गद्य

आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग १)

‘संस्कार’ कादंबरी वाचली ती दहावी अकरावीत असताना. चाळीतल्या शेंडे काकूंनी त्यांच्या संग्रहातील प्रत वाचायला दिली होती. नंतर कित्येक वर्षे त्यांना ती कादंबरी परत करायला टाळाटाळ करत होतो आणि परत केल्यावर हातातून काहीतरी महत्वाचं निसटून गेलंय अशी भावना मनात सलत होती. पुढे पैसे मिळवू लागल्यावर लेखकाला ज्ञानपीठ पारितोषिक मिळवून देणारी ही कादंबरी विकत घेतली. सुखांत किंवा दुःखांत नसलेली पुस्तके आधी वाचली होती. पण शेवटी उत्तर न देता प्रश्न पाडणारी आणि प्रत्येक वेळी काहीतरी नवीन सांगणारी ही कादंबरी वाचल्यानंतर यू आर अनंतमूर्ती या लेखकाबद्दल आदराशिवाय दुसरी कुठलीही भावना मनात येऊ शकत नाही.

ललित लेखनाचा प्रकार: 

नावांची गम्मत

मराठीच्या गमतीजमती
नावांची गंमत-
कार्य उरकलं . घरात सर्व वयांचे पाहुणे. गप्पांचा अड्डा जमलाच.
'झालं का गं पटवर्धनांकडचं बारसं' ?
'हो, यश नाव ठेवलं'.
'छान आहे. छोटंसं. आडनाव मोठं असल्यामुळे छोटं छान वाटतं'.
'अहो, खरं तर वहिनीला यशोधन ठेवायचं होतं.किंवा हर्षवर्धन. पण सगळे तिला चिडवायला लागले, 'यशोधन पटवर्धन; यमक छान, धन-धन'. आणि म्हणे, हर्षवर्धन ठेवलं तर नाव कुठलं नि आडनाव कुठलं तेच कळणार नाही'. शेवटी म्हणाली, ' ठेवा यश. मी मात्र त्याला यशोधन म्हणून हाक मारणार'.
'अगंबाई, हे उलटंच झालं. मोठं नाव ठेवून छोट्यानं हाक मारतात'.

ललित लेखनाचा प्रकार: 

जो दिल हारा वोह सब जीता

मीं खोल‌ खोल‌ कोस‌ळ‌त‌ अस‌तेवेळी, तुझी भूमिका न‌क्की काय‌ होती? फ‌क्त एक त‌ट‌स्थ ख‌र‌ं त‌र‌ उदासिन प्रेक्ष‌काची की अशा एका मित्राची ज्याला म‌ला ख‌र‌ं पाह‌ता हात देऊन व‌र‌ ओढाय‌चे होते प‌ण त‌से क‌र‌णे ज‌म‌त न‌व्ह‌ते, ब‌घ्याची अस‌हाय भूमिका क‌र‌ण्याप‌लीक‌डे काहीही क‌र‌ता येत‌ न‌व्ह‌ते? की त‌ळ्याच्या काठाव‌र‌ ब‌सून बुड‌णाऱ्याची म‌जा प‌हाण्याचा आसुरी आन‌ंद‌ मिळ‌व‌णाऱ्या सेडिस्ट‌च्या भूमिकेत तू होतास्? म‌ला क‌ळ‌त‌च नाही. तू बोल‌त‌ नाहीस आणि माझ्याक‌डे त‌री कुठे अशी जादूची कांडी आहे की म‌ला तुझ्या म‌नात‌ले ओळ‌ख‌ता यावे?

ललित लेखनाचा प्रकार: 

आपली मराठी - काय वाट्टेल ते!

मराठीच्या गमतीजमती-----
काय वाट्टेल ते!
गेल्या आठवड्यात आम्ही एका मैत्रिणीकडे जमणार होतो. आम्ही दोघी-तिघी इतर मैत्रिणींची वाट बघत बागेच्या कोपर्‍यावर थांबलो होतो. थोड्या वेळाने आम्ही आत सरकत गेटजवळच्याच एका बाकावर बसलो. शेजारी हिरवळीवर आमच्या नातीच्या वयाची एक छोटी खेळत होती. चेंडूच्या मागे पळत ती आमच्याजवळ आली. मी चेंडू तिच्या हातात ठेवला. तो घेऊन क्षणभर आमच्याकडे टक लावून ती पाहात राहिली. मग विचारलं,
"ए, तू तिथे काय करतेस"?
"बसलीये". मी तिच्याच सुरात म्हणाले.
"का बसलीयेस"?
"वाट पाहतेय".
"कोणाची वाट"? तिनं निरागसपणे यिचारलं.

ललित लेखनाचा प्रकार: 

मरणाचा बाजार

लहानपणापासून एक गोष्ट माझ्या लक्षात आलीये, कोणीही गेलं, वारलं, मेलं, खपलं, गचकलं वगैरे तर मला रडायलाच येत नाही. हे माझ्या खूप जवळच्या लोकांना म्हणजे ज्यांनी मला विनाकारण रडताना पाहिलंय त्यांना पटणारही नाही, बाकीच्यांचं तर जाऊचदे! पण नाहीच येत मला रडायला कोणीही गेलं तरी. म्हणून मला ती व्यक्ती प्रिय असत नाही असं नसतं. कितीही प्रिय व्यक्ती असली तरी असंच होतं. हे बहुतेक मरणाचा आणि इमोशन्सचा बाजार मांडलेला बघून होत असावं. तर ते असो.

ललित लेखनाचा प्रकार: 

बेंजामिन फ्रँकलिनमय फिलाडेल्फिया

मार्च २०१७ महिन्याचा ललित मासिकाच्या अंकात गोविंदराव तळवलकर यांचा एक लेख आला आहे, त्याचे नाव आहे एका वाद्याचा गहिरा इतिहास. तो लेख Anglican Music नावाच्या एका पुस्तकाची माहिती देणारा आहे. ते वाद्य म्हणजे Glass Harmonica आहे, त्या वाद्यात बेंजामिन फ्रँकलिन याने बरीच सुधारणा केली असा उल्लेख आहे. मला नवल वाटले. मी नुकतीच फिलाडेल्फिया शहराला भेट दिली होती. तेथील संग्रहालयात हे वाद्य मी पाहिल्याचे आठवते मला. हा बेंजामिन फ्रँकलिन नावाचा माणूस महा-उपद्व्यापी. फिलाडेल्फिया शहरात ठिकठिकाणी त्याच्या संबंधित स्थळे आहेत. अवघे शहरच बेंजामिन फ्रँकलिनमय आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

ललित लेखनाचा प्रकार: 

सुरवंट‌

मालाडला रहात असतानाची गोष्ट आहे ही. सकाळी लवकर, बहिणी शाळेला गेल्या होत्या. शाळेत जायला, मी अजून लहान होतो.नाना ऑफिसला गेले होते. सकाळपासून, तीनचाकी सायकल, बाहेरच्या गॅलरीत चालवून मला कंटाळा आला होता. मग घरांत येऊन खेळण्यांची पिशवी जमिनीवर रिकामी केली. जड खेळणी तिथेच पसरली आणि गोट्या, बॉल वगैरे मंडळी, सैरावैरा चारी दिशांना पळाली. लाकडी घसरगुंडीवरुन 'टकाक्क- टकाक्क करत खाली येणारा एक मिष्किल डोळ्याचा लाकडी मुलगा होता. ते माझं आवडतं खेळणं होतं तेंव्हा. त्याच्याशी थोडा वेळ खेळलो. मग भोवरा फिरवायचा प्रयत्न केला. पण ती दोरी बांधता बांधता, सैल होऊन सुटून यायची आणि मग भोवरा काही फिरायचा नाही.

ललित लेखनाचा प्रकार: 

रैना

ईश्वरानं तसं काही सूचित केलेलं नसतानाही काही शब्दांच्या माथी अकारण काळिमा आलेला आहे. त्यातला एक शब्द काळा रंग. तिच्या काळ्या रंगाशिवाय रात्रीचं रात्रपण अपूर्ण आहे. निरपराध असताना देखील रात्रीनं, आपल्या सख्याचा दोषापराध, काळ्या रंगाचा तो कलंक,अल्पांशानं आपल्या अंगावर घेतला आहे. आपण नाही का म्हणत - दिवसाढवळ्या अमका अमका अत्याचार झाला. म्हणजे जणू काही रात्री हलकी फुलकी पापं चालून जावीत. भरबाजारात, भररस्त्यात, दिवसाच्या लख्ख उजेडात, चारचौघांसमोर कोणी डोळाही ओलावू नये; मात्र रात्रीच्या अंधारात, घराच्या कोण्या कोपर्‍यात, जीव दाटून आलेलं विशेष काही नसावं.

ललित लेखनाचा प्रकार: 

फिलाडेल्फिया मधील नाटकांचा रस्ता

मी गेल्या महिन्यात कार्यालयीन कामानिमित्त अमेरिकेतील पूर्व भागात असेलल्या ऐतिहासिक अशा फिलाडेल्फिया(Philadelphia) शहरी काही दिवस गेलो होतो. पूर्वीही एकदा २०१४ मध्ये गेलो होतो. त्यावेळच्या अनुभवांबद्दल लिहायचे राहून गेले आहे, एक नाममात्र अपवाद सोडून, आईस हॉकीचा सामना, ज्याबद्दल पूर्वी लिहिले आहे. ह्या वेळेसही मला फिलाडेल्फियामध्ये भटकंती करायला बऱ्यापैकी सवड मिळाली. त्याबद्दल सविस्तर लिहीनच नंतर, पण येथे मी अनुभवलेल्या नाट्यसंस्कृती बद्दल लिहिणार आहे.

ललित लेखनाचा प्रकार: 

काही रोचक अनुभव - ३

साधारण ७५-७६ च्या सुमारास पुण्यात शिकायला होतो, तेंव्हाचीच गोष्ट. वेळ मिळेल तेंव्हा मुंबईला जाणे-येणे व्हायचेच. अशाच एका रविवारी संध्याकाळी, व्ही.टी. ला जाऊन, डेक्कन क्वीन मधे बसलो होतो. गाडी सुटायला साधारण पंधरा मिनिटे तरी अवकाश असेल. एक, माझ्यासारखाच मध्यमवर्गीय दिसणारा, गोरटेला तरुण माझ्यासमोर येऊन उभा राहिला.

"तुम्ही पुण्याला कुठे रहाता ? सदाशिव पेठेच्या जवळ आहे का ?" मी होकारार्थी मान हलवली. (आयला, म्हणजे आपणही सदाशिवपेठी दिसायला लागलो की काय?)

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - गद्य