Skip to main content

तिची कविता

तिची कविता

ती एक आई
जीवन घडवणारी!
ती एक पत्नी
साथ देणारी !!
ती एक ज्योती
उज्जवल भविष्याप्रत नेणारी!
ती एक दिप्ती
अखंड तेवत राहणारी !!
ती एक कळी
उमलण्यासाठी आसुसणारी!
ती एक चांदणी
चमचमण्यासाठी धडपडणारी !!
ती एक शक्ती
सामर्थ्य प्रदान करणारी !
ती एक व्यक्ती
जगण्याचा अधिकार मागणारी!!

-प्रणव- Sat, 31/10/2015 - 17:43

जगण्याचा अधिकार मागणारी

अधिकार मागावेत का हिसकून घ्यावेत का मिळवावेत ...

डॉ. एस. पी. दोरुगडे Sun, 01/11/2015 - 18:10

आवडली कविता.