माझी शाळा सृजन आनंद -४

भाग १ भाग २ भाग ३

सृजन मधल्या पध्दती continued …

मधली सुट्टी : मधल्या सुट्टीची घंटा वाजली कि आम्ही सगळे (पूर्ण वर्ग) आपापली बस्करं उचलून गोलाकारात बसून एकत्र ( कंपू मध्ये नाही ) डबा खायचो . डबा खाण्यापूर्वी " वदनी कवळ घेतां " म्हणायची पद्धत होती पण आमचं " वदनी कवळ घेतां " काहीसं असं होतं :
वदनी कवळ घेतां , नाम घ्या मातृभू चे
सहज स्मरण व्हावे आपुल्या बांधवांचे
कृषिवल कृषी करोनी राबती दिनरात
श्रमिक श्रम करोनी वस्तू ह्या निर्मितात
स्मरण करुनी त्यांचे अन्न सेवा खुशाल
उदरभरण व्हावे चित्त होण्या विशाल
वरील श्लोकात एखादा-दुसरा शब्द मागे पुढे झाला असेल पण मला जे आठवतंय ते साधारण असंच होतं .

इतिहासाचा तास: पहिलीत असताना इतिहासाचा तास हा गोष्टींचा तास होता . सुचिताताई "देनिसच्या गोष्टी " पुस्तकातल्या गोष्टी सांगायच्या. देनिस ची ओळख पहिल्यांदा तिथे झाली .
मला माहिती नाही इतर शाळांत दुसरीच्या वर्गाला काय इतिहास असतो. आम्हाला दुसरीत इतिहासाचं पुस्तक म्हणजे "चार्ल्स स्तेन्मेत्झ" ह्या संशोधकाचं छोटंसं चरित्र टाईप (चित्रमय ) पुस्तक होतं . गोष्ट सांगून संपल्यावर त्या गोष्टीवर चित्र काढणे वगैरे पण करायचो . माझ्या वर्गातल्या बहुतेकांना ते अजून लक्षात आहे आणि त्या पुस्ताकातल्या गोष्टींवर अजूनही आमची चर्चा होते .
तिसरी पासून रेग्युलर शिक्षण मंडळांच पुस्तक होतं. तिसरीच्या इतिहासाच्या पुस्तकाचं नाव होतं "माणसाची गोष्ट" तेव्हा मला वाटलेलं कि हि कोणत्यातरी माणसाची गोष्ट असणार म्हणून उत्साहानी वाचायला घेतलं आणल्या आणल्या तर तो मानवाच्या उत्क्रांतीचा इतिहास निघाला

मराठीचा तास : मराठीच्या तासाला नेहमीच्या अभ्यासाबरोबरच निरनिराळी कोडी, एका मोठ्ठ्या शब्दात लपलेले छोटे शब्द शोधणे ( जसेकी जवाहरलाल ह्या शब्दात आहेत लाल, रवा , वार , हर इ. इ . हा शब्द मला अजूनही आठवतोय कारण ह्या खेळात सई नावाच्या मैत्रिणीने "लव" असाही शब्द शोधला (इंग्रजी अर्थाने) आणि मग आम्ही सगळे हसायला लागलो मग ताईंनी लव चा मराठी अर्थ वगैरे समजावून सांगितला ), शब्द कोडी, चित्र वर्णन ( खरेतर interpretation कारण एका एका आई-बाबा आणि मुलं अशा जाहिरातीतल्या चित्राचे आम्ही interpretation केले होते आणि जाहिरातीतल्या आई-बाबांचे कपडे चांगले आहेत म्हणजे ते गरीब घरातले नसणार असे काही पण निरीक्षण नोंदवले होते.) सृजन मध्ये शिकवणाऱ्या एक ताई परदेशात गेल्या होत्या तर त्यांना पत्र लिहिणे, क ने संपणाऱ्या तीन अक्षरी शब्दाची यादी करणे (हे जस्ट एक उदाहरण झाले ), नवीन गाणी तयार करणे - गोष्टींचं गाण्यात रुपांतर करणे, चिमणीच घर मेणाचं किंवा मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी ह्यासारख्या गोष्टीचं alternate version तयार करणे, वर्गात दोन ग्रुप करून गोष्टीतल्या एका पात्राची बाजू एका ग्रुपने आणि दुसऱ्या पात्राची बाजू दुसऱ्या ग्रुपने मांडणे असं बरंच काही होत असे.

सुशोभन : सृजन मधली सांगण्यासारखी अजून एक गोष्ट म्हणजे सुशोभन . प्रत्येक वर्गात एक सुशोभानाचा कोपरा असे. वर्गाच्या पटसंख्येनुसार ५-६ मुलांचा एक असे ६ गट केले जात. प्रत्येक गटाचा एक सुशोभानाचा वार ठरलेला असायचा . त्या वारी त्या गटातल्या मुलांनी एक सुशोभन वस्तू वर्गात आणून त्या कोपर्यात मांडायची . आपल्या वाराच्या आदल्या दिवशी मधल्या सुट्टीत किंवा शाळा संपता-संपता त्या गटाची एक छोटी मीटिंग व्हायची आणि मग सुशोभानाचा विषय (थीम ) ठरत असे . जसे कि पर्यावरण किंवा क्रिकेट किंवा नारळ असे काहीही विषय आम्ही ठरवायचो आणि मग कोण काय करणार ते ठरायचं . जर समजा नारळ विषय असेल तर कोणी करवंटीपासून तबला किंवा तत्सम वस्तू बनवायचं , कोणी नारळाच्या झाडाचं चित्र काढत असे कोणी नारळाचे उपयोग ह्यावर तक्ता बनवत असे तर कोणी नारळाची झाडे कुठे कुठे असतात ते जगाच्या नकाशात दाखवत असे.
परत, हे जस्ट उदाहरण झालं पण आमच आम्हीच विषय आणि कोण काय करणार हे ठरवत असू . ह्यात ताई -दादांचा हस्तक्षेप मुळीच होत नसे . कधी कधी दोन जणांना एकच गोष्ट करायची असे मग बाकीचे त्यांच्यातले मध्यस्थ बनून सलोख्याचा मार्ग शोधत .
दुसर्या दिवशी ( म्हणजे सुशोभानाच्या वारी ) शाळेत आल्या आल्या आपापल्या सुशोभानाच्या वस्तू आम्ही सुशोभानाच्या कोपर्यात मांडून ठेवत असू . मग जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आमच्या आणि इतरही वर्गातली मुलं आणि ताई -दादा सुशोभन बघून जात . कल्पक किंवा कलात्मक सुशोभानाचे जाहीर टाळ्या वाजवून कौतुक (वर्गात किंवा प्रार्थनेच्या वेळी ) केलं जायचं . सुशोभन आणि विषय कसा आहे ह्यावर कधी कधी चर्चा पण होत असे वर्गात. अर्थात कधी कधी कोणी तरी सुशोभन आणायचं विसरायचच किंवा अत्यंत कमी वेळात काहीतरी करून आणायचं. पण बर्याचदा इतर ग्रुप पेक्षा आपलं सुशोभन छान व्हावं ह्यासाठी प्रयत्न असायचे .
मधल्या सुट्टीत डबा खाऊन झाल्यावर वर्गावर्गात फिरून सुशोभन बघणे हे माझं ठरलेलं असायचं !

प्रकल्प : सृजन मध्ये चारही वर्षं आम्हाला प्रकल्प नावाचा विषय होता. प्रकल्पाचा तास पण होत असे . उद्योग किंवा लघु-उद्योग असा काहीतरी प्रकल्प विषय होता तेव्हा ते उद्योग म्हणजे काय कोण करतात का करतात अशी काय माहिती प्रकल्पाचे विषय शिक्षक देत असत मग तुम्ही एक लघु-उद्योगाच उदाहरण सांगा किंवा करून आणा असा गृहपाठ असायचा. एकदा छोटी छोटी १ सेमी लांबीची दोर्याची रीळं करून नेलेलं आठवतंय. एकदा मातीची पृथ्वी केलेली ( आत सगळे थर वेगवेगळ्या रंगाने रंगवलेले) असं तुटक तुटक आठवतंय मी ह्यावर अजून माहिती विचारून/ शोधून देईन .

वर्ग वही : प्रत्येक वर्गाची त्या त्या वर्षाची एक वर्ग वही असे. ( जसे कि १९९५ पहिली, १९९५ दुसरी इ इ ) ह्या वहीत दिवसवार प्रत्येक तासाला काय शिकवलं, काय विशेष झालं, काय चर्चा झाली ह्याची नोंद त्या त्या तासाचे शिक्षक तासानंतर करत असत. हा आमच्या वर्गाच्या वर्ग वहीतला एक नमुना :

पालकसभा : सृजन मध्ये दर महिन्याच्या एका ठराविक शुक्रवारी पालक सभा असत असे . प्रत्येक वर्गाचे पालक आणि वर्गशिक्षक ह्यांच्यात चर्चा होत असे . वर्ग वहीतल्या नोंदी, मुलांची प्रगती -विचार- वर्तणूक, शाळेचे आगामी उपक्रम इ इ बद्दल पालकांना माहिती दिली जात असे. त्याच प्रमाणे शाळेकडून पालकांच्या काय अपेक्षा आहेत किंवा शाळा आणि पालक ह्यांच्या सहकार्याने मुलांसाठी काय उपक्रम राबवता येतील असे बरेच विषय चर्चिले जात . ह्यानंतर जर काही मुलांबद्दल वर्ग-शिक्षक किंवा इतर शिक्षक ह्यांना पालकांशी बोलायचं असेल तर वन टू वन डिस्कशन होत असे.

वर्गसभा: पालकसभे प्रमाणे वर्गसभा देखील होत असे . दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी शेवटचे दोन तास वर्ग-सभे साठी असत. तेव्हा आम्ही आमचं आम्हीच छोट्या नाटिका किंवा भाषण किंवा गोष्टी सांगणे असं काय काय करायचो बर्याचदा हे सारं impromptu असायचं पण धमाल मजा यायची.

आता मात्र माझ्याकडच्या सृजन बद्दलच्या गोष्टी संपत आल्यात असं वाटतंय. मी सृजन मध्ये असताना झालेले विविध उपक्रम ह्यावर पुढच्या भागात लिहेन आणि मग बघू .

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

हा भागही खूप आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

एक विनंती आहे.

कोणत्याही वयातल्या शाळेत नॉर्मल (समजल्या जाणाऱ्या) जन्तेपेक्षा वेगळी वागणारी मुलं असतात. ही मुले स्वमग्न किंवा इतर कोणत्याही प्रकारे विशेष असतीलच असं नाही. त्यांच्या स्वभावात, वागण्यात एक वैचित्र्य असतं एवढंच.

उदा. माझ्या प्राथमिक शाळेत एक बोर्डे नावाचा मुलगा होता. त्याला नाकात पेन्सिल घालायची सवय होती. पेन्सिल तशीच नाकातून लोंबत ठेवून हा गडी सगळीकडे हिंडत असे.

अशा वैचित्र्यपूर्ण (quirky या अर्थाने) सृजन आनंद कसं हाताळत असे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

उम्म… मला आमच्या काळात असं वागणारी मुलं आठवावी लागतील. पण माझंच उदाहरण द्यायचं झालं तर मी बर्यापैकी मोठ्ठी होईपर्यंत (प्राथमिक शाळेत असतानाही) उजव्या हाताचा अंगठा चोखत असे. शाळेतसुद्धा . पण त्यावरून कधी कोणी रागावलेलं, मारलेलं किंवा सर्वांसमोर अपमान वगैरे आठवत नाही. नाही म्हणायला स्वच्छतेच्या दृष्टीने ते कसं अयोग्य आहे हे समजावून सांगितलेलं आठवतंय . मुळात आपण काहीतरी अयोग्य करतोय ह्याची जाणीव करून दिली जात असे .
अजून एक म्हणजे आम्हाला वर्गामित्रांपैकी कोणाचीही एक आवडणारी सवय आणि एक न आवडणारी सवय लिहायला सांगत . मग माझ्या मित्राने लिहिलेलं कि सिद्धी अजूनही अंगठा चोखते . असं मित्र मैत्रिणींकडूनच constructive feedback देण्याची / घेण्याची पध्दत होती .

अजून काय बर quirky वागणं ? पाटीवरची पेन्सिल खाणं quirky म्हणता येईल का ? पण ती तर मला अजूनसुद्धा आवडते Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

पण मला लक्षात आलं तुम्ही कशा प्रकारची वेगळी मुलं म्हणताय . माझ्या माध्यमिक शाळेत एक मुलगा सगळ्यांना शाई पिऊन दाखवत असे तर एकाने हिरव्या स्केचपेनने हातावर 'मेरा बाप चोर है ' असं लिहिलं होतं Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

छान आहे. फार वेगळी जाउदेत मारकुटी, हट्टी किंवा उद्धटपणे बोलणारी मुलं असतील ना तुमच्या शाळेत त्यांना समजवायची पद्धतीची काही उदाहरणे आठवत असतील तर सांगा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला आमच्या वेळेची अशी उदाहरणं अजिबातच आठवत नाहीयेत. मला वाटतं सृजनचे ताई-दादा ह्या प्रश्नाचं उत्तर चांगल्या प्रकारे देवू शकतील.
On the same note, सृजन-आनंद मधून आलेल्या मुलांचा स्पष्टवक्तेपणा , प्रतिप्रश्न विचारणे , शिक्षकांची चूक निदर्शनास आणून देणे इ. सवयींमुळे ५वी नंतरच्या शाळेतील काही शिक्षकांचं असं मत होतं कि सृजन-आनंद ची मुलं उद्धट असतात Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

छान. रोचक!

गेल्या पाचेक वर्षात ज्यांची मुलं पारंपारीक प्रार्थमिक शाळेत गेली आहेत त्यांना काय वाटतं यासर्वबद्दल? I mean मी माझी मराठी शाळा, बहिणीची इंग्रजी शाळा (दोन्ही पारंपारीक) आणि सिद्धीची पर्यायी शाळा अशी तुलना करतेय. पण मला सध्याच्या पारंपारीक शाळेत काय चालत माहित नाही. आमच्या काळापेक्षा नक्कीच बदल झाला असेल असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Sorry to be a nitpicking bore पण असे लक्षामध्ये आणून देतो की तुनच्या शाळेचे 'सृजन-आनंद' हे नाव अशुद्ध आहे. ’दृश्’ धातूवरून दर्शन,’कृ्ष्’ वरून कर्षण तसे ’सृज्’ वरून सर्जन. सृजन हे सर्जनसाठीचे w.r. (wrong reading) आहे अशी टिप्पणी मोनिअर विल्यम्सच्या शब्दकोषामध्ये आहे. सर्जन-आनंद असे नाव हवे.

इतक्या विद्वज्जनांचा पाठिंबा असलेल्या शाळेच्या नावातच अशी चूक का असावी? आणि अशी शंकाहि कोणास इतकी वर्षे येऊ नये? शंका आली असती तर कोणत्याहि चांगल्या ग्रंथालयात मो.वि. वा अन्य शब्दकोष पाहून एका मिनिटात प्रश्नाचे उत्तर मिळाले असते.

कोणी म्हणेल किरकोळ बाब आहे, द्या सोडून! पण मला ते पटत नाही. शिक्षणाच्या बाबतीत अशी ढिलाई क्षम्य नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्जन आनंद नाव अगोदरच बुक झाल्यामुळे असेल भौतेक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

'सृजन-आनंद' असे नाव चुकीचे (वाटत) असल्यास येथे दिलेल्या अर्थानुसार सृजना+आनंद = 'सृजनानंद' चालू शकेल काय ?
----
अवांतर -
...अन्य शब्दको पाहून एका मिनिटात प्रश्नाचे उत्तर मिळाले असते...
..........मोल्सवर्थमध्ये (कोश = कोष) दिला असला तरी सामान्यतः शब्दको असा वपरला जातो. 'कोष' हा गाभा या अर्थी तर 'कोश' हा साठा या अर्थी वापरला जातो. तुमच्या मते नक्की फरक काय आहे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चूक 'सृजन' ह्या पदातच आहे. सृजन-आनंद चूक पण सृजनानंद बरोबर असा हा मुद्दा नाही. 'सर्जन-आनंद' वा डॉ आनंद ह्यांच्या नावासारखे नाव नको असल्यास 'सर्जनानंद' ह्यापैकीच एक पर्याय निवडायला हवा.

तुम्ही दाखविलेल्या संस्थळावर मो.वि. कोष आहेच. तेथे मी वर दाखविलेली नोंदच आहे. पहा:

(w.r. म्हणजे wrong reading)

माझ्या १९९९ प्रतीच्या छापील पुस्तकात हीच नोंद १२४५व्या पानावर आहे.

(कोश आणि कोष असे दोन्ही वापर बरोबर आहेत. मला 'कोष'ची अधिक सवय आहे कारण हा शब्द मी फार वर्षांपूर्वी 'दृढतरनिबद्धमुष्टे: कोषविषण्णस्य सहजमलिनस्य| कृपणस्य कृपाणस्य च केवलमाकारतो भेदः' ह्या कृपण (चिक्कू मनुष्य) आणि कृपाण (जंबिया) ह्यांची विनोदी तुलना करणार्‍या श्लोकामध्ये वाचला होता.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दृढतरनिबद्धमुष्टे: कोषविषण्णस्य सहजमलिनस्य|

४ + ४ + ४ ९ + ९

कृपणस्य कृपाणस्य च केवलमाकारतो भेदः ||

५ + ६ + १ + ११ + = २६

ही तर संस्कृत आर्या अर्थात अवजड आर्या दिसते आहे. पंतांची लाडकी आर्या अर्थात संस्कृतातली गीति नव्हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'यस्या: प्रथमे पादे द्वादश मात्रास्तथा तृतीयेऽपि| अष्टादश द्वितीये चतुर्थके पञ्चदश साऽऽर्या|| ह्या आर्येच्या लक्षणानुसार

दृढतरनिबद्धमुष्टे: (१२)
कोषविषण्णस्य सहजमलिनस्य|(१८)
कृपणस्य कृपाणस्य च (१२)
केवलमाकारतो भेदः || (१५)

अशा मात्रा आहेत. तुम्ही वर दिलेली ४ + ४ + ४ ९ + ९, तसेच ५ + ६ + १ + ११ + = २६ ही गणति कळली नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पादाप्रमाणे नव्हे तर शब्दाप्रमाणे मात्रा मोजल्या आहेत. मात्रा व अधिकचिन्हे लिहायची राहून गेल्याने गणना चूक दिसतेय इतकेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विशेषनामाला हे नियम लागू होत नाहीत अशा अर्थाचा पाणिनीचा का कुणाचासा काहीतरी श्लोक आहे ना? मागे धनंजयने ऋच्या नावासाठी संदर्भ दिला होता. कुणी दुवा देईल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

वैयक्तिक नाव काय वापरावे हा पूर्ण व्यक्तिस्वातन्त्र्याचा प्रश्न आहे. एखाद्याने स्वतःला 'अबकड' असे नाव घेतले तर आपण कोण त्याला जाब मागणार?

मात्र सार्वजनिक वापराच्या नावाची निवड करतांना अधिक काळजी घेतली जावी कारण चुकीच्या नावामुळे चुकीचा संदेश जाऊ शकतो. अशा चुकीच्या नावामुळे निष्काळजीपणाचा आरोप वाचणारे लोक तुमच्यावर by default लावतील. तुम्हास ते चालणार आहे का? व्यक्तीस व्यक्तिस्वातन्त्र्याचा भाग म्हणून चालू शकेल पण संस्थेला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते संस्थापकांच्या आणि चालकांच्या धारणांवर आणि धोरणांवर अवलंबून असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

वरती मेघुतै म्हणतात त्याप्रमाणं google ह्या नावामागची कथा जगविख्यात आहे.
विशेषनाम --> मूळ शब्दापासून घेतलं जाणं --> ओघात तो शब्द बदलणं --> तो शब्दच स्वतःच एक अस्तित्व होउन जाणं ह्या पायर्‍या होतातच की.
.
.
अजून एक म्हणजे ह्या भाषेत अमुक शब्द तमुक ठिकाणहून्/दुसर्‍या भाषेहून आला; असं आपणं म्हणतो.
त्यावेळी तो बर्राचसा बदललेला असतो.
ह्या केसमध्ये शुद्धभाषाप्रेमी आणि रोजमर्राची भाषा वापरत सुटणारे बिंधास वापरकर्ते ह्यांच्यात
"सर्ज्ञन ह्या संस्कृत शब्दापासून सृजन हा मराठी शब्द बनला आहे" असे म्हणून मांडवली/तडजोड करु शकतो का ?
म्हणजे तुम्ही म्हणता, ते शुद्ध्/योग्य्/मूळ शब्द आहे हे म्हण्णे मान्य होइल; मान राखला जाइल;
आणि लोकांना ते वापरत आहेत तेही चालण्यासारखे आहे अशी जाणीव येइल.
जिंक-जिंक परिस्थिती.काय म्हणता ?
( बादवे, विन-विन ह्यास प्रतिशब्द म्हणून "उभयानंददायी" असे म्हणता यावे काय, "उभयविजयी" अगदिच शब्दास शब्द भाषांतर केल्यासारखे वाटते.).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन (बीएमसी) हे बॉम्बेचे मुंबई झाल्यावरही एमएमसी न करता, बीएमसी हेच बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन या रुपात मेंटेन करणे.
विक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूटचे (व्हीजेटीआय) देशीकरण करताना वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूट असे करुन व्हीजेटीआय मेंटेन करणे अशा स्वरुपाचं का? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कोल्हटकरजी,
तुमचे इतरही लेखन मी वाचले आहे त्यामुळे तुमच्या ज्ञानाबद्दल किंचितही शंका नाही. लिखाणात बोलण्याचा टोन कळत नाही आणि जेन्युईन प्रतिसाद पण तिरकस वाटू शकतो म्हणून हे क्लिअर करतेय .
मी इतरही बर्याच ठिकाणी सृजन हया शब्दाचा वापर झालेला वाचला आहे . तुम्ही म्हणता ते बरोबर असेल तर मग ते सर्व उल्लेख चुकीचे आहेत का ?

अशी शंकाहि कोणास इतकी वर्षे येऊ नये?

ह्या बाबतीत मला खालील शक्यता वाटतात :
१. विद्यार्थी - १लि ते ४थी वयोगटातील विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेचे एवढे ज्ञान नसते . त्यामुळे विद्यार्थ्यांना अशी शंका आली नसावी .
२. पालक - पालकांसाठी शाळेच्या नावापेक्षा शाळेची विचारपद्धती किंवा शिक्षणपद्धती आणि मुलांचे आनंदी असणे हे जास्ती महत्वाचे असावे . (अर्थात बहुतांश पालकांना सृजन हे चुकीचे रूप आहे हे माहिती नसावे असेही मला वाटते )
३. संस्थाचालक - पालक किंवा इतरही कोणी नावातील चूक लक्षात आणून दिली असण्याची शक्यता नाकारता येत नाही पण
अ] प्रचलित नाव बदलणे तांत्रिक दृष्ट्या कटकटीचे असावे किंवा
ब] प्रचलित नावापेक्षा सर्जन आनंद हे जरा odd वाटते (सर्जन हा शब्द जास्तकरून इंग्रजी अर्थाने वापरला जातो आपल्याकडे)
क] नावासहित शाळेची जी ओळख तयार झाली आहे ती बदलण्याची इच्छा नसावी

माझ्यापुरते बोलायचे तर मी भाषेला अभियाक्तीचे साधन ह्यापलीकडे जास्ती महत्व देत नाही . आणि कोल्हापुरात बर्याच शाळांना व्यक्तींची नावं आहेत ( जसे कि वि. स. खांडेकर प्रशाला , ताराराणी हायस्कूल , उषाराजे हायस्कूल , स म लोहिया ) त्या नावांपेक्षा मला सृजन आनंद ( चुकीचे असले तरी ) हे नाव निश्चितच आवडते.

अजून एक, माझ्या बौद्धिक मर्यादा म्हणा किंवा वैयक्तिक बायस , सर्जन ऐवजी सृजन ही मला तरी अक्षम्य चूक वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

जोरदार सहमती.

सर्जन हा शब्द बरोबर, सृजन चूक. हे मला माहीत आहे. मान्य आहे. क्वचित कधी मी दुरुस्तीही सुचवली आहे. पण इथला कोल्हटकरकाकांचा प्रतिसाद मात्र पटला नाही.

विशेषनामाच्या बाबतीत शब्द चूक की बरोबर असा आग्रह मुळातच कामाचा नाही. मग तो व्यक्तिनामासाठी असो किंवा संस्थेच्या नावासाठी. ते त्या त्या व्यक्तीच्या किंवा संस्थापक-चालकांच्या मतानुसारच ठरणार.

मूळ शब्द-त्याचा अपभ्रंश-रुळलेला अपभ्रंश-नवा शब्द असं अनेकदा होतं. शक्य तेव्हा तेव्हा ते सुधारावं. पण ते नक्की कधी स्वागतार्ह याचे काळेपांढरे आडाखे बसवता येत नाहीत. मुळात किती टक्के लोक अमुक शब्द वापरतात, ते अचूक शोधणं अशक्यप्राय असतं. बरं, असा शब्द पुन्हा रुळवू पाहणार्‍याकडे प्रतिभा असेल, सत्ता असेल, वा हाती माध्यम असेल, तरी त्याचं काम थोडं तरी सोपं. एरवी ’परोक्ष - अपरोक्ष’ (बरोबर उलट अर्थानं शब्द रुळणे), ’बम्भेरी - भंबेरी’ (शब्दाला निराळाच अर्थ चिकटणे), परभाषेतलाच शब्द रुळणे... अशा गोष्टी होतातच. (किती चरफड झाली, तरी हळूहळू कधीतरी ’एखाद्याची मदत करणे’ हेच रूढ होऊन बसणार आहे... लोकशाहीला पर्याय नाही.)

सृजन - सर्जन बहुधा त्याच वाटेवर असावा. त्यात ते संस्थेचं नाव. रुळलेलं नाव. शिक्षण आणि मुलाचा आनंद हे महत्त्वाचं, नाव म्हणून वापरलेला शब्द किती अचूक ते त्या मानानं बिनमहत्त्वाचं, असंही या प्रकरणात असावं. म्हणून तपशिलात सहमती असूनही, कोल्हटकरकाकांचा प्रतिसाद अस्थानी वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

@मेघना - <त्यात ते संस्थेचं नाव. रुळलेलं नाव. शिक्षण आणि मुलाचा आनंद हे महत्त्वाचं, नाव म्हणून वापरलेला शब्द किती अचूक ते त्या मानानं बिनमहत्त्वाचं> हे नाव रुळले का तर ते पहिल्यापासून - चुकीचे असूनहि - दिले होते म्हणून. मुळातच काळजी घेऊन सर्जन-आनंद किंवा सर्जनानंद असे बरोबर नाव दिले असते तर तेहि रुळले असते. मुलांचा आनंद पूर्वलक्ष्यी प्रभावाने मुळातील चूक धुवून टाकू शकेल काय?

@सिद्धि - <सर्जन ऐवजी सृजन ही मला तरी अक्षम्य चूक वाटत नाही.> अक्षम्य चूक मलाहि वाटत नाही कारण ही चूक बरेच जण करतांना दिसतात. (पुढे पहा.) शाळेतील विद्यार्थी ह्या चुकीला जबाबदार आहेत असे मी मानत नाही. ही चूक सर्वस्वी चालकांची आहे, ज्यांनी नाव देतांनाच पूर्ण काळजी घ्यायला हवी होती. चुका करणे आणि चुका न करणे ह्यांमध्ये चालक 'चुका न करणे' ह्या बाजूस असायला हवेत की नाही?

आता थोडे तुम्हा दोघींच्या बाजूने बोलतो. ही चूक कितपत फैलावली आहे अशी चाचणी घेण्यासाठी मी खालील शब्द गूगलमध्ये घालून किती 'हिट्स्' येतात हे पाहिले. त्याचे हे परिणामः

सृजन ३७७,०००
सर्जन ३२३,००० {सर्जन म्हणजे डॉक्टर धरून)
सृजनशील ४१,८००
सर्जनशील ४०,५००
सृजनशीलता १९,६००
सर्जनशीलता २५.७००

तेव्हा असे म्हणता येईल की चूक वा बरोबर, पण 'सृजन' हा चुकीचा शब्द 'सर्जन' ह्या बिनचूक शब्दाला अंमळ मागे टाकत आहे. हे भाषेच्या संदर्भातील 'ग्रेशम्स लॉ'चे उदाहरण आहे असे म्हटले पाहिजे किंवा Lunatics have taken over the asylum!

जाता जाता ह्या विकिपानातली चर्चा अवश्य वाचा.

अवान्तर - सिद्धि ह्यांचे अभिनंदन अशासाठी की त्यांनी 'सिद्धि' ह्या बिनचूक शब्दाचा वापर केला आहे, 'सिद्धी' टाळला आहे आणि 'आम्ही असाच उच्चार करतो' हा self-serving अघळपघळ बचाव वापरलेला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अवान्तर - सिद्धि ह्यांचे अभिनंदन अशासाठी की त्यांनी 'सिद्धि' ह्या बिनचूक शब्दाचा वापर केला आहे, 'सिद्धी' टाळला आहे आणि 'आम्ही असाच उच्चार करतो' हा self-serving अघळपघळ बचाव वापरलेला नाही.

उगा कायतरीच? हा बचाव कशावरून?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सुजलाम् सुफलाम् हाही शब्दप्रयोग चुकीचा असूनही वापरात रुळला आहे.

सुलजा, सुफला ही मातृभूमीची विशेषणं असल्याने आणि विशेषणाचेही रुप विभक्ती प्रत्ययाप्रमाणे होत असल्याने मूळ गाण्यात ते बरोबरच आहे.

पण इतर मराठी वाक्यांमधेही बर्‍याचदा हे म् लावूनच वापरलं जातं.

उदा. "अशा या सुजलाम् सुफलाम् भारतमातेला मी वंदन करतो". किंवा "चला, या महाराष्ट्राला सुजलाम् सुफलाम् करुया" अशा प्रकारची वाक्यं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0