वार्तालाप : रेड्यामुखी वेदवाणी

रेड्यामुखी वेदवाणी
विद्या जगण्याची
ओवी ज्ञानीयाची.

आपण सर्वांनी ही कथा ऐकलीच असेल. संत ज्ञानेश्वर माऊलीने चमत्कार केला आणि रेडा वेद गायन करू लागला. आपण सर्वांना माहीत असेलच रेडा माणसाची बोली बोलू शकत नाही. मग या कथे मागचे सत्य काय? ज्या लोकांना लिहिता वाचता येत नाही त्यांच्या बाबत हिंदीत एक म्हण प्रसिद्ध आहे "काला अक्षर भैस बराबर". माऊलीच्या काळात फारच कमी लोकांना लिहिता वाचता येत होते. संस्कृत भाषा तर हजारोंतून एखाद दुसर्‍या माणसाला. दुसरीकडे आपले सर्व धर्मग्रंथ वेद, उपनिषद, पुराण, भगवद्गीता इत्यादि देव भाषेत अर्थात संस्कृत मध्ये होते. आपल्या धर्मग्रंथात काय आहे, धर्म काय आहे, धर्माच्या मार्गावर चालत जीवन-यापन कसे करावे. हे जनतेला कळेनासे झाले होते. अश्याच परिस्थितीत धर्माच्या नावावर जनतेला मूर्ख बनविणार्‍यांचा बाजार भरतो. समर्थांच्या शब्दांत "शास्त्रांचा बाजार भरलाl देवांचा गल्बला जालाl लोक कामनेच्या व्रतालाl झोंबोन पडतीl आमच्या शास्त्राचे पारायण करा, आमच्या देवाला नवस बोला किंवा फक्त देवाचे नाव घ्या, मेहनत-मजूरी करण्याची गरज नाही, तुम्हाला इछित फळे मिळतील. सुख समाधान ऐश्वर्य तुमच्या दारी येईल. समर्थांच्या शब्दांत समाज नासून गेला होता. समाजाची स्थिति "अजगर करे ना चाकरी. पंछी करे ना काम. दास मलूका कह गये सबके दाता राम" अशी झाली होती. चमत्काराच्या आशेने प्रजा कर्महीन झाली, आळशी झाली। गरीबी आणि भुकेचे साम्राज्य सर्वत्र पसरलेले होते.

समाजात धर्माच्या बाबतीत माजलेला गोंधळ पाहून संत निवृतींनाथांनी संत ज्ञानेश्वरांना भगवद्गीता मराठी भाषेत प्रगट करण्याची आज्ञा दिली. आता भगवद्गीताच का? हा प्रश्न मनात येणारच. वेद, उपनिषद यांचे सार भगवद्गीतेत आहे. भगवद्गीता माणसाच्या मनातून भय, भ्रम, संशय, निराशा दूर करते. आत्मग्लानि आणि अकर्मण्यतेने ग्रस्त माणसाला स्वकर्तव्य, स्वधर्माची जाणीव करून देते. माणसाला निष्काम कर्म आणि अखंड पुरुषार्थ करत जगण्याचा मार्ग दाखविते. ज्ञानेश्वरी मराठीत असल्याने अशिक्षित आणि निरक्षर जनतेला ही वेदांचे ज्ञान सहज उपलब्ध झाले. अनेक संतांनी आणि प्रवचनकारांनी वेदांचे ज्ञान महाराष्ट्रातील खेड्या-पाड्यात पोहचविले. दुसर्‍या शब्दांत रेडा वेद गायन करू लागला होता.

आज ही तीच परिस्थिति आहे. हजारो पंथ आणि धर्म आहेत. चमत्कारांच्या गाथा आहेत. या शिवाय सरकार मान्य गेमिंग एप ही आहेत. आयपीएल वर पैसा लावा, दोन कोटी मिळवा. जिंकणार्‍यांच्या नावांचा उदो-उदो होतो. कोट्यवधी युवा मेहनत मजूरी सोडून विभिन्न गेमिंग खेळयांत त्यांच्या जवळ असलेला पैसा ही कोट्यधीश बनण्याच्या लालसेने उडवीत आहे. चमत्कार होईल या आशेने कथा पारायण, नवस बोलत आहेत, कधी तरी नशीब उघडेल या आशेने. देशात कोट्यवधी लोकांनी कामधंधे करणे सोडून दिले आहे.(राशन पाणी सरकार फ्री देतेच, मग काम करायची गरज काय). जेंव्हा माणूस स्वकर्तव्य आणि स्वकर्म विसरून जातो त्याच्या नशिबी उपासमार, गरीबी आणि भूक येणारच. थोडक्यात आज ही भगवद्गीतेचा संदेश पुन्हा ज्ञानेश्वरीच्या माध्यमाने महाराष्ट्रात सर्वत्र पोहचविण्याची गरज आहे.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आपण सर्वांना माहीत असेलच रेडा माणसाची बोली बोलू शकत नाही.

म्हणजे मग इतके दिवस तुम्ही इथे जनावरांची बोली बोलताय की काय? (माणसांच्याच बोलीसारखी वाटली खरी. Impressive!)

संस्कृत भाषा तर हजारोंतून एखाद दुसर्‍या माणसाला. दुसरीकडे आपले सर्व धर्मग्रंथ वेद, उपनिषद, पुराण, भगवद्गीता इत्यादि देव भाषेत अर्थात संस्कृत मध्ये होते. आपल्या धर्मग्रंथात काय आहे, धर्म काय आहे, धर्माच्या मार्गावर चालत जीवन-यापन कसे करावे. हे जनतेला कळेनासे झाले होते. अश्याच परिस्थितीत धर्माच्या नावावर जनतेला मूर्ख बनविणार्‍यांचा बाजार भरतो.

म्हणजे, हिंदूंमध्येसुद्धा असले चालते?

आमच्या शास्त्राचे पारायण करा, आमच्या देवाला नवस बोला किंवा फक्त देवाचे नाव घ्या, मेहनत-मजूरी करण्याची गरज नाही, तुम्हाला इछित फळे मिळतील. सुख समाधान ऐश्वर्य तुमच्या दारी येईल. समर्थांच्या शब्दांत समाज नासून गेला होता. समाजाची स्थिति "अजगर करे ना चाकरी. पंछी करे ना काम. दास मलूका कह गये सबके दाता राम" अशी झाली होती. चमत्काराच्या आशेने प्रजा कर्महीन झाली, आळशी झाली। गरीबी आणि भुकेचे साम्राज्य सर्वत्र पसरलेले होते.

हे पुन्हा वाचले. हिंदूंबद्दलच आहे, याची पुनरेकवार खात्री करून घेतली. (मग मुसलमानांना नि ख्रिश्चनांनाच तेवढी काय म्हणून नावे ठेवायची? ते आमच्याहून निराळे असे नेमके काय करतात?)

बरे, "आमच्या शास्त्राचे पारायण करा, आमच्या देवाला नवस बोला किंवा फक्त देवाचे नाव घ्या, मेहनत-मजूरी करण्याची गरज नाही, तुम्हाला इछित फळे मिळतील. सुख समाधान ऐश्वर्य तुमच्या दारी येईल." हे सगळे (आमचे हिंदू!) लोक नेमके सांगत कोणाला होते? आमच्या हिंदूंनाच ना? हात्तेच्या! म्हणजे, बाटवून बाटवून बाटवायचे कोणाला, तर जे अगोदरच हिंदू आहेत, त्यांनाच?

मुसलमान-ख्रिश्चन धर्मप्रसारक आणि हिंदू धर्मप्रसारक यांच्यातील हा भेद चिंत्य आहे. (परंतु, कदाचित हिंदवेतरांना बाटविण्यात आमच्या हिंदू धर्मप्रसारकांचे धैर्य कमी पडले असू शकेल. चालायचेच.)

ज्ञानेश्वरी मराठीत असल्याने अशिक्षित आणि निरक्षर जनतेला ही वेदांचे ज्ञान सहज उपलब्ध झाले.

हे तेराव्या शतकात कदाचित खरे असेलही. आजमितीस ज्ञानेश्वरीच्या casual वाचनातून कोणास काही अर्थबोध होईल, तर शपथ. म्हणजे, आमचा वुड्डहौससाहेब म्हणतो, त्याप्रमाणे, It's like Shakespeare; Sounds impressive, but does not mean a thing.

(अर्थात, हा ज्ञानेश्वरांचा — किंवा फॉर्दॅट्मॅटर शेक्सपियरचासुद्धा — दोष म्हणता येणार नाही. भाषा बदलत जाते, त्याला कोण काय करणार?)

असो चालायचेच.

------------------------------

Whatever that may mean.

खरे तर 'भावार्थदीपिके'च्या. 'ज्ञानेश्वरी' हे 'भावार्थदीपिके'ला पालथ्या घड्यावर पाणी-छाप अडाणचोट पब्लिकने आपल्या मगदुराप्रमाणे दिलेले नाव आहे. त्या ग्रंथाचे ते खरे नाव नव्हे.

आणि, mind you, ज्या आम पब्लिकच्या आड्यन्सकरिता ज्ञानेश्वरांनी 'भावार्थदीपिका' (उर्फ ज्ञानेश्वरी) लिहिली, त्या आम पब्लिकची मजल casual वाचनाइतपतच असते. तिचा सखोल अभ्यास वगैरे करणारे मूठभरच असतात, नि त्यातलेसुद्धा अनेकजण सहासात शतकांनंतर वगैरे निपजतात. बाकीचे फक्त 'ग्यानबा तुकाराम' म्हणून टाळ कुटण्यात नि वारीतून पायी जाण्यात धन्यता मानतात. (तेही ठीकच, म्हणा. To each, his (or her) own poison.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बकवास करण्या अगोदर खरी स्थिती समजून घ्या.
रेशन सरकार फ्री मध्ये देते ?

कोणाला.?
ज्या बकवास सरकार नी टॅक्स चे लाखो करोड कुठे खर्च केले.
लाखो करोड कोटी कर्ज काढून ते कोठे खर्च केले .
त्या मध्ये गरीब लोकांवर किती खर्च केले.
ह्या साठी मोदी सरकार नी लोकसभेत विधेयक मांडून.
जगातील कमी भ्रष्ट असणाऱ्या देशातील तज्ञ लोकांची बहु राष्ट्रीय समिती नेमून शोध घेण्याचे ठरविले जावे आणि खरेच चोकशी करावी.
इथे बकवास करू नये.
रेडा, गीता,कुराण,, मावूली ह्यांची आता काही गरज नाही.
लोकांना मूर्ख बनवणे सोडा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रेडा जी भाषा बोलतो ती माणसं ओळखू शकत नाहीत.
शास्त्र तितके अजून विकसित झाले नाही.
पुराण रचलेल्या कथा इथे का देत आहात.

ज्ञानेश्वर आता अस्तित्वात असते तर चपला नी मारले असते तुमच्या सारख्या लोकांना.
पुरातन वास्तू कला,पुरातन राज्य व्यवस्था, पुरातन योग कला, पुरातन kamkrida कला, पुरातन बाकी सर्व गोष्टी
Pyramid,Maya Sanskriti.
अगदी महाभारतातील .
अस्त्र, शस्त्र ह्या सर्व विषयी कुतूहल आहे.

पण त्या वर अभ्यास करून ,प्रयोग करून , आज ते सिद्ध करणे गरजेचे आहे.
विविध यंत्र ,AI मदतीला आहे.
पण कोण च हे करत नाही.
फक्त बकवास करतात..
आज जे काही अती ज्ञानी साधू असतील त्यांनी फक्त एका प्राण्याची भाषा समजते हे सिद्ध करावे.
एक पण कोणत्याच धर्मात सापडणार नाही.
सर्व ढोंगी,नालायक ,मूर्ख आहेत .
लोकांनी ह्या मूर्ख लोकांच्या नादी लागू नये

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0