Skip to main content

फुसके बार – १४ फेब्रुवारी २०१६

फुसके बार – १४ फेब्रुवारी २०१६
.

१) एबीपीमाझावर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी मिळणा-या मिसळीचे प्रकार दाखवत होते. नाशिकच्या एका ठिकाणच्या मिसळीमध्ये चिवडा, पोहे वगैरे काहीच नसते. मोड आलेली वेगवेगळी कडधान्ये, वेगवेगळ्या प्रकारची शेव, तर्री. मोड आलेल्या कडधान्यांवर एक निखारा ठेवलेली पणती, त्यापासून येणारा धूर आत कोंडावा म्हणून वरून झाकण. त्याचा वेगळाच स्वाद येतो. अशा प्रकारे आपल्याला हवे तसे कमी-अधिक तिखट करून घेता येते

मग ते झाल्यावर ठाणे, पुणे वगैरे टिकाणच्या.

इंग्रजी किंवा इतर कोणत्याही चॅनलवर अशा कार्यक्रमांमध्ये दाखवले जाणारे टीव्हीवाल्यांचे चवीचे रसिक सहसा सडपातळ नसतात; किंबहुना सडपातळ म्हणता येईल याच्या जवळपासही नसतात, यामागचे रहस्य काय असावे?

दुसरी गोष्ट म्हणजे हे खवैय्ये विविध पदार्थ चाखताना उऽऽऽम, वगैरे प्रशंसादर्शक, मादक आवाज काढत असतात, त्यावेळी त्यांच्या कॅमेरामनच्या तोंडाला किती पाणी सुटत असेल. की आधी कॅमेरामनचा पोटोबा शांत करून हे शुटिंग केले जाते? मला विमानतल्या हवाईसुंद-या, रेस्टॉरंटमधले वेटर्स यांच्याबाबतही नेहमी हाच प्रश्न पडतो. त्यांच्यापैकी कोणी पदार्थ वाढताना सारखे आवंढे गिळताना दिसत नाही.

यातला सर्वात मोठा व क्रूर विरोधाभास म्हणजे इकडे हे लोक मिटक्या मारत मिसळ खाण्याचे आधीच रेकॉर्ड केलेले चित्रीकरण दाखवले जात असताना खालच्या पट्टीत काश्मीरमधील कुपवाडात झालेल्ता चकमकीत एक चांदवडचा तर दुसरा विजापूरचा असे दोन जवान मृत झाल्याची व एक मेजर पदाचा अधिकारी गंभीर जखमी झाल्याची बातमी दाखवली जात होती.

यावेळी मात्र सांगलीकडचे कुपवाड आणि काश्मिरातले कुपवाडा यांच्यात गल्लत न करण्याइतके टीव्हीवाले शहाणे झालेले दिसत होते.

२) देशद्रोह म्हणजे नक्की काय ते एकदा ठरवण्याची वेळ आली आहे. देशद्रोह म्हणजे देशाबाहेरच्या शक्तींशी संधान साधून त्यांना संवेदनशील माहिती पुरवणे एवढाच आहे का?

‘कोणी पादले तरी तो देशद्रोह समजला जाईल’ अशी पोस्टही या निमित्ताने पाहण्यात आली. त्यांना हा प्रश्न खडसावून विचारला पाहिजे. केवळ इतरांचा द्वेष करायचा या एकमेव भुमिकेतून विविध पक्षात विभागलेले दलित एकत्र येऊन इतरांचा द्वेष पसरवण्याच्या स्वत:च्या अजेंड्यात साथ देत नाहीत म्हणून थयथयाट करणारे हे महाभाग कळतनकळत या देशद्रोह्यांनाच साथ देत आहेत. त्यामुळे ख-या देशद्रोह्यांवर टीका केली तरी यांच्या पोटात दुखताना दिसते. त्यातूनच कोणी पादले तरी त्याला हे सरकार देशद्रोह समजेल काय अशा हास्यास्पद फुसकुल्या हे महाशय फोडताना दिसतात.

या महाशयांच्या वॉलवर त्यांचे समविचारी मित्र इतर जातीयांचा द्वेष करणा-या कमेंट्स सर्रास महात्मा फुले इत्यादींच्या नावावर नियमितपणे खपवताना दिसतात आणि त्याला यांची अजिबात हरकत नसते. मी कुठल्याही जातीच्या आधारावरील संघटनाविरूद्ध आहे, कारण ते एकूण समाजाच्या हिताचे नाहीच. पण हे महाशय ब्राह्मणांच्या एकत्र येण्याच्या आवाहनांच्या पोस्ट्स वेचून वेचून एकत्र करतात व त्यावर त्यांचे समविचारी मित्र वर उल्लेख केल्याप्रमाणे ब्राह्मणविरोधी कमेंट्स करतात. याला अर्थातच यांची हरकत नसते. मात्र इतरत्र ब्राह्मणांवर जहरी टीका करणा-या पोस्ट्सही इतरत्र सर्रास दिसत असताना त्यात मात्र यांना काही वावगे दिसत नाही. यांच्या स्वत:च्या वॉलवर हा एकांगी प्रकार नेहमीच जळत असताना यांची देशद्रोहाबद्दलची किंवा देशविरोधाची संवेदनाच बधीर झालेली दिसते यात काय आश्चर्य?

जेएनयुमधील विद्यार्थ्यांचे वर्तन देशविरोधी घोषणा वा दहशतवादावरून फाशी झालेल्यांच्या समर्थनार्थ घोषणा देणे हे देशद्रोही वर्तनच समजले पाहिजे. या पार्श्वभुमीवर जेएनयुमध्ये देशविरोधी स्वरूपाच्या घोषणा देणा-यांवर कारवाई करण्याची केन्द्र सरकारच्या भुमिकेचे स्वागतच करायला हवे. त्याचबरोबर या देशद्रोह्यांच्या समर्थनासाठी वेगवेगळे मुखवटे चढवून कोण पुढे येते यावरदेखील लक्ष ठेवले पाहिजे.

रोहित वेमुलाच्या आत्महत्येमुळे हैद्राबाद विद्यापीठातील त्याच्या संघटनेने याकूब मेमनच्या फाशीला मानवतेच्या आधारावर समर्थन करण्याच्या प्रकाराकडे दुर्लक्ष केले गेले किंबहुना पाठीशी घातले गेले. असे समर्थन करण्याच्या उद्योगांमुळे तोही देशद्रोही होता का असा प्रश्न विचारला गेला. डॉ. आंबेडकरांचे नाव तुमच्या संघटनेला देता, त्यांचे कार्य जरूर पुढे न्या, मात्र त्यांच्या नावाची ढाल पुढे करून तुमचे सगळेच उद्योग पवित्र करून घेतले जातील या भ्रमात राहू नका हे स्पष्टपणे सांगण्याची वेळ आली आहे.

अभाविपचे कोठे चुकत असेल, तर ते जरूर दाखवून द्या, त्यांच्या हातून काही गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य घडत असेल, तर ते करणा-या त्यांच्या नेत्यांवर व कार्यकर्त्यांवर जरूर कारवाई करा. मात्र ते करतात ते सगळेच चूक आणि आम्ही राजकीय चळवळीत असूनही वेळ आली की सोयीप्रमाणे दलित, कम्युनिस्ट वगैरे चेहरे मिरवणार आणि स्वत:ला सरसकट निर्दोष, अभागी म्हणवून घेणार. हे यापुढे फार काळ चालेल असे वाटत नाही.

मुळात या मुलांना या वाटेने जाण्यास प्रोत्साहन देणारे कोण आहे हे शोधायला पाहिजे.

रोहित वेमुलाच्या आत्महत्येचे निमित्त झाल्यामुळे हैद्राबाद विद्यापीठात दिवसभर ‘उपोषण’ करणारा नाटकी पप्पू काल जेएनयुमध्येही आला, कारण येथेही भाजपचा निषेध करण्याची संधी त्याला दवडायची नव्हती. मात्र ज्या विद्यार्थानी तेथे देशविरोधी घोषणा दिल्या त्याबद्दल तो काही बोलला नाही.

या लोकांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य नेहमी देशद्रोह्यांच्या किंवा दहशतवाद्यांची भलावण करण्यातच कसे खर्ची होते, हा प्रश्न कोणालाच कसा पडत नाही?

जेएनयुसारखी विद्यापीठे ही डावे विचार असलेल्यांचा बालेकिल्ला मानली जातात, त्यामुळे डी. राजा, सीताराम येचुरी हे तेथील कारवाईवरून चिडणे साहनिकच आहे. पण कुठली कृत्ये देशहिताची नाहीत हे समजण्याइतकी समज कॉंग्रेसकडे; जो राष्ट्रीय पक्ष म्हणवतो; नसावी? पप्पूच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पक्ष म्हणून किती दिशाहीन झाला आहे याचेच हे लक्षण आहे.

जेएनयुमधून पास झालेल्या आर्मीतल्या बुजुर्ग निवृत्त अधिका-यांनीही तेथे चाचलेल्या देशविरोधी उद्योगांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे व असेच प्रकार चालू राहिले तर आम्हाला या विद्यापीठाकडून मिळालेल्या पदव्या परत कराव्या लागतील असे त्यांनी सांगितले आहे.

३) द्रमुक – कॉंग्रेसची हातमिळवणी देशाला लुटणारे पुन्हा एकत्र

तामिळनाडुतल्या आगामी विधानसभेच्या निवडणुकांसाठी द्रमुक व कॉंग्रेसच्या युतीची आज घोषणा झाली. याच दुकलीने मनमोहनसिंग यांच्या स्वच्छ प्रतिमेच्या आड देशाला लुटले होते. लुटले होते हा शब्दही तोकडा ठरावा इतके लुटले होते.

२जी घोटाळे उघड झाल्यावर द्रमुकचे तोन मंत्री थोडाकाळ गजाआड गेल्यामुळे या दोन पक्षांमध्ये वितुष्ट असल्याचे चित्र होते. मात्र आता निवडणुका जवळ आल्या की हे दोन्ही लुटारू पुन्हा एकत्र आलेले आहेत.

या मैत्रीवरून पप्पूला कोणी विचारल्याचे ऐकिवात नाही. त्याच्या पक्षाने च द्रमुकने केलेल्या लुटालुटीची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे काही बोलणे योग्य नसल्याचे कारण पप्पू देईल.

इकडे अशा अभद्र युत्या, तिकडे पंजाबात भाजपही अकाली दलाशी असलेली युती सोडेल अशी चिन्हे नाहीत. अकाली दलानेही पंजाबला व पंजाबातील तरूणांना देशोधडीला लावण्यात कसलीच कसर सोडलेली नाही. महाराष्ट्रात यापूर्वी भाजप शिवसेनेच्या भ्रष्टपणाच्या व गुंडगिरीच्या दावणीला बांधलेला होता, तोच प्रकार त्यांच्याबाबतीत पंजाबमध्ये झाला आहे. पंजाबात अमरिंदरसिंग यांच्या नेतृवाखाली कॉंग्रेसचे सरकार येऊन त्यांनी तरी तरुणाईला ड्रग्जच्या विळख्यातून वाचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत अशी इच्छा आहे.

४) थॅचर यांच्या ख्रिसमसचे जबरदस्तीचे पाहुणे

टिम बेल हे ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांचे मित्र व सल्लागारही. त्यामुळे सलग जवळजवळ १२ वर्षे त्यांना थॅचर यांच्या निवासस्थानी ख्रिसमस साजरा करावा लागला.

पहिल्या वर्षी त्यांना जेव्हा यासाठीचे निमंत्रण मिळाले तेव्हा त्यांना कोण आनंद झाला होता. पंतप्रधानांच्या घरचा ख्रिसमस. परंतु त्यानंतर सलग एवढी वर्षे त्यांच्याकडेच ख्रिसमस साजरा करावा लागल्यामुळे व त्यात अगदी तोचतोचपणा असल्यामुळे व एकूणच रडाळपणा असल्यामुळे ते इतके कंटाळले होते की आता थॅचर पंतप्रधानपदी न राहतील तर बरे असे त्यांना झाले होते.

५) व्हॅलेंटाइन डे आपल्याकडे का साजरा करावा? अगदी कोणी पती पत्नी नसले तरी एकमेकांचे वाढदिवस असतात. त्याव्यतिरिक्त साजरे करायला सतत काही ना काही निमित्त लागते हेच त्यामागचे कारण असते. पतीपत्नींना एकमेकांच्या वाढदिवसाशिवाय लग्नाचा वर्धापनदिन तरी असतो, आमचे काय ही प्रेमींची अडचण असावी.

पण एखाद्या दिवशी ठरवून आपले प्रेम व्यक्त करायचे यातच कृत्रिमपणा येत नाही का? की तो कृत्रिमपणाही आजकाल आवश्यक झाला आहे?

राही Thu, 25/02/2016 - 14:19

In reply to by अनु राव

म्हणजे राकु इथे जे करतायत तसेच तिथे चाललेय? म्हणजे तिथे चाललेय तसेच इथे चाललेय? बिनबुडाचे आरोप करणे, त्रास देणे, खोटे विदा देणे, भीतीचे वातावरण तयार करणे? म्हणजे राकु असे करतात तर.

अनु राव Thu, 25/02/2016 - 14:24

In reply to by राही

राकु खोटा विदा देतात, पण त्यात त्यांचा स्वार्थ नसतो. बाकीचे सर्व त्यांना लागु नाही.
फाटे फोडुन काहीही मिळणार नाही तुम्हाला.

माझ्यात आणि राकुंच्यात भांडण लाऊ नका राही तै. तसे ते होणार नाही.

राजेश कुलकर्णी Thu, 25/02/2016 - 14:03

In reply to by राही

राही,
मी काही गैसमज करून घेत नाही. पण म्हणीचा उत्तरार्ध थोडा गैरलागू आहे. आहे. सोडले तर मी काही पळून जात नाही. येथेच राहतो. निर्लज्जासारखे म्हणा हवे तर. येथून जा असे संपादकांनी सांगूनही.
भाषा आवडत नाही - सर्वांचीच भाषा तुम्हाला आवडेल अशी कशी असू शकेल? तुम्ही कमेंटमधल्या की पोस्टमधल्या, की दोन्हीतील भाषेबद्दल म्हणताय माहित नाही. कमेंटवरची भाषा सहसा कमेंटकर्त्यांच्या भाषेवर व हेतुवर अवलंबून असते आणि पोस्टमधली भाषा हा माझ्या स्वातंत्र्याचा भाग आहे. तेव्हा बंदी आणायची तर कशासाठी तेही सांगा.
तुम्ही अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा उल्लेख केलात म्हणून, श्रेणी देणे हा त्याच्यावरचा घाला अाहे असे तुम्हाला वाटते का? मी वर तुमची श्रेणी चुलीत घाला असे म्हटले तेही कदाचित तुम्हाला आवडले नसेल. पोस्ट वाचनमात्र करणे, हव्या तशा व तेथे हलवणे, यात अभिव्यक्तीस्वातंत्रयाचा संकोच झाला असे तुम्हाला वाटले की नाही माहित नाही.
मला श्रेय नको, पण असा निर्लज्जपणा केला, म्हणूनच संपादकमंडळी सदर नावाचा वेगळा उपक्रम करत आहेत? अन्यथा मला या पोर्टलबाहेर माझा-माझा ब्लॉग काढायला अनेकदा सांगण्यात आले होते. भविष्यात इतरांनाही असेच सांगितले गेले असते.
असो.

राही Thu, 25/02/2016 - 20:56

In reply to by राजेश कुलकर्णी

इथे पळणं म्हणजे सुसाट सुटणं.

"हे ऐसीचे आंगण, आम्हां दिले आहे आंदण,
आम्ही देऊ, कसेही प्रतिसाद रे.
मालक बोलेनाssत. मालक काही केल्या ब्यानेनाssत रे."

राजेश कुलकर्णी Thu, 25/02/2016 - 11:48

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तुमची श्रेणी गेली चुलीत.
मूळ माहितीच्य संदर्भाबद्दल सतत करवादत जाऊ नका. मी काही येथे पीएचडीचा थेसिस साजरा करत नसतो, ना तुम्ही माझे एक्झामिनर आहात. की प्रत्येक गोष्टीचा संदर्भ द्यावा. स्वत:कडे तर्क नावाचा प्रकार नसेल किंवा स्वत:ला विचित्र तर्क काढण्याची सवय असेल तर त्यातूनही दुस-याचा तर्काचा अभाव दिसू शकतो का हे एकदा तपासून पहा. 'एकंदरीत कुरूपपणा' हा तर सिक्सरच. यावर काय लिहावे यावरून माझी मती कुंठित झाली आहे.

मेघना भुस्कुटे Thu, 25/02/2016 - 12:00

In reply to by राजेश कुलकर्णी

यावर काय लिहावे यावरून माझी मती कुंठित झाली आहे.

अदितीचे त्रिवार अभिनंदन. राही यांना मनापासून दुजोरा.

चिंतातुर जंतू Thu, 25/02/2016 - 12:05

In reply to by राजेश कुलकर्णी

>> हवे तर आताचे सरकार तसे जोमाने करते आहे असे समजा असे ते म्हणाले. शिवाय एक विचारधारा या देशात सत्तेपासून वारंवार डावलली गेली आहे. आता (पूर्ण बहुमताची संधी) असल्यामुळे त्यांनी त्यांना हवे असलेल्या गोष्टी घडवून आणणे साहजिक असल्याचे ते म्हणाले.

हे साहजिक असलं तर ते सत्तालोभाच्या चौकटीतच; पण म्हणून ते गैर नाही असा अर्थ त्यातून निघत नाही, आणि पळशीकरांनाही तो अभिप्रेत नसावा.

>> त्यामुळे आताच्या माध्यमांकडून निष्पक्षपणाची अपेक्षा ठेवणेच गैर असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय चर्चांचे विषयदेखील भडक असतात, त्यात तुम्हाला एक कोणती तरी बाजू घ्यावीच लागते, अन्यथा प्रेक्षकांचे ‘मनोरंजन’ होत नाही असे ते म्हणाले. त्यामुळे बोलताना मुद्द्याच्या दोन्ही बाजू सांगू पाहणारा वक्ता त्यांच्या पसंतीस पडत नाही, या अर्थाने लोकही या स्थितीस जबाबदार आहे असे ते म्हणाले.

हे मान्य केलं तर ह्या माध्यमांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करणं आणि त्यांच्या भूलथापांना बळी न पडता सत्य काय आहे ह्याची शहानिशा करणं अधिकच महत्त्वाचं ठरतं. विशेषतः राष्ट्रीय पातळीवरच्या प्रमुख वाहिन्यांवर खोटे व्हिडिओ दाखवून जनमत भडकावण्याचे पद्धतशीर प्रयत्न होत असताना.