ऑलिंपिक २०१२: क्रीडाप्रकार-१ (A-B)

ऑलिंपिक २०१२: क्रीडाप्रकार: A-B C-E F-H I-S T U-Z

=======

आता लंडन ऑलिंपिकला साधारण एक महिना उरला आहे. त्याची पूर्वतयारी इथे सुरू करूया जेणे करून ऑलिंपिक सुरू झाल्यावर आपल्याला पूर्ण लक्ष आपापल्या आवडत्या खेळांकडे, खेळाडूंकडे देता येईल. "क्रीडाप्रकार" या लेखमालिकेत आपण लंडन ऑलिंपिकमध्ये समाविष्ट असणाऱ्या क्रीडाप्रकारांची थोडक्यात माहिती, त्यात किती व कोणत्या प्रकारच्या स्पर्धा खेळल्या जातील आणि त्यात किती पदके पणाला लागलेली असतील अश्या प्रकारची माहिती घेणार आहोत. सोयीसाठी एका भागात ५ ते ८ खेळ समाविष्ट करायचा मानस आहे. या भागात इंग्रजी अद्याक्षरे A va B ने सुरू होणार्‍या पुढील क्रीडाप्रकारांची माहिती घेऊयातः
तिरंदाजी(Archery), अॅथलेटिक्स(Athletics), बॅडमिंटन(Badminton), बास्केटबॉल(basket Ball), बीच वॉलीबॉल(Beach Volleyball) आणि बॉक्सिंग(Boxing)

चला तर मग सुरू करूयात:

तिरंदाजी(Archery)

या स्पर्धेमध्ये एकूण चार सुवर्णपदके पणाला लागलेली असतील. दोन पुरुष गटात तर दोन महिला गटात पदके मिळतील. यामध्ये पुरुष व स्त्रियांची एकेरी स्पर्धा व सांघिक स्पर्धा यांचा समावेश आहे.
एकेरी स्पर्धा: यात सर्वप्रथम 'रँकिंग फेरी' होईल. या फेरीचा उपयोग ६४ खेळाडूंची १ ते ६४ अशी क्रमवारी लावण्यासाठी करण्यात येतील. त्या नंतरच्या राऊंडसमधे पहिल्या गुणकांनाचा खेळाडू ६४व्या गुणांकनाच्या खेळाडूबरोबर भिडेल. त्याच प्रकारे २रा ६३ व्या बरोबर .. असे करत करत 'एलिमिनेशन' पद्धतीने शेवटच्या दोन खेळाडूंमध्ये सुवर्ण पदकाचा तर सेमी फायनल ला हरलेल्या खेळाडूंमध्ये ब्रॉन्झ पदकाचा सामना होईल. स्पर्धेच्या एका सेटमध्ये तीन बाण मारावे लागतील. अश्या पाच सेटच्या गुणांकनाच्या बेरजेवरून विजेता ठरेल.

सांघिक स्पर्धा: यात एका संघात तीन खेळाडू असतील. यात सर्वप्रथम 'रँकिंग फेरी' होईल. या फेरीचा उपयोग १६ संघांची १ ते १६ अशी क्रमवारी लावण्यासाठी करण्यात येतील. त्या नंतरच्या राऊंडसमधे पहिल्या गुणांकनाचा संघ ६४व्या गुणांकनाच्या संघाबरोबर भिडेल. त्याच प्रकारे २रा १५ व्या बरोबर .. असे करत करत 'एलिमिनेशन' पद्धतीने शेवटच्या दोन संघामध्ये सुवर्ण पदकाचा तर सेमी फायनलला हरलेल्या संघामध्ये ब्रॉन्झ पदकाचा सामना होईल.
स्पर्धेच्या एका सेटमध्ये सहा बाण (प्रत्येकी दोन) मारावे लागतील. अश्या चार सेटच्या गुणांकनाच्या बेरजेवरून विजेता ठरेल. जर समान गुण झाले तर तीन बाणांचा (प्रत्येकी एक) 'शुट ऑफ' खेळवला जाईल. त्यातही निर्णय न झाल्यास, डार्ट बोर्डवरच्या मध्याच्या सर्वात अचूक वेध घेणारा संघ विजेता ठरेल

स्पर्धा कुठे होणार?: ही स्पर्धा क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. सदर मैदान यासाठी सज्ज झाले आहे.

स्पर्धा कधी होणारः एकेरी स्पर्धा २७ जुलैपासून सुरू होतील. महिलांची अंतिम फेरी दोन ऑगस्ट तर पुरुषांची ३ऑगस्टला खेळवली जाईल. सांघिक स्पर्धा पुरुष व महिलांच्या अनुक्रमे २८ व २९ जुलै रोजी सुरू होतील आणि त्याच दिवशी त्यांचा निकालही लावला जाईल.

बीजिंग ऑलिंपिकचे निकालः कोरियाने २ सुवर्णांसह पाच पदके मिळवत बाजी मारली होती. त्यापाठोपाठ एकेक सुवर्ण पदक चीन व युक्रेनने पटकावले होते.

यावेळी भारताकडून कोण?
पुरुष एकेरी: जयंत तालुकदार, रूणदिप रॉय आणि राहुल बॅनर्जी
महिला एकेरी: बोम्बायला देवी (गेल्यावेळी सांघिक स्पर्धेत सहावा क्रमांक), दीपिका कुमारी (राष्ट्रकुल स्पर्धेत दोन सुवर्ण व आशियाई स्पर्धेत ब्रॉन्झ), चेक्रुवुलु स्वुरो
महिला सांघिक: वरील तीन खेळाडूंचा संघ स्पर्धेत उतरेल
पुरूष सांघिक तरूणदिप रॉय, जयंत तालुकदार आणि राहुल बॅनर्जी

यावेळी भारताला पदकाची आशा? दीपिकाने काही चमत्कार केला तरच. मात्र शक्यता फार कमी

==============================

अॅथलेटिक्स(Athletics)

ऍथलेटिक्स
ऍथलेटिक्स

या स्पर्धेमध्ये तब्बल ४७ सुवर्णपदके पणाला लागलेली असतील. यापैकी २४ ट्रॅकवर, १६ 'फील्ड'वर, दोन संयुक्त ठिकाणी तर रस्त्यांवर होणाऱ्या स्पर्धेतून ठरतील. ऑलिंपिकचे घोषवाक्य Citius, Altius, Fortius’ (‘अधिक वेगात, अधिक उंचावर, अधिक ताकदीने’) सार्थ ठरवणाऱ्या या क्रीडाप्रकारात चालण्यापासून, मॅराथॉनपर्यंत सारे खेळ आहेत. प्रत्येक खेळाबद्दल माहिती देणे इथे औचित्याचे होणार नाही. त्या त्या स्पर्धा चालू असताना त्याबद्दल बोलूच. ऑलिंपिक मधला सर्वात जास्त पदके मिळवून देऊ शकणाऱ्या या प्रकारात, साधारण दोन हजार खेळाडू भाग घेणार आहेत.

स्पर्धा कुठे होणार?: खास ऑलिंपिकसाठी बांधलेल्या 'ऑलिंपिक पार्क'मध्ये या स्पर्धा होतील. मेरेथॉनसारख्या स्पर्धा लंडनामध्ये अन्यत्र सुरू होऊन या मैदानावर निकाल लागेल. सदर मैदान यासाठी सज्ज झाले आहे.

स्पर्धा कधी होणारः ३ ऑगस्टपासून हा महासोहळा सुरवात होईल ते ऑलिंपिकचे शेवटचे पदक १२ ऑगस्टला याच क्रीडाप्रकाराचे (पुरुष मॅरेथॉन स्पर्धेचे) असेल

बीजिंग ऑलिंपिकचे निकालः पनामा, इस्टोनिया, केनिया सारख्या देशांसकट एकूण २० देशांनी या क्रीडाप्रकारात पदके मिळविली त्यापैकी ७ सुवर्णासह २३ पदके मिळवून अमेरिका प्रथम तर ६ सुवर्णांसह १८ पदके मिळवून रशिया त्यामागोमाग होती. जमैका व केनिया सारख्या तुलनेने अप्रगत परंतु काटक खेळाडूंच्या देशांनी ६ सुवर्णपदके पटकावत अनुक्रमे ११ व १४ पदके पटकावली होती.

यावेळी भारताकडून कोण?
भारत या स्पर्धांमध्ये कधीच एकही पदक मिळवू शकलेला नाही. यावेळी एकूण १३ अॅथलिट ऑलिंपिकसाठी पात्र ठरले आहेत
पुरुषः
५० किमी चालणे: बसंत राणा
२० किमी चालणे: बलजिंदर सिंग, गुरमित सिंग, इरफान थोडी
पुरुष मॅरेथॉन: रामसिंग यादव
थाळी फेक: विकास गौडा (आशियाई ब्रॉन्झ, राष्ट्रकुल रौप्य, जागतिक स्पर्धा ७वा, अथेन्स १४वा, बीजिंग २२वा)
गोळाफेकः ओमप्रकाश करहाना
ट्रिपल जम्पः रणजित महेश्वरी (राष्ट्रकुल ब्रॉन्झ)
महिला
८००मी धावणे: टिन्टु लुका (पीटी उषाची विद्यार्थिनी, आशियाई ब्रॉन्झ)
३००० मी अडथळा शर्यत: सुधा सिंग (आशियाई सुवर्ण, रौप्य)
थाळी फेक: कृष्णा पुनिया (आशियाई २ ब्रॉन्झ, राष्ट्रकुल सुवर्ण, अर्जुन पदक विजेती), सीमा
उंच उडी: सहाना कुमारी
ट्रिपल जम्पः रणजित महेश्वरी (राष्ट्रकुल ब्रॉन्झ), मयुखा जॉनी

यावेळी भारताला पदकाची आशा? शक्यता जवळ जवळ नाहीच

======

बॅडमिंटन(Badminton)

बॅडमिंटन
बॅडमिंटन

या स्पर्धेमध्ये ५ सुवर्णपदके पणाला लागलेली असतील. स्त्रिया व पुरूष यांच्या एकेरी व दुहेरी स्पर्धा आणि मित्र दुहेरी स्पर्धा या क्रीडाप्रकारात खेळल्या जातील. सर्व प्रकारांत स्पर्धकांना ग्रुप्समध्ये विभागले जाईल (ग्रुप्स घोषित व्हायचे आहेत) ज्यात प्रत्येक खेळाडूला ग्रुप मधील इतर प्रत्येक खेळाडू बरोबर खेळावे लागेल. यातील अव्वल १६ खेळाडू नॉक-आऊट पद्धतीने खेळतील. शेवटचे दोन विजेते सुवर्णपदका साठी खेळतील तर सेमी फायनलमध्ये पराभूत झालेले ब्रॉन्झ मेडलसाठी खेळातील

स्पर्धा कुठे होणार?: मुळात लाइव्ह कंन्सर्ट्स, इतर मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी प्रसिद्ध असलेल्या लंडनमधील 'वेम्बली अरेना' इथे या स्पर्धा होणार आहेत. सदर स्पर्धेचे स्थळ यासाठी सज्ज झाले आहे.

स्पर्धा कधी होणारः सगळ्या प्रकारच्या स्पर्धा २८ जुलैपासून सुरू होतील. ३ ऑगस्टला मिश्र दुहेरी, ४ ऑगस्टला महिला (एकेरी व दुहेरी) आणि ५ ऑगस्टला पुरूष (एकेरी व दुहेरी) निकाल लागतील

बीजिंग ऑलिंपिकचे निकालः चीन आणि आशियाई अतिपूर्वेच्या खेळाडूंचा दबदबा असणाऱ्या या खेळात गेली स्पर्धा अपवाद नव्हती. चीनने ३ तर इंडोनेशिया व कोरियाने प्रत्येकी १ सुवर्ण जिंकले होते.

यावेळी भारताकडून कोण?
अख्ख्या भारताचे यावेळी या स्पर्धांकडे लक्ष लागले असेल. आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मजबूत टीम यावेळी जात असावी
पुरुष एकेरी: पुरुपल्ली कश्यप (राष्ट्रकुल ब्रॉन्झ)
महिला एकेरी: सायना नेहवाल (बस नाम ही काफी है Wink )
महिला दुहेरी: ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा (राष्ट्रकुल सुवर्ण, जागतिक स्पर्धा ब्रॉन्झ)
मिश्र दुहेरी: व्ही. दिगु आणि ज्वाला गट्टा (कॉमनवेल्थ रौप्य, जागतिक स्पर्धा ब्रॉन्झ)

यावेळी भारताला पदकाची आशा? अर्थातच! सायना नेहवाल हिच्याकडून एका पदकाची (खरंतर सुवर्णाची) अपेक्षा करायला हरकत नाही. या व्यतिरिक्त माझ्यामते दोन्हीपैकी एका (खरंतर दोन्ही) दुहेरी स्पर्धेत किमान ब्रॉन्झ मिळण्याची मला आशा वाटते. पुरुष एकेरीतील पुरुपल्ली कश्यप हा देखील पेटला तर मोठे उलटफेर करू शकतो हे त्याने नुकतेच #३ खेळाडूला हरवून दाखवून दिले आहे. पण त्याच्याकडून सध्यातरी पदकाची अपेक्षा नाही.

=============

बास्केटबॉल(basket Ball)

बास्केटबॉल
बास्केटबॉल

या स्पर्धेमध्ये २ सुवर्णपदके पणाला लागलेली असतील. स्त्रिया व पुरूष यांच्या सांघिक स्पर्धा या क्रीडाप्रकारात खेळल्या जातील. संघांना ग्रुप्समध्ये विभागले जाईल (ग्रुप्स घोषित झाले आहेत). ज्यात प्रत्येक संघाला ग्रुप मधील इतर प्रत्येक संघाबरोबर खेळावे लागेल. यातील अव्वल ४ संघ सेमी फायनल खेळतील. त्याचे विजेते सुवर्णपदकासाठी खेळतील तर सेमी फायनलमध्ये पराभूत झालेले ब्रॉन्झ पदकासाठी खेळातील

स्पर्धा कुठे होणार?: बास्केटबॉलसाठी लंडनमध्ये नवा बास्केटबॉल अरेना बांधत आहेत. शिवाय नॉर्थ गिनिच अरेना येथेही काही स्पर्धा होतील. दोन्ही स्थळे यासाठी सज्ज झाली आहेत.

स्पर्धा कधी होणारः सगळ्या प्रकारच्या स्पर्धा २८ जुलैपासून सुरू होतील.त्यांचे निकाल ११ व १२ ऑगस्टला लागतील

बीजिंग ऑलिंपिकचे निकालः अपेक्षेप्रमाणे दोन्ही सुवर्णपदके अमेरिकेने जिंकली होती

यावेळी भारताकडून कोण? संघ अपात्र / अनुपलब्ध

यावेळी भारताला पदकाची आशा? गैरलागू

=============

बीच वॉलीबॉल (Beach Volleyball)

बीच वॉलीबॉल
बीच वॉलीबॉल

१९९६च्या अटलांटा ऑलिंपिक पासून या खेळाचा समावेश ऑलिंपिकमध्ये झाला आहे. या क्रीडाप्रकारामधे २ सुवर्णपदके पणाला लागलेली असतील. स्त्रिया व पुरूष यांच्या सांघिक स्पर्धा या क्रीडाप्रकारात खेळल्या जातील. संघांना ग्रुप्समध्ये विभागले जाईल (ग्रुप्स घोषित झालेले नाहीत). ज्यात प्रत्येक संघाला ग्रुप मधील इतर प्रत्येक संघाबरोबर खेळावे लागेल. यातील अव्वल ४ संघ सेमी फायनल खेळतील. त्याचे विजेते सुवर्णपदकासाठी खेळतील तर सेमी फायनलमध्ये पराभूत झालेले ब्रॉन्झ पदकासाठी खेळातील

स्पर्धा कुठे होणार?: या एकूणच 'प्रेक्षणीय' खेळासाठी तरुणांची भरपूर गर्दि असते. यासाठी लंडनच्या बाहेरील स्थळ निवडण्याऐवजी ऐन शहराच्या मध्यात पंतप्रधानांच्या जणू अंगणात, हॉर्स गार्डस परेड, इथे या स्पर्धा होणार आहेत. ऐन ऑलिंपिकमध्ये हा भाग स्थापत्यच्या आणि राजकारणाच्या पलीकडल्या सौंदर्याने भरलेला असेल Wink

स्पर्धा कधी होणारः सगळ्या प्रकारच्या स्पर्धा २८ जुलैपासून सुरू होतील.महिला व पुरुष गटाचे निकाल अनुक्रमे ८ व ९ ऑगस्टला लागतील

बीजिंग ऑलिंपिकचे निकालः कॅलिफोर्नियात मोठ्याप्रमाणावर खेळल्या जाणाऱ्या या खेळाची दोन्ही सुवर्णपदके अपेक्षेप्रमाणे अमेरिकेने जिंकली होती.

यावेळी भारताकडून कोण? संघ अपात्र / अनुपलब्ध

यावेळी भारताला पदकाची आशा? गैरलागू

====

बॉक्सिंग(Boxing)

बॉक्सिंग
बॉक्सिंग

गेल्या ऑलिंपिकमध्ये पदक मिळाल्यापासून भारतात या क्रीडाप्रकाराला अधिक चालना मिळाली आहे. या वर्षी पहिल्यांदाच महिला बॉक्सिंगचा समावेश केला आहे. या क्रीडाप्रकारामध्ये १३ सुवर्णपदके पणाला लागलेली असतील. स्त्रिया व पुरूष यांचे सामने विविध वजनी गटांत खेळले जातील. सदर स्पर्धा प्रत्येक वजनी गटात संपूर्णपणे नॉक-आऊट पद्धतीने खेळली जाईल. त्यातील सेमीफायनलचे विजेते सुवर्णपदकासाठी खेळतील तर सेमी फायनलमध्ये पराभूत झालेले ब्रॉन्झ पदकासाठी खेळातील.

स्पर्धा कुठे होणार?: पाच खेळांसाठी सज्ज केलेले सर्वात मोठे स्थळ 'एक्सेल' या नावाने ओळखले जाते.

स्पर्धा कधी होणारः सगळ्या प्रकारच्या स्पर्धा ३१ जुलैपासून सुरू होतील.महिला व पुरुष गटाचे निकाल अनुक्रमे ९ व ११,१२ ऑगस्टला लागतील.

बीजिंग ऑलिंपिकचे निकालः बीजिंग ऑलिंपिकमध्ये रशियन वर्चस्व भेदून चायनाने २ सुवर्णांसह ४ पदके जिंकून २ सुवर्णांसह ३ पदके जिंकणाऱ्या रशियाला मागे टाकले होते. भारतालाही या स्पर्धेत ब्रॉन्झ प्राप्त झाले होते.

यावेळी भारताकडून कोण?
यावेळी भारताकडून ७ पुरूष पात्र आहेत तर पहिल्यांदाच महिलांना प्रवेश मिळाल्याने ५ वेळा जगज्जेती ठरलेल्या मेरी कोमलाही संधी मिळणार आहे.
४९ किलो: देवेंद्रो सिंग
५६ किलो: शिव शापा
६० किलो: जय भगवान
६४ किलो: मनोज कुमार
६९ किलो: विकास यादव
७५ किलो: विजेंदर सिंग
८१ किलो: सुमित संगवान
महिला ५१ किलो: मेरी कोम

यावेळी भारताला पदकाची आशा?
होय! याहीवेळी भारताला पदकाची आशा करता येईल. पुरुषांमध्ये एक ते दोन ब्रॉन्झ पदके मिळवण्याची शक्यता आहे. मेरी कोमकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा मी करतो आहे ती चूक ठरू नये ही प्रार्थना

टीपः
१. सदर माहिती सध्या उपलब्ध असलेली आहे. अजुन काहि खेळाडू प्रात्र होण्याची शक्यता आहे. (उदा. आज (२२ जुन) पुरुष संघ तिरंदाजीस्पर्धेत पात्र ठरला आहे. अश्यावेळी हा धागा अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न असेल
२. माहितीत चुक आढळल्यास सांगावे, खातरजमा करून चुक सुधारली जाईल. तसेच नवे तपशील कळल्यासही सांगावे म्हणजे य्थायोग्य बदल करता येतील

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

बॅडमिंटनमधे सायना आणि ज्वाला-अश्विनी यांच्याकडून अपेक्षा आहेत. बॉक्सिंगमधे भारतीय खेळाडूंनी आत्तापर्यंत काही ना काही कमाई केली आहे. मेरी कोम आणि इतर पुरूष मुष्टीयोद्ध्यांकडूनही अपेक्षा आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ऑलिम्पिक सोहळा माझ्या सर्वात आवडत्या सोहळ्यांपैकी एक आहे. अनेक खेळात असलेला रस, वेगवेगळ्या कौशल्यांची मेजवानी, अनेक अटीतटीच्या लढती आणि खेळाडूंची चिकाटी पाहून दिल खूश होतो. मागची तीन चार ऑलिम्पिक नेटाने पाहिली होती, यावेळी मात्र कितपत जमेल शंका आहे. पण या लेखमालेमुळे किमान खेळाडूंची ओळख होईल आणि जेवढं पाहता येईल त्यात मजा येईल.

या लेखातील आलेल्यापैकी, बॅडमिंटनचे सामने चुकणार नाहीत असा माझा प्रयत्न असेल विशेषतः उपांत्यफेरी पुढचे. चायनाचे खेळाडू यात फार चांगले असतातच पण भारत, इंडोनेशिया आणि कधी कधी युरोपातले काही खेळाडू चमकून जातात. भारताच्या टीमला शुभेच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

उत्तम प्रकल्प! प्रत्येक खेळाचा घेतलेला आढावा आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हेच म्हणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक माहिती आहे. आता मला या विषयासाठी इतर वर्तमानपत्रं/मासिकं वाचायची गरज नाही. पुढील भाग वाचायला आवडतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अ‍ॅथलेटिक्सः
आता 'सहाना कुमारी' उंच उडीमधे पात्र ठरली आहे.
शिवाय राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेती सीमा ही देखील थाळीफेक स्पर्धेत पात्र ठरली आहे
ट्रिपल जम्पमधे(तिहेरी उडी?) मयुखा जॉनी पात्र झाली आहे.

तिरंदाजी
शिवाय जयंत तालुकदार, तरूणदिप रॉय आणि राहुल बॅनर्जी हे तिरंदाज एकेरी स्पर्धेतही पात्र झाले आहेत.

सदर माहिती लेखात वाढवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!