पॉलिटिंगल भाग १ : शपथविधी

शपथविधीनिमित्त थोडी गंमत


उधोजीराजांनी महालात जोरदार एंट्री केली. 'कोण आहे रे तिकडे?'.

मिलिंदोजीः मीच हाये. आनखी कोन असनार!

उधोजीराजेः तूच का पुन्हा! बाकीचे कुठे गेले?

मिलिंदोजीः बाकीचे गेलेत वानखेडेवर. गावजेवन हाये म्हने. बुंदीचे लाडू, पाकातल्या पुऱ्या, बासुंदी... झालंच तर..

उधोजीराजीः खामोश! सपशेल खामोश! अरे काय ही मर्दमावळ्यांची अवस्था! कांदा-मिरची-भाकरी खाऊन, भीमथडीच्या तट्ट्यावर मांड टाकून यवनाला जेरीस आणणारे आमचे मावळे आज गनिमांच्या पंगतीला बसणार? हर हर!

मिलिंदोजी: नाव काढू नका त्या मिरचीचं आनि तट्टांचं! ती तसली मिरची खाऊन, दिवसदिवस तट्टावर मांड टाकून बसल्यावर कुठं कुठं दुखायचं! सांगायची सोय राहिली नव्हती.

उधोजीराजेः झालं का तुझं मिरचीपुराण चालू. पुन्हा एकदा खामोश!

मिलिंदोजी: बरं राह्यलं!. मी म्हनत होतो तुमच्या आवडीची ताकातली भेंडी सुद्धा आहे पंगतीला!

उधोजीराजेः (तोंडातली लाळ आवरत) आम्ही अन्नासाठी कोणाचेही मिंधे होणार नाही! आमच्या सन्मानाशी तडजोड नाही म्हणजे नाही! आमच्या मुदपाकखान्यात आजच ताकातल्या भेंडीची ऑर्डर द्या

मिलिंदोजीः ग्यास संपलाय!

उधोजीराजेः खामोश! मी कशासाठी आलो होतो हे काय चाललंय. (मिलिंदोजींना हातातला फोन दाखवत) हे बघ!

मिलिंदोजीः आयफोन 6 का? वाटलंच! माझ्या गळ्यात मारलाय मोटो-जी !

उधोजीराजे: फोन नाही. व्हॉट्सअॅपवर सकाळीच आलेला मेसेज बघ.

मिलिंदोजी लक्षपूर्वक वाचतातः
गुड मॉर्निंग महाराष्ट्र
जस्ट चिल महाराष्ट्र
राक अँड रोल
तेवढेच बोल
चावडीवरती वाजतोय ढोल

सकाळ म्हणजे मॉर्निंगं
रस्त्यावरती वॉकिंगं
दादोजी आणि शिवबांनाही
रस्त्यावरती पार्किंगं

आता वेक अप सारे रान
लावणी आहे आमुची छान
आता बर्न अप सारे रान
हेच आहे आमचे गान

मिलिंदोजी: (हताश होत) आदित्यची नवी कविता काय! चांगलीच म्हनायची!!

उधोजीराजेः त्याला कुठलं जमतंय एवढं मराठी लिहायला! आमच्या एका खबऱ्याने पाठवलेला गुप्त संदेश आहे. प्रत्येक ओळीचे पहिले अक्षर वाच

मिलिंदोजीः गु ज रा ते चा स र दा र आ ला आ हे. हे तर सकाळपास्नं टीवीवर दाखवताहेत. यात कसला गुप्त संदेश!

उधोजीराजेः खामोश! जीभ हासडून टाकीन. आताच वानखाड्यावरील शामियान्यात येण्याचे निमंत्रण आम्हाला मिळाले. त्यात हा संदेश! आईभवानीच्या कृपेने साक्षात शिवबांना जी संधी मिळाली नाही ती आम्हाला मिळतेय. शिवबांनी फक्त अफजुल्याचा काटा काढला. आम्ही अफजुल्या आणि आदिलशहा दोघांचाही आज काटा काढणार. झालंच तर कविराज रामदासपंत आठवल्यांनाही धडा शिकवून येणार.

मिलिंदोजीः अहो पन...

उधोजीराजेः (दोन्ही हात आकाशाकडे पसरून आशीर्वाद मागत) हे आईभवानी मला आशीर्वाद दे. शामियान्यात झेड सेक्युरिटी असल्याने तुझी भवानी तलवार नेता येणार नाही पण वाघनखं लपवून नेईन. हा मी निघालो!

मिलिंदोजीः माझ्या शुभेच्छा हायेतच. तेवढी वाघनखं अंगरख्याच्या वरच्या खिशात ठेवा. मागच्या येळेला तुमानीच्या मागच्या खिशात लपवली आणि नंतर मलम लावायला वैद्य मिळाला नाही!

टीपः चित्र जालावरुन साभार

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (12 votes)

प्रतिक्रिया

ह्या ह्या ह्या ह्या. मस्त लिहिलंय.

उधोजींनी काय करून घेतलंय स्वतःचं...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ROFL एक लंबर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हा हा हा! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जबर्‍या!! आवल्ड!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ROFL _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तंबी दुराई, ठणठणपाळ , आणि अशा इतर सर्वोत्तम गणल्या जाणार्‍या व्यंगात्म लिखाणाच्या तोडीचं लिखाण. "अतिशहाणपणा" या सदराखाली एक कॉलम इथे सुरू करावा असं सुचवतो Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

विंदांची क्षमा मागून .....

शपथ तुला भगव्याची
रुसव्या नि फुगव्याची

शपथ रिमोट कंट्रोलची
दाढीची नि गॉगलची
शपथ एनरॉनाची
आणि महाजनांची
आणि शपथ
गंजलेल्या
या धनुष्यबाणाची

शपथ गडे
शपथ गडे
शपथ वानखेडेची

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

जबरदस्त. परफेक्ट जमलं आहे. आठवलेंची कविता, रामदासस्वामींचा संदेश, आदित्यचं मराठी आणि वाघनखं वगैरे सर्व रसायनांच खुमासदार मिश्रण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile आवडलं, नेमकं आणि खुमासदार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या अल्ला ,मार डाला! उद्धव ठाकरेंना कुणी तरी पाठवा रे हे.
शेवटची ओळ वाचून तोंडातला चहा बाहेर सांडला Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडलं....
वाघनखांचा ज्योक वेगळ्या प्रकारे ऐकला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मस्त लिहिले आहे. ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तच आहे हे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

खल्लास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मस्त

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

ROFL सुपर्ब!!!! फार मजा आली.
ब्येक्कारम - ब्येक्कारे-ब्येक्कारानि प्रथमा हसले ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झक्कास

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0