Skip to main content

अन्य

यात अधिक टॅग्ज हवे असल्यास व्यवस्थापकांशी संपर्क करावा.

भुरा - एका संघर्षाची यशस्वी ध्येयपुर्ती

शरद बाविस्कर यांचं 'भुरा' वर वर पाहता एका खान्देशी तरूणाची संघर्षमय जगण्याची गोष्ट न राहता गेल्या दोन दशकातील तरुणाईची प्रातिनिधिक स्वरूपात व्यक्त केलेली मनस्वी चिंतनशील आणि प्रेरणादायी गोष्ट झाली आहे. लेखनाचा काळ हा लेखकाची दहावी ते जेएनयू मधील शिक्षकी जीवन एवढाच रेखाटला आहे. हा प्रवास सरासरी वीस वर्षातील संघर्ष आणि यशस्वी घोडदौड यापुरता मर्यादित आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे हाच प्रवास छोटेखानी वाटत असला तरी उर्वरित पुढच्या आयुष्याबद्दल आश्वासक असा वैचारिक पाया यातून साकारला गेला आहे. यात लेखकाने प्रांजळपणे आणि पारदर्शक पद्धतीने काल सुसंगत घडलेल्या घटना त्यावरची मूलभूत मतं लिहिली आहेत.

समीक्षेचा विषय निवडा

॥उजेड पाडला तुळशीपाशी॥

तुळशीबागेतल्या ब्रा तशा रिकाम्याच असतात. म्हणजे ॲलर्जीसारख्या, नुस्तीच लक्षणं खरा रोग नाहीच.

समीक्षेचा विषय निवडा

टेस्ट मेकर्स - मयूख सेन

परदेशात स्वतःचं असं जग पुन्हा रचू पाहणाऱ्या अशा सात स्त्रियांच्या गोष्टी मयूख सेनच्या 'टेस्ट मेकर्स' या पुस्तकात वाचायला मिळतात. या सातही बायका मायदेश सोडून अमेरिकेत स्थायिक झाल्या. यांतल्या प्रत्येकीनं आपल्या पाककलेतून आणि पाककृतींबद्दलच्या लिखाणातून अमेरिकेच्या बदलत्या खाद्यसंस्कृतीत आपल्या मायदेशाला स्थान मिळवून दिलं. या सगळ्यांना बांधून ठेवणारा समान दुवा म्हणजे आपला देश सोडून नवीन देशात आल्यावर सतत वाटणारी व्याकुळता.

समीक्षेचा विषय निवडा

दारिद्र्य: भाषेचे आणि भाषिक समाजाचे

मराठी ही एक प्रगत भाषा आहे असे मानले जाते. (ती अभिजात भाषा आहे की नाही यावर माझा पास). मराठीभाषिक समाज दहा कोटींच्या घरात आहे आणि जगाच्या सर्व भागांत तो पोचलेला आहे.

एखाद्या 'प्रगत' भाषेमध्ये, रोजच्या आयुष्यातील काही महत्वाच्या संकल्पनांसाठी जर शब्दच अस्तित्वात नसले, तर? विशेषतः लिंगासारख्या मूलभूत विषयाशी संबंधित संकल्पनांसाठी?

काही उदाहरणे: (माझ्या माहितीप्रमाणे. या निरीक्षणांत चुका असल्यास त्या दुरुस्त करेन)

समीक्षेचा विषय निवडा

वाचावंच असं राकेश मारिया यांचं आत्मचरित्र

(पुस्तक परिचय आहे, स्पाॅयलर अलर्ट देऊन ठेवते आहे.) (ही समीक्षा नाही.)
राकेश मारिया हे नाव मुंबईकरांना फारच ओळखीचं. माझ्यासाठी विशेष मुद्दा म्हणजे माझी पत्रकारितेची सुरुवात झाली त्याच्या एकदोन वर्षं आधीच ते मुंबईत रुजू झाले होते आणि १९९३च्या बाॅम्बस्फोटाचा तपास त्यांनी केला होता त्यामुळे ते तुलनेने लहान वयात प्रकाशझोतात आले होते. तेव्हापासून ते गेल्या वर्षी निवृत्त होईपर्यंत हा पोलिस अधिकारी चर्चेत राहिला, बऱ्याच अंशी चांगल्या कामामुळे. त्यामुळे त्यांचं 'लेट मी से इट नाउ' हे पुस्तक गेल्या वर्षी आल्यापासून वाचायचं ठरवलंच होतं, ते अखेर गेल्या आठवड्यात मिळालं वाचायला.

समीक्षेचा विषय निवडा

⭐️⭐️वारसा प्रेमाचा - आजोबा-नातवाचं हृद्य नातं! ⭐️⭐️

Warasa Premacha Book Cover

‘गंगेमध्ये गगन वितळले’ ह्या अंबरीश मिश्र ह्यांच्या पुस्तकामुळे ‘म. गांधी - व्यक्ती, माणूस’ असं कुतूहल पहिल्यांदाच निर्माण झालं. त्यानंतर आता हे दुसरं पुस्तक, ज्यामुळे त्यांचा अधिक जवळून, थेट परिचय घडला...

वारसा प्रेमाचा - अरुण गांधी - अनुवाद: सोनाली नवांगुळ - साधना प्रकाशन - पहिली आवृत्ती: ५ जानेवारी २०१९ - पृष्ठे: १२० - किंमत: रु. १२५/-

समीक्षेचा विषय निवडा

टाकसाळ निर्माण - उदय कुलकर्णी

टाकसाळ निर्माण - उदय कुलकर्णी - आवृत्ती पहिली: ऑक्टोबर २०१३ - तुळजा प्रकाशन - पृष्ठं: ५६ - किंमत: रु.५०/- मुखपृष्ठ: मनोज आचार्य

समीक्षेचा विषय निवडा

लेखकाची गोष्ट - अ सर्व्हायव्हल गाईड फॉर मराठी रायटर्स, लेखक: विश्राम गुप्ते

माणसाचं आयुष्य एकरेषीय नसतं, अनेक घटना-प्रसंग-कारणांच्या परिणामाने ते घडत-बिघडत असतं. त्यामुळे स्वत:तील एखाद्या पैलूविषयी सांगताना ते तेवढ्यापुरतं नसून एकंदर जगण्याविषयीचं कथन ठरतं. ‘लेखकाची गोष्ट - अ सर्व्हायव्हल गाईड फॉर मराठी रायटर्स’ ह्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लेखक विश्राम गुप्ते यांनी ‘मी फक्त माझा लेखकीय प्रवासच तेवढा सांगणार आहे’ असं जरी म्हटलेलं असलं तरीसुध्दा तो तेवढाच नाही हे पुढे वाचताना लक्षात येतं. परंतु हे आत्मचरित्रदेखील नाही.

समीक्षेचा विषय निवडा