दिवाळी अंक २०१२
कथा एका रिसर्चची
कुठलंही संशोधन म्हटलं की पहिली आवश्यक गोष्ट म्हणजे पैसा. होय, संशोधनाच्या उद्दिष्टाहून आवश्यक गोष्ट म्हणजे आर्थिक साहाय्य. त्यामुळेच बहुधा सगळे अभ्यास हे एखाद्या संस्थेच्या मागणीवरून (कारण ती संस्था आर्थिक आणि इतर मदत करते) किंवा वैयक्तिक असल्यास शिष्यवृत्ती वा तत्सम मदतीच्या बळावरच केले जातात. 'अर्थस्य रिसर्चो दासः।' हे शंभराहून अधिक टक्के खरं आहे.
विशेषांक प्रकार
- Read more about कथा एका रिसर्चची
- 5 comments
- Log in or register to post comments
- 10732 views
अलक्ष्मी देवीची कथा
तुम्ही कधी अलक्ष्मी देवीची कथा ऐकलीय का? नसणारच ऐकली मला खात्री आहे . कारण इतर देवींसारखं तिला ही सगळंच खूप गुडी गुडी करून सादर केलं गेलंय.
पण त्यामुळे काही फार फरक नाही पडत. तिच्या देवळाच्या परिसरात जाताच तुम्हाला जाणवत की काही तरी गडबड आहे इथे .
इथे काही नेहमीसारखा पवित्र प्रसन्न मंगल असं काही वाटत नाही ब्वा. इथे सगळीच गडबड आहे .
अलक्ष्मी मातेची मूर्ती फार वेगळी आहे. इतर देवींसारखा तिला साज शृंगार काही आवडत नाही.
ती अतीच गोरी (पांढरी) आहे . चेहऱ्यावर छद्मी भाव आहेत. डोळे कुणालाही हिप्नोटाईज करतील असे वेगळेच तेजस्वी आहेत.
विशेषांक प्रकार
- Read more about अलक्ष्मी देवीची कथा
- 11 comments
- Log in or register to post comments
- 19242 views
मृद्गंध
"या वर्षी राज्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. धरणांचीही स्थिती समाधानकारक नाही. त्यामुळे दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण होण्याचा संभव आहे. या परिस्थितीला तोंड देणे व त्यावरची उपाययोजना यासाठी आजची राज्यमंत्रिमंडळाची बैठक आयोजित केली आहे."
बोलून होताच सुळ्यांनी, मुख्य सचिवांनी, बैठकीवर एक नजर फिरवली आणि एक दीर्घ श्वास घेतला. तातडीची बैठक बोलावण्यामागे कारणही तसच होतं. जुलै उलटून गेला तरी राज्यात समाधानकारक पाउस पडला नव्हता. दुष्काळाचे चटके जाणवायला सुरुवात झाली होती.
"एकदंरीत काय स्थिती आहे?" मुख्यमंत्र्यानी शांततेचा भंग करत विचारलं.
विशेषांक प्रकार
- Read more about मृद्गंध
- 7 comments
- Log in or register to post comments
- 12975 views
खिळे
खिळे
(या आठवणी थोड्या धूसर आहेत. त्यामुळे तपशिलाच्या चुका संभवतात.)
दुपारची वेळ, नुकतीच दुपार सुरू झालेली. बातमी धडकते! कशी, कुठून, कोणाकडून... सांगता येणं शक्य नाही; पण धडकते. 'इंदिरा गांधींवर गोळीबार झाला आणि त्या गेल्या...' 'नाही, त्या गेल्या नाहीत...' दुसरी बातमी म्हणत असते, 'त्या जखमी आहेत'. तिसरी बातमी येते 'गोळीबार त्यांच्याच अंगरक्षकानं केलाय. शीख आहे तो...'
माणसं रेडिओकडं वळतात. जुना व्हॉल्वचा एक रेडिओ आणि एक ट्रान्झिस्टर. दोन्ही तीन बँडचेच. एमडब्ल्यू, एसडब्ल्यू1 आणि एसडब्ल्यू2.
विशेषांक प्रकार
- Read more about खिळे
- 9 comments
- Log in or register to post comments
- 11498 views
लेखनः बाहेर आणि आत
‘लिहिणं’ ही जाणीवपूर्वक केली जाणारी कृती असूनही ती काहीशी धूसर आहे माझ्यासाठी.
म्हणून ‘लिहिण्या’बद्दल मला अनेक प्रश्न पडतात.
उदाहरणार्थ: ‘लिहिणं म्हणजे नेमकं काय?’
‘अव्यक्ताला व्यक्त होण्याची निकड का भासते?’
‘यासाठी शब्दांचं माध्यम का निवडलं जात?’
‘अभिव्यक्तीसाठी रचनाप्रकार (गद्य की पद्य, ललित की वैचारिक ..) कसा निवडला जातो?’
‘मला अक्षरओळख नसती, तर मी कशी व्यक्त झाली असते?’
‘लिहिण्याची प्रक्रिया आत किती असते आणि बाहेर किती असते?”
‘लिहिण्याला कशाची मदत होते? कशाचा अडथळा होतो?’
‘मी का लिहिते?’
***
विशेषांक प्रकार
- Read more about लेखनः बाहेर आणि आत
- 11 comments
- Log in or register to post comments
- 17008 views
गजरा
लहान असताना टी.व्ही. ही एक ठराविक वेळी पाहण्याची आणि चॅनल्सचा रतीब न घालणारी एक करमणूकीची सोय होती. त्यावेळी दूरदर्शनवर 'गजरा' नावाचा एक कार्यक्रम यायचा. त्या कार्यक्रमामुळे मला गजरा हा शब्द, तो खराखुरा फुलांचा गजरा प्रत्यक्ष डोळ्यांनी बघायच्या आधी कळला. त्या कार्यक्रमात सुरुवातीला कॅलिडोस्कोपमधून दिसते तशी वेगवेगळ्या आकारांची हालणारी नक्षी दिसायची. त्यामुळे गजरा ही एक रंगीबेरंगी वस्तू असावी असेच मला वाटायचे. पण प्रत्यक्ष बघितल्यावर बहुतकरून तो पांढऱ्या रंगाचा असतो हे बघून थोडा हिरमोडच झाला होता.
विशेषांक प्रकार
- Read more about गजरा
- 13 comments
- Log in or register to post comments
- 19921 views
ख्रिसमस केक
साहित्य-
१५० ग्राम मैदा,
१५० ग्राम बटर,
१५० ग्राम साखर,
४ अंडी,
१ चहाचा चमचा बेकिंग पावडर,
२ ते ३ चहाचे चमचे रम,
२ ते ३ चहाचे चमचे कोको पावडर (अनशुगर्ड)जर शुगर्ड कोको/ड्रिंकिंग चॉकलेट पावडर असेल तर ५ ते ६ चमचे.
१ चमचा ब्रु किवा नेसकॅफे पावडर,
१ चमचा जायफळ पावडर,
१ ते २ चमचे दालचिनी पावडर
बदाम, काजू, अक्रोड,बेदाणे, ड्राइड चेरीज, ड्राईड प्लम्स इ.चे तुकडे साधारण वाटीभर,
४ ते ५ चहाचे चमचे दूध
कृती-
ड्राय फ्रूट्सचे तुकडे रममध्ये भिजवून ठेवा.
बटर फेसून घ्या, त्यात साखर घालून फेसा,नंतर त्यात अंडी टाकून फेसून घ्या.
विशेषांक प्रकार
- Read more about ख्रिसमस केक
- 6 comments
- Log in or register to post comments
- 10823 views
पेठा
समस्त जालीय-स्नेह्यांना आणि आप्तेष्टांना दीपोत्सवाच्या गोड गोड शुभेच्छा.
गोडाचं नाव निघालच आहे तर एखादी मिठाई होउन जाऊदे का? :)
एकदा लहान असताना मी चुकून खडीसाखरेचा मोठा खडा समजून हा आग्र्याचा पेठा उचलला होता. त्याचा पहिला चावा घेताच तो तोंडात असा काही विरघळला की यंव रे यंव. पेठ्याशी जुळलेलं पहिल्या नजरेतलं हे प्रेम आजही तस्संच टिकून आहे. भौगोलिक कारणांमुळे हे पहिलं प्रेम माझ्यासाठी हल्ली दुर्मिळ झालंय.
थोडी शोधाशोध केल्यावर कळल की घरच्या घरी पेठा बनवणं इतकं सोप्पं आहे की माझ्याने रहावेना. चला तर मग लागू या तयारीला.
साहित्य :
विशेषांक प्रकार
- Read more about पेठा
- 9 comments
- Log in or register to post comments
- 15056 views
जेम्स प्रिन्सेप आणि ब्राह्मी लिपीचा शोध
हेस्टिंग्जच्या काळामध्ये हिंदुस्तानात भरपूर पैसा जोडून १७८७मध्ये इंग्लंडात परतलेल्या जॉन प्रिन्सेप ह्यांना एकूण सात मुलगे होते. ईस्ट इंडिया कंपनीच्या नोकरभरतीमध्ये ओळखी, वशिले आणि पुतणेगिरी भरपूर होती. तिचाच लाभ घेऊन सातही प्रिन्सेप भाऊ हिंदुस्तानात आले. त्यांपैकी दोघांनी विशेष कर्तबगारी दर्शविली. एक सर हेन्री थॉबी प्रिन्सेप आणि दुसरा म्हणजे जेम्स प्रिन्सेप.
विशेषांक प्रकार
- Read more about जेम्स प्रिन्सेप आणि ब्राह्मी लिपीचा शोध
- 7 comments
- Log in or register to post comments
- 17171 views
आजचं सपाट जग आणि भारतीय सिनेमा
तंत्रज्ञान आणि कला यांचा परस्परसंबंध वेगवेगळ्या अंगांनी पाहता येतो. कलाविष्कारांना आपल्यापर्यंत आणण्यात तंत्रज्ञानाची मदत होते ही त्यांपैकी एक बाजू झाली; कलाविष्काराच्या तंत्रामध्ये फरक झाल्यामुळे कलेच्या निर्मितीत फरक पडतो ही आणखी एक बाजू झाली; तर जगण्यामध्ये तंत्रज्ञानामुळे फरक पडतो आणि त्याचं प्रतिबिंब कलाविष्कारात पडतं ही त्यांहून भिन्न बाजू आहे. आजच्या भारतीय सिनेमाच्या संदर्भात हे मुद्दे कसे लावून पाहता येतील?
कलाविष्काराच्या तंत्रामध्ये फरक झाल्यामुळे कलेच्या निर्मितीत पडलेला फरक :
विशेषांक प्रकार
- Read more about आजचं सपाट जग आणि भारतीय सिनेमा
- 19 comments
- Log in or register to post comments
- 20891 views