Skip to main content

लेखक, विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची हत्या

प्रख्यात कन्नड लेखक, विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
डॉ. कलबुर्गी यांनी मूर्तिपूजेविरुद्ध विचार मांडले होते.

(व्यवस्थापन : हत्येवरील चर्चा दीर्घकाळ चालू राहिल्यामुळे स्वतंत्र धागा करण्यात आलेला आहे.)

बॅटमॅन Mon, 31/08/2015 - 02:44

काही हिंदुत्ववाद्यांनी याची अप्रत्यक्ष जबाबदारीही घेतली, मात्र चौफेर टीका झाल्यावर अक्कल आली आणि हात झटकून मोकळे झाले असेही वाचल्याचे स्मरते.

प्रसन्ना१६११ Mon, 31/08/2015 - 14:47

In reply to by बॅटमॅन

अतिशय वाईट बातमी.. निषेध करावा तेव्हढा थोडाच आहे. ज्याने जबाबदारी घेतली, त्याला ताबडतोब अटक केली पाहिजे; हिंदुत्ववादी असेल वा अजून कोणी! हत्येचे कोणीही समर्थन करता कामा नये! जर ही हत्या कुण्या भडकू हिंदुत्ववाद्याने केली असेल, तर तो हिंदुंचेच जास्त नुकसान करीत आहे. कलबुर्गीनी हिंदु धर्मावर वा देवांवर टीका केलेली असली तरीही त्यामुळे अशी जीव हिंसा ही गोष्ट कोणीही विवेकी हिंदु मान्य करणार नाही!
तिकडे मिडिया शीना खुनावर अखंड बोंबलत असताना या हत्येवर प्रतिक्रियाही येऊ नयेत, ही खरेच चिंतेची गोष्ट.

बॅटमॅन Mon, 31/08/2015 - 15:00

In reply to by प्रसन्ना१६११

जाता जाता:

देवाच्या मूर्तीवर लघवी करण्यात काही चूक नाही अशा विधानाबद्दल कलबुर्गी यांच्यावर मध्यंतरी बरीच टीका झाली होती.

(त्यातूनच हत्या झाली वगैरे वगैरे जावईशोध पहावयास रोचक असतील. त्यासोबतच येणारे डिफेन्सिव्ह विवेचन, लघवी-हत्या तुलना, मुद्याचे गांभीर्य वगैरे एकूण निर्माल्यही पाहणे अतिरोचक ठरेल.)

चिंतातुर जंतू Mon, 31/08/2015 - 15:14

In reply to by बॅटमॅन

>> देवाच्या मूर्तीवर लघवी करण्यात काही चूक नाही अशा विधानाबद्दल कलबुर्गी यांच्यावर मध्यंतरी बरीच टीका झाली होती.

>> (त्यातूनच हत्या झाली वगैरे वगैरे जावईशोध पहावयास रोचक असतील. त्यासोबतच येणारे डिफेन्सिव्ह विवेचन, लघवी-हत्या तुलना, मुद्याचे गांभीर्य वगैरे एकूण निर्माल्यही पाहणे अतिरोचक ठरेल.)

माझ्या माहितीनुसार यू आर अनंतमूर्ती यांनी आपल्या लहानपणीच्या आठवणींमध्ये सांगितलेल्या एका प्रसंगाचा ह्याला संदर्भ आहे. 'देव अस्तित्वात नाही, तो मला काहीही करू शकत नाही ह्याची खातरजमा करायला म्हणून मी लहानपणी मूर्तीवर लघवी केली होती', असं अनंतमूर्ती आपल्या आठवणींत सांगतात. माझ्या आठवणीनुसार कळबुर्गी यांनी केवळ ह्या आठवणींचा संदर्भ एका मुलाखतीत दिला होता आणि एक प्रकारे अनंतमूर्तींना बसवण्णांच्या नावे पुरस्कार देण्यामधला विरोधाभास दाखवला होता. अधिक माहिती गूगलवर शोधली तर मिळावी. हत्येसारख्या गंभीर गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर आणि विश्वासार्ह माहितीशिवाय भडक विधानं करणं जबाबदार सदस्यांकडून अपेक्षित नाही.

बॅटमॅन Mon, 31/08/2015 - 15:24

In reply to by चिंतातुर जंतू

अर्थातच, कृती अनंतमूर्तींची आणि उल्लेख केला कलबुर्गींनी. नुसता उल्लेखच केला नाही तर समर्थनही केले.

http://www.telegraphindia.com/1150831/jsp/nation/story_39951.jsp#.VeQke…

इथून उद्धृतः

At a seminar in June 2014, Kalburgi, a former VC of Hampi Kannada University, had denounced idol worship as a "meaningless ritual", angering Sangh parivar elements. But Prasad said nothing more was known about the attackers or if someone had given them the assignment.

At the seminar, Kalburgi had also said "one can even urinate on idols", while quoting from author and academic U.R. Ananthamurthy's work. In the work, the writer had narrated how he had urinated on an idol to rid himself of the fear induced by his traditional upbringing.

हे समर्थन जर समर्थनीय असेल तर याच्या तार्किक एक्स्टेन्शनने बाकीच्या अनेक गोष्टी समर्थनीय ठरतात ही गोष्ट खूप रोचक वाटते.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 31/08/2015 - 18:20

In reply to by बॅटमॅन

द न्यूज मिनीट - कलबुर्गी काय म्हणाले होते याचा उल्लेख नाही.
टाईम्स ऑफ इंडिया - कलबुर्गींनी अनंतमूर्तींच्या कृतीचा उल्लेख केला होता.
डेक्कन हेराल्ड - पुन्हा एकदा उल्लेख केला होता अशी बातमी.

आणि वर दिलेल्या दुव्यामध्येही अनंतमूर्तींचं लेखन उद्धृत केल्याचा उल्लेख. कोणत्याही बातमीत कलबुर्गींनी अनंतमूर्तींच्या कृतीला पाठिंबा दिल्याचा वा निषेध केल्याचा उल्लेख नाही.

बॅटमॅन Mon, 31/08/2015 - 18:24

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

टेलिग्राफमधील उतार्‍याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून आपलेच घोडे दामटण्याच्या अपेक्षित प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आता हेच पुन्हा पहा.

इथून उद्धृतः
At a seminar in June 2014, Kalburgi, a former VC of Hampi Kannada University, had denounced idol worship as a "meaningless ritual", angering Sangh parivar elements. But Prasad said nothing more was known about the attackers or if someone had given them the assignment.

At the seminar, Kalburgi had also said "one can even urinate on idols", while quoting from author and academic U.R. Ananthamurthy's work. In the work, the writer had narrated how he had urinated on an idol to rid himself of the fear induced by his traditional upbringing.

यात मी स्वतःच्या पदरचे काही घातले असेल तर सांगावे. अधोरेखित भाग हा समर्थन कसे दर्शवीत नाही तेही सांगण्याची कॄपा मज पामरावर करावी ही विनंती. नुसता उल्लेखच नसून समर्थनही आहे. तुमची समर्थनाची व्याख्या काय आहे हे कळाल्यास बरे होईल.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 31/08/2015 - 18:31

In reply to by बॅटमॅन

अधोरेखित केलेल्या वाक्यात कलबुर्गींचं वाक्यही अर्धवट आहे असं दिसतंय. छापील माध्यमात आल्यामुळे आणखी चांगलं समजतंय (अवतरणात कॅपिटल अक्षर नाही). अर्धसत्य. कोणीतरी काहीतरी म्हणाल्याचं अर्धवट सांगितलेलं असेल तर ते फार विश्वासार्ह नसतं, त्याच्या मागचे-पुढचे सगळे संदर्भ तपासायचे हे तुमच्यासारख्या इतिहासात रस घेणाऱ्या पामरांना मी सांगायचं?

बॅटमॅन Mon, 31/08/2015 - 18:36

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कोणीतरी काहीतरी म्हणाल्याचं अर्धवट सांगितलेलं असेल तर ते फार विश्वासार्ह नसतं, त्याच्या मागचे-पुढचे सगळे संदर्भ तपासायचे

की गैरसोयीच्या संदर्भाची अर्धवट म्हणून संभावना करायची? बाकीचे संदर्भ पूर्ण असल्याच्या थाटात मारे दिलेत त्यांमध्ये उल्लेख नाही, या एका संदर्भात उल्लेख आहे. मुळात उल्लेख आहे हेच जिथे धडपणी मान्य करवेना (कारण त्यामुळे नॅरेटिव्ह सोयीस्कर राहत नाही) तिथे बाकी कारणमीमांसा कुठे सुरू होणार? तस्मात वैचारिक भ्रूणहत्येबद्दल (आणि यानंतर जी हेत्वारोपाची चिखलफेक होईल त्याबद्दलही) अभिनंदन आणि शुभेच्छा.

.शुचि. Mon, 31/08/2015 - 18:53

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ते इंग्रजी वाक्य हे मलाही "समर्थन" वाटत नाहीये. केवळ "संदर्भ" वाटत आहे. उन्मादाच्या भरात अनेकदा "रीडींग बिटवीन द लाइन्स" होते, विनाकारण शत्रुत्व आरोपित केले जाते.

(याला सायकॉलॉजीचाही संदर्भ आहे. Participants were asked to judge the expressions of faces presented to them and to complete a self-report measure of aggression. Relative to low physically aggressive participants, high physically aggressive participants were more likely to mistake non-angry facial expressions as being angry facial expressions)

ही सर्व भगव्या उन्मादाची लक्षणेच आहेत.

बॅटमॅन Mon, 31/08/2015 - 19:47

In reply to by .शुचि.

उद्या मग संदर्भ म्हणून "वन कॅन ईव्हन कीप विमेन अ‍ॅट होम" असे वाक्य लिहिल्यास ते विमेन अ‍ॅट होमचे समर्थन नाही वगैरे निष्कर्षही निघतीलच. :)

.शुचि. Mon, 31/08/2015 - 19:50

In reply to by बॅटमॅन

वन कॅन ईव्हन कीप विमेन अ‍ॅट होम" असे अमका म्हणाला

असे जर लिहीले तर ते समर्थन नसून फक्त संदर्भ असेल.

बॅटमॅन Mon, 31/08/2015 - 19:52

In reply to by .शुचि.

जर तो म्हणणारा अमका नेमके तसेच म्हणाला असेल तर तो संदर्भ, नैतर समर्थनच. अनंतमूर्तींनी सांगितलेल्या आठवणीत समर्थन असेल तर कलबुर्गी यांचा उद्गार संदर्भ ठरतो, नैतर ते समर्थनच ठरेल.

मेघना भुस्कुटे Mon, 31/08/2015 - 20:32

In reply to by बॅटमॅन

हो. समजा, केलं समर्थन. त्यांनी केलं की नाही माहीत नाही. मी करते अनंतमूर्तींचं समर्थन. मी हिंदू आहे. माझाही आहे देव. नास्तिक असले तरीही. मग? पुढे?

बॅटमॅन Mon, 31/08/2015 - 20:41

In reply to by मेघना भुस्कुटे

म्हणजे देवाच्या मूर्तीवर लघवी करण्याला तुमचा पाठिंबा आहे तर.

कै नै, नेमके समर्थन कशाला आहे ते स्पष्ट करून घेतोय.

मेघना भुस्कुटे Mon, 31/08/2015 - 20:44

In reply to by बॅटमॅन

मूर्त गोष्टी न दुखावता, दुसऱ्याचं स्वातंत्र्य न हिरावता कुणीही काहीही करण्याला माझा पाठिंबा आहे.

बॅटमॅन Mon, 31/08/2015 - 22:04

In reply to by मेघना भुस्कुटे

धन्यवाद.

बाकी "नास्तिक असले तरी माझाही देव आहे" हे वाक्य जमल्यास या पामराला स्पष्ट करून सांगता येईल काय?

बॅटमॅन Tue, 01/09/2015 - 12:36

In reply to by मेघना भुस्कुटे

अच्छा, म्हणजे सोयीस्करपणे पाहिजे तेव्हा लाथाडून पाहिजे तेव्हा हक्क सांगण्याची पद्धत का? बरं बरं!

मेघना भुस्कुटे Tue, 01/09/2015 - 13:17

In reply to by बॅटमॅन

हां, असंदेखील बघता येतं का याकडे?! बरं बरं!

माझ्या मते धर्मश्रद्धा आणि सांस्कृतिक वारसा यांच्यात काही भाग सामायिक असतो. धर्माच्या बाबतीत चिकित्सक असणारे अनेक जण सांस्कृतिक वारसा आवश्यक मानतात आणि जपतात. विशेष करून इतिहासाशी परिचित असलेल्या तुला हे कळणं सोपं जाईल उलट, असं मला वाटत होतं. म्हणजे शिवाजीला अरेतुरे करणारे मेहेंदळे त्याच शिवाजीच्या इतिहासाची मांडणी करताना आपला सांस्कृतिक वारसा जपतात, वाढवतात. पण शिवाजीमहाराज अशी भक्ताळू हाक मारण्याचं मात्र ठामपणे नाकारतात.

हे तसंच काहीसं आहे.

शिवाय धर्मश्रद्धा पडताळून पाहण्याचं स्वातंत्र्य आपल्याला घटनेनं दिलं आहे. अशा चिकित्सा करणार्‍या अनेक विचारवंतांचा-समाजसुधारकांचा वारसाही भारताला - त्यातही महाराष्ट्राला - लाभलेला आहे. जोवर या चिकित्सांमधून सार्वजनिक / वैयक्तिक मालमत्तेचं नुकसान होत नाही, कुणाच्या स्वातंत्र्याला धक्का बसत नाही, कुणाला शारीरिक/आर्थिक इजा होत नाही, तोवर(च) हे स्वातंत्र्य मनमुराद वापरता येतं. त्यामुळे अनंतमूर्तींनी (त्यांचं उदाहरण इथे सगळ्यांना माहीत आहे म्हणून ते) आपल्या खाजगी अवकाशात देवावर लघवी केली असेल आणि त्यामुळे देव त्यांना काहीही शिक्षा करत नाही हे त्यांनी स्वतःला - आप्तजनांना पटवून दिलं असेल, तर मी त्यात काहीही चुकीचं मानत नाही. मी अशा प्रकारच्या प्रयोगांना माझ्या धर्माचा अविभाज्य भाग मानते.

बॅटमॅन Tue, 01/09/2015 - 14:23

In reply to by मेघना भुस्कुटे

अनंतमूर्तींनी कुणाला काही पटवून दिल्याचे तरी कुठे दिसले नाय बा. ते एक असोच.

प्रश्न इतकाच आहे की एरवी धर्म, आस्तिकता यांना पालीसारखे झटकणार्‍यांना आत्ताच सांस्कृतिक वारशाबिरशाची आठवण का झाली? हे सगळं सोयीस्कर आहे हे दिसतंच आहे. ते मला खूप रोचक वाटतं.

चिकित्सा करण्याचा हक्क केव्हा, तर तो वारसा स्वीकारला असेल तेव्हा. एरवी कायम वारसा पुसण्याच्या घाईत असलेल्यांना असे तात्कालिक, सिलेक्टिव्ह उमाळे येणं चिंताजनक असल्याने त्यांच्या चिकित्साहक्कासाठीच्या ओरड्यात पोकळपणाच दिसतो.

मेघना भुस्कुटे Tue, 01/09/2015 - 14:26

In reply to by बॅटमॅन

एरवी धर्म आणि आस्तिकता यांना पालीसारखं न झटकणं म्हणजे नक्की काय; दिवसातला किती वेळ कोणत्या कृतींमध्ये घालवल्याचा विदा मिळाल्यास असं न झटकल्याचा योग्य पुरावा मिळेल; त्याहून महत्त्वाचं म्हणजे काही जणांना हे 'रोचक' वाटू नये, म्हणून असे पुरावे कुणी का बरं गोळा करावेत आणि देत फिरावेत?

(जर पुरेसं स्पष्ट होत नसेल, तर स्पष्टीकरण - वरचे प्रश्न र्हेटॉरिक म्हणतात तशातले आहेत. त्यांची उत्तरं अपेक्षित नाहीत. अतिशहाण्या, थॅ़क्यू.)

झाली सोयीस्कर आठवण असं गृहीत धरून चालू. मग? पुढे?

बॅटमॅन Tue, 01/09/2015 - 14:30

In reply to by मेघना भुस्कुटे

झाली सोयीस्कर आठवण असं गृहीत धरून चालू. मग? पुढे?

ढोंगाची कबुली देऊन असा हक्कबिक्क सांगण्यातले वैयर्थ्य आणि तर्कविसंगती आपणहूनच आपसूक अधोरेखित केल्याबद्दल धन्यवाद.

मेघना भुस्कुटे Tue, 01/09/2015 - 14:33

In reply to by बॅटमॅन

तुला एकट्यालाच दिसतेय बाबा वैय्यर्थ आणि तर्कविसंगती!
बहुतांश जनता असं मानते की साधू वाण्याची गोष्ट करमणूक म्हणून ऐकावी आणि त्यातल्या धमक्या कानाआड कराव्यात. हवं तर गुर्जींशी वाद घालावा. पण गोडाचा शिरा (त्यात मुरलेल्या केळ्यासकट) हा आपला सांस्कृतिक वारसा आहे. असेल सोयीस्कर. मग काय करायचं? मानवी आयुष्य अशा सोयींसकटच चालतं!

बॅटमॅन Tue, 01/09/2015 - 14:39

In reply to by मेघना भुस्कुटे

गांधी आणि आंबेडकरांना सिलेक्टिव्हली आपले म्हणणे आणि अशा सिलेक्टिव्हली वारसा पाळण्याच्या गोष्टी करणे हे दोन्ही तत्त्वतः सारखेच आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टी मंजूर असाव्यात किंवा दोन्ही त्याज्य वाटाव्यात. तसे होत नसल्याने रोचक वाटते, इतकेच.

एरवी रक्षाबंधनासारख्या सणाला शिव्या घालण्यात इतिकर्तव्यता मानणार्‍यांनी फक्त गोडाचा शिरा खाण्याकरिता सत्यनारायण तरी का घालावा, हा एक सनातन प्रश्न आहे. असो.

मेघना भुस्कुटे Tue, 01/09/2015 - 14:48

In reply to by बॅटमॅन

का घालू नये? सत्यनारायण फडतूस आहे हे सिद्ध करण्याकरता कुणाला घालावासा वाटला, तर त्याला तो हक्क आहेच. तुला म्या पामरीने इतिहासाबद्दल काय सांगावे म्हणा, पण गोपाळराव जोशींचं उदाहरण इंट्रेष्टिंग आहे. त्यांनी म्हणे आदले दिवशी बाप्तिस्मा घेऊन दुसर्‍या दिवशी एकादष्ण्या केल्या होत्या. माझाही धर्म आहे, मला हवं ते करीन, असं म्हणून. एकाच वेळी दोन्ही धर्मांना फाट्यावर मारण्याकरता कर्मकांडाचा साधन म्हणून वापर केला त्यांनी.
त्यांनाही हक्क आहेच.

बॅटमॅन Tue, 01/09/2015 - 14:52

In reply to by मेघना भुस्कुटे

कुणालाही काहीही करायचा जसा हक्क आहे तसा त्या कृतीबद्दल कमेंट पास करायचा मलाही अधिकार आहे. कुंपणावर बसून दगड मारून मजा पाहणे हेच वैचारिक इतिकर्तव्य असल्याची समजूत बाळगणार्‍यांनी मी एखाददुसरा दगड मारला म्हणून इतके आकांडतांडव करावे हे खूपच रोचक वाटले.

तेव्हा-दांभिक आचार अवश्य करावेत, फक्त कमेंटी आल्या तर गळा काढू नये.

मेघना भुस्कुटे Tue, 01/09/2015 - 14:56

In reply to by बॅटमॅन

अय्या! आकांडतांडव काय नि गळा काढणं काय नि दगड मारणं काय? मी आपलं मला वाटतं ते सांगतेय. मला हक्क आहे, तसाच तुलाही हक्क आहेच. तेच तर म्हणतोय आपण. दे टाळी.

बॅटमॅन Tue, 01/09/2015 - 15:01

In reply to by मेघना भुस्कुटे

दांभिकपणाचे उघड समर्थन खूपच उद्बोधक आहे - एकूण परंपरेला साजेसेच. हेच लॉजिक लावलं तर आरेसेसही दोषमुक्तच होईल. पण ते गैरसोयीचं आहे, कूल पॉइंट्स मिळत नाहीत म्हणून करायचं नाय.

(विषय काय, बोलतोय काय? वगैरे कमेंटी, प्यासिव अग्रेसिव श्रेण्या आणि अन्य डायट्राईबच्या प्रतीक्षेत. आन्दो.)

मेघना भुस्कुटे Tue, 01/09/2015 - 15:03

In reply to by बॅटमॅन

आता अवांतरच बोलतोय म्हणून, होऊन जाऊ दे, विचारतेच!

कूल पॉइंट्स म्हणजे? कोण देतं ते?

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 31/08/2015 - 20:45

In reply to by मेघना भुस्कुटे

हे वाचल्यावर तुझं ब्लॉगपोस्ट (का जुनी प्रतिक्रिया) आठवलं. तुझाही नंबर लागावा अशा अर्थाचे प्रतिसाद येणार का?

ऋषिकेश Mon, 31/08/2015 - 15:15

In reply to by बॅटमॅन

विधान वाचून मला शंकराच्या पिंडीवर पाय ठेऊन झोपणार्‍या विसोबा खेचरांची आठवण झाली!
ज्या धर्मात अश्या पद्धतीच्या गोष्टी आहेत तरीही त्या धर्मातील लोकांना वरील विधानाचे किंचितही वैषम्य वाटावे हे बघुनच त्या धर्मवद्यांची कीव येते!

बॅटमॅन Mon, 31/08/2015 - 15:19

In reply to by ऋषिकेश

विसोबा खेचर हे आस्तिक होते हा क्षुल्लकसा तपशील विसरलात काय?

डोके बाजूला ठेऊन पाहिले तर अफजलखानवध आणि गांधीहत्या यांतही साम्यच दिसणार, त्यामुळे अपेक्षित प्रतिसादाचे नवल वाटले नाही.

ऋषिकेश Mon, 31/08/2015 - 19:03

In reply to by बॅटमॅन

बाकी सगळे जाऊ दे, पण त्यांची हत्या होणे हे तुम्हाला योग्य वाटते का अयोग्य?
माझ्या अंदाजाने ही हत्या होणे तुम्हालाही गैर वाटते. बरोबर ना?

चर्चा करताना त्याबद्दल तुमच्या भुमिकेचा कोणत्याच प्रतिसादातून काही अंदाज येईना म्हणून स्पष्ट विचारले

ऋषिकेश Mon, 31/08/2015 - 20:42

In reply to by बॅटमॅन

माझी भूमिका स्पष्टच आहे,

तीच तर माझ्यापर्यंत पोचली नाहिये!
कोणत्या प्रतिसादातून स्पष्ट झालीये ती?

ऋषिकेश Tue, 01/09/2015 - 08:44

In reply to by बॅटमॅन

तो प्रतिसाद असायः

काही हिंदुत्ववाद्यांनी याची अप्रत्यक्ष जबाबदारीही घेतली, मात्र चौफेर टीका झाल्यावर अक्कल आली आणि हात झटकून मोकळे झाले असेही वाचल्याचे स्मरते.

म्हणजे नक्की भुमिका काय? अक्कल आली म्हणजे?

ऋषिकेश Tue, 01/09/2015 - 15:11

In reply to by बॅटमॅन

अंदाज बांधता आला नाही तर भाषिक दौर्बल्य!? असेलही
बरं! इथे कोणाला कळलीये बॅट्याची नक्की भुमिका काय आहे? मदत करा मला समजून घ्यायला!

ऋषिकेश Mon, 31/08/2015 - 08:39

अतिशय खिन्न करणारी बातमी!
या धर्मवादी लोकांना वाद घालता येत नाहीत, त्यांना त्यात जिंकणे अशक्य आहे म्हणून हे असले उद्योग! काही हजार वर्षांपूर्वीच्या नियमांनी जखडलेली एकुणच निरुपयोगी धर्मव्यवस्था मृत्यूमंथाला लागली आहे तेव्हा या असल्या पळपुट्या नी भ्याड मार्गाने अखेरची तडफड सुरू आहे असे समजावे काय?

धर्मवादी मंडळीची अशक्य कीव येते!

नितिन थत्ते Mon, 31/08/2015 - 08:43

In reply to by ऋषिकेश

उलट सिक्युलर अधर्माचे उच्चाटन करून धर्मस्थापनेसाठी नरेंद्रावतार आलेला आहे. :)

नितिन थत्ते Mon, 31/08/2015 - 13:26

In reply to by ऋषिकेश

अतिअवांतर:

मोबाइलवर स्मायली दिसत नाहीत :( त्यामुळे वरचा ऋषिकेशचा प्रतिसाद कोरा दिसला होता.

मेघना भुस्कुटे Mon, 31/08/2015 - 09:27

सर्वांत भीतिदायक काय वाटलं माहितीय? रविवारी सकाळी हे घडलं. नंतर संध्याकाळपर्यंत अनेक बातम्यांच्या वाहिन्या मी आलटून पालटून चाळत होते. कुठेतरी एखादा अपवाद वगळता या गोष्टीची, त्याच्या गांभीर्याची कुठे दखलही घेतलेली नव्हती. एरवी कुठे गुडघाभर पाणी तुंबल्यावर नाचत सुटणारे हे लोक. यांना काही पडलेलीसुद्धा नाहीय. दु:ख, भीती वगैरे तर ठीकच. पण आता हे इतकं रूटीन - नॉर्मल आहे, की त्याची बातमीही होणार नाही, या जाणिवेनं कसंसंच झालं.

अंतराआनंद Mon, 31/08/2015 - 10:26

In reply to by मेघना भुस्कुटे

खरचं हे भितीदायकच आहे. कालच काय आज सकाळीही सगळ्या वाहिन्या ते इंद्राणी प्रकरण चघळत बसलेल्या. दोन वर्षांपूर्वी झालेल्या हाय प्रोफाईल हत्येबद्द्ल पोलिसांपासून सगळे एवढे संवेदनाशील आणि ही अभ्यासू, विचारवंत माणसं त्यांची अशी हत्या होणं हे सर्वसाधारणच वाटतं का सगळ्यांनाच!

ऋषिकेश Tue, 01/09/2015 - 08:54

In reply to by मेघना भुस्कुटे

पण आता हे इतकं रूटीन - नॉर्मल आहे, की त्याची बातमीही होणार नाही, या जाणिवेनं कसंसंच झालं.

याची बातमी न होण्याचं हे कारण नसावं ही शक्यता तुम्ही लक्षात घेतली नाहिये का?
माध्यमं ही आता 'व्यवसायिक' माध्यमं आहेत....

नगरीनिरंजन Tue, 01/09/2015 - 09:34

In reply to by ऋषिकेश

आता म्हणजे १६ मे २०१४ नंतर का?
खरं म्हणजे कोणत्याही धर्माच्या फतव्यांना वेळीच "कडाडून" विरोध न केलेल्या पुरोगाम्यांचेही यात थोडे पाप आहेच. पहिल्यापासूनच धर्म न बघता कडक भूमिका घेतली असती तर कदाचित ही वेळ नसती आली.

ऋषिकेश Tue, 01/09/2015 - 09:43

In reply to by नगरीनिरंजन

"आता" म्हणजे माझ्यासाठी १६ मे नाही. किंवहूना कोणतीही तारीख नाही
नव्वदोत्तरी काळानंतर असे अनेक बदल हळुहळू होत आहेत, तेव्हा आता म्हणजे या या तारखेनंतर असे सांगता येऊ नये.
वरील मेघनाचे मुळ वाक्यातील 'आता' चा अर्थ मी 'हा भेकडपणे केलेला खून झाला तेव्हा' असा घेतला.

मेघना भुस्कुटे Tue, 01/09/2015 - 09:58

In reply to by ऋषिकेश

आता म्हणजे दोन खून होऊन त्याबद्दल काहीही हालचाल न झाल्यानंतर. तसंही महाराष्ट्रात फडणवीस आत्ता आले. आधीच्या सरकारनं कुठं काय दिवे पाजळले? त्यामुळे १६ मे की १५ ऑगस्ट की अजून काही, त्याचे हिशेब माझ्याकडे नाहीत.

घाटावरचे भट Tue, 01/09/2015 - 09:58

In reply to by नगरीनिरंजन

१६ मे २०१४चं असोसिएशन लोकांच्या डोक्यात एवढं फिट्ट बसलेलं आहे. तसं पाहिलं तर दाभोळकरांची हत्या झाली तेव्हा राज्यात आणि केंद्रातही काँग्रेस सरकार होतं आणि जेव्हा कलबुर्गींची हत्या झाली तेव्हा कर्नाटक राज्यातही काँग्रेसचेच सरकार आहे. वेळीच पुंग्या टाईट करायला पाहिजे होत्या असल्या माथेफिरू लोकांच्या. लोकांच्या प्रतिक्रियांबद्दल म्हणाल तर भगवे काय आणि हिरवे काय, ज्यांचे त्यांचे दिवस असतात. त्या त्या वेळी माज आणि शक्तिप्रदर्शन करणारच.

अस्वल Mon, 31/08/2015 - 09:35

वाईट बातमी :( पण आता दु:खापेक्षा चीड जास्त येते आहे.
दुसरी वाईट बातमी म्हणजे, ह्यावर उमटणार्‍या प्रतिक्रिया. बहुतेकांना फरक पडलेला नाही. एक टोक म्हणजे "बरंच झालं, उगाच माज करत होता". शिवाय धार्मिक भावना आहेतच.
जणू कुणी काही चिकित्सात्मक मांडलं की भोकंच पडतात लोकांच्या अंगाला. हे धार्मिक भावना दुखावणं वगैरे जरा जास्तच चाललंय.

घाटावरचे भट Mon, 31/08/2015 - 09:46

In reply to by अस्वल

दुसरी वाईट बातमी म्हणजे, ह्यावर उमटणार्‍या प्रतिक्रिया. बहुतेकांना फरक पडलेला नाही. एक टोक म्हणजे "बरंच झालं, उगाच माज करत होता". शिवाय धार्मिक भावना आहेतच.

जस्ट आऊट ऑफ क्युरियॉसिटी, अशा प्रतिक्रिया तुम्हाला कुठे दिसल्या? मला तर फारशा काही प्रतिक्रियाच दिसत नाहीयेत मीडियामध्ये.

अस्वल Mon, 31/08/2015 - 10:05

In reply to by घाटावरचे भट

वरचं टोक व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपावर पाहिलं. आणि मित्रांमधे बोलल्यावर खुनाचं समर्थन कुणीही केलं नसलं तरी "धार्मिक भावना उगाच का दुखवायच्या?" असं बर्‍याच जणांचं मत होतंच.

अतिशहाणा Mon, 31/08/2015 - 22:00

डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची हत्या झाली ही एक अत्यंत चांगली बातमी आहे. उगीच 'आम्ही हत्येचा निषेध करतो पण त्यांनी केले ते सर्वथैव गैरकृत्य होते. मुसलमान करतात ते चालते, पण हिंदूंनी केले तर का पोट दुखते' वगैरे गुळगुळीत भाषा वापरून तोंडदेखला निषेध करण्याची माझी इच्छा नाही. वास्तविक गोमाता वगळता इतर कोणत्याही प्राण्याचे मय वा मूत्र पवित्र नाही हे हिंदू धर्मात कधीच सर्वमान्य झाले आहे. उदा. श्रावणी या नावाने करण्यात येणाऱ्या हिंदू धर्मीयांच्या विधीमध्ये गोमय-गोमूत्र प्राशनासारखी पवित्र कृत्ये केली जातात. मनुष्यप्राण्याचे मूत्र मात्र संपूर्णपणे अपवित्र आहे. त्यामुळे कलबुर्गींनी अनंतमूर्तींचा दाखला देत 'मी ही मूर्तीवर लघवी केली असती' असे निव्वळ म्हटल्यानेच त्यांना देवाने शिक्षा केली हे सत्य आहे.

मात्र या सर्व गोष्टींच्या पलीकडे जाऊनही त्यांच्या हत्येमुळे आशेचा एक भगवा किरण आता मनात आलाय. आता लवकरच गणपती येतील. 'श्रीं'च्या आशीर्वादाने गल्लोगल्ली फिरणारे वर्गणीखोर, वर्गणी न देणाऱ्या दांभिक नास्तिकांच्या स्कूटर-सायकलींची हवा सोडणारे-बल्ब फोडणारे न्यायप्रेमी, भल्या पहाटे मंडपाच्या स्पीकरवर 'शीला की जवानी'ची भूपाळी लावणारे संगीतप्रेमी, 'श्रीं'च्या मूर्तीमागे टंपरच्या टंपर भरून बीअर-व्हिस्की आचमन करणारे प्रासादिक, 'श्रीं'च्या वरदहस्ताने मंडपातच रमी-तीनपत्त्यांचे डाव खेळणारे खेळाडू, रस्त्याने ये-जा करणाऱ्या तरुणी-महिलांना आवाज टाकणारे रसिक कार्यकर्ते, आणि या सर्वावर कडी करणारे विसर्जन मिरवणुकीतले गुलाल-ढोलताशेप्रेमी उन्मादी भक्त या सर्वांचीही हत्या होण्याची एक किमान शक्यता निर्माण झालीय असं तुम्हाला वाटत नाही का?

जर एखाद्या अनाम धर्मवीराने हिंदूधर्मातील देवतांच्या विटंबनेचा बदला घेतला असेल, तो 'श्रीं'च्या विटंबनेकडे दुर्लक्ष करील असे तुम्हाला का वाटते?

टीपः सदर प्रतिसाद उपरोधिक आहे असे स्पष्टपणे लिहिण्याचा सल्ला एका नॉनऐसीकर हितचिंतकाने दिलाय त्यामुळे मी वरील प्रतिसाद उपरोधिक आहे असे या ठिकाणी या माध्यमातून जाहीर करतोय.
- एक उद्विग्न भारतीय

Nile Mon, 31/08/2015 - 22:08

हे मुलतत्ववादी वेळीच आळा घातला नाही तर एक दिवस आयसीससकडे घेऊन जाणार अशी भिती वाटते.

सुधीर Tue, 01/09/2015 - 11:33

In reply to by नगरीनिरंजन

यानिमित्ताने चार्ली हेब्दोच्या वेळी झालेले वाद आठवतात. जीव घेणे अक्षम्य तर आहेच. पण "भावना दुखावतील अशी मतं मांडणंही चुकीचं आहे" हा मुद्दा मलाही पटत नाही. आजच्या टिओआय च्या अग्रलेखात वाचलेलं वाक्य. "People have the right to air their views in a democracy, no matter how offensive they may be to some.".

मेघना यांच्या खालच्या प्रतिसादातला नास्तिक आणि 'सांस्कृतिक वारसा' हा मुद्दा खूप आवडला. मीही जवळजवळ नास्तिकतेच्या उंबरठ्यावर आहे. लोकसत्तातली शरद बेडेकरांची 'मानव विजय' लेखमालिका त्या विचारांना अजून खतपणी घालते आहे. कुरुंदकरांच्या शिवरात्र पुस्तकातला विचार आठवतो. "धर्माची प्रमुख कक्षा श्रद्धा आहे. बुद्धीने श्रद्धा भंगतात. पण बुद्धीने श्रद्धा निर्माण करता येत नाहीत. बुद्धिवादाच्या आधारे धर्मसुधारणा करा की, सगळाच धर्म नाकारा. त्यामूळे मूळ धर्मश्रद्धेलाच हादरा बसतो. परिणामी शतकानुशतके समाजात मुरलेल्या श्रद्धा गळून पडतात. त्यांच्या जागा नवीन श्रद्धा घेऊ शकत नाहीत." श्रद्धा गळून पडल्यात, तरीही, केवळ 'सांस्कृतिक वारसा' म्हणून 'काही' परंपरा स्वखुषीने जपतो, अगदी श्रद्धा नसली तरीही.

अनु राव Tue, 01/09/2015 - 12:30

In reply to by सुधीर

मेघना यांच्या खालच्या प्रतिसादातला नास्तिक आणि 'सांस्कृतिक वारसा' हा मुद्दा खूप आवडला. मीही जवळजवळ नास्तिकतेच्या उंबरठ्यावर आहे.

मी पूर्ण नास्तिक आहे, तरीही मला कोणाला मूर्ख म्हणायचा हक्क प्राप्त होतो असे मला वाटत नाही.
आपल्या पेक्षा वेगळे वागणार्‍याला, जर मला तो काही त्रास देत नसेल तर नावे ठेवण्याचा, हीन लेखायचा किंवा त्याच्या विचारसरणीला हसायचा अधिकार प्राप्त होतो असे मला वाटत नाही.

ते सुद्धा सार्वजनिक रीतीने तर असे बोलायचा काहीही अधिकार नाही. तुम्ही तुमचा ग्रुप बनवा आणि त्यात काय बोलायचे ते बोला.

People have the right to air their views in a democracy, no matter how offensive they may be to some.".

हे अत्यंत मूर्ख पणाचे वाक्य आहे. right to express ही फार गमतीशीर गोष्ट आहे. कोणाला खून करुन पण एक्स्प्रेस व्हावे असे वाटले तर?

श्रद्धा गळून पडल्यात, तरीही, केवळ 'सांस्कृतिक वारसा' म्हणून 'काही' परंपरा स्वखुषीने जपतो, अगदी श्रद्धा नसली तरीही.

हा दांभिक पणा आहे.

अतिशहाणा Tue, 01/09/2015 - 15:36

In reply to by सुधीर

मी तर अनु राव यांच्या तीनही मुद्द्यांशी सहमत नाही. उदा. व्यंगचित्र काढलं म्हणून दुसऱ्याचा खून करायला आपण मुसलमान आहोत का? आज तो धर्म अशा सर्व प्रकारांमुळं जगात जिकडेतिकडे बदनाम होतोय. ठिकठिकाणी त्यांना शिव्याही आपणच देतोय आणि अजाणतेपणाने आपल्या धर्माचंही इस्लामीकरण करतोय हा गंभीर प्रकार आहे. त्यातही गंमत म्हणजे हिंदू धर्माच्या अभिमानी लोकांना त्याचं इस्लामीकरण करायचंय आणि तथाकथित धर्मद्रोही पुरोगाम्यांना त्याचं मोकळंढाकळं, स्वतंत्र विचारांचा सन्मान करणारं पारंपरिक रुप बरं वाटतंय.

मला मूर्तीवर लघवी करणे हा प्रकार फारसा आवडला नाही. श्रद्धा दुखावण्यापेक्षा या प्रकारात सभ्यतेचे निकष कुठेतरी तरी पाळले जात नाहीत असे वाटले. (अनंतमूर्ती यांनीही हा प्रकार लहानपणी केला होता. मोठेपणी फक्त त्याचा उल्लेख केलाय, कलबुर्गींनीही त्याचा फक्त उल्लेख केलाय त्यामुळं त्यांनाही जाणत्या वयात हे करावंसं वाटलं नाही, कुठंतरी त्यांनाही हे सभ्यतेच्या प्रकारातून खटकतंय असं वाटलं.) पण सभ्यतेचे निकष दुखावणे ही शहरी मानसिकता झाली. शिवाय कलबुर्गी यांनी इतरांना निव्वळ हीन लेखण्यासासाठी किंवा दुसऱ्याच्या विचारसरणीला हसण्यासाठी किंवा आजकाल ज्याला 'भावना दुखावण्यासाठी' म्हणतात त्यासाठी असं म्हटलंय असंही नाही. देवभोळ्या जनतेच्या मनातील अंधश्रद्धेचे उच्चाटन करण्यासाठी कलबुर्गी किंवा अनंतमूर्तींनी जे केलंय ती हिंदू धर्मातील सुधारणेची परंपरा आहे. यापूर्वी फुल्यांनीही तेच केलंय, पेरियारांनीही तेच केलंय, तुकारामांनीही तेच केलंय. देवदेवतांचा वापर करुन पुरोहित, पुजारी मंडळी अंधश्रद्धा पसरवत आहेत म्हणून पुरोहितांना नाकारण्यासाठी देवांना नाकारण्याची भूमिका ही हिंदू धर्मातील सुधारणेची परंपरा आहे.

उदा. महात्मा फुले यांचा अखंड पाहा.

पशू शिरी सोंड पोर मानवाचे !सोंग गणोबाचे नोंद ग्रंथी !!
बैसे उन्द्रावरी ठेउनीया बूड ! फुंकीतो शेंबुड सोंडेतुन !!
अंत्यजासी दुर भटा लाडु देतो ! नाकाने सोलीतो कान्दे गणु !!
चिखला तुडवुनी बनवीला मोरया ! केला ढंबुढेऱ्या भाद्रपदी !!
उत्सवाचे नावे द्रव्य भोंदाडीती !वाटी खीरापती धुर्त भट !!
जय मंगलमुर्ती जय मंगलमूर्ती !गाती नित्य कीर्ती टाळ्यासह !!
गणोबाची पूजा भाविका दावीती ! हरामाच्या खाती तूप पोळ्या !!
देवाजीच्या नावे जगाला पीडीती !अधोगती जाती निश्चयाने !!
खरे देवभक्त देह कष्टवीती ! पोषण करीती घरच्यांचे !!
आजानाशी ज्ञान पांगळ्या अन्नदान ! हेच बा स्मरण निर्मीकाचे !!
स्वजातीहीता साठी बोधीले पाखांड !धर्मलन्ड खरे जोती म्हणे !!

अनु राव Tue, 01/09/2015 - 15:45

In reply to by अतिशहाणा

देवभोळ्या जनतेच्या मनातील अंधश्रद्धेचे उच्चाटन करण्यासाठी कलबुर्गी किंवा अनंतमूर्तींनी जे केलंय ती हिंदू धर्मातील सुधारणेची परंपरा आहे.

मालक - इथेच प्रॉब्लेम आहे. दुसर्‍यांना वेडे, मुर्ख, कमी अकलेचे समजणे आणि स्वता कडे त्यांच्या उद्धाराची जबाबदारी आहे अशी हुच्चभुभु भुमिका घेणे हाच मानकिक विकार आहे. फुले आगरकरांची उदाहरणे देऊ नका. आगरकरांनी सुद्धा फक्त जिथे शोषण होते आहे किंवा शक्यता आहे अश्याच गोष्टींना विरोध केला.

जी कोण सो कॉल्ड देवभोळी जनता आहे, ती काय आमंत्रण घेऊन आली आहे का ह्यांच्या कडे की आमचा उद्धार करा.
दुसर्‍यांचा सो कॉल्ड उद्धार करण्यापेक्षा आपण बोलतो काय , वागतो काय ह्याचा आधी विचार करावा.

अनंतमूर्ती यांनीही हा प्रकार लहानपणी केला होता. मोठेपणी फक्त त्याचा उल्लेख केलाय,

लहानपणी केलात ना, ठीक आहे. रादर तुम्ही ( पक्षी मूर्ती ) घरी कश्यावर मुततात आणि काय खातात ह्याच्याशी कोणाला काही घेणेदेणे नाही. आता वय वाढले ना तुमचे ( पक्षी मुर्तींचे ), मग कशाला चारचौघात मी इथे मुततो, तिथे क्ष करतो हे सांगत हींडताय? का अजुन लहानपण संपतच नाहीये? स्वताला महत्व देणे सोडले ह्या लोकांनी तरी खूप झाले.

अतिशहाणा Tue, 01/09/2015 - 18:54

In reply to by अनु राव

प्रतिवादाचा एक शेवटचा प्रयत्न

रादर तुम्ही ( पक्षी मूर्ती ) घरी कश्यावर मुततात आणि काय खातात ह्याच्याशी कोणाला काही घेणेदेणे नाही. आता वय वाढले ना तुमचे ( पक्षी मुर्तींचे ), मग कशाला चारचौघात मी इथे मुततो, तिथे क्ष करतो हे सांगत हींडताय? का अजुन लहानपण संपतच नाहीये? स्वताला महत्व देणे सोडले ह्या लोकांनी तरी खूप झाले.

मूर्ती यांचं वाक्य साधारण असं आहेः 'अामच्या गावात एक दगड होता. त्याला पवित्र दगड मानले जात होते. त्याच्यात खरोखरच शक्ती आहे का याची परीक्षा घेण्यासाठी मी गुपचूप त्यावर लघवी केली. तीन-चार दिवस भीती वाटत होती. पण काही झाले नाही. त्या दगडाच्या देवात रक्षण करण्याची शक्ती नाही.'

या वाक्याचा अर्थ स्वयंस्पष्ट आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करणाऱ्या कलबुर्गींना हे वाक्य वापरावं वाटलं यात मला काही चुकीचं दिसत नाही. मात्र त्यातून 'अनंतमूर्ती हे इथे मुततात, तिथे मुततात' असा अर्थ काढणे हे अर्थातच प्रत्येकाची जाण आणि समज यावर अवलंबून आहे.

जी कोण सो कॉल्ड देवभोळी जनता आहे, ती काय आमंत्रण घेऊन आली आहे का ह्यांच्या कडे की आमचा उद्धार करा.
दुसर्‍यांचा सो कॉल्ड उद्धार करण्यापेक्षा आपण बोलतो काय , वागतो काय ह्याचा आधी विचार करावा.

कसं आहे की, अनंतमूर्ती, कलबुर्गी, दाभोळकर यांच्यासारख्या लोकांना मी, माझं ह्या अप्पलपोटेपणापेक्षाही समाजातील दुर्दैवी लोकांबाबत सहानुभूती वाटते. फुल्यांकडं कुणी गेलं होतं का की स्त्रीशिक्षणासाठी तुमच्या बायकोला शेणाचे गोळे आणि दगडगोट्यांचा मार खाऊ द्या हे सांगायला? का आंबेडकरांकडं गेलं होतं, लंडनला परत न जाता भारतातच दलितांसाठी काम करा असं सांगायला. दुसऱ्यांनी न सांगताही त्यांच्या भानगडीत नाक खुपसून कामं करणाऱ्या अशा उपद्व्यापी लोकामुळं एका जुनाट, रुढीप्रिय धर्मालाही नव्या जगात रुबाबाने वावरता येतंय. मूर्ती-कलबुर्गींसारखे लोक ह्या प्रकारे उपद्व्याप करुन धर्मसुधारणेला हातभारच लावत आहेत. मी त्यांचा प्रचंड ऋणी आहे.

बॅटमॅन Tue, 01/09/2015 - 19:58

In reply to by अतिशहाणा

मूर्तीचे वाक्य कलबुर्गीने कसे उद्धॄत केले हे पाहिले तर जाण, समज वगैरे वगैरे बरेच उद्बोधन होण्यची शक्यता आहे.

बाकी कॄतिशून्य, अ‍ॅट टाईम्स बॉर्डरिंग ऑन कंडिसेन्शन अशी सहानुभूती काय करायचीये? दाभोळकरांना बाकी काही म्हटले तरी कृतिशून्य तरी कुणीच म्हणणार नाही. कलबुर्गी आणि मूर्ती यांचे कृतिशील योगदान काय आहे ते सांगा मग पाहू त्या सहानुभूतीचे लोणचे घालायचे की काय करायचे ते.

आडकित्ता Mon, 07/09/2015 - 23:33

In reply to by बॅटमॅन

मूर्तीचे वाक्य कलबुर्गीने कसे उद्धॄत केले हे पाहिले तर जाण, समज वगैरे वगैरे बरेच उद्बोधन होण्यची शक्यता आहे.

माझ्याच नावाने वेगळा काढलेल्या धाग्यावर मला श्रेणी देता येत नाहीत.
बॅटमॅन,
मूर्ती अन कलबुर्गी या दोघांनाही एकेरीवर बोलून तुम्ही जे काय दाखवलेत, त्यावरून 'कलबुर्गीला मारला ते बरे झाले' हाच तुमचा विचार आहे, असे सिद्ध होते, असे माझे मत झाले आहे.
हे माझे मत बरोबर, की चूक?

बॅटमॅन Tue, 08/09/2015 - 01:11

In reply to by आडकित्ता

मूर्ती अन कलबुर्गी या दोघांनाही एकेरीवर बोलून तुम्ही जे काय दाखवलेत, त्यावरून 'कलबुर्गीला मारला ते बरे झाले' हाच तुमचा विचार आहे, असे सिद्ध होते, असे माझे मत झाले आहे.
हे माझे मत बरोबर, की चूक?

१. शिवाजीमहाराजांचा एकेरी उल्लेख करणे म्हणजे अनादर नव्हे असे मी म्हणत असतो, ऐसीवरच तशी विधाने मी केलेली आहेत. मूर्ती किंवा कलबुर्गी यांचा एकेरी उल्लेख त्यामुळे इतका खटकणे विनोदी वाटले.

२. बाकी एखादा माणूस या ना त्या कारणाने मरण पावल्यावर किती वेळाने त्याच्या आक्षेपार्ह विधानांची चर्चा केली म्हणजे आत्ता लावला तसा हास्यास्पद सूतस्वर्गन्याय तुम्ही लावणार नाही तेवढे सांगा. एक दिवस? दोन दिवस? दहाव्यानंतर? की चौदाव्यानंतर?

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 01/09/2015 - 23:43

In reply to by अतिशहाणा

कसं आहे की, अनंतमूर्ती, कलबुर्गी, दाभोळकर यांच्यासारख्या लोकांना मी, माझं ह्या अप्पलपोटेपणापेक्षाही समाजातील दुर्दैवी लोकांबाबत सहानुभूती वाटते. फुल्यांकडं कुणी गेलं होतं का की स्त्रीशिक्षणासाठी तुमच्या बायकोला शेणाचे गोळे आणि दगडगोट्यांचा मार खाऊ द्या हे सांगायला? का आंबेडकरांकडं गेलं होतं, लंडनला परत न जाता भारतातच दलितांसाठी काम करा असं सांगायला. दुसऱ्यांनी न सांगताही त्यांच्या भानगडीत नाक खुपसून कामं करणाऱ्या अशा उपद्व्यापी लोकामुळं एका जुनाट, रुढीप्रिय धर्मालाही नव्या जगात रुबाबाने वावरता येतंय. मूर्ती-कलबुर्गींसारखे लोक ह्या प्रकारे उपद्व्याप करुन धर्मसुधारणेला हातभारच लावत आहेत. मी त्यांचा प्रचंड ऋणी आहे.

याउप्पर काही लिहिण्याची गरज वाटत नाही.

अंतराआनंद Tue, 01/09/2015 - 23:29

In reply to by अनु राव

लहानपणी केलात ना, ठीक आहे. रादर तुम्ही ( पक्षी मूर्ती ) घरी कश्यावर मुततात आणि काय खातात ह्याच्याशी कोणाला काही घेणेदेणे नाही. आता वय वाढले ना तुमचे ( पक्षी मुर्तींचे ), मग कशाला चारचौघात मी इथे मुततो, तिथे क्ष करतो हे सांगत हींडताय? का अजुन लहानपण संपतच नाहीये? स्वताला महत्व देणे सोडले ह्या लोकांनी तरी खूप झाले.

त्यांनी हे एकदाच केले-सांगीतले आहे पण तुमच्यासारही मंडळी ते जणू येता जाता तेच करत होती अश्याथाटात सांगताय.

आणि यामुळे तुमच्या भावना दुखावतात मग जे दहीहंडी, गणपती,नवरात्र याचं स्वरूप आहे त्याने नाही का दुखावत तुमच्या भावना? माझ्या भावना त्याने आधी का दुखावल्या असं म्हणणे मग हत्येचा निषेध करणे हा दुटप्पीपणाचा कळस झाला. कुणी काहीही केलं तरी वृद्ध माणसाला सकाळी घराच्या दारात गाठून मारणं हा भ्याडपणाच झाला.
तुमचा तो देव तुम्हाला चांगल्या टणक दगडी भावना देवो .

अंतराआनंद Tue, 01/09/2015 - 23:29

In reply to by अनु राव

लहानपणी केलात ना, ठीक आहे. रादर तुम्ही ( पक्षी मूर्ती ) घरी कश्यावर मुततात आणि काय खातात ह्याच्याशी कोणाला काही घेणेदेणे नाही. आता वय वाढले ना तुमचे ( पक्षी मुर्तींचे ), मग कशाला चारचौघात मी इथे मुततो, तिथे क्ष करतो हे सांगत हींडताय? का अजुन लहानपण संपतच नाहीये? स्वताला महत्व देणे सोडले ह्या लोकांनी तरी खूप झाले.

त्यांनी हे एकदाच केले-सांगीतले आहे पण तुमच्यासारही मंडळी ते जणू येता जाता तेच करत होती अश्याथाटात सांगताय.

आणि यामुळे तुमच्या भावना दुखावतात मग जे दहीहंडी, गणपती,नवरात्र याचं स्वरूप आहे त्याने नाही का दुखावत तुमच्या भावना? माझ्या भावना त्याने आधी का दुखावल्या असं म्हणणे मग हत्येचा निषेध करणे हा दुटप्पीपणाचा कळस झाला. कुणी काहीही केलं तरी वृद्ध माणसाला सकाळी घराच्या दारात गाठून मारणं हा भ्याडपणाच झाला.
तुमचा तो देव तुम्हाला चांगल्या टणक दगडी भावना देवो .

गब्बर सिंग Tue, 01/09/2015 - 12:51

In reply to by अनु राव

१) पूर्ण नास्तिक आहे, तरीही मला कोणाला मूर्ख म्हणायचा हक्क प्राप्त होतो असे मला वाटत नाही.

२) आपल्या पेक्षा वेगळे वागणार्‍याला, जर मला तो काही त्रास देत नसेल तर नावे ठेवण्याचा, हीन लेखायचा किंवा त्याच्या विचारसरणीला हसायचा अधिकार प्राप्त होतो असे मला वाटत नाही.

३) हे अत्यंत मूर्ख पणाचे वाक्य आहे. right to express ही फार गमतीशीर गोष्ट आहे. कोणाला खून करुन पण एक्स्प्रेस व्हावे असे वाटले तर?

३ वाक्यातले अधोरेखित भाग एकाशेजारी एक ठेवून पहा.

बॅटमॅन Tue, 01/09/2015 - 12:40

In reply to by सुधीर

हो पण कैकांनी तसेही मत मांडलेले पाहिले आहे. अर्थात धर्म बघून यांच्या प्रतिक्रिया येत असल्याने ते अपेक्षितच होते म्हणा.

श्रीगुरूजी Tue, 01/09/2015 - 15:27

In reply to by सुधीर

"भावना दुखावतील अशी मतं मांडणंही चुकीचं आहे" हा मुद्दा मलाही पटत नाही.

भावना दुखावतील अशी कृत्ये (उदा. देवाच्या मुर्तीवर लघुशंका करणे) करणे चुकीचं आहे" हा मुद्दा तरी पटेल का?

अस्वल Tue, 01/09/2015 - 22:33

In reply to by श्रीगुरूजी

कारण मग उठसूठ कुठल्याही गोष्टींनी लोक "माझ्या _(धार्मिक/जातीय्/वैश्विक्/आर्थिक्/सामाजिक) भावना दुखावतात" हे शस्त्र पुढे करणार.
देवाच्या मूर्तीवर सार्वजनिकरित्या जाहीर बोलावून लघुशंका केली- तर नक्कीच आक्षेपार्ह आहे. त्यातून काहीच निष्पन्न होत नाही.
पण एखाद्याने प्रयोग म्हणून, खाजगीत असं कृत्य केलं, आणि ते आपल्या पुस्तकात आठवण म्हणून सांगितलं (अनंतमूर्ती)
किंवा
एखाद्याने अशा प्रयोगाला पाठिंबा दिला (कलबुर्गी)
तर त्याला त्यांचे खाजगी प्रयोग/मत म्हणा. त्यामुळे कुणाच्याही भावना दुखावल्या जायची गरज नाही.

आणि ह्यात भावना आणण्यापेक्षा एक वेगळा-कदाचित आक्षेपार्ह- पण "विचार" म्हणून बघितलं तर भावनांपर्यंत पोचायची गरजच लागणार नाही.

बॅटमॅन Tue, 01/09/2015 - 22:44

In reply to by अस्वल

पण एखाद्याने प्रयोग म्हणून, खाजगीत असं कृत्य केलं, आणि ते आपल्या पुस्तकात आठवण म्हणून सांगितलं (अनंतमूर्ती)
किंवा
एखाद्याने अशा प्रयोगाला पाठिंबा दिला (कलबुर्गी)
तर त्याला त्यांचे खाजगी प्रयोग/मत म्हणा. त्यामुळे कुणाच्याही भावना दुखावल्या जायची गरज नाही.

खाजगीरीत्या कुणी राष्ट्रध्वज जाळला-निव्वळ एक प्रयोग म्हणून-आणि त्यानंतर वरीलप्रमाणेच आठवण-समर्थन वगैरे केले तर काय प्रतिक्रिया असेल?

अस्वल Tue, 01/09/2015 - 22:50

In reply to by बॅटमॅन

राष्ट्रध्वज का जाळला? फक्त कारण द्यावं.
अ) तो एका विशिष्ट कापडाचा बनलाय, त्याचे ज्वालाग्रही गुण पडताळून पहायचेयेत म्हणून?
ब) १६ ऑगस्टला जाळला, तो कचरा आहे.
क) बाकी लोकांना काय वाटेल ते बघण्यासाठी जाळला.
ड) मला भारत देश ही कल्पनाच मान्य नाही आणि मला त्याचा निषेध करायचा आहे वगैरे.
ई) निव्वळ खाज म्हणून. तुमच्या भाषेत ट्रोलिंग.

ह्यातलं ई) सोडलं तर बाकी गोष्टींना प्रयोग म्हणून एक objective आहे. तसं ई) लाही आहे, पण मग ते झेपणार नाही, तेव्हा सोडून द्या.
तर मुद्दा हा की प्रयोग का केला, हे सांगून त्याचं समर्थन करावं. Blanket सहमती देऊ शकत नाही.

बॅटमॅन Tue, 01/09/2015 - 23:46

In reply to by अस्वल

समजा ई) सोडून बाकी कुठलेही कारण असेल तर सहमती असेल का? असे करणे कायदेशीर गुन्हा आहे या माहितीचा सहमतीवर काही परिणाम होईल का?

अस्वल Wed, 02/09/2015 - 02:02

In reply to by बॅटमॅन

वर म्हटल्याप्रमाणे कारण काय आहे ते महत्त्वाचं आहे. इतर कुठलंही असं blanket कारण असेल तर सहमत/असहमत नाही ना सांगता येत.
आता अ) ते ड) मधलं कुठलंही कारण माझ्यामते वैध आहे. It has a sincere motive with a conclusive objective. So a valid experiment. Controversial? may be.
फार तर काय, मी ते खाजगीत करीन आणि लोकांना सांगायला जाणार नाही, ईमेल करीन रिझल्टस, किंवा फोरम वर टाकीन :)

श्रीगुरूजी Tue, 01/09/2015 - 23:11

In reply to by अस्वल

पण एखाद्याने प्रयोग म्हणून, खाजगीत असं कृत्य केलं, आणि ते आपल्या पुस्तकात आठवण म्हणून सांगितलं (अनंतमूर्ती)
किंवा
एखाद्याने अशा प्रयोगाला पाठिंबा दिला (कलबुर्गी)
तर त्याला त्यांचे खाजगी प्रयोग/मत म्हणा. त्यामुळे कुणाच्याही भावना दुखावल्या जायची गरज नाही.

सार्वजनिक श्रद्धास्थानाची विटंबना, त्याची पुस्तक लिहून सार्वजनिक प्रसिद्धी आणि त्या कृतीला सार्वजनिक पाठिंबा हा खाजगी प्रयोग नसतो. कोणाच्या तरी श्रद्धास्थानावर आघात करण्यासाठी ते जाणुनबुजून केलेले घृणास्पद कृत्य असते. अशा घृणास्पद कृत्याच्या जाहिरातीमुळे अनेकांच्या भावनांवर आघात होईल हे तसे कृत्य करणार्‍याला आणि अशा कृत्याचे समर्थन करणार्‍याला पूर्ण जाणीव असते. अशा प्रकाराला मी विकृती समजतो.

एकीकडे घोषणा द्यायच्या की विचारांची लढाई ही विचारांनीच लढायला हवी आणि दुसरीकडे विचारांची लढाई घृणास्पद कृत्यानी लढायची ही विकृती आहे.

अस्वल Tue, 01/09/2015 - 23:18

In reply to by श्रीगुरूजी

पुस्तकाचा अजेंडा ह्या कृत्याची प्रसिद्धी हा नसावा- असा माझा एक अंदाज आहे! त्यामुळे "सार्वजनिक श्रद्धास्थानाची विटंबना, त्याची पुस्तक लिहून सार्वजनिक प्रसिद्धी" हे विधान सरासर चूक आहे. पुस्तकाची प्रसिद्धी कुठल्याही इतर पुस्तकाप्रमाणेच होत असते.
"त्या कृतीला सार्वजनिक पाठिंबा हा खाजगी प्रयोग नसतो. " हे एकदम मान्य. सार्वजनिक भाषणात जर असं म्हटलं असेल तर ते नक्कीच खाजगी मत नाही.
पण पाठिंबा देणे ही कृती नसून वैचारिक असतो, तेव्हा "विचारांची लढाई घृणास्पद कृत्याने लढायची" हा दावाही चूक वाटतो.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 01/09/2015 - 23:48

In reply to by श्रीगुरूजी

या तथाकथित घृणास्पद कृत्यामुळे कोणाच्याही अभिव्यक्ती वा व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला आलेला नाही. तेव्हा एखादी कृती तुम्हाला आवडली नाही तर तिचा निषेध करण्याचा हक्क असतो, पण "भावना दुखावल्या" हे स्पष्टीकरण पुरेसं नसतं. विशेषतः असली लेमळट स्पष्टीकरणं कलबुर्गींची हत्या झाल्यानंतर लगेच यावीत हे अतिशय संतापजनक आहे. असले प्रकार स्वतःला धार्मिक म्हणवणाऱ्या लोकांनी करावेत हे तर कल्पनेपलिकडचं वाटतं. पण मग धार्मिक असणं आणि सुसंस्कृत असणं या दोन निराळ्या गोष्टी आहेत याची जाणीव होते. काही लोकं धार्मिक आणि सुसंस्कृत दोन्ही असतात, काहींना एकच गोष्ट जमते.

बॅटमॅन Tue, 01/09/2015 - 23:54

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

या तथाकथित घृणास्पद कृत्यामुळे कोणाच्याही अभिव्यक्ती वा व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला आलेला नाही. तेव्हा एखादी कृती तुम्हाला आवडली नाही तर तिचा निषेध करण्याचा हक्क असतो, पण "भावना दुखावल्या" हे स्पष्टीकरण पुरेसं नसतं.

म्हणजे निव्वळ "भावना दुखावल्या" या भांडवलावर पिच्चर, सीरियल वगैरेंवर टीका करणारे स्वयंघोषित स्त्रीवादी गंडलेच तर!

श्रीगुरूजी Wed, 02/09/2015 - 15:37

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

या तथाकथित घृणास्पद कृत्यामुळे कोणाच्याही अभिव्यक्ती वा व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला आलेला नाही.

तथाकथित घृणास्पद कृत्यामुळे? म्हणजे देवाच्या मूर्तीवर लघुशंका केल्याचे जाहीर करूनसुद्धा हे कृत्य घृणास्पद असल्याबद्दल अजून संशय वाटतोय? धन्य आहे!

तेव्हा एखादी कृती तुम्हाला आवडली नाही तर तिचा निषेध करण्याचा हक्क असतो, पण "भावना दुखावल्या" हे स्पष्टीकरण पुरेसं नसतं.

तुम्हाला मूर्तीपूजा मान्य नसेल तर निषेध करण्याचा हक्क असतो, पण त्यासाठी समाजाला पूजनीय असलेल्या देवाच्या मूर्तीवर लघुशंका करण्यासारखे घृणास्पद कृत्य करण्याची आणि त्यायोगे समाजाच्या श्रद्धा दुखावण्याची गरज नसते.

समाजाचे श्रद्धास्थान आणि पूजनीय असलेल्या देवाच्या मूर्तीवर कोणीतरी येऊन लघुशंका केल्यामुळे मूर्ती अस्वच्छ झाली. म्हणजेच आपल्या आवडत्या देवाच्या स्वच्छ मूर्तीला सजवून पूजा करण्याच्या समाजाच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर घालाच आला ना. अशा परिस्थितीत "भावना दुखावल्या" हे स्पष्टीकरण पुरेसं नसेल तर कोणते स्पष्टीकरण पुरेसे ठरेल?

विशेषतः असली लेमळट स्पष्टीकरणं कलबुर्गींची हत्या झाल्यानंतर लगेच यावीत हे अतिशय संतापजनक आहे. असले प्रकार स्वतःला धार्मिक म्हणवणाऱ्या लोकांनी करावेत हे तर कल्पनेपलिकडचं वाटतं. पण मग धार्मिक असणं आणि सुसंस्कृत असणं या दोन निराळ्या गोष्टी आहेत याची जाणीव होते. काही लोकं धार्मिक आणि सुसंस्कृत दोन्ही असतात, काहींना एकच गोष्ट जमते.

अनंतमूर्तींनी समाजाकडून पुजल्या जाणार्‍या देवाच्या मूर्तीवर लघुशंका केली आणि त्या कृत्याचे कलबुर्गींनी समर्थन केले. त्याबद्दल तथाकथित पुरोगाम्यानी कलबुर्गींचे समर्थन करणे हे अतिशय संतापजनक आहे. असे समर्थन सर्वधर्मसमभाव, समान हक्क, पुरोगामी, बुद्धीप्रामाण्यवादी, व्यक्तीस्वातंत्र्याचे पुरस्कर्ते, लोकशाहीवादी इ.इ. म्हणविणार्‍यांनी लरावेत हे तर कल्पनेपलिकडचं वाटतं. पण मग वचारांनी पुरोगामी असणं आणि आचाराने पुरोगामी असणं या दोन निराळ्या गोष्टी आहेत याची जाणीव होते. काही लोकं पुरोगामी आणि प्रामाणिक दोन्ही असतात, काही जण विचारांनी पुरोगामी आणि आचाराने ढोंगी असतात.

अस्वल Wed, 02/09/2015 - 23:32

In reply to by श्रीगुरूजी

काही लोकं पुरोगामी आणि प्रामाणिक दोन्ही असतात, काही जण विचारांनी पुरोगामी आणि आचाराने ढोंगी असतात.

विचारांनी आणि आचारांनी पुरोगामी (आलाच साला शब्द!) असलेल्यांनी काय केलं पाहिजे अशी तुमची अपेक्षा आहे?
मी फक्त एक कुतूहल म्हणून विचारतोय, म्हणजे प्रामाणिकपणे पुरोगामी असलेले जे कोणी लोक आहेत (ऐकताय ना बे? तुमच्यासाठी चाललंय हे सगळं!) त्यांना तरी कळेल.

श्रीगुरूजी Thu, 03/09/2015 - 13:35

In reply to by अस्वल

विचारांनी आणि आचारांनी पुरोगामी (आलाच साला शब्द!) असलेल्यांनी काय केलं पाहिजे अशी तुमची अपेक्षा आहे?

जसे विचार तसेच आचरण असावे. सेलेक्टिव्ह पाठिंबा किंवा सेलेक्टिव्ह बॅशिंग नसावे.

अस्वल Thu, 03/09/2015 - 22:23

In reply to by श्रीगुरूजी

म्हणजे काय? एक उदाहरण द्या.
मी समजा कलबुर्गींच्या विचारांना पाठिंबा देणारा एक पुरोगामी आहे. आणि मी म्हटलं की मला त्यांचा XYZ विचार मान्य आहे (उ.दा. "प्रयोग म्हणून एका मूर्तीवर लघवी करून बघणे की त्यामुळे काय होतं")
एवढं म्हटल्यामुळे मी एक ढोंगी पुरोगामी आहे का? आणि अस्सल पुरोगामी बनण्यासाठी मी अजून काय केलं पाहिजे?
(खवचट पणा नाहीये, सरळ प्रश्न आहे.)

ऋषिकेश Fri, 04/09/2015 - 13:26

In reply to by अस्वल

यानिमित्ताने प्रकट (अस्वलाला उद्देशून नाही):
कोणी कितीही म्हटलं काहीही व कितीही बडबड केली, टोमणे मारले तरी माझे मत अजूनही बदललेले नाही आचार-विचारात नेहमीच फरक रहाणार.
मग त्या व्यक्तीचे विचार पुरोगामी असोत, प्रतिगामी असोत, उदारमतवादी असोत वा अनुदारमतवादी, आधुनिक असोत वा पारंपाररिक! त्या एखाद्याची कितीही इच्छा व/वा काहीही मत असले तरी त्याप्रमाणे वागणे प्रत्येकाला प्रत्येकवेळी शक्य होईलच असे नसते. भवताल, अनेक अवधाने, परिस्थिती, कायदे, सामाजिक नितीमत्ता दरवेळी त्या गोष्टीला/मताला अनुकूल असेलच असे नाही. पण ती व्यक्ती तसे वागत नाहिये म्हणून ते मत गैर व/वा बाद अजिबात ठरत नाही!

बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले दे काही पटत नाही.

चालायच्या आधी बोलायचाही एक टप्पा असतो, आणि तो कमी महत्त्वाचा नाही. (अनेक जण तिथेही पोचू शकत नाहीत - विचारच तिथे पोचत नाहीत तर चालणे दूरचेच राहिले!)

बोलणारा बोलतेवेळी तसे वागू शकेलच याची खात्री नाही पण इतर कोणला प्रेरणा देऊ शकेल किंवा कालांतराने अनेकांना तसे वाटल्यावर समाजाचे नियम बदलू लागल्यावर एखादा धैर्य करेल.

अर्थात कोणताही नवा नी बंधने मोडणारा विचार कोणी मांडला की तुम्ही काय करताय? तुम्ही किती अस्सल आहात? वगैरे प्रश्न विचारणारे हरेक काळात होते. त्यांच्याकडे किती लक्ष द्यायचे हे प्रत्येक हत्तीने ठरवाने :)

बॅटमॅन Fri, 04/09/2015 - 14:16

In reply to by ऋषिकेश

कुंपणावर बसून खडे टाकणार्‍यांना प्रत्यक्ष पोहणार्‍यांइतकेच महत्त्व दिले पाहिजे हा कंठाळी आग्रह म्हणजे एकूण लोकशाहीकरणाचेच फलित आहे, "माय इग्नॉरन्स इज़ अ‍ॅज़ गुड अ‍ॅज़ युवर नॉलेज" वगैरे वगैरे सारखे.

बाकी पालथ्या घड्याची कबुली पाहून डोळे निवले. :)

बॅटमॅन Fri, 04/09/2015 - 14:34

In reply to by मेघना भुस्कुटे

"आजकाल कोणीही लोकं साहित्य, कला, इ. बद्दल बोलतात" असे हुच्चभूभू स्वरात ओरडणे म्हणजे खरी पोटदुखी हे कळायला घडा कसा असावा लागतो हेवेसांनल. :)

श्रीगुरूजी Fri, 04/09/2015 - 14:58

In reply to by अस्वल

पुरोगाम्यात अस्सल फार थोडे आहेत. जे आहेत ते इतरांच्या श्रद्धास्थानावर आघात न करता आपल्या विचारांचे आचरण करीत असतात.

उदा. पु. ल. देशपांडे रूढार्थाने नास्तिक होते. त्यांनी अनेक नाटके लिहिली. स्वतःच्या नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी ते इतर नाटककारांप्रमाणे स्टेजची पूजा, कलेची देवता समजल्या जाणार्‍या नटराजाच्या मूर्तीची पूजा ते करीत नसत. स्टेज स्वच्छ ठेवणे, नाटक वेळेवर सुरू करणे ही रंगदेवतेची पूजा असे मी मानतो असे त्यांनी लिहिले आहे. स्वतः नास्तिक आहे म्हणून इतरांच्या श्रद्धेची खिल्ली उडविणे, नटराज किंवा इतर कोणत्याही देवाच्या मूर्तीची विटंबना करणे इ. प्रकार त्यांनी कधीच केले नाहीत. ते स्वतः नास्तिक होते आणि आयुष्यभर ते नास्तिकच राहिले.

जसे पु. ल. देशपांडे होते तसेच एस. एम. जोशी, अनिल अवचट, प्रधान सर इ. पुरोगामी व्यक्तींच्या बाबतीत सांगता येईल. जसे विचार होते तसेच त्यांचे आचरण होते.

अस्वल Fri, 04/09/2015 - 21:30

In reply to by श्रीगुरूजी

पुरोगाम्यात अस्सल फार थोडे आहेत. जे आहेत ते इतरांच्या श्रद्धास्थानावर आघात न करता आपल्या विचारांचे आचरण करीत असतात.

हे तुमचं गृहितक आहे, जे साफ चूक आहे.
.
उ.दा. मला सती प्रथा आवडत नाही आणि माझा त्याला विरोध आहे. उद्या कुणी जर येऊन म्हणाला की "तुम्ही आमच्या श्रद्धास्थानावर आघात करू शकत नाही."
तर तुमच्या व्याख्येप्रमाणे मी एक ढोंगी पुरोगामी ठरेन(!). हे उदाहरण २०१५ मधे हास्यास्पद वाटलं तरी १८ किंवा १९व्या शतकात तसं वाटलं नसतं.
मला जर एखादी गोष्ट प्रामाणिकपणे पटली असेल तर मी तिचा पुरस्कार करणार. ती गोष्ट इतरांचे श्रद्धास्थान असेल तर मला माझे शब्द्/कृती जपून कराव्या लागतील- पण मी तसा वागलो तर मला ढोंगी म्हणणं हे खरं तर विनोदी वक्तव्य आहे!
.
बाकी प्रतिसादातली उदाहरणं माझ्या शंकेशी संबंधित नसल्यामुळे त्यांचा विचार केला नाही. जर पु.ल. नास्तिक होते आणि त्यांनी आपली नास्तिकता आपल्यापुरती मर्यादित ठेवली असेल तर ते अस्सल्/ढोंगी अज्याबात ठरत नाहीत. तो त्यांचा वैयक्तिक चॉइस होता.

बॅटमॅन Sat, 05/09/2015 - 12:59

In reply to by अस्वल

श्रद्धास्थान वगैरे म्हटले की सतीप्रथेसारखी उदाहरणेच आठवणे हे सोयीस्कर आणि एकदम चान चान आहे.

गवि Mon, 07/09/2015 - 12:30

In reply to by बॅटमॅन

श्रद्धास्थान वगैरे म्हटले की सतीप्रथेसारखी उदाहरणेच आठवणे हे सोयीस्कर आणि एकदम चान चान आहे.

अगदी अगदी.. सतीप्रथा आणि जातीव्यवस्था.. नव्या काळात एखादी सतीची घटना जरी भारत देशासमोर आली तरी अजिबात घाऊक समर्थन न मिळणारी, उलट ते मागास आणि दुरित आहे असंच जनरल सामाजिक मत असणारी, एक जवळजवळ नामशेष झालेली प्रथा..

आणि नामशेष झालेली नसली तरी जिचं निवळत जाणं कोणालाही ढळढळीत दिसतंय (शहरात नष्टच झालेली आणि खेडेगावात कमी होत चाललेली) एक व्यवस्था..

या दोन्हीची उदाहरणं त्यांच्या अस्तित्वाच्या प्रमाणापेक्षा भरपूर जास्त सढळपणे वापरली जातात हे खरं आहे.

नितिन थत्ते Mon, 07/09/2015 - 13:48

In reply to by गवि

+१

पण जातिव्यवस्थेविषयी असहमत आहे. जात ही (निदान ब्राह्मणांच्या*) मनात अजूनची घट्ट असलेली व्यवस्था आहे.

**एम एच हायस्कूल किंवा बेडेकर विद्यामंदिर मध्ये मुलांना न घालता सरस्वती सेकंडरी स्कूल मध्ये घालावं कारण बेडेकर आणि एमएचमध्ये हल्ली तसली मुलं फार असतात हे ब्राह्मण लोक उघड बोलतात. सरस्वतीमध्ये अजून ब्राह्मणांना प्राधान्य आहे असंही उघडपणे बोलतात. [सरकारी नियमाप्रमाणे मागासवर्गीय घेतले की उरलेले शक्यतो ब्राह्मणच- मराठे, कुणबी, कुंभार, लोहार वगळून- घेतात असं असावं]**

*माझ्या जवळ हेच लोक असल्याने मला यांच्याविषयी डेफिनेट माहिती आहे.

ऋषिकेश Mon, 07/09/2015 - 13:53

In reply to by नितिन थत्ते

मुंबई-ठाण्यातले (एकुणच वेगवान महानगरातले) जातीचे स्थान, व्याप्ती आणि तीव्रता यांच्यात नी निमशहरे, गावे वगैरेतील जातींचे स्थान यांच्यात प्रचंडच फरक आहे हे मी मुंबई सोडल्यावर मला चांगलेच जाणवले. (फक्त ब्राह्मणच नव्हे, सर्वच जातीत)

मोठ्या वेगवान मेट्रो शहरांत हे त्यांच्या त्यांच्या घेट्टोपुरते मर्यादित असते. इतर कॉस्मो भागात ते जवळजवळ नामशेष असते

गवि Mon, 07/09/2015 - 14:29

In reply to by ऋषिकेश

तुलना आजची पुणेमुंबई विरुद्ध आजची खेडेगावे अशी करायची नसून पूर्वीच्या खेडेगावातली नोंदवलेल्या जुन्या लेखनातून दिसणारी परिस्थिती आणि त्याच ठिकाणची आजची परिस्थिती यांच्यातली तीव्रता-सौम्यता अशी करायची आहे.

जशीच्यातशी परिस्थिती आहे हे मेघनाचं विधान अजिबातच पटत नाही. इव्हन थत्तेचाचांनी उल्लेखिलेल्या उदाहरणांतही काही लोकांचे विचार (अमुक शाळेत घालून नका, तिकडे ते लोक असतात इ.) हे त्याच जुनाट लाईनीवर असल्याचं दिसलं तरी पूर्वी सांगितली जाणारी आचारांतली आक्रमकता तर कमी / नाहीशी झाली आहे हे मान्य करावंच लागेल ना?

"किमान ती सती अन जाती अशी व्यवस्था पुन्हा रिस्टोर करा, आणि जे लोक चार वर्ण + तुच्छता + शिवाशीव+ सती इ. पाळणार नाहीत त्यांना एलिमिनेट करा" म्हणून देशव्यापी सिस्टीम उभी करु पाहणारे कोणी उठले तर त्यांना मेजोरिटी समाजाकडून "धर्मनिष्ठ" किंवा "पाठिंबा देण्यायोग्य" असं तरी समजलं जाणार नाही हे तरी मान्य आहे का?

मूळ समजुती/प्रथा आणखी घट्ट करत नेण्यापेक्षा त्या चूक आहेत हे मान्य करणार्‍यांची संख्या वाढतेय हेही अमान्य आहे का?

मेघना भुस्कुटे Mon, 07/09/2015 - 14:38

In reply to by गवि

तुलना....पूर्वीच्या खेडेगावातली नोंदवलेल्या जुन्या लेखनातून दिसणारी परिस्थिती आणि त्याच ठिकाणची आजची परिस्थिती यांच्यातली तीव्रता-सौम्यता अशी करायची आहे.

या तुलनेचा काय उपयोग? परिस्थिती बदलली आहे हे स्वयंस्पष्ट आहे.

पण तो बदल पुरेसा आहे का, असा प्रश्न आहे. एरवी घासूगुर्जींच्या निकषांनुसार (गुर्जी, तुमचं नाव घेते आहे खरी. पण 'घासूगुर्जींचे निकष' हे आता सामान्यनाम झालेलं आहे. :प) सावित्रीबाईकालीन स्त्रियांशी तुलना करू जाता आजच्या स्त्रियांची परिस्थिती नि:संशय उत्तमच आहे. पण हे बदल पुरेसे आहेत का? इक्विलिब्रियम प्रस्थापित झाला असं म्हणण्याइतके आहेत का? आता बदलांची गरज संपली आहे का? तर नाही. जात या गोष्टीची सार्वजनिक आचारविचारांत जितक्या प्रमाणात निर्भर्त्सना केली जाते, त्या प्रमाणात जातीला खिंडारं पडलेली नाहीत. जातींच्या भिंती पडल्या असल्याच, तर एकाच आर्थिक पातळीवर असलेल्या दोन जातींमधला बेटी व्यवहार (हं. असो.) काहीसा सैल झाला आहे, इतक्याच मर्यादित अर्थानं. एरवी विखार शिल्लक आहेच.

या संदर्भचौकटीत 'जशीच्या तशी परिस्थिती' हे शब्द घ्यावेत.

गवि Mon, 07/09/2015 - 14:47

In reply to by मेघना भुस्कुटे

पण हे बदल पुरेसे आहेत का? इक्विलिब्रियम प्रस्थापित झाला असं म्हणण्याइतके आहेत का?

हे दोन्ही अगदी रास्त प्रश्न असले तरी इथे "श्रद्धास्थानांना धक्का" याचे उदाहरण म्हणून जे आले (सती) त्या संदर्भासाठीच ते पहावे ही विनंती.

सती जाण्याच्या प्रथेला कोणी अमानुष म्हणाला तर त्याने आमच्या "श्रद्धास्थानाला धक्का बसला" किंवा "धार्मिक भावनेवर थुंकला" असं शंभरातले किती सामान्यजन म्हणतील?

मेघना भुस्कुटे Mon, 07/09/2015 - 15:09

In reply to by गवि

या संदर्भात आत्ता तरी शंभरातला एखादाही सतीप्रथेची बाजू घेणार नाही. हे मान्य आहे.

पण अवांतरः कितीही निराशावादी वाटलं तरी मला खरोखरच असं म्हणायचं आहे - एका म्हातार्‍या संशोधकाला गोळ्या घातल्यावर त्याने कोणाच्या कोणत्या कृतीला शाब्दिक पाठिंबा दिला होता याच्याबद्दलच्या चर्चा न झडता त्याच्या भ्याड हत्येचा सार्वत्रिक आणि वादातीत निषेध होईल असं मी काही वर्षांपूर्वीपर्यंत छातीठोकपणे म्हटलं असतं. आज माझे दात घशात गेले असते. त्याप्रमाणे आज सतीप्रथेची बाजू घेणारा एकही हरीचा लाल निघणार नसला, तरी उद्या एखाद्या सोयीस्कर सतीप्रकरणानंतर त्या प्रकरणाचा निषेध न होता त्या 'साध्वी'च्या पूर्वायुष्याची चर्चा होणारच नाही, याची मला कोणतीही खात्री (हे खास मिहिरसाठी) देता येत नाही.

गवि Mon, 07/09/2015 - 15:35

In reply to by मेघना भुस्कुटे

एका म्हातार्‍या संशोधकाला गोळ्या घातल्यावर त्याने कोणाच्या कोणत्या कृतीला शाब्दिक पाठिंबा दिला होता याच्याबद्दलच्या चर्चा न झडता त्याच्या भ्याड हत्येचा सार्वत्रिक आणि वादातीत निषेध होईल असं मी काही वर्षांपूर्वीपर्यंत छातीठोकपणे म्हटलं असतं. आज माझे दात घशात गेले असते.

हत्येचा निषेध सर्वांनीच केलेला दिसतोय. अगदी वादातीत निषेधच केलेला दिसतोय सर्वांनीच. वादाचा मुद्दा तिथे नाहीच आहे. इथे औचित्यभंग आणि कट्टरतेला पाठिंबा या दोन गोष्टींचा चुकून घोळ झालेला आहे.

मला वाटतं की निधन झाल्यानंतर लगेच त्यांच्या विचारांचं विच्छेदन करणं हा भाग "औचित्य न सांभाळलं गेल्याचा" आहे.. कट्टर मागास किंवा हत्यासमर्थक विचाराचा नाही. ते आज हयात असते आणि त्यांच्या विचारांना असाच शाब्दिक विरोध झाला असता तर ते उचित वाटलं असतं ना तुला? कारण इन दॅट केस विचारांचा प्रतिवाद विचारांनी केला गेलेला आहे. आत्ताच्या स्थितीत फरक इतकाच आहे की त्यांची हत्या आणि तदनुषंगिक दुर्दैवी निधन झाल्यामुळे या घटनेनंतर लगेचच त्यांच्या विचारांना केला गेलेला वैचारिक विरोध हा इनफॅक्ट औचित्यभंग आणि केवळ औचित्यभंगच असताना त्याऐवजी तो "कट्टर प्रतिगामी हत्यासमर्थक विचार" म्हणून मिसइंटरप्रीट होण्याचा धोका मी लक्षात आणून देऊ इच्छितो इतकंच.

म्हणूनच एखाद्याच्या निधनानंतर लगेच केवळ दु:खच व्यक्त करावं, वैचारिक मतभेद व्यक्त करु नये असा संकेत असावा.

मेघना भुस्कुटे Mon, 07/09/2015 - 15:59

In reply to by गवि

इथे औचित्यभंग आणि कट्टरतेला पाठिंबा या दोन गोष्टींचा चुकून घोळ झालेला आहे.

असहमती.

या औचित्यभंगाचं काय कारण असेल, असा प्रश्न तुम्हांला पडत नाही का? हुसेनच्या विचारांबद्दलही आक्षेप घेतले गेले. दाभोलकरांच्या विचारांबद्दलही प्रश्न विचारले गेले. इथे कुठे झाला आहे औचित्यभंग? एकतर मधे थोडे दिवस जाऊ द्यावेत हा संकेत पाळला गेला. तो पाळण्याचं सौजन्य जेव्हा हे तथाकथित ’विचारविच्छेदक’ वापरत नाहीत, तेव्हा त्यांच्या हेतूंबद्दल शंका येते. हा केवळ औचित्यभंग नसून हे उघडउघड त्या व्यक्तीबद्दलची सहानुभूती नाहीशी व्हावी / झाली तरी चालेल अशा उद्देशानं केलेलं समर्थन आहे. कितीतरी वादांमध्ये 'तुमचा हत्येला पाठिंबा आहे का?' असं स्वच्छ विचारल्याखेरीज हत्येचा निषेध दिसलासुद्धा नाही. याचा अर्थ दुसरा काय घ्यावा?

एका विशिष्ट धारणेकडून जेव्हा समाज दुसर्‍या टोकाकडे जाऊ लागतो, तेव्हा त्याचे पडसाद अशा प्रकारच्या वादांमधून उमटतात असं तुम्हांला वाटत नाही का? की या औचित्यभंगाला काहीच कारण नाही, असं तुमचं मत आहे?

ऋषिकेश Mon, 07/09/2015 - 16:32

In reply to by मेघना भुस्कुटे

सहमत आहे.
अश्या प्रकारच्या उदाहरणांच्या स्वातंत्र्योत्तर कालातील इतिहास गांधीजींपर्यंत मागे नेता यावा.
अश्या 'काळाच्या पुढे' असणार्‍या गांधीजींचा खून झाल्यावर धर्मवाद्यांकडून त्यांच्या प्रतिमाहननाचे झाले तितके प्रयत्न अन्य कोणाचेही झाले नसावेत. हा केवळ औचित्यभंग म्हणून दुर्लक्ष करण्याजोगा प्रकार अजिबात नाही, तसे समजणे वाळूत तोंड खुपसणे ठरेल!

बॅटमॅन Mon, 07/09/2015 - 16:10

In reply to by गवि

अतिनेमके.

टीका केली रे केली की लगेच ते प्रतिगामी, हिंदुत्ववादी आणि अजून कायकाय होणार. पण दांभिकांकडून अशी लेबले लागणे म्हणजेच योग्य मार्गावर असल्याची पावती असल्याने त्याचे काही वाटत नाही.

ऋषिकेश Mon, 07/09/2015 - 17:07

In reply to by गवि

हत्येचा निषेध सर्वांनीच केलेला दिसतोय. अगदी वादातीत निषेधच केलेला दिसतोय सर्वांनीच.

काहीही काय?
निषेध ज्यांनी व्यक्त केलेत त्यात अनेकांचे सावध आहेत, डोक्यावर कंडिशन्स अप्लाय चे अ‍ॅस्टरिक घेतलेले
काहींनी तर थेट निषेध व्यक्तही केलेला नाही. त्या व्यक्तीचे नुसतेच नी बेफाम व अखंड प्रतिमाहनन चालवले आहे!

ऋषिकेश Tue, 08/09/2015 - 13:13

In reply to by अनामिक

अजिबात शरम वगैरे नाही लादत आहोत. फक्त गविंना सांगतोय की त्यांचे गृहितक चुकीचे आहे!
त्यांना आपणहून शरमेले होत असेल तर माझा नाईलाज आहे!

नितिन थत्ते Mon, 07/09/2015 - 15:47

In reply to by मेघना भुस्कुटे

तसेच आता सती जाण्याचं समर्थन कोणी करणार नाही असं मी १९८५ मध्ये छातीठोकपणे म्हटलं असतं. बाय १९८९ माझे दात घशात गेले असते.

(रूपकुंवर सती प्रकरणानंतर त्या सती जाण्याचं समर्थन - विजयाराजे शिंदे यांनी केलं होतं. तो मिलिटंट हिंदुत्वाच्या अ‍ॅसर्शनचा सुरुवातीचा काळ होता).

चिंतातुर जंतू Mon, 07/09/2015 - 18:10

In reply to by गवि

>> आणि नामशेष झालेली नसली तरी जिचं निवळत जाणं कोणालाही ढळढळीत दिसतंय (शहरात नष्टच झालेली आणि खेडेगावात कमी होत चाललेली) एक व्यवस्था..
या दोन्हीची उदाहरणं त्यांच्या अस्तित्वाच्या प्रमाणापेक्षा भरपूर जास्त सढळपणे वापरली जातात हे खरं आहे.

>> इव्हन थत्तेचाचांनी उल्लेखिलेल्या उदाहरणांतही काही लोकांचे विचार (अमुक शाळेत घालून नका, तिकडे ते लोक असतात इ.) हे त्याच जुनाट लाईनीवर असल्याचं दिसलं तरी पूर्वी सांगितली जाणारी आचारांतली आक्रमकता तर कमी / नाहीशी झाली आहे हे मान्य करावंच लागेल ना?

More than 1000 honour killings in India every year: Experts

Though there was no nationwide data on the prevalent of honour killings in India, they quoted figures compiled by the India Democratic Women's Association, according to which Haryana, Punjab and U P account for about 900 honour killings and another 100 to 300 in the rest of the country

NEHA DIXIT tracks Khap panchayats across north India.

adam Mon, 07/09/2015 - 14:42

In reply to by ऋषिकेश

+- शेषराव मोरे ह्यांच्या भाषणातील काही भाग :-
आज बेटीबंदी वगळता अन्य सामाजिक विषमतेच्या बेडय़ा तोडण्यात आपल्याला बहुतांशी यश मिळालेले आहे. बेटीबंदी हीही हळूहळू तुटत जाईल; आणि ती तोडणे ही सक्तीने वा कायद्याने करावयाची गोष्ट नव्हे. जातीतल्या जातीतसुद्धा इच्छेप्रमाणे मुले-मुली मिळतातच असे नव्हे. बेटीबंदी तोडणे याचा व्यावहारिक अर्थ तरुण-तरुणी विवाहासाठी तयार असतील तर त्या आंतरजातीय विवाहाला विरोध करू नये, पािठबा द्यावा, उत्तेजन द्यावे एवढाच असू शकतो. बाबासाहेबांनी बेटीबंदी तोडण्याचा हाच अर्थ सांगितला आहे. तेव्हा ही बेटीबंदी वगळता अन्य बाबतींत आपल्या समाजाने एक प्रकारे सामाजिक क्रांतीच केली आहे व त्याचे श्रेय राज्यघटनेला, विविध कायद्यांना, परिवर्तनवादी व विद्रोही साहित्याला व चळवळींना व िहदू समाजाच्या परिवर्तनशील स्वभावाला दिले पाहिजे.
मराठी साहित्याच्या संदर्भात हा मुद्दा मी यासाठी उपस्थित केला आहे, की गेल्या ६५ वर्षांत झालेल्या या सामाजिक परिवर्तनाची नोंद साहित्यात झाली आहे काय? या परिवर्तनाचे चित्रण करणारे साहित्य निर्माण झाले आहे काय? फुले-शाहू-आंबेडकर यांच्या काळातील समाज आज राहिलेला नाही. जातिव्यवस्थेची, बेटीबंदीचा अपवाद वगळता, उर्वरित बंधने तुटली आहेत हे वास्तव मांडणाऱ्या कविता, कथा, कादंबऱ्या, नाटके लिहिली जात आहेत काय? दलित विद्यार्थ्यांला दुरून छडी मारणारा मास्तर आता कोठे सापडतो? आता दलित हा गुरुजी होऊन सवर्ण हा आनंदाने त्याचा शिष्य बनला आहे, हे वास्तव नाही काय? दलित म्हणून जन्मलेल्या विद्वानाला, साहित्यिकाला, विचारवंताला सार्वजनिक व्यासपीठावर साष्टांग नमस्कार घालणारे कित्येक सवर्ण तुम्हाला जागोजागी सापडतील. समाजात झालेले हे क्रांतिकारक परिवर्तन साहित्यात का येऊ नये? आजच्या परिवर्तनवादी म्हणून नावलौकिकास आलेल्या साहित्यात आजच्या परिवर्तनाचे चित्र येत नसून मागच्या काळातील अपरिवर्तनीय समाजाचे येत आहे.
.
.
बाकी माझं काही मत नाहिच.

नितिन थत्ते Mon, 07/09/2015 - 17:00

In reply to by adam

>>आता दलित हा गुरुजी होऊन सवर्ण हा आनंदाने त्याचा शिष्य बनला आहे, हे वास्तव नाही काय?

नाही. तो आनंदाने शिष्य बनलेला नाही.

मेघना भुस्कुटे Mon, 07/09/2015 - 13:57

In reply to by नितिन थत्ते

शंभर टक्के सहमती. काही विशिष्ट शहरी भाग आणि काही विशिष्ट सामाजिक क्रिया वगळता जात जशीच्या तशी आहे.

अनु राव Mon, 07/09/2015 - 14:32

In reply to by नितिन थत्ते

पण जातिव्यवस्थेविषयी असहमत आहे. जात ही (निदान ब्राह्मणांच्या*) मनात अजूनची घट्ट असलेली व्यवस्था आहे.

तुम्ही जी उदाहरणे दिली ती खरी असली तरी वेगळी आहेत. जेंव्हा जेंव्हा ब्राह्मणांचा उल्लेख अश्या संदर्भात केला जातो त्यात अन्याय, अत्याचार वगैरे समाविष्ट असतो.
ब्राह्मणांकडुन अन्याय, अत्याचार ह्या गोष्टी महाराष्ट्रात अगदी काना कोपर्‍यात बंद होउन बरीच वर्ष झाली.
आता ग्रामिण भागात उलटी परिस्थिती आहे.

तुम्ही जी शाळेची उदाहरणे सांगीतली त्यात कोणावर अन्याय, अत्याचार होत नाही.

आपल्या सारख्या लोकांमधे ( च ) रहाणे ह्या चूक काय आहे ते मला अजुन कळत नाहीये. ह्यात फक्त जात येत नाही. आर्थिक परीस्थिती वगैरे पण येते. मला माझ्या शेजारी गळ्यात दोरखंडासारख्या सोन्याच्या साखळ्या घालणारे नको असतील तर ते चूक आहे का?

श्रीगुरूजी Sat, 05/09/2015 - 13:15

In reply to by अस्वल


उ.दा. मला सती प्रथा आवडत नाही आणि माझा त्याला विरोध आहे. उद्या कुणी जर येऊन म्हणाला की "तुम्ही आमच्या श्रद्धास्थानावर आघात करू शकत नाही."
तर तुमच्या व्याख्येप्रमाणे मी एक ढोंगी पुरोगामी ठरेन(!). हे उदाहरण २०१५ मधे हास्यास्पद वाटलं तरी १८ किंवा १९व्या शतकात तसं वाटलं नसतं.

सतीप्रथेमध्ये एका व्यक्तीचा अनैसर्गिक मृत्यु आहे, त्यात बळजबरी आहे, क्रूरता आहेच आणि त्यामुळे त्या व्यक्तीचा जगण्याचा हक्क नाकारला गेला आहे. त्यामुळे अशा प्रथांना विरोध योग्यच आहे.

दुसरं म्हणजे तुम्ही सती प्रथेला विरोध केला म्हणून तुम्ही कसे ढोंगी पुरोगामी ठराल? (बादवे, ढोंगी पुरोगामी असे म्हणणे म्हणजे गोल सर्कल किंवा ग्रीन हिरवा असे म्हणण्यासारखे आहे). तुम्ही ढोंगी किंवा पुरोगामी तेव्हाच ठराल की तुम्ही फक्त सती प्रथेला विरोध करता आणि इतर धर्मात जर अशाच क्रूर प्रथा असतील तर त्याला विरोध न करता तो त्यांच्या धर्माचा अंतर्गत प्रश्न आहे असे म्हणून गप्प राहता.


मला जर एखादी गोष्ट प्रामाणिकपणे पटली असेल तर मी तिचा पुरस्कार करणार. ती गोष्ट इतरांचे श्रद्धास्थान असेल तर मला माझे शब्द्/कृती जपून कराव्या लागतील- पण मी तसा वागलो तर मला ढोंगी म्हणणं हे खरं तर विनोदी वक्तव्य आहे!

.

वरील अधोरेखित वाक्यात जे लिहिले आहे तेच मी सुरवातीपासून सांगत आहे.

बाकी प्रतिसादातली उदाहरणं माझ्या शंकेशी संबंधित नसल्यामुळे त्यांचा विचार केला नाही. जर पु.ल. नास्तिक होते आणि त्यांनी आपली नास्तिकता आपल्यापुरती मर्यादित ठेवली असेल तर ते अस्सल्/ढोंगी अज्याबात ठरत नाहीत. तो त्यांचा वैयक्तिक चॉइस होता.

काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. मी पु. ल. किंवा माझ्या प्रतिसादातील इतरांना अजिबात ढोंगी म्हटलेले नाही. उलट मला त्यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे. पु. लं. चा तर मी जबरदस्त पंखा आहे. इतरांच्या श्रद्धांना अतिरेकी कृती करून विरोध न करता त्यांनी प्रामाणिकपणे आपले विचार मांडले आणि आपली नास्तिकता आपल्यापुरतीच मर्यादित ठेवली हेच मी माझ्या प्रतिसादातून सांगण्याचा प्रयत्न केला होता.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 04/09/2015 - 22:14

In reply to by श्रीगुरूजी

स्वतः नास्तिक आहे म्हणून इतरांच्या श्रद्धेची खिल्ली उडविणे, नटराज किंवा इतर कोणत्याही देवाच्या मूर्तीची विटंबना करणे इ. प्रकार त्यांनी कधीच केले नाहीत.

पण पुलंनी नवनाट्याची खिल्ली उडवलीच की. ज्यांची नवनाट्यावर श्रद्धा आहे त्यांच्या श्रद्धेचं काय?

'काहीच पवित्र नाही' असं मानणारेच खरे अस्सल.

श्रीगुरूजी Sat, 05/09/2015 - 12:46

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

खिल्ली उडवली म्हणजे नक्की काय केलं? विटंबना केली का नवनाट्यांच्या पुस्तकांवर लघुशंका केली?

'काहीच पवित्र नाही' असं मानणारेच खरे अस्सल.

हिंदूंचे काहीच पवित्र नाही असं मानणारेच अस्सल पुरोगामी!

नगरीनिरंजन Sat, 05/09/2015 - 14:52

In reply to by श्रीगुरूजी

ते नवनाट्य वाल्यांना ठरवू द्या की. विटंबनेची व्याख्यापण तुम्हीच करणार का?
बाकी ज्यांनी लघुशंका केली ती कोणत्या वयात केली आघात करायला केली की एक प्रयोग म्हणून केली आणि तरीही काहीच झाले नाही म्हणून नास्तिकता बळकट झाली हे तपासून पाहण्याचे प्रयोजन लोकांना वाटत नाही; कारण प्रयोग/शंका/विरोध या गोष्टीला श्रद्धेत स्थान नाही. :-)

मुळात लघुशंका करण्याचा प्रकार खोडसाळ्पणा म्हणून केलेला नसल्याने तसाच प्रकार इतर धर्मीयांच्या बाबतीत का करत नाहीत असे विचारणे अस्थानी आहे. पण दुसर्‍या धर्मांच्या वेड्या चाळ्यांवर प्रखर व प्रकट टीका होत नाही याबाबतीत मी सहमत आहे. त्या धर्मांतल्या शिकलेल्या पण गप्प बसणार्‍या लोकांइतके दुटप्पी आणि ढोंगी लोक अन्य नाहीत.

श्रीगुरूजी Sat, 05/09/2015 - 15:10

In reply to by नगरीनिरंजन

ते नवनाट्य वाल्यांना ठरवू द्या की. विटंबनेची व्याख्यापण तुम्हीच करणार का?

ही व्याख्या घटनाकारांनी फार पूर्वीच करून ठेवलेली आहे. इथे पहा - http://adrindia.org/sites/default/files/Details%20of%20IPC%20Sections%2…

घटनेच्या कलम २९५ अ नुसार,

Section 295A. Deliberate and malicious acts, intended to outrage religious feelings or any class by insulting its religion or religious beliefs.

295A. Deliberate and malicious acts, intended to outrage religious feelings or any class by insulting its religion or religious beliefs.— Whoever, with deliberate and malicious intention of outraging the religious feelings of any class of citizens of India, by words, either spoken or written, or by signs or by visible representations or otherwise, insults or attempts to insult the religion or the religious beliefs of that class, shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to three years, or with fine, or with both.

SECTION 295:
Section 295 of the I.P.C makes destruction, damage, or defilement of a place of worship or an object
held sacred, with intent to insult the religion of a class of persons, punishable with imprisonment which
may extend to two years, or with fine , or with both. This section has been enacted to compel people to
respect the religious susceptibilities of persons of different religious persuasion or creeds.

Ingredients of Section 295:
- The accused must do such an act with the intention of insulting the religion of any person, or
with the knowledge that any class of person is likely to consider such destruction, damage or defilement as an insult to their religion.

- The accused must destroy , damage or defile any place of worship or any object which is held as
sacred by any class of persons.

defile -
1. to make foul, dirty, or unclean; pollute; taint; debase.
2. to violate the chastity of.
3. to make impure for ceremonial use; desecrate.
4. to sully, as a person's reputation.

बाकी ज्यांनी लघुशंका केली ती कोणत्या वयात केली आघात करायला केली की एक प्रयोग म्हणून केली आणि तरीही काहीच झाले नाही म्हणून नास्तिकता बळकट झाली हे तपासून पाहण्याचे प्रयोजन लोकांना वाटत नाही; कारण प्रयोग/शंका/विरोध या गोष्टीला श्रद्धेत स्थान नाही. (स्माईल)

तुम्ही प्रयोग म्हणून करा किंवा अजून कोणत्याही कारणाने करा, इतरांची श्रध्दास्थानांची विटंबना करून त्यांच्या धार्मिक भावना दुखावू नका. तुमची नास्तिकता बळकट झाल्याने किंवा दुर्बल झाल्याने जगाला काडीचाही फरक पडत नाही.

मुळात लघुशंका करण्याचा प्रकार खोडसाळ्पणा म्हणून केलेला नसल्याने तसाच प्रकार इतर धर्मीयांच्या बाबतीत का करत नाहीत असे विचारणे अस्थानी आहे. पण दुसर्‍या धर्मांच्या वेड्या चाळ्यांवर प्रखर व प्रकट टीका होत नाही याबाबतीत मी सहमत आहे. त्या धर्मांतल्या शिकलेल्या पण गप्प बसणार्‍या लोकांइतके दुटप्पी आणि ढोंगी लोक अन्य नाहीत.

का अस्थानी आहे? हाच प्रयोग इतर धर्मियांच्या श्रद्धास्थानावर का नाही केला? का तेवढी हिंमतच झाली नाही?

कलम २९५ अ नुसार देवाच्या मूर्तीवर लघुशंका करणे किंवा त्याचे समर्थन करणे हा गुन्हाच आहे. त्याचे समर्थन होऊच शकत नाही.

नगरीनिरंजन Sat, 05/09/2015 - 15:37

In reply to by श्रीगुरूजी

हाहा, ती नवनाट्याच्या विटंबनेची व्याख्या आहे?
असो. पण मग घटनेत सांगितलेल्या मार्गाने कारवाई झाली असती तर कोण काय म्हणाले असते?
इथे लघुशंका करण्याचे समर्थन चालू नाहीय तरी तुम्ही पुन्हा-पुन्हा हिंमत नाही का वगैरेच प्रश्न विचारत बसणार असाल तर वाद व्यर्थ आहे.

श्रीगुरूजी Sat, 05/09/2015 - 15:41

In reply to by नगरीनिरंजन

(१) मुळात नवनाट्य आणि देवाची मूर्ती यांना एकाच पातळीवर तोलल्याने मी आधीच्याच प्रतिसादात विचारलं होतं की नवनाट्याची खिल्ली उडविली होती म्हणजे नक्की काय केलं होतं?

(२) इतर धर्मियांविषयी प्रश्न विचारणे अस्थानी आहे असं तुम्ही आधीच्या प्रतिसादात लिहिल्याने मला हिंमतीविषयी प्रश्न विचारावा लागला.

असो.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 07/09/2015 - 20:37

In reply to by श्रीगुरूजी

(१) मुळात नवनाट्य आणि देवाची मूर्ती यांना एकाच पातळीवर तोलल्याने ...

कोणता देव, कोणती प्रतिमा किंवा कोणतं प्रतीक थोर हे लोकांनी आपापलं ठरवायचं नाही, असं तुमचं म्हणणं आहे का? कोणाची इब्सेनवर राम-कृष्णासारखी भक्ती असू शकते ती कमी दर्जाची म्हणायची का?

... मी आधीच्याच प्रतिसादात विचारलं होतं की नवनाट्याची खिल्ली उडविली होती म्हणजे नक्की काय केलं होतं?

खिल्ली हा शब्द तुमचाच. पुलंचं 'खुर्च्या' हे ननाट्य खिल्लीचं एक उदाहरण.

ऋषिकेश Mon, 07/09/2015 - 12:19

In reply to by श्रीगुरूजी

तुमची नास्तिकता बळकट झाल्याने किंवा दुर्बल झाल्याने जगाला काडीचाही फरक पडत नाही.

हेच वाक्य आस्तिकतेला व/वा तथाकथित श्रद्धास्थानांना का व कसे लागु नाही?

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 04/09/2015 - 00:38

In reply to by श्रीगुरूजी

समाजाचे श्रद्धास्थान आणि पूजनीय असलेल्या देवाच्या मूर्तीवर कोणीतरी येऊन लघुशंका केल्यामुळे मूर्ती अस्वच्छ झाली. म्हणजेच आपल्या आवडत्या देवाच्या स्वच्छ मूर्तीला सजवून पूजा करण्याच्या समाजाच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर घालाच आला ना. अशा परिस्थितीत "भावना दुखावल्या" हे स्पष्टीकरण पुरेसं नसेल तर कोणते स्पष्टीकरण पुरेसे ठरेल?

हे काहीतरी विनोदीच.

श्रद्धाळूंनी पूजा केल्यामुळे नास्तिकांच्या भावना दुखावतात, हे असंच निरर्थक विधान आहे. पण निरर्थक विधानांचा प्रतिवाद म्हणून दुसरं निरर्थक विधान करणं म्हणजे आपणही त्याच पोरकट पातळीला उतरणं आहे. मला ते करायचं नाही. म्हणून स्पष्ट उत्तर - श्रद्धाळूंना आपापल्या मूर्त्या आणून पूजा-अर्चा छाप विधी करायला अनंतमूर्ती, कलबुर्गी किंवा इतर कोणी आडकाठी केलेली नाही, तसे कायदे बनवलेले नाहीत. त्यामुळे "समाजाच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर घालाच आला" ही चक्क स्वतःची आणि इतरांची फसवणूक आहे. त्याला मी बळी पडणार नाही.

कलबुर्गींनी समर्थन केल्याचं कोणत्याही पेपरात छापलेलं मला दिसलं नाही. त्यांनी तो प्रसंग उद्धृत केला.

फसवणूक आणि खोटारडेपणा धर्माच्या नावाखाली ... चालू द्या. तीसुद्धा परंपराच आहे.

श्रीगुरूजी Fri, 04/09/2015 - 14:50

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

म्हणून स्पष्ट उत्तर - श्रद्धाळूंना आपापल्या मूर्त्या आणून पूजा-अर्चा छाप विधी करायला अनंतमूर्ती, कलबुर्गी किंवा इतर कोणी आडकाठी केलेली नाही, तसे कायदे बनवलेले नाहीत. त्यामुळे "समाजाच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर घालाच आला" ही चक्क स्वतःची आणि इतरांची फसवणूक आहे. त्याला मी बळी पडणार नाही.

नास्तिकांनी देखील मूर्तीपूजा न करण्यास कोणीच आडकाठी केलेली नाही किंवा तसे कायदेही बनविलेले नाहीत. घटनेने सर्वधर्मियांना आपापल्या उपासना पद्धतीप्रमाणे धार्मिक कृत्ये, उपासना, पूजाअर्चा करण्याचे व्यक्तीस्वातंत्र्य दिले आहे. जे नागरिक त्या मूर्तीची श्रद्धेने पूजाअर्चा करीत होते त्या मूर्तीवर लघुशंका करण्याचा अधिकार अनंतमूर्तींना कोणी दिला? आपण ज्या मूर्तीची श्रद्धेने पूजा करतो त्याच मूर्तीवर मूर्तीपूजा मान्य नसलेल्याने लघुशंका करणे हा श्रद्धाळूंच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर घालाच आहे.

आपले विचार समाजाला पटविता येत नसतील तर समाजाच्या श्रद्धास्थानांची विटंबना करून त्यांच्या भावना दुखाविण्याचा कोणत्याही तथाकथित पुरोगाम्याला कायदेशीर अथवा कोणताच अधिकार नाही.

कलबुर्गींनी समर्थन केल्याचं कोणत्याही पेपरात छापलेलं मला दिसलं नाही. त्यांनी तो प्रसंग उद्धृत केला.

आपल्याला एखाद्या गोष्टीचं अज्ञान असलं तर ती गोष्टच जगात अस्तित्वात नसते अशी काही जणांची समजूत असते. खालील चित्रफीत पहा.

https://www.youtube.com/watch?v=mS5y9Asrzug

BANGALORE: Former vice-chancellor of Kannada University Dr M M Kalburgi's remarks 'there is nothing wrong in urinating on idols,' has sparked criticism in the literary, political and academic circles.

The BJP workers staged a protest at Ananda Rao Circle condemning Kalburgi's remarks that were interpreted by many as anti-God.

Researcher Dr M Chidananda Murthy termed Kalburgi's statements 'uncivilised and nonsensical'.

"His criticism of blind beliefs is not correct. Kalburgi said idols should not be worshiped and it is not wrong to urinate on them. This is pure nonsense," Murthy said.

फसवणूक आणि खोटारडेपणा धर्माच्या नावाखाली ... चालू द्या. तीसुद्धा परंपराच आहे.

मी पुराव्याशिवाय बोलत नाही. मी वर लिंक दिली आहे. कोण खोटे बोलत आहे ते दिसत आहे. ढोंगीपणा, खोटारडेपणा आणि दुसर्‍यांच्या श्रद्धास्थानांची विटंबना (म्हणजे फक्त हिंदूंच्या. इतर धर्मांच्या बाबतीत कृती तर सोडाच, ही मंडळी तोंडातून ब्र देखील काढत नाहीत.) ही तथाकथित पुरोगाम्यांची आणि निधर्मांधांची परंपरा आहे. चालू द्या.

असो.

अंतराआनंद Sat, 05/09/2015 - 13:40

In reply to by श्रीगुरूजी

कमालेय तुमची तुम्ही हे एकच तुणतुणं वाजवताय जणू काही येता जाता कल्बुर्गी आणि अनंतमूर्ती सगळ्या देवादिकांच्या मूर्तीवर लघूशंका करत हिंडत होते. तुमची ही श्रद्धा जे देवाचं नाव घेउन वाईट कामं करतायत त्यांच्या बाबतीत कशी काय नाही हो दुखावत? त्यांनी लहानपणी केलेलं काम आणि त्याचा मोठेपणी एकदा दिलेला दाखला याने तुमच्या भावना दुखावल्या जातात मग हे सार्वजनिक गणपतीत मूर्तीसमोर अचकट विचकट नाचणारे लोक बघून तुमच्या भावना काय करतात? देवळात मोठ्या मोठ्यने लागणारी गाणी, गणपती, दहीहंडी वैगेरेच्या मिरवणूकेतले आवाज ऐकून आजारी , वृद्ध यांचे हाल होतात तेव्हा तुमच्या भावना कुठल्या मुर्तींची वास्त्पुस्त करायला गेलेल्या असतात? की त्या फक्त दगडी देवांच्या बाबतीतच संवेदनाशील असतात आणि हाडामासाच्या माणसांच्या त्रासाची त्यांना फिकीर नसते?

श्रीगुरूजी Sat, 05/09/2015 - 15:23

In reply to by अंतराआनंद


कमालेय तुमची तुम्ही हे एकच तुणतुणं वाजवताय जणू काही येता जाता कल्बुर्गी आणि अनंतमूर्ती सगळ्या देवादिकांच्या मूर्तीवर लघूशंका करत हिंडत होते.

असं मी कधी म्हटलंय? एखादी घृणास्पद कृती फक्त एकदाच जरी केली तरी ती वाईटच असते.

तुमची ही श्रद्धा जे देवाचं नाव घेउन वाईट कामं करतायत त्यांच्या बाबतीत कशी काय नाही हो दुखावत?

जे जे असे करतात त्यांना त्यांना कायद्यानुसार शिक्षा होत असते. त्याचे कोणीच समर्थन करीत नाही.

त्यांनी लहानपणी केलेलं काम आणि त्याचा मोठेपणी एकदा दिलेला दाखला याने तुमच्या भावना दुखावल्या जातात मग हे सार्वजनिक गणपतीत मूर्तीसमोर अचकट विचकट नाचणारे लोक बघून तुमच्या भावना काय करतात? देवळात मोठ्या मोठ्यने लागणारी गाणी, गणपती, दहीहंडी वैगेरेच्या मिरवणूकेतले आवाज ऐकून आजारी , वृद्ध यांचे हाल होतात तेव्हा तुमच्या भावना कुठल्या मुर्तींची वास्त्पुस्त करायला गेलेल्या असतात? की त्या फक्त दगडी देवांच्या बाबतीतच संवेदनाशील असतात आणि हाडामासाच्या माणसांच्या त्रासाची त्यांना फिकीर नसते?

दोन वेगवेगळ्या गोष्टींची तुलना होत आहे. अनंतमूर्तींनी ते घृणास्पद कृत्य केले तेव्हा कदाचित आपण काय करीत आहोत हे त्यांना समजलं नसेल, परंतु नंतर कळत्या वयात, वयाच्या साठीनंतर पुस्तक लिहून त्याचा उल्लेख करणे, आपण जे काही केलं त्याच्याबद्दल अजिबात खंत न वाटणे आणि नंतर कलबुर्गींनी स्वतःच्या कळत्या वयात त्या कृतीचे समर्थन करणे हे अत्यंत संतापजनक आहे.

गणपती, दहिहंडी इ. सोहळ्यात मोठ्या आवाजात लावल्या जाणार्‍या गाण्यांचा समाजाला त्रास होतोच. ते निषेधार्ह आहेच. मी त्या प्रकाराचे कधीच समर्थन केलेले नाही. सर्व सार्वजनिक उत्सव, रस्त्यावर साजर्‍या केल्या जाणार्‍या थोर महापुरूषांच्या जयंत्या-पुण्यतिथ्या, लग्नाच्या वराती इ. बंद व्हायलाच हव्यात अशी माझी इच्छा आहे. सरकारी पातळीवर सुद्धा त्यावर प्रयत्न सुरू आहेत. न्यायालयाने याबाबतीत काही निर्बंध सुद्धा घातले आहेत. काही काळाने हे प्रकार नक्कीच मोठ्या प्रमाणात कमी होतील.

सुधीर Wed, 02/09/2015 - 16:34

In reply to by श्रीगुरूजी

गुरुजी, तुमचा मुद्दा चुकीचा नाही. पण तुम्ही हे गृहीत धरून चालला आहात की, अनंतमूर्तींने तसे कृत्य केलेच आहे. कशावरून ती थापेबाजी नसेल?
दुसरा मुद्दा हा की आपल्या भावना एवढ्या नाजूक का असव्यात, की कुणाच्या थापेबाजीने त्या दुखाव्यात?

श्रीगुरूजी Thu, 03/09/2015 - 13:42

In reply to by सुधीर


गुरुजी, तुमचा मुद्दा चुकीचा नाही. पण तुम्ही हे गृहीत धरून चालला आहात की, अनंतमूर्तींने तसे कृत्य केलेच आहे. कशावरून ती थापेबाजी नसेल?

अनंतमूर्तींनी १९९६ साली स्वतःच्या एका पुस्तकात या घटनेचा उल्लेख केला आहे. त्यानंतर त्यांच्यावर अनेकवेळा टीका होऊनसुद्धा त्यांनी ती थाप होती असे म्हटलेले नाही. तस्मात ती घटना खरी धरायला हवी.

दुसरा मुद्दा हा की आपल्या भावना एवढ्या नाजूक का असव्यात, की कुणाच्या थापेबाजीने त्या दुखाव्यात?

समजा ती थाप असली तरी ती थाप अत्यंत घॄणास्पद स्वरूपाची थाप आहे. उद्या तुमच्या मुलीच्या शाळेतल्या एखाद्या शिक्षकाने सांगितले की मी काल शाळा सुटल्यावर तुमच्या मुलीवर बलात्कार केला आणि कालांतराने ती थाप असल्याचे सिद्ध झाले तरीसुद्धा तुमच्या मनात त्या शिक्षकाबद्दल आकस राहिलच ना.

सुधीर Thu, 03/09/2015 - 15:56

In reply to by श्रीगुरूजी

"घटना खरी धरायला हवी" आणि "घडली आहे'च'" यात खूप अंतर आहे. हा माझा मुद्दा होता.

दुसरं म्हणजे, सामाजिक भावनेशी निगडीत असलेल्या घटना असे मला अपेक्षित होते. (जसे मागे गणपतीची सोन्याची मूर्ती दिवेआगारामधून चोरीस गेली आणि ती वितळवून भामट्यांनी पैसेही खाल्ले). एखाद-दुसर्‍या व्यक्तीच्या खाजगी आयुष्यात घडलेल्या अप्रिय घटनांवर त्याला आकस वाटेल वा न वाटेल पण तो मुद्दा इथे सर्वस्वी गौण आहे, असे मला वाटते.

आणि शेवटचे, अनंतमूर्तींमुळे तुमच्या भावना दुखावल्या गेल्यात ही नोंद घेतो आणि थांबतो.

श्रीगुरूजी Thu, 03/09/2015 - 19:53

In reply to by सुधीर

धन्यवाद! खालील प्रतिक्रिया लिहून मी सुद्धा थांबतो.

(१) कलबुर्गींच्या खुनाचा निषेध

(२) अनंतमूर्तींनी देवाच्या मूर्तीवर लघुशंका केल्याचा निषेध आणि

(३) कलबुर्गींनी अनंतमूर्तींच्या कृत्याचे समर्थन केल्याचा निषेध