जाहिराती
जाहिराती
जाहिरातदार - अंडानी प्रा. लि.
"नमस्ते. नमस्ते. मितरों... भाईयों अने बेहनो. अने अन्य सर्व लोक... केम छो बेनजी, डिकरा मजामा नें? सरस... तुमचा मराठीमंदी काय बोले? हा, वा वा."
"तो मितरों, तुमाला वाटला अशेलच की मी इथे मराठी साइटवरती कशामाटे आलो आहे. मारु नाम... माझा नाव अंडानी. मी अंडानी प्रायवेट लिमिटेडचा सोल प्रोप्रायटर. तो माजा काम इथे अशा की तुमाला माहिती पडलेलीच असेल की आता गेला दीड वर्सात नवीन सिस्टिम आलेली आहे. तेव्हा तुम्ही पन खूस आहात, आमी पन खूस आहेत. आमी ज्यास्त खूस आहोत, पन त्ये बात व्येगली."
"तर मला बोलायचा असा आहे, की नवीन सिस्टममध्ये काई नवीन गोस्टी हायेत. तेसाठी मग आपल्याला काही... काय बोलते रे तेला.... हां, काई व्येगल्या पद्धतीने काम करवा होय. मग तेसाठी काई नवीन प्रोडक्ट्सची जरूरत पडते. म्हनून आमची कंपनीकडून आमी काही नवीन प्रोडक्ट्स घेऊन आलेली आहोत. आता प्रोडक्ट म्हनलं की मार्केटिंग आलाच. मार्केटिंग म्हंटलं की जैरात, ऐडवर्टाइजिंग वगैरे आलाच ना. नैतर अच्छे दिन कसे येनार. हा हा हा."
"तेवा सर्व सेगमेंटमंदी रीचाउट करन्यामाटे आमी ऐसीच्या दिवाळी स्पेसलमंदीपन आमच्या प्रोडक्ट्सच्या एडवर्टाइजमेंट्स करतो आहोत."
"पेल्ले ऐसीवाले एडिटर लोग दिवाली शुरू होनापेल्लेच तेंचा स्पेसल सुरू करते. आनि रोज त्रण-चार आर्टिकल पब्लिश करते. एटलामाटे आमी पण फिक्स करे... फिक्स केलं के आमचे अॅडवर्टाइजमेंट पण रोज एक नवीन प्रोडक्टवाली आवसे."
"तो मितरों, अंडानी प्रोडक्ट्सना वतीने दिवालीमाटे बहुत शुभेच्छा. अने आ धागापर हररोज एक नवीन अॅडव्हर्टाइज जोवानो भूलो नही. नव्वदोत्तरीमाटे तुमाला अनेक उपयुक्त प्रोडक्ट्स ऐया जोवा मळसे."
"तमा सर्वामाटे हेप्पी दिवाली!"
१.'परत' फेड-अप
२. खयाली goष्ट पुलाव
३. हस्तिदंती मनोरा
४. कटिंग ग्लास
५. नेम ड्रॉपर
६. झांडू
७. बुत्तोडा
...
विशेषांक प्रकार
लिनक्सच्या फाफॉवर मलाही दिसत
लिनक्सच्या फाफॉवर मलाही दिसत नाहीये. हा दुवा.
१. http://aisiakshare.com/files/diwali15/adverts/buttoda_final_sign.jpg
२. http://www.aisiakshare.com/files/diwali15/adverts/jhandu_final_sign.jpg
इथे अवांतरच होणारे, इलाज
इथे अवांतरच होणारे, इलाज नाही.
मला कुबुंटू+क्रोम (45.0.2454.101 Ubuntu 14.04 (64-bit)) यावर चित्रं दिसत आहेत.
या धाग्यात तीन चित्रं लावली आहेत. सगळ्यात वर 'विनोदी' असं अक्षरं+त्याची आडवी पट्टीवाली पार्श्वभूमी आणि दोन जाहिराती. यातलं पहिलं चित्रं दिसतंय. पंकज भोसलेंच्या 'प्लेबॉय'चे साहित्यिक गोमटेपण लेखातलं हफ-पोस्टच्या सर्व्हरवरचं लेखात डकवलेलं चित्र दिसतंय. पण जाहिरातींचीच चित्रं का दिसत नाहीयेत हे मला समजत नाहीये. त्यातही या धाग्यावरची तिन्ही चित्रं ऐसीच्याच सर्व्हरवर आहेत.
चाचणी म्हणून प्रतिक्रियेतही एक चित्र डकवून पाहिलं होतं पण तेही फाफॉवर दिसलं नाही म्हणून काढून टाकलं.
कोणाला काही उपाय माहीत असल्यास, समजल्यास मला खरड/व्यनी करावा ही विनंती.
शक्यतो लवकरात लवकर ही चित्रं वेगळ्या प्रकारे लावण्याचाही प्रयत्न सुरू आहे.
इतर जाहिरातींच्या प्रतिक्षेत
=))
इतर जाहिरातींच्या प्रतिक्षेत आहे.