कथा

गोम

ललित लेखनाचा प्रकार: 

मालफंक्शन (पूर्वप्रसिद्धी: लोकसत्ता १८ मार्च २०१७ )

'पूजा की थाली' सिरियलच्या हजाराव्या एपिसोडची पार्टी...

डिसेंबर महिन्यातला सुखद गारवा...
'मॅरियट-जुहू' च्या बाहेर एकामागोमाग एक गाड्या सुळ्ळकन लागत होत्या आणि तारे तारका आत शिरत होते.
सगळा पोर्च 'डिओर', 'शनेल', 'हर्मिस' ...आणि व्हॉट नॉट परफ्युम्सच्या वासानी प्रमत्त यौवनेसारखा घमघमत होता.

सगळ्यात आधी आली पी. के. टी. (पूजा की थाली) चा हिरो रचित सिन्हाची 'बीमर'.
आपल्या दोन्ही गालांवरच्या खळ्या फोटोग्राफर्सनी पुरेशा टिपल्यायत याची खात्री करून तो दोन्ही हातांनी विजयी बट्ट्या दाखवत आत घुसला.

ललित लेखनाचा प्रकार: 

गोष्ट सांगा गणित शिकवा .... 12

उत्साहाच्या भरात रात्री बराच वेळ मुलांना झोप आली नाही. सबमरीन मध्ये प्रवास करण्याचा अनुभव असा किती जणांना असतो? बरं, त्यावर काही वाचायला पण फारसे मिळत नाही. 20,000 Leagues under the sea आणि U-boat सारखी पुस्तक कोण वाचतं आजकाल? आणि दुसऱ्या महायुद्धाचे चित्रपट आता जुने झाले! नाही म्हणायला The Ghazi Attack या हिंदी चित्रपटामुळे निदान सबमरिन असे काही असते हे तरी कळलं होत. प्रकाराची युद्धनौका माहित झाली होती. पण शेवटी तो हिंदी पिक्चर! किती माहिती मिळणार?

ललित लेखनाचा प्रकार: 

फाफे फॅफि

"ट्टाॅक्!" अक्साच्या समुद्रकिनाऱ्यावरचा वाॅचटाॅवर बघून बनेश आपसूक उद्गारला.

"उचलली जीभ, लावली टाळ्याला!" प्रसादने त्याला चिडवण्याची संधी सोडली नाही.

"मी विचार करतोय; ऐतिहासिक गडकिल्ल्यांवर टेहळणी बुरूज असायचे, त्यांचीच ही अर्वाचीन आवृत्ती ना?" बनेश म्हणाला.

"किल्ल्याविना बुरूज!" प्रसादने उत्तर दिले. "आणि याचा हेतूही पूर्ण निराळा आहे. कोणी उगाचच समुद्रात पोहायला गेलं आणि गटांगळ्या खायला लागलं, तर या वाॅचटाॅवरवरच्या गार्डला दिसतं, आणि तो बुडणाऱ्याला वाचवायला धावत जाऊ शकतो."

"धावत? मला वाटलं की पोहत जावं लागेल." सुभाषने विनोद करायचा प्रयत्न केला.

ललित लेखनाचा प्रकार: 

तीन इच्छा

मी दहावी पास झाल्यावर माझ्या बाबांच्या माझ्याबद्दलच्या अपेक्षा फार वाढल्या. आपला मुलगा कमीत कमी इंजिनिअर होणारच होणार आणि लगेच पहिले विमान पकडून अमेरिकेला जाणार अशी दिवास्वप्ने त्यांना पडू लागली. ती स्वप्ने खरी झाली आहेत अश्या थाटांत कॉलर ताठ करून ते कॉलनीत फिरू लागले. तरी बरं मला फक्त एकोणसाठ टक्के गुण मिळाले होते. गणितात माझी अवस्था वादळांत सापडून वाताहात झालेल्या जहाजावरील खलाशासारखी होती. एखाद्या फळकुटाला पकडून, वादळ आणि लाटांनी अस्त व्यस्त मार खाऊन अर्धमेला झालेला खलाशी शेवटी देवाच्या दयेने किनाऱ्याला पोहोचतो तसा मी गणिताच्या पस्तीस गुणांच्या काठाला येऊन थडकलो होतो.

ललित लेखनाचा प्रकार: 

.

दिवाळी अंकात समावेश झाल्यामुळे कथा ऐसीवरून काढत आहे

ललित लेखनाचा प्रकार: 

‘Reality’ Shows!

‘रिअॅलिटी’ शो ‘Reality’ Shows
"Be grateful that you only see the outward man. Be grateful that you never see the passions, the hatreds, the jealousies, the malice, the sicknesses... Be grateful you rarely see the frightening truth in people."
-----Alfred Bester in The Demolished Man
तात्याचं लग्न होऊन चांगली सहा सात वर्षे झाली आहेत. त्याची बायको सुशी. दोघांचा संसार मजेत चालला आहे.

ललित लेखनाचा प्रकार: 

जग गेले उडत!

आज रविवार होता. कदाचित शनिवारही असेल. काय फरक पडणार होता? काही वाटेल ते झालेतरी तरी तो आज काम करणार नव्हता. उठून चहा करून घ्यावा असं वाटलं होतं पण नाही उठला. अंथरुणात लोळत पडण्यातली मजा काही औरच. अर्धवट झोपेत अर्धवट.....
तेवढ्यात टेलिफोन वाजला. त्याने घड्याळात पाहिले. जवळ जवळ दहा वाजत होते. आता कोण फोन करत होतं? टेलेफोन वाजायचा थांबला. चला सुंठीवाचून खोकला गे ... पुन्हा घंटी वाजायला सुरुवात झाली. आता घ्यायलाच पाहिजे. त्याने आळसटलेल्या हाताने फोन उचलला.

ललित लेखनाचा प्रकार: 

गोष्ट सांगा गणित शिकवा... ९

(आईसक्रीम आणि गणित Smile )
.
**************************
आत्ता पर्यंत: अंतराळात भ्रमण करून ज्ञानाच्या सीमा वाढवण्याच्या मोहिमेवर टीम पुणे सध्या त्रिकोणी ग्रहावर... एरेटॉसथिनिस काकाबरोबर समद्वीभुज खंडाची ट्रिप वरून परत त्रिकोणी नगरात आले ...
.

ललित लेखनाचा प्रकार: 

गोष्ट एका कातळाची

संध्याकाळची वेळ होती. सगळीकडे धूसर गुलाबी निळा प्रकाश पसरला होता. दूरवर कुठे तांबडे पट्टे दिसत होते. सूर्य मावळतीला आला होता.पाखरं बऱ्यापैकी घराकडे परतली होती. मध्येच कुठेतरी एखादा चुकार बगळा फडफड करताना ऐकू येई. देवीच्या देवळाच्या मागे असलेल्या कातळावर दोन मित्र बसले होते.ते आपल्या गप्पांमध्ये कधीचे गुंग झाले होते. आसपासची खेळत बसलेली मुलं कधीच पांगली आहेत ह्याची ही त्यांना जाणीव राहिली नाही. त्यांच्या आपल्या बऱ्याच वेळ गप्पा चालु होत्या. निवडणुका, आठवड्याचा बाजार, नव्याने बघितलेलं लॉकडउन, जमिनीच्या सातबारा ह्या सगळ्या विषयांवर ते रंगले होते.

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - कथा