Skip to main content

संस्कृती

परदेशात स्थायिक होणे,गरज की निर्लज्जपणा?

Taxonomy upgrade extras

थांबा थांबा,जुनाच विषय आहे ,मान्य.लगेच मला राष्ट्रभक्तीचे सर्टीफुकट देऊ नका.मी काही तितकासा प्रखर राष्ट्रभक्त नाही.हा विषय मनात आला त्याला कारण हा प्रसंग.

आगामी कार्यक्रम / उत्स्फूर्त कट्टे - कोणकोण येतंय? - ३

Taxonomy upgrade extras

दरवेळी ऐसीवरची मित्रमंडळी भेटतात तेव्हा तो जाहीर केलेला कट्टा असतोच असं नाही. कारण बऱ्याच वेळा कट्टा भरवणं, एकत्र भेटणं वगैरे ठरवायला चिकार वेळ लागतो. आणि दरवेळी पंधरा वीस लोक जमवणं शक्यही नसतं. कधीकधी चार टाळकी एकत्र जमली तरी मैफल जमू शकते. असे उत्स्फूर्त, इंप्रॉम्प्च्यू कट्टे अधिक वारंवार व्हावेत यासाठी हा धागा.

सीमोल्लंघन

Taxonomy upgrade extras

dasara

गेल्या वर्षी च्या दसऱ्या नंतर whatsappwhatsapp वर आलेले हे चित्र.
मराठी भाषिकांची संख्या बऱ्यापैकी असलेल्या कुठल्याही शहराचे असू शकेल असेल.
सोने लुटण्याची, सीमोल्लंघन करण्याची परंपरा महाराष्ट्रा बाहेर कुठे असल्याचे मी पहिले नाही

हॅमर कल्चर

Taxonomy upgrade extras

बाविसाव्या शतकातील बाप-लेकीत घडलेला हा संवाद.
"पपा, पपा, तुम्ही सतत माझ्यापासून तो हातोडा का लपवून ठेवता?"
"त्याच्यामागे एक फार मोठी गोष्ट आहे."
"पपा सांगा की ती गोष्ट मला"
"विसाव्या शतकात घडलेली ही गोष्ट आहे. त्याकाळी एक ‘प्रगत’ समाज होता. अचानक एके दिवशी एकमेकांच्या डोक्यावर हातोडा मारण्याची लाट उठली. काही महिन्यातच ही क्रेझ सर्वांच्या अंगवळणी पडू लागली. लोकांना दुसरे काही सुचेनासे झाले. जो उठतो तो हाण दुसऱ्याच्या डोक्यावर हातोडा. हळू हळू हा समाज बदलला. सर्व काही हातोडामय झाले.

स्मरणरंजन - भाग १

Taxonomy upgrade extras

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, स्मरणरंजन मांडण्यासाठी आहे. बरेचदा जसजसे वय वाढत जाईल तसतसा, स्मरणरंजन हा माणसाचा स्थायीभाव होत जातो. काही आठवणी पुन्हा पुन्हा किंवा आवेगाने येत असल्याने आपण विसरू शकत नाही.

कलिवर्ज्य- भाग-१

Taxonomy upgrade extras

विवीध हिंदु धर्मग्रंथानुसार चार युगे मानली जातात. कृत-त्रेता-द्वापर-कलि. युगे सर्वोत्तम कृत पासुन सुरु होत क्रमाने ढळत सर्वात खालच्या पातळीला कलि पर्यंत येतात असे मानले जाते. कृतयुग सर्वश्रेष्ठ पुण्यवानांचे युग होते. त्याउलट कलियुगात मानवांचे पतन होते. कलियुगात काय काय होईल ? याची लांबच लांब गंभीर व गंमतीदार वर्णने धर्मग्रंथ करत असतात उदा. यज्ञासाठी /दानासाठी पर्याय शोधले जातील, ब्राह्मण शूद्रांसारखा आचार करतील, शूद्र धनसंचय करतील, ब्राह्मण भक्ष्याअभक्ष्याचे नियम मोडतीलो,म्लेच्छां चे राजे राज्य करतील, स्त्रियांचे चारीत्र्य लोप पावेल त्या अनैसर्गिक संभोगात रत होतील.

माझ्याही कर्वेनगरात

Taxonomy upgrade extras

अभिजित ज्या काळात तिथे होता* जवळपास त्याच काळात मीही त्याच भागात होतो. २००९ च्या शेवटाचा तो काळ. पण तिकडे नंतर येउ. मुळात मी तिथवर कसा पोचलो ते सांगतो.

आपली संस्कृती : २(एडवर्डच्या ब्लॉगवरून साभार)

Taxonomy upgrade extras

संस्कृती ही एकप्रवाही नसते. त्यामुळे तिच्या सर्व प्रवाहांत एकाच वेळी पोहणे शक्य नाही. तिच्याबद्दल थोडंसं लिहिताना मी वहिवाटीचा प्रवाह निवडलाय.

आपली संस्कृती : १ (संभ्रमाच्या विवरामधून)

Taxonomy upgrade extras

‘स्वदेस’ आठवतोय? त्यातल्या एका प्रसंगात गावातील एक माणूस मोहन भार्गवला भारतीय संस्कृती किती महान आहे हे सांगत असतो त्यावेळी मोहन एक वाक्य बोलून जातो,”मै नही मानता की मेरा देश महान है”. भारतीय सण, परंपरा,रिती,रिवाज याचे सतत गोडवे गाणारे टिपिकल बॉलीवूड चित्रपट पाहता हे वाक्य तसं धाडसीच. आपलीच संस्कृती सर्वश्रेष्ठ हा ताठा मिरवणाऱ्या भारतीयांना धक्का देणारं, त्यांना विचार करण्यास भाग पाडणारं. खरोखर छान होता तो प्रसंग. मस्त जमून आलेला. ‘माझा देश,संस्कृती महान नाही पण आपण तिला महान बनवू शकतो. अमेरिकेला नावं ठेवण्याचा कोणताच अधिकार आपल्याला नाही’ हा मोहनचा विचार मला तेव्हा पचला नव्हता.

जबाबदारी - मुलींची आणि मुलांची

Taxonomy upgrade extras

नमस्कार मंडळी
आज एका नवीन अन संवेदनशील विषयावर चर्चा करून आपली मते आजमावायची आहेत ...

आजकाल भारतीय / हिंदू समाजामध्ये एकच अपत्य होऊ देण्याची प्रथा रूळली आहे. आईवडिलांची आर्थिक परिस्थिति ,मुलांच्या शिक्षणावर होणारा अफाट खर्च याबरोबरच मुलगा-मुलगी समान समजून "मुलाची वाट पाहत अधिक अपत्ये " वाढवण्या विरुद्ध सरकारचा जोरदार प्रचार तसेच अन्य काही घटक या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून असेल किंवा पती -पत्नीना अधिक मुले होऊ देणे योग्य वाटत नसल्याने म्हणा , समाजात एकच अपत्य असणार्‍या अथवा एकच मुलगी असणार्‍या कुटुंबांची संख्या प्रचंड वाढत असलेली दिसून येते...