पोलिटिंगल भाग ३ : काला पैसा काट खायेगा!

पोलिटिंगल - भाग १, भाग २
गुजरातप्रतापधुरंधर प्रधानसेवक श्री. नमोजी आणि आम्ही यांच्या मैत्रीचे (आम्हीच सांगितलेले!) सुरस किस्से सर्वशृत आहेत. सिग्नल मोडणे, पीयूसी वगैरे फालतू गोष्टींसाठी आम्हाला पकडणाऱ्या पुण्याच्या हवालदारांना 'नमोजींना ओळखतोस काय?' असे विचारुन आम्ही अनेकदा गार केलं आहे. (मात्र तुम्ही हा प्रयोग करु नका! काही हवालदार 'तोडपाणी' केल्याशिवाय सोडत नाहीत! एकाला दमात घेण्यासाठी आम्ही एकदा 'पावती फाडा!' म्हटलं तर त्यानं आमच्याकडून फुल पैशे घेऊन 'पावती नंतर घेऊन जा' असं सांगितलं) ते असो!


काळ्यापैशासारख्या संवेदनशील विषयावर नमोजी सफेदझूट बोलत आहेत असा आरोप वाचून आम्हाला राहवेना. आम्ही तडक दिल्लीला पातलो. बंगल्याच्या हिरवळीवर नमोजी येरझारा घालत होते. नेहमीप्रमाणे संकटविमोचक अमितजी दरवानाच्या जागेवर उभे!


आम्हीः नमो नरेन्द्राय नमोस्तुते!


नमोजीः केम छो!


आम्हीः मजामा! (आता आम्हाला इतकेच गुजराती येत असल्याने पुढचा संवाद मराठीत!)


नमोजीः कशासाठी आलात? चहा घेणार?


गुजराती मसालानुं चाय मिळणार म्हटल्याने आम्ही अधिकच पाघळलो.


आम्हीः फक्त चहाच? थोडा ढोकळाही मागवा ना. (आम्हाला खरंतर कुठंही न्यायची सोय नाही!)


नमोजीः (त्रासिकपणे) बोला.


आम्हीः एव्हाना जहाजं निघाली असतील नाही?


नमोजीः (संदिग्धपणे) हम्म


आम्हीः मग सुवेझ कालव्यातून येणार की केप ऑफ द गुड होप वरुन? (आम्ही इयत्ता सहावीचे इतिहास-भूगोलाचे ज्ञान पाजळले)


नमोजीः तमे जुओ ने! वाट बघा! कीप अप द गुड होप! (हजरजबाबी नमोजींचे इंग्रजीवरही भलतेच प्रभुत्त्व! असे शाब्दिक खेळ करणे येरागबाळ्याचे काम नाही!)


आम्हीः वाटलंच होतं. एकदा काळा पैसा भारतात आला की प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये येतील हे तुम्ही सांगितल्यापासून मी बँकेत हिचंही एक एक्स्ट्रा खातं उघडून ठेवलंय!


नमोजीः (सावध होत). काळा पैसा? त्याचं काय?


आम्हीः म्हटलं एकदा जहाजं आली की पैशाचं वाटप झटदिशी करता येईल. जहाजांच्या वजनामुळे गेल्या महिन्यापासून समुद्राच्या पाण्याची पातळीही वाढली आहे म्हणे!


नमोजीः जहाजं? हम्म आलं लक्षात. मग काय म्हणणं आहे?


आम्हीः जहाजं येईपर्यंत इथल्या लोकांची तोंडं गप्प करायला हवीत! फार बोलताहेत आजकाल. (रंगाचा डबा टेबलावर ठेवत) हा बघा एशियन पेंट्स (रंग गेला तर पैशे परत!)
रिझर्व बँकेतून काही नोटा आणून त्या काळ्या रंगानं रंगवायच्या आणि टीवीवर 'काळा पैसा परत' अशी जाहिरात करायची कल्पना कशी वाटते?


नमोजींनी त्रासिक मुद्रेने दरवाजाकडे पाहिले. अमितजी बाह्या सरसावत पुढे येताना पाहून आम्ही धूम ठोकायचा प्रयत्न केला.


तोंड काळे होणे म्हणजे काय या वाक्प्रचाराचा अर्थ त्यादिवशी आम्हाला समजला!

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (4 votes)

प्रतिक्रिया

Smile
छान आहे पण नेहमीप्रमाणे वाचुन "खो खो" न होता स्मितहास्यावर बोळवण करतो Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

थोडक्यात की हो आटपलेत.. जरा सरसावून बसतच होतो, तितक्यात नमोंकडून तुमची हकालपट्टी. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

+१ असेच म्हणते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जहाजांच्या वजनामुळे गेल्या महिन्यापासून समुद्राच्या पाण्याची पातळीही वाढली आहे म्हणे!

नमोभक्तांच्या वल्गनांचा स्रोत तुम्हीच काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हाहाहा Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0