ही बातमी समजली का? - भाग १८९
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं. तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.
---
आधीच्या धाग्यात १०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.
सेंटिनलींशी संपर्क करणारी संशोधक
मधुमाला चट्टोपाध्याय या संशोधिकेनं १९९१ सालात अंदमानच्या सेंटिनली आदिवासींशी संपर्क प्रस्थापित केला होता. त्याची कथा. वरच्या चित्रात, मधुमाला तीन महिन्यांच्या सेंटिनली बाळासोबत.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
करेक्षण - ते बाळ जारवा
करेक्षण - ते बाळ जारवा जमातीचं आहे. (लिंकमधेतरी तसं लिहिलंय)
डिटेल वाचतो. सेंटिनली लोकांपर्यंत पोचणं हे कसलं कर्मकठीण काम आहे त्याची कल्पना आहे.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
योग्य.
ते बाळ अंदमानमधली आणखी एक आदिवासी जमात जारवा जमातीतलं आहे. अंदमान-निकोबारच्या आदिवासींबद्दल मधुमाला यांनी काम केलं होतं.
मधुमाला स्त्री असल्यामुळे सेंटिनली आदिवासींना तिच्यावर, आणि तिच्या टीमवर विश्वास ठेवणं सोपं गेलं, असा उल्लेख दुव्यात आहे. एरवी इतर लोकांकडे शत्रू म्हणून पाहणाऱ्या आदिवासींना शत्रुत्व वाटू नये, यासाठी तिनं काय केलं याचंही वर्णन लेखात आहे. या पार्श्वभूमीवर 'त्यांना मदत करूनच सोडेन' छापाची डायरीनोंद करणारा अमेरिकी चू बाणानं मेला, ही गोष्ट मुद्दाम नोंदवून ठेवण्यासारखी.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अमेरिकी चू कोटी!!!!
कोटी!!!!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
पारशी जमातीने सरकारकडे आरक्षण
पारशी जमातीने सरकारकडे आरक्षण मागितले नाही.
काय आचरटबाबा , तुम्हीपण... ते
काय आचरटबाबा , तुम्हीपण... ते कशाला मागतील आरक्षण ? सगळं गुबगुबीत असतंय त्यांचं. मालक लोकं ती.
इथं लोकं पुलंवरून पेटलीहेत आणि तुम्ही काय ही चेष्टा करताय ?
>>>इथं लोकं पुलंवरून पेटलीहेत
>>>इथं लोकं पुलंवरून पेटलीहेत ~~>>
अमची महत्त्वाकांक्षा लघुतमकांक्षा चानेल ओनर होण्याची नसते. मालिकांपुरते उरलो आम्ही. हमो मराठेच्या 'एक लेखक एक दिवस'मध्ये फिरोदिया म्हणतात तुमचे लोक ~~~~. " होण्यास मागत नाहीत.
पुलंवरून पेटायचं कारण नाहीच. आजही कोणताही प्रकाशक पुलं आणि अध्यात्म पुस्तक प्रकाशनात हात घालायला तयार असतो हेच मिशेलिन स्टार.
बाकीच्या आताच्या सक्षम लेखकांनी मालिका पकडल्या. मांडलेकर,दरडे .
>>>इथं लोकं पुलंवरून पेटलीहेत
>>>इथं लोकं पुलंवरून पेटलीहेत ~~>>
अमची महत्त्वाकांक्षा लघुतमकांक्षा चानेल ओनर होण्याची नसते. मालिकांपुरते उरलो आम्ही. हमो मराठेच्या 'एक लेखक एक दिवस'मध्ये फिरोदिया म्हणतात तुमचे लोक ~~~~. " होण्यास मागत नाहीत.
पुलंवरून पेटायचं कारण नाहीच. आजही कोणताही प्रकाशक पुलं आणि अध्यात्म पुस्तक प्रकाशनात हात घालायला तयार असतो हेच मिशेलिन स्टार.
बाकीच्या आताच्या सक्षम लेखकांनी मालिका पकडल्या. मांडलेकर,दरडे .
अजिनोमोटो ऊर्फ मोनोसोडियम
अजिनोमोटो ऊर्फ मोनोसोडियम ग्लूटामेट हा पदार्थ कसा तयार करण्यात आला त्याचा अति जबरदस्त इतिहास.
https://qz.com/quartzy/1477172/the-persistent-racist-myth-of-chinese-res...
त्यातून हे कळालं की अजिनोमोटो हे त्या पदार्थाचं नाव नसून त्या पदार्थाच्या जगातील नंबर १ उत्पादक कंपनीचं नाव आहे. झेरॉक्स वगैरेसारखाच प्रकार.
लय भारी, अवश्य वाचा.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हाहाहा!
भारतीय संडासच भारी!
https://www.theguardian.com/news/2018/nov/30/bowel-movement-change-the-w...
भारतीय संस्कृती --> १ पाश्चात्य संस्कृती --> ०
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
भारतीय संस्कृती?
मुळात ज्याला तुम्ही "भारतीय संडास" म्हणता (किंवा इंग्रजीत ज्यास squat toilet अशी संज्ञा आहे), त्यात quintessentially "भारतीय" असे काहीही नाही. त्याचा उद्गम अथवा विस्तार दोन्ही "भारतीय" नाही.
मुळात ही संकल्पना सार्वजनिक ठिकाणचे संडास बांधण्याकरिता म्हणून squat toilet इंग्लंडात/युरोपात उद्गम पावली. आजमितीस युरोपात ते कितपत आढळतात याबद्दल कल्पना नाही, परंतु तुरळक आढळत असावेत असे विकीमजकुरावरून वाटते. (तसे क्वचित अमेरिकेतही आढळतात असेही विकीवर वाचल्याचे आठवते; मात्र, आजतागायत अमेरिकेत निदान मी तरी एकही पाहिलेला नाही. असो.)
मात्र, खुद्द युरोपात त्यांची व्याप्ती सार्वजनिक संडासांपुरतीच मर्यादित असो वा आजमितीस अजिबातच नसो, आशियात मात्र हा प्रकार अतिशय लोकप्रिय झाला, असे कळते. मध्यपूर्वेपासून ते पार जपानपर्यंत (पक्षी: केवळ हिंदुस्थानातच नव्हे.) हा प्रकार घरगुती संडास म्हणून सर्रास प्रचलित आहे, असे विकी सांगतो.
सबब, हा गोल भारतीय संस्कृतीच्या नावावर नमूद करणे उचित ठरणार नाही, एवढेच नम्रपणे सुचवू इच्छितो.
इत्यलम्|
१९९६ साली सिंगापूरला गेलो
१९९६ साली सिंगापूरला गेलो होतो तिथे फॅक्टरीत दोन्ही प्रकारचे संडास होते. फरक इतकाच की आपल्याकडे वॉटर ट्रॅप असतो त्यात पाणी (पॉटच्या) मागच्या भोकातच राहते. तर सिंगापूरच्या संडासात ते जिथे आपण पो टाकतो तो भाग पाण्याखाली झाकला जाईल इतके होते. त्यामुळे बहुधा पो पॉटला चिकटण्याची शक्यता रहात नाही. पण आत बसलेल्याला मात्र ते विचित्र वाटते कारण पो एका जागी न राहता इकडे तिकडे हलतो.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
फीचर की बग?
अहो ते फीचर नसेल बग असेल... तुंबला असेल तो संडास. सिंगापूरचा असला म्हणून काय झाले?
(पण... पण... पण... सिंगापूर तर जागतिक संडास संघटनेचे मुख्यालय की कायसेसे आहे ना?)
ओळीत २५ संडास तुंबलेले?
ओळीत २५ संडास तुंबलेले?
तसेही फ्लश केल्यावर भांडे ओव्हरफ्लो होत नव्हते.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
संस्कृतीअभिमान अगदी योग्य
संस्कृतीअभिमान अगदी योग्य गोष्टीबाबत निदर्शनास आणल्याबद्दल शास्त्री बुवांचे अभिनंदन !!!
जीडीपी
हा माझा विषय नाही, पण जग आपल्याला हसतंय असं वाटतंय. खरं का?
India Goes Back to the Future—Again—With Economic Growth Revisions - WSJ
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
भविष्य बदलण्यापेक्षा इतिहास
भविष्य बदलण्यापेक्षा इतिहास बदलणं जास्त सोपं नाही का?
महागडे चित्र
खफवरून इकडे
//
आचरटबाबा
रविवार, 02/12/2018 - 11:44
मागच्या महिन्यात एक(वॅाटरकलर?) चित्र ९०मिलिअन डॅालरसला क्रिस्तीने विकलं. मॅाडन आर्टवगैरे नाहीये. चित्रकार हयात आहे.
चित्र : स्विमिंग पुलात एकजण पालथा पोहतोय पांढरऱ्या चड्डीत, एक बाई काठावर उभी राहून पाहतेय. त्याची आई असावी.
अभ्याचं मत काय?
चिंतातुर जंतू
रविवार, 02/12/2018 - 14:45
आचरटबाबा तुम्ही बहुधा ह्या बातमीबद्दल बोलताय. ते दोघेही पुरुष आहेत आणि चित्रकार (डेव्हिड हॉकनी) गे आहे.//
आता आठवलं मी ही बातमी France24 चानेलवर पाहिली होती. ( चित्र पटकन दाखवलं होतं.) "हयात असलेल्या चित्रकारांच्या चित्रांना मिळणाऱ्या किंमतींत सर्वोच्च."
डेव्हिड हॉकनी
डेव्हिड हॉकनी सुप्रसिद्ध आहे. किंबहुना हयात चित्रकारांपैकी सर्वात प्रसिद्धही म्हणता येईल. त्यातही पोहण्याच्या तलावाची त्याची मालिका सुपरिचित आहे. त्यापैकी 'अ बिगर स्प्लॅश' हे आता अनेक ठिकाणी ज्याचा संदर्भ घेतला जातो असं iconic चित्र आहे. त्याविषयी अधिक इथे आणि त्याच्या स्विमिंग पूल चित्रांविषयी अधिक इथे.
हे मॉडर्न आर्टच मानलं जाईल.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
वाचतोय, मजेदार आहे.
वाचतोय, मजेदार आहे.
संडास हा चावून चोथा झालेला
संडास हा चावून चोथा झालेला विषय ( सर्व कोट्या धरून) आहे पण तरीही महत्त्वाचा आहेच.
दोन पावलावर हे फार सुरक्षित स्वच्छ असते. रेल्वेत वर्तमानपत्र (जुने, वाचण्यासाठी नाही) न्यावे लागते. दार उघडल्यावर समोर कोणता संडास येईल सांगता येत नाही. पेपरची फायरवॅाल कुणाच्या मांडीची *** आपल्या *** लागू नये म्हणून. पण पण बायो संडास आल्यापासून तो कागद खाली ढकलता येत नाही. थोडक्यात समबडी शुड गेट डाउन टु ब्रास टॅक्स.
https://indianexpress.com
चांगली दगडफेक!
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
२०१९ची पूर्वतयारी?
पोलीस ठाण्यावर जमाव चालून जाणं, दादरीमधल्या अखलाकच्या प्रकरणाची चौकशी करणारा पोलीस त्यात जखमी होणं आणि त्याला इलाजासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना पुन्हा हल्ला होऊन तो मारला जाणं - हे काही साधंसुधं प्रकरण वाटत नाही.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
मागील आठवड्यात एक राजस्थानी
मागील आठवड्यात एक राजस्थानी व्यक्ती "दंगली होणार आहेत" असे प्र्डिक्शन करत होती. पण ती राम मंदिराच्या संदर्भात बोलत होती.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
पोलिसाची हत्या
पोलिसाची हत्या जिथे सहज झाली आहे तो उत्तर प्रदेश
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
टंबलर, यू टू!
फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर वगैरेंनी आधीच केलेली गोष्ट अखेर आता टंबलरनंदेखील केली आहे -
Tumblr will ban all adult content on December 17th
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
अडाणी पाण्यात देव घालून?
अडाण्यामागचा दुर्दैवाचा फेरा काही संपत नाही.
Court challenge launched over minister's 'flawed' decision on Adani water trigger
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
अंदमानमधले आदिवासी
अंदमानमधले आदिवासी,पर्यटकांच्या सोयीसाठी विकास इत्यादि सन्डे एक्सप्रेसमधला लेख
शांताबाई रानडे
सामाजिक कार्यकर्त्या शांताबाई रानडे यांचे निधन
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
Microsoft Edge browser विंडोज
Microsoft Edge browser विंडोज ओएसमधून वेगळा होणार महिन्याभरात॥ ओपनसोर्स क्रोमिअमवर येणार.
---
आताचा लुमिआ मोबाइल फोनवर html5test स्कोअर ४४५/५५५ आहे तो ५२०/५५५ होईल का?
सध्या फोटोच्या मागचा कोड प्रापर्टिजमध्ये येत नाही तो येईल बहुतेक.
ख्रिस्तिएन मिशेल आणि दुबईची राजकन्या
https://timesofindia.indiatimes.com/india/how-a-prince-runaway-princess-...
गेल्या आठवडयात ओगस्ता वेस्टलंड प्रकरणातला दलाल च्रिस्तिएन मिशेल ला युएईने भारताच्या स्वाधीन केल. हे करण्यासाठी भारतीय कोस्ट गार्डने घरातुन पळुन जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या युएईच्या एका राजकन्येला पकडुन तिच्या बापाच्या स्वाधीन केलं. त्यानंतर मिशेलला भारताच्या ताब्यात देण्यात आलं.
सो.गा / रा.गा विरुद्ध का दलाल साक्ष देईल अशी अपेक्षा आहे.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
ट्विटरवरच्या खरडीवरून (
ट्विटरवरच्या खरडीवरून ( गेसंबंधी टिप्पणी) एका स्टारला एका कार्यक्रमाच्या होस्टिंगमधून काढले, ( the verge)मग तो त्या पोस्ट डिलिट करतोय, पण आता उशिर झालाय.
, इकडेही सावध राहायला हवय कारण ऐसी बरेच लोक वाचतात.
मराठा आरक्षणाविरोधात याचिकाकर्त्यावर हल्ला
मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणारे गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
बाप रे!!!
बाप रे!!!
शोधा रे कोणीतरी...
https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/rbi-gover...
उर्जीत पटेल कसे inefficient होते, काँग्रेस बरोबर कशी हात मिळवणी केली होती, त्यांच्या आजोबांची / पणजोबांची एकदा नेहरूंबरोबर भेट झाली होती ... शोधा काहीतरी पटकन ...
कॅशलेस व्यवस्था आणणार तर
कॅशलेस व्यवस्था आणणार तर गवर्नर सही कुठे ठोकणार?
कॅशलेस झाले तरी ५, १०, २०, ५०
कॅशलेस झाले तरी ५, १०, २०, ५०, १०० व २०० च्या नोटा ठेवाव्याच लागतील.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
गेल्या महिन्यात पाच,दहाची
गेल्या महिन्यात पाच,दहाची नाणी पर्यटनात नेलेली. दहाची नाणी गुजरातमध्ये कुणी घ्यायला तयार नव्हते.
विधानसभा निकाल.
"आज खुश तो बहुत होगे तुम" अशा छापाच्या खवचट पोष्टी ऐसीवर न दिसल्यामुळे भाजपेयी, हिंदुत्ववादी आणि त्यांच्या सहानुभूतीदार लोकांच्या विनोदबुद्धीबद्दल शंका येत आहेत.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अब कहा है पालिटिकल पंडित
निकालांच्या दिवशी दिल्लीत एक सभा होत असते आणि बोलणारे साहेब "अब कहा है पालिटिकल पंडित" असं साऱ्या दुनियेभरचा राग चेहऱ्यावर ठेवून विचारत असतात. आज ती सभा सुद्धा झालीच नाही वाटतंय. मी वाट बघत होतो ...
करतारपूर नेहरूमुंळे पाकिस्तानात गेलं, हे त्यांच्या जाण्याच्या ५५ वर्षानंतरही एका पक्षाचा प्रचार असतो. इंदिरा गांधी जाउन ३५ वर्षांनंतरही त्यांनी काय केलं होतं हा त्याच पक्षाचा प्रचार असतो. आता किती दिवस हा असाच प्रचार ऐकणं नशिबात आहे त्या काशीच्या महादेवाला माहित. काशी कोणाचा मतदारसंघ आहे कायनू. आपल्या पक्षाने काय काम केलं हेही प्रचारात सांगता येतं हे कोणी तरी हळूच कानात सांगायला पाहिजे त्या साहेबांच्या.
विनोदबुद्धी
एरवी कर्कश आरडाओरडा करणारे भक्त आणि 'काँग्रेसच्या विधवा' किंवा तत्सम हिणकस गोष्टी भकणारे पंप्र आणि त्यांचे चेले यांच्याबद्दल चकार शब्द न काढणारे न-भक्त, या सगळ्या लोकांबद्दल माझं काहीएक म्हणणं नाही. मात्र एक फेसबुकपोस्ट आवडली.
राको आणि मित्र छोटा डॉन यांनी फेसबुकवर लिहिलंय -
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
नेहरू एके नेहरू
११ डिसेंबर २०१८ ची नेहरूंची रिॲक्शन
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
फोटोशॉप कळतेय हो!
पण... पण... पण... त्या ओरिजनल फोटोत लेडी मौंटबॅटन आहे ना?
नाही म्हणजे, लेडी मौंटबॅटनककडे पाहून नेहरूंचे असे होणे हे एक वेळ समजू शकतो, पण... मोदींकडे पाहूनसुद्धा??????
संदर्भ!
गेले काही महिने, ह.पा. नेहरूंच्या नावावर बिल फाडण्याचे प्रकार सुरू होते, विशेषतः निवडणूक-प्रचारसभांमध्ये. नोटबंदी फसली का, असं विचारलं की नेहरूंच्या नावानं शंख; जीएसटीबद्दल विचारलं की पुन्हा नेहरू.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
ते कळले हो! पण...
हे नेमके कधी होत नव्हते?
बोले तो, निवडणूक प्रचारसभांमध्ये हा प्रकार नवीन असेलही कदाचित, परंतु या विशिष्ट गोटात एनीथिंग अँड एव्हरीथिंग दॅट इज़ (पर्सीव्ह्ड टू बी) राँग विथ इंडिया, त्याचे बिल नेहरू-गांधी घराण्यावर फाडण्याची परंपरा अगदी अनादि काळापासून नाही, तरी गेला बाजार नेहरू (/नेहरू-गांधी घराणे) असल्यापासून आहेच की. त्यात नवीन ते काय?
अगदी पार नेहरूंनी काश्मीर प्रश्न यूनोत नेल्यापासून ही बोंब चालू आहे.
मान्य, की हे नवीन नाही.
मान्य, की हे नवीन नाही.
सूक्ष्म फरक असा , की सध्या त्याचा अतिरेक झाला आहे. आणि (मो.क.)गांधी व आंबेडकर यांना या गालीप्रदान समारंभातून(जाहीर डिस्कोर्स मधे)वगळले गेले आहे. आता फक्त न्हेरू एवढेच फॉल गाय आहेत.
नेरुशिवाय सिमेंट वापरल्यास
नेरुशिवाय सिमेंट वापरल्यास प्लास्टर तडकते.
जियो
लय भारी निकाल!! मस्त मस्त! पप्पू जिंकला गप्पू हरला!!
पप्पू जिंकल्याचा आनंद नाही, परंतु...
...गप्पू सोकावत होता.
.
अखिलेश यादवांचं ट्विटर चालवणाऱ्या लोकांचं कौतुक वाटलं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मला लहानपणी डबल डेकर बसचे फार
मला लहानपणी डबल डेकर बसचे फार अप्रुप होते. जे मी भरपूर उपभोगले. पण एक राहिलंच. एक सिंगल आणि एक डबल अशा दोन बशी फोर्टात कोर्टाच्या पुढे कुठेतरी उभ्या असायच्या ( बहुतेक टेलि कम्यु टावर इमारतीसमोर?) त्यात कँटिन होते आणि त्यात बसून खायचे होते. पण बाबा म्हणायचे अरे ते फक्त बिएसटीच्या डायवर कंडक्टरांसाठी आहे.
मला डबल डेकर बस बघायला, प्रवास करायला ( वरती पुढच्या शिटवर) फार आवडतं.
( लघुनिबंध संपला.)
मलाही
अजूनही डबलडेकरच्या सगळ्यात पुढच्या शिटेवर बसण्यासारखं दुसरं सुख नाही. सांताक्रूझ ते कुर्ला (आणि उलटही) ३१३ नं. बस अजूनही डबलडेकर आहे. ही बस फ्लायओव्हरवरुन वगैरे जात असल्याने अजूनच मज्जा. तशीच कुलाब्यालाही, बहुतेक ३ नं. असावी. ही कँटीनवाली बस पाहिलेली नाही. शोधायला पाहिजे.
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
या बशीचा म्हणजे टपले नसलेल्या
या बशीचा म्हणजे टपले नसलेल्या बशीचा - इनका भी बडा नाम है। क्रिकेट,फुटबॅाल टीम जिंकल्यावर याच्या डेकावरूनच मिरवणूक काढतात॥
प्राइवेट वाहन म्हणून महागड्या गाड्या असतील पण डडे बस नसते.
पर्यटन - शहरफेरीसाठी हीच बरी. आता जर्मनीने रस्त्यावरून पाण्यात पोहणारी तयार केली आहे तशी मुं मनपाने घेतली आहे म्हणतात पण डॅाकच मिळत नाही. चालायचंच.
लोक वाढदिवसाला बुक करतील, केक कापत फिरवतील शहरात, समुद्रात -
मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं?
छोट्याछोट्या गमतीत लपलेलं असतं.
दोनचार टकले ग्यालरीतून पाहून आपल्याला हात करतील, त्यानाही हाय!!
डब्बल डेकर
सिप्झ ते अंधेरी स्टेशन अजून ही डबल डेकर चालते. काही २०३ (पोयसर आगार ते जुहु चौपाटी) आहेत. एकदा मी आणि मयत्रीण कयानी मधून बाहेर पडलो आणि दादर ला जायला टॅक्सी शोधत होतो, समोर सिग्नल वरून सुट्लेली वरळी ची बस दिस्ल्यावर त्यामागे वेड्या सारखे धावून पकडून वरळी ला गेलो. फक्त वर्च्या मजल्यावर बसून मुंबई पहायच्या वेडेपणासाठी... महालक्ष्मी रेसकोर्स, वरळी मस्त दिसलं.
कॉलेज ला असताना पावसात त्या वरच्या सीटवर बसून मस्त पाऊस अंगावर घेउन येण्यासाठी मी आणि माझ्या मित्राने बस स्टॉप वर दिड तास डबल डेकर ची
वाट पाहण्याचा शहाणपणाही केलाय.
बिना टपाच्या निलांबरी च ज्याम कौतुक आहे मला, स्पेशली वरळी सी फेस च्या समोरुन जाते ती तेव्हा तर तिच्यात बसायला जीव चाल्लेला म्हणालात तरी हरकत नाही... लौकरच जाईन.
हायफाय यासाठी...!
- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |
अबकी बार्
अबकी बार, पाँचो ऊंगलियाँ कीचड्पर !
अमिताव घोष यांना 'ज्ञानपीठ'..
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
वा! वा! वा! वा! वा! वा! वा!
वा! वा! वा! वा! वा! वा! वा! वा! वा! वा! वा! वा! वा! वा! वा! वा!
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
लेख हवा.
आबा, एखादा तपशिलवार लेख लिही की. (बिभीषण सातपुतेंची मुलाखतही हवीच, ते अस्वल आणि तू काय ते बघा.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
तपशीलवार लेख सध्या जमणं कठीण
तपशीलवार लेख सध्या जमणं कठीण आहे, पण तूर्तास हा जुना लेख.
http://aisiakshare.com/node/6009
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
जीनियस इन कॉपी पेस्ट
खरं तर ह्यात आश्चर्य वाटावं असं काहीच नाही, तरीही -
मराठीत कॉपी पेस्ट
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
https://www.ndtv.com/india
https://www.ndtv.com/india-news/army-chief-bipin-rawat-on-difficulties-o...
He cited logistical reason also behind not posting women on frontlines. "Our orders are that a lady officer will get a hut in the COB, then there are orders that we have to cocoon her separately. She will say somebody is peeping, so we will have to give a sheet around her," General Rawat said.
The Army Chief questioned whether a women officer with commanding responsibilities can stay away from her post for long? "I am ready, it is not that army is not ready (for combat role for the women). Will she command? Okay, so now I make her a commanding officer. She is commanding a battalion. "Do I put a restriction on her to say that in that command tenure you will not be given maternity leave? If I say that, there will be ruckus created," he added
अजूनही काही गोष्टी न बोलता अध्याहृत सोडलेल्या दिसतात.
असा विचार करुन ही गोष्ट पुढच्या पन्नास वर्षांतही शक्य होणार नाही.
"मा सॅाचा EDGE ब्राउजर
"मा सॅाचा EDGE ब्राउजर अकार्यक्षम करण्यात गुगलचा चावटपणा आहे "- एक जुना कर्मचारी. "साइटमधला ( वि युट्युब) कोड फिरवतात."
तर अशा काही आतल्या गोष्टी कर्माचारी उघड करू शकतात का? ( नोकरीत नसताना, सोडल्यावर)
आधार डेटाबेस वापरायची फी
आधार डेटाबेस वापरायची फी वर्षाला साठ लाख रु मोबाइल कंपन्या देतात!
फक्त?
यात नक्की काय माहिती त्यांना मिळते?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
महिती काढतात का ते नाही महिती
महिती काढतात का ते नाही महिती पण आधारद्वारे युजर व्हेरिफिकेशन करतात मोबाईल कंपन्या. त्याची फी असेल. आधारद्वारे व्हेरिफिकेशन केलं तर सिम्कार्ड काही तासांत चालु होते. जुन्या पद्धतीने दोने तीन दिवस लागतात.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
आधारद्वारे युजर व्हेरिफिकेशन
आधारद्वारे युजर व्हेरिफिकेशन करण्याचे रिलाअन्स जिओने प्रथम चालू केले. आताही सिमकार्ड हे केल्याबरोबर ताबडतोब चालूच होते. ( त्यासाठी खर्च साठ लाख वार्षिक हा फी धरून असणार)
जिओने चालू केल्याने इतरांनाही ती पद्धत अमलात आणण्याशिवाय पर्याय नव्हता.
मग एवढे सर्व केल्यावर हे प्रीपेड सिमकार्ड काश्मिरसह नॅार्थईस्टमध्ये चाललेलेच पाहिजे॥ बिलिंग पोस्टपेडची अट का? त्यात काय कंपनीचा माणूस घरी येऊन पत्ता बरोबर आहे का तपासतो?
आधार इ ओथेंटिकेशनसाठी तो
आधार इ ओथेंटिकेशनसाठी तो डेटाबेस अक्सेस करावा लागतो. त्यासाठी फी.
QR code आणा म्हणतात, तो स्वस्त आणि मस्त आहे असं कंपन्या म्हणतात.
लागला शोध एकदाचा ...
https://m.navbharattimes.indiatimes.com/metro/lucknow/other-news/bjp-mlc...
हनुमान मुसलमान असल्याचा शोध
हनुमान मुसलमान असल्याचा शोध आम्हाला कॉलेजातच लागलेला होता.
जसा रहमान, सलमान, सुलेमान असतो तसा हनुमान
या न्यायाने सगळे बुद्धिमान सुद्धा मुसलमानच असतात.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
इंग्रजीतलं स्पेलिंग Heman,
इंग्रजीतलं स्पेलिंग Heman, Superman, Spiderman च्या स्पेलिंगच्या जवळ जाणारं वाटतं. त्या शक्यतेचाही विचार होऊ शकतो.
विनोद जुना आहे खरा, परंतु...
...अर्धवट सांगितलात.
संपूर्ण विनोद असा आहे:
दूरदर्शनवर रविवारचे रामायण चालू असते. (तेच ते रामानंद सागरवाले.) लंकादहनाचा एपिसोड असतो. पाहायला एक अमेरिकन, एक मुसलमान, आणि एक सरदारजी.
तिघांनाही एपिसोड (आणि त्यातला तो हनुमान) प्रचंड आवडतो. आणि मग हनुमान आपलाच होता, हे सिद्ध करण्याची तिघांत अहमहमिका सुरू होते.
"ते ही-मॅन, सुपरमॅन, स्पायडरमॅन वगैरे आमचे सुपरहीरो आहेत, तसाच आमचा हॅनूमॅन." - अमेरिकन.
"छट बे! वो उस्मान, सुलेमान, रहमान वैसे हमारा हनुमान." - मुसलमान.
यावर सरदारजी फक्त हसतो.
बाकीचे दोघे त्याला विचारतात, "हसायला काय झाले?"
सरदारजी म्हणतो, "एक तो दूसरे की बीवी के लिए तीसरे की लंका जलाने वाला, और फिर उस के लिए ख़ुद की पूँछ को आग लगवाने वाला, सिर्फ़ एक सरदार ही हो सकता है."
द्रौपदी
सगळ्या बुद्धिमानांबद्दल कल्पना नाही, परंतु द्रौपदी मुसलमान होती, एवढे निश्चित.
द्रौपदीचेच 'पांचाली' हे नाव घ्या. जिसके पाँच अली, वो पांचाली.
सॉरी शक्तिमान पण.
सॉरी शक्तिमान पण.
सॉरी, पण...
...शक्तिमान हा मुसलमान नसून जर्मन असण्याची शक्यता अधिक वाटते.
Schacktimann.
खा, प्या आणि तंगड्या वर करून ...
https://www.esakal.com/desh/naseeruddin-shah-says-he-fears-his-children-...
समाजातलं "विष" सिलेक्टिव्हली दिसतं सरांना. Whataboutery नाही. पण ही नाटकं in any case उठून दिसतात.
सोपे आहे.
गोहत्येवरून (किंवा गोहत्येच्या नुसत्या संशयावरून, किंवा (हा अमक्या गटाचा आहे, तेव्हा) याने गाय मारली/खाल्ली असेलच(/यानेच गाय मारली/खाल्ली असेल), अशा निव्वळ अॅझम्पशनवरून) आपल्या मुलांचा खून होऊ शकतो, अशी भीती जर तुम्हाला वाटू लागली, तर तुम्हीसुध्दा अशीच बोंब माराल. तूर्तास तुम्हाला अशी भीती वाटत नाही, म्हणून तुम्ही ती मारत नाही, इतकेच.
ज्याचे जळते, त्याला कळते.
त्यात झालेय काय, की सध्याचे सरकार आल्यापासून अशा घटनांना ऊत आलेला आहे, किंवा गेला बाजार त्यांचे प्रमाण वाढलेले आहे. (आणि/किंवा, दुष्ष्ष्ट हलकट लिबरल फेक मीडिया अशा घटनांना अंमळ जास्तच प्रसिद्धी देतात. खरे तर रूटीन म्हणून असल्या बातम्या दडपल्याच पाहिजेत. कुत्रा माणसाला चावला तर ती बातमी नव्हे.) त्यामुळे त्यांना वाटले असेल तसे.
आमच्या देशातसुद्धा सध्याचे सरकार आल्यापासून काही प्रकारच्या घटनांना ऊत आलेला आहेच. (किंवा आमच्याकडचीही दुष्ष्ष्ट हलकट लिबरल फेक मीडिया आजकाल अशा घटनांना अंमळ जास्तच प्रसिद्धी देते, म्हणा ना! खरे तर रूटीन म्हणून दडपून टाकल्या पाहिजेत असल्या बातम्या! कुत्रा माणसाला चावला तर इ.इ.) बिगरपांढरे बिगरख्रिस्ती म्हणून आम्हालाही थोडीफार भीती वाटतेच, म्हणून आम्हीही त्याबद्दल थोडीफार अशीच बोंब ठोकतो. बहुतांश बिगरलिबरल पांढऱ्या ख्रिस्त्यांना तशी भीती वाटत नाही (किंबहुना त्यांना काहीच वाटत नाही), म्हणून ते बोंबलत नाहीत. तसेच आहे हे.
तर सांगण्याचा मतलब, ज्याला ज्याचा त्रास जास्त होतो, त्याबद्दल तो बोंबलतो, नि ज्याचा त्रास होत नाही किंवा तुलनेने कमी होतो, त्याबद्दल बोंबलत नाही. हे सिलेक्टिव असणे हे साहजिक आहे. जावे त्याच्या वंशा...
+१
शिवाय, खडकीच्या शिंप्यालाही अशी भीती वाटत असेल. पण १५० रुपये शिलाईत ड्रेस शिवून देणाऱ्या शिंप्याची विधानं सकाळ किंवा कोणतंही वृत्तपत्र छापेल असं नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
बॊंबस्फोट झाल्यानंतर 'मला तर
बॊंबस्फोट झाल्यानंतर 'मला तर आता ट्रेनने प्रवास करण्याचीच भीती वाटते. जीवंत परत घरी येऊ की नाही अशी शंका येते' ही विधानं वाचलेली आहेत.
ती तशीही वाटतेच.
चढताना ट्रेन-फलाटामधल्या फटीत पडू, गर्दीच्या रेट्याने खाली पडू, झालंच तर ट्रेन फलाटावरच चढेल किंवा पेट घेईल किंवा कलंडेल आणि ह्यातून सुटलोच तर ब्रिजच खचेल, चेंगराचेंगरी होईल इत्यादी चिल्लर भिती असतातच. बॉम्ब तो (अभीभी) नया है वह.
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
>>ट्रेन फलाटावरच चढेल किंवा
>>ट्रेन फलाटावरच चढेल किंवा पेट घेईल किंवा कलंडेल
मनोबा भेटले होते का नुकतेच?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
बॊंबस्फोट नवीन आहेतच. मुद्दा
बॊंबस्फोट नवीन आहेतच. मुद्दा असा आहे की ती भीती व्यक्त केल्याबद्दल कोणी त्यावर टीका केलेली नव्हती.
किंवा, रादर...
...लोकलप्रवासात ही बाकीची इतकीसुद्धा 'विषे' असताना केवळ बाँबस्फोटाचेच विष सिलेक्टिवली दिसण्याबद्दलही कोणी टीका केलेली नव्हती.
असो चालायचेच.
हेच म्हणायचं होतं.
हेच म्हणायचं होतं.
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
Android open सोर्सवर चालणारा
Android open सोर्सवर चालणारा EDGE ब्राउजर विंडोज इनसाइडरवाल्यांना देत आहे.
(युट्युब चालवण्यातल्या अडचणी दूर)
?
हे काही कळले नाही. Edge browser आता Chromium based आहे. त्याचा अँड्रॉइड ओ एस पी शी काय संबंध?
एज विथ कटिंग
आचरटबाबा मुळात सॉफ्टवेअर इंजिनिअर नाहीत त्यामुळे तत्सम संदर्भ अचूकच, ताजे आणि खोल असतील असे नाही. त्यांच्या परीने ते अनेक गोष्टी स्वतःच समजून ट्रायल आणि एरर ने काहीतरी खटपटी(कौतुकास्पद) करीत असतात त्यामुळे जिस्ट समजून घ्यावी.
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
बरोबर. तत्सम संदर्भ मी तपासत
बरोबर. तत्सम संदर्भ मी तपासत नाही पण नेट-लेखांतले आहेत.
सध्याच्या आठवड्यातल्या या दोन बातम्या वाचून इथे लिहिलं. ( बातम्यांची लिंक टाकली नव्हती.)
मी विंडोज लुमिया फोन वापरतो,अजून चालतोय म्हणून. ( ओएस 8.1होती ती त्यांनी 10 अपग्रेड करून दिली.)IE11चा EDGE झाला. काही गोष्टी आणि अॅप्स चालत नाहीत कारण काय तर फोनसाठी दिलेली ओएस, त्यातले वर्शन अगदी तळागाळातले आहे. -Anniversary Udate 1607. त्याचे अपडेट्स ( Word आणि Excelचेही) दर महिन्याला येत असत ते सप्टेंबरपासून बंद केले. ( माझ्याकडे पीसी कधीच नव्हता आणि अजूनही नाही.) फोनातली छोटी रॅम ही लिमिटेशन आहे अन्यथा ओक्टोबर अपडेट 1809 सुद्धा मिळाली असती असा गोड गैरसमज.
तर हे सर्व वाचनातूनच कळलं.
विचित्र निर्णय
https://venturebeat.com/2018/12/21/indian-government-to-intercept-monito...
या निर्णयामुळे आउटसोर्सिंग धंद्यावर टाच येऊ शकते. पण ग्यानबाचे अर्थशास्त्र कोळून प्यायलेले सरकार या गोष्टीचा विचार करून निर्णय घेत नाही.
.
मोटाभाई बघतोय.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
डेव्ह एगर्स
ह्या पार्श्वभूमीवर रोजच्या खाजगीपणाच्या आपल्याकडूनच नियमितपणे होणाऱ्या भंगाविषयी डेव्ह एगर्स काय बोलला हे लक्षात घेण्यासारखं आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
कोण हे डेव्ह एगर्स ? त्यांना
कोण हे डेव्ह एगर्स ? त्यांना आदरणीय मोदीजींपेक्षा किंवा स्वामी विवेकानंदांपेक्षा (हे उगाच) जास्त समजतं का ?
मोदी_सरकार_फॉर_2029
+१
चांगला लेख आहे.
+२
मलाही आवडला.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अरेरे
आमचा संगणक उघडा पडणार! सरकार त्यांत डोकावून बघणार!
!
एक भयंकर अश्लील चित्र डोळ्यांसमोरून तरळून गेले.
फ्रँक रिच आणि ट्रम्प सरकार
फ्रँक रिच यांच्या मते ट्रम्प सरकारचा अंदाधुंद कारभार आता रिपब्लिकनांनाच फार काळ सहन होणार नाही.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
delete
Delete
चाईईईईना!
गेल्या वर्षीच्या तुलनेत, अमेरिकेची चीनसोबतच्या व्यापारातली तूट २०१८ साली १७ टक्क्यांनी वाढून $३२३ बिलियन एवढी झाली.
'वॉल स्ट्रीट जर्नल'मधल्या बातमीचं शीर्षक आणि दुवा:
China’s Annual Trade Surplus With U.S. Hits Record Despite Trump’s Tariff Offensive
इतिहासाची पुनरावृत्ती!
इतिहासाची पुनरावृत्ती!
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
म्हणजे कशी? एकोणिसाव्या
म्हणजे कशी? एकोणिसाव्या शतकातील घडामोडींचा संदर्भ आहे की तुलनेने अलीकडच्या घटनांचा संदर्भ आहे?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
एकोणिसाव्या शतकातल्या घटनांचा
एकोणिसाव्या शतकातल्या घटनांचा. ट्रेड डिफिसिट युद्ध करण्याइतपत महत्त्वाचं असू शकतं याचं बहुदा पहिलंच उदाहरण.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
ओके थँक्स.
ओके थँक्स.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं