Skip to main content

जाहिराती

विनोदी जाहिराती नव्वदोत्तरी

जाहिराती

जाहिरातदार - अंडानी प्रा. लि.

"नमस्ते. नमस्ते. मितरों... भाईयों अने बेहनो. अने अन्य सर्व लोक... केम छो बेनजी, डिकरा मजामा नें? सरस... तुमचा मराठीमंदी काय बोले? हा, वा वा."

"तो मितरों, तुमाला वाटला अशेलच की मी इथे मराठी साइटवरती कशामाटे आलो आहे. मारु नाम... माझा नाव अंडानी. मी अंडानी प्रायवेट लिमिटेडचा सोल प्रोप्रायटर. तो माजा काम इथे अशा की तुमाला माहिती पडलेलीच असेल की आता गेला दीड वर्सात नवीन सिस्टिम आलेली आहे. तेव्हा तुम्ही पन खूस आहात, आमी पन खूस आहेत. आमी ज्यास्त खूस आहोत, पन त्ये बात व्येगली."

"तर मला बोलायचा असा आहे, की नवीन सिस्टममध्ये काई नवीन गोस्टी हायेत. तेसाठी मग आपल्याला काही... काय बोलते रे तेला.... हां, काई व्येगल्या पद्धतीने काम करवा होय. मग तेसाठी काई नवीन प्रोडक्ट्सची जरूरत पडते. म्हनून आमची कंपनीकडून आमी काही नवीन प्रोडक्ट्स घेऊन आलेली आहोत. आता प्रोडक्ट म्हनलं की मार्केटिंग आलाच. मार्केटिंग म्हंटलं की जैरात, ऐडवर्टाइजिंग वगैरे आलाच ना. नैतर अच्छे दिन कसे येनार. हा हा हा."

"तेवा सर्व सेगमेंटमंदी रीचाउट करन्यामाटे आमी ऐसीच्या दिवाळी स्पेसलमंदीपन आमच्या प्रोडक्ट्सच्या एडवर्टाइजमेंट्स करतो आहोत."

"पेल्ले ऐसीवाले एडिटर लोग दिवाली शुरू होनापेल्लेच तेंचा स्पेसल सुरू करते. आनि रोज त्रण-चार आर्टिकल पब्लिश करते. एटलामाटे आमी पण फिक्स करे... फिक्स केलं के आमचे अॅडवर्टाइजमेंट पण रोज एक नवीन प्रोडक्टवाली आवसे."

"तो मितरों, अंडानी प्रोडक्ट्सना वतीने दिवालीमाटे बहुत शुभेच्छा. अने आ धागापर हररोज एक नवीन अॅडव्हर्टाइज जोवानो भूलो नही. नव्वदोत्तरीमाटे तुमाला अनेक उपयुक्त प्रोडक्ट्स ऐया जोवा मळसे."
"तमा सर्वामाटे हेप्पी दिवाली!"

१.'परत' फेड-अप
२. खयाली goष्ट पुलाव
३. हस्तिदंती मनोरा
४. कटिंग ग्लास
५. नेम ड्रॉपर
६. झांडू
७. बुत्तोडा

परत फेड अप अंडानी

हस्तिदंती मनोरा अंडानी

हस्तिदंती मनोरा अंडानी

कटिंग ग्लास अंडानी

नेम ड्रॉपर अंडानी

झांडू अंडानी

बुत्तोडा अंडानी


...

विशेषांक प्रकार

चिमणराव Wed, 04/11/2015 - 09:57

सारु पण फोटांमा शु लखेलु ए वाची शकता नथी।बुंदिना सो लाडवानी ओरडर साथे एक हात्तोडा मफत आपी रह्या छो केम?

राजेश घासकडवी Wed, 04/11/2015 - 18:19

In reply to by चिमणराव

सारु पण फोटांमा शु लखेलु ए वाची शकता नथी।

फोनवर दिसत नाहीये का? कारण मला कॉंप्युटरवर व्यवस्थित दिसतं आहे.

बुंदिना सो लाडवानी ओरडर साथे एक हात्तोडा मफत आपी रह्या छो केम?

जरूर. पण कडक बुंदिना लाडवामाटेच. आमच्या हातोडाचा तो पण उपयोग आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 05/11/2015 - 06:17

In reply to by चिमणराव

लिनक्सच्या फाफॉवर मलाही दिसत नाहीये. हा दुवा.
१. http://aisiakshare.com/files/diwali15/adverts/buttoda_final_sign.jpg
२. http://www.aisiakshare.com/files/diwali15/adverts/jhandu_final_sign.jpg

नितिन थत्ते Thu, 05/11/2015 - 06:47

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विंडोज फाफॉवर पण दिसले नाही. (लाडवांची झैरात दिसली नाही. हातोड्याचीच दिसली)

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 05/11/2015 - 07:35

In reply to by नितिन थत्ते

आता दोन जाहिराती लावल्या आहेत - बुत्तोडा आणि झांडू.

(पहिलं चित्र दिसतंय पण पुढची दिसत नाहीत असं का होतंय हे मला समजत नाहीये.)

राजेश घासकडवी Thu, 05/11/2015 - 09:54

In reply to by नितिन थत्ते

लाडवांची जाहिरात नाहीये. फक्त हातोड्याचीच आहे. त्यानंतर झांडू ची लावली. या दोन्ही मला दिसताहेत - लॅपटॉपवर (विंडोज आणि फायरफॉक्स)

नितिन थत्ते Fri, 06/11/2015 - 19:56

In reply to by राजेश घासकडवी

हातोड्याची जाहिरात दिसली पण तो लाडू फोडण्यासाठी असल्याचा उल्लेख दिसला नाही. (कुणीतरी प्रतिसादात तसा उल्लेख केलावता म्हणून लाडवाची जाहिरात असं म्हटलं).

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 05/11/2015 - 20:32

In reply to by बिटकॉइनजी बाळा

इथे अवांतरच होणारे, इलाज नाही.

मला कुबुंटू+क्रोम (45.0.2454.101 Ubuntu 14.04 (64-bit)) यावर चित्रं दिसत आहेत.

या धाग्यात तीन चित्रं लावली आहेत. सगळ्यात वर 'विनोदी' असं अक्षरं+त्याची आडवी पट्टीवाली पार्श्वभूमी आणि दोन जाहिराती. यातलं पहिलं चित्रं दिसतंय. पंकज भोसलेंच्या 'प्लेबॉय'चे साहित्यिक गोमटेपण लेखातलं हफ-पोस्टच्या सर्व्हरवरचं लेखात डकवलेलं चित्र दिसतंय. पण जाहिरातींचीच चित्रं का दिसत नाहीयेत हे मला समजत नाहीये. त्यातही या धाग्यावरची तिन्ही चित्रं ऐसीच्याच सर्व्हरवर आहेत.

चाचणी म्हणून प्रतिक्रियेतही एक चित्र डकवून पाहिलं होतं पण तेही फाफॉवर दिसलं नाही म्हणून काढून टाकलं.

कोणाला काही उपाय माहीत असल्यास, समजल्यास मला खरड/व्यनी करावा ही विनंती.

शक्यतो लवकरात लवकर ही चित्रं वेगळ्या प्रकारे लावण्याचाही प्रयत्न सुरू आहे.

अनुप ढेरे Fri, 06/11/2015 - 10:19

नेम ड्रॉपर भारी आहे. पण झाहिरात करायची गरज आहे अस वाटत नाही. अनेक लोक सढळ वापर करतात याचा ऑलरेडी.

.शुचि. Sun, 08/11/2015 - 06:50

हाहाहा "हस्तीदंती मनोरा (आयव्हरी टॉवर)" झकासच :)

कुठल्याच खिडकीतून जमीन दिसत नाही

=)) हाण तेजायला!