फॅसिझमची व्यवच्छेदक लक्षणं
लॉरेन्स ब्रिट यांनी २००३ साली फॅसिझमविषयी एक लेख लिहिला होता. http://www.informationclearinghouse.info/article4113.htm त्यात त्यांनी ६ वेगवेगळ्या (मुसोलिनी, हिटलर, सालाझार, पापाडोपौलोस, पिनोशे आणि सुहार्तो) फॅसिस्ट राजवटींचा अभ्यास करून त्यांमध्ये समान दिसणारी फॅसिझमची १४ लक्षणं सांगितली होती. त्यांचा काहीसा स्वैर अनुवाद सादर करतो आहे.
१. राष्ट्रवादाचा जोरदार आणि सतत पुरस्कार - राष्ट्राचा झेंडा, राष्ट्राची इतर चिन्हं यांबद्दल अतिरेकी जागरुकता. देशभक्तीचा जोरदार पुरस्कार. देशभक्त नसलेल्यांचा तिरस्कार. परकीय शक्तींबद्दल संशय. परकीयांबद्दल घृणा.
२. मानवी अधिकारांबद्दल तुच्छता आणि संकोच - फॅसिस्ट राज्यकर्त्यांनी आपल्याला जे हवं आहे त्यात मानवी अधिकार, लोकांच्या जिवांची किंमत ही अडचण मानली. प्रचाराची साधनं वापरून होणारे अत्याचार क्षुल्लक आहेत इतकंच नव्हे तर ज्यांच्यावर अत्याचार होत आहेत तेच कसे नालायक लोक आहेत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा अत्याचार भयंकर होत होते तेव्हा गुप्तता, इन्कार आणि अफवा/गैरसमज पसरवण्यात फॅसिस्ट राजवटी वाकगबार होत्या.
३. शत्रूसमुदायाकडे बोट दाखवून एकाच वेळी त्यांना बळीचा बकरा बनवणं आणि त्यांच्याविरुद्ध संघटित होण्यास कारण बनवणं - सर्व फॅसिस्ट राजवटींमध्ये सगळ्यात महत्त्वाचं सूत्र म्हणजे लोकांना मुख्य प्रश्नांपासून लक्षवेध करण्यासाठी बळीच्या बकऱ्यांचा वापर. यामुळे अपयशांचं खापर फोडण्यासाठी आणि जनतेचं फ्रस्ट्रेशन नियंत्रित दिशेला वळवण्यात या राजवटींना यश आलं. सतत प्रचार आणि खोटी माहिती पसरवून अनेक वेगवेगळ्या समूहांकडे बोट दाखवण्यात आलं. सर्वसाधारणपणे कम्युनिस्ट, समाजवादी, सेक्युलर, लिबरल, ज्यू, अल्पसंख्यांक, शत्रुराष्ट्रं, परधर्मीय, समलिंगी आणि सर्वसमावेशक आतंकवादी. राजवटींना विरोध करणाऱ्यांना टेररिस्ट/देशद्रोही अशी विशेषणं लावून त्यांचा नायनाट केला जायचा.
४. सैन्याचं, सुरक्षा रक्षण व्यवस्थेचं वर्चस्व - राज्यकर्त्यांनी कायमच मिलिटरीला उच्च स्थान दिलं आणि मिलिटरी-इंडस्ट्रियल कॉंप्लेक्सला पाठिंबा दिला. इतर तीव्र गरजा असूनही राष्ट्राच्या बजेटपैकी मोठा हिस्सा मिलिटरीसाठी दिला गेला. मिलिटरीकडे प्रखर राष्ट्रवादाचं प्रतीक म्हणून पाहिलं गेलं.
५. तीव्र लिंगभेद - राज्यकर्ते हे मुख्यत्वे पुरुष असल्यामुळे स्त्रियांकडे दुय्यम नागरिक म्हणून पाहाण्यात आलं. त्यांची भूमिका घर सांभाळणं, आणि मुलांना जन्म देऊन त्यांचं पालनपोषण करणं इतकीच राहावी असं ठासून सांगण्यात आलं.
६. मीडियावर प्रचंड प्रमाणावर नियंत्रण - काही राजवटींनी मीडियावर मालकी हक्क स्थापन केले तर काहींनी अप्रत्यक्षपणे नियंत्रण ठेवलं. यात लायसन्सेस देणं, आर्थिक आणि राजकीय दबाव टाकणं, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रवादाचं आवाहन करणं, सूचक धमक्या देणं वगैरे गोष्टी येतात.
७. राष्ट्रीय सुरक्षेबद्दलचा गंड - राज्यकर्ते जे काही करतात त्याला राष्ट्रीय सुरक्षेचा रंग चढवण्याचं काम या राजवटींनी केलं. विरोधकांना देशविरोधी आणि देशद्रोही ठरवण्याचा या राजवटींचा प्रयत्न राहिला.
८. धर्म आणि राज्यकर्त्यांचं साटंलोटं - कम्युनिस्टांनी धर्म नाकारला तर फॅसिस्टांनी तो कवटाळला. बहुसंख्येचा धर्माधार स्वीकारून त्या धर्माचे आक्रमक रक्षक असल्याची भूमिका त्यांनी घेतली. राज्यकर्त्यांची प्रत्यक्ष वागणूक ही धर्माच्या व्यापक मानवतावादी तत्त्वांविरोधी असली तरी त्याकडे निर्लज्जपणे काणाडोळा केला गेला. विरोधक हे धर्मद्वेष्टे आहेत आणि राज्यकर्त्यांना विरोध म्हणजे धर्माला विरोध असं चित्र निर्माण केलं गेलं.
९. मोठ्या कंपन्यांचे हात बळकट करणं - सामान्य माणसाचं आयुष्य नियंत्रित केलं जात असतानाच मोठ्या कंपन्यांना हवं ते करण्याचं अमर्याद स्वातंत्र्य दिलं गेलं. यात मिलिटरीसाठी आवश्यक उत्पादनं निर्माण करण्याची क्षमता म्हणून कंपन्यांकडे/कॉर्पोरेशन्सकडे पाहिलं गेलं. इतकंच नाही तर समाजावर नियंत्रण ठेवण्याची यंत्रणा म्हणूनही त्यांना महत्त्व दिलं गेलं. विशेषतः नाहीरे वर्गावर वचक ठेवण्यासाठी.
१०. कामगार आणि शेतकरी यांची शक्ती खच्ची करणं - डाव्या शक्ती, एकत्रित झालेला कामगार वर्ग - कारखान्यातला वा शेतातला - ही आपल्या राजकीय नियंत्रणाला आव्हान समजून फॅसिस्ट राजवटींनी त्यांना पद्धतशीरपणे खच्ची केलं. गरीबांकडे तुच्छतेने पाहिलं गेलं.
११. विचारवंत व कलावंत यांच्याबद्दल तुच्छता आणि त्यांचं खच्चीकरण - विचारवंत आणि त्यांना अपेक्षित असलेलं विचारस्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य हे या राजवटींना त्याज्य होते. त्यांना राष्ट्रीय सुरक्षा आणि देशभक्तीच्या आदर्शांच्या विरोधक मानलं गेलं. युनिव्हर्सिटींवर कडक नियंत्रण ठेवलं गेलं, राजकीय विरोधक असलेल्या प्राध्यापकांना त्रास दिला गेला किंवा काढून टाकलं गेलं. वेगळे विचार दाबून टाकण्यासाठी त्यांवर हल्ला केला गेला, त्यांची तोंडं दाबली किंवा बंद केली गेली. या राजवटींसाठी कला आणि साहित्य हे केवळ देशाच्या उन्नतीसाठी असायला परवानगी होती. देशाच्या त्रुटी दाखवणाऱ्या कलाकृतींवर व कलाकारांवर हल्ला केला गेला.
१२. गुन्हे आणि त्यांना शिक्षा देण्याबद्दल अतिरेकी तीव्र आचार - बहुतांश राजवटींनी अत्यंत क्रूर न्यायव्यवस्थेचा पाठपुरावा केला आणि मोठ्या प्रमाणावर लोकांना तुरुंगात टाकलं. पोलिस व्यवस्थेला मोठ्या प्रमाणात सामर्थ्य दिलं गेलं. साधे आणि राजकीय गुन्हे वाढवून-चढवून इतर मोठ्या गुन्ह्यांत गुंफले गेले होते आणि ते आरोप राजकीय विरोधकांवर वापरले गेले. भीती, दहशत आणि देशद्रोह्यांबद्दलची घृणा वापरून पोलिस अधिकारांची व्याप्ती वाढवण्यात आली होती.
१३. भ्रष्टाचार आणि बगलबच्चेगिरी - उच्च पदांवर असलेल्यांच्या जवळचे आणि आर्थिकदृष्ट्या वरचे, म्हणजे उद्योगपती वगैरे यांचं उखळ पांढरं झालं. सत्ता आणि उद्योग यांचं साटंलोटं साधून प्रचंड प्रमाणावर भ्रष्टाचार साधला गेला. याबाबतीत जनता कायमच अंधारात राहिली.
१४. भ्रष्ट किंवा खोट्या निवडणुका - बहुतांश राजवटींमध्ये निवडणुका हा फार्स होता. निवडणुका मॅनेज करण्यासाठी विरोधकांना तुरुंगात टाकणं, निवडणुक यंत्रणेवर नियंत्रण ठेवणं, विरोधी मतदारांना धमकावणं किंवा दहशत दाखवणं, खरी मतं नष्ट करणं असे अनेक उपाय वापरले गेले.
या व इतर लक्षणांविषयी इथे चर्चा अपेक्षित आहे
विदा नसताना कंटाळा आला म्हणणं
विदा नसताना कंटाळा आला म्हणणं रोचक आहे. अदानी समुहाचा फायदा गेल्या दोन वर्षात कीती वाढला का वाढलाच नाही हे शोधा जरा. अदानी पॉवर, अदानी पोर्ट्स या कंपन्यांचे शेअर दोन वर्षातल्या लोवेस्ट भावाजवळ चालू आहेत.
पंजाब शेजारच्या हरियाणामध्ये माजी मुख्यमंत्री दंगल भडकवत आहेत. ते कुठल्या पार्टीचे आहेत ते शोधा. महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा इथे निवडणुकांआधी कुठले दंगे भडकले त्याचीही माहिती द्या.
रोचक, उद्बोधक इत्यादीच्या
रोचक, उद्बोधक इत्यादीच्या वाट्याला तशीही मी जात नाही. पण मी आकडे नि लिंका फेकून विदा-विदा कधीच खेळत नाही हे तुम्ही आत्ता विसरलेले दिसताय, त्यामुळे ते रोचक-उद्बोधक व्यापार खेळायलापण मी येणार नाही, हे तुमच्या लक्षात येणं कठीण आहे. बाकी मोठ्या कंपन्यांचा फायदा करून देणं हे झालेलं दिसत नाहीसं म्हणता? फक्त 'बॉर्रं'! झोपा निवांत'. :)
-१ मला विदापंचमी खेळायचा
-१
मला विदापंचमी खेळायचा कंटाळा येतो. त्यामुळे पास. बाकी अडाणी उद्योगसमूहाच्या भरभराटीबद्दल आणि राज्यांमधल्या निवडणुकांपूर्वी बरोब्बर नेम धरून उसळणार्या स्थानिक असंतोष कम दंगलींबद्दल काही बोलत नाही.
मेघनाताई, अडाणीचं नाव आणि दंगली हे मुद्दे तूच जाताजाता बोलत नाही असं म्हणून बोलली होतीस. त्यावर प्रतिवाद आल्यावर परत मूळ कंटाळ्याला सिलेक्टिव्हली पकडलं असंच भासतं आहे हं. आणि स्पेसिफिकमधे न शिरता कसं कोणतंही विधान करता येईल ? तू विधानं करु इच्छिते आहेस असं वाटल्याने हे म्हटल्याशिवाय राहावलं नाही.
असं पाहा, बातम्या वाचून मतं
असं पाहा, बातम्या वाचून मतं तयार होतात. खरं म्हणजे त्याला पूरक विदाही मिळवता येतो, इथल्या अनेक दिग्गजांप्रमाणे. पण त्यात शिरायचा मला खरोखर आळस आहे. याचा अर्थ माझी मतं मांडू नयेत का? संयत भाषेत आहेत नि बदनामीकारक नाहीत, तोवर त्याला प्रत्यवाय नसावासं दिसतं. म्हणून मत मांडलं होतं. अजूनही मांडते, की शेअर घसरला ही फक्त एक बाजू झाली. तीही एका उदाहरणाबाबतची. पण अजून खोलात शिरणं मला मानवत नाही. तुम्ही वजा अकरा दिलेत तरी त्यात बदल होणे नाही! ;-)
बाकी - विद्याअभावी आपण धरून चालू घटकाभर की हे एक लक्षण दिसत नाही तूर्तास. पण मुख्य प्रश्न निराळाच आहे. तो म्हणजे फॅसिस्ट राजवटींची लक्षणं सोडून 'डाव्यांचंही तस्संच दिसतं की!' हा असंबद्ध मुद्दा धोपटणं. त्याचं काय?
माझा क्वोट : खुलासा
फॅसिस्ट राजवटीही कल्याणकारी असू शकतात अशा आशयाचं खाली तिरशिंगराव म्हणताहेत, हे मला मान्य आहे.
हा उल्लेख पाहून भलताच चकित झालो. मग सगळे प्रतिसाद तपासले. माझ्या नांवाने कोणी डु आयडी तर वावरत नाही ना ? कारण या धाग्यांवर मी एकही प्रतिसाद दिला नव्हता. मी अजूनपर्यंत कधीही फॅसिस्ट राजवटीची भलामण केलेली नाही. बाकी चालू द्या.
चांगला लेख
चांगला लेख आहे.
हे निकष चालू राजवटीला लावून पाहिले. बहुतांश निकष लागू होत नाहीत असे वाटले. दोन तीन निकष काही ठराविक संदर्भांत लागू होतात असं जाणवलं. काही निकष आजच्या राजवटीला लागू असले तर ते गेल्या चाळीस वर्षांतल्या अनेक राजवटींना लागू होतात असंही वाटलं.
एकंदर भारतातल्या परिस्थितीला किमान चालू राजवटीच्या संदर्भात - आणि चालू राजकीय व्यवस्थेच्या संदर्भात - फॅसिझमचा धोका नाही असं या लेखावरून वाटलं.
आयटी अॅक्टमधलं ६६ए हे सेक्षन
हे निकष चालू राजवटीला लावून
हे निकष चालू राजवटीला लावून पाहिले. बहुतांश निकष लागू होत नाहीत असे वाटले. दोन तीन निकष काही ठराविक संदर्भांत लागू होतात असं जाणवलं. काही निकष आजच्या राजवटीला लागू असले तर ते गेल्या चाळीस वर्षांतल्या अनेक राजवटींना लागू होतात असंही वाटलं.
हे तुम्ही कोणत्या देशातील चालू राजवटीबद्दल बोलताय? अमेरिका? (तुमचं वास्तव्य त्या देशात असल्याने इतके ठाम लिहिले आहे असे वाटल्याने खातरजमा करतोय)
काही उधृते.
हे तुम्ही कोणत्या देशातील चालू राजवटीबद्दल बोलताय? अमेरिका? (तुमचं वास्तव्य त्या देशात असल्याने इतके ठाम लिहिले आहे असे वाटल्याने खातरजमा करतोय) >>>>>
>>> एकंदर भारतातल्या परिस्थितीला किमान चालू राजवटीच्या संदर्भात - आणि चालू राजकीय व्यवस्थेच्या संदर्भात - फॅसिझमचा धोका नाही असं या लेखावरून वाटलं.
सदस्याच्या खासगी माहितीचा जाहीर उल्लेख
>>> हे तुम्ही कोणत्या देशातील चालू राजवटीबद्दल बोलताय? अमेरिका? (तुमचं वास्तव्य त्या देशात असल्याने इतके ठाम लिहिले आहे असे वाटल्याने खातरजमा करतोय)
>>>>आम्हाला कळवायला आनंद होतो की, "ऐसी अक्षरे" वरील सभासद श्री. ऋषिकेश यांनी "ऐसी अक्षरे" वरील संपादनाची जबाबदारी स्वीकारली आहे. : दुवा
"संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे" यातून उधृत करून :
- प्रतिसाद संतुलित असावेत. लेखनाचा सांगोपांग विचार करून वाईटाबरोबर चांगले काय हेही सांगावे. व्यक्तिगत टीकाटीप्पणी टाळावी.
कम्युनिस्ट राजवटींनाही ...
फॅशिस्टांचे शत्रु कम्युनिस्ट ह्यांच्या राजवटींनाही हेच पुष्कळसे निष्कर्ष लागू पडतात. एकाधिकारवादी कम्युनिस्ट आणि एकाधिकारवादी फॅशिस्ट हे दोघेहि एकाच चेहर्याचे दोन मुखवटे असतात. ऑर्वेलच्या शब्दांतः
Years pass on Animal Farm, and the pigs become more and more like human beings—walking upright, carrying whips, and wearing clothes. Eventually, the seven principles of Animalism, known as the Seven Commandments and inscribed on the side of the barn, become reduced to a single principle reading “all animals are equal, but some animals are more equal than others.” Napoleon entertains a human farmer named Mr. Pilkington at a dinner and declares his intent to ally himself with the human farmers against the laboring classes of both the human and animal communities. He also changes the name of Animal Farm back to the Manor Farm, claiming that this title is the “correct” one. Looking in at the party of elites through the farmhouse window, the common animals can no longer tell which are the pigs and which are the human beings
एकदम सहमत
अनु राव यांच्याशी एकदम सहमत
कम्युनिस्ट राजवटीत किती लोक ठार मारले गेले याची गणना. स्त्रोत : वरील पुस्तक. पृष्ठ क्र. ४.
USSR - 20 million
China - 65 million
Vietnam - 1 million
North Korea - 2 million
Cambodia - 2 million
Eastern Europe - 1 million
Afghanistan - 1.5 million
Latin America - 150,000
Africa - 1.7 million
( त्यांनी मारले म्हणून इतरांनी सुद्धा मारावे असं म्हणायचंय का तुला, गब्बर ?. )
भारतात माओ वाद्यांनी काय कमी
भारतात माओ वाद्यांनी काय कमी मारले आहेत का?
बंगाल मधे पण ३० वर्ष बाकीच्या लोकांना डावे गुंड ठोकतच होते.
मी तुला ३ दिवसापूर्वी सांगितले ना का मुळातच समाजवाद आणि साम्यवाद ह्या "गुन्हेगारी संकल्पना" आहेत. त्यातुन कधीही काहीही चांगले निर्माण होऊ शकत नाही. जसे कामा तुन क्रोध निर्माण होतोच होतो तसे डाव्या विचारसरणीतुन हुकुमशाही निर्माण होतेच होते.
तरीदेखील भारतात मात्र
तरीदेखील भारतात मात्र मानवतेचा ठेका डावी विचारसरणी असलेल्या व तद्दन कम्युनिस्ट असलेल्यांनीच घेतला आहे असे चित्र उभे केले जात आहे. यांच्या उद्योगांना इतरांचा पाठिंबा मिळवून यांचे उद्योग अव्याहतपणे चालू रहावे याकरता दलित व इतरांचा मुलामा दिला जातो.
भारतात लोकशाही आहे याला यांचा नाइलाज आहे.
तरीदेखील भारतात मात्र
तरीदेखील भारतात मात्र मानवतेचा ठेका डावी विचारसरणी असलेल्या व तद्दन कम्युनिस्ट असलेल्यांनीच घेतला आहे असे चित्र उभे केले जात आहे.
ठेका ?? कैच्याकै !!!
उजव्यांना कोणी मनाई केलेली आहे मानवतेबद्दल बोलण्याची व आंदोलने करण्याची आणि धोरणे राबवण्याची ??
( बायदवे भारतात उजवे नेमके कोण हा प्रश्नच आहे. भाजपावाले उजवे आहेत असं म्हंटलं तर तो चांगल्यापैकी विनोद होईल. )
भांडवलशाहीत "फडतूस
भांडवलशाहीत "फडतूस असल्यामुळे" मेलेल्यांची गणना कुणी केली आहे का?
अनेक भांडवलशाही राष्ट्रातही शॉल्लेट वेल्फेअर प्रोव्हिजन्स आहेतच. भांडवलशाहीत फडतूसांना (वेल्फेअर स्टेट च्या द्वारे) दिली गेलेली मदत (उदा. सोशल सिक्युरिटी) हा भांडवलाचा लेबर वर असलेला विजयच आहे. दिलेली मदत ही लेबर च्या स्वरूपात नसते. कोणतीही व्यक्ती येऊन मदत करीत नाही. पैसे दिले जातात. भांडवलाचा श्रमभावनेवर क्रूर सूड.
म्हंजे भांडवलशाहीत वाचवले गेलेल्यां फडतूसांची संख्या जास्त आहे असं म्हणायला हवं. नैका ?
--
कॅपिटल म्हंजे लिटरली मशिनरी, एक्विपमेंट वगैरे. लक्षावधी डॉलर्स ची शस्त्रे बनवली जातात. जे कॅपिटल आहे. व त्यामुळे युद्धात मरणार्यांची संख्याही कमी होते. For the same amount of damage to be caused ... less people actually die (compared to yesteryear wars in which more of a face to face fight was more common). This is not to say that face to face fight has been eliminated completely. पण आज युद्धांचा परिणाम हा फेस टू फेस लढाई पेक्षा शस्त्रास्त्रांद्वारे केलेल्या विध्वंसाच्या इन्टेन्सिटीवर अवलंबून असतो. यात भांडवल भांडवलावर मात करायचा यत्न करते. पण labor(soldier) becomes less and less relevant and hence less and less subject to risk (hazard).
सोशल सेक्युरिटी नसती तर - (१)
सोशल सेक्युरिटी नसती तर -
(१) एक तर लोकांनी जबाबदारी घेऊन अधिक पैसे मिळविले/साठविले असते.
किंवा
(२)एकमेकांचा गळा कापला असता, चोर्या-डाके घातले असते.
किंवा
(३) हे दोन्ही झाले असते................................................. अर्थात ऑर् वापरलयामुळे तीसरा मुद्दा अध्याहृतच होता पण परत केला इन केस.
.
अर्थात अनार्की टाळता आली नसती. पण अर्थात आय वंडर रुझवेल्ट (त्यांनीच केली ना सोशल सेक्युरिटी सुरु?)येण्याआधी, अनार्की कशी काय नव्हती?
.
कॉम्प्लेक्स आहे बाबा.
अनार्की येण्यासाठी बहुसंख्य
अनार्की येण्यासाठी बहुसंख्य लोकांना अनार्की येण्यामुळे गमावण्यासारखं काही नसलं पाहिजे.
गमावण्यासारखं काही नाही असे लोक १० टक्केच असतील तर अनार्की येत नाही कारण ९० टक्के लोकांचे हितसंबंध व्यवस्थेत गुंतलेले असतात. असे लोक ४०% वगैरे असतील तर अनार्की येऊ शकते.
जर तसा तो कुणीच केला नाही, तर
जर तसा तो कुणीच केला नाही, तर इकडे कुणी कडवे कम्युनिस्ट नाहीत असं घोषित कराल का?
जर लेखाचे टायटल "डाव्या/समाजवादी राजवटीची व्यवच्छेदक लक्षणे" असे केले तर लगेच मान्य करीन की इथे कोणी कम्युनिस्ट नाही म्हणुन.
तसेही हिटलरच्या पक्षाच्या नावात पण सोशॅलिस्ट असा शब्द होता ना.
गडबड
>>जर लेखाचे टायटल "डाव्या/समाजवादी राजवटीची व्यवच्छेदक लक्षणे" असे केले तर लगेच मान्य करीन की इथे कोणी कम्युनिस्ट नाही म्हणुन.
डावे आणि फॅसिस्ट हे मूलतःच वेगवेगळे मानून तुम्ही कदाचित पोथीनिष्ठतेचा गोंधळ करता आहात. तुम्हाला हे रोचक वाटेल कदाचित. आणीबाणी आणणाऱ्या इंदिरा गांधींमध्येही फॅसिस्ट प्रवृत्ती होत्या. आणि भारतातल्या डाव्यांमधल्या फॅसिस्ट प्रवृत्ती गो.पु. देशपांड्यांनी आपल्या 'उद्ध्वस्त धर्मशाळा' ह्या नाटकात परिणामकारकरीत्या मांडल्या आहेत. अर्थात, कम्युनिस्ट पक्षातल्या त्यांच्या दांडग्या अनुभवांवरच नाटक आधारित आहे.
डावे फॅसिस्ट
>> हरकत नाही. तसे नसेल तर मग लेखाचे टायटल "डाव्या फॅसिझम ची व्यवच्छेदक लक्षणे" असे करा.
अजूनही गोंधळ होतो आहे असं म्हणेन. डाव्यांमधले काही फॅसिस्ट असतात, पण सगळे फॅसिस्ट काही डावे नसतात. त्यामुळे असं शीर्षक फक्त डाव्यांमधल्या फॅसिस्टांकडे बोट दाखवणारं आणि म्हणून (लेखातला मजकूर पाहता) अयोग्य ठरेल.
मला काय म्ह्णायचे आहे. सर्व
मला काय म्ह्णायचे आहे. सर्व डावे फॅसिस्ट हुकुमशहा असतात. हुकुमशाही/दडपशाही हे डाव्यांचे व्यवच्छेदक लक्षण आहे, इतके की डावे फॅसिस्ट म्हणणे म्हणजे द्विरुक्ती होइल.
असे कीती उजवे फॅसिस्ट होते? हिटलर पण सोशॅलिस्ट हुकुमशहा होता. मुसोलोनी च्या बिचारड्या राजवटीला फॅसिस्ट म्हणणे म्हणजे हुकुमशाहीचा अपमान आहे.
डाव्यांमधले काही फॅसिस्ट असतात
हे मुळात चुक आहे, सर्व डावे हुकुमशहा असतात.
सत्ता
>> सर्व डावे फॅसिस्ट हुकुमशहा असतात. हुकुमशाही/दडपशाही हे डाव्यांचे व्यवच्छेदक लक्षण आहे, इतके की डावे फॅसिस्ट म्हणणे म्हणजे द्विरुक्ती होइल.
असे कीती उजवे फॅसिस्ट होते? हिटलर पण सोशॅलिस्ट हुकुमशहा होता. मुसोलोनी च्या बिचारड्या राजवटीला फॅसिस्ट म्हणणे म्हणजे हुकुमशाहीचा अपमान आहे.
तुम्ही बहुधा फक्त सत्ताधारी लोकांविषयी बोलत आहात. 'डावे' किंवा 'उजवे' ह्या संज्ञा विचारसरणीशी संबंधित असाव्यात. त्यामुळे सगळे डावे किंवा उजवे सत्ताधारी असत नाहीत. ह्याउलट एकाधिकारशाहीवादी सत्ताधारी फॅसिस्ट असण्याची लक्षणं दाखवेल, मग तो स्वतःला उजवा म्हणो की डावा.
नाही नाही. सत्ता असो नसो.
नाही नाही. सत्ता असो नसो. डावे जिथे जमेल तिथे हुकुमशाही राबवतात. घरात, मित्रांमधे, अश्या संस्थळावर.
आणि जिथे जमत नाही तिथे तिथल्या सत्ताधार्यांना सलाम ठोकतात.
आणि तसाही हा लेख सत्ते बद्दल चा च आहे.
पाहिजे तर "सत्ताधीश डाव्यांची व्यवच्छेदक लक्षणे" असे टायटल करा.
वादापुरतं हे गृहितक मान्य
वादापुरतं हे गृहितक मान्य करू. पण उजवे अशी हुकुमशाही राबवतच नाहीत, किंवा नगण्य राबवतात असं तुमचं म्हणणं आहे का?
असतील राबवत्, पण प्रमाण खुपच कमी, त्यामुळे हुकुमशाही हे उजव्यांचे व्यवच्छेद्क लक्षण होऊ शकत नाही. आणि त्या राबवण्यात ही स्टॅलिन/ माओ वगैरे उंची ( कींवा खोली ) अजिबात गाठलेली नसते.
अगदी झार च्या राज्यात पण इतकी दडपशाही नव्हती. म्हणुनच लेनिन वगैरे रशियातुन पळुन जाऊ शकले. लेनिन आल्यावर फक्त मृत्यु.
पण डावे = हुकुमशाही असे समिकरण आहे. डावे = सत्तापिपासु पणा असेही एक समिकरण आहे.
चिंज - माझ्या बरोबरीने
चिंज - माझ्या बरोबरीने तुम्हाला ही "विनोदी" श्रेण्या मिळु लागल्यात. हे तुमच्या साठी चांगले लक्षण नाही. कदाचित माझ्यासारख्या डुकरीणीशी कुस्ती करायला तुम्हाला शेणात उतरावे लागलेले दिसतय.
पण शेण हा आपला एरीया आहे, हे तुम्हाला माहीती असेलच. और हर डुकरीण अपने शेण मे शेर होती है
अवांतर
>> चिंज - माझ्या बरोबरीने तुम्हाला ही "विनोदी" श्रेण्या मिळु लागल्यात. हे तुमच्या साठी चांगले लक्षण नाही. कदाचित माझ्यासारख्या डुकरीणीशी कुस्ती करायला तुम्हाला शेणात उतरावे लागलेले दिसतय.
पण शेण हा आपला एरीया आहे, हे तुम्हाला माहीती असेलच. और हर डुकरीण अपने शेण मे शेर होती है
हे मुद्द्यापासून अवांतर आहे. त्यामुळे माझा पास. आपले विचार स्पष्ट केल्याबद्दल धन्यवाद.
असं लेबल लावायला लॉरेन्स
असं लेबल लावायला लॉरेन्स ब्रिटच्या लेखालाच प्रमाण मानायचं असेल, तर १४ही लक्षणं घ्यायला हवीत. अजून कोणा अभ्यासकाला काही वेगळी समान लक्षणं दिसली असतील/दिसतील. आपल्याला फॅसिझमची जी व्याख्या पटते किंवा जी लक्षणं जास्त अॅप्ट वाटतात, त्यात ती राजवट बसत असेल, तर म्हणायचं त्या राजवटीला फॅसिस्ट. हा.का.ना.का. ;)
सामान्य जनतेच्या मनात लष्कर
सामान्य जनतेच्या मनात लष्कर आणि सैनिक यांच्याबद्दल प्रमाणापेक्षा जास्त प्रेम असणं किंवा दिवसेंदिवस ते वाढत जाणं हे ही एक लक्षण म्हणता येईल(तिकडे आपले जवान सीमेवर मरत असताना तुम्ही इथे सरकारवर टीका करूच कशी शकता यासारखी असंबद्ध वाक्ये सतत कानावर पडणं ). लष्कर आणि त्यातील अधिकारी जनतेपासून जितके दूर तितकं चांगलं.
यासंदर्भात काही लिहायची इच्छा आहे प्रयत्न करतो
लष्कर आणि त्यातील अधिकारी
लष्कर आणि त्यातील अधिकारी जनतेपासून जितके दूर तितकं चांगलं.
याच्याशी सहमत आहे. व्ही.के सिंग हे खासदार आणि त्यातून मंत्री झालेले फार पटलेलं नाही. नॉर्मल जनता आणि (आजी/माजी) सैनिक यांच्या विचार करण्याच्या पद्धतीत खूप मोठा फरक असतो. आत्ताच्या डिबेटमध्ये सैन्याला मध्ये आणलं हे देखील चूक आहे.
देशभक्ती ही संकल्पना
देशभक्ती ही संकल्पना अतिशयोक्तीपूर्ण आहे असे नागराज मंजुळे परवा एका मुलाखतीत म्हणाला. मी त्याच्याशी सहमत आहे. स्वतंत्र सार्वभौम लोकशाही असलेल्या देशात देशभक्तीची गरज नाही. थोडेसे सामाजिक भान, स्वयंशिस्त आणि देशाबद्दलचे प्रेम देशाला प्रगत बनवण्यासाठी पुरेसे आहे. त्यासाठी सामान्य माणूस देशभक्त असण्याची गरज नाहि. आणि नकोच.
लेखाचा अनुवाद छानच आहे.
लेखाचा अनुवाद छानच आहे. लक्षणंही बरीचशी चपखल.
कोणताही उद्देश न प्रकट करता सहजच या लेखाचा अनुवाद सध्या टाकणं म्हणजे साधारणपणे दादरी प्रकरणाच्या आसपास सहजच आपला "हिंदू धर्मातील गायीचे महत्व" असा लेख निरागसपणे टाकण्यासारखं आहे. ;)
पुन्हा एकदा.. अनुवाद छान.
व्यवच्छेदक?? कसे काय?
ही लक्षणे कोणत्याही राजवटीला लागू होतात, केवळ 'फॅसिस्ट' नव्हे.
प्रत्येक लक्षणाचा विचार केल्यास ते जगातल्या कोणत्याही प्रकारच्या (उदा. कम्युनिस्ट, भांडवलशाही, सैनिकी, धार्मिक किंवा तथाकथित मुक्त लोकशाही) राजवटींना लागू होते.
त्यांचा वापर सर्वच राजवटींकडून होतो. वापराच्या प्रमाणात डावे-उजवे (उन्नीस-बीस).
'फासिस्ट, हुकुमशाही, एकाधिकारशाही, तानाशाही' अशा प्रकारची शेलकी विशेषणे प्रस्थापित राजवटीचा विरोध करताना नेहमीच वापरली जातात.
ती झारविरुद्ध वापरली गेली त्याच रशियात स्टालिनविरुद्धही वापरली गेली.
ती इंदिरा गांधींविरुद्ध वापरली गेली तशीच नरेन्द्र मोदींविरुद्धही वापरली जात आहेत.
राजवट, तिच्यातून प्रत्यक्ष फायदा होणारे लोक/विचारवंत, तिला योग्य मानणारी सामान्य जनता
विरुद्ध
विरोधक, त्यांचे हितसंबंध असलेले लोक/विचारवंत आणि विरोधक जनता
हा लढा नेहमीच सुरू असतो.
हिटलर,पॉलपॉट,मुसोलिनी, सालाझार, पापाडोपौलोस, पिनोशे आणि सुहार्तो या लोकांची नावे घेताना स्टॅलिन, माओ, डेंग जिआओपिंग, इंदिरा गांधी किंवा इस्लामिक स्टेट हेही अशाच लढ्याचे भाग आहेत हे लक्षात ठेवले पाहिजे.
'व्यवच्छेदक' आणि 'फासिस्ट' या दोन्ही शब्दांना आक्षेप यासाठी की ही कोणत्याही महत्त्वाकांक्षी राजवटीची लक्षणे ठरतात.अशा राजवटींमध्ये अनेक प्रस्थापित बाबींना धक्का पोचतो. उलथापालथी होतात. त्यातल्या काही यशस्वी ठरतात तर काही अपयशी.
ज्या राजवटींची नावे वर घेतली आहेत त्या अपेशी ठरल्या. पण अशा अनेक इतर राजवटी यशस्वीही ठरल्या आहेत आणि त्यांच्यामुळे अंतिमतः त्या-त्या समाजाचा उत्कर्षही झालेला आहे. (राजेशाही ही एक प्रकारची हुकुमशाहीच होती.)
उलगडून सांगा
>> ही लक्षणे कोणत्याही राजवटीला लागू होतात, केवळ 'फॅसिस्ट' नव्हे.
मुद्दा कळला नाही. ती 'व्यवच्छेदक लक्षणं आहेत' असा दावा असल्यामुळे एखाद्या राजवटीला ती लक्षणं कितपत लागू होतात त्यानुसार ती राजवट किती फॅसिस्ट ते ठरतं. म्हणजे ही लक्षणं कोणत्याही राजवटीला लागू होऊ शकतातच. त्यामुळेच, 'केवळ फॅसिस्ट' म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे तेच कळलं नाही. लेखात म्हटलं आहे की 'फॅसिस्ट' हे विशेषण एखाद्या राजवटीला कितपत लागू पडतं ते तिच्या गुणवैशिष्ट्यांनुसार ठरतं. तुमच्या मते 'फॅसिस्ट' हे विशेषण (लेखात दिलेल्या किंवा इतर) गुणवैशिष्ट्यांवरून न ठरता त्या राजवटीच्या हाताबाहेर असलेल्या काही घटकामुळे खरं ठरतं का? (उदा. जात जशी जन्मावरून ठरते तद्वत) की आणखी काही?
>> पण अशा अनेक इतर राजवटी यशस्वीही ठरल्या आहेत आणि त्यांच्यामुळे अंतिमतः त्या-त्या समाजाचा उत्कर्षही झालेला आहे. (राजेशाही ही एक प्रकारची हुकुमशाहीच होती.)
पुन्हा मुद्दा समजला नाही. राजवट 'यशस्वी' होते म्हणजे नक्की काय? आणीबाणीच्या काळात रेल्वे वेळावर धावत होत्या हे त्या राजवटीचं यश होतं, ह्या अर्थानं का? आणि 'अंतिमतः उत्कर्ष' म्हणजे तरी नक्की काय? ब्रिटिशांनी पोस्ट, रेल्वे वगैरे आणली किंवा सतीवर कायद्यानं बंदी आणली म्हणजे त्यांनी आपला अंतिमतः उत्कर्षच केला का? आणि अंतिमतः उत्कर्ष करणारी राजवट फॅसिस्ट असू शकते की नाही?
माफक प्रयत्न : उत्तरे
१. किती फॅसिस्ट ते ठरतं. >>> फासिझम या शब्दाची व्याख्या - "an authoritarian and nationalistic right-wing system of government and social organization ". त्यात 'किती' फॅसिस्ट हा प्रश्न येत नाही. फासिस्ट म्हणजे उजवे आणि राष्ट्रवादीच! इतर राजवटी - जसे सोशालिस्ट, मिलिटरी वगैरे तशा नसू शकतात.
२. राजवट 'यशस्वी' होते म्हणजे नक्की काय?>> उदा. चीन. व्याख्येने फासिस्ट (उजवी) नाही, एकाधिकारशाही, हुकुमशाही आहे. पण देशाचा उत्कर्षही झालेला आहे हे अमान्य करताच येत नाही. किंवा अतातुर्क केमाल पाशाची राजवट - फासिस्ट नाही, परंतु एकाधिकारशाही. देशाचा उत्कर्ष झाला.
उदाहरण
>> उदा. चीन. व्याख्येने फासिस्ट (उजवी) नाही, एकाधिकारशाही, हुकुमशाही आहे. पण देशाचा उत्कर्षही झालेला आहे हे अमान्य करताच येत नाही.
परवाच एक चिनी चित्रपट पाहात होतो. एका सैनिकी कारखान्यातल्या कामगारांच्या मुलाखतींवर आधारित होता. कामगारांचे अनुभव अतिशय विदारक होते. एकच उदाहरण सांगतो : धोरण बदललं म्हणून सबंध कारखाना शेकडो मैल दूरवर स्थलांतरित करण्यात आला. सगळे कामगार आपापलं आयुष्य सोडून स्थलांतरित झाले. दुसरा पर्यायच नव्हता. बोटीने नव्या जागी जात असता मध्ये काही तासांचा थांबा होता. सर्व कामगार तिथे उतरले. परत जाण्याची वेळ आली तेव्हा अचानक एका बाईच्या लक्षात आलं की आपलं मूल हरवलं आहे. साधारण राजवटीत अशा वेळी मागे थांबून, पोलिसात जाऊन, मुलाला शोधण्याचा प्रयत्न करून काही दिवसांनी माणूस नव्या जागी रुजू होईल. पण असा पर्यायच तिला नव्हता. आईला जबरदस्तीनं बोटीत बसवलं गेलं. त्यानंतर पुन्हा तिला आपलं मूल पाहायला मिळालं नाही. अनेक वर्षांनंतर ती बाई चित्रपटात हा अनुभव सांगते.
राजवट यशस्वी झाली ती अशी आणि अंतिमत: उत्कर्ष झाला तोही असाच. आणि एवढं सगळं होऊनही कुणीही सरकारवर जाहीर टीका करत नाही. कारण फट् म्हणता देशद्रोह व्हायचा.
(आणि अशा कितीही गोष्टी सांगितल्या तरीही इथे मला डावा समजणारे लोक आपलं मत बदलणार नाहीतच. पण ते असो.)
त्यात 'किती' फॅसिस्ट हा
त्यात 'किती' फॅसिस्ट हा प्रश्न येत नाही.
माझ्या मते हे काळंपांढरं, आहे-नाही या प्रकारचं गुणविशेषण नाही. गणितातली व्हेक्टरची कल्पना इथे उपयोगी पडेल. माझं म्हणणं असं की हे चौदा निकष एकाच व्हेक्टरचे चौदा कॉंपोनंट्स आहेत असं समजू. आणि त्या प्रत्येक कॉंपोनंटचं वेगवेगळ्या राजवटींसाठी काहीतरी मोजमाप करून त्याला ० ते १ मध्ये आकडा देऊ. तर आदर्श लोकशाहीत हे सर्व शून्य असतील आणि व्हेक्टर मॅग्निट्यूडही शून्य असेल. याउलट जसजशी या कॉंपोनंट्सची मॅग्निट्यूड वाढेल तसतशी या व्हेक्टरची मॅग्निट्यूड वाढेल. जास्तीत जास्त मॅग्निट्यूड १ असेल. हा बिंदू म्हणजे संपूर्ण फॅसिस्ट राजवट. आता या शून्य ते एक मॅग्निट्यूडमध्ये जसजसे आपण शून्यपासून वाढवत नेऊ तसतसं लोकशाहीचं प्रमाण कमी आणि फॅसिझमचं प्रमाण वाढेल. पांढऱ्यापासून काळ्यापर्यंत जाताना राखाडी रंग काळपट होत जातो तसं. यात कुठे रेष आखायची आणि यापलिकडे फॅसिझम अलिकडे लोकशाही असं सांगणं कठीण आहे.
अर्थात ही मांडणी फक्त समजून घेण्यासाठीच आहे. अशी मोजमापं शक्य नाहीत, तसंच ही १४ लक्षणं काही म्युच्युअली इंडिपेंडंट नाहीत. आणि हीच १४ अंतिम असंही नाही.
फासिस्ट म्हणजे उजवे आणि राष्ट्रवादीच!
मला वाटतं याला ऐतिहासिक कारणं आहेत. जेव्हा या राजवटी दिसल्या, त्यांच्या कार्यपद्धतींबद्दल मांडणी झाली तेव्हा डाव्या राजवटी नव्हत्या. त्यामुळे फक्त उजव्यांबद्दल मांडणी झाली. मला वाटतं शब्द थोडे गंडलेले आहेत. जगाने फॅसिझम - उजव्या राष्ट्रांकडून होणारा टोटॅलिटेरिअझम - आधी पाहिला आणि त्याला फॅसिझम असं नाव दिलं. मग त्यांच्या लक्षात आलं, की डाव्या सरकारांनीही हेच केलं. मग त्याच्यासाठीचा वेगळा शब्द करावा लागला, आणि तो सर्वसाधारण शब्द टोटॅलिटेरिअझम हा वापरला गेला. पण मुळात ही तंत्रं वापरून, कुठच्या का पोथीच्या आधारे जनमानसात आपण विरुद्ध ते अशी दुही निर्माण करून क्रूरपणे राज्यावरची पोलादी पकड राखण्याच्या प्रवृत्तीला सर्वसाधारण नाव नाही. हे थोडं पेडॅंटिक होतं आहे, पण शेवटी नक्की शब्द काय वापरायचा यावरच वाद आहेत.
पण शेवटी स्वातंत्र्य, समता, बंधुता, विविधतेशी समन्वय, सहिष्णुता, दयाभावना, कणव ही मूल्यं एका बाजूला आणि कट्टरता, समाजरूढींची जाचकता, आपल्यापेक्षा मोठं काहीतरी असलेल्या एंटिटींसाठी आपण त्याग करण्याची अपेक्षा - असा मूल्यव्यवस्थांचा संघर्ष होतो. लहानपणी 'देव देश अन धर्मासाठी, प्राण घेतलं हाती' हे गाणं आवडायचं. पण 'इमॅजिन देअर्ज नो हेवन, नो हेल, नो कंट्री नथिंग टु लिव्ह ऑर डाय फॉर' हे गाणं भुरळ घालायला लागलं. आदर्श लोकशाही आणि फॅसिस्ट प्रवृत्ती यांच्यातला संघर्ष म्हणा किंवा फरक म्हणा तो हा आहे.
सिस्टिम, व्यवस्था, समाजनियम, गावगाडा यांचा वैयक्तिक विचारांची आणि आयुष्यांची कुचंबणा करण्याइतपत शक्तिशाली वापर याला मी फॅसिझम/टोटेलिटेरियनीझम म्हणेन. त्या अर्थाने सरंजामशाही व्यवस्था हीही फॅसिस्ट होती. पण आता पुन्हा आपण शब्दांच्या व्याख्या आणि त्यांच्या मर्यादेपर्यंत पोचतो आहोत.
आत्तापर्यंतची चर्चा वाचली.
आत्तापर्यंतची चर्चा वाचली. गविंनी लिहिलेलं आहे की
कोणताही उद्देश न प्रकट करता सहजच या लेखाचा अनुवाद सध्या टाकणं म्हणजे साधारणपणे दादरी प्रकरणाच्या आसपास सहजच आपला "हिंदू धर्मातील गायीचे महत्व" असा लेख निरागसपणे टाकण्यासारखं आहे.
तर ताकाला जाऊन भांडं लपवणं, किंवा काहीतरी वैचारिक काडी टाकून कसं पेटलं हे बघत बसण्याचा माझा हेतू नाही. मांडणी मुद्दामच सर्वसाधारण केली होती, पण तरीही या सगळ्या लक्षणांचा भारतीय परिप्रेक्ष्यात विचार व्हावा हाच उद्देश होता. त्यामुळे माझी त्याबाबतची मतं मांडतो.
सर्वप्रथम, इथे अनेकांनी फॅसिस्ट आणि डावी अत्याचारी सरकारं असा भेदभाव केलेला आहे. जणू काही फॅसिस्ट प्रवृत्ती ही केवळ उजव्यांची मक्तेदारी असते. अनेकांनी ही लक्षणं अनेक डाव्या राजवटींना लागू पडतात हे दाखवून दिलेलं आहे. तेही योग्यच आहे. पण पुन्हा तेच, फॅसिस्ट प्रवृत्ती या उजव्या-डाव्या विचारसरणीच्या पलिकडे जातात. म्हणजे वरच्या उदाहरणांत जिथे 'धर्म' म्हटलं आहे तिथे 'कम्युनिस्ट विचारसरणी' असं लिहिलं तर तोच मुद्दा स्टालिनलाही लागू पडतो. (कदाचित 'पोथीनिष्ठता' हा शब्दप्रयोग जास्त व्यापक ठरेल.)
तुलना करायची तर डावे की उजवे अशी न होता फॅसिस्ट राजवट विरुद्ध लोकशाही अशी व्हायला हवी. आणि सर्वसाधारण आदर्श लोकशाहीपासून दूर एकाधिकारशाहीच्या दिशेने किती जवळ जात आहोत याचा अंदाज या लक्षणांवरून यायला हवा. याचा अर्थ कधीकाळी आदर्श लोकशाही होती असा दावा नाही. किंबहुना सर्वच जगात, जिथे लोकशाही ठीकठाक चालू आहे तिथेही सरकारं यातल्या अनेक मार्गांचा कमीजास्त प्रमाणात वापर करतातच. त्यामुळे शून्य फॅसिझम - संपूर्ण लोकशाही असं जगात कुठेच नसावं.
भारतातल्या सध्याच्या राजवटीला यातली अनेक लक्षणं लागू पडतात. त्यातली काही आधीच्या राजवटींनाही पूर्वापारपणे लागू होत होती, त्यामुळे या सरकारने काही नवीन केलेलं आहे असं नाही. मात्र काही गोष्टी अधिक तीव्रतेने वाढलेल्या दिसतात. उदाहरणार्थ 'विचारवंत व कलावंत यांच्याबद्दल तुच्छता आणि त्यांचं खच्चीकरण', 'धर्म आणि राज्यकर्त्यांचं साटंलोटं', 'राष्ट्रवादाचा जोरदार आणि सतत पुरस्कार', 'शत्रूसमुदायाकडे बोट दाखवून एकाच वेळी त्यांना बळीचा बकरा बनवणं आणि त्यांच्याविरुद्ध संघटित होण्यास कारण बनवणं', 'तीव्र लिंगभेद', 'गुन्हे आणि त्यांना शिक्षा देण्याबद्दल अतिरेकी तीव्र आचार (आचारपेक्षा विचार - या सगळ्या फुलीफुलींना अमुकअमुक केलं पाहिजे)'. आणि ही पावलं मला आधीच लोकशाहीपासून दूर असलेल्या भारतीय व्यवस्थेला अजून दूर नेणारी वाटतात.
मात्र इटली, जर्मनीमध्ये त्याकाळी झालं तसं, तितक्या तीव्र आणि हिंस्र प्रमाणात भारतात फॅसिझम पसरेल असं वाटत नाही. तो काळ वसाहतवादाचा होता, आणि या राष्ट्रांना नवीन वसाहती हव्या होत्या, आणि त्या इतर राष्ट्रांकडून लुटायच्या होत्या. भारत त्यामानाने फारच प्रचंड मोठा देश आहे, आणि आसपासचं वातावरणही तिथे होतं तसं नाही. त्यामुळे भारताची घटना फेकली जाऊन हुकुमशाही येईल, भारत हिंदुराष्ट्र म्हणून घोषित केलं जाईल, किंवा मुसलमानांसाठी छळछावण्या उघडल्या जातील वगैरे मला बिलकुल वाटत नाही. मात्र आदर्श लोकशाहीच्या जवळ जाण्याऐवजी दूर नेण्याचे प्रयत्न होत आहेत, आणि त्यांना यश मिळतं आहे हे मला काळजी करण्याजोगं वाटतं.
फासिस्ट
फासिझम हा शब्द चर्चाप्रस्तावात इतक्या सैलपणे वापरला असेल तर वादाचा प्रश्नच नाही. (तसा तो राजेश घासकडवी यांनी वापरला असेल असे वाटले नव्हते.)
परंतु, फासिझम या शब्दाची व्याख्या "an authoritarian and nationalistic right-wing system of government and social organization " अशी होत असेल (आणि प्रस्तुत चर्चा-प्रस्तावातल्या मूळ लेखावरून तेच ध्वनित होत असल्याने) तर मात्र न्यॅशनालिस्टिक आणि राईट-विंग या दोन्ही शब्दांवरून आक्षेप आहे.
हडेलहप्पी
कुठलंही मत, सुधारणा, देशभक्ती, देश-अभक्ती, श्रद्धा, अंधश्रद्धा वगैरे गोष्टी मुळापासून उखडण्याची किंवा प्रवेगपूर्वक राबवण्याची हडेलहप्पी ही त्या त्या संकल्पनेला/राबवणार्याला फॅसिस्ट बनवते असं वाटतं. रॅडिकल बनणं/बनवणं हे लोकशाहीला मारक असावं बहुधा. स्वतःच्या तत्त्वांशी कठोर निष्ठा असलेले लोक वंद्य ठरतात म्हणा, पण सौम्य तत्त्वांनिशी सौम्य निष्ठेने काम करणारेही हळूहळू बरंच काम करून जातात, तडजोड करूनही कार्यहानी होऊ देत नाहीत. (असं आपलं मला वाटतं.)
कोणताही राक्षसी वेग समाजाने एका लयीत चालण्यास अडथळा ठरतो असंही वाटतं. हा राक्षसीवेग साधण्यासाठी मग जनतेला भुलवणं, चिथवणं, मोहवणं, संमोहित करणं असे वशीकरणाचे मार्ग चोखाळावे लागतात, कुणाचातरी बागुलबोवा दाखवावा लागतो, कुणाचातरी बळीचा बकरा बनवावा लागतो.
भरमसाट खतं किंवा काल्ट्रिन देऊन भराभर झाड वाढवण्यापेक्षा मुळं भक्कम करीत करीत झाडाला हळूहळू वाढू देणं कदाचित झाडाच्या आणि वाढवणार्याच्या हिताचं असावं.
कुठल्याही सत्तेत अधीर, उतावळे लोक असले की फॅसिझ्मचा धोका वाढतो. खर्या नेत्याचा पेशन्स, धीर हा मुख्य गुण असतो.
विषयाशी संबधीत हा एक अतिशय
विषयाशी संबधीत हा एक अतिशय संतुलित लेख.
परंतु यातील काही गोष्टी मला तरी पटलेल्या नाहीत. मोदींची कार्यशैली हुकुमशहासारखीच आहे. गोमांसबंदी सारखे कालबाह्य नियम आणि त्यातून उद्भवलेल्या छोट्यामोठ्या घटना, समाजात वाढत असणारा किंवा आतापर्यंत छुपा असलेला 'आपण-ते' हा विचार हा नक्कीच चिंतेचा विषय आहे. पण तरिही त्याशिवाय सगळ्यांच पक्षांमध्ये दिसणारी सर्वसामान्यांबद्द्ल वाढती अनास्था ह्याबद्द्ल कोणाला बोलावं वाटत नाही हे भयानक आहे.
गरीब वैगेरे सोडा पण वेळेवर कर भरणारे, नियम पाळणारे आमच्यासारख्याना नागरिक म्हणून कसले हक्क आहेत? शुद्ध हवा नाही, उत्तम सोडा, वर्षानुवर्षं ठिकठाक रस्ते नाहीत, गावगुंडांची वाढती दादागिरी. पण या विषयावर माझ्या भोवतालच्यांनाही काही करायचं नाही हे जास्त चिंताजनक आहे. धर्म अफू आहे हेच खरं असावं असं वातावरण आहे. "गाय मारू नये" यावर तावातावाने बोलणार्^याला " गायीचं जाऊदे पण या अव्यवस्थेमुळे तुझा व तुझ्या माणसाचा मृत्यू प्रत्येक कुठेना कुठे दबा धरुन बसलाय त्याच्याविरुद्ध आपण काय करायचं?" असं विचारलं की त्याच्याकडे उत्तर नसतं.
आमच्याकडे प्रदुषणाविरोधात, झाडं तोडण्याविरोधात काढ्लेल्या मोर्च्यात चार डोकीही येत नाहीत पण सत्संग ओसंडून वहातात.
वरच्या काही प्रतिक्रिया बघून डाव्यांचं केंद्रीय सत्ता भारतात कधी बरं होती? हा प्रश्न पडला. त्यामुळे बंगालात किंवा केरळात त्यांनी काय केलं याची तुलना येते कुठे? ते सर्वांना मान्य होण्यासारख नव्हतं म्हणूनच एवढी वर्षे ते फक्त तिथेच राहिले ना?
+१-१
मला नेमकं हेच म्हणायचय. (म्हणजे तुम्च्या शब्दांतून जो अर्थ मला समजलाय, तो मला म्हणायचा आहे. काही दुरुस्ती असेल तर सांगावी.)
.
.
अर्रे... आम पब्लिक धत्तड तत्तड करत छान छान मज्जा मज्जा करता ना तेव्हाही मला हाच प्रश्न असतो.
पण कुणी भानावर असेल तर शपथ.
.
.
.
http://www.misalpav.com/node/22848 इथे एक लहानशी गोष्ट आहे.
नेमकं लिहिलय.
.
.
ही ती गोष्ट --
****गोष्ट सुरु****
नेहमीप्रमाणे, एक राजा असतो आणि त्याचा एक प्रधान असतो. ऑफ कोर्स तो प्रधान अगदी विश्वासू, मित्रवत इ.इ. असतो. दोघे एकदा असेच गप्पा मारत असतात. तेवढ्यात राजवाड्यासमोरून एक साधू चाललेला असतो. राजा त्याला आत बोलावतो आणि त्याचा आदर सत्कार करतो. साधू खुश. तो राजाला म्हणतो,
"हे राजन! तू माझा इतका आदर केलास तर मी आता तुला काही देणं लागतो. तर ऐक, आजपासून बरोब्बर १५ दिवसांनी या गावात एक वादळ येणार आहे. ते जादूचं वादळ असणार आहे. त्याचं वारं ज्याच्या कोणाच्या कानात जाईल त्याला वेड लागेल." एवढं बोलून साधू निघून गेला. राजा आणि प्रधानाची जाम फाटली. आता काय करायचं? दोघांना काही सुचेना. शेवटी रिवाजाप्रमाणे प्रधानाला एक युक्ति सुचली.
"सरकार, आपण एक काम करू. आपण एक एकदम एअरटाइट खोली बांधू आणि आपल्या कुटुंबियांसमवेत त्यात वादळ यायच्या आधीच जाऊन बसू. वादळ थांबलं की बाहेर निघू. शिंपल!"
राजा खुशच खुश. खोली वगैरे बांधून झाली. ठरल्याप्रमाणे वादळ आलं. वादळाची चाहूल लागताच हे दोघे आपापल्या फ्यामिलीसकट खोलीत गेले आणि दार घट्ट लावून घेतलं. थोड्यावेळाने वादळ शमलं. सगळं काही स्थिरस्थावर झाल्याची खात्री करूनच राजा आणि प्रधान खोलीबाहेर पडले. बघतात तर काय, बाहेर राज्यातले बाकीचे सगळेच लोक वेडे झाले होते. नुसता धिंगाणा चालू होता. कुणी नाचत होतं, कुणी गात होतं, कुणी रडत होतं, कुणी कपडे फाडत होतं. हे दोघेही बघतच राहिले. खोलीत जाताना हे असं होईल हे लक्षातच आलं नव्हतं त्यांच्या. हताशपणे दोघेही बाकीच्या पब्लिककडे बघत बसले. एक दोघांना त्यांनी समजवायचाही प्रयत्न केला. काही फरक पडला नाही. उलट हे दोघे आपल्यासारखे वागत नाही म्हणून लोकच त्यांच्या अंगावर धावून आले. हे दोघे घाबरले आणि त्यांनी परत खोलीत धाव घेतली. दार आतून लावून घेतलं आणि विचार करू लागले. ऑफ कोर्स, आयडिया प्रधानालाच सुचली.
"हुजुर, आता एकच उपाय दिसतो आहे. सगळे जसं वागतायेत ना, आपणही तसंच वागायचं."
"म्हणजे! आपणही वेडं व्हायचं? काय बोलताय काय तुम्ही प्रधानजी? कळतंय का तुमचं तुम्हाला तरी?" राजा ओरडला.
"अगदी बरोबर, अगदी हेच म्हणतोय मी. आणि महाराज, शहाणपण म्हणजे तरी काय? चारचौघे जसे वागतात तसं वागणं म्हणजे शहाणपण. आज शहाणपणाची व्याख्याच बदलली आहे. आपण निमूटपणे ते नवीन शहाणपण मान्य करायचं आणि कातडी बचावायची."
"अहो पण..."
"आता पण नाही नी बिण नाही... जीव वाचवायचा असेल तर एकच मार्ग... एऽऽऽ नाचोऽऽऽ धत्तड तत्तड धत्तड तत्तड"
****गोष्ट संपली****
"हे सगळं आता खूप वाढाल्य " वगैअरे कुणी म्हटलं की आश्चर्य वाटतं.
अर्रे ? सगळं धड होतं कधी ?
प्लीझ जागे व्हा हो. आपण सगळे असेच गटारित लोळत आहोत पूर्वीपासून.
आणि चुकून कुणी खरं बोलायचा प्रयत्न केलाच तर .....
असो.
"गाय मारू नये" यावर
"गाय मारू नये" यावर तावातावाने बोलणार्^याला " गायीचं जाऊदे पण या अव्यवस्थेमुळे तुझा व तुझ्या माणसाचा मृत्यू प्रत्येक कुठेना कुठे दबा धरुन बसलाय त्याच्याविरुद्ध आपण काय करायचं?" असं विचारलं की त्याच्याकडे उत्तर नसतं.
पण त्या व्यक्तीच्या प्रायॉरिटीज आपण कोण ठरविणार? त्याला इन्टेन्सली गाय मारण्याबद्दल वाटू शकतं तितकी बुद्धी नसे त्याच्याकडे की माणसं मरतायत ते लक्षात यायची. अॅव्हरेज आय क्यु काही मूठभर लोकांमुळेच कदाचित वरती गेलेला असतो बाकीचे मेंढ्यांसारखेच असतात.
याचा अर्थ मी गाय न मारण्याच्या पक्षात आहे असे नव्हे हे आधीच क्लियर करते.
.
आमच्याकडे प्रदुषणाविरोधात, झाडं तोडण्याविरोधात काढ्लेल्या मोर्च्यात चार डोकीही येत नाहीत पण सत्संग ओसंडून वहातात.
सगळेजण सत्संग आणि अध्यात्मिकतेवरच का घसरतात माहीत नाही. प्रदूषणविरोधी मोर्च्यात ४ टाळकीही येत नाहीत पण रेस्टॉरन्ट्स/सिनेमागृह मात्र तुडुंब वहाताना दिसतात म्हणा की. प्रत्येकवेळा ते सत्संगी आणि अध्यात्मिक लोकच का नजरेत येतात?
त्या व्यक्तीच्या प्रायॉरिटीज
त्या व्यक्तीच्या प्रायॉरिटीज आपण कोण ठरविणार?
माझ्या मते अंतराआनंदचा रोख ठराविक व्यक्तींकडे नसून व्यक्तीसमूहाकडे, समाजाकडे आहे. मूठभर माणसं अशी वागतात यामुळे फरक पडत नाही.
सगळेजण सत्संग आणि अध्यात्मिकतेवरच का घसरतात माहीत नाही. प्रदूषणविरोधी मोर्च्यात ४ टाळकीही येत नाहीत पण रेस्टॉरन्ट्स/सिनेमागृह मात्र तुडुंब वहाताना दिसतात म्हणा की. प्रत्येकवेळा ते सत्संगी आणि अध्यात्मिक लोकच का नजरेत येतात?
बाहेर खाणं किंवा चित्रपट बघणं या कृती समूहाने केल्या जात नाहीत. माणसं व्यक्तिगत किंवा कुटुंब या पातळीवर निर्णय घेऊन करतात. सत्संग आणि अध्यात्म यांच्या नावाखली ठरवून गर्दी जमा केली जाते. पर्यावरणासाठी मोर्चा आणि सत्संगाचे कार्यक्रम यांच्यात 'ठरवून जमा केलेली गर्दी' हे साम्य आहे.
पर्यावरणासाठी मोर्चा आणि
पर्यावरणासाठी मोर्चा आणि सत्संगाचे कार्यक्रम यांच्यात 'ठरवून जमा केलेली गर्दी' हे साम्य आहे.
अगदी अगदी.
अध्यात्माला माझा विरोध नाही पण तो व्यक्तिगत भाग असावा असं मला वाटतं.
तुलनेत मी अध्यात्मच का आणलं याचं दुसरं कारण म्हणजे ते तुम्हाला कृतीशील बनवण्याचा आभास निर्माण करत, कृतीशून्य बनवून टाकतं. आपण काही करावं, करू शकतो ही धारणा नष्ट करुन "तो" आहे, "तो" करेल व्यवस्थित अश्या भासात गैरसोयी सहन करत जगायला शिकवतं. पुढे जाऊन त्या गैरसोयी निर्माण करणारं बनवतं. त्यांचं समर्थन करायला शिकवतं. सामान्य माणसाचं नकळतपणे गुंडात रुपांतर करण्याची ताकद बाळगून असतं. शुची, अध्यात्म "फक्त मनाच्या शांततेसाठी" आणि व्यावहारिक जीवन त्याच्याजागी अशी फारकत तुझ्यासारखी हुशार व्यक्ती करु शकते पण बरेच जण हे पार्टीशन न करु शकल्याने स्वतःच्या समस्या त्या गुंगीत विसरु बघतात, विसरतात.
"एवढी माणसं जमतात" असं म्हणताना मला म्हणायचं असतं की "एवढा वेळ असणारी,तो देऊ शकणारी माणसं आहेत. पण स्वतःचं भलं करण्यासाठी वेळ देण्याची इच्छा कोणाला नाही." आज जे काही आजूबाजूला चाललं आहे त्यात बदल करण्यासाठी स्वतःत, स्वतःच्या जीवनशैलीत, विचारात बदल करावा लागेल. हा बदल करावा असं लोकांना वाटत नाही पण त्यांना देवळांच्या रांगेत घालवायला वेळ आहे.
शिनेमा बघणारी, पार्ट्यात वेळ घालवणारी ही माणसे आहेत पण तो काही सर्व समस्यांवरील एकमेव उपाय आहे, असं ती म्हणत नाहीत. अध्यात्म मात्र असा दावा करतं.
असो, हे काही विषयाला धरुन नाही.
मन, हो हे पूर्वी ही अस्तित्वात होतं असं म्हणून आताचे राज्यकर्ते त्यांची जबाबदारी झटकू शकत नाहीत. जेव्हा ही व्यवस्थेची वाट लागत होती तेव्हा एक सबळ विरोधी पक्ष म्ह्णून भाजपाने त्यांची जबाबदारी इतपत निभावली? गेल्या दोन निवडणूका तरी काँग्रेस दुर्बळ सत्ताधारी आणि भाजपा प्रबळ विरोधी पक्ष होता ( मला संसदेतील आकडेवारी नक्की नाही सांगता येणार) त्यावेळी लोकहित सोडून मंदीर, महाआरती आदी विषय तेव्हा भाजपाला महत्वाचे वाटत होते. तेव्हा "हे गेल्या सत्ताधारयांचं कुकर्म आहे असं दाखवण्याचा जो प्रयत्न सर्वच पातळ्यांवर होतो आहे ते मला चुकीचच वाटतं.
गेली कित्येक वर्षे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने होते, सारवजनिक संस्थांमध्ये वर्गण्या गोळा करुन सत्यनारायणाच्या पूजा घातल्या जातात, टीव्हीवर हिंदू पुराणांशी संबधीत मालिका लागतात, देवळे बांधली जातात, त्यांची संस्थानं होतात तरिही 'हिंदूहीत धोक्यात" अशी भावना निर्माण करण्यात हे लोकं यशस्वी झालेत याचं मला वाईट वाटतं.
कदाचित मला काय म्हणायचं आहे हे स्पष्ट नाही करु शकलेय . पण वेळ नाही. पुन्हा केव्हातरी.
तुलनेत मी अध्यात्मच का आणलं
तुलनेत मी अध्यात्मच का आणलं याचं दुसरं कारण म्हणजे ते तुम्हाला कृतीशील बनवण्याचा आभास निर्माण करत, कृतीशून्य बनवून टाकतं. आपण काही करावं, करू शकतो ही धारणा नष्ट करुन "तो" आहे, "तो" करेल व्यवस्थित अश्या भासात गैरसोयी सहन करत जगायला शिकवतं. पुढे जाऊन त्या गैरसोयी निर्माण करणारं बनवतं. त्यांचं समर्थन करायला शिकवतं. सामान्य माणसाचं नकळतपणे गुंडात रुपांतर करण्याची ताकद बाळगून असतं. शुची, अध्यात्म "फक्त मनाच्या शांततेसाठी" आणि व्यावहारिक जीवन त्याच्याजागी अशी फारकत तुझ्यासारखी हुशार व्यक्ती करु शकते पण बरेच जण हे पार्टीशन न करु शकल्याने स्वतःच्या समस्या त्या गुंगीत विसरु बघतात, विसरतात.
शब्दाशब्दाशी सहमत.
अध्यात्मामुळे मनःशांति मिळते हा तर एक मोठ्ठा बकवास आहे. अध्यात्मावर - केवळ "भावना दूखावल्या जातील" म्हणून लोक टीका करीत नाहीत. ( आणि जोडीला एक अत्यंत महत्वाची समस्या आहे व ती म्हंजे - बाबी वेगवेगळ्या असणे व तसे त्यांकडे पाहणे - या वृत्तीचा अभाव. अध्यात्म, हिंदुत्व/धर्म, देश, समाज, देव/दैव, संस्कृती ह्या सगळ्यांना एक्झॅक्टली एकच समजले जाते. )
--
"एवढी माणसं जमतात" असं म्हणताना मला म्हणायचं असतं की "एवढा वेळ असणारी,तो देऊ शकणारी माणसं आहेत. पण स्वतःचं भलं करण्यासाठी वेळ देण्याची इच्छा कोणाला नाही." आज जे काही आजूबाजूला चाललं आहे त्यात बदल करण्यासाठी स्वतःत, स्वतःच्या जीवनशैलीत, विचारात बदल करावा लागेल. हा बदल करावा असं लोकांना वाटत नाही पण त्यांना देवळांच्या रांगेत घालवायला वेळ आहे.
पण बघा की जिथून काहीही रिटर्न्स मिळण्याची शक्यता अत्यंत कमी असते (व तसा पुरावा अत्यंत कमी असतानाही) त्या देवासमोर पैसे अर्पण करताना स्वेच्छेने (कोणत्याही बळजबरीविना) व इदम-न-मम या भावनेतून अर्पण केले जातात.
इन्फॉर्मल इन्स्टिट्युशन्स इतक्या आहेत की फॉर्मल इन्स्टिट्युशन्स ची पर्वा सुद्धा कोणी करत नाही. निर्वाचन आयोगा सारखी उत्तम व निष्पक्ष फॉर्मल इन्स्टिट्युशन आहे. पण त्याकडे अगदी दुर्लक्ष करतो आपण. पण ती तशी का आहे यामागे काय कारण आहे याकडे दुर्लक्ष केले की बाकीच्या इन्स्टिट्युशन्स निर्माण करणे अवघड होऊन बसते. फक्त टी एन शेषन यांनी ती तशी घडवली एवढं एक वाक्य उच्चारलं की आपण सुखी होऊ शकतो. ती बिघडली कशी नाही ? एवढं करप्ट राजकारण असूनही निर्वाचन आयोगाची क्रेडिबिलिटी धोक्यात का आली नाही - त्याची कारणे कोणती - याकडे दुर्लक्ष करतो आपण.
खरंतर साऊंड फॉर्मल इन्स्टिट्युशन्स ह्या आपल्या सद्यस्थितीतील समस्यांवर किमान काही प्रमाणावर तरी चांगला उपाय आहे व आपल्या वृत्तीस पूरकही आहे असं मला वाटतं. अर्थात आज आत्ता शुक्रवारची संध्याकाळ आहे व मी जरा जास्त घेतलेली आहे त्यामुळे असं वाटत असेलही.
अध्यात्मामुळे मनःशांति मिळते
अध्यात्मामुळे मनःशांति मिळते हा तर एक मोठ्ठा बकवास आहे
गब्बर - पूर्ण व्यक्तीस्वातंत्र्य असलेल्या भारता सारख्या देशात, लोक सत्संगाकडे खूप प्रमाणात जात असतील तर नक्कीच त्यांना काहीतरी मिळत असणार?
लोक काय मूर्ख आहेत का स्वताचा पैसा आणि वेळ काहीच मिळत नसणार्या गोष्टीवर खर्च करायला?
अध्यात्मावर - केवळ "भावना दूखावल्या जातील" म्हणून लोक टीका करीत नाहीत.
काहीतरीच काय गब्बु, अध्यातमावर टिका करणे हे फॅड पूर्वी पासुन आहे. अगदी विखारी टिका होते काही कारण नसताना. अध्यात्म करणारी लोक कोणाचे काही खात नसतात तरी त्यांच्यावर मूर्ख , बेअक्कल अशी टिका होते.
अध्यात्म = कृतीशून्यता का? जिथे माणसाची मर्यादा येते फक्त तिथेच.
तुलनेत मी अध्यात्मच का आणलं याचं दुसरं कारण म्हणजे ते तुम्हाला कृतीशील बनवण्याचा आभास निर्माण करत, कृतीशून्य बनवून टाकतं. आपण काही करावं, करू शकतो ही धारणा नष्ट करुन "तो" आहे, "तो" करेल व्यवस्थित अश्या भासात गैरसोयी सहन करत जगायला शिकवतं. पुढे जाऊन त्या गैरसोयी निर्माण करणारं बनवतं. त्यांचं समर्थन करायला शिकवतं. सामान्य माणसाचं नकळतपणे गुंडात रुपांतर करण्याची ताकद बाळगून असतं.
हे जे तू म्हणतेस ते खूप खरं असलं तरी बहुसंख्य वेळा अध्यात्माकडे व्यक्ती ही जीवनाच्या अनिश्चतेतून किंवा काहीजणांकरता नैराश्येतून वळलेली असते. बर्याच अशा गोष्टी असतात ज्यात आपली कृती काही नसते पण भोगावं आपल्याला लागतं. आपल्या मुलाबाळांकरता एका ठराविक मर्यादेबाहेर आपण करु शकत नाही हे जाणून , शेवटी हतबलतेने परिस्थितीला सामोरे जाण्याऐवजी काही प्रमाणात नियंत्रण आणण्याचा निदान आभास स्वतःच्या मनापुरता निर्माण करावा लागतो. बहुसंख्य लोक हे त्यातून अध्यात्माकडे वळतात.
.
आत्ता तू म्हणशील, जगात २ प्रकारचे लोक आहेत कृतीशील व कृतीशून्य. वर म्हटलच आहेस की अध्यात्म व्यक्तीला कृतीशून्य बनविते. हे सरसकटीकरण झालं. सत्य्साईबाबा (मी त्यांची फॅन नाही) यांनी शाळा/रुग्णालये उभारलेली आहे. अध्यात्मिक व्यक्ती मोर्च्यात भाग घेत नाहीत, फक्त देव पाण्यात घालून बसतात हे सिद्ध झालेले नाही, सर्व मोर्चेकरी नास्तिक होते हेदेखील नाही. हां वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अभाव हा ब्लेम अध्यात्म जरुर घेइल पण कृतीशून्यता नाही. कारण जिथे माणूस थिटा पडतो तिथे अध्यात्म सुरु होतं असं मला वाटतं.
चांगला धागा आणि चर्चा
फॅसिस्ट किंवा टोटॅलिटेरियन सत्ता हुकुमशाही असतात. हुकुमशहांना विनोदाचं वावडं असतं.
सध्या भारतात जे काही सुरू आहे ते बघता, भक्तांनाही राज्यकर्त्यांबद्दल केलेल्या विनोदांचं वावडं असतं. १६ मे २०१४ च्या आधी काही वर्षं जे राज्यकर्ते होते त्यांच्या नावानेही विनोद होत होते; आणि फार कोणी भावना पेटून उठत नव्हते. भक्तांचा इंटरनेटवरचा आवाज किती हे बघितलं तर आवाजी मतदानाने भक्त लोक हुकुमशहा निवडून द्यायला टपले आहेत असं वाटतं.
संपादकांना कल्पकता कात्रीची भेट !
डोळा ठेऊन दुसर्या लेखकाच्या प्रतिसादीयडोळ्यास काऊंटर करणार्या महनिय टेलरींग प्रित्यर्थ अनु रावांचा उपरोक्त प्रतिसाद हलवणार्या संपादकास खालील कल्पकता कात्री सप्रेम भेट ;)
By Pieter Bruegel der Ältere [Public domain], via Wikimedia Commons
वरच्या लक्षणांपेक्षा निराळं
वरच्या लक्षणांपेक्षा निराळं का कसं ते लक्षात येत नाहीये पण -
राज्यकर्ते म्हणजेच राष्ट्र/राज्य अशी मांडणी. देवकांत बारुआ यांना 'इंडिया इज इंदिरा' असा नारा दिला होता. आता ऑर्गनायजर तेच करतोय. मागे एफटीआयआय संदर्भात गजेंद्र चौहानला विरोध म्हणजे हिंदूविरोध म्हणून झालं, आता हे नवीन(!) -
RSS: IITs are being used for ‘anti-India, anti-Hindu’ activities
किंचित दुरुस्ती
सिव्हिल वॉर म्हणजे ज्यात आर्मी इन्व्हॉल्व्ड नसून कथित सिव्हिलेअन्स गट एकमेकांशी लढतात ती लढाई असे मला वाटते.
किंचित दुरुस्ती. सिव्हिल वॉर म्हणजे ज्यात आर्मी इन्व्हॉल्व्ड
असून
कथित सिव्हिलेअन्स गट
आर्मीच्या गटांसोबत
एकमेकांशी लढतात ती लढाई असे मला वाटते. (कित्येकदा आर्मीमध्येच गट पडतात. तर कधी कधी प्रामुख्याने आर्मी विरुद्ध स्थानिक जनतेचा उटहव, असलं कैतरी चित्र होतं. गदारोळात प्रशासन कोलमडतं, अराजक येतं, काय सुव्यवस्था खड्ड्यात जाते, अशी अवस्था. नागरिकांच्या निष्ठा दोलायमान असतात. पूर्वीच्या सरकारचं नक्की औरस प्रतिनिधी कोण; ह्याबद्दल संभ्रम असतो. विविध गट दावे अक्रीत असतात. )
संदर्भ -- रशिया, चीन, अमेरिका ह्या सर्व ठिकाणचे सिव्हिल वॉर.
किम्वा अगदि इंग्लंडचेही सिव्हिल वॉर.
ज्यात मिलिटरी कमांडर क्रॉमवेल ह्यानं खुद्द राजेशाही उखडून फेकली होती इंग्लंडमधून काही वर्षांसाथी.
(आता परंपराप्रिय , एक्सलग हजार वर्शांच्या सलग राजेशाहीचा वारसा सांगणारे ब्रिटिश हे टॅक्निकली मान्य करोत नैतर न करोत.
पण ही फ्यक्ट आहे.)

आभार. 'करू का?' असं म्हणत मी
आभार. 'करू का?' असं म्हणत मी अतीच आळस केला. (आणि माझ्याआधी तुम्ही अनुवाद केल्यामुळे तो फळाला आला! ;-))
***
इथल्या अनेक लोकांना 'हे सगळं डावे(च्च) लोक करतात...' असं ठासून सांगावंसं वाटतं आहे. ते का याचं कोडं काही उलगडत नाहीय. कारण डावे सत्ताधीश असं करत नाहीत, असा इथे लेखकाचा वा धागाकर्त्याचा दावा दिसला नाही. किंबहुना फॅसिस्ट राजवटी कोणत्या विचारसरणीच्या असतात याबद्दल या लेखात कुणीच काहीच म्हणत नाहीय. ज्या राजवटी फॅसिस्ट असतात, त्यांचे हे गुणधर्म असल्याचं दिसतं असा सरळसाधा मुद्दा आहे.
१४ पैकी साडेतेराच गुणधर्म दिसताहेत, मग हे काही फॅसिस्ट नाहीत - असली हास्यास्पद तर्क मी तरी करणार नाही. कारण हे गणित नाही. ही काही निरीक्षणाधारित निष्कर्ष आहेत.
खालची लक्षणं सध्या लागू होताहेत असं मला वाटतं आहे. (या वाक्याचा अर्थ जगातल्या कोणत्याही भाषेत 'आधीच्या, पलीकडल्या, अलीकडल्या कोणत्याच राजवटींत ही लक्षणं कधीच नव्हती' असा होत नाही.)
१. राष्ट्रवादाचा जोरदार आणि सतत पुरस्कार हे दिसतं आहे आजूबाजूला फारच मोठ्या प्रमाणात. झेंड्यावरून आणि राष्ट्रगीतावरून मुस्लीमधर्मीयांना त्यांची देशभक्ती सिद्ध करावी लागल्याच्या किमान ३ ताज्या बातम्या ऐकल्या आहेत नुकत्याच.
४. सैन्याचं, सुरक्षा रक्षण व्यवस्थेचं वर्चस्व याबद्दल अलोट प्रेम आपल्याकडे आहेच. त्याचा सध्याच्या राजवटीशी संबंध नसावा. (लोकशाहीच्या यशापयशाबद्दल मागे घेतलेल्या सर्वेक्षणात लोकांचा कल लोकांशी थेट संबंध न येता सत्ता राबवणार्या संस्थांवर जास्त आणि थेट संबंध येणार्या संस्थांवर कमी दिसला होता. उदाहरणार्थ, न्यायालय, निवडणूक आयोग आणि लष्कर - विश्वासार्ह. संसद, लोकप्रतिनिधी, पोलीस - अविश्वासार्ह. हे लोकशाहीच्या दृष्टीनं चिंताजनक आहे.) आपल्याकडे सैन्याबद्दल अनाकलनीय प्रेम असल्याचं पूर्वापार दिसतं. शहीदांबद्दलचे प्रेमादराचे लोट, असंबद्धपणे कोणत्याही बाबतीत त्यांचे संदर्भ खेचून आणणं, लष्कराला पाचारण केलं की सगळे प्रश्न सुटतील असं मानणं, सरहद्दीवर काही धोका निर्माण झाला की सगळे हेवेदावे विसरून देशभक्तीची नि एकतेची लाट उसळणं हे आधीपासूनच आहे.
६. मीडियावर प्रचंड प्रमाणावर नियंत्रण अजून प्रत्यक्ष नियंत्रण प्रचंड नाही. पण अप्रत्यक्ष नियंत्रणाबद्दल काही गंभीर प्रश्न विचारता येतील असं गेल्या काही दिवसांचं चित्र आहे खरं.
७. राष्ट्रीय सुरक्षेबद्दलचा गंड हेही जुनंच आहे. का-ही-ही झालं की त्यात 'परकीय शक्तींचा हात' असण्याचं आपलं दुखणं जुनंच आहे.
८. धर्म आणि राज्यकर्त्यांचं साटंलोटं हे कधी नव्हे इतकं आत्ता दृगोच्चर झालं आहे, होतं आहे. ऊठसूट दुखावणार्या धार्मिक भावना नि त्या भावनांना येत चाललेलं, येत गेलेलं हिंसक टोक पाहता ते कुणी नाकारू शकणार नाही. पण हे याआधीच्याही राजवटीत होतं. फक्त आधीच्या धर्माचं नाव धर्मनिरपेक्षता असं होतं.
९. मोठ्या कंपन्यांचे हात बळकट करणं हा सध्याच्या राजवटीतला प्रमुख आक्षेपाचा मुद्दा असेल, बाकी धर्मरंग आणि जातीय विद्वेषाचे मुद्दे निव्वळ मुखवटे असतील, असं भाकीत एका ज्येष्ठ स्नेह्यांनी १६-मे-पूर्व काळात केलं होतं, त्याची आठवण झाली. हे घडतं आहेच. पण ते आधीच्या राजवटीहून निराळं नाही.
११. विचारवंत व कलावंत यांच्याबद्दल तुच्छता आणि त्यांचं खच्चीकरण हे फारच प्रकर्षानं घडताना दिसतं आहे हे कुणीच नाकारणार नाही. हगल्यापादल्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊन कलाकारांवर बंद्या लादणं, अटका करणं, दंगली घडवणं, विद्यापीठं बंद करण्याची भाषा होणं, त्यांना विचारजंत-निष्क्रिय-फुकट्ये अशा नावांनी संबोधलं जाणं, अभिव्यक्तिस्वातंत्र्याला स्तोम म्हणणं.. हे सगळं अंगावर यावं इतकं वाढलं आहे.
१३. भ्रष्टाचार आणि बगलबच्चेगिरी जुनंच.
१४. भ्रष्ट किंवा खोट्या निवडणुका हॅहॅहॅ! हेही जुनंच.
यांतली अनेक लक्षणं आधीच्या तथाकथित निधर्मी, डावे टिळे लावणार्या राजवटींमध्येही होती, प्रश्नच नाही. किंबहुना राजवट कोणत्या विचारसरणीची आहे, त्यानुसार विरोधकांना लावायच्या लेबलांमध्ये बदल होतो, असं दिसतं. दर वेळी धरला डावा की चिरडला, असं झालेलं दिसत नाही. कधी विरोधकांचं नाव बूर्झ्वा असं असतं, कधी सनातनी; कधी कम्युनिस्ट, कधी मडब्लड, कधी देशद्रोही. लेबलं बदलतात. पण 'त्यांच्या' पायाखाली काय जळतं आहे ते दाखवल्यामुळे सध्या 'आपल्या' बुडाखाली लागलेली आग कशी काय आपोआप विझते, ते माझ्या समजुतीपलीकडचं आहे. उलट तूर्तास आधीच्या राजवटींपेक्षा या लक्षणांत भरच पडल्याचं चित्र आहे. तरीही लोकांना भीती कशी वाटत नाही, नवल आहे.
बाकी माझ्या मते, लेखाचा मुद्दा 'तुमचे राज्यकर्ते वाईट, आमचे चांगले' असा नसून; अमुक अमुक लक्षणांपैकी बहुसंख्येने एकवटतात तेव्हा त्या राजवटी फॅसिस्ट ठरतात हे दाखवण्याचा आहे. फॅसिस्ट राजवटीही कल्याणकारी असू शकतात अशा आशयाचं खाली तिरशिंगराव म्हणताहेत, हे मला मान्य आहे. फक्त त्यातली आकडेवारी मला थोडी गोंधळाची वाटते. आधुनिक काळातल्या किती टक्के फॅसिस्ट / हुकूमशाही राजवटी बहुजनांसाठी दीर्घकालीनरीत्या कल्याणकारी ठरल्या होत्या? मला विदा पाहायला आवडेल. माझीच भीती थोडी कमी होईल.