Skip to main content

चित्पावन ब्राह्मण नेमके कोण आहेत?

चित्पावन ब्राह्मण हा समाज प्रामुख्याने महाराष्ट्रात पहायला मिळतो. मध्यप्रदेश ,गोवा व इतरत्रही हा समाज विखुरला आहे.जागतिकीकरणाच्या रेट्यात ,माहीती तंत्रज्ञानाच्या युगाच्या प्रारंभी ,परदेशात जाणार्या व स्थायिक होणार्यात चित्पावन आघाडीवर होते.
चित्पावनांची इतिहासातील नोंद ही खासकरुन शिवकाळानंतर पहावयास मिळते,त्याआधी चित्पावनांचा उल्लेख आढळत नाही.चित्पावनांचे महत्वाचे विशेष हे त्यांच्या रंगरुपात आहे.भारतात क्वचीत आढळनारा लख्ख गोरा रंग,घारे निळे वा पिंगट डोळे,अत्यंत धारदार नाक ,स्पष्ट शब्दोच्चार ही त्यांची रंगरुपाची वैशिष्ठे त्यांना ईतर भारतीयांपासून वेगळी करतात.चित्पावन मुळचे कुठचे यावर अनेक प्रवाद आहेत .काहीजण त्यांचा सबंध बेने इस्त्राईल समाजाशी जोडतात.चित्पावन समाजाविषयी काही प्रश्न उपस्थीत होतात ,जाणकारांनी प्रकाश टाकावा
* चितपावन जर भारतीय असतील तर उपखंडातल्या लोकांप्रमाणे त्यांची शरीरगुणवैशिष्ठे का नाहीत?, उदा. गव्हाळ,सावळा रंग ,काळे डोळे,चपटे नाक ईत्यादी
* शिवकाळ व त्याआधी चित्पावनांचा उल्लेख का सापडत नाही?
*जर ते युरोपातून भारतात स्थलांतरीत झाले असतील तर तो काळ कोणता असावा?
* जर ते स्थलांतरित होते तर इथल्या जातिव्यवस्थेत त्यांना सर्वोच्च स्थान कसे प्राप्त झाले असावे???
कृपया हा धागा इतरत्र हलवु नये ,या थ्रेडवरच चर्चा अपेक्षीत आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 18/03/2016 - 04:54

चित्पावन ब्राह्मण मुळात आफ्रिकेतून स्थलांतरित झालेल्या होमो सेपियन सेपियनांचे वंशज असावेत असं माझं खाजगी मत आहे. संदर्भ मागू नये, देणार नाही. कारण हे खासगी मत आहे.

बिटकॉइनजी बाळा Fri, 18/03/2016 - 10:17

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

होमो सेपिअन तर ठीकच, पण The Last Journals of David Livingstone, या पुस्तकात मध्य आफ्रिकेत Chit-apangwa गावाचे उल्लेख आहेत. मला वाटतं हे होमो सेपिअन इथलेच आहेत. अपभ्रंश चितपावन असा होऊ शकतो.

गब्बर सिंग Fri, 18/03/2016 - 05:41

इथल्या जातिव्यवस्थेत त्यांना सर्वोच्च स्थान कसे प्राप्त झाले असावे???

( वाचकहो/प्रतिसादकहो - आता प्लीज -- कोण श्रेष्ठ व कोण कनिष्ठ हे कसे आणि कोण ठरवणार ? २०१६ मधे इंटरनेट क्रांतिच्या युगात ह्या असल्या मध्ययुगीन संकल्पना किती काळ कुरवाळत बसणार ? - असले प्रश्न विचारून आपण विचारवंत आहोत असे भासवायचा यत्न करू नये. )

दाह Fri, 18/03/2016 - 09:43

In reply to by गब्बर सिंग

हा तेच

काय फरक पडतो ? कुठले का असेनात!! हे असलं जातीचं मूळ वगैरे शोधणे म्हणजे खरोखर निरर्थक आहे असं मला वाटतं . अर्थात चित्पावनांमधीलच काही (सरसकटीकरण नाही ) लोकांना ते काहीतरी स्पेशल , अनोखे आहेत आणि त्यांच्यात इतरांहून 'विशेष ' असे काही गुण आहेत असे भास अधून मधून होत असतात. आम्ही इतरांहून वेगळे असे सांगण्याचा अट्टाहास ही काहींच्यात दिसतो. पण जाऊ दे ना!!!

अनु राव Fri, 18/03/2016 - 09:53

कृपया हा धागा इतरत्र हलवु नये ,या थ्रेडवरच चर्चा अपेक्षीत आहे.

ह्यात थोडा राकुंचा भास झाला.

ऐसी संपादक मंडळी - तुम्ही राकुंना मिस नाही का हो करत? पुन्हा त्यांना आग्रहाचे निमंत्रण द्यायचे का?

साती Fri, 18/03/2016 - 10:27

१.लख्ख गोरा रंग, धारदार नाक, निळे पिंगट डोळे फक्त चित्पावनांतच आढळतात का?
कश्मिरींत नाही का?
पंजाब्यांत नाही का?
२. चित्पावनांना इथल्या जातीव्यवस्थेत सर्वोच्च स्थान आहे असं कुठे वाचलंत? कोण म्हणतं?
मी तरी यापूर्वी असं कुठेही ऐकलं नाही. उलट ओसरीत कोब्रांना जेवायला घालणारे देब्रा ऐकलेयत.
३. स्पष्ट शब्दोच्चार म्हणजे काय? केवळ संस्कृत आणि मराठी स्पष्ट बोलतात म्हणून का? त्या त्यांच्या सरावाच्या भाषा आहेत.
कुणालाही सरावाने जमू शकतात. हे चित्पावन लोकांचे वैशिष्ट्य असल्याचेही मी इथेच प्रथम वाचत्येय.
४.या माहितीचा नेमका उपयोग काय करणार आहात, की फक्त ज्ञानासाठी ज्ञान?

दाह Fri, 18/03/2016 - 10:23

काय फरक पडतो ? कुठले का असेनात!! हे असलं जातीचं मूळ वगैरे शोधणे म्हणजे खरोखर निरर्थक आहे असं मला वाटतं . अर्थात चित्पावनांमधीलच काही (सरसकटीकरण नाही ) लोकांना ते काहीतरी स्पेशल , अनोखे आहेत आणि त्यांच्यात इतरांहून 'विशेष ' असे काही गुण आहेत असे भास अधून मधून होत असतात. आम्ही इतरांहून वेगळे असे सांगण्याचा अट्टाहास ही काहींच्यात दिसतो. पण जाऊ दे ना!!! अजून बरीच कामे बाकी आहेत.

आणि प्रणव यांनी विचारल्याप्रमाणे , खरंच आपल्या देशात जातीचा इतका माज कसा निर्माण होत असावा ? म्हणजे मी सतत एका ब्राम्हण ग्रुपवर एक संदेश पाहतो "गर्वच नाही तर माज आहे ब्राम्हण असल्याचा , जय परशुराम!"
या फालतूगिरीची गरज काय ?

तिरशिंगराव Fri, 18/03/2016 - 10:28

थ्रेड - हा थर्ड ग्रेड या शब्दसमुहाचा शॉर्ट फॉर्म आहे का हो ?

- एक चित्पावन

बॅटमॅन Fri, 18/03/2016 - 12:32

शिवपूर्वकालीन चित्पावनांचा उल्लेख सापडत नाही?

मग त्या इस ९८२ च्या आसपासच्या दिवेआगर ताम्रपटावरची "घैसास", "देवल", "पटवर्धन" ही आडनावे कुणाची असतील बरे?

झालंच तर सह्याद्रीखंड नामक ग्रंथाबद्दल कधी ऐकले आहे काय?

अरविंद कोल्हटकर Sat, 19/03/2016 - 21:09

In reply to by बॅटमॅन

सह्याद्रिखंडामध्ये निश्चित कोठे चित्पावनांचा उल्लेख सापडतो असा काही संदर्भ कोणी दिल्यास मजजवळील सह्याद्रिखंडामध्ये शोधून त्याबद्दल येथे लिहू शकेन. माझ्याजवळील पुस्तकाला अनुक्रमणिका, इंडेक्स असे काही नसल्यामुळे ६०० पानांमधून काही शोधणे अवघड आहे. सह्याद्रिखंडातील रेणुकामाहात्म्यामध्ये सापडेल अशा अपेक्षेने मी त्याचे सर्व चाळीस अध्याय चाळले पण तेथे काही सापडले नाही. ते माहात्म्य परशुराम आणि सहस्रार्जुन ह्यांचे युद्ध आणि सहस्रार्जुन मारला जाणे येथे संपते.

बॅटमॅन Sat, 19/03/2016 - 22:58

In reply to by अरविंद कोल्हटकर

पाहून सांगतो. बाकी सह्याद्रिखंडाची पोथी जवळ बाळगल्यामुळे काही ब्राह्मणांना पेशव्यांनी शासन केल्याचे उल्लेख मध्ये काही रिसर्च पेपरमध्ये पाहिले होते. बहुधा रोझालिंड ओ हॅनलॉन यांच्या पेपरमध्ये असावेत.

बॅटमॅन Sun, 20/03/2016 - 23:14

In reply to by आदूबाळ

हे खूप नवीन उदाहरण झालं आबा. युरोपात हे पोप लोक्स कैकदा इन्देक्स लिबोरम प्रोहिबितोरम अर्थात ब्यान्ड पुस्तकांची सूची काढत, आणि त्यांच्या सर्व प्रती जप्त करून भरचौकात जाळत.

https://en.wikipedia.org/wiki/Index_Librorum_Prohibitorum

याची प्रथमावृत्ती १५५९ साली तर लाष्ट आवृत्ती १९४८ साली निघाली आणि १९६६ साली फॉर्मली रद्द करण्यात आली. शिवाय चर्चमध्ये अशी उदाहरणे इ.स. १७० सालापासून सापडतात असे त्याच लिंकेत दिलेय.

तेही एक सोडून सोडा. चीनमध्ये इसपू २१३ साली कन्फ्यूशिअन तत्त्वज्ञानाची सर्व पुस्तके जाळली गेली. म्हणजे अशी उदाहरणे किमान २२०० वर्षे इतकी जुनी आहेत.

http://www.thenagain.info/WebChron/China/BookBurn.html

अरविंद कोल्हटकर Sun, 20/03/2016 - 01:08

In reply to by बॅटमॅन

सह्याद्रिखंडाची मराठी वर्जनहि आहे असे समजते. ती १७२० च्या सुमारास निर्माण झाली. तिच्यामध्ये ब्राह्मण उपजातींबद्दल काही अनुदार लेखन असल्याने ती बहिष्कृत केली गेली असावी असा तर्क - अर्थात खरोखरीच तसे झाले असल्यास, मला निश्चित माहीत नाही.

राही Fri, 18/03/2016 - 12:47

कुठलाही अभिनिवेश अथवा कोणतेही किल्मिष न ठेवता पुरातत्त्व आणि मानववंश या शास्त्रांच्या दृष्टिकोणातून चांगली चर्चा होऊ शकेल; धाग्याचा हेतू एखाद्याला खोडसाळ भासला तरी.
इरावतीबाईंनी कोंकणस्थ ब्राह्मणांची शरीरमापे (डोक्याचा आकार वगैरे) ही कोळ्यांशी मिळतीजुळती आहेत आणि देशस्थांची महारांशी, असा निष्कर्ष काढला होता. पण आता पुरातत्त्वशास्त्रात इरावतीबाई आणि राजवाडे यांच्या काळाहून कितीतरी अधिक संशोधन झालेले असणार. कोंकणस्थांचे साम्य एक उंची वगळता कश्मीरींशी दिसते हे माझे मत. पंजाबी गोरे असतात पण डोळ्यांचा रंग निळा-घारा जास्त करून (कोंकणस्थांइतक्या प्रमाणात) नसतो. अपवाद कपूर खानदान, पण ते पेशावरचे, मुख्य पंजाबपासून आय्सोलेटेड असलेले. मजजवळ वंशपरंपरागत आलेली एका जुन्या लेखमालेची कात्रणे आहेत. पण इतक्या रद्दीत शोधाशोध करणे मुश्किल आणि कंटाळवाणे आहे.

बॅटमॅन Fri, 18/03/2016 - 12:55

देशस्थ, कोकणस्थ, मराठा आणि धनगर या महाराष्ट्रातील चार प्रमुख जातींच्या जेनेटिक्सबद्दल रोचक विवेचन असलेला हा पेपर पहावा असे सुचवतो.

http://genomebiology.biomedcentral.com/articles/10.1186/gb-2005-6-8-p10

तिथे दिलेला परिच्छेदः

Results

The generated genomic data was compared with putative parental populations- Central Asians, West Asians and Europeans using AMOVA, PC plot, and admixture estimates. Overall, disparate uniparental ancestries, and l.1% GST value for biparental markers among four studied caste populations linked well with their exchequer demographic histories. Marathi-speaking ancient Desasth-brahmin shows substantial admixture from Central Asian males but Paleolithic maternal component support their Scytho-Dravidian origin. Chitpavan-brahmin demonstrates younger maternal component and substantial paternal gene flow from West Asia, thus giving credence to their recent Irano-Scythian ancestry from Mediterranean or Turkey, which correlated well with European-looking features of this caste. This also explains their untraceable ethno-history before 1000 years, brahminization event and later amalgamation by Maratha. The widespread Palaeolithic mtDNA haplogroups in Maratha and Dhangar highlight their shared Proto-Asian ancestries. Maratha males harboured Anatolianderived J2 lineage corroborating the blending of farming communities. Dhangar heterogeneity is ascribable to predominantly South-Asian males and West-Eurasian females.

Conclusions

The genomic data-sets of this study provide ample genomic evidences of diverse origins of four ranked castes and synchronization of caste stratification with asymmetrical gene flows from Indo-European migration during Upper Paleolithic, Neolithic, and later dates. However, subsequent gene flows among these castes living in geographical proximity, have diminished significant genetic differentiation as indicated by AMOVA and structure.

धनगर जातीच्या उगमस्थानाबद्दलचे निरीक्षणही रोचक आहे.

राही Fri, 18/03/2016 - 13:28

In reply to by बॅटमॅन

होय, हे या संशोधनाची बातमी म्हणून वाचनात आले होते. पण मूळ संशोधन माहीत नव्हते.
अतिशय रोचक. धन्यवाद. जेनेटिक्समुळे कितीतरी कोडी सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बिटकॉइनजी बाळा Fri, 18/03/2016 - 13:54

In reply to by बॅटमॅन

+1.
ह्या लिंक बद्दल आभार. विलास सारंगांच्या साहित्यिक निबंधात त्यांनी अशा अभ्यासाची गरज प्रकर्षाने सांगितली होती.

ग्रेटथिंकर Fri, 18/03/2016 - 14:07

In reply to by बॅटमॅन

Marathi-speaking ancient Desasth-brahmin shows
substantial admixture from Central Asian males but
Paleolithic maternal component support their Scytho-
Dravidian origin. Chitpavan-brahmin demonstrates younger
maternal component and substantial paternal gene flow
from West Asia, thus giving credence to their recent Irano-
Scythian ancestry from Mediterranean or Turkey, which
correlated well with European-looking features of this caste.
This also explains their untraceable ethno-history before
1000 years, brahminization event and later amalgamation
by Maratha.

वरील माहीती जर खरी असेल तर चित्पावनांचा भारतातला वावर हजार वर्षापेक्षा जास्त नाही,मग दोन अडीज हजार वर्षापुर्वी घट्ट झालेल्या जातीव्यवस्थेत त्यांना उच्चस्थान(ब्राह्मन) कसे प्राप्त झाले असावे?

बॅटमॅन Fri, 18/03/2016 - 14:13

In reply to by ग्रेटथिंकर

वरील माहीती जर खरी असेल तर चित्पावनांचा भारतातला वावर हजार वर्षापेक्षा जास्त नाही,मग दोन अडीज हजार वर्षापुर्वी घट्ट झालेल्या जातीव्यवस्थेत त्यांना उच्चस्थान(ब्राह्मन) कसे प्राप्त झाले असावे?

जर बाहेरच्यांना इथल्या जातीव्यवस्थेत उच्च स्थान मिळाले तर याचा अर्थ ती व्यवस्था घट्टबिट्ट नव्हती असाच होईल हे उघड आहे. त्यामुळे घट्ट, जुलमी जातीव्यवस्थेच्या पाईकांना आता कोकणस्थ हे मूळचे इथलेच असे कबूल करणे भाग पडावे बहुधा.

अजूनेक उदाहरण म्हणजे राजपुतांचे. इराण व मध्य आशिया येथील अनेक टोळ्या (ज्यांना एकत्रितपणे 'सिथियन' म्हटले जाते) भारतात हळू हळू येत राहिल्या. त्यांना इथे सामावून घेतले गेले आणि क्षत्रियांचा दर्जाही दिला गेला.

राही Fri, 18/03/2016 - 14:54

In reply to by ग्रेटथिंकर

१)मला या उद्धृताबद्दल पश्चात विचाराने असे वाटले की असे आहे तर दिवेआगर येथल्या शके ९८२च्या ताम्रपटात घैसास पटवर्धन ही नावे इतक्या लवकर म्हणजे शा-शंभर वर्षांत कशी शिरली असावीत?
२)गोवा-कारवारचे काही शेणवी 'षडङ्गविद' पासून 'शेणवी' अशी व्युत्पत्ती मानतात.
३) दैवज्ञदेखील पंचांगकर्ते आणि षडङ्गविद् असत.
४)कोंकणस्थांना महाराष्ट्रात जातिव्यवस्थेतले तथाकथित उच्च स्थान अलीकडेच म्हणजे चारपाच शतकांपूर्वी मिळाले असावे. तत्पूर्वी पैठणादि धर्मक्षेत्रांचा पगडा असावा. मध्ययुगीन मराठी संतसाहित्यावरदेखील दक्खनच्या पठारी प्रदेशातील लेखकांचे वर्चस्व जाणवते किंवा त्यांची बहुसंख्या जाणवते.

बॅटमॅन Fri, 18/03/2016 - 15:05

In reply to by राही

कोंकणस्थांना महाराष्ट्रात जातिव्यवस्थेतले तथाकथित उच्च स्थान अलीकडेच म्हणजे चारपाच शतकांपूर्वी मिळाले असावे. तत्पूर्वी पैठणादि धर्मक्षेत्रांचा पगडा असावा. मध्ययुगीन मराठी संतसाहित्यावरदेखील दक्खनच्या पठारी प्रदेशातील लेखकांचे वर्चस्व जाणवते किंवा त्यांची बहुसंख्या जाणवते.

उच्च स्थान म्हणजे ब्राह्मण करून घेणे अशा अर्थी. बाकी पेशवाईनंतरच कोकणस्थांचे वर्चस्व वाढलेय हे उघड आहे.

प्रियदर्शिनी कर्वे Fri, 18/03/2016 - 23:33

In reply to by बॅटमॅन

या माहितीबद्दल अतिशय धन्यवाद. डॉ. इरावती कर्वे यांनी प्रथम शरीरशास्त्राचा मानववंशशास्त्राच्या अभ्यासासाठी उपयोग केला, तेव्हा जेनेटिक्सचे ज्ञान पुरेसे प्रगत नव्हते. पण आता जेनेटिक्सचा वापर करूनही भारतातील जातींवर संशोधन चालू आहे, इतकेच नाही तर त्यातून इरूआजीच्या निष्कर्षांची पुष्टी होते आहे, हे वाचून मला फार आनंद वाटला.

माझ्या आजीने केलेल्या अगदी प्राथमिक स्वरूपाच्या संशोधनातूनही तिने जातिव्यवस्थेच्या पारंपरिक स्पष्टीकरणाला छेद दिलेला होता. चार वर्ण आणि त्यांचे उपविभाग म्हणजे जाती, हा सर्वसाधारण समज आहे. पण तसे असेल, तर सर्व ब्राम्हणांचे एकमेकांशी असलेले नाते, एकाच परिसरातल्या ब्राम्हणांच्या इतर जातींशी असलेल्या नात्यापेक्षा जवळचे असायला हवे. पण एका भौगोलिक क्षेत्रात रहाणाऱ्या वेगवेगळ्या वर्णातल्या जाती या एकाच वर्णातल्या वेगवेगळ्या जातींपेक्षा जास्त जवळच्या नात्याने बांधलेल्या असाव्यात हा त्यांचा निष्कर्ष होता. ज्या आधारावर जाती आपल्या वर्णांचा माज बाळगतात, आणि वर्णशुध्दतेबद्दल आग्रही असतात, त्यालाच छेद देणारे त्यांचे संशोधन होते. हिंदू समाजाला त्यांनी वेगवेगऴ्या स्रोतांमधून आलेल्या चिंध्या मनाला येतील तशा एकत्र शिवून तयार होणाऱ्या गोधडीची उपमा दिलेली आहे.

कोकणस्थ ब्राम्हणांच्या जेनेटिक मुळासंबंधीचे दिलेल्या संशोधनातले वर्णन पहाता कदाचित खालील आख्यायिका कोकणस्थांच्या तुलनेने अलिकडे कोकणात येण्याचे आणि तरीही ब्राम्हण वर्णात स्थान मिळवण्याचे स्पष्टीकरण देईल.

कोकणाचा कारभार पुलयोमी राजाच्या मेव्हण्याकडे होता, आणि तेव्हा तिथे निबिड अरण्य आणि मासेमारी करून उपजीवीका करणारे कोळी याखेरीज काहीच नव्हते. या मेव्हण्याने तिथे यज्ञ करायचे ठरवले, आणि त्यासाठी त्याने ठिकठिकाणी यज्ञकामासाठी ब्राम्हण आल्यास त्यांना जमिनी इनाम मिळतील असे निरोप पाठवले. जवळच्या देशावरच्या ब्राम्हणांना कदाचित खडतर भौगोलिक परिस्थितीची कल्पना असल्यामुळे यामध्ये रस वाटला नसावा, पण दूर राजस्थानातल्या काही ब्राम्हणांनी हे आमंत्रण स्वीकारले.

या यज्ञाचे ठिकाण होते चितपोलन - म्हणजे आजचे चिपळूण. यज्ञानंतर इनाम मिळालेल्या जमिनींवर हे ब्राम्हण स्थायिक झाले, आणि त्यांचे नाव अपभ्रंशाने चितपावन पडले. याचा पावन चित्त असण्या नसण्याशी काहीच संबंध नाही. मात्र चितपावन ब्राम्हण हे मुख्यतः कोकणात शेतीवाडी करत होते, केवळ देवाधर्माची कामे नाही, ह्याचे स्पष्टीकरणही यातून मिऴू शकते.

रहाता राहिली गोष्ट जातीय वर्चस्वाची, तर हे मुख्यतः तत्कालीन राजकीय परिस्थितीवर अवलंबून असते. पेशवे स्वतः ज्या जातीचे होते, त्या जातीचे महत्व त्यांच्या राजवटीत वाढले. नंतरच्या काळातही हाच कल साधारणतः राहिलेला आहे. सत्ताधीशांच्या जातीचा समाजात वरचष्मा रहातो, हे आजही भारताच्या बहुतेक भागात दिसून येते.

पेशव्यांचे राज्य बुडाले, तेव्हा त्यांना कर्जे देऊन बसलेले त्यांचे जातभाई कफ्फलक झाले, आणि रिकाम्या हाती कोकणात परतले. पण इंग्रजी शिक्षणाची सोय झाल्याबरोबर त्याचा फायदा करून घेण्यातही हे लोक आघाडीवर होते. टिळक, आगरकर, (महर्षि) कर्वे, (रॅंग्लर) परांजपे हे सर्वजण दापोलीच्या गॅडने हायस्कूलचे विद्यार्थी होते. तेव्हा त्यांच्या कतृत्वाचे श्रेय त्यांच्या जातीपेक्षा शाळेतील शिक्षकांचे असू शकते!

राही Sat, 19/03/2016 - 00:16

In reply to by प्रियदर्शिनी कर्वे

'चित्पावन' या नावाचा चित्पावनांवरील लेखसंग्रह पुस्तकरूपात प्रसिद्ध झालेला आहे. त्यातल्या राजवाडे यांच्या लेखात या चितपोलनवर बराच उहापोह आहे. राजवाड्यांनी हाती कुठलीही ठोस साधने नसताना स्वपरिश्रमाने केलेली मांडणी आज अगदी विसंगत आणि प्रसंगी विनोदी वाटते. पण त्यांच्या परिश्रमाचे मोल मोठे आहे.
इरावतीबाईंचे बहुतेक सर्व लेखन आजची पिढीसुद्धा आवडीने वाचते यातच सर्व आले.
आपल्या प्रतिसादातल्या 'इरुआज्जी'च्या उल्लेखामुळे वातावरण अगदी घरगुती होऊन गेले. ममत्वाने भरलेले.

बॅटमॅन Sat, 19/03/2016 - 02:39

In reply to by प्रियदर्शिनी कर्वे

ही आख्यायिका रोचक आहे. पहिल्यांदाच ऐकली. त्याऐवजी कोकणकिनार्‍यावर लागलेले जहाज आणि त्यातले मेलेले १४ पुरुष आणि त्यांना परशुरामाने चितेवर पावन करून जिवंत केले ही आख्यायिका कैकदा ऐकलेली आहे.

अरविंद कोल्हटकर Sat, 19/03/2016 - 03:30

In reply to by प्रियदर्शिनी कर्वे

The New Brahmins - Five Maharashtrian Families by DD Karve.

वरील शीर्षकाचे पुस्तक दिनकर धोंडो कर्वे-संपादित University of California at Berkeley ह्यांच्या विद्यमाने १९६३ साली प्रकाशित करण्यात आले. कोल्हटकर-कर्वे-पटवर्धन-सरदेसाई-कातगडे अशा पाच कुटुंबातील व्यक्तींनी वेगवेगळ्या नव्या क्षेत्रामध्ये काय कर्तबगारी दाखविली असा त्या पुस्तकाचा विषय होता. American Anthropologist ह्या जर्नलमध्ये त्याचे आलेले परीक्षण आणि पुस्तकपरिचय येथे पाहता येईल.

इरावती कर्वे ह्यांनी जी.एस.घुर्ये ह्यांच्या मार्गदर्शनाने कोकणस्थांवर जे जेनेटिक्स-संबंधी संशोधन केले त्याची माझ्या मनातली आठवण. माझे वडील (जन्म १९१४) सातार्‍यात ज्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थी असतांना इरावतीबाईंनी तेथे येऊन संशोधनाचा भाग म्हणून विद्यार्थ्यांच्या डोक्याचा घेर अशा प्रकारची मापे घेतली होती. त्यामध्ये माझे वडीलहि होते अशी आठवण वडिलांनी मला सांगितली होती. ही गोष्ट १९२७-२८ ची असणार.

माहितगारमराठी Sat, 19/03/2016 - 12:08

In reply to by प्रियदर्शिनी कर्वे

प्रियदर्शिनी कर्वे यांनी दिलेली पुलयोमीची आख्यायिका इतर आख्यायिकांपेक्षा अधिक विश्वासार्ह वाटते पण तसे असेल तर चितपावन ब्राह्मण आडनावांमध्ये; एक्सक्लुजीवली राजस्थानी ब्राह्मणी आडनावांशी पुरेसे साम्य असलेली काही ना काही आडनावे आढळावयास हवीत शिवाय डिएनए सुद्धा जुळावयास हवीत.

माहितगारमराठी Sun, 20/03/2016 - 14:01

In reply to by प्रियदर्शिनी कर्वे

या यज्ञाचे ठिकाण होते चितपोलन

समुद्रकिनार्‍यालगतचा रेतीमय भागास पुळण (इंग्लिश: Beach) म्हणतात, तेव्हा चिपळूण मधिल पळूण हे पुळणचा अपभ्रंश असण्याची शक्यता असू शकते का ? महाराष्ट्रातील गावांच्या नावाच्या डाटाबेस मध्ये गणपतीपुळे , भंडारपुळे (रत्नागिरी) , पुळास (कुडाळ-सिंधुदुर्ग) हि कोकणातील गावे दिसतात. (अर्थात 'पुळ' हा उपसर्ग अथवा प्रत्ययघेऊन देशावर अगदी गडचिरोली पर्यंत ग्रामनामे आहेत हेही खरे)

मोल्सवर्थाची चिपोळणा, चिपुळणा, चिपोळा (p. 284) [ cipōḷaṇā, cipuḷaṇā, cipōḷā ] m A tribe of Bráhmans or an individual of it. Called also चित्तपावन & कोंकणस्थ. आणि A tribe of Bráhmans or an individual of it: called also कोंकणस्थ & चिपोळणा ह्या नोंदी कर्वेंनी मांडलेल्या थेअरीस अंशतः दुजोरा देतात.

पण

चिपळूण चे नाव आधी चितपोलन होते यास स्वतंत्र दुजोरा उपलब्ध नसल्यास तो केवळ कयास ठरतो शिवाय 'चितपोलन' मध्ये चित हा उपसर्ग कुठून आला हा प्रश्न शिल्लक राहतो खासकरुन 'चित' हा उपसर्ग असलेली चिता, चितळ प्राणिवाचक शब्दांमुळे उर्वरीत महाराष्ट्रात बरीच गावे दिसतात पण कोकणात 'चित' हा उपसर्ग असलेले एकही गाव डाटाबेस मध्ये दिसले नाही. त्यामुळे 'चित' या शब्दाचा उलगडा अद्यापी बाकी रहात असावा किंवा कसे

धर्मराजमुटके Fri, 18/03/2016 - 13:33

मला वाटते ते कोणीही पेश्श्ल नसून / ३.५% वाले नसून आपल्यासारखीच हाडामासांची माणसे आहेत एवढे कळले तरी पुरेसे असावे सध्याच्या युगात.

ऋषिकेश Fri, 18/03/2016 - 13:38

In reply to by धर्मराजमुटके

माझ्यातर्फे एक मार्मिक.. अर्थात तरी जेनेटिक्समुळे सामाजिक शास्त्रांच्यादृष्टीने बरेच माहितीचे दरवाजे उघडणार आहेत.
एखादी गोष्ट माहित असणे/मान्य असणे आणि त्याची अस्मिता असणे यात फरक आहे

गब्बर सिंग Sun, 20/03/2016 - 09:14

In reply to by धर्मराजमुटके

मला वाटते ते कोणीही पेश्श्ल नसून / ३.५% वाले नसून आपल्यासारखीच हाडामासांची माणसे आहेत एवढे कळले तरी पुरेसे असावे सध्याच्या युगात.

अवांतर : मांजरं किंवा चिमण्या यांच्या तुलनेत मानव हा पेश्शल नसून त्यांच्यासारखाच हाडामासाचा प्राणी आहे.

चिमणराव Fri, 18/03/2016 - 13:57

वैज्ञानिक शोध कसोट्या फारच जबरी असतात.काहीतरी भलतेच सिद्ध होऊन पंचाइत करून घ्याल.
हलवू नका हलवू नका हलवू नका
पुढ्ढे धोक्का आहे आहे आहे.

अनु राव Fri, 18/03/2016 - 14:12

In reply to by चिमणराव

वैज्ञानिक शोध कसोट्या फारच जबरी असतात.काहीतरी भलतेच सिद्ध होऊन पंचाइत करून घ्याल.
हलवू नका हलवू नका हलवू नका
पुढ्ढे धोक्का आहे आहे आहे.

मोठ्ठा धोका आहे.

ह्या आयडी चा उद्देश पण हा धागा काढण्यामागे चांगला नाही. जेंव्हा मुळातला उद्देशच चांगला नसतो तेंव्हा कोणी कीतीही प्रयत्न केले तरी फल चांगले निघणार नाही.

ऐसी संमं अश्या धाग्यावर खरी चर्चा व्हावी असे प्रामाणीक पणे वाटते ह्यात शंका नाही, पण उद्देश चांगला नसल्यामुळे धागा उडवावा अशी माझी विनंती.

तसेही सर्वांची मते ह्या बाबतीत ही ठाम आहेत, ती चर्चे ने बदलणार नाहीत.

ग्रेटथिंकर Fri, 18/03/2016 - 14:36

In reply to by अनु राव

ह्या आयडी चा उद्देश पण हा धागा काढण्यामागे चांगला
नाही. जेंव्हा मुळातला उद्देशच चांगला नसतो तेंव्हा
कोणी कीतीही प्रयत्न केले तरी फल चांगले निघणार
नाही.>>>>>>>>> नाही हो ,उद्देश वाईट नाही ,माझे अनेक मित्र कोब्रा आहेत.ज्यांच्याकडून अनेक थेअरीज ऐकायला मिळातात,काहीजणांना अमेरीकेत ' तुम्ही स्पॅनिश आहात का ? असेही प्रश्न विचारले गेले.
बहुतांश ठीकाणी परशूरामाने समुद्र किनारी वाहत आलेल्या मृत व्यक्तींना जिवंत केले वगैरे भुक्कड थेअरीज वाचायला मिळतात .पण शास्त्रीय माहीती कुणीच देत नाही,निदान इथे तरी माहीती मिळेल म्हणून हा प्रपंच.

अनुप ढेरे Fri, 18/03/2016 - 15:01

In reply to by ग्रेटथिंकर

परशूरामाने समुद्र किनारी वाहत आलेल्या मृत व्यक्तींना जिवंत केले वगैरे भुक्कड थेअरीज वाचायला मिळतात .

त्या कथा खर्‍या आहेत असं फार लोक मानत असतील असं वाटत नाही. पण मायथॉलॉजी म्हणून भुक्कड नसून रोचक जरून असतात. परशुरामाची ष्टूरी एका ज्यू ष्टुरीशी जुळते म्हणे.

ऋषिकेश Fri, 18/03/2016 - 15:08

In reply to by अनुप ढेरे

+१ लोककथांचा सामाजिक शास्त्रांमध्ये एक ऐतिहासिक पुरावा म्हणून किती उपयोग होतो माहित नाही पण सत्यापर्यंत एक महत्त्वाचे साधन म्हणून त्याचा अनेकदा उपयोग दिसतो. रा.चिं. ढेर्‍यांच्या पुस्तकांमध्ये याचा छान उपयोग केलेला दिसतो

बॅट्या या साधनाच्या उपयुक्ततेवर अधिक प्रकाश टाकू शकेल

बाळ सप्रे Fri, 18/03/2016 - 15:56

In reply to by ग्रेटथिंकर

माझे अनेक मित्र कोब्रा आहेत.ज्यांच्याकडून अनेक थेअरीज ऐकायला मिळातात

फारच चतुर मित्र दिसतायत तुमचे.. त्यांचा मस्त टाइमपास झाला असेल तुम्हाला क्न्फ्युज करून.. आता इथे सगळ्यांचा टाइमपास होइल.. पण तुमचं कन्फ्युजन दूर होइल असं दिसत नाही..

ह.घ्या.

अनु राव Fri, 18/03/2016 - 14:44

In reply to by अनु राव

पुढे मोठी होणारी आग आधीच छोटी असताना विझवा म्हणले तर "भडकाऊ"

भल्याचा जमानाच नाहीये हे खरे.

अनु राव Fri, 18/03/2016 - 14:45

In reply to by अनु राव

पुढे मोठी होणारी आग आधीच छोटी असताना विझवा म्हणले तर "भडकाऊ"

भल्याचा जमानाच नाहीये हे खरे.

चिंतातुर जंतू Fri, 18/03/2016 - 14:03

>> जर ते स्थलांतरित होते तर इथल्या जातिव्यवस्थेत त्यांना सर्वोच्च स्थान कसे प्राप्त झाले असावे???

स्थलांतरितांना जातिव्यवस्थेत उच्च स्थानावर सामावून घेतलं जाण्याची अनेक कारणं आहेत. (त्यातली बरीचशी सत्तास्थानांच्या जवळीकीशी संबंधित असावीत.) शिवाय, मूलनिवासींना जातिव्यवस्थेत नीच स्थान असण्याचीही अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळे चित्पावन नक्की कोण होते ह्याचा ह्या प्रश्नाशी फारसा संबंध नसावा.

साती Fri, 18/03/2016 - 14:39

In reply to by अनु राव

कारण धाग्यात किंवा प्रतिसादात कुणीही तुमची जात कोणती हे विचारलेले नाही.
किंवा तुम्ही 'चित्पावन' आहात किंवा नाही हे ही विचारलेले नाही.

बाकी आम्ही आमचे चित्त स्वतःच पावन करून घेतले आहे.
;)

अनु राव Fri, 18/03/2016 - 14:43

In reply to by साती

कोण कसे प्रतिसाद देते आहे त्या वरुन कळतेच, म्हणुन जनगणना म्हणले.

माझे पण चित्त सदाचेच निर्मळ असल्यामुळे आपल्या दोघींचा काही प्रश्न नाही.

अनु राव Fri, 18/03/2016 - 15:18

चार प्रश्ने चार उत्तरे

* चितपावन जर भारतीय असतील तर उपखंडातल्या लोकांप्रमाणे त्यांची शरीरगुणवैशिष्ठे का नाहीत?, उदा. गव्हाळ,सावळा रंग ,काळे डोळे,चपटे नाक ईत्यादी

भारतीय नाहीतच, त्यामुळे भारतीयांसारखे कसे दिसतील? कपुर, खन्ना वगैरे लोक पण ग्रीक डीसेंट ची आहेत, ती भारतीयांसारखी कशी दिसतील? काश्मीरी पण बाहेरचेच.

* शिवकाळ व त्याआधी चित्पावनांचा उल्लेख का सापडत नाही?

सापडतो असे कोणी तरी वर लिहीले आहे, पण काय फरक पडतो?

*जर ते युरोपातून भारतात स्थलांतरीत झाले असतील तर तो काळ कोणता असावा?

कोणता का असेना? काय फरक पडतो?

* जर ते स्थलांतरित होते तर इथल्या जातिव्यवस्थेत त्यांना सर्वोच्च स्थान कसे प्राप्त झाले असावे???

पूर्वी मेरीट वर स्थाने मिळत असावीत.

बॅटमॅन Fri, 18/03/2016 - 15:25

In reply to by अनु राव

भारतीय नाहीतच, त्यामुळे भारतीयांसारखे कसे दिसतील? कपुर, खन्ना वगैरे लोक पण ग्रीक डीसेंट ची आहेत, ती भारतीयांसारखी कशी दिसतील? काश्मीरी पण बाहेरचेच.

'काय फरक पडतो' हा सनातन प्रश्न बाजूस ठेवला तर हे विधान चूक आहे हे नक्की. गोरा रंग, घारे डोळे, पिंगट केस, इ. वैशिष्ट्ये 'भारतीय' नाहीत म्हणजे नक्की काय? अशाप्रकारे दिसणारे लोक भारतात बहुसंख्येने नाहीत इतकाच याचा अर्थ आहे. त्याकरिता ग्रीसपर्यंत जायची गरज नाही. पठाण, इराणी वगैरे लोकांकडे पाहिले तर याचे उत्तर सहज मिळून जाईल. ग्रीक्स खूप दूरची गोष्ट. त्यांचेही काही वंशज भारतात नक्कीच असावेत, परंतु अत्यल्पसंख्य. निव्वळ बघून तसा फरक करणे (ग्रीक विरुद्ध पठाण/इराणी) अवघड आहे इफ नॉट अशक्य.

नितिन थत्ते Sat, 19/03/2016 - 18:19

In reply to by बॅटमॅन

डोळे घारे असले तरी केस मात्र ब्लॉण्ड रंगाचे नसून काळे असतात. त्यामुळे इराणी/इराकी हे पारडे थोडे जड ठरते.

तेजा Sun, 20/03/2016 - 21:10

In reply to by नितिन थत्ते

महात्मा फुले चित्पावनांना इराणीच संबोधतात. इराणी आर्य ब्राह्मण असा त्यांचा उल्लेख करतात.

'न'वी बाजू Sun, 20/03/2016 - 21:27

In reply to by तेजा

महात्मा फुले (आपल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यास अनुसरून) चित्पावनांस काय वाटेल ते संबोधोत. त्यांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आदरच आहे, परंतु म्हणून ते संबोधन वस्तुस्थितीचे द्योतक म्हणून आपोआप ग्राह्य ठरावे काय?

(उलटन्यायाने, चित्पावन महात्मा फुल्यांस जे काही संबोधत असावेत, त्यांचा जो काही उल्लेख करत असावेत, तोदेखील आपोआप ग्राह्य मानता यावा काय?)

तेजा Sun, 20/03/2016 - 21:32

In reply to by 'न'वी बाजू

चर्चा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची नाहीए. चित्पावन नेमके कोठले यावर आहे. थत्ते यांचे विधान महात्मा फुले यांच्या विधानाशी जुळणारे आहे, म्हणून येथे नमूद केले. त्यावर आपण ज्या त्वेषाने रिअ‍ॅक्ट झाला आहात, त्यावरून आपला फुल्यांबद्दलचा पूर्वग्रहच दिसून येतो.

'न'वी बाजू Sun, 20/03/2016 - 21:43

In reply to by तेजा

थत्त्यांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्यदेखील मान्यच आहे. परंतु म्हणून त्यांचीदेखील प्रत्येक बात आम्ही आपोआप ग्राह्य नाहीच धरत.

(हो की नाही हो थत्तेचाचा?)

तेजा Sun, 20/03/2016 - 21:47

In reply to by 'न'वी बाजू

तुमचा युक्तिवादच चूक आहे. फुल्यांचा, माझा अथवा थत्त्यांचा मुद्दा तुम्ही ग्राह्य धरा, असे मी माझ्या प्रतिसादात कोठेच म्हटलेले नाही.

'न'वी बाजू Sun, 20/03/2016 - 22:14

In reply to by नितिन थत्ते

('भडकाऊ' श्रेणी अर्थातच अधिक आवडली असती, परंतु) प्रांजळपणे जी श्रेणी दिलीत, तीच गोड मानून घेत आहे.

सबब, 'मार्मिक' ही सही! :)

गब्बर सिंग Sun, 20/03/2016 - 22:20

In reply to by तेजा

त्यावरून आपला फुल्यांबद्दलचा पूर्वग्रहच दिसून येतो.

फुले यांना चित्पावनांबद्दल पूर्वग्रह नव्हता असं सूचित करताय ? पूर्वग्रह नव्हता तर फुले यांनी कोणत्या आधारावर चित्पावनांना इराणी (आर्य ब्राह्मण) संबोधले ?

( अवांतर : मी चित्पावन नाही. )

तेजा Sun, 20/03/2016 - 22:29

In reply to by गब्बर सिंग

मी काहीही सूचित करीत नाहीए. तुम्ही फुल्यांची एक ओळही वाचलेली नाही, तरीही त्यांच्या बद्दल ठाम विधान करीत आहात.
फुल्यांनी ब्राह्मणांत चित्पावन देशस्थ वगैरे असा भेद केलेला नाही. सर्वांना ते ब्राह्मण या एकाच श्रेणीत घालतात.

गब्बर सिंग Sun, 20/03/2016 - 22:41

In reply to by तेजा

तुम्ही फुल्यांची एक ओळही वाचलेली नाही, तरीही त्यांच्या बद्दल ठाम विधान करीत आहात.

नाय नाय. मी विधान करत नैय्ये. मी नेमके उलटे करतोय. मी प्रश्न विचारतोय.

-

फुल्यांनी ब्राह्मणांत चित्पावन देशस्थ वगैरे असा भेद केलेला नाही. सर्वांना ते ब्राह्मण या एकाच श्रेणीत घालतात.

मग तुमचे पहिले विधान - महात्मा फुले चित्पावनांना इराणीच संबोधतात. इराणी आर्य ब्राह्मण असा त्यांचा उल्लेख करतात. - फुले यांना मिसरिप्रेझेंट करत नाही का ?

'न'वी बाजू Sun, 20/03/2016 - 22:54

In reply to by गब्बर सिंग

फुले यांना चित्पावनांबद्दल पूर्वग्रह नव्हता असं सूचित करताय ?

श्री. फुले यांस चित्पावनांबद्दल काही पूर्वग्रह असल्यास तो श्री. फुल्यांचा मस्तकशूळ. मला श्री. फुले यांबद्दल काही पूर्वग्रह आहे असे कोणास वाटत असल्यास तो तसे वाटणाऱ्याचा मस्तकशूळ.

सांगण्याचा मतलब, श्री. फुले यांनी (किंवा फॉर द्याट म्याटर अन्य कोणीही) काही विधान केले, तर ते 'त्यांचे एक मत' (जे असण्याचा त्यांचा अधिकार अर्थातच मान्य आहे) याहून अधिक काही मूल्य देऊन (केवळ ते म्हणतात म्हणून) फेस व्ह्याल्यूवर आपोआप ग्राह्य धरता यावे काय? इतकाच सवाल आहे.

(महात्मा गांधींबद्दल पूर्ण आदर बाळगूनसुद्धा, वैद्यकशास्त्राच्या संदर्भात केवळ वैयक्तिक विश्वासाच्या आधारावर त्यांनी अत्यंत आत्मविश्वासासहित केलेलीच नव्हे तर लेखरूपात प्रकाशित केलेली आणि आजच्याच काय, परंतु तत्कालीनसुद्धा ज्ञात वैद्यकीय शास्त्रानुसार धडधडीत चुकीची विधाने उद्धृत करता येतील. परंतु ती केवळ महात्मा गांधींनी केली, म्हणून त्यांस काही वजन प्राप्त होऊ नये.)

(अवांतर : मी चित्पावन नाही.)

(अतिअवांतर: माझ्याही ज्ञात पूर्वजांत कोणीही चित्पावन नाही. सबब, या मारामारीत - बोले तो, ही मारामारी असेलच तर - माझाही वैयक्तिक कुत्रा नाही.)

इत्यलम्|

बॅटमॅन Mon, 21/03/2016 - 17:00

In reply to by नितिन थत्ते

ग्रीक लोकांचे केसही बहुतांशी काळेच असतात. अकिलीसचे केस सोनेरी असणे हे अनयूज्वल होते असे वाचल्याची पुसट अआतह्वण आहे.

राही Fri, 18/03/2016 - 18:02

या धाग्याचे तारू भरकटून भलत्याच किनार्‍याला लागले नाही, उलट शिडात वारा भरून घेऊन मस्त धावते आहे, म्हणून गद्गदून आले आहे. परमेश्वरा, आता डोळे मिटले तरी चालतील रे बाबा.
ऐसीवरच्या घनगहनगंभीर चर्चा वाचता वाचता डोळे मिटू मिटू येतात ती वेगळी गोष्ट.

चिमणराव Fri, 18/03/2016 - 21:10

एक छोटेसे उदाहरण घेऊ:
ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतली आणि ती पुण्याजवळ आहे.मागे एकदा अशी मागी /विचारणा झाली की त्या समाधीच्या वरच्या छताला भोक पाडून आत कॅम्रा सोडून -----
खरंच योगमुद्रा घेतली असेल तर हाडाच्या सांगाड्यावरुन सर्वच सिद्ध होईल.पण त्याला नकार मिळाला.काही भलतंच सिद्ध झालं तर स्विकारणार का?
समजा मोहेंजो दडोतल्यांचे जेनेटिक्स जुळले तर ?
इजिप्तमध्ये बय्राच गोष्टी ( साडेचारहजार वर्षांपुर्विंच्या )इतिहास/प्रवाद सिद्ध करताहेत.
जातीत वर्चस्व होतं का हे जेनेटिक्स सिद्ध करू नाही शकणार पण .

अरविंद कोल्हटकर Fri, 18/03/2016 - 22:15

वरील माहीती जर खरी असेल तर चित्पावनांचा भारतातला वावर हजार वर्षापेक्षा जास्त नाही,मग दोन अडीज हजार वर्षापुर्वी घट्ट झालेल्या जातीव्यवस्थेत त्यांना उच्चस्थान(ब्राह्मन) कसे प्राप्त झाले असावे?

कोकणस्थांना जातीच्या उतरंडीत सर्वोच्च स्थान आहे असे कोण म्हणते? स्वतः कोकणस्थांचा अर्थातच ह्या विधानाला पूर्ण संमति आहे पण इतर समाज, विशेषतः कर्‍हाडे, देवरुखे (जे कोकणातलेच आहेत), देशस्थ, इत्यादि गट हे इतक्या सहजतेने मानतात काय?

तेव्हा तो मुद्दा वादग्रस्त म्ह्णून बाजूस ठेवू, तरीहि एक गोष्ट स्वच्छ दिसते. जोपर्यंत ब्राह्मणवर्ग एकूणातच महाराष्ट्रात सर्व बुद्धिप्रधान क्षेत्रात पुढारलेला होता - जवळजवळ १९५० पर्यंतचा काळ - तोपर्यंत असे सहजगत्या पाहिले तरी जाणवत असे की प्रत्येक क्षेत्रात जी जी व्यक्ति नावाजलेली असे ती बहुतांशी कोकणस्थच असे. असे का घडले असावे?

सध्या आपल्या आसपास जे जे कोकणस्थ दिसतात त्या सर्वांची कुटुंबे गेल्या २०० ते १५० वर्षात कोकणामधून देशावर आली आहेत. ही सर्व कुटुंबे पेशव्यांचा उदय झाल्यानंतर वर आली. डझनावारी कोकणस्थ आडनावांचे कुलवृत्तान्त एव्हांना छापून आलेले आहेत. त्यापैकी कोठेच मूळ पुरुष आजपासून १२-१३ पिढयांपूर्वीचा नसावा. आमच्या 'कोल्हटकर' ह्या आडनावाच्या घराण्यांचा कुलवृत्तान्त प्रथ १९३६ साली छापला आणि अलीकडेच त्याची पुढची सुधारित आवृत्ति निघाली आहे. उदाहरण म्हणून ह्या आडनावाकडे पाहू.

ह्या आडनावाचे सर्व जण परंपरेने 'आम्ही दापोलीजवळच्या कोळथरचे किंवा जवळच्या नेवरे गावाचे आणि आमचा देव म्हणजे कोळथर गावात आजहि देऊळ असलेला कोळेश्वर महादेव' असे सांगतात. परंपरेने चालत आलेल्या समजापलीकडे त्याला फार आधार नाही पण ते खरे असावे. बहुतेक सर्वच कोकणस्थ आडनावांचे मूळ गाव कोकणात असते तसेच आमचेहि आहे. नावातहि साम्य आहे. कोळथरकर ते कोल्हटकर हा अपभ्रंश सहज दिसण्याजोगा आहे. (ह्याची एक मनोरंजक आणि पटण्याजोगी व्युत्पत्ति जुन्या काळातले राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून ओळखले जाणारे वासुदेवराव कोल्हटकर ह्यांनी निर्माण केली आणि त्यांचे चिरंजीव वामनराव ह्यांच्याकडून मी ती ऐकली. ती अशी - जुन्या काळात सर्व लेखन मोडीमध्ये केले जाई आणि त्या लिपीत दोन अक्षरे अगदी सारखी दिसणे आणि त्यामुळे वाचनात चूक होणे ही नित्याचीच बाब होती. मोडीमध्ये 'ळ' नाही, त्याऐवजी 'ल' वापरला जातो. 'थ' आणि 'ह' जलद लिहिलेल्या हस्तलिखितामध्ये सारखेच वाटतात. तसेच 'र' आणि 'ट'मध्येहि विशेष फरक नाही. ह्या साधर्म्यामुळे असेच केव्हातरी 'को ळ थ र क र' हे आडनाव मोडीत लिहिलेले वाचतांना ते 'को ल ह ट क र' पक्षी 'कोल्हटकर' असे वाचले जाऊ लागले आणि पुढे तोच प्रघात कायम झाला.) 'कोल्हटकर' आडनावाच्या एकूण १४ शाखा आहेत. ह्या शाखा अशा ठरल्या की कुटुंबातील परंपरेने मागे जात जात एकूण १४ पुरुष असे निघाले की ज्यांचे एकमेकांमध्ये काय नाते होते ह्याचा सर्व पुरावा अथवा परंपरा नष्ट झाली आहे. हे 'मूळ पुरुष' मानून ज्या १४ शाखा समजल्या गेल्या त्यांमध्ये माहीत असलेल्या पिढया अशा - (शाखांची संख्या आणि माहीत असलेल्या पिढया) १-१२, ३-११, ३-१०, २-९, ३-८. २-७. १ पिढी = २० वर्षे असा अंदाज धरला तर ह्याचा अर्थ असा सर्व कोल्हटकर शाखांचे पूर्वज २००-२५० वर्षापूर्वी कोकणामधून देशावर आले.

हे सर्व मूळ पुरुष अगदी जुन्या काळात दारिद्र्याने पिडलेले कोकणातले भिक्षुक अथवा किरकोळ शेती करणारे लंगोटीधारी लोक असणार. त्यांच्यापूर्वीच्या त्यांच्या किती पिढया दरिद्री कोकणातल्या त्या दारिद्र्यात होऊन गेल्या त्याची गणती नाही. पेशवाई १८व्या शतकाच्या प्रारंभी महाराष्ट्रात स्थिर झाली तेव्हा त्यापासून प्रेरणा घेऊन हे दरिद्री लोक वर आले. पेशव्यांचा प्रभाव वाढत गेला तसे ह्यांच्यापैकी काही जणानी त्यातून निर्माण होणार्‍या नवीन संधि हेरल्या आणि मामलती-इनामे-सरदारक्या मिळवल्या. काहीजण सावकारी-व्यापारात शिरले. पेशवाईतील दीक्षित-पटवर्धन, चिपळूणकर हे सावकार पेशव्यांनाहि कर्जे देऊ शकत असत. (पटवर्धन बाग ही पुण्यातील नवी वस्ती दीक्षित-पटवर्धनंच्या मूळ शेतजमिनीवर वसलेली आहे.) त्यांची अर्थिक प्रगति होत गेली आणि पुणे, सातारा, सांगली अशा तत्कालीन सत्तास्थानांमधील त्यांची वस्तीहि वाढत गेली.

इंग्रजी राज्य येथे १८१८ नंतर सुरू झाले तेव्हा इंग्रजांचे धोरण जुन्या प्रस्थापित वर्गाला फार नाखूष न करणे असे होते. ह्याच हएतूने त्यांनी पुण्यात ह्या पुण्यातील ब्राह्मणवर्गाला शिक्षण देण्यासाठी 'पूना कॉलेज' ही संस्था सुरू केली. तेथे जुन्या पद्धतीचेच शिक्षण जुन्या शास्त्रीवर्गाकडून दिले जात असे, १८३४ मध्ये मेकॉलेच्या प्रसिद्ध - आणि आता वादग्रस्त - 'मिनट' मुळे अशा जुन्या पठडीतील शिक्षणाला इंग्रजी भाषेच्या आणि आधुनिक शास्त्रांच्या अभ्यासाची जोड मिळाली आणि विश्रामबागेमध्ये मेजर कँडी ह्यांच्या देखरेखीखाली हे नवीन शिक्षण देणे सुरू झाले. (ह्याच विषयाचा काही तपशीलात पाठपुरावा माझ्या येथे अडीच तीन वर्षांपूर्वी लिहिलेल्या 'मोल्सवर्थ कोश, मोल्सवर्थ आणि कँडी' ह्या चार भागांच्या लेखमालिकेमध्ये पहता येईल.) अशा नवीन शिक्षणामुळे नोकरी मिळणे सोपे होते ही माहिती जसजसी पसरत गेली तसतशी ब्राह्मणवर्गाकडूनच जुन्या पठडीतील शिक्षणाऐवजी नव्या इंग्रजी शिक्षणाला मागणी येऊ लागली. ह्या सर्वाचा अत्याधिक लाभ साहजिकच पुण्यातील चित्पावन ब्राह्मण वर्गाला सर्वाधिक मिळाला आणि अन्य ब्राह्मण उपजातींच्या मानाने त्यांची आर्थिक परिस्थिति आणि भरभराट सुधारत गेली. नवे आधुनिक वैद्यकी, प्राध्यापकी, वकिली, सरकारी नोकरी असे व्यवसाय अधिक प्रमाणात त्यांच्याच ताब्यात आले. (ही तुलना केवळ मराठी बोलणार्‍या समाजापुरतीच मर्यादित आहे. त्यापलीकडे पाहिले तर त्याच इंग्रजी शिक्षणाच्या कारणामुळे पारसी, गुजराथी अशा गटांचीहि भरभराट झाली.) २०व्या शतकात पहिल्या अर्धात नव्याने निर्माण झालेल्या मराठी भाषिक जिमखान्यासारख्या वस्तीत बहुतेक सर्व जुने बंगले चित्पावनांच्या मालकीचे असतात हे त्याचे एक उदाहरण.

ज्याची आर्थिक स्थिति चांगली तो इतरांपेक्षा स्वतःला वरचा मानतो हा जगाचा नियमच आहे. एक काळ - साधारण शिवशाहीच्या अखेरपर्यंत - असा होता की देशावरील ब्राह्मण कोकणातल्या दरिद्री ब्राह्मणांना बरोबरीचे मानत नसत. तेव्हा सारा मान असे तो पैठण-नाशिक-कर्‍हाड अशा क्षेत्रातील ब्राह्मणांना, जे बहुतांशी देशस्थच असत. हे सगळे चित्र पेशवाईबरोबर बदलत गेले आणि १९व्या शतकाच्या शेवटापर्यंत अशी स्थिति आली होती की कोकणस्थांचा मूळचा न्यूनगंड नष्ट होऊन त्याची जागा नव्या अहंगंडाने घेतली.

माहितगारमराठी Fri, 18/03/2016 - 23:43

चित्पावनींचे स्थलांतर खूप अलिकडचे असण्यातली एक मोठी अडचण त्यांची चित्पावनी बोली असू शकेल का ? चित्पावनी बोलींचे मला सर्व शब्द माहित नाहीत पण ऐसि आणि मिपावरील धाग्यातून जेवढा शब्द संग्रह पुढे आला तो प्राकृताशी जवळचाच दिसतो सर्वसामान्य मराठी माणसाला न समजणारे शब्द त्यात फार कमी दिसतात, चेड, बोड्यो, सां, विन्चां, पेख हे शब्द जरा वेगळे वाटतात त्यातील काही कानडी किंवा तुळू असतील ते वगळावे लागतील, स्किथीअन संबंध दाखवायचा तर किमान पक्षी पर्शीअन, सिंधी किंवा पंजाबी या पैकी एका भाषेचा काही प्रमाणातरी प्रभाव चित्पावनी बोलीवर मिळावयास हवा तसा प्रभाव आढळत नसेल तर त्यांचे कोकणात येणे बरेच बरेच मागे जाईल.

स्थलांतर अलिकडील असेल तर चे एक उदाहरण मराठी विकिपीडियावर पहाण्यात आले ते म्हणजे टाकणकार समाजाची वाघ्ररी बोलीतील हे खूळ वाचावे मग आधीच्या भाषेचे प्रभाव कसे शिल्लक राहतात ते दिसते.

तसे प्रभाव जेवढे कमी दिसतील तेवढे स्थलांतर जुने असा अर्थ होऊ शकेल किंवा कसे.

बॅटमॅन Sat, 19/03/2016 - 02:45

वरती कोल्हटकर या आडनावासंबंधाने काही रोचक खल झालेला आहे. त्यावरून वासुदेवशास्त्री खर्‍यांच्या कुटुंबाची हकीगत आठवली, ती त्यांचे शिष्य दामोदर भट यांनी लिहिलेल्या खरेचरित्रात आलेली आहे. विजयनगर साम्राज्याचा पाडाव झाल्यावर त्यांचे पूर्वज दक्षिणेतून कोकणात आले. सुरुवातीला त्यांचा एकदम काळा वर्ण पाहून (खरेशास्त्रीही काही गोरे नव्हते.) ग्रामस्थांचा त्यांच्या ब्राह्मण्यावर विश्वास बसेना म्हटल्यावर त्यांनी बसल्याजागी वेदपठण करायला सुरुवात केली आणि मग विश्वास बसला. ते बाहेरून आल्याची आठवण म्हणून ग्रामदैवतापुढील पंगतीतही जरा बाजूस त्यांचे पान असे इ.इ. वाचल्याचे आठवते.

'न'वी बाजू Sat, 19/03/2016 - 17:59

In reply to by बॅटमॅन

सुरुवातीला त्यांचा एकदम काळा वर्ण पाहून ग्रामस्थांचा त्यांच्या ब्राह्मण्यावर विश्वास बसेना म्हटल्यावर त्यांनी बसल्याजागी वेदपठण करायला सुरुवात केली आणि मग विश्वास बसला.

भले! आणि इथे डिट्टो शेम-टू-शेम ष्टोरी असूनसुद्धा प्रतिष्ठानपुरीच्या आमच्या त्या कोण्या एका अनामिक रेड्यास मात्र तशीच रेकग्णिषण काही मिळाली नाही! (वशिला कमी पडला बहुतेक साल्याचा.)

अर्थात, 'काळा वर्ण' हा आमच्या रेडोपंताचा एकमेव ह्याण्डिक्याप होता, अशातला भाग नव्हे, परंतु तरीही... मग काय उपयोग त्याच्या त्या वेदपठणाचा, त्याबद्दल (ब्राह्मण्याची) रेकग्णिषण मिळणार नसेल तर, असा एक प्रश्न मनास चाटून गेल्याखेरीज राहत नाही. शिवाय, वेदपठण केले ह्याने, नि त्याबद्दल रेकग्णिषण मात्र लाटले भलत्याच कोणीतरी (जो तसाही ब्राह्मण बोले तो 'आतल्या गोटातला'च होता, जो फक्त आपले रद्द झालेले रेकग्णिषण येनकेनप्रकारेण 'आतल्या गोटा'च्या थ्रू रीइण्ष्टेट करू पाहत होता, एवढेच), असाही एक दुर्दैवी आणि अत्यंत लज्जास्पद असा प्रकार आमच्या रेडोबाच्या बाबतीत घडला, ही बाबदेखील दुर्लक्षून चालणार नाही. (थोडक्यात काय, तर आमच्या रेड्यावर अन्याय झालेला आहे.)

मॉरल्स ऑफ द ष्टोरी:

-रेकग्णिषण मिळण्याकरिता केवळ क्वालिफिकेषण असून भागत नाही. 'आतून' सेटिंगसुद्धा लागते.
- 'आतल्या गोटा'तलेसुद्धा शेवटी 'आपल्या माणसा'लाच प्रेफर करतात.
- बिवेअर ऑफ टौट्स. ते तुम्हाला काही मिळवून तर देणार नाहीतच; वर तुमच्या कष्टाचे श्रेय स्वत: लाटून बसतील, नि तुम्ही बसाल वेदघोष करत.
- आगाऊ मोबदला वाजवून घेतल्याखेरीज आपल्या कलेचे प्रदर्शन पब्लिकमध्ये करू नये. तेथे कोणालाही कशाचाही पत्ता नसतो, आणि काही पडलेलेही नसते. (शिवाय, डोंबाऱ्याचा खेळ हे एक फेल्ड बिझनेस मॉडेल आहे. आणि खास करून त्यातल्या माकडाकरिता तर रॉ डील आहे.)
- आणखी आपणांस सुचतील तशी.

(अतिअवांतर: 'थ्री ईडियट्स'मधील तोतया रणछोडदास छाछड उर्फ रँचो उर्फ फुन्सुक वांगडू हे पात्र निदान अंशत: तरी ज्ञानेश्वरांच्या रेड्यावरून बेतले असावे काय?)

ते बाहेरून आल्याची आठवण म्हणून ग्रामदैवतापुढील पंगतीतही जरा बाजूस त्यांचे पान असे इ.इ. वाचल्याचे आठवते.

है शाबास! आणि इथे आमच्या पैठणी रेड्याच्या नशिबी मात्र...

रेड्यांवरील अन्याय थांबवा!!!!!!

तिरशिंगराव Sat, 19/03/2016 - 10:17

अजून १०० वर्षांनी, अमेरिकेतले चितपावन, भारतात आपले कोणी वंशज राहिले आहेत का, याचा बहुधा शोध घेतील.

धनंजय Mon, 21/03/2016 - 21:18

In reply to by तिरशिंगराव

अमेरिकेत स्थित जगन्नाथ दीक्षित यांचे "चित्पावनिझम" हे पुस्तक आताच उपलब्ध आहे.
विक्रीस उपलब्ध नाही, पण अ‍ॅमॅझॉन डॉट कॉम वरील दुवा
(मी वरवर चाळून वाचलेले आहे. चांगले आहे.)

डॉ.दीक्षित यांचे हे पुस्तक माझ्याकडे आहे. माझ्या अंदाजानुसार ते पुस्तक आता आऊट ऑफ प्रिंट आहे.

दिग्विजय भोसले Sat, 19/03/2016 - 12:43

चर्चा रोचक आहे,
कष्टपूर्वक प्रयत्नाने कुणीही कोणत्याही उच्चस्थानावर(यशस्वी) जाऊ शकतो.
यशस्वी माणसाची जात पाहण्यापेक्षा त्याने केलीली मेहनत पाहणे योग्य वाटते.
आता ही मेहनत करून यशस्वी होण्याची कला कोणाकोणाच्या DNA मध्ये आहे,हे अभ्यासणे मात्र रोचक ठरेल.

आदूबाळ Sat, 19/03/2016 - 19:38

In reply to by अनुप ढेरे

खोती वतन असल्यामुळे खोत चित्पावनच असायला पाहिजेत असा नियम नसावा.

तुंबाडच्या खोतांचा मूळपुरुष मोरया "नागर" (गुजराती) ब्राह्मण असल्याचा उल्लेख आहे.

किंबहुना दादा खोतानंतर झालेल्या वाताहातीत तुंबाडची खोती बांडेसरकारकडे गेल्याचा उल्लेख आहे. (हे बांडेसरकार मूळचे मराठा आणि धर्मान्तरित मुस्लिम असतात.)

प्रथमेश नामजोशी Wed, 23/03/2016 - 13:09

In reply to by आदूबाळ

कोकणात श्रीमंतांकडे पाणी भरायचं काम करणार्‍यांनाही 'खोत' म्हणायचे म्हणे.

बाकी 'तुंबाडचे खोत' ही fiction ना? मग त्यातले रेफरन्सेस काय कामाचे?!

'न'वी बाजू Thu, 24/03/2016 - 23:23

In reply to by प्रथमेश नामजोशी

कोकणात श्रीमंतांकडे पाणी भरायचं काम करणार्‍यांनाही 'खोत' म्हणायचे म्हणे.

हम्म्म्म्म्... श्रीमती ऋद्धी तथा श्रीमती सिद्धी (बोले तो मिसेस गणपतीबाप्पा #१ आणि #२) यांची माहेरची आडनावे 'खोत' होती, याची कल्पना नव्हती.

अत्यंत रोचक माहिती! (उपयुक्ततेबद्दल अर्थातच साशंक आहे.)

अतिशहाणा Thu, 24/03/2016 - 23:51

In reply to by 'न'वी बाजू

श्रीमती ऐवजी सौ. हवे! (या पाश्चात्यांच्या प्रभावाने, कुठे नेऊन ठेवलीय मराठी संस्कृती आमची!)

सुनील Thu, 24/03/2016 - 16:48

In reply to by अनुप ढेरे

खोत म्हणजे त्याच्या खोतीखाली येणार्‍या गावांतील जमिनीचा सारा शेतकर्‍यांकडून वसूल करून तो सरकारजमा करणारा वतनदार. तो कुठल्याही जाती वा धर्माचा असू शके. खोती ही वंशपरंपरागत असल्यामुळे काही कुटुंबानी पुढे खोत हेच आडनाव लावण्यास सुरुवात केली.

सहजच रायगड जिल्यातील खोत आडनावांच्या मतदारांची यादी पाहिली. त्यात जवळपास निम्मी नावे मुस्लिम वाटतात!

चार्वी Mon, 21/03/2016 - 12:41

मुळात अमुक एक जातीचे मूळ काय वगैरे नुसत्या चर्चा करण्यात काय हशील आहे तेच मला समजत नाही. त्यामुळे प्रतिसाद द्यायची इच्छा नव्हती. पण एकंदर चर्चा अभिनिवेशहीन वाटल्यामुळे वाचनीय वाटली. तेवढ्यात म. फुल्यांवरून नाहक चकमक घडली, तेव्हा प्रतिसाद लिहावासा वाटला. फुल्यांचे मत विचारात घेताना ते ससंदर्भ जाणून घ्यावे ही सगळ्यांना विनंती.

फुल्यांनी तत्कालीन साधनांचा वापर करून काही राजकीय सिद्धांत मांडले. त्यांचा सिद्धांत असा, की इराणी म्हणजेच आर्य म्हणजेच भट्/ब्राह्मण लोकांनी भारतावर ('बलिस्थाना'वर) अनेक स्वार्‍या करून इथल्या मूळ लोकांना दास केले. त्यांच्यावर आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी जातिव्यवस्था निर्माण केली, जातिव्यवस्थेचा पुरस्कार करणारे ग्रंथ लिहिले. त्या काळी भारतविद्या, मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र वगैरे शाखांत जे सिद्धांत मांडले जात होते, त्यांच्यावर फुल्यांचे सिद्धांत आधारलेले होते. शेतकर्‍याचा असूड या पुस्तिकेत त्यांनी John Wilson च्या India Three Thousand Years Ago चा आधार घेतल्याचं दिसून येतं. परंतु त्यानंतर या शास्त्रांत झालेल्या प्रगतीमुळे आर्यवंशावर वगैरे आधारित सिद्धांत मागे पडले. उदा. संस्कृत, ग्रीक, लॅटिन भाषांत असलेल्या विलक्षण साधर्म्यामुळे ह्या आणि तदोद्भव भाषा बोलणारे लोक एका (आर्य) वंशाचे असावेत असे तेव्हा अनेक विद्वानांना वाटत होते. पण आर्य गटात मोडणार्‍या भाषा बोलणारे लोक वंशाने आर्य असतीलच असे नाही, हे आता बहुतांशी मान्य आहे. त्यामुळे फुले ब्राह्मण/भटांना आर्य=इराणी म्हणतात, हे विधान आता आपण शब्दशः न घेतलेलेच बरे.

फुल्यांनी बहुतांश लिखाणात ब्राह्मणांच्या पोटजातींचा उल्लेख केलेला नाही. कारण त्यांच्या टीकेचा रोख जातिव्यवस्था आणि त्याच्या आधारे ब्राह्मण करत असलेले शोषण हा होता. माझ्या आठवणीप्रमाणे फक्त सार्वजनिक सत्यधर्म पुस्तिकेत, तेसुद्धा एका तळटीपेत त्यांनी उल्लेख केला आहे की देशस्थ ब्राह्मण हे मूळ भारतीय ('क्षेत्रस्थ') असावेत, आणि इराणी आर्य ब्राह्मणांनी त्यांना आपल्या धर्मात वळते (कन्वर्ट) करून घेतले असावे. पण आधी सांगितल्याप्रमाणे या सिद्धांतावर शब्दशः विश्वास ठेवण्याचे कारण नाही.

मग फुल्यांचा हा सिद्धांत आज फालतू समजून टाकून द्यावा का? तसंही नाही. आर्य लोक बाहेरून भारतात आले आणि तत्सम सिद्धांत त्यावेळी ब्राह्मण पुढार्‍यांना भलतेच सोयीचे वाटत होते. कारण आपण आपल्या राज्यकर्त्यांच्या तोडीचे आहोत (इंग्रजही आर्य, भारतीय उच्चवर्णीयही आर्य), असा निष्कर्ष त्यातून काढता येत होता. भारतीय वंशाचे लोक नेभळट आहेत, या टीकेला प्रत्युत्तर द्यायला वापरता येणार होता. आर्य सिद्धांताचा उपयोग राष्ट्रभावना चेतवण्यासाठी करता येत होता. पण राष्ट्राच्या या संकल्पनेत आपसूक अनार्यांना स्थान नव्हते. फुल्यांनी ही बाब नेमकी ओळखली. एरवी उच्चवर्णीयांना सोयीच्या वाटत असलेल्या या आर्य सिद्धांताचाच वापर करून त्यांनी दाखवून दिले की सामाजिक एकतेशिवाय राष्ट्र या संकल्पनेला अर्थ नाही. दुसरे, जर आर्य ब्राह्मण परके असतील, तर त्याचा अर्थ शूद्रातिशूद्र या भूमीचे मूळ मालक होते. शूद्रातिशूद्रांचे मानसिक बळ वाढवण्यासाठी फुल्यांनी आर्य सिद्धांताला वेगळंच वळण दिलं!

ऋषिकेश Mon, 21/03/2016 - 13:31

In reply to by चार्वी

शेवटच्या परिच्छेदातील मांडणी माझ्यासाठी नवीन आहे आणि रोचकही. आभार!

अवांतरः याच आर्यपणाच्या समजूतीमुळे आपल्याकडे अजूनही हिटलरबद्दल "आपला" आहे सम्जून प्रेम बाळागणारे महाभाग सापडतात!

राही Mon, 21/03/2016 - 16:35

गणेश दैवज्ञ यांचा 'ग्रह लाघव' हा ग्रहगणितावरील गणितग्रंथ (१५२० इ.स.) प्रसिद्ध आहे.

राही Mon, 21/03/2016 - 19:34

In reply to by बॅटमॅन

गणेश दैवज्ञ याचे गोत्र कौशिक आणि तो मुंबईपासून दक्षिणेस चाळीस मैलांवर 'नंदीग्राम' येथला होता असे गूगलबाबाने सांगितले. त्याच्या 'ग्रहलाघव' वर टीका लिहिणारा गंगाधर हा कौशिकगोत्री वाजसनेयी ब्राह्मण होता असेही दिसले. म्हणजे शुक्ल यजुर्वेदी ना?
गणेश दैवज्ञ याच्या वडिलांपासून पुढे अनेक पिढ्यांत प्रसिद्ध गणितज्ञ निपजले.
हे नंदीग्राम म्हणजे रायगड जिल्ह्यातले नांदगाव असावे.

बॅटमॅन Tue, 22/03/2016 - 01:09

In reply to by राही

गणेश 'दैवज्ञ' म्हणजे चित्पावन नसावा. बाकी वाजसनेयी म्हणजे शुक्लयजुर्वेदीच, रैट्ट.

स्पीकिंग ऑफ गणितज्ञ- करणकौस्तुभ नामक ज्योतिषग्रंथाचा लेखक कृष्ण दैवज्ञ याच्याच वंशातला होता की काय?

हा ग्रंथ शिवछत्रपतींच्या आज्ञेवरून पंचांगशुद्धीकरिता लिहिला गेला. म्हणजे राजाचे लक्ष किती चौफेर होते ते पहा. रोजच्या वापरातल्या शब्दांकरिता राज्यव्यवहारकोश रचून घेतला, तसेच पंचांगशुद्धीसारख्या विषयातही लक्ष घातले. सर्व फ्रंट मजबूत करून घेतले.

ऋषिकेश Tue, 22/03/2016 - 09:05

In reply to by बॅटमॅन

म्हणजे राजाचे लक्ष किती चौफेर होते ते पहा.

हो ना राव! गांधीजी आणि शिवाजी या दोन व्यक्तींचा आवाका बघितला की दरवेळी नव्याने स्तिमित होतो मी! त्यांनी लक्ष घालून काही महत्त्वाचे सांगितले नाही अशी क्षेत्रे फारच विरळ असावीत!

राही Tue, 22/03/2016 - 18:07

In reply to by बॅटमॅन

कृष्ण दैवज्ञ हा पहिल्या गणेश दैवज्ञाचा पणतू. मध्ये आणखी एक गणेश होऊन गेला. पहिल्या गणेशाच्या चुलत कुटुंबातसुद्धा काही निष्णात ज्योतिषी निपजले. यांची स्वरचना आणि टीकात्मक असे विपुल ग्रंथ आहेत. किंबहुना पहिल्या गणेशाच्या 'ग्रहलाघवा'चा आधार आताआतापर्यंत ग्रहणे वगैरे ठरवण्यासाठी घेतला जात होता. या संबंधी एस. भालचंद्र राव यांचे इंडिअन अ‍ॅस्ट्रॉनॉमी, गांगुली यांचे सूर्यसिद्धांताविषयीचे पुस्तक आणि मोहन आपटे यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत.

ग्रेटथिंकर Mon, 21/03/2016 - 18:34

देशस्थ ब्राह्मणांकडून काही थेअरीज ऐकायला मिळतात ,ज्यात कोकणस्थ हे ब्रिटीश ,डच , पोर्तुगीज व भारतीय यांचा संकर आहेत.यात कीतपत तथ्या आहे हे जाणकारच सांगतील .कदाचीत शिवकाळानंतर चित्पावनांचा वाढलेला प्रभाव व देशस्थांची त्यांनी मोडून काढलेली मक्तेदारी यामुळे कदाचीत देशस्थ व कायस्थांनी जाणून बुजून केलेल्या कुचाळक्या या पलीकडे या थेअरीला काही मेरीट नसावे.

माहितगारमराठी Mon, 21/03/2016 - 21:37

In reply to by ग्रेटथिंकर

'काही तर्कसुसंगत सुचले नाही की कुचाळक्यांच्या गल्लीत गे(जे)म्स होतात' अशी आमेरीकेत म्हण आहे म्हणे. ज्या अर्थी चित्पावनी बोलीचा शब्द संग्रह प्राकृताशी जवळचाच दिसतो सर्वसामान्य मराठी माणसाला न समजणारे शब्द त्यात फार कमी दिसतात, त्या अर्थी चित्पावनांचे कोकणात येणे बरेच बरेच मागे म्हणजे युरोपीयनांचे भारतात व्यापारासाठी येण्याच्याही बरेच बरेच मागे जाईल. त्यामुळे कुचाळक्या कुणिही केल्या तरीही त्या नि:संशय आधारहीन आहेत हे निश्चित.

नितिन थत्ते Tue, 22/03/2016 - 10:23

In reply to by माहितगारमराठी

काही अनाकलनीय कारणाने कोकणस्थ स्वतःला वेगळे समजतात हे खरे आहे.

मोबाईलच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा इअरफोन नुकतेच पापिलवार होत होते तेव्हा हे इअरफोन (रबर बेलो नसलेले) कोकणस्थांच्या कानात नीट बसत नाहीत असं एका कोकणस्थाने मला सांगितलं होतं.

माहितगारमराठी Tue, 22/03/2016 - 11:10

In reply to by नितिन थत्ते

:) कोकणस्थ मंडळी काय म्हणतायसा ? थत्तेचाचा -आज मंगळवारच आहे बुधवार उद्या आहे ;)- खिल्ली उडवून राहीले की :(

बाळ सप्रे Tue, 22/03/2016 - 17:08

In reply to by नितिन थत्ते

काही अनाकलनीय कारणाने कोकणस्थ स्वतःला वेगळे समजतात हे खरे आहे

कोकणस्थच नव्हे सगळ्याच जाती याबाबतीत सारख्या.. कर्‍हाडे, देशस्थ्,मराठा, जाट, बनिया, ...व्हॉट्सॅपवर, फेसबुकवर जातीवार ग्रुप्समधले असे बरेच क्वोट्स बघितलेत..

पण (जाहीरपणेतरी ) आम्ही दुसर्‍यांना कमी लेखत नाही असं पांघरूण घातलं की झालं.. पण वेगळेपण ठरवताना सगळे चांगले गुण आपल्या जातीत कसे आहेत हे सांगण्याची दक्षता घेतलेली असते.. :-)

गब्बर सिंग Tue, 22/03/2016 - 21:38

In reply to by बाळ सप्रे

पण (जाहीरपणेतरी ) आम्ही दुसर्‍यांना कमी लेखत नाही असं पांघरूण घातलं की झालं.. पण वेगळेपण ठरवताना सगळे चांगले गुण आपल्या जातीत कसे आहेत हे सांगण्याची दक्षता घेतलेली असते.

सप्रे साहेब, हे काहीसं अनिष्ट आहे असं तुम्ही ध्वनित करताय का ? असल्यास का अनिष्ट आहे ?

बाळ सप्रे Wed, 23/03/2016 - 10:53

In reply to by गब्बर सिंग

दुसर्‍या जातींना कमी न लेखणे इष्टच आहे. पण हे फक्त जाहिरपणे असते, मनात काही वेगळेच असते. काही पॉलिटिकली करेक्ट (दुसर्‍या जातींना कमी न लेखता केवळ आपल्या जातीची भलामण करणारे) क्वोट्स पाठवणार्‍याशी याविषयावर जरा खोलवर बोलणे झाल्यावर खरे बाहेर निघाल्याचे ("लायकी नसताना या लोकांना वगैरे वगैरे") वैयक्तिक अनुभव असल्याने असे लिहिले आहे..

तिरशिंगराव Tue, 22/03/2016 - 19:19

रबर बेलो नसलेले इअरफोन्स माझ्याही कानांत बसत नाहीत. कधीही गळून पडतात. शिवाय त्याच्या हार्ड सरफेसमुळे कानाची कूर्चा दुखू लागते ते वेगळेच. पण त्याचे कारण, मी कोकणस्थ आहे म्हणून, हे आज कळले.

संजय जोगदंड Tue, 15/08/2017 - 18:09

फोनेशीयन आणि कोकणस्थांचा संबंध सैषा गणेशविद्या ह्या पुस्तकात वाचल्यामुळे माहितीजालावर कोण हे फोनेशियन म्हणून बघीतल्यावर बरीच माहिती मिळाली.भूमध्य समुद्रजवळ स्वतःचा छोटा देश असलेले,कोठल्यातरी समुद्र जिवापासून आकर्षक जांभळा रंग बनवून वारेमाप पैसे कमावणारे,नाकात बोलणारे,गर्विष्ठ असे वर्णन होते.ग्रिक का रोमनांनी कार्थेज येथे शिरकाण करून होड्यांमधे भरून समुद्रात सोडले असे वर्णन आहे.त्यामुळे चिपळूणास लागलेल्या प्रेतात परशुरामांनी जिव भरला हे कोकणस्थांचे वर्णन पटते.त्याचप्रमाणे रशियन भाषेशी मराठीचे साधर्म्य {विशेषतः कोकणस्थी}अचंबित करणारे आहे,उदा.साखर,मांस,कलकलाट,किनात,डुबऱया.हे शब्द.

चिमणराव Tue, 15/08/2017 - 20:02

अदितीने सुरुवातीला व्यक्त केलेले मत बरोबर आहे. तुर्कीमधल्या काही जमाती द अफ्रिकेत गेल्या. या दोन ठिकाणचे लोकांचे बरेचसे डिउनए कोब्रांच्या डिएनएशी जुळतात. (गैरवापर होऊ नये म्हणून डिएनए टेस्ट केलेले लोक पुढे येत नाहीत.)
काही युरोपकडे जाऊन भारतात आले तर काही द अफ्रिकामार्गे.
( मंगळुर ,तिरुवअनंतपुरममध्येही ते आले. परशुराम कथा - जमीन मिळवल्याची केरळमध्येही आहे. पृथ्वी नि:क्षत्रिय करणे हे परशुरामाने त्याकाळच्या राजांचा वारंवार केलेला पराभवाचे लोककथांतले अतिरंजित रूप म्हणता येईल. हे माझे मत.)