है सबसे मधुर वो गीत...

"है सबसे मधुर वो गीत जिन्हें, हम दर्द के सुर में गाते हैं
जब हद से गुज़र जाती है खुशी, आँसू भी छलकते आते हैं
हैं.." हे शैलेंद्रने लिहिलेल्या तलतच्या सुरातल्या ओळी ब्रिटिश कवी पी. बी. शेलीच्या " To the Skylark" मधल्या " Our sincerest laughter, With some pain is fraught; Our sweetest songs are those that tell of saddest thought, " याच्याशी जुळतात असं माझ्या बाबांनी जेंव्हा शैलेंद्रचा मुलगा दिनेश याला कळवलं तेंव्हा तो चकित झाला आणि त्या नंतर त्याच्याशी बाबांचे स्वर जुळले ते आजतागायत. शैलेंद्र म्हणजे बाबांचे दैवत. शैलेन्द्रने लिहिलेल्या प्रत्येक गीताच्या मागचा इतिहास दिनेशच्या तोंडून ऐकल्यावर ते मला सांगताना उनकी आंखे नम हो जाती थी।

बाबांनी सवय लावली होती हिंदी चित्रपटातली गाणी ऐकायची. हॉस्टेलमध्ये फिलिप्सचा रेडिओ उशाशी ठेवून गाणी ऐकायची आणि अभ्यास करतांना पण रेडिओ. विविध भारतीवर ठेवलेला काटा इकडचा तिकडे होईलच कसा? ‘आप के अनुरोधपर', ' मन चाहे गीत’ आणि ‘जयमाला’. म्हणूनच पहिल्या वर्षी इम्तिहान में मिळालेले मार्क्स खूप कमी होते. पण, रुक जाना नही तू कहीं हार के,इक बंजारा गाए, जो खो गया मैं उसको, आनेवाला पल, कुछ तो लोग कहेंगे, जियो तो ऐसे जियो, मैं जिंदगी का साथ या ओळी मोटिवेट करायच्या. ही हिंदी गाणी नसती तर जीवन असह्य होऊन गेलं असतं.भारतातल्या भूलोकीच्या हिंदी गंधर्वांच्या लकेरी ऐकण्यात काय सुख आहे ते अशा डायहार्ड कानसेनांनाच कळणार. षड्जावर सुरु करुन निषादापर्यंत लीलया आवाज फिरविणारे हे तानसेन आणि बैजू बावरा च्या दोन कन्या ताना आणि रिरी प्रमाणे तानसेनलाही हरवणाऱ्या गायिका. गांधारात गाऊन आवाजाने मधुर गंध पसरविणारे हे गायक म्हणजे गुलाबाच्या आणि चाफ्याच्या पाकळ्यां चुरून आपल्यावर वर्षाव केलाय अशी अनुभूती. ही गाणी ऐकताना ज्यांनी गाण्यांसोबत एखादी लकेर घेतली किंवा ज्यांच्या पावलांनी ठेका धरायला सुरूवात केली ती माणसं जिवंत असल्याचा दावा करू शकतात. आणि त्या सर्व कविराजांची मांदियाळी? ओह!! संगीत मन को पंख लगाए, गीतों से रिमझिम रस बरसाए…

अर्ध्या तासात किंवा काही वेळा एका तासात गाण्यांचा खजिना रीता व्हायचा. गायक आणि चित्रपटाच्या नावांव्यतिरिक्त गीतकार आणि संगीत दिग्दर्शकाच्या नावासह गाण्यांची घोषणा केली जायची. एखाद्या गीतकाराचं नाव घेतलं की पुढे काय असणार हा फॉर्म्युला जवळपास ठरलेला असायचा. उदा. गीतकार आनंद बक्षी नाव ऐकले तर पुढे संगीतकार आरडी बर्मन, किंवा लक्ष्मीकांत प्यारेलाल असतील याची गॅरंटी. शकील बदायुनी आणि नौशाद ही जोडी अगदी फेविकॉल. आनंद बक्षी कधी कधी गुलशन बावरा आणि इंदिवर यांना सोबत घेउन यायचे पण कल्याणजी आनंदजी यांना हमखास आणायचे, तर साहिर कधी नौशाद, रोशन, चित्रगुप्त, रवी तर कधी एस डी बर्मन आणायचे. मजरुह सुलतानपुरी जास्त करून एस डी बर्मन बरोबर घरोबा करायचे. शैलेंद्र आणि हसरत जयपुरी यांचं नाव घेतलं की मीच पुढची घोषणा करायचे, " शंकर जयकिशन." आणि नव्वद टक्के ते बरोबर असायचं.एसएच बिहारी यांची जोडी ओ पी नय्यर, तर राजा मेहदी अली खान सोबत मदन मोहन हे कधीच चुकायचं नाहीं. कैफी आझमी आणि मदन मोहन अशी जोडी कधी तरी जमायची. मग केंव्हातरी सलील चौधरी,सोनिक-ओमी, सी रामचंद्र, इक्बाल कुरेशी, उषा खन्ना, हंसराज बहल संगीत द्यायला यायचे तर जान निसार अख्तर, कमर जलालबादी, नक्शल्याल पुरी, एमजी हशमत, गौहर कानपुरी, नीरज, समीर, अंजान, गुलजार, देव कोहली, निदा फाजली, माया गोविंद असे गीतकार भेटीला येत. बाकी गायक गायिका यांचा ताफा असायचा तो मोहंमद रफी, मुकेश, मन्ना डे, हेमंत कुमार, तलत महमूद, किशोर कुमार, लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांचाच. गीता दत्त, सुरैय्या, नूरजहान, शारदा, आणि मुबारक बेगम कधीतरी डोकवायच्या.जितकी गाणी ऐकली ती सगळी पाठ झाली. कशी झाली कल्पना नाही. गाण्यातला गोडवा, त्यातले शब्द आणि संगीत नियोजन यांचा बहुतेक वाटा असावा गाणी पाठ होण्यामागे.

या सर्वावर कडी म्हणजे 'झुमरी तलैया से नंदलाल शर्मा!! श्रोत्यांची नावे आणि ठिकाण जाहीर करताना एक नाव न चुकता सतत घेतलं जायच. ''झुमरी तलैया से नंदलाल शर्मा!' एकदा मी रेडिओ श्रीलंका लावला तेंव्हाही झुमरी तलैयाचे नंदलाल शर्मा तिथे पोहोचले होते!!

कॉलेजात वीकली असाईनमेंट असायची. त्याचा निकाल मी झुमरी तलैयाशी जोडायचे. म्हणजे " आज झुमरी तलैया से पिंकी, टीना,महेश,अशोक, रामलाल, साधना, सरिता, नानाजी, रिंकू, घोषबाबू, बिपीन , रमेश, महादेव, नारायण इत्यादि इत्यादि लांबलचक यादी असेल तर मला वीस पैकी अठराच्या खाली मार्क नसतील आणि फक्त दोन तीनच नावे आणि त्यात 'झुमरी तलैया से नंदलाल शर्मा असतील तर वीस पैकी चौदा पंधरा पडतील. मला एक दोन विषयातच अठरा एकोणीस पडायचे. बाकी पंधरा, सोळाच्या आसपास. 'झुमरी तलैया से नंदलाल शर्मा' माझे मार्क खाऊन टाकायचे!! मी मग त्यांचा इतका धसका घेतला की परीक्षेच्या काळात आणि रिझल्टच्या दिवशी झुमरी तलैया से ऐकलं रे ऐकलं की एक मिनिटभर रेडिओचं बटन ऑफ करायची. दीवानी मुजसी नहीं इस अंबर के नीचे…! माझ्या वेडपटपणाचे आता हसू येते.

मग झुमरी तलैया कुठे आहे आणि नंदलाल शर्मा कोण आहेत हे जाणून घेण्याची प्रबळ इच्छा व्हायची. पोस्ट कार्ड वर " नंदलाल शर्मा, झुमरी तलैया" एवढा पत्ता टाकून त्याना विनंती करावी की " महाशय, तुमची पसंती कृपया थांबवा" असा विचारही एकदा मनात येऊन गेला होता. हे रोज पसंती कळवतात तर यांच्याकडे पोस्टकार्डस् किती असतील? वर्षाचे एक हजार पोस्टकार्डस् त्यांनी एकदम घेऊन ठेवलेत की काय? एकदम एवढे पोस्टकार्डस् घेतल्यावर त्यांना डिस्काउंट दिला असेल म्हणून ते रोज तीन कार्डस् टाकतायत बहुतेक. कार्डवर त्यांनी असा फॉर्म तयार केला असेल की फक्त गाण्याचं नाव टाकायचं आणि पोस्ट करायचं, असे वेडगळ प्रश्न मनात यायचे. मग परीक्षा संपल्यानंतर एकदा एक चाळा लागला तो म्हणजे 'झुमरी तलैया से नंदलाल शर्मा यांची पसंती नेमकी काय असते ते शोधायचे. मग ते ज्या गाण्यांची फर्माईश करायचे त्याची यादी करायची आणि आपल्या आवडी प्रमाणे ही यादी जुळते काय ते पहायचे. असे मी सहा सात महिने सतत केले. आश्चर्याची बाब म्हणजे ही यादी जेंव्हा संपली तेंव्हा 'झुमरी तलैया से नंदलाल शर्माना मी मनोमन सलाम केला.त्यांचा आदर वाटायला लागला. त्यांच्या बदल नकारात्मक विचार केला म्हणून वाईट ही वाटले. त्या गाण्यांची यादी अशी:

ये परबतोंके दायरे,ये शाम का धुंवा/इतनी हसीन इतनी जवां रात क्या करें/अगर सुन ले, तो एक नगमा, हुजूर-ए- यार लाया हूं/न तुम हमे जानो/कोई बता दे दिल है जहाँ/
क्या मिलिये ऐसे लोगोंसे जिनकी फितरत छुपी रहे/अच्छा जी मैं हारी/जाग दिले दिवाना/तू कहां ये बता/इक रात में दो दो चांद खिले/दीवाना मस्ताना हुवा दिल/तडपाओगे, तडपालो/ख्वाब हो तुम या/तेरी दुनियासे दूर/सीनेमें सुलगते हैं अरमाँ/चल उड जा रे पंछी/अगर मुझसे मुहब्बत है मुझे सब अपने गम दे दो/आ जा रे मेरे प्यार के राही/जो बात तुझमें है तेरी तसवीर में नही/दिल का दिया,जला के गया/
तेरी दुनिया में जीने से/छू लेने दो नाजूक/तुम अपना रंजो गम अपनी निगेबानी मुझे दे दो/रंग दिल की धडकन भी लाती तो होगी/मोरा गोरा अंग लइ ले/मुझे दर्द-ए-दिल का पता न था/टूटे हुवे ख्वाबोंने/छेडो ना मेरी जुल्फें, सब लोग क्या कहेंगे/तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नही/
जिंदगी ख्वाब है/अखियन संग अखियां लागे आज/
बेरहम आसमाँ/चांद जाने कहां खो गया/जीवन है मधुबन/
दिल जो न कह सका/जानू जानू री/दूर रहकर न करो बात करीब आ जाओ/ना तो कारवांकी तलाश है/चलो इक बार फिर से/ये रात ये चाँदनी फिर कहाँ सुन जा दिल की दास्ताँ/
फैली हुई है सपनों की बाहे आजा चल दे कहीं दूर वहीं मेरी मंज़िल वही तेरी राहे/ नाचे मन मोरा मगन/ लाखों हैं निगाह में ज़िंदगी की राह में/हमको तुम्हारे इश्क़ ने क्या-क्या बना दिया/बंदा परवर थाम लो ज़िगर/है दुनिया उसीकी जमाना उसीका/इशारों इशारों में दिल/ तुमने मुझे देखा/ अल्ला तेरो नाम/ जुल्फ की छाँव में चेहरे का उजाला लेकर,
तेरी वीरान सी रातों को सजाया हमने/हमदम मेरे खेल ना जानो चाहत के इकरार को/आँचल में सजा लेना कलियाँ, जुल्फों में सितारे भर लेना/बिन देखे और बिन पहचाने तुमपर हम कुर्बान/देखो रुठा ना करो बात नजरोकी सुनो/तस्वीर तेरी दिलमे/दिन ढल जाये/वो शाम कुछ अजीब/फिर ना कीजे मेरी गुस्ताख निगाही का गिला/निगाहें मिलाने को जी चाहता है/ पुकारता चला हूं मैं/ मैं ये सोचकर उसके दर से/ऐ मेरे दिल कहीं और चल/याद आई आधी रात को/तुम तो दिलके तार छेड़कर/ ओ सजना बरखा बहार आई/ मस्ती में छेड़के तराना/ओ चांद जहां वो जाए/ पंछी बनू उड़ती फिरू/ लग जा गले के फिर ये/जरूरत जरूरत है/ मुन्ना बड़ा प्यारा/ वो देखो जला घर किसी का/ जा रे जारे उड़ जारे पंछी/ आपकी नजरों ने समझा/ फिर आने लगा याद वही/सजन संग काहे नेहा लगाए/ मैं तेरी नजरका सुरूर हूं/खेलो ना मेरे दिल से/ तुम जो मिल गए हो/ तुम जो हुए मेरे हमसफर/ छोड़कर तेरे प्यार का दामन/देखो माने नहीं रूठी हसीना/ प्यार पर बस तो नहीं है… वगैरे.

एवढी गाणी रोज वर्षभर ऐकल्यानंतर माझं आणि वल्लरी, माझी रूममेट, वल्लरी मुद्गलचं एकमत झालं की जवळ जवळ सगळ्या गाण्यात दिल आणि प्यार हे शब्द असतातच. दिल म्हणजे काय ते कळलं पण प्यार? सायरा बानोला दोन्ही ही कळलं नाही. " दिल विल प्यार वार मैं क्या जानूं रे, " पण प्यार? ये किस मर्ज कि दवा है? गाणी प्रेमाची भाषा बोलतात पण प्रेमाची एक सरळसोट व्याख्या कुठेच मिळत नव्हती. भौतिक स्वरूपात प्रेम दिसतं काय कधी? त्याचा ज्वालामुखीसारखा उद्रेक होतो काय ? त्याच वेगानं ते खालीही बसतं? प्रेम म्हणजे उत्सव? उत्साह? ऊर्जा? नाही वाटत तसं. तुम्ही तुमच्या हार्टथ्रॉबचा हात धरून झाडांच्या सावलीतून पावले टाकीत चालत आहात त्याला प्रेम म्हणता येईल? हरणाला वाळवंटात मृगजळ दिसते तसा भास? दिवसाच्या प्रत्येक मिनिटाला I Iove you म्हणणं ? ते देखील काहीं काळानंतर उबग आणेल. प्रेम म्हणजे सुंदर स्त्री? " इन्सान बन गई है किरन माहताब कि…?" तिचा सुरेख हात? "और तेरी मरमरी बाहों का सहारा न मिले." लांब बोटं? नेलपेंट लावलेली? तिच्या किंवा त्याच्यासोबत वाळूत बांधलेला किल्ला? समुद्राच्या लाटांवर केलेलं सर्फिंग? तिला दिलेलं बुके? तिचं मोनालिसा स्माईल? एक रोमँटिक संध्याकाळ? "रात के हमसफर?" रंगीबेरंगी पंख असलेले फुलपाखरू? उन्हात, पावसात, दऱ्याखोऱ्यात, डोंगरावर, समुद्र किनारी घालवलेले क्षण? " ये परबतोंके दायरे"? चंद्राच्या कोरीत, पक्ष्यांच्या थव्यात, मोराच्या पिसाऱ्यात, चांदण्यात, काळया ढगात, कोवळ्या उन्हात, शिंपल्यातल्या मोतीत, काळया मातीत, गुलाबाच्या पाकळ्यात सापडतं का ते? सूर्य मावळताना दोघांनी पाहिलेले आकाशातले लाल, निळे, पिवळे, गुलाबी अशा अनेक रंगाच्या रेघोट्या? "ये शाम का धुआं?" किंवा क्षितिजावर महासागराला भेटणारे निळे आकाश म्हणजे प्रेम? त्याने/तिने तुमच्या शरीराच्या प्रत्येक इंच न इंच त्वचेचे केलेले अवघ्राण? चांदण्या रात्री तलावात तिच्या /त्याच्या सोबत हळू हळू वल्हवलेली बोट? " ये रातें ये मौसम", किंवा सिमल्याच्या धुकारलेल्या एका रात्री नूतनला " तू कहां ये बता.." अशी देव आनंदने घातलेली साद? असेलही कदाचित कारण " प्यार का देखो असर, आए तुम थामे जिगर,मिल गई आज मुझे मेरी मन चाही डगर " असं तो म्हणतो जेंव्हा नूतन बाल्कनीतली खिडकी उघडते. म्हणजे त्याला इच्छित "डगर" मिळाले असा अर्थ झाला असं म्हणेपर्यन्त " क्यों छुपा इक झलक फिर दिखा " अशी तो तिला विनवणी करतो कारण तिनं खिडकी बंद केलेली असते. ते 'झलक ' म्हणजे प्यार का?
एवढं प्रचंड मंथन केल्यानंतर शेवटी एकदा शोध लागला प्रेम म्हणजे काय ते. गुलजारने व्याख्या केली:
प्यार कोई बोल नहीं, प्यार आवाज़ नहीं
एक खामोशी है सुनती है कहा करती है
ना ये बुझती है ना रुकती है ना ठहरी है कहीं
नूर की बूँद है सदियों से बहा करती है
सिर्फ़ एहसास है ये, रूह से महसूस करो
प्यार को प्यार ही रहने दो, कोई नाम ना दो.
येस्स. सिर्फ एहसास. ते संपलं की द एंड. शेवट.अंत. म्हणून प्रेम कधी सफल होऊच नये. दो प्रेमी हंसोंका जोड़ा बिछड़ना ही चाहिए. त्याची परिणीती परिणीतीत होऊ नयेच. ते तसच राहावं. अमूर्त, अनंत, अनाहत. हूरहूर लावणारं. The sweet pain should linger on, forever. हातात पकडता न येणाऱ्या फुलपाखरासारखं.

अजून एका गोष्टीचा शोध लागला होता. नंदलाल शर्मा सोबत राधा देवी असल्या तर गाणं हमखास लता मंगेशकरचं. नंदलाल शर्मा अधिक राजेंद्र कुमार जैन असेल तर रफी- लता, रफी - आशा युगल गीत आणि मन्ना डे. नंदलाल शर्मा आणि सुरेश कुमार शर्मा असेल तर किशोर, तर नंदलाल शर्मा सोबत शाम सुंदर अगरवाल असेल तर मुकेश आणि तलत असा कोंबो असायचा. या सगळ्यात नंदलाल शर्मा हे कॉमन फॅक्टर. नंदलाल शर्मा सोलो असेल तर हेमंत कुमार, एस डी बर्मन, शमशाद, नूरजहान, सुरैय्या, गीता दत्त यांचा नंबर लागायचा.

हे असे शोध लावण्यात वल्लरीचा सिंहाचा वाटा होता. तिचे शतशः आभार, तिला प्रणाम. ती रेडिओला "रेडीहो" म्हणायची!!. As if to be ready to listen to the songs!!

ज्या झुमरी तलैया से नंदलाल शर्माना मी पसंती लिहू नका असे कळवणार होते त्यांना आता " श्रीमान झुमरी तलैया से नंदलाल शर्मा, तुमची पसंती अत्युच्च दर्जाची असते. मला असं वाटतं की संगीतातलं तुम्हाला बरच काही कळत असावं त्याशिवाय इतकी सुंदर आणि गोड गाणी तुमच्या पसंतीला उतरलीच नसती. आपली एक चाहती." असं लिहून मी " नंदलाल शर्मा झुमरी तलैया, भारत." ह्या पत्त्यावर पोस्टकार्ड पाठवून दिले. काया, वाचा आणि मनानी त्यांना मी वाईट बोलले होते त्यावर हाच एक उतारा होता. Dear Nandlal Sharma was a die-hard कानसेन!!

आता नेट वर झुमरी तलैया शोधलं की ते झारखंड राज्यात कोडरमा जिल्हा आहे त्यातले एक गांव आहे ते कळतं. "तलैया" हा हिंदी भाषेतील लहान तलावासाठी शब्द असून झुमरी हा शब्द "झुरी" म्हणजे स्थानिक भाषेत "झुडुप", जो सामान्यतः खेड्यांमध्ये स्वयंपाकासाठी इंधन म्हणून वापरला जातो त्यावरून तयार झाला आणि झुमरी हे स्थानिक लोकनृत्य आहे असाही शोध लागला.

आता ते सगळं आठवलं की हसायला येतं. आश्चर्याची गोष्ट ही की सध्याच्या २४x७ चॅनेल, एफएम रेडिओ आणि नॉनस्टॉप संगीताचा कंटाळा येतो. पूर्वीच्या अर्ध्या/एक तासाच्या कार्यक्रमात होणाऱ्या त्या गंधर्वांच्या गुंजनात जी खुमारी होती तीच प्रिय होती.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आम्हीही आयुष्यभर गाणी ऐकली आणि अजुनही रेकॉर्डेड ऐकतोय. पण असा अब्यास कधी नाही केला. फक्त, सर्वच आवडणारी गाणी आता दृक-श्राव्य माध्यमातून ऐकतो, त्यामुळे कुठले गाणे कोणावर चित्रित केले आहे ते मात्र तोंडपाठ झाले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुलीच लई अब्यास करत्यात. आन साथीला रेडू आसला त बोर्डात पयला लंबर घ्येतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या लिस्टीत, चांद मध्धम है, आंसमां चुप है, मेरा छोटासा देखो ये संसार है, इस दिलकी हालत क्या कहिये, मेरे नैना बहाये नीर, मैं तो जाऊ ना जमुना किनारे, खिले कमलसी काया वगैरे गाणी पण अ‍ॅड करावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येस. मला फक्त या गाण्याचे चित्रपट सांगा. तू नळी वर मिळेलच पण काही वेळा चूक होऊ शकते. थॅन्क्स एनीवे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांद् मध्धम - रेल्वे प्लॅटफॉर्म
मेरा छोटासा - भाई भाई
इस दिलकी हालत - अनहोनी
मोरे नैना - बावर्ची
मै तो जाऊ न - बाप बेटे
खिले कमलसी काया - चित्रपटात आलं नाही.
पण सर्व गाणी तू नळीवर आहेतच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहाव्या परिच्छेदात जी गाण्यांची यादी दिली आहे त्यासाठी विशेष आभार! त्या यादीची प्लेलिस्ट करणार. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थँक्यू सई, ती गाणी खरंच गोड आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नक्शल्याल पुरी

हे बहुधा नक़्श (?) लाय्लपुरी असावेत.

(लाय्लपुर (Lyallpur) बोले तो आजचे (पाकिस्तानातले) फ़ैसलाबाद. पंजाबचा तत्कालीन इंग्रज लेफ्टनंट गवर्नर सर जेम्स लाय्ल याच्या नावे वसविलेले. पुढे पाकिस्तान सरकारने ते बदलून सौदी राजा फ़ैसल याच्या नावे ते फ़ैसलाबाद असे केले. नावाचा धनी एक परकीय बदलून दुसरा परकीय झाला, इतकेच. इंग्रजांच्या काळात ती कदाचित एक मजबूरी होती; स्वातंत्र्योत्तर काळात काय? असो चालायचेच.)

नंदलाल शर्मा, झुमरी तलैया

यांच्याबद्दल कल्पना नाही, परंतु, असाच एक भला मोठा 'कुशवाहा' क्लॅनसुद्धा होता, ज्यांनी विविध भारती, झालेच तर ऑल इंडिया रेडिओ उर्दू सर्विस, वगैरेंवर फ़र्माइशी देण्याचे करियर केले, असे आठवते. (श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन उर्फ 'रेडिओ सिलोन' फारसे ऐकलेले नाही, त्यामुळे, तिथेसुद्धा पोहोचले असल्यास कल्पना नाही.)

--------------------

बाकी, एका अत्यंत निरुपयोगी विषयावरील एक अत्यंत रटाळ असा स्मरणरंजनी लेख. 'ऐसीअक्षरे'वरील (तथा एकंदरीत भारतातल्यासुद्धा) वाढत्या तरुणाईला ज्याबद्दल अजिबात क्लू नसेल (आणि घेणेदेणेही नसेल) अशा गोष्टीवरचा. थेरडेशाहीचे दार ठोठावीत ते उघडण्याची वाट पाहात उभ्या असलेल्या (१९६६-बॉर्न!) माझ्यासारख्या हॅव-बीन पिढीच्या प्रतिनिधीलासुद्धा जो रटाळ वाटला, तो आजच्या तरुणाईला काय वाटेल?

नाही म्हणायला, लेखात ज़िक्र केलेली गाणी एक से एक ख़ूबसूरत आहेत. परंतु, ती म्हणजे केवळ गाण्यांची एक यादी झाली. ती काय, मीसुद्धा करू शकतो. यादी केल्याने त्या गाण्यांचा आस्वाद थोडाच मिळतो? त्याकरिता यूट्यूब नाहीतर स्पॉटिफाय किंवा गेला बाजार प्रसारभारतीच्या ॲपवरून विविध भारती यांचीच वाट धरावी लागते! यादी दिल्याने 'मला ही गाणी माहीत आहेत' हे जाहीर करण्यापलिकडे नेमके काय साध्य होते? किंवा, 'तुझ्यापेक्षा माझी यादी सरस'च्या निरर्थक चढाओढीत भाग घेण्याकरिता उपयोग होऊ शकतो फार फार तर. एकंदरीत, आपली यादी मांडण्याकरिता केवळ निमित्त म्हणून लेखाचे प्रयोजन, म्हणायचे.

(निदान, त्या वल्लरी मुद्गलबद्दल थोडे अधिक असते, तरी गोष्ट कदाचित वेगळी असती. परंतु, तीसुद्धा आतापर्यंत आजी झाली असणार, म्हणा! दात हालत असणार, नाहीतर साफ पडलेले असणार (कदाचित कवळीही लावत असेल, कोण जाणे!); केस पांढरे झालेले असणार... जाऊ द्या, झाले!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१९६६ बॉर्न ! ओह, म्हणजे मी तुमच्यापेक्षा चक्क १४ वर्षांनी थेरडा आहे तर! तरीच मला, श्यामसुंदर, हुस्नलाल-भगतराम, सज्जाद, हंसराज बहल यांचीही गाणी आवडतात!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही थेरडेशाहीचे प्रतिनिधी आहात म्हणूनच तुम्हाला या यादीचं महत्त्व कळत नाही. कधी स्पॉटिफाय वापरलं आहे का? एकेकाळी, आता आपल्याला प्लेलिस्ट करावी लागणार नाही. एक गाणं लावलं की त्याच्याशी साधर्म्य असलेली इतर गाणी आपोआप लागतील अशा आनंदात असणाऱ्या लोकांना त्यांच्या भांडवलशाही अल्गोरिदमनं कपाळाला हात लावायला लावला.
तुम्ही के. एल सेहगलपासून जरी सुरुवात केलीत तरी तुम्हाला काहीही करून आलिया भटच्या "व्हॉट झुमका" (हे साधनाच्या "झुमका गिरा रे" चं हिंस्र रिमिक्स आहे) पर्यंत आणून सोडायची जबाबदारी स्पॉटिफायनं घेतलेली असते. गेला बाजार आदित्य ए अशा नावाच्या एका इंडी गायकाचं "चाँद बालियां" नावाचं टुकार गाणं तरी ऐकवून सोडतातच.

आमच्या पिढीने असे मन लावून रेडिओ ऐकले नसल्यानं आणि आमचा प्लेलिस्ट करायचा सगळा पेशन्स राहुल रॉयचा आशिकी नाहीतर अमीर खानचा दिल वगैरे असल्या सिनेमांची गाणी ऐकण्यात गेल्यामुळे अशी आयती यादी कुणी दिली की आनंद होतो.
स्वतःच्या हाताने यादी करू असं ठरवलं तरी तितका व्यासंग असायला हवा. ही यादीही प्रत्यक्षात यायला तीन महिने तरी लागतील. पण आता अशा ओल्ड फॅशन्ड गोष्टी अधिक आकर्षक वाटतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कधी स्पॉटिफाय वापरलं आहे का?

हो. वापरले आहे, वापरतो. (भो**चे महिन्याला १३ डॉलर घेतात, तरीही वापरतो. पूर्वी गूगल प्ले म्युझिक होते तेव्हा गाणे विकत घेतानाच तेवढे काय ते पैसे द्यावे लागायचे. नंतर मग वाटेल तेव्हा, वाटेल तितक्यांदा वाजवा, जाहिरातींविना. पण गेऽले बिचारे! (तसेही आयफोनवर चालले असते की नाही, कोण जाणे. परंतु तेव्हा माझ्याकडे आयफोन नव्हता.) त्यामुळे आता नाइलाजास्तव स्पॉटिफायवर जाणे आले. आणि जाहिराती नकोत, म्हणून प्रीमियमवर.)

एक गाणं लावलं की त्याच्याशी साधर्म्य असलेली इतर गाणी आपोआप लागतील अशा आनंदात असणाऱ्या लोकांना त्यांच्या भांडवलशाही अल्गोरिदमनं कपाळाला हात लावायला लावला.

मी त्यांच्या अल्गोरिदमवर शक्यतो अवलंबून राहात नाही. जमेल तशी, आठवेल तशी प्लेलिस्ट पेन्स्टेकिंगली बनवीत, वाढवीत राहातो. (कदाचित इट्स अ जनरेशनल थिंग.)

"व्हॉट झुमका" (हे साधनाच्या "झुमका गिरा रे" चं हिंस्त्र रिमिक्स आहे)

दोन्ही ऐकून आहे. फार कशाला, परवा तो पिच्चरसुद्धा (बोले तो, रॉराप्रेक.) थेटरात जाऊन पाहून आलो.

आता यापुढे हे असेच पिच्चर नि अशीच गाणी यायची. (पिच्चर तसा वाईट नव्हता, म्हटले तर.)

(तुम्हाला म्हणून सांगतो, हिंदुस्थानच्या फाळणीचे मला फारसे दु:ख वाटत नाही. परंतु, पंजाबची फाळणी व्हायला नको होती. आख्खा देऊन टाकला असता 'त्यां'ना, तरी चालले असते. फक्त, एकसुद्धा पंजाबी (रेफ्युजी म्हणून) 'इकडे' न पाठविण्याच्या बोलीवर. बाकी तुमचे तुम्ही आपापसात पाहून घ्या, काय ते. असो.)

(बादवे, 'हिंस्त्र' नव्हे. 'हिंस्र'.)

तुम्ही के. एल सेहगलपासून जरी सुरुवात केलीत तरी तुम्हाला काहीही करून आलिया भटच्या "व्हॉट झुमका" (हे साधनाच्या "झुमका गिरा रे" चं हिंस्त्र रिमिक्स आहे) पर्यंत आणून सोडायची जबाबदारी स्पॉटिफायनं घेतलेली असते.

आधी म्हटल्याप्रमाणे, मी स्पॉटिफायच्या अल्गोरिदमवर अवलंबून न राहता शक्य तोवर स्वत:ची प्लेलिस्ट वाजवतो. परंतु तरीही, क्वचित प्लेलिस्टेतर काही वाजविलेच, तरीसुद्धा, इतकाही वाईट अनुभव आजवर तरी कधी आलेला नाही.

आमच्या पिढीने असे मन लावून रेडिओ ऐकले नसल्यानं आणि आमचा प्लेलिस्ट करायचा सगळा पेशन्स राहुल रॉयचा आशिकी नाहीतर अमीर खानचा दिल वगैरे असल्या सिनेमांची गाणी ऐकण्यात गेल्यामुळे अशी आयती यादी कुणी दिली की आनंद होतो.

स्वतःच्या हाताने यादी करू असं ठरवलं तरी तितका व्यासंग असायला हवा.

व्यासंगाचा प्रश्न तितकासा नसावा. परंतु, तुमच्या पिढीला पेशन्स फार कमी, हे खरे आहे.

('अमीर' नव्हे. 'आमिर' बहुधा (चूभूद्याघ्या); परंतु, 'अमीर' निश्चित नव्हे.)

ही यादीही प्रत्यक्षात यायला तीन महिने तरी लागतील.

वर्षभर लागेना का. काय फरक पडतो? हळूहळू बनवायची, जशी जमेल तशी. कोणाला घाई आहे?

----------

(अतिअवांतर: स्पॉटिफायवरून आठवले. गीता दत्तचे (बहुधा ग़ैरफ़िल्मी) 'होले होले हवा डोले' बऱ्याच दिवसांपासून शोधतो आहे. स्पॉटिफायवर 'बायकोला उचकविण्यासाठी वाजवायची गाणी' म्हणून एक (खाजगी) प्लेलिस्ट बनवून ठेवलेली आहे, त्यात घालण्यासाठी. त्या प्लेलिस्टेत 'प्रीतम आन मिलो'पासून ते 'ओ दूर जानेवाले'पर्यंत बरास्ता 'जवाँ है मुहब्बत' काय वाटेल ती गाणी आहेत. हे एक गाणे स्पॉटिफायवर काही केल्या मिळत नाही. काय करता येईल?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बायकोला उचकविण्यासाठी वाजवायची गाणी

हे गाणं ऐकून एखाद्याची बायको का उचकत असेल असा साहजिक प्रश्न पडला. पण त्याचीही काही स्टोरी असेल जी पुढच्या प्रतिसादात येईल. त्यामुळे प्रश्न विचारणं अपरिहार्य आहे.

हे गैर फिल्मी आहे म्हणून नसेल असं म्हणता आलं असतं पण स्पॉटिफाय नियमितपणे संबंध अल्बम काढून टाकतं. आणि त्यांच्या फुकट आणि विकत दोन्हीं ग्राहकांना हीच ट्रीटमेंट आहे. पण त्यामागे त्यांचे आणि प्रोड्युसर लोकांचे काही लागेबांधे किंवा तंटे असावेत असं जाणवतं. उदाहरणार्थ, करण जोहरचा हिंदी सैराट आला तेव्हा झीचा (मंजुळेचा) मराठी सैराट स्पॉटिफायवरून गायब झाला. आणि मला अजय-अतुलमधला जो कुणी गातो त्याचे हिंदी उच्चार सहन होत नाहीत. चाली त्याच असल्या तरी. तसंच मला ज्यांची गाणी (आणि सिनेमेही) फार आवडतात असे शुजित सरकारचे पिकू आणि गुलाबो सिताबो गायब झाले (हे सिनेमे आवडण्यामागचे कारण अमिताभ बच्चन नाही). माझ्या मुलाला गोवारीकरच्या पानिपतातलं (मख्ख सदाशिवराव - अर्जुन कपूर) 'मर्द मराठा' हे गाणं आवडायचं. तो अल्बमही त्यांनी एक दिवस अचानक गायब केला.
मीही एका फोनवर प्रीमियम घेतलं आहे (स्पॉटिफायच्या मालकाने भारतातले भारतीय फुकटे आहेत असं जाहीर वक्तव्य केलं असलं तरीही!). पण मला आता असं वाटायला लागलं आहे की स्टीव्ह जॉब्सच्या आयपॉडवर, बेकायदेशीर वेबसायटांवरून गाणी उतरवून साठवून ती ऐकणे - हा संगीत ऐकण्याच्या तंत्रज्ञानाचा सुवर्णकाळ होता.
या सगळ्या तंत्रज्ञानांवर मी एकदोन वर्षांपूर्वी एक लेखही लिहिला होता. पण तो स्मरणरंजनी आहे म्हणून प्रकाशित केला नाही. तेव्हा, पंचविशीच्या आसपास असताना, आयपॉड शफलमुळे (ज्यामध्ये गाण्यांच्या याद्या दिसायच्या नाहीत आणि पुढे कोणतं गाणं आहे हे कळायचं नाही) निर्माण होणाऱ्या अनिश्चिततेवर मी एक इंग्रजी कविताही केल्याचे स्मरते आहे. ती कविता, आयुष्यात काही विशेष जबाबदाऱ्या नसताना लोक काय काय करू शकतात याचं बेमिसाल उदाहरण असावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे गाणं ऐकून एखाद्याची बायको का उचकत असेल असा साहजिक प्रश्न पडला.

आता कोणी कशावरून नि का उचकावे, यासाठी काही नियम थोडाच आहे? परंतु, एक शक्यता अशी वाटते, की एकदा कामावरून दमून घरी आलेली असताना आल्याआल्या मी तिला यूट्यूबवरून शोधून काढून ‘होले होले हवा डोले’ ऐकविले. साहजिकच तिची प्रतिक्रिया ‘ही बाई (बोले तो, गीता दत्त) अशी अचानक ढेकूण चावल्यासारखी का किंचाळतेय?’ अशी झाली. माझ्या बायकोचा अतिजुन्या गाण्यांचा टॉलरन्स अंमळ कमीच आहे. नि त्यात मीसुद्धा कधीकधी (!) १८५७ साली पैदा झाल्यासारखा वागतो. चालायचेच.

(आमचे लग्न झाले त्या काळात माझ्या गाडीत अशीच (बोले तो, तिच्या मते बाबा आदमच्या जमान्यातली) गाणी वाजत. (टिपिकली तलत महमूद, वगैरे.) तर असेच एकदा त्यात ‘चाँद एक बेवा की चूडी की तरह टूटा हुआ’ असली काहीतरी (भन्नाट) सुरुवात असलेले (तलतचे) गाणे ऐकून हादरली होती. (I don’t necessarily blame her for that!) तेव्हापासून माझ्या गाण्यांच्या आवडीनिवडीला टार्गेट करून असते. मी (तलतचे) ‘दिल-ए-नादाँ तुझे हुआ क्या है’ वाजविले, की हिने ‘लव्हेरिया हुआ’ म्हणून उत्तर दिलेच पाहिजे! फार कशाला, पुढे मुलगा झाला, तो लहान असताना, गाडी चालवीत असताना मी (त्या ‘सीने में सुलग़ते हैं अरमाँ’मधल्या) त्या ‘एक ऐसी आग लगी मन में, जीने भी न दे मरने भी न देऽ एऽ एऽ एऽ एऽ’बरोबर बेंबीच्या देठापासून तारस्वरात गाऊ लागलो, की मागच्या सिटातल्या चाइल्डसिटातून ‘Daddy, don’t cry!’ म्हणून मला ओरडून सांगायला त्याला शिकविले होतेनीत्! (तरी नशीब, मुलाची आवड पुढे थोडीबहुत तरी माझ्यासारखी निघाली. त्याच्या स्पॉटिफाय प्लेलिस्टेत (एकही अक्षर न समजता) ‘प्यासा’ वगैरेची गाणी सापडतात! कधीमधी वेळीअवेळी (बहुधा अवेळीच) ती गातोसुद्धा!) आता, इतके झाल्यानंतर, अपनी भी कुछ तो बनती है, I owe her (at least) one, नाही काय?)

तर, सांगण्याचा मतलब, ती का उचकते, याची चिकित्सा मी करीत नाही. Ours not to wonder why. ती एखाद्या गाण्याला उचकते, हे लक्षात आले, की… I merely oblige.

तर असे आहे एकंदरीत सगळे. चालायचेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याच्या स्पॉटिफाय प्लेलिस्टेत (एकही अक्षर न समजता) ‘प्यासा’ वगैरेची गाणी सापडतात!

'प्यासा'ची गाणी मीही लहानपणी ऐकली तेव्हा 'हे काहीतरी महत्वाचं आहे' इतपत नोंद झाली असावी डोक्यात (ती मला ऐकू यावीत याची व्यवस्था करणाऱ्या लोकांबद्दल कृतज्ञता आहेच!)
साहिरनं लिहिलेल्या गाण्यांमध्ये जे एक शांत resignation असतं ते मला फार आवडतं.

"इसको ही जीना कहते हैं
तो यूँही जी लेंगे
उफ़ न करेंगे लब सी लेंगे
आँसू पी लेंगे
ग़म से अब घबराना कैसा
ग़म सौ बार मिला"

किंवा..

उतना ही उपकार समझ कोई
जितना साथ निभा दे
जनम मरण का मेल है सपना
ये सपना बिसरा दे
कोई न संग मरे

याचंच नंतरचं थोडं आधुनिक व्हर्जन..

कोई भी साया नहीं राहों में
कोई भी आएगा न बाहों में
तेरे लिए, मेरे लिए, कोई नहीं रोने वाला
झूठा भी नाता नहीं चाहों में
तू ही क्यों डूबा रहे आहों में
कोई किसी संग मरे, ऐसा नहीं होने वाला
कोई नहीं जो यूँ ही जहां में, बाँटे पीर पराई..

मी प्यासा सोडून यातले कुठलेच सिनेमे बघितले नाहीत पण साहिरची गाणी गाणारे नायक नक्कीच "तू हां कर, या ना कर. तू है मेरी किरन" वाले नसावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पु लं चे प्रो चक्रदेव आठवले.

--------------------------------------------

"समर्थां बद्दल आपल काय मत आहे "

"हं! नारायण ठोसर!!" असे तुच्छतापुर्ण उद्गार काढुन त्यांनी एक मनुक तोंडात टाकली

-----------------------------------------

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसाद इथे हलविला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तर असे आहे एकंदरीत सगळे. चालायचेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झुमरीतलैय्यावाल्यांनी खरच अनेक मधुर गीते ऐकण्याची संधी दिली.

चित्रपट गीतांचा तो एक सुवर्णकाळ म्हणावा लगेल. गीतकार, संगीतकार, गायक, वाद्यवृंद सारे काही बेजोड, बेमिसाल.

रेडिओ आणि चित्रपट गीतांबद्दल छान लिहिले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

O my God! OMG! Wowwww! What a beautiful work! Take a bow boss...! I am re-living again, Aabhinay. This is a treasure to be cherished forever! I am indebted to you. Thanks a million, no a billion! Wow!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

O my God! OMG! Wowwww! What a beautiful work! Take a bow boss...! I am re-living again, Aabhinay. This is a treasure to be cherished forever! I am indebted to you. Thanks a million, no a billion! Wow!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अभिनय आणि सई. वल्लरी मुद्गल कडून "शतशः आभार".

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0