विदा-भान - प्रतिसाद

लोकसत्तामध्ये माझं सदर विदा-भान २ जानेवारीपासून सुरू झालं.

विदा म्हणजे काय, ती कशी जमवली जाते, आपल्यासाठी-विरोधात कशी वापरली जाते, याची लोकांना माहिती मिळावी, यासाठी हे सदर आहे. आजूबाजूच्या लोकांशी बोलताना, त्यांना या विषयाची अजिबातच कल्पना नाही, असं वाटलं म्हणून ही लेखमाला.

लेखांचे दुवे इथे चिकटवेनच. त्यावर तुम्हाला काही आक्षेप असतील, चुका काढायच्या असतील, किंवा एखादा महत्त्वाचा मुद्दा आलाच पाहिजे, काही स्पष्टीकरणं फारच उडतउडत लिहिली आहेत, असं वाटत असेल तर जरूर प्रतिसाद द्या. पुढे ५१ आठवडे मी काय लिहिणार, हे अजून पक्कं ठरवलेलं नाही. त्यासाठीही तुमच्या प्रतिसादांचा उपयोग होईल.

अतिशहाणानं या पुस्तकाची खरडफळ्यावर सूचना केली - Data And Reality

विदाविज्ञान, प्रोग्रॅमिंग संदर्भात काही उपयुक्त चर्चा झाली तरीही हरकत नाही. त्याचा नवा धागा काढायची गरज पडली तर तेही करता येईलच.

हा पहिला लेखांक - हा डबा काय साठवतो? (इपेपरचा दुवा.)

लेखांक २ - 'विदा' म्हणजे नक्की काय?

लेखांक ३ - नफ्यासाठी कायपन

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सुरुवात सोपी व मस्त झालेली आहे. हेरगिरीचा हा मुद्दा माहीत नव्हता. पुढिल मालिका वाचायला आवडेल. भरपूर लिही आणि जर वृत्तपत्रिय सदरात कमी शब्दमर्यादा दिलेली असेल तरी सर्व विचार वेगळ्या लेख स्वरुपात ती ऐसीवर मांड. कमेंटमधुन वाचता येते पण खड्यात तांडूळ निवडल्यासारखे करावे लागते. याचा अर्थ ऐसीवर रद्दी कमेंटस असतात असा नसून, कंटेंट, सलग सुसूत्र वाचायची आशा असा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जगी घाण अन चिखलची सारा, म्हणो कितीही कुणी शहाणा,
पदोपदी मज कमळ घालते, गुणगंधाचा नवा उखाणा

: इंग्रजी Data डेटा या शब्दाला काही जण अलिकडे विदा असा शब्द वापरू लागले आहेत. याला आधारसामग्री हाही शब्द बऱ्याचदा वापरला जातो. कोणता शब्द जास्त समर्पक?

विदा सुटसुटीत वाटला तरी ‘आधारसामग्री’ तून बोध चटकन होतो. तो अर्थपूर्ण आणि समर्पक आहे.

विदा वाल्यांची मांडणी अशी की विद् या संस्कृत धातुवरून विदा शब्द तयार केला आहे. पण हे ओढाताणून केलेलं वाटतंय. आणि आयटीमधल्या नवमराठीजनांची बौद्धिक अरेरावी इतकी असते की आता ह्या अशा शब्दयोजना मुख्य प्रवाहात मान्यता पावतील अशी (भितीयुक्त) लक्षणे आहेत.

विदाला दत्त म्हटलं तर? आपणच दिलेली माहिती. शिवाय वापरायची परवानगी आपणच देतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

विदाला दत्त म्हटलं तर? आपणच दिलेली माहिती.

Given अशा अर्थी 'दत्त' शब्दाची योजना आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सदराचं नावही 'गुरुदेव दत्त' ठेवा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी2
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

छान विषय, सुरवात आवडली. केर काढण्याच्या रोबो चे उदाहरण मस्त.
'लोकांना या विषयाची अजिबातच कल्पना नाही' याशी सहमत आहे.
मी एकंदरितच स्मार्ट फोन, ईंटरनेट वापरताना अनावश्यक माहिती देणे टाळण्याचा प्रयत्न करतो. (त्याचा कितपत उपयोग होतो याबाबत साशंक आहेच, तरीही) . माझे मित्र म्हणतात 'तुझी माहिती गोळा करून ते असे काय करणार आहेत'. मी म्हणतो 'माहिती नाही, पण मी सहजासहजी माहिती देणार नाही'.
परवा दुसऱ्या एका शहरात हॉटेल मध्ये चेक इन करताना तेथील कर्मचाऱ्याने बोटाचा ठसा स्कॅन करण्यास सांगितले. (आधार ऑथेंटिफिकेशन असावे बहुतेक ) मी नकार दिला. तेव्हा त्याने पर्याय दिला की शाई लावून ठसा रजिस्टर मधे उमटवा. मला हा ऑफलाईन पर्याय आवडला.
शिर्डी च्या मंदिरात प्रवेश करण्यासाठी पास बनवावा लागतो. तिथेही बोटाचा ठसा स्कॅन करण्यास सांगितले. पर्याय नसल्याने ठसा दिला. मी शिर्डी च्या मंदिरात गेलो होतो ही माझ्यादृष्टिने अनावश्यक माहिती आता इंटरनेटच्या विदागारात कुठेतरी साठवलेली आहे.

हल्ली बरेच आजुबाजुचे लोक अलेक्सा किंवा तत्सम स्पिकर खरेदी करत आहेत. सतत कान देउन ऐकत बसलेला एखादा हेर आपणहून विकत घेताना लोकांना काहीच वाटत नाही.
का मी उगीचच फार विचार करतोय ?

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एका चर्चेत निखिल देशपांडे यांनी मांडलेलं मत मला पटलं. ते म्हणाले, "जोवर साठवलेल्या विद्याचा उपयोग मला साबण विकायला केला जातोय तोवर मला काही फरक पडत नाही. पण जेव्हा त्या विद्याचा उपयोग माझे मूलभूत हक्क दडपण्यासाठी होईल, तेव्हा मात्र मला आक्षेप असेल."

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

सदर प्रतिसाद निरर्थक बकवास वाटू शकेल, पण ते तसं नाही. फार तर मनात आलं ते तसंच्या तसं उतरवून काढलं, असं म्हणता येईल.

सर्वप्रथम, घाटपांडे काकांचे आभार. दत्त हा शब्द मला आवडला/पटला का नाही, याबद्दल एक लेखांक लिहिता येईल. शब्द काही का असेना, त्यातून जे व्यक्त होतंय ते महत्त्वाचं.

बोका आणि आदूबाळनं विषयाला हात घातला आहेच. बोक्यानं हाताच्या ठशांचा उल्लेख केला आहे. ही विदा त्याच्याकडून घेतली, पण तिचा उपयोग नक्की कुठे होईल याबद्दल त्याला (कोणालाच) फार माहिती दिली जात नाही. विदा ही संकल्पना त्रिकोणमिती (trignometry)सारखी निर्लेप नाही. मात्र त्रिकोणमिती ही संकल्पना अनेक शतकं आपल्याला माहीत आहे. कॉलेजात sin, cos वगैरे गोष्टी वापरताना आपण sin = समोरची बाजू / त्रिकोणाचा कर्ण, एवढा विचार करत बसत नाही. कारण तोवर ती संकल्पना आत्मसात झालेली असते.

मात्र विदेचं असं नाही. बोक्यानं म्हटलंय, "मी शिर्डी च्या मंदिरात गेलो होतो ही माझ्यादृष्टिने अनावश्यक माहिती आता इंटरनेटच्या विदागारात कुठेतरी साठवलेली आहे." त्यात आक्षेपार्ह गोष्ट अशी आहे की कदाचित जगाच्या अंतापर्यंत ही माहिती विदागारात साठवली जाईल. आणखी १०० वर्षांनी आपल्यापैकी कोणीही जिवंत नसेल, पण बोक्याच्या नातेवाईक, पोराबाळांना, संबंधितांना या गोष्टीचा त्रास किंवा फायदा होऊ शकेल. पहिल्या भागात माझ्या दृष्टीनं मुख्य मुद्दा हाच होता की हे प्रकरण नवं आहे; त्याच्या उपयोग-उपद्रवाची कल्पना आपल्याला कोणालाच पुरेशी आलेली नाही.

अणूविघटनाचा शोध, E = mc2 याचा शोध लावला तेव्हा त्यातून अणूबाँब बनेल आणि हिरोशिमा-नागासकीत मोठा संहार घडेल याची कल्पना लिझ माईट्नर आणि आईनस्टाईनला नव्हती. पण या गोष्टी घडल्या. मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी होते तेव्हा त्याविरोधात जनमत सहज तयार होतं. मात्र निखिल देशपांडे - आदूबाळ म्हणतात तसं, आपली राजकीय मतं बदलली गेली ही कदाचित आपल्याला समजणारही नाही. आपली विदा वापरून आपल्याला छाटछूट साबण विकणं निराळं आणि आपलं मतस्वातंत्र्य आपल्या नकळत हिरावून घेणं निराळं.

विदा फक्त दिलीच जाते असं नाही. कधी विदा फक्त असते. आत्ता आमच्याकडे बाहेर ३से. तापमान आहे, ही विदा आहे. ती दिली-घेतली जात नाहीये. मात्र मी या तापमानाबद्दल प्रतिसाद लिहून ती विदा दिली. तुम्ही जेव्हा हा धागा उघडलात, तेव्हा हा धागा उघडण्याची विदा जमा झाली.

सात आंधळे आणि हत्तीसारखे विदा-विदाविज्ञान या गोष्टी आहेत. विदावैज्ञानिक म्हणून काम करणाऱ्या लोकांना बहुतेकदा 'आम्हाला समजलंय का सुरू आहे ते', असं वाटतं. पण तेही सात आंधळ्यांपैकी एक आहेत. या लेखमालेचं प्रयोजन आहे ते हेच. या हत्तीचं रूप आपल्याला जेव्हा आकळेल तेव्हा आकळेल; तोवर तो हत्ती आपल्याला उपद्रव कसा देतो, याची थोडी माहिती असलेली बरी.

शब्दाबद्दल -

विदा या शब्दाबद्दल मला काहीही राग-लोभ नाही. तो शब्द न्यूरल नेटवर्क्स जशी शिकतात, तसा शिकले. ८-१० वर्षांपूर्वी (माझ्यासाठी प्रथमच) कोणी तरी हा शब्द वापरला, त्याचा अर्थ मला लागला - समजला असं म्हणत नाही - अर्थ लागला म्हणून मी तो पुढे वापरला. न्यूरल नेटवर्कांंबद्दल लिहेन तेव्हा हेच उदाहरण वापरता येईल. त्याबद्दलही आभार. म्हणून चर्चा महत्त्वाची; मतपरिवर्तन झालं तर झालं. सगळ्यांनी एकसारखा विचार केला तर विदाविज्ञानाचाही मला कंटाळा येईल.

माझ्या दृष्टीनं आवाजाच्या संचाला अर्थ प्राप्त होतो कारण तो आपण मान्य करतो. एरवी कोणत्याही आवाजाला, ध्वनिसंचाला अंगभूत असा काहीही अर्थ नाही. मराठी/संस्कृत न जाणणाऱ्या व्यक्तींना विदा हा ध्वनिसंच पूर्णतया निरर्थक वाटेल. मला संस्कृत येत नाही, त्यामुळे विद्‌वरून विदा आला, ही माहिती माझ्यासाठी फार उपयुक्त नाही; मला या माहितीचं उपयोजन करता येत नाही. विदा हा शब्द स्त्रीलिंगी, त्याचं सामान्यरूप विदे आणि अनेकवचन विदा हेच, ही माहिती मला समजते, या माहितीचा उपयोग करता येतो; कारण ही माहिती मराठी शब्दाबद्दल आहे. मला मराठी येते.

डेट्यासाठी कोणी काय शब्द वापरावेत याबद्दल माझं काहीही मत नाही. अगदी 'भञघूञत' असा काही निरर्थक शब्द योजण्याचं सर्वानुमते(!) ठरलं तर मी तोही शब्द वापरेन. मी भाषातज्ज्ञ नाही, विदावैज्ञानिक/डेटा सायंटिस्ट आहे. शब्द ठरवा, त्याचं लिंग, एक-अनेकवचनं, सामान्यरूप वगैरे काय ते मला सांगा; मी ते शब्द वापरेन. विदा कशी गोळा केली जाते, तिचा आपल्यासाठी आणि आपल्याविरोधात कसा वापर केला जातो याबद्दल लोकांना माहिती असावी, यात मला रस आहे. शिवाय जोडीला डेटासैंटीस्टगिरी करून मला डॉलरं छापता आली की झालं!

वर डेटा या शब्दाचं सामान्यरूप केलं, डेट्या. मग हा शब्द मराठी झाला का? तर माझ्या लेखी हा शब्द मराठी झाला. एक सीडी, अनेक सीड्या; असा प्रयोग केला की सीडी हा शब्द माझ्या लेखी मराठी होतो. मला या वादात खरोखर रस नाही; त्या वादात मत मांडण्यासाठी भाषाशास्त्राचा जितपत अभ्यास पाहिजे, तेवढा माझा अभ्यास नाही. यापुढे तो अभ्यास करायला मला वेळ नाही आणि अभ्यासाशिवाय मतप्रदर्शन करणं मला शक्य नाही.

तरीही व्यक्तिगत आवडीनिवडींच्या पातळीवर विदा हा शब्द मला थोडा आवडतो. विदाविज्ञान यात अनुप्रास साधतो म्हणून नाही; तर मी 'विद्रट' ठरते आणि "मी विद्रटपणा करते", असं म्हणता येतं. हे विनोद वाचवण्यासाठी मी माझं मत विदा या शब्दाच्या पारड्यात टाकेन.

बाकी विदा/डेटा/आत्त/दत्त/सांख्य/डाटा ही एकच संकल्पना आता एवढी महत्त्वाची ठरत आहे आणि ठरणार आहे, की तिला लोक 'आजच्या काळातलं सोनं' म्हणतात. आपण भारतीय लोक तसे धार्मिक, अध्यात्मिक. आपण तिची (संकल्पना) तुलना विष्णूशी करू. विष्णूची कशी सहस्र नावं आहेत, तशी विदेचीही सहस्र नावं. हाच एक शब्द योग्य आणि बाकीचे काहीबाही कारणांनी वाईट, अशी जातीव्यवस्था का तयार करा? आपण विदासहस्रनाम तयार करू.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ह्या लेखमालेचा अवाका प्रचंड मोठा आहे- तू कसं आणि काय लिहिणार आहेस त्याबद्दल कुतूहल.
.
पण 4 W तरी कळावेत अशी अपेक्षा-
what is data?
how is it collected?
why is it collected?
who can use or misuse it?

हे प्रश्न चढत्या क्रमाने किचकट होत जातात. शेवटच्या प्रश्नाचं उत्तर महा किचकट.

पण बव्हंशी लोकांना "आपल्याच फोन किंवा तत्सम इलेक्ट्रॉनिक उपकरणामुळे आपला विदा आपणच कंपन्यांना पाठवतो" हेच ठाऊक नसतं. आणि हा प्रश्न किती गंभीर आहे तेही.

उदाहरण १- "आणखी ६० वर्षांनी तुम्ही कसे दिसाल?" किंवा "कुठले बॉलीवूड हिरोहिरवीण तुमचे जीवनसाथी बनू शकतात" टाईप भिक्कू ॲपस वापरताना ते ॲप -
तुमचं लोकेशन/काँटॅक्ट/फोटो/कॅमेरा/माईक इ. सगळ्या गोष्टी तपासण्याची मुभा हावरटपणे मागतं.
तुम्ही कत्रिना की ऐश्वर्या ह्या मूलगामी प्रश्नात गुंतले असल्याने बिन्धास्त "I agree" करून मोकळे होता. आणि मग जेव्हा जेव्हा तुम्ही जिथे जाल तिथली माहिती हे भिक्कू ॲप आपल्या कंपनीला पाठवतं.
झिंबल.

उदाहरण २- गूगल जेव्हा अँड्रॉईड फोन सेट करतं, तेव्हा सगळे पर्याय "डिफॉल्ट" तुमचा विदा गोळा करतात. ते न तपासता तसेच ठेवले तर आपली सगळी माहिती सुमडीत गूगलला मिळते. अर्थात ह्यात सुलभता हा भाग आहे, पण बरीच सेटिंग्स (ॲड वगैरे) नीट तपासून पहायला हवी. फेसबुकचंही तेच.

असं अजून बरंच काही. तेव्हा "विदा" जाणणं महत्त्वाचं आहे, इंटरनेटवर वावरताना अजूनच महत्त्वाचं.

लिखाणाला शुभेच्छा!
आणि विदा हा शब्द सोपा आणि उत्तम आहे. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'4 W'बद्दल आभार. माझ्याही डोक्यात असंच काहीसं आहे. पुढची सगळी उदाहरणं वाचून अगदी हेच्च आणि अस्संच्च, अशी प्रतिक्रिया उमटली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

१) लेख मालिकेचं स्वागत.
२) छापील माध्यमातले लेख संध्याकाळी केरात/ रद्दीत जातात. पेप्रांचे आर्काइव बरोबर चालत नाहीत त्यामुळे मोठी लेखमालिका असेल तर ते लेख अगोदर ब्लॅागवर टाकून मग पेप्रात द्यावेत ( लोकसत्ताचे मत अनुमती घ्यावी लागेल.)एका ठिकाणी सहज मिळतील.
३) पेप्राचा वाचक वेगवेगळ्या स्तरातला असतो त्यामुळे शैली आणि माहितीबद्दल मत देत नाही.
४)नावातच तारखेचा टॅग असावा -
विदाभान २०१९०१०२
विदाभान २०१९०१०९
विदाभान २०१९०११६
इत्यादि

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ते लेख अगोदर ब्लॅागवर टाकून मग पेप्रात द्यावेत ( लोकसत्ताचे मत अनुमती घ्यावी लागेल.)

हे होणं शक्य नाही. पण सकाळचा पेपर लोकांच्या हाती पोचल्यानंतर आणि त्यांच्या वेबसाईटवर लेख दिसू लागल्यानंतर एखाद्या लेखकानं तो आपल्या ब्लॉगवर किंवा ऐसीसारख्या साईटवर प्रकाशित केला, तर त्यांना काही अडचण नसावी (कारण आता तो लेख सार्वजनिक आहे).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ब्लाग किंवा छापील लेख जे अगोदर शक्य असेल ते. शोभा डे'चे लेख आणि ब्लागपोस्टही असतात. त्यांचा तसा करार असेल. पण ते एकातएक जोडलेले नसतात. घटनांवर टीका वाच्यता मतं असतात. इकडे एकाच विषयावर मालिका आहे,पुढे कुणाला सलग वाचायची इच्छा होईल तेव्हा पेपराचे अर्काइव फसतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लोकसत्ताच्या जुन्या लिंका न चालण्याचा अनुभव कोणाला आहे का? युनिकोडपासून मला असा अनुभव नाही.

ब्लाॅगाचा मला कंटाळा येतो, आणखी एक लोढणं कुठे सांभाळणार! त्यापेक्षा सगळं लिहून झाल्यावर, ते साफसूफ करून ऐसीवर डकवणं सोपं असेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

4W वगैरे ठीक आहे, पण मुळात लोकांच्या मानसिकतेत संस्कृती, सामाजिक स्थान, इ. अनेक घटकांमुळे फरक असतो आणि काळानुसारही पडत असतो ह्याचा विचार होणंही आवश्यक आहे. भारतातल्या लोकांची खाजगीपणाची कल्पना पाश्चात्त्य जगापेक्षा वेगळी असते. कालच मला एक (न-ममव) माणूस एका प्रवासादरम्यान पहिल्यांदा भेटला. तो मला पुन्हा भेटेल ह्याची फारशी शक्यता नाही. त्याचं आडनावही कळलं नसताना पाच मिनिटांत तो सहज स्वतःविषयी इतक्या गोष्टी सांगू लागला की मला आश्चर्य वाटलं. असे तपशील मी अनोळखी माणसाला देत नाही. पण अशा संभाषणात मी स्वतःहून असे तपशील दिले नाहीत तर भारतात मी आखडू ठरतो. अशी माणसं सहज आपला डेटा सगळीकडे (समाजमाध्यमं, ॲप्स, सरकार, इ.) देत राहतात असा माझा अंदाज + अनुभव आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सदर इसम वयस्कर किंवा तंत्रज्ञान विषयात नोकरी न करणारा असणार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सदर इसम वयस्कर किंवा तंत्रज्ञान विषयात नोकरी न करणारा असणार.

चाळिशीचा असावा. त्याच्याकडे स्मार्टफोन होता, त्यावर व्हॉट्सॅप, इतर ॲप्स होते, आधार होतं, पॅन होतं, इ. इ.
म्हणजे, तो तंत्रकुशल होता आणि त्याचा डेटा त्यानं अनेक ठिकाणी दिलेला असणार (असा माझा अंदाज).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

रोजचा संपर्क बहुतांश विदावैज्ञानिकांशी किंवा त्या कामासाठी सॉफ्टवेअर लिहिणाऱ्या लोकांशी येतो; त्यामुळे त्या पलीकडचे लोक कसा विचार करत असतील, याची सहज कल्पना येत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

त्याच्याकडे स्मार्टफोन होता, त्यावर व्हॉट्सॅप, इतर ॲप्स होते, आधार होतं, पॅन होतं

माझ्या वडिलांकडे स्मार्टफोन आहे, त्यावर व्हॉटसअप आहे, इतर अॅपस क्यांडी क्रॅश वगैरे आहेत. आधार ई. आहे. त्यांना तंत्रकुशल म्हणायला मी तयार नाही. मोबाईलच्या मेनुतून डेटा कनेक्शन चुकून बंद झाले तर त्यांना आयडिया किंवा जिओच्या दुकानात जावे लागते.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'ज्याचे हाती ससा, तो फासेपारधी' हा जगाचा न्याय पुरातन आहे.

तद्वत, 'ज्याचे हाती स्मार्टफोन, तो तंत्रकुशल' या आधुनिक न्यायास अनुसरून आपल्या तीर्थरूपांस 'तंत्रकुशल' असे संबोधण्यास प्रत्यवाय नसावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेखमालेचे स्वागत. सुरुवात उत्तम, बाकी लेखही तसेच असतीलशी अपेक्षा आहे. एकूणच या विषयाची तांत्रिक चौकट सांगताना त्याच्या गणिती-प्रोग्रॅमिंग गाभ्यालाही हात घातला जावा असं वैयक्तिक मत. बाकी लेख येतील तसे पाहूच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अदिती, आजचा लेख भारी आहे. फार तोलूनमापून लिहिता आहात असं दिसतंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

आभार, पुंबा.

तोलूनमापून का म्हणता? शब्दाबद्दलच म्हणत असाल तर तो वाद माझ्यासाठी महत्त्वाचा नाही. मला त्यातलं तंत्रज्ञान महत्त्वाचं वाटतं आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होतो ते. बाकी वाद साहित्यसंमेलनाची वारी करणाऱ्या लोकांसाठी सोडून देऊ, कसं! Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नाही. मला succinct ह्या अर्थाने म्हणायचे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

इथे लिंक देता येईल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेखाच्या मजकुरातच वाढवली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

दोन्ही लेख, इथल्या लिंकवरुनच वाचले. आता मला पेपरातले लेख, हात फैलावून वाचण्यापेक्षा, हे सोपं वाटतं! म्हणजे मी वयस्कर या सर्वसाधारण कॅटेगरीतून बाहेर पडलो असा दावा करु शकतो.
सदर इसम वयस्कर किंवा तंत्रज्ञान विषयात नोकरी न करणारा असणार.
हे वाक्य मला उगाचच टोचून गेलं. समोरच्याला, बोलताना अनावश्यक माहिती/विदा पुरवणं, हे माणसाच्या स्वभावावर जास्त अवलंबून असावे, शिवाय ते माणसाच्या आयक्यू शी ही निगडित असावं! प्रवासात याचे अनेक अनुभव आहेत. कुणाला काय सांगावं, याचं भान काही लोकांना उपजतच असतं आणि काहींना ते अजिबात नसतं! त्याचा वयाशी वा तांत्रिक शिक्षणाशी संबंध नसावा.
विदा या शब्दाविषयी उगाचच चर्चा होत आहे. एखादी गोष्ट निरखताना ती उलटसुलट करुन बघतात. तसं, विदा हा शब्द उलट करुन बघितला तरी 'दावि' हा मराठीच शब्द होतो. आपली माहिती इतरांना दाखवणे वा न दाखवणे, या अर्थीही विदा हा शब्दच योग्य आहे.
लेख उत्तम झाले आहेत म्हणून तर माझ्या सारख्या ले मॅनला कळत आहेत. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

फेसबुकवर पर्सनॅलिटी टेस्ट किंवा तुम्ही कोणत्या ऍक्ट्रेस सारख्या दिसता किंवा कुठली हेअरस्टाईल तुम्हाला कशी दिसेल वगैरे जे खेळ असतात, त्यातून कोणती विदा कशी वापरली जाऊ शकते ? मोह झाला तरी त्यावाटेला जात नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही बहुतांशी ॲप्स असतात, आणि ती तुम्ही जेव्हा वापरता त्या आधी ती ॲप्स तुमची काय काय माहिती गोळा करताहेत ते विचारतात. तिथे अंदाज येऊ शकतो.
पण पडद्यामागे फेबु काही माहिती ॲप्सना उपलब्ध करून देते- त्यावर एक ग्राहक म्हणून आपला काहीच ताबा नसतो. अशा वेळी ह्या ॲप्सना तुमची काही माहिती फेबुतर्फे मिळू शकते.
थोडक्यात- वाटेला न जाणं हे बेष्ट.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अदिती असे वर्गीकरण करता येइल का - विदा हा स्टॅटिक व डायनॅमिक असतो.
माझी जन्मतारीख, उंची, अंगावरील तीळ, गुणसूत्रे हा झाला स्टॅटिक विदा.
तर ....
माझे वजन, चित्रपटविषयक आव्डीनिवडी, दरदिवशीचा कॉफी इनटेक, माझी बाजारपेठेतील पत (नेट वर्थ) हा झाला डायनॅमिक विदा.
म्हणजे मला विचारायचे आहे की विदा चे वर्गीकरण मूलभूत किती प्रकारांनी करता येते? तशी काही संकल्पना आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जगी घाण अन चिखलची सारा, म्हणो कितीही कुणी शहाणा,
पदोपदी मज कमळ घालते, गुणगंधाचा नवा उखाणा

उंची, अंगावरील तीळ हा डायनॅमिक असावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बरोबर!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जगी घाण अन चिखलची सारा, म्हणो कितीही कुणी शहाणा,
पदोपदी मज कमळ घालते, गुणगंधाचा नवा उखाणा

दुसरा भागही चांगला आहे. मला स्वतःला तो विदा शब्द आवडत नाही. डेटा हा शब्द कुठलंही स्पष्टीकरण ना देता लोकसत्ताच्या वाचकांना सहज कळण्यासारखा आहे. व्याकरणाच्या दृष्टीने विदा पुल्लिंगी की स्त्रीलिंगी? एका ठिकाणी `ती विदा` असा संदर्भ आला आहे. त्याऐवजी डेटा हा साधा शब्द वापरून घोळ सहज टाळता येईल. दत्त वगैरे तर खूपच विनोदी. कॉम्प्रेस केलेला दत्त असेल तर घट्ट म्हणायचं का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाही म्हणजे, आता व्याकरणाचा (आणि तद्जन्य घोळाचा) मुद्दा काढलाच आहेत, तर, डाटा/डेटा हा व्याकरणदृष्ट्या अनेकवचनी आहे. (एकवचन: डाटम/डेटम.) परंतु तरीही, अनेकजण तो (चुकीने) एकवचनी वापरतात. त्या घोळाचे काय करावे?

आम्हांस वाटते, विदा हा शब्द सावरकरी भाषाशुद्धीवाल्यांनी सावरकरांच्याच सन्मानार्थ काढला असावा. (वि.दा. अर्थात, विनायक दामोदर.) अन्यथा, 'डेटा'ला आमचा व्यक्तिशः विरोध नाही. ('बॉम्बे'लासुद्धा.)

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विदा म्हणजे ते विदा का.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दत्त वगैरे तर खूपच विनोदी. कॉम्प्रेस केलेला दत्त असेल तर घट्ट म्हणायचं का?

'काँप्रेस्ड डेटा'बद्दल थोडा विचार करावा लागेल. मात्र, 'रॉ डेटा'करिता 'दत्त दिगंबर' अशी शब्दयोजना करता यावी.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी4
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ROFLROFL आवरा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जगी घाण अन चिखलची सारा, म्हणो कितीही कुणी शहाणा,
पदोपदी मज कमळ घालते, गुणगंधाचा नवा उखाणा

लेखाचे शीर्षक अलविदा ठेवणार?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दोन लेख वाचल्यावर असं वाटतय की बावन लेख (द्यायचेच म्हणून, ) फार होतील. तीनचारनंतर वाचकांचे प्रश्न आले पाहिजेत मग त्यांना उत्तरे असा प्रकार हवाय. किंवा लेखातच काही प्रश्न विचारायचे. त्यांना धरून पुढे जायचे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझं काम बहुतेकसं विदा साफसूफ करून मॉडेलिंगसाठी तयार करणं आणि मॉडेल मान्य झालं की वेब-डेव्हलपमेंटवाल्या लोकांच्या हातात ते सुपूर्द करणं असं असतं. त्यात विदा कोणत्या प्रकारची आहे - चल किंवा अचल यानं फरक पडत नाही. काही अपवाद असतात, म्हणजे टाईम सिरीज मॉडेलिंग असेल तर अर्थातच फरक पडतो; किंवा भाषेच्या बाबतीतही कधी फरक पडतो.

सामान्यतः व्यक्तींची व्यक्तिगत माहिती जपण्याबद्दल लोक अधिक जागरूक असतात. नाव, जन्मगाव, जन्माची तारीख, वगैरे. मात्र शान्तादुर्गांनी प्रतिसादात जे उदाहरण दिलेलं आहे, "तुम्ही पुढच्या जन्मी कोण होणार" किंवा असले काही प्रश्न फेसबुकवर दिसतात, त्यात दिवसाच्या कोणत्या वेळेला माहिती जमा झाली, याचाही कदाचित वापर करत असतील. भरदिवसा केली तर सदर व्यक्ती बेरोजगार आहे किंवा ऑफिसात आनंदी नाही, असा निष्कर्ष काढता येईल; किंवा असं काही.

विदा वापरून नक्की काय करायचं आहे, कोणता प्रश्न सोडवायचा आहे, यानुसार विभागणी कशी करता येईल याचा विचार केला जातो.

तिरशिंगराव, तुम्ही म्हणता तो मुद्दा व्यक्तिगत पातळीवर योग्यच आहे. असं पाहा की मी कॉलेजात असताना आमच्या घरी फोन आला. आताची कॉलेजातली पोरं मोठी झाली तेच मोबाईल फोन बघत. त्यामुळे नॉर्मल काय आहे, कोणती माहिती महत्त्वाची आणि कशाकडे दुर्लक्ष करता येईल, या गोष्टी स्थलकालपरत्वे बदलत जातात. इमेल पत्ते नसलेले आणि सुस्थित घरांतले पंचविशीचे लोक सापडणार नाही ज्यांचा इमेल अड्रेस नाही, किंवा कोणत्याही समाजमाध्यमांवर नाहीत; वयस्कर लोकांत असे चिकार सापडतील किंवा त्यांचे नावापुरते इमेल अड्रेस असतील आणि समाजमाध्यमं माहीतही नसतील.

घट्ट, दत्त दिगंबर Biggrin

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आजच्या लोकसत्तेत विदाभानवर प्रभाकर नानावटींची प्रतिक्रिया आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/