विवेकानंदांची पत्रे वाचतांना मनात आलेले विचार .

मला हिंदु धर्मातील सर्वसंगपरीत्याग संन्यास हि संकल्पना नेहमीच इंटरेस्टींग ( सीरीयसली या अर्थाने इंटरेस्टींग ) वाटत आलेली आहे, एक माणुस एका महान ध्येय्यासाठी वा त्याच्या द्रुष्टीने अधिक श्रेयस्कर अशा अर्थपुर्ण तत्वासाठी वा उच्चत्तम जीवन जगण्यासाठी इतर सर्व मानवी नातेसंबंधांचा त्याग करतो. हे विचारणीय आहे. माणुस खरोखर सर्वसंगपरीत्याग मुळात करु शकतो का ? करण्याने करण्याचा अविर्भाव केल्याने तसे करता येणे शक्य असते का ? मुळात असे त्याला का करावेसे वाटते ? जन्मापासुन ते मृत्युपर्यंत माणुस कुठल्या ना कुठल्या गोष्टीशी व्यक्तीशी संबधात असतोच असतो. अगदि एकाकी बेटावर राहणारा देखील तेथील निसर्गाशी निर्जीव वस्तुंशी स्वत:ला रीलेट करतच असतो. एखादा जगाशी तोडुन राहणारा हि जगाशी विरोधाने का होइना बांधलेलाच असतो. मोनास्ट्रीत अनेक वर्षे एकाकी राहणारे मोनास्ट्रीशी घट्ट संबंधितच असतात. तर हे डिसकनेक्ट करणे होणे शक्य असते का ?

दुसरा एक भाग म्हणजे धार्मिक व्यक्तींची एक अपेक्षा असते की जी मला कायम दांभिक वाटते ती अशी की मी एक महान कार्य करीत आहे ध्येय्यासाठी जगत आहे तर आता तुमची म्हणजे सामान्य जनांची अशी जबाबदारी आहे की तुम्ही माझ्या सर्व्हायव्हल ची माझ्या लिव्हींग ची जबाबदारी घेतलीच पाहिजे नव्हे ते तुमचे नैतिक कर्तव्यच आहे. या सर्व्हायव्हल च्या अपेक्षेने परत स्वत:च इतरांशी बांधुन घेण येतच. याने असा माणुस संपुर्ण आयुष्याशी इंटीग्रेट राहण प्रामाणिक असण टाळतच असतो. माझा एक आयुष्याचा महत्वपुर्ण भाग भुमिका मी इतरांवर लादतो करवुन घेतो अशा अर्थाने. पण आयुष्य असे सोयिस्कर तुकड्यात तोडुन जबाबदारी व त्यापेक्षा भुमिका व त्या अनुषंगाने येणारे सर्व अनुभव आघात यांना सामोर जाण या पासुन एक दांभिक पलायन असा माणुस करत असतो अशा कुठल्याही माणसाला जीवनाच परीपुर्ण आकलन होण शक्य आहे का असत का ?

इथे हिंदु धर्माच उदाहरण घेतलय पण हे सर्वच धर्माबाबत लागु होत, अजुन एक बाब अशी की अशा धर्माच्या संकल्पनांच्या प्रत्यक्ष आचरणात आणण्याने निर्माण होणारी मानवी मनाची तीव्र कुचंबणा व ताण.व त्याने हतबल होणारा माणुस, अशी माणस आपली नैसर्गिक सहजता व संवेदनशीलता हरवुन बसतात. त्याहुन वाईट म्हणजे ते आपली मुलभुत प्रामाणिकता इंटेग्रीटी हरवुन दांभिक बनतात.

विवेकानंद यांची हि पत्रे वाचुन माझ्या मनात वरील विचार चक्र सुरु झाले. त्यांचे हे पत्र पहा

X
To Mrs. G. W. Hale
DETROIT,
20 February 1894.
DEAR MOTHER,
My lectures here are over. I have made some very good friends here, amongst them Mr. Palmer,* President of the late World's Fair. I am thoroughly disgusted with this Slayton* business and am trying hard to break loose. I have lost at least $5,000 by joining this man. Hope you are all well. Mrs. Bagley and
her daughters are very kind to me. I hope to do some private lecturing here and then go to Ada and then back to Chicago. It is snowing here this morning. They are very nice people here, and the different clubs took a good deal of interest in me.
It is rather wearisome, these constant receptions and dinners; and their horrible dinners — a hundred dinners concentrated into one — and when in a man's club, why, smoking on between the courses and then beginning afresh. I thought the Chinese alone make a dinner run through half a day with intervals of smoking!!

However,they are very gentlemanly men and, strange to say, an Episcopal clergyman* and a Jewish rabbi* take great interest in me and eulogize me. Now the man who got up the lectures here got at least a thousand dollars. So in every place. And this is Slayton's duty to do for me. Instead, he, the liar, had told me often that he has agents everywhere and would advertise and do all that for me. And this is what he is doing. His will be done. I am going home. Seeing the liking the American people have for me, I could have, by this time, got a pretty large sum. But Jimmy Mills* and Slayton were sent by the Lord to stand
in the way. His ways are inscrutable.

However, this is a secret. President Palmer has gone to Chicago to try to get me loose from this liar of a Slayton. Pray that he may succeed. Several judges here have seen my contract, and they say it is a shameful fraud and can be broken any moment; but I am a monk — no self-defence. Therefore, I had better throw up the whole thing and go to India.
My love to Harriets, Mary, Isabelle, Mother Temple, Mr. Matthews, Father
Pope and you all.*
Yours obediently,
VIVEKANANDA.

इथे विवेकानंद एक कुचंबणा अनुभवतात आणि एक दांभिकता दर्शवितात जी प्रातिनीधीक आहे. त्यांची हि पत्रे अशा माणसाची स्थिती दर्शवतात. यातले पहिले पत्र पहा यात एक पारंपारीक ट्विस्टेड नैतिक भुमिका विवेकानंद कशी घेतात ती दांभिकता बघण्यासारखी आहे. या पत्रात स्पष्टपणे असे दिसुन येते की विवेकानंदांनी स्लेटन या व्यक्तीबरोबर एक लिखीत करार केलेला होता ज्या अनुसार त्याने विवेकानंदांसाठी अमेरीकेत चांगल्या ठिकाणी सभांचे/व्याख्यानांचे आयोजन करावयाचे होते त्या सभांची चांगली अ‍ॅडव्हर्टाइज करणे व त्यांद्वारे चांगला निधी विवेकानंदांसाठी उभा करणे अपेक्षीत होते. या पत्रात विवेकानंद आपला राग व्यक्त करत आहेत की कसे त्यांना ५००० डॉलर चे नुकसान झालेय इ. व मी अधिक पैसा मिळवु शकलो असतो मात्र स्लेटन ने कराराप्रमाणे चांगले काम केले नाहि इ. तर करार करुन विवेकानंद पस्तावलेले दिसतात. यापुढच्या पत्रातील भागात विवेकानंद अत्यंत दांभिक भुमिका घेतांना दिसतात. ते म्हणतात त्यांचा नविन मित्र मि. पामर हा स्लेटन च्या करारा च्या प्रकरणातुन सुटका करण्यासाठी शिकागो ला गेलेला आहे व पुढे पामर मला वाचवण्यात यशस्वी होवो अशी ईश्वराकडे प्रार्थना माझ्यासाठी कर असे हि ते पत्रात मिसेस हेल ला सांगतात. अजुन एकीकडे अनेक जजेस ना त्यांनी हे कॉट्रॆक्ट दाखवुन कायदेशीर सल्ला हि घेतलेला दिसतो असे पत्रावरुन दिसते. तर एकीकडे सल्ला घेण मित्राकरवी मदत घेण व ईश्वराला प्रार्थना करण हा करार भंग करण्यासाठी सर्व भौतिक प्रयत्न जोरात चालवलेले दिसतात. आणि त्याच बरोबर ते अत्यंत दांभिकतेने मिसेस हेल ला म्हणतात कि हे कंत्राट मोडता येउ शकते असा सल्ला जजेसने दिलेला आहे ( पण त्यांना तसे करण्याचे धाडस हि अर्थातच दिसुन येत नाही) म्हणुन ते म्हणतात की " पण मी तर एक संन्यासी आहे - नो सेल्फ़ डिफ़ेन्स तर मी स्वत:चा बचाव करणार नाही तर मग मी अ‍ॅज अ सन्यासी काय करेल ? मी संन्यासी आहे मी या फ़ंदात पडणार नाही असे सुचवत ते म्हणतात की देअरफ़ोर आय हॅड बेटर थ्रो अप द व्होल थिंग अ‍ॅंड गो टु इंडिया ( हे सर्व सोडुन मी सरळ हिंदुस्थानात निघुन जाईल)
वादासाठी मान्य केले की करार कदाचित अन्यायकारक असेल एकतर्फ़ि असेल किंवा स्लेटन हा करार जसा अंमलात आणायला हवा तसा आणतही नसेल कदाचित. परंतु पहिल्यांदा मुळात लिखीत करार करावयाचा त्याची तयारी दर्शवायची त्यातुन निर्माण होणारा सर्व व्यावहारिक भौतिक फ़ायदा याची पुरेपुर अपेक्षा बाळगायची, तो अपेक्षेप्रमाणे प्रत्यक्षात येत नसतांना दिसल्यावरच व अपेक्षीत पैशाच्या लाभाची शक्यता क्षीण झाल्यावर, एकिकडे तो करार मित्राकरवी भंग करण्याचे प्रयत्न करणे जजेस चे कायदेशीर सल्ले घेणे व सर्व प्रयत्न फ़ोल आहेत वाटल्यावर.मग आता काय करायच तर म्हणायच मी संन्यासी आहे नो सेल्फ़ डिफ़ेन्स ? मग जजेस ना करारप्रत दाखवुन सल्ला घेणे काय आहे ? पळुन जाणे पलायन करणे करार भंग करुन स्वत:ची नैतिक जबाबदारी झटकणे. व ती झटकतांना मला काय व्यावहारीक भौतिक जगाचे प्रयोजन मी तर संन्यासी आहे. मी आपला सरळ निघुन जाणार सर्व काहि सोडुन. आय शल रन अवे नो सेल्फ़ डिफ़ेन्स मी मैदानातुन पळ काढणार. का मी तर संन्यासी च आहे,. शिवाय हे सर्व सीक्रेट आहे हे देखील मिसेस हाल ला बजावयाला ते विसरत नाहीत. म्हणजे सिक्रेट ली पलायन ? हे प्रातिनीधीक आहे नैतिक भुमिका घेणे टाळणे त्या अनुषंगाने येणारे आघात टाळणे व भौतिकतेचे सोयिस्कर विभाजन दांभिकतेने करणे हे सर्व सर्व प्रातिनीधीक आहे जे सर्व च धर्मांमधे आढळुन येउ शकते.

दुसरी दोन पत्रे पहा

CXXVIII
Maharaja Ajit Singh, the Raja of Khetri
MATH BELUR
22 November 1898
YOUR HIGHNESS —
Many thanks for your kind note and the Nimbarka Bhashya — reached through Jaga Mohan Lalji. I approach your Highness today on a most important business of mine,knowing well that I have not the least shame in opening my mind to you, and that I consider you as my only friend in this life. If the following appeals to you, good; if not, pardon my foolishness as a friend should. As you know already, I have been ailing since my return. In Calcutta your Highness assured me of your friendship and help for me personally and [advised me] not to be worried about this incurable malady. This disease has been caused by nervous excitement; and no amount of change can do me good,
unless the worry and anxiety and excitement are taken off me.
After trying these two years a different climate, I am getting worse every day and now almost at death's door. I appeal to your Highness's work, generosity and friendship. I have one great sin rankling always in my breast, and that is [in order] to do a service to the world, I have sadly neglected my mother. Again,
since my second brother has gone away, she has become awfully worn-out with grief. Now my last desire is to make Sevâ [give service] and serve my mother, for some years at least. I want to live with my mother and get my younger brother married to prevent extinction of the family. This will certainly smoothen my last days as well as those of my mother. She lives now in a hovel. I want to build a little, decent home for her and make some provision for the youngest, as there is very little hope of his being a good earning man. Is it too much for a royal descendent of Ramchandra to do for one he loves and calls his
friend? I do not know whom else to appeal to. The money I got from Europe was for the "work", and every penny almost has been given over to that work. Nor can I beg of others for help for my own self. About my own family affairs
— I have exposed myself to your Highness, and none else shall know of it. I am tired, heartsick and dying. Do, I pray, this last great work of kindness to me, befitting your great and generous nature and [as] a crest to the numerous kindnesses you have shown me. And as your Highness will make my last days
smooth and easy, may He whom I have tried to serve all my life ever shower His choicest blessings on you and yours.
Ever yours in the Lord,
VIVEKANANDA
P.S. This is strictly private. Will you please drop a wire to me whether you will do it or not?
Ever yours,
VIVEKANANDA

CXXIX
To Maharaja Ajit Singh, the Raja of Khetri
MATH BELOOR
HOWRAH DISTRICT
1 December 1898
YOUR HIGHNESS —
Your telegram has pleased me beyond description, and it is worthy of your noble self. I herewith give you the details of what I want. The lowest possible estimate of building a little home in Calcutta is at least ten thousand rupees. With that it is barely possible to buy or build a house in some out-of-the-way quarter of the town — a little house fit for four or five persons
to live in. As for the expenses of living, the 100 Rs. a month your generosity is supplying my mother is enough for her. If another 100 Rs. a month be added to it for my lifetime for my expenses — which unfortunately this illness has increased, and
which, I hope, will not be for long a source of trouble to you, as I expect only to live a few years at best — I will be perfectly happy. One thing more will I beg of you — if possible, the 100 Rs. a month for my mother be made permanent, so that even after my death it may regularly reach her. Or even if your Highness ever gets reasons to stop your love and kindness for me, my poor old mother may be provided [for], remembering the love you once had for a poor Sâdhu.
This is all. Do this little work amongst the many other noble deeds you have done, knowing well whatever else can be proved or not, the power of Karma is self-evident to all. The blessings of this good Karma shall always follow you and yours. As for me, what shall I say — whatever I am in the world has been
almost all through your help. You made it possible for me to get rid of a terrible anxiety and face the world and do some work. It may be that you are destined by the Lord to be the instrument again of helping yet grander work, by taking this load off my mind once more. But whether you do this or not, "once loved is always loved". Let all my love and blessings and prayers follow you and yours, day and night, for what I owe you already; and may the Mother, whose play is this universe and in whose
hands we are mere instruments, always protect you from all evil.
Ever yours in the Lord,
VIVEKANANDA

यात अत्यंत लाचार झालेले हतबल असहाय्य अशा अवस्थेतले विवेकानंद खेत्री संस्थानचे महाराजा अजित सिंग यांच्याकडे आपल्या आईसाठी १०० रु महिना व स्वत:साठी १०० रुपये महिना आर्थिक मदत मागतांना दिसतात. हे अतिशय करुण उदास करणार अस पत्र आहे याने विवेकानंद यांची झालेली कुचंबणा दिसुन येते. जी खरोखर अनेक प्रश्न मनात उभे करते जे वरील परीच्छेदात उपस्थित केले होते की खरच माणुस आपले रीलेट होणे नातेसंबंध यांचा त्याग करु शकतो का ? व एकीकडे अमुर्त संकल्पना जीवनात उतरवतांना निर्माण होणारा ताण व कुचंबणा याने निर्माण होणारी ह्युमन सिच्युएशन हि पुन्हा गंभीरतेने अवलोकन करण्यासारखी आहे. यात ते अत्यंत प्रांजळ पणे कबुल करतात की जगाची सेवा करता करता आय हॅव सॅडली निगलेक्टेड माय मदर त्यात ते प्रामाणिकतेने म्हणता की आय हॅव एक्स्पोज्ड मायसेल्फ़ टु युवर हायनेस आणि इतर कोणालाही या संदर्भात काहीही कळणार नाही. ही मदतीची मागणी विवेकानंद अत्यंत कसोशीने गुप्त ठेवण्याचा इतरांपासुन लपवण्याचा प्रयत्न करत असलेले दिसतात पत्रा अखेरीस पोस्ट स्क्रीप्ट जोडुन पुन्हा धिस इज स्ट्रीक्टली प्रायव्हेट हे लिहायला ते विसरत नाहीत. यात अतिशय लाचारीने राजा ची स्तुती करणारे त्याला रामचंद्राचा वंशज म्हणणारे व इतकी छोटी मदत त्यांच्यासारख्या राजासाठी मोठी आहे का ? असे अजीजीने विचारणारे, त्याच बरोबर मिशन च्या कार्यासाठी जमवलेल्या पैशाचा विनीयोग स्वत:च्या वैयक्तीक गरजांसाठी इतक्या मजबुरीतही कमालीच्या प्रामाणिकपणे टाळणारे विवेकानंदही दिसतात. ते त्यांची कुचंबणा हि व्यक्त की एकीकडे ते त्यांनी कार्यासाठी उभारलेला पैसा व्यक्तीगत कारणासाठी वापरु शकत नाही व दुसरी कडे इतर कोणाला देखील ते भीक मागु शकत नाहीत. महाराजांनी देखील तत्काळ त्यांना ८ च दिवसात प्रतिसाद दिलेला आहे असे या दोन पत्रांवरुन दिसते. त्यांचा एक भाउ वारलेला आहे व दुसरा कोण जाणे कसा पण कमावण्याच्या लायकीचा नाही असे ते राजांना सांगतात व म्हणुन आईला मदतीची आवश्यकता कशी आहे हे ते सांगतात. त्यांच्या मनात पुढे मागे आपल्यावरील राजाचे प्रेम आटले तर मिळणारी मदत बंद होण्याची भीती ही दिसुन येते. त्या केसमध्ये किमान आईला मिळणारी मदत तरी बंद होउ नये अशी कळवळुन विनंती करणारा पुत्र विवेकानंद दिसतो. शिवाय ईश्वरानेच कदाचित तुम्हाला अशा महान कामात साधन बनण्याचे सौभाग्य दिलेले आहे की ज्यायोगे तुम्ही माझ्या मनावरचा मोठा भार कमी करत आहात हे जोडायलाही ते विसरत नाहीतच.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

माणुस खरोखर सर्वसंगपरीत्याग मुळात करु शकतो का ? करण्याने करण्याचा अविर्भाव केल्याने तसे करता येणे शक्य असते का ? मुळात असे त्याला का करावेसे वाटते ? जन्मापासुन ते मृत्युपर्यंत माणुस कुठल्या ना कुठल्या गोष्टीशी व्यक्तीशी संबधात असतोच असतो. अगदि एकाकी बेटावर राहणारा देखील तेथील निसर्गाशी निर्जीव वस्तुंशी स्वत:ला रीलेट करतच असतो. एखादा जगाशी तोडुन राहणारा हि जगाशी विरोधाने का होइना बांधलेलाच असतो. मोनास्ट्रीत अनेक वर्षे एकाकी राहणारे मोनास्ट्रीशी घट्ट संबंधितच असतात. तर हे डिसकनेक्ट करणे होणे शक्य असते का ?

मला वाटतं सर्वसंगपरित्याग हे ध्येय (destination) नसून एक tool आहे, प्रवास आहे, सत्चिदानंद/शांती प्राप्त करण्याचा. You aren't out to achieve सर्वसंगपरित्याग but by means of it you want to achieve शांती/मौन्/ज्ञान्/सत-चित-आनंद.

दत्तात्रेयांचे २४ गुरु होते पैकी,एक गुरु- धान्य कांडणारी स्त्री होती. या स्त्रीने अनेक बांगड्या घातल्या होत्या व ती धान्य कांडत होती त्यामुळे अविरत खळखळ आवाज येत होता. मग तिने प्रत्येक हातात २ च बांगड्या ठेवल्या. आवाज कमी तर झाला परंतु पूर्ण शांतावला नाही. मग तिने एक बांगडी प्रत्येक हातात ठेवली.
यावरुन दत्तात्रेयांनी निष्कर्ष काढला की - अगदी अध्यात्मात पुढे गेलेल्या लोकांनीही फार जमाव करुन राहू नये, ज्यायोगे गॉसिप (कुलंगड्या?) करण्यास पोषक वातावरणनिर्मीती होते.
"एकला चालो रे."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुसरा एक भाग म्हणजे धार्मिक व्यक्तींची एक अपेक्षा असते की जी मला कायम दांभिक वाटते ती अशी की मी एक महान कार्य करीत आहे ध्येय्यासाठी जगत आहे तर आता तुमची म्हणजे सामान्य जनांची अशी जबाबदारी आहे की तुम्ही माझ्या सर्व्हायव्हल ची माझ्या लिव्हींग ची जबाबदारी घेतलीच पाहिजे नव्हे ते तुमचे नैतिक कर्तव्यच आहे.

शॉल्लेट.

यालाच पब्लिक चॉईस थियरी मधे "Dispersed/diffused costs and concentrated benefits" असं म्हणतात.

दुसरे म्हंजे त्यांना हे प्रचंड पटलेले असते की ते जे करत आहेत ते महान कार्य आहे. कशावरून ??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माणुस खरोखर सर्वसंगपरीत्याग मुळात करु शकतो का ? करण्याने करण्याचा अविर्भाव केल्याने तसे करता येणे शक्य असते का ? मुळात असे त्याला का करावेसे वाटते ?

प्रत्येकाच्या आयुष्यात कसेही जगले तरी कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या तापपीडा असतातच. त्यांचं कारण बर्‍याचदा शोधणं शक्य नसतं किंवा उपयोगाचं नसतं. नेमकं कारण न कळल्याने "तुमची सध्याची एकूण (जगण्याची) प्रोसेस चुकीची आहे" असं सांगणार्‍या गुरु किंवा तत्सम लोकांचं म्हणणं लोकांना पटायला लागतं. सध्याच्या प्रोसेसपेक्षा ड्रास्टिकली वेगळं काही करायला सुरुवात करणे म्हणजे चूक सुधारणे अशी मानसिकता असल्याने जितके जास्त ड्रास्टिक बदल तितकं "करेक्टिव्ह अ‍ॅक्शन"चं समाधान जास्त.

या विचारप्रक्रियेवर भरपूर वेगवेगळे पंथ, उपचारपद्धती, गुरुशिष्य निघाले आहेत आणि निघत राहणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी एक महान कार्य करीत आहे ध्येय्यासाठी जगत आहे तर आता तुमची म्हणजे सामान्य जनांची अशी जबाबदारी आहे की तुम्ही माझ्या सर्व्हायव्हल ची माझ्या लिव्हींग ची जबाबदारी घेतलीच पाहिजे नव्हे ते तुमचे नैतिक कर्तव्यच आहे.

असं नक्की कोण म्हणतं? नाही, माझं अज्ञान असेल, आहेच. पण ऐकायला आवडेल.
हे सन्यासी लोक आपापला मार्ग अनुसरत असतेवेळी, अन्य लोक उगाच्त्यांना महत्त्व देऊ लागतात.
उदा - वासुदेवानंद सरस्वती, ५ का किती घरं भिक्षा मागून नंतर ती झोळी नर्मदेत बुसवुन अर्थात चव मारुन अन्नग्रहण करत असत. आता कोणाला म्हणजे सर्वसामान्यांना ती गोष्ट फार अपील झाली तर त्यात वासुदेवानंद सरस्वतींचा काय दोष?
इतकेच काय एकाकी जीवन आवडत असलेल्या त्यांच्या मागे मागे लोक लागत.
ज्ञानेश्वरांनी कधी म्हटले आहे काय की मी आता एक महान कार्य करणार आहे ते म्हणजे एका ग्रंथाची निर्मिती?
_____
या लोकांनी सामान्यांपासून कधीच अपेक्षा ठेवलेली नाही. असल्यास उदाहरण द्याच.
______
हे लोक स्वतःचे निहीत (का काय ते म्हणजे destined) कार्य करत असतात अन कारंज जसं मुद्दाम अन्य लोकांना भीजवत नाही पण त्याच्या संपर्कात कोणी आले की प्रसन्न तुषार अंगावर पडल्याखेतरीज रहात नाहीत तद्वत लोकच त्यांना मोठेपणा देऊ पहातात, देतात, एकटं सोडत नाही. साधनेत व्यत्यय आणतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असं नक्की कोण म्हणतं? नाही, माझं अज्ञान असेल, आहेच. पण ऐकायला आवडेल.

तुमच्या प्रश्नाचे काहीसे उत्तर द्यायचा यत्न करतो. ही जबाबदारी एक प्रकारे moral compunction म्हणून काम करते. इथेच कॉमन लॉ व लेजिस्लेटिव्ह लॉ मधला फरक दिसतो. तुमच्या दारात आलेल्या संन्याशास भिक्षा न देणे यात तुम्हास किमान काही प्रमाणावर moral compunction वाटू शकते. म्हणून तुम्ही देता. व हे moral compunction धर्म व अध्यात्माच्या माध्यमातून प्रचार्/प्रसार वापरून केले जाते. संन्याशास भिक्षा न देणे यात तुम्हाला prudential objection नाही वाटणार.

पुनश्च - मी दिलेले उत्तर अगदीच भोंगळ असेल तर सोडून द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या सर्वसंगपरित्यागाला केव्हा उदात्तीकरण प्राप्त झालं कोण जाणे. पण कथांमध्ये उल्लेख येतात ते ऋषीमुनींचे, इंद्रपद किंवा वर मिळवण्याकरता तपश्चर्या केल्याचे.
उत्तर भोंगळ नाही.
(१) सटली एखादे न-कर्तव्य हे कर्तव्याच्या रुपाने लादले जाऊ शकते........... तुम्ही म्हणता त्याप्रमाणे
(२) तरीही मला वाटतं की - अतिथी देवो भव, याचकाला विन्मुख पाठवू नये अशा अध्यात्मिक अगदी नसलेल्या पण "मूल्यात्मक शिकवणींमुळे" सामान्य जन भिक्षा देत असावेत.
पण (१) आणी (२) ची टक्केवारी किंवा प्रत्येकाचा जनमानसावरील पगडा हा व्हेगच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बहुधा उपनिषत्कालापासून सर्वसंगपरित्यागाची कन्सेप्ट जास्त रूढ झाली असावीसे वाटते.

या निमित्ताने जन्म घेऊन कर्मे करून परत त्यांतून बाहेर पडण्याऐवजी गर्भावस्थेत असतानाच प्रयत्न करून मोक्ष मिळवल्याची एका ऋषीची कथा आठवली. अस्सं पायजे. उगा जन्म घ्या, मग गुरू शोधा वगैरे भानगडच नाय. जर एवीतेवी सर्वसंगपरित्यागच करायचा आहे तर जन्म तरी कशाला घ्या, नै का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जर एवीतेवी सर्वसंगपरित्यागच करायचा आहे तर जन्म तरी कशाला घ्या, नै का?

अगदी अगदी.

गर्भावस्थेत असतानाच प्रयत्न करून मोक्ष मिळवल्याची एका ऋषीची कथा

हाण्ण तेजायला ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>सर्वसंगपरित्यागच करायचा आहे तर जन्म तरी कशाला घ्या, नै का?

भारतात दरहजारी कमीतकमी २० मुलांना असा मोक्ष मिळतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अतिथी या शब्दा चा इतिहास या मागचा अर्थ अत्यंत वेगळा आहे.
अत्यंत नम्रतेने भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास हे राजवाडे यांच अतिशय छोटेखानी पुस्तक मला वाटत नेटवर देखील
सुदैवाने उपलब्ध आहे अवश्य् वाचुन बघा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओके.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी एक महान कार्य करीत आहे ध्येय्यासाठी जगत आहे तर आता तुमची म्हणजे सामान्य जनांची अशी जबाबदारी आहे की तुम्ही माझ्या सर्व्हायव्हल ची माझ्या लिव्हींग ची जबाबदारी घेतलीच पाहिजे नव्हे ते तुमचे नैतिक कर्तव्यच आहे.

मी एक महान तत्काळ आर्थिक मोबदला न देणारे किंवा सद्यस्थितीत आर्थिक सरप्लस न बनवू शकणारे, पण माझ्या ठाम मतानुसार दीर्घकालीन सार्वजनिक फायद्याचे, कार्य करीत आहे ते पूर्ण करण्याच्या ध्येयासाठी जगत आहे तर आता तुमची म्हणजे सामान्य जनांची अशी जबाबदारी आहे की तुम्ही माझ्या सर्व्हायव्हल ची माझ्या लिव्हींग ची जबाबदारी घेतलीच पाहिजे तुम्हाला जर माझं ध्येय पोटेन्शियल सर्वोन्नतीकारक वाटत असेल तर, आणि माझ्या अन्नवस्त्रनिवारा आदि गरजा मात्र तत्काळ पूर्ण करण्याशिवाय गत्यंतर नसल्याने, तुम्ही माझ्या गरजांचा भार सांभाळून मला ठरवलेले कार्य करण्यास मदत कराल का? नव्हे ते तुमचे नैतिक कर्तव्यच आहे.

असा भावही त्यातल्या अनेकांचा असू शकतो. "केलेच पाहिजे" आणि "तुमचे कर्तव्यच आहे" असं थेट म्हणणारे पाहिल्याचं आठवत नाही. तसे असतील तर ते चुकीच्या पद्धतीने हे मांडत आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नटराज फिर चँपिअन...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

विवेकानंद जिथून आले तिथे एका देवळात होणारी बली देण्याची प्रथा बंद झाली का?त्यांनी हिंदू धर्म ,जातीव्यवस्था यासाठी काय केले?फक्त भागवत धर्माचाच प्रसार केला का ? हे जाणून घ्यायचे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पत्रे वाचतांना मनात आलेले विचार .

विचारांचा रोख स्पष्ट नाही. विचार भरकटलेले वाटले.
विवेकानंदांच्याबद्दल टीका आहे, की करुणा की खेद ? विवेकानंदांच्या इतर लेखनाचा तुमचा अभ्यास आहे का ? की हत्तीच्या शेपटावरून पूर्ण आकार बेतण्याचा प्रयत्न आहे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विवेकानंदांच्या इतर लेखनाचा तुमचा अभ्यास आहे का ? की हत्तीच्या शेपटावरून पूर्ण आकार बेतण्याचा प्रयत्न आहे ?

स्नेहांकिता इतर अभ्यास समजा नसेलही, पण या पत्रांविषयी मत मांडण्यासाठी इतर वाचनाची काही आवश्यकता आहे का हा मूळ प्रश्न.
तसेच कोणताही विषय अति खोलात जाऊन अभ्यास केल्याशिवाय मतच मांडू नये असे म्हटले तर काही दिग्गज सोडता कोणी लिहीणारच नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उदा.आपला लहान भाउ आहे त्याच्याविषयी एकाच वेळी आपल्याला करुणा खेद राग कौतुक वाटु शकत ते नैसर्गिक आहे.
माझे विचार कंप्लीट वर्क्स ऑफ विवेकानंद खंड १ ते ९ वरील वाचनावर आणि त्यावर केलेल्या विचारांवर आधारीत आहेत.
मला विवेकानंद कधी आवडतात कधी त्यांची दया येते कधी चीड येते कधी कौतुक वाटत
एकच काय वाटत ते सांगा याला माझ्याकडे सांगता येण शक्य नाही अस उत्तर आहे.
उदा. ते जेव्हा भारतीय स्त्री विषयक विचार व्यक्त करतात तेव्हा मला त्यांचा अनेक ठीकाणी राग येतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रज्ञावंतांचे विचार १०० टक्के आकलन होणे अवघड असते. तुमच्या प्रयत्नाचे कौतुक आहे. पण समग्र विवेकानंद जाणणे आजवर फार कमी तत्ववेत्त्यांना जमले आहे. तेव्हा क्षणिक विचार मांडण्यापेक्षा अभ्यासातून आलेले निष्कर्ष वाचायाला अधिक चांगले वाटले असते.

ते जेव्हा भारतीय स्त्री विषयक विचार व्यक्त करतात तेव्हा मला त्यांचा अनेक ठीकाणी राग येतो.

त्या काळच्या सामाजिक विचारधारेला अनुकूल असेच स्वामीजींचे विचार होते. प्रत्येक स्त्रीच्या ठायी ते कालीमाता पहात असत, हे विसरून चालणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विवेकानंद हे स्फूर्तिदायक आणि लोकसंग्रह करणारे होते हे माहीत आहे. पण त्यांच्या मौलिक* तत्त्वज्ञानाबद्दल मला तितकीशी माहिती नाही. (*म्हणजे नव्या किंवा जुन्याला नवा तात्त्विक संदर्भ=अर्थ देणारे मूलगामी)

शोध घेता-घेता चाळत-चाळत वाचलेले त्यांचे बहुतेक विवेचन केवलाद्वैत-प्रकारचे वाटले. म्हणून अधिक वाचायची इच्छा झाली नाही. (केवलाद्वैतातील मौलिक विचारांकरिता शंकराचार्य बरे पडतात.) विवेकानंदांचे लेखन विपुल आहे, म्हणून मी सुरुवातीला चाळायला घेतलेली पुस्तके चुकली असतील.

विवेकानंद यांचे नवे (वा जुन्याला नवीन अर्थ = नवे) तत्त्वज्ञान काय, याची ओळख करण्यासाठी, सुरुवात करण्यासाठी काही पुस्तकांचा निर्देश कराल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विवेकानंद यांच्या समग्र साहित्यात ज्ञानयोग हा अत्यंत उत्कृष्ठ ग्रंथ आहे. तो जरुर वाचा.
परंतु तुम्हाला अपेक्षीत असलेले " नवे " असे त्यात आढळेल असे वाटत नाही.
तुमचा मुळ ग्रंथांचा व्यासंग पाहता ज्ञानयोगा तील संकल्पना हि जुन्याच वाटतील
परंतु तरीही एक वेळ अवश्य वाचाच.
इट इज वर्थ रीडींग.
विवेकानंद एका बाजुने परंपरेला धक्का देतात व दुसरया बाजुने तोलुन धरतात
वुमेन ऑफ इंडिया हे व्याख्यान एकदा वाचुन बघा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राजयोग आणि ज्ञानयोग आपण वाचले आहेत का ?
त्यांच्या आकलनाची तीव्रता आणि चिंतनाची खोली संबंधितांना लक्षात येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हिमालयात राहणाऱ्या योगीला हि संसार सुटलेला नाही. कारण पोट हे प्रत्येकालाच आहे. कंदमूळ शोधण्यासाठी हि प्रयत्न करावाच लागतो.

गृहस्थ आणि सन्यासी यात एकच फरक आहे, संन्यासी हा स्वत:चा संसार सोडून समाजाचा संसार करतो. त्याच्या उन्नतीसाठी तो भिक्षा मार्ग स्वीकार करतो. वेळ प्रसंगी अन्यायी सत्तेला हि आव्हान देण्याची त्याची क्षमता असते.

खरा संन्यासी कसा असतो याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे समर्थ रामदास आणि आजचे समर्थ रामदेव.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समर्थ रामदेव म्हणजे रामदेवबाबा? अहो हजारो कोटी संपत्ती असलेल्या पतंजलि उद्योगसमूहाचा मालक आहे तो. तो संन्यासी कसाकाय झाला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरा संन्यासी कसा असतो याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे समर्थ रामदास आणि आजचे समर्थ रामदेव.

रामदेव म्हंजे दोन अर्थ निघतात -

१) रामचा देव
२) राम ज्याचा देव आहे तो

यातला नेमका कोणता ?

( कृपया हलकेच घेणे; हेच २ प्रश्न रामदासांच्या बाबतीत का विचारले नाहीत ते तुम्हास माहीती असेलच. )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0