ही बातमी समजली का - ११९

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं. अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००हून अधिक प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा / जाईल.

____

एकाकी लांडग्यांच्या (Lone Wolf Terrorist) हल्ल्यांविरुद्ध करायचे सात उपाय :
1. हे असले माथेफिरू एकाकी लांडगे कसे तयार होतात आणि हल्ले कसे प्लॅन करतात याची माहिती काढून तिचे संश्लेषण करणे . "कोण" हल्ला करणार आहे हे समजले तर उत्तमच, पण ते जवळजवळ अशक्य दिसते.
2. हल्ल्याआधी कोणत्या प्रकारचे छुपे संवाद घडत असतात याची माहिती काढून तिचे संश्लेषण करणे, व सर्व सुरक्षा यंत्रणांना ती पुरवत राहणे . यात माहिती काढणारे आणि तिचे संश्लेषण करणारे यांच्यात जवळचे सहकार्य अपेक्षित आहे .
3. मुसलमान समाजाशी जवळचे संबंध ठेऊन माहिती मिळवण्यास त्यांचे सहकार्य मिळवणे. तसेच त्या समाजातील प्रतिष्ठित लोकांतर्फे समाजात दहशतवादाविरुद्ध मत तयार करणे . दहशतवादी हे आपल्या समाजाची (निदान सुप्त का होईना ) वाहवा मिळविण्यासाठी असली कृत्ये करतात हे लक्षात ठेवणे.
4. कोणत्या, कशा प्रकारच्या घटनांनी (राजकीय? सामाजिक? वैयक्तिक ?) दहशतवादी हल्ले "ट्रिगर" होतात यावर संशोधन करणे .
5. दहशतवाद्यांना "स्फूर्ती ' कशापासून आणि कोणत्या लोकांपासून मिळते ते शोधून काढणे. अशी 'स्फूर्तिस्थाने " निकामी करणे आणि दहशतवादामागची "उदात्तता", त्याविरुद्ध प्रचार करून नष्ट करणे.
6. पालक , शाळा, विद्यापीठे येथे माहिती सत्रे घेत राहणे . अनेक दहशतवादी तरुण विदयार्थी असतात . त्यांची दहशतवादाकडे आकृष्ट होणार्याच्या व्यवच्छेदक लक्षणांची (अचानक अबोल होणे, फेसबुक वरच्या पोस्ट्स , शस्त्रास्त्रातील नवा इंटरेस्ट , मध्यपूर्वेची वारी, मित्रमंडळ बदलणे, मशिदीच्या वाऱ्या आणि धर्माची कर्मकांडे वाढणे इत्यादी इत्यादी ) माहिती सर्वांना पुरविणे.
7. कोणाच्या हातात बंदुका जाऊ शकतात यावर सक्त सामाजिक नियंत्रण . लष्करी हल्ल्याजोग्या ("assault") बंदुकांची खरेदी कोण करत आहे यावर नियंत्रण .

हे सर्व खालील लेखातून घेतले आहे :
Preventing Lone Wolf Terrorism: some CT Approaches Addressed
by Edwin Bakker and Beatrice de Graaf
http://www.terrorismanalysts.com/pt/index.php/pot/article/viewFile/preve...
आणि भारतात हल्ली मॉल, थिएटर यांची आपली आपली सुरक्षा असते असे दिसते . ते फारच उत्तम!

0
Your rating: None

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

स्त्रिया घटस्फोट का घेतात

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

http://www.telegraph.co.uk/bu

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

Politicians as CEOsआजकाल

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

Gurdip Singh case shows how

Gurdip Singh case shows how Sushma Swaraj has made foreign ministry accessible to everyone

हे सगळं खरं असेल तर प्रशंसनीय आहे.

-------

समाजवादाची सुमधुर फले : Venezuela food shortages leave zoo animals hungry

Some 50 animals have starved to death in the last six months at one of Venezuela's main zoos, according to a union leader, due to chronic food shortages that have plagued the crisis-stricken South American nation.

निकोलस माडुरो यांनी स्टॅलिन च्या ही पुढची पायरी गाठली असावी असं वाटतंय मला. स्टॅलिन च्या कालात रशियात प्राणिसंग्रहालये होती का ? काय परिस्थिती होती त्यांची ? १९९२ नंतर काय स्थिती झाली ??

--------

प्राण्यांचं काय घेऊन बसलात ....

Venezuela's new decree: Forced farm work for citizens - A new decree by Venezuela's government could make its citizens work on farms to tackle the country's severe food shortages.

---------

कामगारांचा दोन सप्टेंबरला देशव्यापी संप

Hate speech is acceptable only if it is against the rich people.

Also Muslims, rationalists, feminists, secularists and rationalists of all sorts.

(Member of the vast left-wing conspiracy!)
"A serious and good philosophical work could be written consisting entirely of jokes." -- Ludwig Wittgenstein

इस्लामचे कैवारी पैशास पासरी

इस्लामचे कैवारी पैशास पासरी आहेत कारण हिंदुधर्माबद्दल जरा बरे उद्गार काढले की कम्युनल कम्युनल म्हणून उच्चरवात भोकाड पसरणार्‍यांची सध्या चलती आहे.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

इस्लाम

इस्लाम हा जगातील सर्वात भिकारचोट धर्म आहे असे जर तुमचे म्हणणे असेल तर मी तुमच्याशी पूर्ण सहमत आहे.

(Member of the vast left-wing conspiracy!)
"A serious and good philosophical work could be written consisting entirely of jokes." -- Ludwig Wittgenstein

काय हे ?

काय हे ? Sad

Also Muslims, rationalists,

Also Muslims, rationalists, feminists, secularists and rationalists of all sorts.

आमचा मुद्दा हा आहे की - त्या विशिष्ठ धर्माचे मूळ नाव "शांतताप्रिय" असेच होते. नंतर ते इस्लाम वगैरे करण्यात आले. इतर धर्मांनी, भाषांनी तो "शांतता" त्या धर्मामधूनच उचलला / चोरला.

फेमिनिझम हा शब्दपण त्या विशिष्ठ शांतताप्रिय धर्मातूनच प्रसवला. त्या विशिष्ठ शांतताप्रिय धर्माचे प्रेषित लोक सगळे फेमिनिस्टच होते. त्या धर्माची स्थापनाच मुळी एका जेंडर न्युट्रल असलेल्या फेमिनिस्ट व्यक्तीने केलेली आहे.

खरंतर रॉबर्ट ऑमन ने रॅशनल वागणूकीची व्याख्या केली ती सुद्धा त्या विशिष्ठ शांतताप्रिय धर्मातल्या सर्वोच्च ग्रंथाततून उचलूनच. इथे ते संपूर्ण व्याख्यान वाचायला मिळेल. दुसर्‍या पानावर रॅशनल ची व्याख्या आहे.

त्या शांतताप्रिय धर्मातल्या सर्वोच्च ग्रंथातल्या पहिल्या वाक्यात १० शब्द आहेत व ते सर्व सेक्युलर या शब्दाचे विविध अर्थ आहेत.

उदा. इष्क पर जोर नही या चित्रपटातलं हे गाणं - "ये दिल दिवाना है, दिल तो दिवाना है, दीवाना दिल है ये, दिल दीवाना". तसे.

गब्बरसिंग सरकास्टिक चांगलं

गब्बरसिंग सरकास्टिक चांगलं होता येतं तुम्हाला. पण कधी हे शस्त्र भांडवलवादावरपण चालवा.

समजा भांडवलवादाला इस्लाम म्हंटलं काही वेळासाठी तर तुम्ही इस्लामी आतंकवादी ठराल.

गब्बरसिंग सरकास्टिक चांगलं

गब्बरसिंग सरकास्टिक चांगलं होता येतं तुम्हाला. पण कधी हे शस्त्र भांडवलवादावरपण चालवा.
समजा भांडवलवादाला इस्लाम म्हंटलं काही वेळासाठी तर तुम्ही इस्लामी आतंकवादी ठराल.

हारून शेख, भांडवलवादावरची टीका तरी वाचा किमान. म्हंजे तुम्हाला नवीन टार्गेट मिळेल हल्ले करायला. बंदूका व इतर आयुधं असतीलच तुमच्याकडे.

ही घ्या लिंक - https://en.wikipedia.org/wiki/Market_failure

मुख्य म्हंजे -

(१) भांडवलवादावर टीका करणार्‍या लोकांना ब्लासफेमी चे कायदे लावले जात नाहीत बर्का !!!

(२) भांडवलवादाची कार्टून्स पण बनवली जातात.

-१०

'बंदूका व इतर आयुधं असतीलच तुमच्याकडे.'
एव्हढी खात्री? वैयक्तिक टीका आवडली नाही. काढून टाकण्याजोगे वाक्य.
निषेध.

वैयक्तिक टीका आवडली

वैयक्तिक टीका आवडली नाही.

आपका मुद्दा सर-आखोंपर, राही.

वैयक्तिक टीका (अ‍ॅड होमिनिझम) हे अयोग्यच. पण मी माझा मुद्दा (की इस्लाम मधे रिफॉर्म्स ची गरज आहे) मांडला होता त्यानंतर सुद्धा "गब्बर तुम्हाला सारकॅस्टिक चांगले बोलता येते" अशी मल्लीनाथी करण्यात आली. तिला चोख प्रत्युत्तर दिले नाही तर एक प्रकारचा moral hazard निर्माण होतो. व तो रोखण्यासाठी मला कठोर वार करणं आवश्यक होतं.

दुर्योधन वधानंतर प्रतिशोध म्हणून अश्वत्थाम्याने पांडवांचे पाचहि पुत्र (ते निद्रित असताना) मारले व स्वतः व्यासांच्या आश्रमात जाऊन लपला. पांडव जाब विचारायला गेले तेव्हा अश्वत्थाम्याने पांडवांवर ब्र्ह्मास्त्र सोडले. त्यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी कृष्णाच्या सांगण्यावरून अर्जुनाने नारायणास्त्राचा अश्वत्थाम्यावर वार केला होता.

"गब्बर तुम्हाला सारकॅस्टिक

"गब्बर तुम्हाला सारकॅस्टिक चांगले बोलता येते" याच्यात इतकं काय वाईट होतं गब्बर. साधी सौम्य मल्लीनाथी (?) होती.

"गब्बर तुम्हाला सारकॅस्टिक

"गब्बर तुम्हाला सारकॅस्टिक चांगले बोलता येते" याच्यात इतकं काय वाईट होतं गब्बर. साधी सौम्य मल्लीनाथी (?) होती.

वाईट हे की - कोणीही विचारायच्या आधीच मी हे मान्य केलं होतं की भांडवलवादात दोष आहेत.

त्याउप्परही "भांडवलवादावर सारकॅझम चे शस्त्र चालवा" असं म्हणालातच ना ?

If you cannot avoid it ...

बाकी सगळं चालू द्या. पण फडतुसांना जगण्याचा हक्क नाही, असं म्हणणाऱ्याने moral hazard बद्दल चिंता व्यक्त करणं बघून करमणूक झाली. If you cannot avoid it, at least enjoy it.

कठोर वार करणं आवश्यक होतं.

ट्रंपोबांचे पक्के भक्त दिसता!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बाकी सगळं चालू द्या. पण

बाकी सगळं चालू द्या. पण फडतुसांना जगण्याचा हक्क नाही, असं म्हणणाऱ्याने moral hazard बद्दल चिंता व्यक्त करणं बघून करमणूक झाली. If you cannot avoid it, at least enjoy it.

मूळ मुद्द्यावर विचार व्यक्त न करता आपल्या सोयीच्या (व आपली पोलिटिकली करेक्ट प्रतिमा कुरवाळणार्‍या) मुद्द्यावर हिरीरीने मत व्यक्त करायचा निर्धार केलेला असला की हे असे प्रतिसाद प्रसवता येतात.

---

ट्रंपोबांचे पक्के भक्त दिसता!

तुमच्या सारखं बिन लादेन ची वकीली करण्यापेक्षा पुष्कळ बरं.

रियली?

गब्बर, बरं आहे ना सगळं?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मुद्द्याचं बोला की !!!

वादाचा मुख्य मुद्दा व त्यावर मी माझं मत मांडलेले आहे. मुद्दा इथे आहे. त्याबद्दल बोला.

बंदूका व इतर आयुधं असतीलच

बंदूका व इतर आयुधं असतीलच तुमच्याकडे --- इथेच तुमची कलुषित दृष्टी दिसते. मुसलमान हा बंदूका व इतर आयुधं बाळगून असणारच हे मत योग्य नाही. मी टार्गेट शोधत फिरत नाही. माझं कुटुंब आणि मी बऱ्यापैकी आनंदी आणि सुखी आहोत असं काही करत बसण्यासाठी. कुठलीही कुंठा नाही. इतकंच काय, कोणी फक्त गरीब आहे याकरता त्याला जगण्याचे हक्क नाकारणारे विचार ठेवणे मला फार असंस्कृत / अतिरेकी वाटते.
मुख्य म्हंजे -
१] इस्लामवर बदनामी म्हणावी इतकी टीका चाललीय सध्या आणि तिला अजिबात विरोध नाही. त्यातून चांगले बदल होतील असा विश्वास आहे.
२] मी, माझे अनेक मित्र आणि ओळखीतले अनेक आणि अनोळखी लोकही असतील त्यांना कार्टूनचं वावडं नाही. आणि टीका करायचा तो एक सभ्य आणि सकारात्मक कलाप्रकार आहे असे मत आहे.

इस्लामवर बदनामी म्हणावी इतकी टीका चाललीय सध्या

यातली किती टक्के टीका इस्लामच्या "आतून" -म्हणजे मुसलमानांकडून - होते आहे ? आणि ती करणाऱ्यांचे समाजात स्थान / स्वीकारार्हता काय आहे ? जितकी टीका अधिक तितके 'आपलेच म्हणणे खरे" असा defensive ग्रह अधिकाधिक पक्का होताना दिसतो ("सत्यशोधक" च्या हुसेन जमादारांनी गेल्या वर्षी यावरून आत्महत्या केली) हे खरे आहे काय ? टीकेमुळेच बांग्लादेशात अनेक ब्लॉग्गर्स मारले गेले आहेत.

(Member of the vast left-wing conspiracy!)
"A serious and good philosophical work could be written consisting entirely of jokes." -- Ludwig Wittgenstein

इस्लाम

इस्लाम हा जगातील सर्वात भिकारचोट धर्म आहे असे जर तुमचे म्हणणे असेल तर मी तुमच्याशी पूर्ण सहमत आहे.

(Member of the vast left-wing conspiracy!)
"A serious and good philosophical work could be written consisting entirely of jokes." -- Ludwig Wittgenstein

इस्लाम हा जगातील सर्वात

इस्लाम हा जगातील सर्वात भिकारचोट धर्म आहे असे जर तुमचे म्हणणे असेल तर ......

माझं खरंच असं म्हणणं नाही.

माझं हे म्हणणं आहे की - (१) इस्लाम, मुस्लिम्स, मौलाना, इस्लामिक परंपरा, इस्लामी शिकवण यांच्यात प्रचंड रिफॉर्म्स ची गरज आहे, (२) दुसरे म्हंजे पुरोगाम्यांनी - काहीही झाले तरी इस्लाम ला अ‍ॅबसॉल्व्ह करण्याचा चंग बांधल्याप्रमाणे वागूबोलू नये. (अर्थात ते असं म्हणतील की त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे.)

कुराण हे देवाने दिलेले पुस्तक असून ते जगाच्या अंतापर्यंत तसेच

इस्लाम, मुस्लिम्स, मौलाना, इस्लामिक परंपरा, इस्लामी शिकवण यांच्यात प्रचंड रिफॉर्म्स ची गरज आहे कुराण हे देवाने दिलेले पुस्तक असून ते जगाच्या अंतापर्यंत तसेच राहणार , त्यात बदल करायचा अधिकार मर्त्य मानवांना नाही , अशी श्रद्धा असलेला धर्म "सुधारणा" कशा मान्य करू शकतो ? एखादाच केमाल आतातुर्क केवळ बळाच्या जोरावर थोडीफार प्रगती करू शकतो.

(Member of the vast left-wing conspiracy!)
"A serious and good philosophical work could be written consisting entirely of jokes." -- Ludwig Wittgenstein

तिमूर कुराण

याबाबतीत तिमूर कुराण यांचे साहित्य दिशादर्शक ठरेल.

नेमके हेच म्हणायचे आहे. दोष

नेमके हेच म्हणायचे आहे. दोष इतरांतही आहेत पण त्यांना ठोकणारे बक्कळ लोकही आहेत. स्वयंघोषित पुरोगाम्यांपैकी जवळपास प्रत्येकजण इस्लामची मात्र वकिलीच करतो तेवढे सोडले तरी बास आहे.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

आमच्या एका मित्राने तर

आमच्या एका मित्राने तर "यांच्यावर कमी टीका होते आहे म्हणून यांच्यावर पण टीका करायला हवी असा गब्बर चा होरा आहे" असा चमत्कारिक (अविचारी) डायल्याग मारला होता.

----

दोष इतरांतही आहेत पण त्यांना ठोकणारे बक्कळ लोकही आहेत.

नेमके.

उदा. कॅपिटलिझम मधे सुद्धा दोष आहेत.

अ‍ॅबसॉल्व्ह करू नका ठीकच. पण

अ‍ॅबसॉल्व्ह करू नका ठीकच. पण म्हणून लगेच भिकारचोट वैगेरे ??? हे टोक नाही तर ते टोक अवघड आहे बाबा लोकं .

धर्म (व्हॉटेव्हर दॅट

धर्म (व्हॉटेव्हर दॅट एनकम्पासेस) सगळेच भिकारचोट* असतात. त्या धर्मात जन्मलेले** लोक त्या भिकारचोटपणाला किती चिकटून राहतात यावर त्या "धर्माचा भिकारचोटपणा" मोजला जातो.

*धर्म भिकारचोट असतात कारण ते मूलत: आउटडेटेड असतात.

**धर्माचे अनुयायी असं इथे म्हटलेलं नाही. कारण धर्मात न जन्मता त्या धर्माचे अनुयायी असणारे लोक फारच कमी/निग्लिजिबल असतील. त्यामुळे त्यांचा विचार करायची गरज नाही.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

Touche'

त्या धर्मात जन्मलेले** लोक त्या भिकारचोटपणाला किती चिकटून राहतात यावर त्या "धर्माचा भिकारचोटपणा" मोजला जातो. : Great!

(Member of the vast left-wing conspiracy!)
"A serious and good philosophical work could be written consisting entirely of jokes." -- Ludwig Wittgenstein

भिकारचोट हे जरा अति वाटलं.

भिकारचोट हे जरा अति वाटलं. भाषा. टाकाऊपण म्हणता आलं असतं भिकारचोटऐवजी. शिवाय धर्म (फक्त इस्लामच नाही तर इतरही / कोणताही ) पूर्ण टाकाऊ / भिकारचोट असतो हे काही मला पटत नाही. बऱ्यापैकी उपयोगी संस्था आहे ती. त्यातला टाकाऊ / भिकारचोट भाग त्याज्य समजावा आणि तो काढून टाकावा धर्मालाच टाकाऊ / भिकारचोट लेबल लावणं अतिरेकी आहे. दुसरं टोक आहे ते.

तुमच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो.

तो शब्द चुकीचा होता. तुमच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो. पण जगात जिथे जिथे मोठ्या कत्तली , बलात्कार, बॉम्ब स्फोट चालू आहेत त्यातल्या बऱ्याचशा जागी इस्लाम चा संबंध आहे (अल कायदा, आयसिस , बोको हराम, लष्कर-ए-जांघवी (पाकिस्तानात शियांना मारणारे) , अल शबाब, तालिबान वगैरे वगैरे !) हे मान्य व्हायला हरकत नसावी . सौदी अरॅबिया हे तर एक यशस्वी आयसिस आहे असेच म्हणावे लागते: सरकारच दर वर्षी शेकडो शिरच्छेद करते . इस्लाम मध्ये दर वर्षी हजारो मुलीही "ऑनर किलिंग " साठी मारल्या जात आहेत.
प्रोटेस्टंट अमेरिकेने जसे आपल्याच समाजातली एक कीड म्हणून "कू क्लक्स क्लॅन" या वंश-द्वेष्ट्या प्रोटेस्टंट संघटनेच्या हिंसक कारवायांचा पूर्ण बंदोबस्त केला, तसे आता मुस्लिम समाजाकडून व्हायला नको का?

(Member of the vast left-wing conspiracy!)
"A serious and good philosophical work could be written consisting entirely of jokes." -- Ludwig Wittgenstein

तुमच्या भावना दुखावल्या असतील

तुमच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो.

हम आहट भी भरते है तो हो जाते है बदनाम
वोह कत्ल तक करते है और चर्चा भी नही होता

आह तो भरेंगेही

हम आह तो भरेंगेही, मगर डेकोरम से.

(Member of the vast left-wing conspiracy!)
"A serious and good philosophical work could be written consisting entirely of jokes." -- Ludwig Wittgenstein

ठीक आहे. भिकारचोट ऐवजी

ठीक आहे. भिकारचोट ऐवजी यूजलेस (टाकाऊ) म्हणू.

टाकाऊ गोष्टी काढून टाकल्या तर धर्मात (विशेष) उरतं काय? सत्य बोलावे, इतरांना त्रास देऊ नये वगैरे ?

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

'सत्य बोलावे, इतरांना त्रास

'सत्य बोलावे, इतरांना त्रास देऊ नये वगैरे' तितक्या महत्वाच्या गोष्टी नाहीत असे म्हणायचे असेल तर माझा पास. शेवटी नीतीच्या कल्पना व्यक्तिसापेक्ष असणारच. माझ्या मते ह्या गोष्टीच धर्माला महत्वपूर्ण आणि उपयोगी संस्था ठरवतात.

अ‍ॅबसॉल्व्ह करू नका ठीकच. पण

अ‍ॅबसॉल्व्ह करू नका ठीकच. पण म्हणून लगेच भिकारचोट वैगेरे ??? हे टोक नाही तर ते टोक अवघड आहे बाबा लोकं .

वाटलंच मला !!!

कोण काय म्हणाले याचा विचार न करता उचलली बंदूक आणि सुरु गोळीबार.

हो ना तुम्ही तर स्पष्ट

हो ना तुम्ही तर स्पष्ट म्हणालात ना -

माझं खरंच असं म्हणणं नाही.

मग हारुन शेख तुम्हाला म्हटले असे का वाटले?

दोन कारणे (१) हारून शेख यांचा

दोन कारणे

(१) हारून शेख यांचा प्रतिसाद माझ्या प्रतिसादाला उत्तर म्हणून होता
(२) हारून शेख यांनी "अ‍ॅबसॉल्व्ह करू नका पण...." अशी सुरुवात केली.

ओके. थँक्स.

ओके. थँक्स.

तुम्हाला नाही म्हणालो मिलिंद

तुम्हाला नाही म्हणालो मिलिंद यांनाच म्हणतोय. उलट तुम्ही तर ती तिमूर कुरानची लिंक दिली त्याबद्दल धन्यवाद. सगळं वाचून काढतो सावकाश.

Venezuela's new decree:

Venezuela's new decree: Forced farm work for citizens - A new decree by Venezuela's government could make its citizens work on farms to tackle the country's severe food shortages.

हे तर ख्मेर रुज सारखे झाले. आता तरी लोकांचे डोळे उघडणार आहेत का?

हे तर ख्मेर रुज सारखे झाले.

हे तर ख्मेर रुज सारखे झाले. आता तरी लोकांचे डोळे उघडणार आहेत का?

समाजवाद्यांना हालहाल करून ठार मारले तरी ते आपले ग्रह सोडत नाहीत.

समाजवाद्यांना हालहाल करून ठार

समाजवाद्यांना हालहाल करून ठार मारले तरी ते आपले ग्रह सोडत नाहीत.

एकदम असहमत.

समाजवादी लोक तत्वासाठी जान वगैरे देत नाहीत ( जान वगैरे सोड रे, काहीच देत नाहीत ). त्यांना समाजखादी म्हणले पाहिजे. दुसर्‍यांचे जे मिळेल ते खातात. त्यांची भुक पण खुप मोठी असते. आमच्या काकांनी २ तुकडे फेकले तर त्यांच्या बद्दल कौतुकाचे लेख लिहीतात. कमीतकमी पैश्यासाठी भाटगीरी करायची हे समाजवाद्यांचे व्यवच्छेदक लक्षण आहे ( तशी बरीच लक्षणे आहेत, पण आत्ता ते नको ).

Gurdip Singh case shows how

Gurdip Singh case shows how Sushma Swaraj has made foreign ministry accessible to everyone

हे सगळं खरं असेल तर प्रशंसनीय आहे.

संकटात अडकलेले आपले नागरिक वगैरे परत आणणं समजू शकते.
पण गुन्हेगारास वाचवण्याचे काय प्रयोजन ?

संकटात अडकलेले आपले नागरिक

संकटात अडकलेले आपले नागरिक वगैरे परत आणणं समजू शकते.
पण गुन्हेगारास वाचवण्याचे काय प्रयोजन ?

भारत हे एक बडे राष्ट्र आहे. भारतीय नागरिकांच्या जीवनाचे सरासरी मूल्य अधिक आहे. इंडोनेशियन नागरिकांच्या सरासरी मूल्या पेक्षा जास्त.

जेव्हा भारत अतिगरीब राष्ट्र होते तेव्हा भारतीय नागरिकांना (उदा आखाती देशात) कस्पटासमान वागवले जात होते. आखाती देशात पोहोचल्यावर काही ठिकाणी त्यांचे पासपोर्ट्स काढून घेतले जात असत. आता परिस्थिती तितकी वाईट नाही. थोडीफार असेलही. पण पूर्वीइतकी वाईट नाही. भारताची बार्गेनिंग पॉवर जास्त आहे. व तिच्या जोरावर भारत सरकारने संकटात सापडलेल्या आपल्या नागरिकांना तिथून इकडे आणणे योग्यच आहे. गुन्हा भारतीय भूमिवर घडलेला नसेल तर भारतात त्याच्यावर (कदाचित) खटला दाखल करता येणार नाही.

त्याच १० गुन्हेगारांमधे एखादा पाकिस्तानी नागरिक असता तर सुषमा स्वराज यांनी - इंडोनेशियन सरकारने त्या पाकी नागरिकाला देहदंडाची शिक्षा द्यायलाच हवी असा आग्रह धरायला हवा होता. कारण पाकी नागरिकाचे जीवनमूल्य भारतीय नागरिकापेक्षा अत्यंत कमी आहे. व तसे मानले जायला हवे. पाकड्यांना आखातात अतिकस्पट वागणूक एवढ्यासाठीच दिली जाते. लेकिन अफसोस की त्या १० जणांत एकही पाकि नसावा.

प्रश्न असा होता गब्बु की

प्रश्न असा होता गब्बु की एखाद्या गुन्हेगारासाठी हे सर्व करण्याचे प्रयोजन काय?

उद्या इंडोनेशियानी "तुझ्या बडे राष्ट का बडा नागरीक ह्या लॉजिक नी" त्या गुन्हेगार भारतीयाला सोडला तर त्याचे काय करायचे?

प्रश्न असा होता गब्बु की

प्रश्न असा होता गब्बु की एखाद्या गुन्हेगारासाठी हे सर्व करण्याचे प्रयोजन काय?
उद्या इंडोनेशियानी "तुझ्या बडे राष्ट का बडा नागरीक ह्या लॉजिक नी" त्या गुन्हेगार भारतीयाला सोडला तर त्याचे काय करायचे?

प्रश्न ठीकठाक आहे.

गुन्हेगार तो "त्यांच्या" नजरेत आहे. भरतभूमीच्या दृष्टीने तो निर्दोष आहे.

शुक पंजरिं वा हरिण शिरावा पाशीं । ही फसगत झाली तैशी - असं होता कामा नये.

तो तिथे गुन्हेगार असेलही. पण तो एका (होऊ घातलेल्या) महासत्तेचा नागरिक आहे. त्याला उचित मान मिळायला हवा. समानता वगैरे बकवास ... नको.

त्याला सोडला व तो भारतात आला तर त्याचे काय करायचे ते भारतीय पोलिस ठरवतीलच की. त्याने भारतीय भूमिवर कोणताही गुन्हा केलेला असेल तर त्यास शिक्षा मिळेलच व गुन्हा केलेला नसेल तर त्यास त्याचे स्वातंत्र्य आहेच की.

म्हणुनच त्या इटलीच्या दोघांना

म्हणुनच त्या इटलीच्या दोघांना मानसन्मानानी परत इटलीला पाठवावे असे मला वाटायचे. ते दिसायला पण एकदम स्मार्ट राजबिंडे, मॅचो होते असे प्रथम दर्शनी बघितल्या बघितल्या मनात आल्याचे आठवते.

म्हणुनच त्या इटलीच्या दोघांना

म्हणुनच त्या इटलीच्या दोघांना मानसन्मानानी परत इटलीला पाठवावे असे मला वाटायचे. ते दिसायला पण एकदम स्मार्ट राजबिंडे, मॅचो होते असे प्रथम दर्शनी बघितल्या बघितल्या मनात आल्याचे आठवते.

अं ... हं.

इटली हे भारताच्या दृष्टीने छोटे, व कमी ताकद असलेले राष्ट्र आहे. त्यांना कमी सन्मान मिळायला हवा. भारतास जास्त.

ते दिसायला कसेही असोत ... त्यांना इथेच ठोकून काढायला हवे. देहदंड हे अत्युत्तम.

अनु, तुम्ही उगीचच समानतेच्या मृगजलात अडकत आहात.

समानता हा बकवास आहे.

इटली हे भारताच्या दृष्टीने

इटली हे भारताच्या दृष्टीने छोटे, व कमी ताकद असलेले राष्ट्र आहे.

हे कैच्या कै. पर कॅपिटा जीडीपी कीती इटली आणि भारताचा? विकासाच्या बाबतीतला क्र्मांक कीती?
आणि ईटली कन्यका भारताची १० वर्ष स्युडो पंतप्रधान होती हे विसरलास तू.

हे कैच्या कै. पर कॅपिटा

हे कैच्या कै. पर कॅपिटा जीडीपी कीती इटली आणि भारताचा? विकासाच्या बाबतीतला क्र्मांक कीती?

पर कॅपिटा जीडीपी हा सरासरी जीवनमूल्य ह्या ठिकाणी फारसा महत्वाचा क्रायटेरिया नाही. मिलिटरी ताकद हा जास्त महत्वाचा मुद्दा आहे.

टॅक्स चुकवणार्‍या भारतीय नागरिकास पोलिस पकडतात तेव्हा भारतीय पोलिसाचे पर कॅपिटा जीडीपी हे त्या टॅक्स चुकवणार्‍या माणसापेक्षा (अनेकदा) कमीच असते की. तरीही पोलिस त्याला पकडतात. कारण बळ जास्त असते म्हणून.

आता तू म्हणशील की - बळ असते पेक्षा "भारतात बव्हंशी प्रमाणावर कायद्याचे, नियमांचे राज्य असते म्हणून पोलिस त्याला पकडतात".

पण मग ते भारतातल्या भारतात. इंटरनॅशनल पोलिटिकल सिस्टिम ही कुठे कायद्याच्या आधारावर चालते ??

(इटली हे नेटो चे सदस्य राष्ट्र आहे.)

ईटली कन्यका भारताची १० वर्ष स्युडो पंतप्रधान होती

नाही, ती "खरी" (म्हणजे सत्ताधारी) पंतप्रधान होती. स्युडो पंतप्रधान मनमोहन सिंग होते!

(Member of the vast left-wing conspiracy!)
"A serious and good philosophical work could be written consisting entirely of jokes." -- Ludwig Wittgenstein

उद्या भारताचा जीडीपी

उद्या भारताचा जीडीपी अमेरिकेपेक्षा जास्त झाला तरीही पर क्यापिटा कमीच असणारे, तेव्हा ते एक असोच.

बाकी इटलीचे भारताच्या दृष्टीने फार कै महत्त्व आजिबात नाही. कोणे एके काळी असले तर असूदे. आज नक्कीच अत्यधिक नाही.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

ते दिसायला कसेही असोत ...

ते दिसायला कसेही असोत ... त्यांना इथेच ठोकून काढायला हवे. देहदंड हे अत्युत्तम.

मी समानतेच्या मृगजळात अजिबात अडकत नाहीये. दोन इटालियन सुंदर मुलींना तुरुंगात टाकावे असे तुला वाटले असते का? सर्व भारतीय पोलिस वगैरे गराड्यात पण ते उठुन दिसत होते ( नक्की कोणी कोणाला पकडलय तेच कळत नव्हते ). मी समानतेची मागणी करत नाहीचे, उलट त्यांना असमानतेनी वागवायला पाहिजे होते. त्यांना २-३ भारतीय जहिरातींचे काँट्रॅक्ट देऊन मग इटलीला पाठवायला पाहिजे होते.

अजीब स्टॉकहोम सिंड्रोम है बा.

अजीब स्टॉकहोम सिंड्रोम है बा.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

बॅटोबा - तुला सौंदर्याची काही

बॅटोबा - तुला सौंदर्याची काही कदरच नाही बघ.

म्हणजे तुमच्या राज्यात

म्हणजे तुमच्या राज्यात खूनबलात्कार वगैरे काहीही केले तरी चालेल, फक्त राजबिंडे असले पाहिजे. हो की नाही?

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

बरोबरीच्या माणसाचे खून चालतील

बरोबरीच्या माणसाचे खून चालतील कदाचित, बलात्कार नाही चालणार, चोरी नाही चालणार.

काय बॅट्या, सुंदर मुलींना बर्‍याच गोष्टी माफ असतात की नाही, उलट कवि शायर तर त्यांच्या साठी खून वगैरे करायला तयार असतात. पण हेच स्मार्ट, रुबाबदार पुरुषाबद्दल म्हणले तर तुला आवडत नाही.

गब्बु - एखाद्या अतिसुंदर मुलीवर खुनाचा खटला चालु आहे आणि तू ज्युरी असशील तर काय करशील?

डिसगस्टिंग

बरोबरीच्या माणसाचे खून चालतील कदाचित, बलात्कार नाही चालणार, चोरी नाही चालणार.

खून का चालतील? शिवाय एक गुन्हा चालतो तर बाकी गुन्ह्यांनी काय घोडं मारलंय?

काय बॅट्या, सुंदर मुलींना बर्‍याच गोष्टी माफ असतात की नाही,

तुमच्या राज्यात असतील. आमच्यात नसतं बॉ असलं काही. सुंदर मुलींना पाहून गोष्टी फ्री देणे वगैरे किस्से अमेरिकेतले ऐकलेत, भारतातले नै ऐकले कधी.

बाकी कवि-शायरांचे काय सांगताय? "शत्रूला रुधिराचे स्नान घालू" वगैरे कविता लिहिणार्‍यांना कुणा टग्याद्वारे एक धक्का देऊन बघा फक्त, फारतर "टग्याने मारला धक्का" अशी कविता बाहेर पडेल. अजून घंटा काही होणार नाही.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

सुंदर मुलींना पाहून गोष्टी

सुंदर मुलींना पाहून गोष्टी फ्री देणे वगैरे किस्से अमेरिकेतले ऐकलेत,

याईक्स!! नो लंच इज फ्री Sad डिसगस्टिंग फेव्हर्स!

किस्से अमेरिकेतले

किस्से हे kiss चे अनेकवचन मानायचे का?

(Member of the vast left-wing conspiracy!)
"A serious and good philosophical work could be written consisting entirely of jokes." -- Ludwig Wittgenstein

खून का चालतील? शिवाय एक

खून का चालतील? शिवाय एक गुन्हा चालतो तर बाकी गुन्ह्यांनी काय घोडं मारलंय?

"बरोबरीच्या माणसाचे" हे शब्द काढुन टाकलेस बॅटोबा.

तूच लिहीले होतेस की "तुमच्या राज्यात", एकदा माझेच राज्य आहे म्हणल्यावर मीच ठरवणार ना काय चालेल काय नाही.

हा हा हा, एकदा माझेच राज्य

हा हा हा, एकदा माझेच राज्य आहे म्हटले की काहीही करा. फक्त ते न्याय्य वगैरे असल्याच्या थाटात बोलू नका.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

एकदा माझेच राज्य आहे म्हटले

एकदा माझेच राज्य आहे म्हटले की काहीही करा. फक्त ते न्याय्य वगैरे असल्याच्या थाटात बोलू नका.

माझ्या राज्यात माझे न्याय्य. तुझ्या राज्यात तुझेच न्याय्य.

शुचि आणि मनोबांच्या राज्यात सर्वांचेच न्याय्य.

शुचि आणि मनोबांच्या राज्यात

शुचि आणि मनोबांच्या राज्यात सर्वांचेच न्याय्य.

असेच काही नाही आय अ‍ॅम पॅशनेट अबाऑऑट फ्यु थिंग्स. पण इतक्या कमी गोष्टी आहेत की, त्या कळून येत नाहीत. जाऊ देत.

खी खी खी

खी खी खी

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

गब्बु - एखाद्या अतिसुंदर

गब्बु - एखाद्या अतिसुंदर मुलीवर खुनाचा खटला चालु आहे आणि तू ज्युरी असशील तर काय करशील?

गुन्हा सिद्ध झाला तर शिक्षा देईनच पण ....

ती अतिसुंदर मुलगी जर श्रीमंत असेल तर मी तिच्याबाबतीत माझे निकष काही प्रमाणावर शिथील करेन.
पण जर ज्याचा खून झाला तो श्रीमंत असेल तर तिच्याबाबतीत माझे निकष काही प्रमाणावर अधिक कडक करेन.
दोघेही श्रीमंत असतील तर त्यातल्या ज्याने अधिक कर भरलेला आहे त्याला काही प्रमाणावर झुकते माप.

( माझे अल्गोरिथम क्लियर आहे - नियम लावताना श्रीमंतांना झुकतं माप मिळायलाच हवं. )

गुन्हा सिद्ध झाला तर शिक्षा

गुन्हा सिद्ध झाला तर शिक्षा देईनच पण ....

तूच ज्युरी असलास तर गुन्हा सिद्ध करायचा की नाही तुझ्याच हातात असेल ना. निर्दोष ठरवु शकतोस तू तिला ( तिने खून केला आहे की नाही हे इममटेरीअल आहे, ती अतिसुंदर आहे हे महत्वाचे ).

( माझे अल्गोरिथम क्लियर आहे - नियम लावताना श्रीमंतांना झुकतं माप मिळायलाच हवं. )

हाय राम, जिथे तिथे फक्त पैसा.

----------

पण बॅट्या तुला उत्तर मिळाले ना. गुन्हा केलाय की नाही ते महत्वाचे नाही, कोण आरोपी हे महत्वाचे.

हाय राम, जिथे तिथे फक्त

हाय राम, जिथे तिथे फक्त पैसा.

त्याप्रमाणे तुम्ही सौंदर्याचा निकष लावा म्हणजे किमान प्रामाणिक आहात हे तरी पटेल. (लोळून हसत)

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

Khizr Khan, and the moment

Khizr Khan, and the moment American Muslims have been waiting for
सुंदर बातमी आहे. अशी मुस्काटात हवीच होती ट्रंपला.

"But I'm also hearing a lot

"But I'm also hearing a lot of support for Khan and his standing up to Trump. And a lot of sadness that Muslims are still having to prove they are 'good Americans.'"

A lot of sadness that america still has to prove that it does not discriminate....असा प्रतिप्रश्न आला तर काय करणार ?

http://www.ibtimes.co.in/utta

http://www.ibtimes.co.in/uttarakhand-govt-begins-rs-25-crore-search-myth...

हाईट आहे ही!

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

यडपटांची कमतरता कुठल्याच

यडपटांची कमतरता कुठल्याच पक्षात नाही !!!

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

कसबा सांगाव मधे मुस्लिम

?

बरे मग?

खुनाचे आरोप कित्येकदा

खुनाचे आरोप कित्येकदा फॅारेन्सिक पुराव्यातून सिद्ध करता येतात आणि साक्षीदारांची गरज भासत नाही.प्राणी मारणे ,बलात्कार वगैरेत साक्षीदार पंचनाम्याअभावी खटला फकरच कमकुवत होतो.

Sushma Swaraj condoles death

Sushma Swaraj condoles death of Mahasweta Devi, but with wrong books

कसलं लास्टींइग इम्प्रेशन ? अशी कोणती कृति तुम्ही केलीत की जी त्या दोन पुस्तकांमधून मिळालेल्या इम्प्रेशन च्या आधारावर होती ??

----

No Chinese incursion in Uttarakhand, only transgression: Defence Minister Parrikar

(१) incursion वि. transgression : दोन्ही मधे काय फरक आहे ??
(२) भारतीय सैन्याकडून असं transgression कधी घडलंय का ? किमान चीन ने तसा आरोप (भारतावर) कधी केलेला आहे का ?? कन्फ्युजन (differing perceptions) दोन्ही बाजूला असेल तर आगळीक दोन्ही बाजूने होऊ शकते. मग दर वेळी त्त्यांच्याच बाजूने आगळीक होते व आपल्या बाजूने कधीच होत नाही असं आहे का ? असेल तर सरकार शेपुट घालत आहे असं म्हणावं का ??

“India-China border is not formally demarcated. There are areas where both sides have differing perceptions of LAC. Barhoti (Uttarakhand) is one such area. There was no incursion, just transgression which has been settled. There is a well defined mechanism to settle such transgressions,” Parrikar said in Lok Sabha

-------------

Every 4th person categorised as ‘beggar’ in India is Muslim

ही बातमी प्रकाशित करण्यामागचा हेतू काय आहे तेच मला समजत नैय्ये -

२५% हे प्रमाण अयोग्य आहे की योग्य ?
०% असते तर योग्य असतं का ?
१००% असते तर योग्य असतं का ?
की असं म्हणणार - आम्ही फक्त डेटा दिला (बातमी दिली) ... त्याच्यातून काय अर्थ काढायचा ते तुमचं तुम्ही ठरवा ? ( म्हंजे वाचकांनी, जनतेने, राजकारण्यांनी, मौलवींनी, मुस्लिम जनतेने ? )

Under the Bombay Prevention of Begging Act, 1959, anyone having no visible means of subsistence and found wandering about in a public space is deemed as a beggar. All those who solicit alms in a public place under any pretence including singing, dancing, fortune-telling or street performing are also deemed as beggars. The Act gives discretionary powers to the police to pick up anyone on suspicion that he is a beggar or a destitute with no means of fending for himself.

भारतीय सैन्याकडून असं transgression कधी घडलंय का ?

नेहरूंनी सैन्याच्या चौक्या फार पुढे - जवळ जवळ चीनच्या हद्दीत बांधायला घेतल्या होत्या. हे कुरापत काढल्यासारखे होईल आणि त्यातून भारतावर चीनचा हल्ला होईल , तेंव्हा हे करू नये अशा प्रकारचा ठराव भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (रणदिवे गट ) केला होता . तो देशद्रोही मानून कम्युनिस्ट पक्षाचा सर्व पॉलिटब्युरो- रणदिवेसह - नेहरूंनी महिनाभर तुरुंगात टाकला होता असे वाचल्याचे आठवते . (चू भू दे घे )

हे खरे असेल तर अतिरोचक आहे.

हे खरे असेल तर अतिरोचक आहे. भक्तांना वाचायला दिले पाहिजे.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

cut off their supplies / force their return to China

Thanks a lot ! Consider: "After May 1961 Chinese troops occupied Dehra Compass and established a post on the Chip Chap River.The Chinese, however, did not believe they were intruding upon Indian territory. In response the Indians launched a policy of creating outposts behind the Chinese troops so as to cut off their supplies and force their return to China.
There were eventually 60 such outposts, including 43 north of the McMahon Line."

As to the Namorugna's policy on constantly maligning Nehru with blatant lies, is it even worth considering?

(Member of the vast left-wing conspiracy!)
"A serious and good philosophical work could be written consisting entirely of jokes." -- Ludwig Wittgenstein

..

अनेक धन्यवाद.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

...

(१) incursion वि. transgression : दोन्ही मधे काय फरक आहे ??

Intent (vs. lack thereof)?

(२) भारतीय सैन्याकडून असं transgression कधी घडलंय का ? किमान चीन ने तसा आरोप (भारतावर) कधी केलेला आहे का ??

वनमयूरन्याय.

बोले तो, भारतीय सैन्याकडून चिनी (किंवा इतर कोणत्याही) हद्दीत जर असे ट्रान्सग्रेशन घडले, तर सामान्यत: त्याची बातमी (१) भारतीय वर्तमानपत्रांपर्यंत पोहोचण्याची, (२) त्यानंतर भारतीय वर्तमानपत्रांतून ती छापून येण्याची, (३) त्यानंतर ती तुम्ही वाचण्याची शक्यता किती? त्याची परिणती एखाद्या तितक्याच मोठ्या मारामारीत झाल्याखेरीज?

जंगलात जर मोर नाचला, आणि ते पाहायला जर तुम्ही जंगलात कडमडला नाहीत, तर मोर जंगलात नाचलाच नाही???

तर मोर जंगलात नाचलाच नाही???

If man is speaking to himself in a jungle and his wife is not there to listen to him, is he still speaking stupidly?
केवळ विनोद म्हणून! हलकेच घेणे!

(Member of the vast left-wing conspiracy!)
"A serious and good philosophical work could be written consisting entirely of jokes." -- Ludwig Wittgenstein

>>अशी कोणती कृति तुम्ही केलीत

>>अशी कोणती कृति तुम्ही केलीत की जी त्या दोन पुस्तकांमधून मिळालेल्या इम्प्रेशन च्या आधारावर होती ??

हाजार चुराशीर मां पुस्तकात चळवळीत कार्यरत असलेल्या तरुणांना "जमावाकडून ठार मारले जाण्याचा" उल्लेख आहे. ही मेथडॉलॉजी त्यांचा पक्ष आत्मसात करत आहे. हे लास्टिंग इंप्रेशन कदाचित महाश्वेता देवींच्या लेखनातून झाले असेल.
----------------------------------
>>All those who solicit alms in a public place under any pretence including singing, dancing, fortune-telling or street performing are also deemed as beggars.

बापरे !!! कै च्या कै व्याख्या आहे. डोंबारी सुद्धा भिकारी !!!! एक प्रकारे मोबदला आधी न ठरवता परफॉर्मन्स केला तर तो भिकारी अशी काहीतरी कल्पना दिसते. "द्या कायतरी समजून जे योग्य वाटेल ते !" असं म्हणणं म्हणजे भीक मागणं.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

सेन्सॉरचा तडाखा (क्रमशः)

आणखी एका चित्रपटाला सेन्सॉरचा तडाखा
'Ka Bodyscapes' refused certification

चित्रपटाचा ट्रेलर :

Ka Bodyscapes (2016) official Trailer from Jayan on Vimeo.

दिग्दर्शकाची मुलाखत

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पेंग्विन

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/penguines...

राणी बागेतल्या पेंग्विन बद्दल ही बातमी आहे. पेंग्विन मुंबईच्या तापमानाला जगू शकतात का ?

हँसनेके दिन भी मैंने रो के गुजारे
भोर भी आँसकी किरन ना लायी |

States to be ranked on

States to be ranked on health, edu parameters

Unleash the power of competition.

फक्त एवढंच करा की हे इन्स्टिट्युशनलाईझ करा. भविष्यात दुसरे सरकार आले तर त्यांना ही यंत्रणा बरखास्त करता येता कामा नये.

मुख्य आरोप कम समस्या तिन असणार आहेत -

(१) आमच्या राज्याची तुलना अमक्या अमक्या राज्याशी करणं चूक आहे कारण ..... ते आधीच विकसित आहेत... नाहीत वगैरे.
(२) रँकिंग मुळे राज्याराज्यांत भांडणं लागतात व म्हणून राष्ट्रीय एकात्मता राखण्यासाठी ही संकल्पना कॅन्सल करण्यात येत आहे,
(३) सर्वात महत्वाचे - चांगली रँक मिळाली की केंद्राकडून काय मिळणार ? आणि मुख्य म्हंजे वाईट रँक मिळाली की (ती सुधारण्यासाठी) काही मिळणार नसेल तर ते राज्य आणखी तळातगाळात जाणार - व हे अनफेअर आहे, अन्याय्य आहे वगैरे वगैरे वगैरे नेहमीचेच आरोप होणार. क्लासिक प्रॉब्लेम इन डेव्हलपमेंट - In so far as they under-perform (ranking declines) they will get the funds from central Govt. and in so far as they outperform (improve the ranking) they will not get funds from center. Why should they improve ?

ही बातमी शब्दशः वाचायची, का

ही बातमी शब्दशः वाचायची, का त्याचा काव्यात्मक अर्थ लावायचा, समजेना.
Abandoned Dutch prisons are now being used to house refugees

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.