Skip to main content

ऑक्सफॅमचा जागतिक श्रीमंतीवरचा रिपोर्ट आणि पुरोगाम्यांचे चित्त.

http://www.forbes.com/sites/laurashin/2014/01/23/the-85-richest-people-…

The 85 Richest People In The World Have As Much Wealth As The 3.5 Billion Poorest

As the World Economic Forum begins in Davos, Switzerland, Oxfam International has released a new report called, “Working for the Few,” that contains some startling statistics on what it calls the “growing tide of inequality.”

The report states:
•Almost half of the world’s wealth is now owned by just one percent of the population.
•The wealth of the one percent richest people in the world amounts to $110 trillion. That’s 65 times the total wealth of the bottom half of the world’s population.
•The bottom half of the world’s population owns the same as the richest 85 people in the world.
•Seven out of ten people live in countries where economic inequality has increased in the last 30 years.
•The richest one percent increased their share of income in 24 out of 26 countries for which we have data between 1980 and 2012.
•In the US, the wealthiest one percent captured 95 percent of post-financial crisis growth since 2009, while the bottom 90 percent became poorer.

प्रचंड आर्थिक असमानतेतून मानवतेत कोणकोणते अन्याय संभव आहेत? याचे एकूण सामाजिक परिणाम काय? संपत्तीचे हे कायदेशीर संहतीकरण असेच कोणत्या स्तराला जाणार आहे?

देव, धर्म नि परंपरा यांना झोडायला घेतलेला दंडुका बाजूला ठेउन ही नक्की किती मोठी बला आहे याचा उहापोह करणे सच्च्या पुरोगाम्यांसाठी आवश्यक आहे असे वाटते. कोणी म्हणेल यात पुरोगाम्यांचा संबंध काय? वेल, या सगळ्या गोष्टींचे परिणाम शुद्ध सामाजिक असतील.

खरोखरच धार्मिक गोष्टींचा परिणाम या महाविकृतींपेक्षा मोठा आहे अशी धारणा आहे का?

एक रोचक बाब म्हणजे स्वतःला बुद्धिप्रामाण्यवादी, बुद्धीवान, विवेकी, सुशिक्षित, विचारी, दूरदृष्टे, ज्ञानसंपन्न, विज्ञानवादी, नैतिक, सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या प्रभावशील, इ इ समजणार्‍या प्रामाणिक पुरोगाम्यांना सुमार बुद्धीच्या श्रीमंतांनी निव्वळ मूर्खात काढले आहे.
आज जगाच्या आर्थिक असमानतेला, पर्यावरणाच्या घाण अवस्थेला, अतिरेकी चळवळींच्या फोफावण्याला, नैसर्गिक स्रोत ८-१० पिढ्यांनंतर संपण्याला*, पांढर्‍या अर्थव्यवस्थेपेक्षा आकाराने मोठ्या असणार्‍या काळ्या अर्थव्यवस्थांना,सामान्य नोकरी करणार्‍या बांधलेल्या माणसाला आपलेच आयुष्य जगायला वेळ न मिळायला, भ्रष्टाचार माजायला**, युद्धांसाठी आयुधे खपवायला, न्यूक्लिअर आणि तत्सम मानवता नष्ट करण्याचे पोटेंशिअल असणारे इव्हंट व्हायला, इंटेग्रेटेड अर्थव्यवस्थांच्या व्हिम्समुळे निष्कारण कुठेही आर्थिक झटके बसायला, स्थानिक उच्च दर्जाच्या गोष्टी निर्यात होऊन जगात सर्वत्र उपलब्ध असायला, इ इ १% श्रीमंत (फक्त श्रीमंत, बाकी काही नाही) लोक कारणीभूत आहेत.

* जस्ट अ व्ह्यू.
** अंशतः
---------
पैकी पुरोगामी पर्यावरण नावाचा एक मुद्दा "त्यांच्या परीने" योग्य तो भर देऊन हाताळताहेत हे मान्य करावे लागेल. पण त्या लढाईत त्यांची औकात काय आहे हे आपण पाहतच आहोत. बाकी मुद्दे आहेत हे देखिल त्यांच्या गावी नाही. त्यांचे स्वरुप काय आहे आणि त्यांची उत्तरे काय आहेत हा भाग अलहिदा. धर्म आणि परंपरा झोडणे यात जगाची प्रचंड उर्जा अनावश्यक रित्या ते खर्च करत आहेत.
=====================================================================================================================
लेख आडकित्ता, अंतराआनंद आणि रमताराम यांना अर्पण.

सलील Tue, 03/02/2015 - 02:16

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ठराविक लोकांना, ठराविक श्रेणीच का मिळतात वगैरे प्रश्न विचारण्यांनी प्रतिसादांमधली भाषा काय असते, अशा प्रतिसादांचा रोख काय असतो, आणि अशा प्रतिसादकांच्या सगळ्याच प्रतिसादांना अशा श्रेणी मिळतात का, याचा तपास करून मग बोलावं. श्रेणीपद्धत का, कशासाठी याबद्दल आधीच उदंड चर्चा झालेली आहे (दुवा १ आणि दुवा २).>>

माझ्यामते तुम्ही गृहीत धरले आहे कि इथे येणारे जवळपास सगळेच नेहमीचे वाचक आहेत. जवळपास बर्याच आयड्यांचे प्लस आणि मायनस प्वाईनट वाचकाला माहिती आहेत. त्यामुळे वाचकाला कळले पाहिजेल कि आयडी कसा आहे आणि त्याला असेच श्रेणीदान सदस्य करणार. कित्येक प्रतिसाद असे आहेत कि ज्याला उगाचच दाबले गेला आहेत असे माझे तरी मत आहे. इथे तो आयडी आधी काय लिहितो ह्याला काही अर्थ नाही.

अनेक इंटरेस्टिंग लोकं ऐसीवर येण्याचं टाळतात>> इथे पुन्हा गृहीतक आहे कि तुम्ही इंटरेस्टिंग असला तरच या बरे नपेक्षा तुमच्यामुळे आह्मी लिहिते होत नाही. तसे असेल तर स्वच्छ लिहावे किंवा सदस्य करतानाच पूर्ण बायोडाटा मागवून त्याने काय काय केले आहे ते बघावे आणि मग सदस्य द्यावे. आपण तर काबुल करतो बुवा २-३ प्रतिक्रिया सोडल्यास आपली काय फार मजल नाही. तेंव्हा आमच्या सारखे लोक अपोआप गायब होतील. हे मी कुठलेही किंतु मनात न ठेवता लेहितो आहे. उदाहरणार्थ खालील लिंक बघा

http://microcapclub.com/

इथे कोणालाही सदस्य होता येत नाही आणि मॉडरेटर जर का नियम पाळले नाहीत किंवा सदस्य फार काही योगदान देत नसेल तर काढून टाकला जातो जेणेकरून क्वालिटी मेंटेन होते. तुम्हाला तसे करता येईल म्हणजे हा प्रश्नच उद्भवणार नाही. किंवा सरळ सरळ हे असले धागे तत्काळ वाचनमात्र करा.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 03/02/2015 - 09:50

In reply to by सलील

सूचनांबद्दल आभार. हे मी कुठलेही किंतु मनात न ठेवता लिहिलं आहे.

पण काये ना, की अभ्यास न करता, लोकांच्या आणि समूहाच्या वर्तनातले पॅटर्न्स न पाहता, रोचक-रंजक काही न लिहिता, संस्थळ कसं असावं याबद्दल सल्ले देण्यासाठी ऐसीवर अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे. ते खुशाल वापरा. झालंच तर तेच अभिव्यक्तीस्वातंत्र्य वापरून अभिव्यक्तीस्वातंत्र्य कमी करा अशी मागणीही करा. पण फार सकारात्मक भर न घालणाऱ्या, झडझडून काम न करणाऱ्या लोकांचे सल्ले फार मनावर घेतले जातील अशी अपेक्षा तेवढी बाळगू नका. अपेक्षा हे दुःखाचं मूळ आहे.

गवि Tue, 03/02/2015 - 10:20

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सर्व उत्तम आहे .. मान्य आहे.

पण पण पण..

आततायी प्रतिसाद देण्याचा प्रकार अतिशय कंटाळवाणा आहे

हे सगळं पुन्हा पुन्हा बोलावं लागणं हे सुद्धा कंटाळवाणं आहे

इंटरेस्टिंग लोकं ऐसीवर येण्याचं टाळतात, त्यातून हा कंटाळवाणा प्रकार आणखी वाढत राहतो.

राग येण, भडकण, वैताग येणे, मनस्ताप होणे अशा सर्वांऐवजी "कंटाळा येणे" असा शब्द जालावर का वापरला जातो ?

आधी मनोरंजन झाले, करमणूक झाली, रोचक वाटले वगैरे म्हणत असत राग आला की.

आता कंटाळा हा नवीन शब्द आहे का? वापरला पायजे. ;)

ऋषिकेश Tue, 03/02/2015 - 10:24

In reply to by गवि

राग येण, भडकण, वैताग येणे, मनस्ताप होणे अशा सर्वांऐवजी "कंटाळा येणे" असा शब्द जालावर का वापरला जातो ?

कारण कंटाळा येणे हे राग येणे, भडकणे, वैताग येणे, मनस्ताप होणे यापेक्षा वेगळी भावना आहे.
तुम्हाला कधी कंटाळा येत नसेल (आयदर दुसरे काही किंवा थेट राग येणे, भडकणं वगैरे होत असेल) तर हे फारच रोचक वैग्रे आहे :)

अनु राव Tue, 03/02/2015 - 10:27

In reply to by गवि

( कंटाळा हा कदाचित आपले म्हणणे कोणी गपचुप ऐकुन घेत नसेल तर मग प्रतिसाद द्यायचा तरी कशाला ह्या निराशेतुन येत असेल )

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 03/02/2015 - 17:50

In reply to by गवि

याच पकाऊपणाचा कंटाळा आलेला आहे.

कोणीतरी पोटतिडकीने "व्यक्तिगत रोखाच्या गप्पा जाहीररित्या करू नका" असं आवाहन करत असताना तिथे तुम्हाला कंटाळाच का येतो, राग का येत नाही वगैरे प्रश्न विचारणं महाबोअर आहे. कोणीही महाबोअर गोष्टी केल्या की मला कंटाळा येतो. म्हणून मग आवरा आता, असं म्हणावंसं वाटतं.

गवि Tue, 03/02/2015 - 21:15

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आवरा आता, असं म्हणावंसं वाटतं.

..ओक्के..इशारा काफी है..त्रास झाल्याबद्दल दिलगीर.

..इतरत्रही वेळेत आवरा अशी जेनेरिक सूचना वाचली.मग ट्यूब पेटली.

अजो१२३ Tue, 03/02/2015 - 13:08

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

या धाग्यावर आणि सध्या एकंदरीतच चाललेला, व्यक्तिगत रोखाचे, आततायी प्रतिसाद देण्याचा प्रकार अतिशय कंटाळवाणा आहे.

संपूर्ण सहमत. धाग्याच्या आर्थिक विषमता या विषयावर एकाही पुरोगाम्याने एकही अवाक्षर काढलेले नाही. बर्‍याच गोष्टींचा अभाव असावा.

अस्वल Tue, 03/02/2015 - 13:10

In reply to by अजो१२३

माहितीपूर्ण दिलेली आहे.
मला तर वाट्तं ऐसीवर पुरोगामी नसावेतच.च्यायला, म्हणजे एवढे दिवस उगाच त्रास झाला नाय ?

गब्बर सिंग Tue, 03/02/2015 - 13:12

In reply to by अजो१२३

धाग्याच्या आर्थिक विषमता या विषयावर एकाही पुरोगाम्याने एकही अवाक्षर काढलेले नाही.

अजो, एकदा नक्की काय ते ठरवा. गब्बर पुरोगामी आहे की नाही ???

अजो१२३ Tue, 03/02/2015 - 13:27

In reply to by गब्बर सिंग

तुम्ही पुरोगामी नाहीत असं तुम्ही स्पष्ट केलंत ते मी मान्य केलं आहे.
============
माझ्या सुदैवाने या धाग्यावर तुम्ही तत्त्वतः (बोलने के वास्ते) माझी भूमिका ऐकून त्यावर चक्क माझ्याबाजूने विचार देखिल मांडले. धन्यवाद.

गब्बर सिंग Tue, 03/02/2015 - 13:48

In reply to by अजो१२३

तुम्ही पुरोगामी नाहीत असं तुम्ही स्पष्ट केलंत ते मी मान्य केलं आहे.

नवाजिश करम शुक्रिया मेहेरबानी
मुझे बक्श दी आपने जिंदगानी

अक्षय पूर्णपात्रे Tue, 03/02/2015 - 20:40

एक रोचक बाब म्हणजे स्वतःला बुद्धिप्रामाण्यवादी, बुद्धीवान, विवेकी, सुशिक्षित, विचारी, दूरदृष्टे, ज्ञानसंपन्न, विज्ञानवादी, नैतिक, सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या प्रभावशील, इ इ समजणार्‍या प्रामाणिक पुरोगाम्यांना सुमार बुद्धीच्या श्रीमंतांनी निव्वळ मूर्खात काढले आहे

१) प्रामाणिक पुरोगामी 'बुद्धिप्रामाण्यवादी ... सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या प्रभावशील, इ इ' असतात.
२) श्रीमंत लोक 'सुमार' बुद्धीचे असतात.

वरील गृहितकांच्या चौकटीत न येणार्‍या अनेक शक्यतांपैकी एक शक्यता: प्रामाणिक पुरोगामी श्रीमंत असल्यास ते पुरोगामी 'सुमार बुद्धीचे' आणि 'बुद्धीवान' हे एकाचवेळी असू शकतील. या अंतर्विरोधामुळे एरवी महत्त्वाची ठरू शकलेली चर्चा भरकटली आहे.

अवांतरः विषमतेविषयी अरुणजोशी यांना काही खरी कळकळ असावी असे मला जाणवते. त्यांनी या प्रश्नाची मांडणी आपल्या कळकळीशी प्रामाणिक राहून करावी असे माझे मत आहे.

आडकित्ता Sun, 08/02/2015 - 21:46

वावावा.

""In the light of new information, this needs to be answered in a different way now. लातुरला भूकंपात गेलेले तेव्हा ड्र्ग्जच्या नशेत होतात का? तुम्हाला एकही संघिष्ट दिसला नाही? डोळ्याचेच डॉक्टर ना?"

जोशी,
तुम्हाला आमचे लाडके जोशी भेटलेले दिसताहेत. ते वाट चुकलेले आहेत हे तुम्हाला समजणं कठीण आहे. पण, त्या आधीच तुमचे इतके कळवळून प्रतिसाद आलेत, तेव्हा माझा इम्पोर्टेड ब्ल्यांकेटं ढापण्याचा प्रतिसाद वर्मी लागलेला दिसतोय. पण काये, खरा आहे तो. ती ब्ल्यांकेटं ढापणारी व्यक्तीमत्वं कोण होती, हे गुलदस्त्यात ठेवूया इथे. वेळ पडेल तेव्हा "गणवेषातले" फोटू आहेत माझ्यापाशी.

अन हो, ती औषधं आम्ही गावभर भीक मागून एमआर व डॉक्टरांकडून सँपलची जमवून नेली होती. माझ्या खिशाला फार चाट बसवली नव्हती. (आधीपासूनच हुश्शार आहे बरं का.) पण त्यावरुन एकेरीवर उतरणारे तुम्ही संघिष्ट काय लायकीचे आहात, ते तुमची (मनोवृत्ती) 'उघडून' दाखविल्याबद्दल धन्यवाद!

ऐसिकरहो!

या टिनपॉट जोशींना आपण विनाकारण फूटेज देत असतो हे अजूनही आपल्या लक्षात आले नाहिये का? जोशींना 'हाऽड!' म्हटलेले समजत नाही. त्यांना 'हाका मारत उभे राहू दिले' की आपोआप पुढल्या दारी जातात ते. मागल्या वेळी बाणेदारपणे मिपावर निघून गेले होते. परतून आल्यावर आपणच फूटेज देऊ लागलो म्हणून पुन्हा फोफावलेत.

असो.

तेव्हा ड्र्ग्जच्या नशेत होतात का?
या वाक्याबद्दल, या जोशींना काय द्यावे?

एक फुकट सल्ला देऊन टाकू.

जोशी, व्यायाम करीत जा. ;) कुणी सांगावे, कुठे कामास येईल?

आडकित्ता Sun, 08/02/2015 - 22:00

माझ्या बाजूने बोलायला उभे राहिलेल्या सर्वांचे आभार मानून पुन्हा एकदा गायब होतो.

लोकहो,
जाताना पुन्हा एकदा.
हे नीच पातळीवर येऊण भांडताना पुरावे कसले देतात? तर हे:

"The following is a report on earthquake and relief efforts by
Rashtriya Swayamsevak Sangh - Janakalyan Samiti (Maharashtra Prant)
Office: 309, Shanivar Peth, Motibaug, Pune - 411030, Ph: (091)0212-450 883"

हा रिपोर्ट कुणी लिहिलाय?
कुण्या त्रयस्थ व्यक्तीने??

मी माझा रिपोर्ट लिहिला तर शिवीगाळ??

संघ "समाजसेवा करतो", हा, 'देव तुमचं भलं करतो' असं म्हणण्यासारखाच 'श्रद्धेचा' विषय आहे, असे म्हणून थांबतो. परवाच्या भू:स्खलनाने महाराष्ट्राच्या नकाशावरून पुसल्या गेलेल्या गावाच्या वेळी (नांव कुणाकुणाला आठवतंय?) संघ समाजसेवेचा पुरावा म्हणून मायबोलीवर 'अंत्येष्टीसाठी आम्ही भडजी पुरवू' अशा अर्थाचे कलेक्टरला उद्देशून लिहिलेले पत्र कुण्या एका महान ब्लॉगरने डकवेल्ले आठवले.

"संघ अ‍ॅनॉनिमसली सेवा करतो" हे वरतून असते एक. चार खाकी चड्डीतले फोटो प्लस संघानेच प्रसवलेली वाहवा. त्रयस्थांच्या तोंडून कधीही ऐकलं पाहिलेलं नाही संघाचं 'मदतकार्य'

उदाहरणार्थ, काहो? नर्मदा धरणात बुडणारे आदिवासी मदतपात्र नाहीत का? सातपुड्यातल्या इतर आदीवासींच्या धर्मांतराचा कळवळा करणार्‍या संघाला इथे कोणते कुलुप लागते? इथे वनवासी कल्याण आश्रम कुठे जातो जिलब्या खायला?

'दांभिक' हा एकच शब्द.

जौद्या.. जास्त चिडचिड होतेय.

अजो१२३ Mon, 09/02/2015 - 13:05

In reply to by आडकित्ता

कोल्हटकरांनी म्हटले आहे म्हणून मी इथे पुढे काही लिहिणार नाही. पण आडकित्ता यांची भाषा ऐसीकरांना सभ्य वाटतेय याचे नवल आहेच.

गब्बर सिंग Mon, 09/02/2015 - 09:03

हा रिपोर्ट व त्यावरील साधक बाधक विचार अनेक लोकांचे ऐकले/वाचले. इथे; इथे; आणि इथे;

मला ही सिच्युएशन अत्यंत आवडली. आर्थिक विषमता आणखी वाढली पाहिजे.