Skip to main content

माझी शाळा सृजन आनंद -३ लीलाताईंचे विचार

1 minute

भाग १ भाग २

नमस्कार ,

मी शाळेशी निगडीत आणि शाळेतील उपक्रमांविषयी अजून लिहिणार आहे पण तोवर ऐसीकरांना वाचण्यासाठी लीलाताईंचा सृजन आनंद काढण्यामागची भूमिका थोडक्यात विशद करणारा हा एक लेख. ( थोडक्यात अशासाठी कारण ह्या विषयावर त्यांनी नंतर एक पुस्तकच लिहिलंय - "प्रवास ध्यासाचा आनंद सृजनाचा" )

हा लेख साप्ताहिक सकाळ मध्ये ९७ साली प्रकाशित झाला होता . ऑन लाईन मिळाला नाही म्हणून नाईलाजास्तव मूळ लेखाचे फोटो लावतेय .
१.

२.

३.

४.

फोटो क्वालिटी अजून चांगली आली असती पण हे वाचणेबल आहेत म्हणून मग मी आईला जास्त त्रास नाही दिला.
गैरसोयीबद्दल सॉरी !

-सिद्धि

Node read time
1 minute

'न'वी बाजू Sun, 29/03/2015 - 04:24

- तुमच्या या लीलाताई (पाटील, "प्रवास ध्यासाचा आनंद सृजनाचा" या लोकप्रिय ग्रंथाच्या सुप्रसिद्ध लेखिका), या बायेनीचान्स प्रा. अद्वयानंद गळतगे यांच्या कोणी लागतात काय? असल्यास नक्की काय लागतात?

- "तुम्ही ही शाळा का केलीत?" हा प्रश्न तिसरीतल्या सिद्धीऐवजी - उदाहरणादाखल - चौथीतल्या दीपिकाने अथवा दुसरीतल्या मयांकने विचारला असता, तर या (पुरातन) कात्रणास ही जागा दिसण्याचे काही प्रयोजन राहते काय?

धन्यवाद.

मेघना भुस्कुटे Sun, 29/03/2015 - 14:25

छान आहे लेख. पण सिद्धी, याच्या जोडीला तुझी निरीक्षणं असतील, तर अजून मजा येईल, असं वाटून गेलं. तू लिही ना आणखीन.

सिद्धि Mon, 30/03/2015 - 20:04

@ मेघना , रिया - हो तर मी लिहिणार आहेच अजून. पण इथल्या लोकांना एकंदरीतच सृजन आनंद किंवा लीलाताई यांच्याविषयी फारसं माहिती नाही असं दिसलं म्हणून (माझ्या संग्रहात असलेला ) हा लेख येथे टाकावासा वाटला.
@ अंतराआनंद - हो का ? मला तरी बोजड नाही वाटला. चान्सेस आर, तुम्ही पूर्वीसुद्धा वाचला असेलच हा लेख.

अजून एक general disclaimer :

मी पहिल्या भागात सांगितल्याप्रमाणे हे माझ्या शाळेचे अनुभव माझ्या दृष्टीकोनातून लिहिण्याचा प्रयत्न माझ्या पात्रतेनुसार करते आहे, त्यामुळे आणि मी कोणत्याही स्युडो-नेमने येथे वावरत नसल्याने माझा, माझ्या नावाचा उल्लेख वारंवार होणारच. तर त्याबद्दल "खवचट, तिरकस , खोडसाळ आणि निरर्थक" शंका विचारण्याऐवजी स्वत:चा अमुल्य वेळ इतरत्र (इच्छा असल्यास) सत्कारणी लावावा हि नम्र विनंती .