दहशत

दहिहंडी, गणपती दिवस जवळ येउ लागतात. कुणा महापुरुषाची जयंती आलेली असते.
उरुस , जुलूसही मागे नसतातच.
त्याच्या काळजात धस्स होतं. तो थबकतो. बिचकतो. नजर चोरुन खालमानाने अंग चोरुन चालू लागतो.
माणूस हा सामाजिक प्राणी आहे. उत्सवप्रिय जंतू आहे. हे त्याच्या मनी बिंबवलं जाणार असतं.
डोक्यात शिरवलं जाणार असतं कानांचे पडदे फाडून. छाती हादरवणार्‍या डीजेच्या दणदणाटात ;
आणि भल्या मोठ्या हेडलाइट्सच्या प्रकाशात

तो घरी येतो. दारं खिडक्या गच्च बंद करतो. जमल्यास कानात कापसाचे बोळे. लाइट बंद करतो.
बिचकलेला सामाजिक प्राणी मग खोल घट्ट कुट्ट अंधारात एकटाच दबून झोपू पाहतो. जीव मुठित धरुन.
.
.
आवाज घुमत राहतो. "त्यांनी" तुझा एक कान फाडलाय, आम्हाला दुसरा फाडू दे. आम्ही तुझेच लोक आहोत!
हिंदूंना त्याचे कान फाडू देउन हिंदुत्व सिद्ध होणार असतं.
हिंदूंशिवाय इतरांनाही त्याला बडवू त्यांच सेक्युलरित्व सिद्ध होणार असतं.
.
.
कधी वाटतं... इथं गुन्हा करणं हा गुन्हाच नसतो.
गुन्ह्याबद्दल तक्रार करणं हा मात्र गुन्हा असतो!
गुन्हेगार मजेत असतात. नि तक्रारदार तुरुंगात!!

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

मनोबा पुन्हा अ‍ॅक्टीव्ह झाला हे बरे झाले.
इथे हा लेख टाकुन काय उपयोग मनोबा. दुसर्‍या ठीकाणी त्याचे खरे स्वागत झाले असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दरवर्षी हेच रडगाणं. बंद गल्लीत घर असेल तर कहर असतो.कोणतंतरी उत्साही मित्रमंडळ.रस्त्याला ट्राफिकचा त्रास नसतो.मांडव मोठा घालता येतो.आवाज नसला पाहिजे . बाकी चांगले कार्यक्रम असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आजच स्कॉट अ‍ॅडम्स यांच्या ब्लॉगवरती वाक्य वाचले होते - महापुरुषांची लिस्टही वेळोवेळी अपडेट करत राहीली पाहीजे.
.
अर्थात ती तशी करणारी लोकं, असतील तर कर्णकटू प्रदर्शन न करण्याइतकी प्रगल्भ असतील.
____
वरवर पहाता हायलाईटेड वाक्याच्या पहील्या अर्ध्या भागाचा कार्यकारणभाव दुसर्‍या भागाशी दिसत नाही. पण तो तसा आहे कारण कर्णकटूतेतून त्या त्या जुन्या महापुरुषाविषयी आंधळी श्रद्धा दिसते व दरवर्षी तिला कवटाळून रहाण्याचा अट्टाहास व ती तशी सर्वांवर लादायचा हट्ट. सायलेंटली कृतज्ञ राहून "मुव्ह ऑन" करता न येणे.
.
तेवढं जर करता आलं असतं तर नवे महापुरुष शोधण्यार ऊर्जा व श्रद्धा व्यय केली असती तर काय हवं होतं.
.
हे रँबलिंग होतय का? मी तर १२/१४ तासात कॉफी/चहा काहीच घेतलेले नाही, लेट अलोन मादक द्रव्य Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तरी बरे, आजकाल रात्री १० पुढे शांत होतात. तेही विसर्जनाच्या दिवशी पाळत नाहीत म्हणा अर्थात. पण हे साउंड सिस्टिमवर ब्यान आणला पाहिजे. रादर कोर्टाने ब्यान घातलेला असूनही कोणी हिंगलत नाही त्याला तो भाग वेगळा. अडाणचोटांना अक्कल कधी येणार ते एक गणपतीच जाणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

न्यायालये अॅक्शन घेत आहेत हे चांगले आहे. एकेकाळी रात्रभर आवाजही चालत होता आता दहा वाजता बंद ही सुधारणा आहे. पण फारच हळूहळू होतंय. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण समीकरण असे आहे.

db level x no of hours = constant

तास कमी झाले पण डीबी लेव्हल वाढली. एकूण कानावर आदळणारी ध्वनी ऊर्जा तितकीच राहिली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

घरातून सत्तरएक फुटांवरून लागलेल्या "डिजेचा आवाज वाढिव आयची शपथ हाय तुला" रेकॅार्ड केलं.मॅक्स डेसबल = ७८ .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0