कथा
लग्न झाले नी अंकल झालो
गेल्या महिन्यात लग्नाला 37 वर्ष पूर्ण झाले. केस पांढरे झाले असले तरीही मी स्मार्ट दिसतो, किमान मला तरी असे वाटते. एक जुना किस्सा आठवला. उन्हाळ्याचे दिवस होते. त्यावेळी मी कृषी भवन मध्ये कार्यरत होतो. इमारतीतील एका छोट्या हॉलमध्ये माझ्यासोबत ६ स्टेनो त्यात ४ कन्या होत्या. दोन तर माझ्याच समवयस्क. दोघींचे लग्न झालेले होते. त्यातली एक अजूनही गुलाबाची कळी होती पण दुसरीचे गोबीच्या फुलात रूपांतरण झाले होते. सर्वच पुरूषांना बायकांचे बोलणे कान टवकारून ऐकण्यात एक आसुरी आनंद मिळतोच. दिवस मस्त जात होते. त्यादिवशी:
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about लग्न झाले नी अंकल झालो
- 8 comments
- Log in or register to post comments
- 3012 views
छंद बायकोचा
(काल्पनिक कथा)
मैफिल वसंतोत्सव अंकात प्रकाशित ऋचा मायी लिखित कथा वाचत होतो. फावल्या वेळात:
बायकोने छंद जोपासला.
नवऱ्याला हिरा सापडला.
अंगणी वर्षाव झाला
नोटांचा.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about छंद बायकोचा
- 6 comments
- Log in or register to post comments
- 2699 views
मी अमुक अमुक--१
‘What we think is impossible happens all the time.’
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about मी अमुक अमुक--१
- Log in or register to post comments
- 1346 views
कोकाटेंंचा रोबोट --२
त्यांनी माझा दंड पकडून मला पलीकडच्या खोलीत नेले आणि झटकन दरवाज्याची खिट्टी लावून दरवाजा बंद केला. खोलीत अंधार होता. दिव्याचा स्विच ओंन केल्यावर खोली प्रकाशाने उजळली.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about कोकाटेंंचा रोबोट --२
- Log in or register to post comments
- 1136 views
कोकाटेंंचा रोबोट --३
रात्रीचे दहा वाजले असावेत. झोप येणे अवघड होते. कोकाट्यांचा तो बुजगावण्यासारखा सारखा दिसणारा रोबोट सारखा डोळ्यासमोर येत होता. शपथेवर सांगतो, मी आजवर कुणालाही जाणूनबुजून फसवलं नव्हतं. पण आज मी त्या “यंत्र मानवाला” फसवलं होतं. त्याची मनाला चुटपूट लागून राहिली. एका परीने कोकाटेंच्या घरातले वातावरण त्याला कारणीभूत असावे. असं पण असेल की मला कोकाटेंच्या हव्यासातला फोलपणा दाखवून द्यायचा असेल. पहा बघता बघता मी देखील त्या चक्रात ओढला गेलो होतो. एका निर्जीव यंत्राला कळत नकळत सजीव मानायला लागलो होतो. अशा विचारांच्या धुंदीत झोपेतही मला रॉबी दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर ते मिश्कील हसू नव्हते.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about कोकाटेंंचा रोबोट --३
- Log in or register to post comments
- 1081 views
कोकाटेंंचा रोबोट--१
कोकाटेंंचा रोबोट
“सफाया” नावाच्या रोबोटचं प्रात्यक्षिक आयआयटी मुंबई मध्ये होणार होते. हा “हॅन्सम रोबोटटिक्स” नावाच्या हॉंगकॉंगच्या कंपनीने बनवलेला रोबोट होता. आयआयटीमधे “टेक फेस्ट” च्या परिश्रमाने हे प्रात्यक्षिक होणार होते.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about कोकाटेंंचा रोबोट--१
- Log in or register to post comments
- 1499 views
एका सासूबाईची करुण कहाणी.
लहान माझी भावली
मोठी तिची सावली.
नकटे नाक उडवीते
घारे डोळे फिरवीते.
भात केला कच्चा झाला
वरण केले पात्तळ झाले.
आडाचे पाणी काढायला गेली
धुपकन पडली आडात.
सासू बाई शेजार्याच्या लहान मुलीला गाणे “शिकवत” होत्या.
सून स्वयंपाक गृहात काम करत होती. मनात म्हणाली. “मला शिव्या देताहेत. ऐकतेय मी सगळे. तुम्ही काही म्हणा मी आडात जाऊन जीव देणाऱ्यातली नाही. सज्जड हुंडा देऊन आले आहे. तेव्हा न लाजत मुलाची किंमत खण खण वाजवून घेऊन त्याला विकला न तुम्ही?”
साबा आणि साबू दोघेही व्हाट’स अप अंकल आणि आंटी.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about एका सासूबाईची करुण कहाणी.
- 10 comments
- Log in or register to post comments
- 3539 views
माझी राधा - २
तू गोड हसलास. मी त्या हसण्यात विरघळले. तुला रागवायचे होते तेच विसरले. कोण आहेस रे तू माझा?
मग तू विचारलेस. इतके प्रेम करतेस माझ्यावर.......!
तुझ्या त्या प्रश्नाने मी आतून हलले. काय बोलावे ते समजेना मला. डोळ्यात टचकन पाणीच आले.तुझ्या त्या शब्दांनी कुठेतरी आत खोलवर काही तरी छेडले होते.
मागील दुवा https://aisiakshare.com/node/8739
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about माझी राधा - २
- Log in or register to post comments
- 1192 views
माझी राधा -१
मी जागीच आहे.मध्यरात्र उलटून गेली आहे. चंद्र क्षितीजावर मावळतोय. आता पूर्ण अंधार होईल. गडद अंधार. मग शुक्राची चांदणी झळाळून उठेल. दुसरा छोटा चंद्रच जणू. आणखी. सभोवतालचे तारा मंडळ जोरजोरात लुकलुकायला लागेल. पण अर्ध्या प्रहरासाठीच. मग उजाडायला लागेल. पूर्वेकडे आभा येईल. चंद्राच्या उजेडाअभावी लखलखीत वाटणारे तारे हळू हळू फिकुटायला लागतील. पक्षी जागे होतील. दूर कुठेतरी गाईंच्या हंबरण्याचा आवाज येईल. आत्तापर्यंत असणारी नीरव शांतता सम्पेल.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about माझी राधा -१
- 2 comments
- Log in or register to post comments
- 1703 views
आउट ऑफ स्टेप:एक अब्सर्डिका -२
आमच्या आधीचे दोन पेशंट तिथे बसले होते. टेबलावर पेपरांची चळत पडली होती. एक जण ‘प्रभात’ वाचत होता. त्याने प्रभात टाकून सकाळ उचलला. बाबांनी चपळाईने प्रभातवर कब्जा केला. डायरेक्ट चौथ्या पानावरच्या काडीमोडच्या नोटीसा वाचायला सुरवात केली.
“आमच्या अशिलाने तुला एकूण चौदा पत्रे लिहिली. तू जी लग्नाच्या आठव्या दिवशी माहेरास निघून गेलीस ती आजतागायत नांदायला परत आली नाहीस. त्यामुळे आमच्या अशिलास लग्नाचा हक्क बजावता...”
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about आउट ऑफ स्टेप:एक अब्सर्डिका -२
- 5 comments
- Log in or register to post comments
- 2468 views