शेतातील रस्त्या विषयक

नमस्कार मंडळी

माझी विदर्भातील एका गावी ३ एकर शेतजमीन आहे आणि माझ्या शेतातून शासकीय दस्तेवज्ञुसर कुठलाही रस्ता नाही तरी पण माझा शेजारी माझ्या शेतातून जबरदस्तीने रस्ता पडून स्वताहाच्या शेतामध्ये जातो .माझ्या शेत मध्ये संत्राची फळबाग असून या फळबागेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे कारण शेजार्याने पडलेला रस्ता हा गाव्रस्त्याला लागून असल्यामुळे गावातील जनावरे माझ्या शेतात घुसून नुकसान करतात कृपया मला हा अतिक्रमित रस्ता बंद करण्यासाठी कायदेविषयक मार्गदर्शन करावे हि विनंती.

field_vote: 
0
No votes yet

http://www.aisiakshare.com/node/2954
हा धागा असाच काहीतरी होता. त्यातून काही कामाच्या लिंका/दुवे मिळतात का पहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वहिवाटीने रस्ता असेल तर तो द्यावा लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

जर कायदेशीरपणे वहिवाटीचा रस्ता नसेल तर पहिले तिथे बांध वाढवा, कुंपण घाला, रस्ता खोदा. हे तर कोणाशी चर्चा न करताही केले तरी प्रॉब्लेम न यावा.
या उप्पर शेजार्‍याने बांध मोडला, कुंपण तोडले तर कायदेविषयक बाबी विचारात घ्याव्या लागतील.

जर कायदेशीरपणे वहिवाटीचा रस्ता असेल तर जितका असेल तितकाच सोडून ही बाब हाताळता येईल असे वाटतेय.

आम्ही नुकतीच अशीच समस्या हाताळली. शेजार्‍याचाच ट्रॅक्टर (पैसे देऊन अर्थात) वापरून बांध घालून आणि तिथे थोडे दगड वापरून काम झाले.. लोकांना कळाले की रस्ता आता वहिवाटीस नाही.
सिम्पल्स.. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सदैव शोधात..

मनपूर्वक धन्यवाद सर आपण अतिशीघ्र माहितीरूपी प्रतिक्रिया दिल्या बद्दल .
आपणास कल्पना देवू इच्छितो कि मी नियमानुसार चालणारा माणूस आहे .भूमिअभिलेख ,तलाठी ,तहसिलकार्यालायातील नक्कल विभागातील जंगल नकाशा यापैकी कुठल्याही सरकारी दस्तएवन्जांवर सदर्हू रस्त्याच्या उल्लेख नाही .त्यानंतर मी शेतावरील बांध उंच केला व आतील बाजूने दोन फुट खोलीची नाली खोदून घेतली व बाहेरील बाजूने काटेरी कुंपण घातले .यावरही शेजारी शेतकऱ्याने गैरकायदा मंडळी जमवून कुंपण तोडले नाली बुजवून टाकली व रस्ता खुला केला .एवढ्या मंडळी समोर माझा टिकाव लागला नाही कारण मी एकटा होतो .पोलिसात तक्रार घेतली नाही कारण विषय दिवानीचा आहे असे त्यांनी सांगितले .दस्तेवजलेखक यांना विचारले असता त्यांनी नोटीस देण्याविषयी कल्पना दिली .पण न्यायालय मार्फत त्यांना नोटीस दिली तर या प्रक्रियेला बराच वेळ ( वर्षे ) लागेल व तोपर्यंत रस्ता खुला राहील आणि माझी संतरा फळबाग पूर्णपणे नाश होवून जाईल . तरी आपणास पुन्हा विनंती कि आपण मला मार्गदर्शन करण्याची पुनच्छ तसदी घ्यावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असय कै.. तुमी आधी नै सांगितलंत ते. म्याटर लै कॉम्प्लिकेटेड है मंग. तुमच्या मर्जीविरुद्ध कोणी जागेत घुसत असेल तर जे साम, दाम, दंड, भेद वाले रस्ते आहेत ते वापरावे लागणार.
अता आपल्या देशात हे सगळे व्यक्तीनुरुप समोरच्या पार्टीनुसार आणि तुमच्या इतर परिस्थिती नुसार असनार हय.
(थोडक्यात सगळं तुमच्यावर आहे..!) इथल्या त्रोटक माहितीवरुन तरी वकिली सल्ला उपयोगी पडावा असं दिसतय.
जर शेजारी जिथला आहे तिथले संपर्क असतील तर सामोपचार चालावा.

बादवे, जर रस्ता वहिवाटीत खूप काळ राहिला तर पुढे समस्या येऊ शकतात हे लक्षात ठेवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सदैव शोधात..

दोन तीन गोष्टींचे स्पष्टीकरण मिळाल्यास काही सांगता येईल.

१) शेजार्‍याने तुमच्या शेतामधून काढलेला रस्ता किती जुना आहे?
२) तो रस्ता काढण्यापूर्वी शेजारी त्याच्या शेताकडे कसा पोहोचत होता?
३) तुमच्या शेतामधून काढलेल्या रस्त्याव्यतिरिक्त शेजार्‍याला त्याच्या शेतात जाण्यासाठी काही सोयीचा मार्ग उपलब्ध आहे काय?

तुमची आणि तुमच्या आसपासची शेती, घरे, रस्ते, पाण्याच्या वाटा इत्यादि कशा आहेत हे एखाद्या हाताने काढलेल्या नकाशामध्ये दर्शवून नकाशा बरोबर जोडल्यास प्रश्न समजण्यास आणखी मदत होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरविंदजी नमस्कार ,
शेताचा नकाशा टाकण्याच्या प्रयत्न केला पण जमले नाही क्षमस्व .
सर्वप्रथम आपण मागितलेले स्पष्टीकरण
१) सदर्हू रस्ता हा १२ वर्षे पूर्वीचा आहे व तो त्यांच्या मागणीनुसार आमच्या आजोबांनी माणुसकी खातीर दिला होता त्यावेळेस माझे शेत कोरडवाहू होते .
२) हा रस्ता वापरण्यापूर्वी तो माझ्या चुलतभावाच्या शेतातातून जात होता .
३) हो , शेजार्याला यापेक्षा अधिक सुकर रस्ता उपलब्ध आहे .
सर आता मझ्या शेताची काल्पनिक नकाशा तुम्हाला शब्द रुपात देत आहे
एक ४० x ३० ची खोली (रूम ) असून पूर्व पश्चिम लांबी ४० व उत्तर दक्षिण रुंदी ३० आहे .या खोलीचे समान ३ भाग (४० x १० ) (अ /ब /क )याप्रमाणे केले .आता हा नकाशा पूर्व पश्चिम असा धरला तर पूर्वेला गावठाण आहे . अ हे माझे शेत असून ते उत्तरेला येत आहे व त्याला पूर्व पच्छिम पांदन रस्ता आहे (उत्तर दिशेला ) , ब हे चुलत भावाचे शेत आहे व क हे शेजार्याचे शेत आहे . शेत अ व शेत ब एकाच गटात असून शेत क हे वेगळ्या गटात आहे .शेजार्याने पाडलेला रस्ता हा शेताच्या पश्चिम दिशेने अगदी बांधा जवळून माझे व भावाच्या शेतातून जातो व तो पांदन रस्त्याला जुळतो .या आधी हा रस्ता पूर्णपणे भावाच्या शेतातून जात होता .(कृपया आपण सुर्य देवते समोर चेहरा करून नकाशा बघावा ) अडचण आल्यास मला मिसकॉल द्यावा ९८८१५२८४२४ .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१२ वर्षे रस्ता असेल तर अवघड आहे. कायदेशीरपणे सुद्धा तुम्ही काही करू शकणार नाही.

रस्त्यालगत दोन्ही बाजूस तुम्ही कुंपण घालून घ्यावे हे बरे. म्हणजे जनावरे शेतात शिरणार नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.