साहित्य

-: गांधी, गुर्जर आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य :-

Taxonomy upgrade extras: 

गेले आठवडाभर वसंत दत्तात्रय गुर्जर यांच्या 'गांधी मला भेटला' या कवितेच्या निमित्ताने साहित्यिक वर्तुळात बरीच खळबळ माजलेली दिसते आहे. "व्यक्तीस्वातंत्र्याचा अधिकार असला तरी त्यातून महापुरुषांचा अनादर करणे योग्य नाही" अशी न्यायालयाची भूमिका आहे. तर "कवीला अपेक्षित असलेला व्यंग्यार्थ, कवितेवर खटला दाखल करणा‍ऱ्यांना कळलाच नाही, ही अभिव्यक्तीची शोकांतिका आहेच, पण त्यांना गांधी कळला नाही, याचेही हे उत्तम उदाहरण आहे" अशी प्रतिक्रिया गुर्जर यांनी दिली आहे. सुमारे वीस वर्षे चाललेल्या या खटल्याचा एक अध्याय आज संपलेला दिसतो.

प्रवास - अनुभव, वर्णन, वाचन आणि दर्शन!

Taxonomy upgrade extras: 

मी आत्तापर्यंत लंडन, माथेरान, महाबळेश्वर, अलिबाग, गणपतीपुळे, कोल्हापूर, अजिंठा, कार्ला, मुंबई एवढी ठिकाणे फक्त बघितली आहेत.
ही चर्चा प्रवास वर्णन आणि संबंधित पुस्तके, मासिके, चॅनेल्स यासंदर्भात आहे. यापूर्वी मी प्रवास वर्णने कधी वाचली नव्हती.पण नुकतीच मीना प्रभूंची दक्षिणरंग (द्क्षिण अमेरिकेवर आधारित) आणि मेक्सिको पर्व ही लायब्ररीतली पुस्तके हाती लागली आणि मला प्रवासवर्णन वाचनाची आवड निर्माण झाली. मीना प्रभूंच्या इतर देशांवरील आणि इतर अनेक लेखकांची प्रवास वर्णनाची पुस्तके मी शोधून विकत घेतली आणि जसा वेळ मिळाला तसा वाचायला लागलो.

उदा: दक्षिणायन - रणजीत मिरजे (दक्षिण अमेरिकेवर आधारित),

अभिवाचनयोग्य कथा सुचवा...

Taxonomy upgrade extras: 

मित्रहो,
जाहीर कार्यक्रमात अभिवाचन करता येतील, अशा मराठीतील काही वेगळ्या, दर्जेदार कथा सुचवता येतील? प्रसिद्ध कथाकारांच्या फारशा परिचित नसलेल्याही चालतील. फक्त त्या अभिवाचनयोग्य हव्यात. (थोडं वर्णन, थोडे संवाद, थोडं रंजन, असा मिलाफ साधणाऱ्या.)
आधी वाचलेल्या, कुणी सुचवलेल्या कथाही नमूद केल्या, तरी चालेल.
अभिप्रायांच्या प्रतीक्षेत....

प्रिय मिलिंद, ... तुझा बाबा.

Taxonomy upgrade extras: 

१५-०७-२०१४

प्रिय मिलिंद,

जन्मदाता म्हणून काही वर्षांपूर्वी म्हणजे २००५ मध्ये माझ्या वयाच्या सत्तरी दरम्यान आयुष्याच्या समाप्तीचा भास व्हायला लागला होता तेव्हा तुला एकमेव असं एक पत्र मी लिहिलं होतं. आणि आता हे दुसरं बहुदा अखेरचं लिहितोय. तसं पहिल्या पत्राला पुरवणी म्हणून मनात काहीबाही साठतच होतं, पण नाना निमित्तांनी लिहिणं आजचं उद्यावर होत गेलं ते या क्षणापर्यंत. आता मात्र "Tough time is all that I have, I may find one day that I have less than I think" असं तीव्रतेने वाटायला लागल्यानं या क्षणी लिहिता झालो. आता गाडी outer signal ला असताना जी धांदल होते तसं जगणं सुरु आहे!

शिव्या व साहित्य

Taxonomy upgrade extras: 

व्यवस्थापकः या धाग्यावरील इथे दिलेल्या प्रतिसादाचे रुपांतर नव्या चर्चाप्रस्तावात करत आहोत. या निमित्ताने एकुणच शिव्या व त्याची विविध साहित्यातील योजना, त्यांचे सौंदर्य, केलेल्या चतुर वापरांची उदाहरणे, विडंबने इत्यादी संबंधित व/वा समांतर विषयांवर चर्चा करता यावी या उद्देशाने धागा वेगळा काढला आहे.
=========

वाक्य पुरे होण्याआधीच त्याला हुंदके अनावर झाले.
क्षणभर थांबलेला निसर्ग पुन्हा नाचू लागला.
भगवान म्हणाले, 'Fuck you Man.'

एक पोएटीक कन्फ़्युजन झालय

Taxonomy upgrade extras: 

मी अनेक वर्षांपुर्वी एक सुंदर गझल जगजित सिंग च्या आवाजात ऐकली होती. ती प्रचंड आवडली होती. तीच्या मधुर चालीमुळे ती डोक्यात अधुनमधुन घुमत राहयची. नंतर ती कॅसेट (ती काळ्या फ़िल्म वाली) हरवली मात्र गझल डोक्यात रुतुन बसली. तिचे शब्द व त्यांचा एक मनात लागलेला अर्थ देखील तसाच फ़ीट्ट झाला. आपले गैरसमज जसे घट्ट होउन जातात तसाच. मी ती बेहोश गुणगुणत असे व मोठा आनंद मला ती गझल गुणगुणतांना व्हायचा. तिचा अर्थ त्यातले शब्द व सर्वात महत्वाच म्हणजे जगजित चित्रा चा आवाज तर खुपच पागल करायचा, प्रचंड आवडायचा.

छापील दिवाळी अंक २०१४

Taxonomy upgrade extras: 

यंदाचे बहुतांश दिवाळी अंक बाजारात आले आहेत. ते ज्यांच्या हाती लागले आहेत, त्यांनी त्याबद्दल लिहिलं तर फार बरं होईल. काय घ्यायचं, काय टाळायचं, काय आवर्जून वाचायचं, ते चटकन कळेल.

मी आणलेले दिवाळी अंक: अक्षर, इत्यादी, युगांतर, पुरुष स्पंदन, शब्द, पद्मगंधा, साधना (युवा विशेषांक) (साधनेचा मुख्य अंक परवापर्यंत तरी बाजारात आला नव्हता.)

साधनेच्या युवा अंकात
- केतकरांचा लेख आहे. फेसबुक आणि ट्विटर आणि स्मार्टफोन्स यांत रमलेल्या तरुणांना उद्देशून त्यांनी जाम चिडचिड केल्ये. Tongue

कविता समजुन घेतांना- भाग १

Taxonomy upgrade extras: 

वाचनाचं वेड असल्याने आणि कविता हा प्रकार प्रचंड आवडता असल्याने अधाशासारखा मिळेल ती कविता वाचत सुटायचो. कधी फ़ार च सुंदर तर कधी फ़ार च टुकार कविता भेटायच्या. पण सुंदर ग्रेट कविता असा काही अनोखा आनंद देतात की ज्याची काही तुलनाच करु शकत नाही. याच नादातुन समीक्षा ही वाचु लागलो मग मात्र थोडा मुळ कविता वाचनाचा आनंद डीस्टर्ब झाला. विनाकारण एक नेणीवेच्या पातळीवर इव्हॅल्युएशन व्हायला सुरुवात झाली. मग कन्फ़्युज झालो मग थोडी चिडचीड ही होउ लागली. ती अशी की अरेच्च्या इतकी सुंदर कविता होती यावर विचार करण टाळुन नुसती फ़ीलींग लेव्हल वर च रेंगाळु दिली असती तर कीती छान झाल असत.

ठराविक उपमा व ठोकळेबाजपणा विरूद्ध चळवळ: भूमिका

Taxonomy upgrade extras: 

पावसाळा आला आहे. आता कोणत्याही क्षणी भारतात मॉन्सून, व सर्वत्र पावसाच्या कविता सुरू होतील. आम्हाला पावसाबद्दलच्या कवितांचा काही प्रॉब्लेम नाही. मात्र त्याला दिल्या जाणार्‍या त्याच त्याच उपमांना घाबरून आम्ही वैचारिक छत्री मे महिन्यापासून उघडून बसलो आहो. हा प्रॉब्लेम पावसापुरता मर्यादित नाही. उपमांपासून भले भले सुटलेले नाहीत. "प्रेमाला उपमा नाही, हे देवाघरचे लेणे". असे कोणीतरी गाण्यात म्ह्णताना उपमा नाही करत करत पुलंच्या रावसाहेबांच्या शिवीप्रमाणे पुढच्याच ओळीत एक निसटली आहे हे त्यांच्याही लक्षात आलेले नसावे. तसेच उपमांप्रमाणेच ठोकळेबाज वाक्ये व घटनांचाही सध्या कथांमधे प्रादुर्भाव झाला आहे.

पाने

Subscribe to RSS - साहित्य