अलीकडे काय पाहिलंत - १६

जुन्या धाग्यात १००च्या जवळपास प्रतिसाद झाल्यामुळे नवीन धागा. उजव्या बाजूला किंवा मुखपृष्ठावर असणाऱ्या मुखवट्यांच्या प्रतिमेवर टिचकी मारून या प्रकारातले सगळे धागे सापडतील.)

***

बीईंग देअर (१९७९) हा चित्रपट पाहिला. - आता लिहिताना बघितलं तर चित्रपट इतका जुना आहे हे कळलं, बघताना तो मला अगदी ताजा वाटला होता.

कथावस्तु सुरू
एक वयस्क (५०-५५ वर्षे वयाचा) व्यक्ती एका श्रीमंताघरचा माळी असतो. जन्मल्यापासून तो केवळ बागकाम करत असतो व त्या घराबाहेर एकदाही पडलेला नसतो. मालकाच्या मृत्यूनंतर सर्व नोकरांना घर सोडावे लागते त्यामुळे तो घर सोडते व या वयात/टप्प्यावर पहिल्यांदा 'खर्‍या' जगाला सामोरा जातो. त्यानंतर काही प्रसंग असे घडतात की तो अमेरिकेतील उच्चपदस्थ पॉवर सर्कलच्या मधोमध दिसू लागतो.
कथावस्तु समाप्त

अतिशय वेगळा विषय आहेच, त्याहून वेगळे आणि छान दिग्दर्शन, अभिनय, ध्वनी, संवाद, संवादफेक सारेच लाजवाब
बागकामातून शिकलेले तत्त्वज्ञान जगण्याला लावणारा हा नायक, एकूणच त्या कथेतील बहुतांश पात्रांना व प्रेक्षकालाही अंतर्मुख करतोच. आणि हे सारे अतिशय नर्मविनोदी ढंगातच नव्हे तर विनोदी त्याच वेळी हृदयस्पर्शी प्रसंगांतून उलगड्त असते.

एक मस्ट वॉच

माझ्याकडून ९/१०

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

'कालजयी कुमार गंधर्व' ह्या ग्रंथाच्या प्रकाशनानिमित्त शनिवार-रविवार पुण्यात काही कार्यक्रम झाले. त्यात उदयन वाजपेयींचं एक छोटेखानी भाषण पाहायला-ऐकायला मिळालं. त्याविषयीचा एक वृत्तांत इथे वाचायला मिळेल. अनेक दिवसांनी एक रसाळ व्याख्यान ऐकण्याची संधी मिळाली. एखाद्या कीर्तनकाराप्रमाणे मधूनच विषयात अवांतर वाटेल असं वळण घेऊन ते पुन्हा आपल्या मुद्द्याकडे येत. तेव्हा मात्र ते वळण कशासाठी घेतलं होतं आणि त्यातून त्यांना कुमारांविषयी काय भाष्य करायचं होतं ते स्पष्ट होई. भारतीय परंपरेतल्या 'मार्गी' आणि 'देशी' परंपरा, भारतीय संगीताचा उगम कशातून झाला असावा ह्याविषयीचे सिद्धांत, त्यांपैकी नक्की कोणता सिद्धांत प्रत्यक्षात योग्य असावा ह्याबद्दल खात्रीनं सांगता न येणं अशी वळणं वाजपेयींनी आपल्या मांडणीत घेतली, आणि कुमारांनी कशी परंपरेची नव्या (आणि आपल्या स्वतःच्या वेगळ्या अशा) पद्धतीनं पुनर्मांडणी केली ते त्यांनी सांगितलं. बंदिशींचे बोल तोडण्याची प्रक्रिया कुमारांनी बदलली; कबीराची भजनं किंवा लोकधुना अशांसारख्या पारंपरिक गोष्टींना त्यांनी नव्या रूपात सादर केलं; असं सगळं सांगतानाच वाजपेयींनी 'वाल्मिकी रामायण' 'तुलसी रामचरिता'त पुन्हा मांडलं गेलं तेव्हा परिचित गोष्टींच्या पुनर्मांडणींमध्येच ती गोष्ट (इथे, रामायण किंवा राम) नव्या दृष्टीनं दिसू लागण्याच्या शक्यता निर्माण झाल्या होत्या असा मुद्दा मांडला. पुनर्मांडणीच्या अशा, म्हणजे परंपरेहून वेगळ्या होण्याच्या प्रवाहात कुमारांचं स्थान त्याद्वारे त्यांनी दाखवून दिलं. शिवाय, कलाकारानं स्वतःच्या वेगळेपणाला पुसून टाकून निर्मिती करण्याच्या भारतीय परंपरेतल्या पद्धतीला बाजूला सारून कुमारांनी आपल्या निर्मितीत आपला ठसा ठेवला आणि त्याद्वारे आधुनिक कलाकारांना कलापरंपरेत एक वेगळा मार्ग दाखवून दिला, असंदेखील त्यांनी सांगितलं. हे सगळं सांगताना 'बनारसच्या अस्ताव्यस्त असण्याच्या परंपरेमुळे त्याचं क्योतो कसं होऊ शकत नाही, किंवा झालंच तर त्यातली ती अघळपघळ संस्कृतीच कशी नष्ट होईल' वगैरे खुसखुशीत उदाहरणां-वळणांनी एखाद्या रसाळ कीर्तनाचा अनुभव दिला.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हा सिनेमा किंवा अश्या सारखे चांगले जुने सिनेमे कुठे मिळतील?

हा सिनेमा टोरेंटवर मिळावा, बराच फेमस दिसतोय
मी ब्रिटीश लायब्ररीतून सीडी आणली होती.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

गॉन गर्ल - निक आणि एमी या बाहेरून सुखी पिक्चर परफेक्ट दिसणारया जोडप्याच्या लग्नाच्या ५ व्या वाढ दिवशीच संशयित परिस्थितीमध्ये एमी त्यांच्या राहत्या घरातून गायब होते . सगळे धागे खून किंवा अपहरण या शक्यतेकडे बोट दाखवत असतात . मात्र धक्कादायक असतो तो निक ने या सगळ्याला दिलेला थंड प्रतिसाद . त्याच्या कडे बघून त्याला याच फारस दुख पण झालेलं नाही हे कळत . त्याला आपल्या बायकोचे जवळचे मित्र कोण आहेत ? आपण कामासाठी बाहेर जातो तेव्हा ति काय करते ? इतकेच काय पण तिचा रक़्त गट कुठला हे पण माहित नसत हे पाहून या प्रकरणाची चौकशी करणारे पोलिस पण आश्चर्यचकित होतात . अर्थातच संशयाचा काटा निक कडे झुकायला लागतो . गायब एमी च्या शोधासाठी मोठी शोध मोहीम राबवण्यात येते . एमी सोबत काय झालेलं असत ? निक ची नेमकी त्यात काय भूमिका असते ? या प्रश्नांची उत्तर हा चित्रपट देतो . वरकरणी हा चित्रपट 'thriller ' सदरात मोडतो कि काय असे वाटू शकते . पण हा चित्रपट अधिक व्यापक मुद्द्यावर भाष्य करतो . लग्न संस्था , बाजारपेठेचा नौकरीवर आणि नाते संबंधावर पडणारा प्रभाव आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे राजकारण . यस ! स्त्री -पुरुष संबंधा मधल राजकारण . एकमेकां पासून वाटणारी असुरक्षितता , 'लोक काय म्हणतील ?' हा पुराना गंड , लोकांसमोर दाखवावा लागणारा आनंदाचा मुखवटा , ज्याच्यासोबत आपण आयुष्य घालवतो त्याच्यासोबत राहून होणार suffocation या सगळ्या गोष्टी हा चित्रपट प्रभावी पणे मांडतो . चित्रपटात 'pretend ' शब्द वारंवार वापरला जातो . समझदार को इशारा काफी है . चित्रपट 'तिकडचा ' असला तरी भारतीय परिस्थिती मध्ये तितकाच चपखल ठरू शकतो . In fact हा जगाच्या पाठीवर कुठेही घडू शकतो . Bottom line is प्रत्येक शादी शुदा त्याने /तिने हा चित्रपट आवर्जून बघायला पाहिजे . Kudos to David Fincher

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

चित्रपट ज्यावर बेतलेला आहे ते जिलियन फ्लिनचं याच नावाचं पुस्तक नळीमध्ये बरेच जण वाचत असतात. वाचतो आता.

*********
आलं का आलं आलं?

होय. हा चित्रपट अतिशय सुरेख आहे. आभार!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पुस्तकाच्या तुलनेत चित्रपट फारच पचकवणी वाटला बॉ. अनेक प्रसंग एकमेकांशी संबंध नसल्यासारखे वाटले. पुस्तकात विस्ताराने वर्णन आल्याने एकंदर प्लॉट तर्कशुद्ध वाटतो. पुस्तक वाचले नसते तर चित्रपट कळलाही नसता असे वाटते.

"च्यायला!सेम आपलीच स्टोरी अशी भावना मनामध्ये आली." everybody loves raymond चे नउ सीझन सम्पवले आत्ताच. भारतीय परिस्थीतीला रिलेट होण्यात friends आणि साइनफिल्ड याना मागे टाकेल. चौर्यकर्मासाठी नम्बर एक. जास्त करुन स्वभावविसन्गतीवर जास्त जोकस् आहेत. बाकी दोन्हीमध्यै विपुल प्रमाणात असणार्या LGBT व्यक्तिरेखा,सेक्शुअल जोक्स, अशक्य वाटाव्या अशा घटना नसताना किवा नगण्य असतानादेखील जबरदस्त विनोदनिर्मिती करण्यात रे रोम्यानो आपल्या गान्ड टाकुन बसणार्या(chillass) स्वभावामुळे यशस्वी होतो. साराभाई या मालिकेची चान्गली म्बणजे अस्सल भारतीय उच्चभ्रु सोसायटीतली नक्कल आहे(अर्थात मुळ मालिकेतील गुन्तागुन्त प्रेक्षकान्च्या भल्यासाठी(?) कमी करण्यात आली आहे.)

Anything can be created or destroyed. You just got to have the power to convert it from one form to another.

चा ट्रेलर पाहिला.
गाणं झकास आहे, आणि एकूण चित्रपटाचा बाजही. वाट बघेश!
ट्रेलरची लिंक. इथे दिसत नाही विडियो.

१९९५ सालचा, डेव्हिड फिंचर दिग्दर्शित "सेव्हन".

सिनेमा जुना आहे आणि बव्हंशी परिचित असण्याची दाट शक्यता आहे. मी खुद्द तो आत्ता पाहिला तो पुनःप्रत्ययाकरताच.

ब्रॅड पिट आणि मॉर्गन फ्रीमन हे दोन पोलीस डिटेक्टिव्ह सात खून करणार्‍या एका खुन्याला पकडतात. या प्रक्रियेमधे आक्रित वाटतील अशा घटना त्यांच्याबरोबरच घटतात असा चित्रपटाचा एकंदर आशय.

सुमारे दहा बारा वर्षांनंतर सिनेमा पाहताना पहिल्यांदा पाहताना न जाणवलेल्या गोष्टी जाणवल्या.

या सात दिवसातल्या घटना न्यूयॉर्कमधे घडतात. त्यावेळचं शहरातलं वातावरण साधारण मुंबईमधे जुलै-ऑगस्टमधे जसं असतं तसं दाखवण्यात आलेलं आहे. जवळजवळ प्रत्येक आउटडोअर दृष्यात जोमाने कोसळणारा पाऊस. सार्‍या चित्रपटातच या झाकोळलेल्या, पावसाळी, ओल्यागिच्च वातावरणाचा उत्तम वापर आहे. कुठेही सूर्यप्रकाश नाही. कुठेही रंग नाहीत. चित्रिकरणामधेही केलेला करड्या शेडचा वापर वस्तुजातांवर पडलेल्या सावटाला अधोरेखित करतो.

ब्रॅड पिट आणि मॉर्गन फ्रीमन यांच्याखेरीज केव्हिन स्पेसी आणि ग्वेनेथ पालट्रो हेही चित्रपटात आहेत. पैकी केव्हिन स्पेसीकडे शेवटची काहीच मिनिटे काम असूनही त्याच्या भूमिकेचं मध्यवर्ती स्वरूप आणि केव्हिन स्पेसीचा अभिनय यामुळे त्याचं काम लक्षांत राहातं. ब्रॅड पिटला जवळजवळ फ्रीमन इतकंच फूटेज असलं तरी मला यावेळी प्रकर्षानं जाणवलं की सिनेमा मॉर्गन फ्रीमनचा आहे. ब्रॅड पिटचं कास्टींग हे निव्वळ फ्रीमनच्या या भूमिकेला कॉट्रास्टींग पार्श्वभूमी म्हणून काय ते केलंय असा एक गमतीशीर विचार माझ्या मनात यावेळी पाहाताना आला. काळ्याकुट्ट, निर्घृण कृत्यांमागच्या माणसाचा छडा लावताना आवश्यक असलेली तार्किक संगती, त्याकरता लागणारं थंड डोकं, आणि डोकं शांत ठेवत असताना मनात येत असणार्‍या संतापाच्या आगडोंबावर ताबा ठेवणं.. मॉर्गन फ्रीमनचा या चित्रपटातला वावर म्हणज, आपल्या अवतीभवतीच्या भीषण वाटणार्‍या जगाशी सांगड घालू पहाणार्‍या विवेकी, विचारी व्यक्तींचं प्रातिनिधिक चित्रण आहे. चित्रपटाच्या सुरवातीला निवृत्त होऊ पहाणारा, या सर्व क्रौर्याला कंटाळलेला मॉर्गन फ्रीमनचा डिटेक्टिव्ह चित्रपट संपताना आपल्या कामाकडे परततो.

चित्रपट संपतानाचं त्याचं व्हॉईस ओव्हरचं वाक्य मार्मिक आहे. Ernest Hemingway once wrote, "The world is a fine place and worth fighting for." I agree with the second part.

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

मला खूप आवडतो. ह्यात २००७-२००८ मधील आर्थिक संकटाच्या सुरूवातीला वॉल स्ट्रीट वरील एक मोठ्या इन्व्हेस्ट्मेंट बँकेतील ३६ तासातल्या घडामोडी दाखवल्या आहेत. केविन स्पेसी, स्टॅन्ली तुची, जेरेमी आयर्न्स, पॉल बेटनी, सायमन बेकर आणी डेमी मूर अशी तगडी कास्ट आहे. कलाकारांचा अभिनय उत्तमच!!! जेरेमी आयर्न्स एक्दम भाव खाऊन जातो.सुंदर आवाज लावलाय त्याने आणि बेअरींग पण अप्रतिम.

सध्या बोर्गन ही उत्तम डॅनिश मालिका बघतोय.ह्यात स्त्री भूमिका खूप प्रभावी आहेत. विविध पदरी पात्र आणि सतत गतिमान कथा त्यामुळे ५ तारे.

=======================================================================
छिन्नी हातोड्याचा घाव, करी दगडाचा देव, सोशी दैवाचे तडाखे त्यास मानूस ह्ये नाव.....

क्रिस्टोफर नोलनचे प्रेस्टीज आणि डार्क नाईट पाहून त्याच्या प्रेमात असल्याने सायन्स फिक्शन आवडत नसूनही इंटरस्टेलर नावाचं सायन्स फिक्शन कम फँटसी प्रकरण धाडसाने पाहिलं
मानवजातीचा विनाश जवळ आलेला असल्याने भविष्यातली मानवी वसाहत करता येईल असा ग्रह शोधण्याचा ५/७ लोकांचा पावणे तीन तास चाललेला संथ , भावूक खटाटोप पाहून कशाला ???
मरेना का ती मानवजात !! प्लीज राहुद्या हो ,असं वाटलं . नोलनच्या सिनेमात अमेरिकन बापलेकीचं अतोनात प्रेम आणि रडारड पाहून आपल्याही भावना उचंबळून सारखं गहिवरून येत. इतकी भावनाप्रधान अवकाशयात्री मंडळी असूनही त्यांचा सहकारी एका पाण्याच्या लाटेत वाहून मरून जातो त्याचे यांना यत्किंचितही दुख्ख होत नाही .त्यांना संकटात नेहेमी कुणीतरी "दे " मदत करत असतो . " हू द हेल आर दे ?" असे ते अधून मधून एकमेकांना विचारत असतात . प्रेक्षकांना आणि त्यातल्या संशोधकांना जे काय समजत नाही ते सगळे पाचव्या डायमेंशन मध्ये असते हे एकदा लक्षात आलं की सगळच सोप्प होऊन जात यु नो ! मारामारीचं एखाद दृश्य हवे म्हणून कि काय दोन संशोधक उगा स्पेस सुटमध्ये अनावश्यक हातवारे करतात . अप्रतिम छायाचित्रण असूनही एकंदरीत संथ गतीमुळे कंटाळा आला .

स्पॉयलर स्पॉयलर स्पॉयलर

सगळीच कथा सांगून टाकली की राव तुम्ही ....मग काय मजा राहिली?

मी काल पाहिला...आवडला

Mandar Katre

पुन्हा (संधी मिळे पर्यंत) असे कध्धीच करणार नाही . Blum 3
टीप : मी सिनेमाची कथा सांगत नाही असा भ्रम झाला होता तो तुटला Sad

ही पूर्ण कथा नाही, असे ठणकावून सांगायचे. लोक मधल्या काळात इतर पिक्चर्स बघतात व विसरतात. नंतर जेव्हा हाच चित्रपट बघतात तेव्हा ते सगळे येथे लिहीलेले होते एवढे व्हेरिफाय करणारे क्वचितच असतील. स्पॉइलर्स नाहीत एवढी 'तसल्ली' मिळाली म्हणजे झाले (सॉरी - काल लय भारी बघितल्याने आज दिवसभर बोलतना मधे हिन्दी शब्द येतायत).

नोलनच्या जगभरात परवाच रिलीज झालेल्या ताज्या सिनेमाची टवाळी केल्याने स्टोरी सांगितल्याचा आरोप करताहेत असा कांगावा सुद्धा करता आला असता . Smile किमान शब्दात कमाल स्टोरी सांगणे विनासायास जमलेले दिसते आहे . ROFL

थोडेफार स्पॉयलर आहेत. आणि जवळपास अख्खी स्टोरीच डकवलिये..... लोकांना काहीतरी पाहू द्या!
अवांतर -चित्रपटावरचे आक्षेप जरा इनोदी वगैरे वाटले... १/१०० भागातले-मुद्दाम शोधून काढल्याटाईप!

चुकीच्या जागी फोकस केलेला वाटतो आहे. भावनिक रडारड सोडली तर बरंच काही आहे की त्यात. तुम्ही तर त्याला "थांब कमांडो कुंकू लावते"च्या लेव्हल ला आणून ठेवलाय.
चित्रपट स्लो तर अजिबात वाटला नाही. दुनिया का सर्वनाश ही थीम फारशी आवडत नसूनही हा शिनेमा विशेष आवडला.

आजच हा चित्रपट पाहिला. फेसबुकावर '_/\_', 'शेवटी नोलान आहे', 'नोलान लय भारी' वगैरे प्रतिक्रिया वाचल्या होत्या, तितका काही भारी वाटला नाही. थोडा ओव्हरहाइप्ड वाटला. काही काही भाग कळ्ळा नाही, काही भाग 'कैच्याकै' वाटला. ते असो. पुढचा भाग पांढर्‍या ठशात. चित्रपट पाहिला नसल्यास वाचू नये.
कृष्णविवराभोवतीच्या लाटवाल्या ग्रहावर प्रकाश कोठून आला? त्यातले आकाश पण पृथ्वीसारखे दाखवले होते.
प्रेमाचे ते वरच्या मितींतले प्रकर्ण काही झेपले नाही.
कृष्णविवरात जाताना माणूस अखंड आत कसा काय जातो? भरती ओहोटीच्या बलाने त्याचे तुकडे होऊन जातील असे वाचले आहे. बरे, गेला तर गेला. तो पाचव्या मितीत कसा गेला? तिथून परत कसा काय आला? पाचव्या मितीत किती वेळ होता?

कृष्णविवरात जाताना माणूस अखंड आत कसा काय जातो?

खरेक्ट! रबरासारखा ताणला गेला पाहिजे ना?

*********
आलं का आलं आलं?

होय, पण तो जातो ते त्या टेसेरॅक्टमध्ये जो फ्यूचर ह्यूमन्सनी तयार केलेला असतो. त्यामुळे अ‍ॅक्च्युअली इनसाईड द ब्लॅक होल गेलाच नै तो.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

टेसेरॅक्ट म्हणजे?
कृष्णविवराच्या आत नव्हे, जवळ गेल्यावरही ताणला जायला हवा. आणि तो इव्हेंट होरायझनच्या आत जातो ना?

टेसेरॅक्ट म्हणजे ती ५-डी रिअ‍ॅलिटी, व्हॉटेव्हर दॅट वॉज व्हेअर ही वॉज इन थे ब्याकसैड ऑफ द लैब्री.

तदुपरि- बेनेफिट ऑफ डौट द्यायचा तर इव्हेंट होरायझनच्या आत जातो असे वाटणे हा त्याचा भ्रमही असेल ना. आय मीन तेवढ्यात तो टेसेरॅक्टातच गेला पण वाटलं की कृष्णविवरात गेला म्हणून.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

मरेना का ती मानवजात !!
ते सगळे पाचव्या डायमेंशन मध्ये असते.

सुप्पर!

पिच्चर पूर्ण IMAX क्यामेर्‍यात आहे त्यामुळे तो फक्त हैदराबादेतच पाहावा.

२०१० साली आलेला, डेब्रा ग्रानिक दिग्दर्शित, "विंटर्स बोन".

जेनिफर लॉरेन्सचे काही सिनेमे पाहिले होते. यात त्या बाईंचं ( Smile ) काम छान असलं तरी ते सिनेमे काही फार आवडले नव्हते. मग तो "सिल्व्हर लायनिंग प्लेबुक" असो किंवा "अमेरिकन हसल्" असो. ("हंगर गेम्स" न झेपलेला प्रकार. तो असोच. ) त्यामुळे, हा सिनेमा पहायला घेताना थोडी शंका होती. मात्र सिनेमा अजिबात निराश न करणारा, माप पुरं पदरात टाकणारा आहे. आणि सिनेमा लॉरेन्सचा आहे यात तर संशयाला कुठे जागा नाहीच.

कथासूत्र (ढोबळमानाने) - सुरवात

सिनेमा कादंबरीवर आधारित आहे ती तर वाचलेली नाही. त्यामुळे काही भाषिक आणि भौगोलिक संदर्भ नंतर वाचून कळले. सिनेमाचं कथासूत्र म्हणायचं तर ते इतकंच की अमेरिकेतल्या मिडवेस्टमधल्या एका विशिष्ट प्रदेशात रहाणार्‍या, फार्मवरचं आयुष्य जगणारं एक कुटुंब. कुटुंबप्रमुख/वडील गैरहजर आहेत. आईला कसलासा डिप्रेशनसदृष्य आजार आहे; तो असा की तिचं बोलणं, कुटुंबाकरता अगदी मूलभूत गोष्टी करण्याची क्षमता या सगळ्या गोष्टी लोप पावलेल्या आहेत. एक मूक अस्तित्व शिल्लक आहे. तीन भावंडं. त्यातली "री" ही सर्वात मोठी सतरा वर्षांची. बाकी दोघं दहा नि चार-पाच वर्षांच्या आसपासचे.

बेपत्ता वडलांना शोधायला पोलीस येऊन गेल्यावर आणि त्यांच्या जामीनापोटी सारी मालमत्ता जप्त होणार याची सूचना दिल्यानंतर "री" घराबाहेर शोध घ्यायला पडते. या शोधात जे तिला मिळतं, जे तिच्याबरोबर घडतं नि ज्यातून ती घडते त्या घटनांची मांडणी म्हणजे एकंदर सिनेमा.

कथासूत्र - अखेर

सिनेमातली भाषा, त्यातल्या माणसांचं जीवन, राहाणी , भाषा ही अमेरिकेतल्या एका अगदी विशिष्ट प्रदेशातली आहे. भाषा इंग्रजीच, पण तिचा बाज हा मिझोरी/अर्कान्सा राज्यांमधला. ग्रामीण भागातलं , निम्नस्तरातल्या लोकांचं आयुष्य या सार्‍याचं चित्रण मला अतिशय प्रभावी वाटलं. प्रचंड प्रमाणातल्या घटना न दाखवतानाही, त्यामागच्या इंटेन्सिटीमुळे संथ गतीतला असलेला हा चित्रपट थरारक आहे यात शंका नाही. कुटुंबीयांधले, छोट्या पंचायतवजा व्यवस्था वाटावी अशा लोकसमूहांमधले संबंध. "ग्रिटी" अशा शब्दाने वर्णन करता येतील अशा व्यक्तिरेखा.

लॉरेन्सचा मला सर्वात अधिक आवडलेला सिनेमा. तिच्याबरोबर जॉन हॉक्स या नटाचं कामही संस्मरणीय. थोडक्यात एक उत्तम अनुभव.

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

'ब्लू वेल्वेट' पाहीला. फिल्म न्वार आणि सरीअल शैलीतला डेविड लिंचने दिग्दर्शित केलेला चित्रपट.
आजारी वडलांना भेटायला हॉस्पिटलात जात असताना एका तरुणाला रस्त्यात कापून फेकलेला कान सापडतो. तो हे पोलिसात कळवतो,तिथला डिटेक्टीव त्याला या प्रकरणापासून लांब रहा असे सुचवतो. पण उत्सुकता त्या तरुणाला गप्प बसू देत नाही आणि तो स्वतःच हे रहस्य उलगडायचा निर्णय घेतो. आणि अभावितपणे सगळ्या प्रकरणात प्रचंड गुंतत जातो. कथानक तसे ढोबळ असले तरी दिग्दर्शकाच्या वेगळया शैलीकरता पाहावा असा हा चित्रपट आहे. काही काही प्रसंग प्रचंड भडक वाटले. नग्नता पण भरपूर आहे. चित्रपटाच्या काही फ्रेम्स अभिजात चित्र वाटाव्या इतक्या सुंदर आहेत (अगदी त्यातल्या नग्नतेसकट ). अभिनय मस्त केलेत सगळ्यांनी. विशेषकरून खलनायक फ्रँक चे काम. अत्यंत अस्थिर मनस्थितीचा हा साडीस्ट खलनायक प्रभावी अभिनयाने अंगावर काटा आणतो. चित्रपटात वेश्यालयात दल्ल्याचे काम करणारे 'बेन ' नावाचे एक पात्र आहे. बेन जेव्हा ' a candy colored clown' हे गाणं म्हणतो (lipsync करतो खरे तर ) तेव्हा फ्रँकचे विदीर्ण होत जाणे हा पूर्ण प्रसंग अभिनयाची परिसीमा आहे. आणि विशेष उल्लेख ब्लू वेल्वेट या गाण्याचा. पूर्ण चित्रपटात हे गाणं असंख्य वेळा पार्श्वभूमीवर वाजत राहतं. (चित्रपट पाहून दोन दिवस झालेत तरी अजुन माझ्या डोक्यात ते घुमतंय. हाँटींग. ).

"She wore blue velvet
Bluer than velvet was the night
Softer than satin was the light
From the stars

She wore blue velvet
Bluer than velvet were her eyes
Warmer than May her tender sighs
Love was ours

Ours a love I held tightly
Feeling the rapture grow
Like a flame burning brightly
But when she left, gone was the glow of
Blue velvet

But in my heart there'll always be
Precious and warm, a memory
Through the years
And I still can see blue velvet
Through my tears

ती होती निळ्या मखमलीत,
अन मखमलीहुन निळी होती रात,
मृदुल रेशमी प्रकाश होता पाझरत,
तारकांतून

ती होती निळ्या मखमलीत,
अन मखमलीहुन निळे होते डोळे,
उबदार होते तिचे श्वास
प्रीतीचे.

प्रयत्न करून पाहीला अनुवादाचा नंतर सुचेचना

गाणं किती विस्ट्फुल आहे. सुंदर!!!

ह्यातला खलनायक कसला खतरनाक आहे!
अवांतर - लिंच साहेब भन्नाट गोष्टी बनवतात. त्यांची "twin peaks" ही मालिकाही भलतीच होती. "Lost highway" मात्र झेपला नाही- पण बेफाट आवडला Smile

तो डेनिस हॉपर आहे. हॉलिवुडमधला एक तगडा नट. त्याचे स्पीड आणि वॉटरवर्ल्ड मधले खलनायकही गाजले.एलेगीमधली त्याची कवीची भुमिकाही मला आवडली होती,अर्थात तो प्रमुख्याने बेन किंग्जलीचा जवळचा मित्र म्हणून समोर येतो, कवी म्ह्णून नाही,पण भुमिका त्याने छान केली होती.

हॉपर जवळजवळ वयाच्या १८ व्या वर्षापासून ह्या क्षेत्रात काम करत होता. जॉन वेनच्या ट्रू ग्रिट मधे तो खलनायक होता. त्याच साली (१९६९) त्याने दिग्दर्शित केलेला ईझी रायडर आला. पीटर फोंडा, हॉपर आणि तरूण जॅक निकोलसन ह चित्रपट आला आणि तूफान गाजला. त्यानंतर हॉपरचा खडतर कळ सुरू झाला. व्यसनही वाढली.अखेर १९७९ साली फोर्ड कपोलाने त्याला, मार्टिन शीन, रॉबर्ट दुवाल आणि ब्रँडोसमोर उभे केले. अपोकॅलिप्स नाऊ मधला त्याचा फोटोग्राफर गाजला. पुढच्याच वर्षी आऊट ऑफ द ब्लु मधे त्याच्या दिग्दर्शनाच आणि अभिनयाच कौतुक झालं. त्यानंतर त्याने मागे वळुन पाहिलं नाही. २०१० च्या मे मध्ये त्याच निधन झाल.

=======================================================================
छिन्नी हातोड्याचा घाव, करी दगडाचा देव, सोशी दैवाचे तडाखे त्यास मानूस ह्ये नाव.....

अतिशय वेगळा विषय आहेच, त्याहून वेगळे आणि छान दिग्दर्शन, अभिनय, ध्वनी, संवाद, संवादफेक सारेच लाजवाब.

या सहा गोष्टी आपण सवत्या सवत्या निरीक्षीत असता काय? चित्रपट वा नाटक पाहताना मला तो/ते पाहणे ही एकच गोष्ट करायला जमते.

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

चित्रपट वा नाटक पाहताना मला तो/ते पाहणे ही एकच गोष्ट करायला जमते.

कमालच म्हणायची!

कमाल काय त्यात? तेच तर करायला गेलेलो असतो मी.
-------------------
कोणत्याही सामान्य माणसाला दहावी पास होणे म्हणजे मराठी, हिंदी, ईंग्रजी, ....., नागरीकशास्त्र पास होणे का असे विचारल्यास तो हो म्हणेल. पण त्याला चित्रपट पाहणे म्हणजे या सहा (आणि पक्के समीक्षक पाहत असलेल्या अजून ६०) गोष्टी पाहणे का विचारले तर तो ठाम नकार देईल.

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

परवा (म्हणजे नक्की परवा नाही) ऐसीवर मागे कधीतरी चर्चा केल्या गेलेल्या गोडसे नावाच्या कोकणातील माणसाचे उत्तर भारतातील भ्रमण व त्यावर त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा अनुवाद (बहुधा हिंदी आणि इंग्रजी दोन्हींत) करणार्‍या लेखिका मृणाल पांडे यांचा दुसरे साहित्यिक पुष्पेश पंत यांचेशी त्या विषया वरील अत्यंत रोचक संवाद दूरदर्शनवर पाहिला. १८५७ची पार्श्वभूमी, १८५७ बद्दलच्या लोकभावना, त्या इतिहासात असाव्यात का, नानासाहेब फडणवीसांना उत्तर प्रदेशातील गावांत काय मान आहे ( हे गोडसेंच्या पुस्तकात नाही), महाराष्ट्र आणि उत्तरेचे ब्राह्मण यांचे ऐतिहासिक संबंध इ इ खूप इंटरेस्टिंग चर्चा होती.

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

'नानासाहेब फडणवीसांना उत्तर प्रदेशातील गावांत काय मान आहे' मधले नानासाहेब फडणवीस कोण असा विचार करत आहे.

नाना फडणीस १८०० साली वारले. पानिपतातून जीव बचावून परत आल्यावर त्यांचे पुनः उत्तरेस जाणे झाले असे वाचल्याचे आठवत नाही. त्यांना नुसते 'नाना' असेच ओळखत असत. उत्तर प्रदेशातील सर्वसामान्यांना त्यांचे नावहि बहुधा माहीत नसावे.

बंडवाले नानासाहेब म्हटले तर ते उत्तरेतच होते आणि तिकडेच परागंदा झाले पण त्यांना फडणवीस हे आडनाव नव्हते. ते होते 'भट' (दत्तक).

बंडवाले नानासाहेब असे त्यांना म्हणायचे होते. चर्चा १८५७ चे बंड आणि भारतीय समाजांचे अभि:सरण अशी काहीशी होती.
----------

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

हे नानासाहेब म्हणजे नाना फडणवीस नव्हेत. हे नाना(साहेब) भट.

(भटच ना? चूभूद्याघ्या.)

दुसर्‍या शब्दांत सांगायचे झाले, तर

नानांत नाना, फडणवीस नाना
इतर नाना करिती तनाना

या उक्तीस अनुसरून, हे नाना म्हणजे तनाना करणारांपैकी.

===========================================================
मग्रूर, मुजोर आणि आढ्यताखोर भुंकणारा ब्राह्मण पुरुष
(ऐतिहासिक काळात किंवा फेस‌बुकाव‌र न वाव‌र‌लेला, प‌ण उप‌क्र‌माव‌र थोडाफार‌ बाग‌ड‌लेला)

मीरा नायर चे बहुतेक सर्व चित्रपट काही काळापूर्वी बघितले ."सलाम बॉम्बे" भिडला अगदी...........Monsoon Wedding आणि The Reluctant Fundamentalist बरे वाटले ...The Namesake ठीक ...इतर Kama Sutra: A Tale of Love ,Mississippi Masala इत्यादी नी मात्र साफ निराशा केली ...

मजीद मजीदी या इराणी दिग्दर्शकाचे ही बहुतेक सर्व सिनेमे बघितले ... अतिशय आवडले ! माझ्या आवडत्या दिग्दर्शकान्च्या लिस्ट मध्ये मजीद मजीदी अगदी वर असणार !

Mandar Katre

विकांताला २ चित्रपट पाहिले
१. एलिझाबेथ एकादशी:
(सुखांताचा अट्टाहासापायी कथेच्या प्रवाहाला शेवटी मारूनमुटकून वळवले आहे ते वगळता) मला एकुणात आवडला. पंढरपूराचे चित्रीकरण, समकालीन परिसर-व्यक्ती-भाषा-प्रथा-प्रसंग यामुळे चित्रपटाची खुमारी वाढली आहे. मात्र हरिशचंद्राच्या फॅक्टरी इतका "ओरिजिनल" आणि थोर नाही वाटला. माझ्याकडून ८.५/१०

२.
इस्ट इज इस्ट पाहिला. फारसा नाही आवडला - कथा नाही आवडली. बाकी अनेक बारकावे छान आहेत पण कथेतच मार खाल्ल्याने परिणाम नाही होत नीट. माझ्याकडून ७/१०

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

खुप वर्षांपासून पाहण्याची इच्छा असलेला 'पॅपीलॉन' परवा पाहण्यात आला आणि नाही म्हटले तरी थोडी निराशाच पदरी आली. महाविद्यालयीन आयुष्यात हेन्री शॅरीयरच्या 'पॅपीलॉन' या कादंबरीने अक्षरशः वेड लावले होते. त्यावर चित्रपटही निघाला आहे हे मात्र अगदी परवा-परवा म्हणजे ६-७ वर्षांपुर्वी कळाले. पण १९७३ मध्ये (माझ्या जन्माच्या एक वर्ष आधी) आलेला हा चित्रपट पाहायला या महिन्यात प्रत्यक्ष मुहुर्त लागला. चित्रपट असल्याने वेळेची मर्यादा येते त्यामुळे कादंबरीतल्या बर्‍याचश्या महत्वाच्या नोंदी राहून गेलेल्या आहेत. शेवटही अगदीच उरकल्यासारखा वाटतो...

पण स्टीव्ह मॅकक्वीनने रंगवलेला पॅपी आणि डस्टीन हॉफमॅनचा डेका विशेष लक्षात राहतो. खासकरुन दुय्यम पात्र असुनही अभिनयाच्या जोरावर डस्टीन हॉफमॅनचा 'डेका', मॅकक्वीनच्या पॅपीलॉनवर सहजी मात करून जातो.

कॉलेजमध्ये असताना पॅपिलॉन वाचली होती. आवडली होती.

कॉलेजमध्ये असतांना त्यावेळी " पापिलान " पाहिला होता , अतिशय आवडला होता , त्यानंतर मूळ इंग्रजी कादंबरी साठी मुंबैत भटकलो.
मुंबै सेंट्रलच्या एका फूटपाथवर १९८० साली अवघ्या पाच रुपयास उचलली. कादंबरी वाचून अधिकच खुलासे समजलेत.पुढे मेहता प्रकाशनातर्फे
प्रकाशित मराठी अनुवाद सुद्धा वाचला, पण अनुवाद तितकासा भावला नाही.
कोणत्याही तुरुंगात टाकले तरीही , निराश न होता , तुरुंगातून पलायन कसे करता येइल ह्याचाच विचार करणारा तो हिरो
त्या वेळी मनाला भावला होता
असो शेवटी " पसंद अपनी अपनी, खयाल अपना अपना " हेच खरे

"विकी डोनर" आणि "भेजा फ्राय" हे पुनरेकवार पाहिले.

विकी डोनरमधला अन्नू कपूरचा "डॉ बलदेवसिंग चढ्ढा" एकच नंबर. त्याच्या देहबोलीतून हा खरोखरच २५ वर्षांचा अनुभव असलेला डॉक्टर आहे असं जाणवून रहातं. विशेषतः "स्पर्म" म्हणताना हाताचा कात्रीसारखा केलेला वापर.

भेजा फ्रायमध्ये थोडा ओव्हर द टॉप अभिनय करूनही लक्षात राहिलेला रणवीर शोरी.

*********
आलं का आलं आलं?

मला "एकपात्री प्रयोग" माहित होते. नाटकांपासून वेगळे पण तरी कथाबद्ध असे एकपात्री प्रयोग, आणि mic समोर येउन तेच तेच जोक सांगणारे johnny lever सारखे अभिनेते, यामुळे stand up हा काही वेगळा कलाप्रकार आहे असं कधी वाटलं नाही. एकूणच नाविन्य होतं, पण आपलंसं कधी वाटलं नाही. पण अमेरिकेत येउन थोडंफार कळायला लागलं. russel peters पासून झाली सुरुवात… त्याचे jokes कळायला लागले थोडेफार… मला आता पण खूप काही कळत नाही… सगळेच stand up वाले आवडतात किंवा सगळे stand up मधले जोक कळतात असं काही नाही. पण फरक कळलाय, stand up comedy करणाऱ्या करणाऱ्या कलाकारांमधला आणि विनोदी अभिनेते, नकलाकार यांच्या मधला… जे लोक विशेष आवडायला लागले त्यात सगळं पहिलं नाव - लुई सी. के.

लुई सी. के. हा चाळिशी ओलांडलेला, ओबडधोबड शरीरयष्टी असलेला, २ मुलींची जबाबदारी "separated" बायकोसोबत शेअर करणारा stand up comedian आहे. त्याच्या विनोदांचं बरचसं content त्याच्या या परिस्थितीतून येतं. त्याचे "Chewed Up", "Hilarious" असे बरेच show प्रसिद्ध आहेत, आणि youtube किंवा netflix वर बघायला मिळतात. मला इथे बोलायचं आहे ते त्याने स्वतःवर काढलेल्या "लुई" या मालिकेबद्दल.… त्याच्या स्वतःच्या रोजनिशीमधल्या घटनांना अतीशायोक्तीचा आणि विनोदाचा हलका मसाला लावून या मालिकेतले भाग आपल्यासमोर येतात. साधे सरळ, जास्त पार्श्वसंगीत वगैरे नसलेले संथ गतीने बिल्ड होत जाणारे सगळे भाग बघायला खूप मजा येते.

लुई ही विनोदी, छान मालिका आहे. लुई आणि त्याच्या आजूबाजूचे लोक त्याच्या "Comedian" च्या नजरेतून पाहताना खरंच मजा येते. यातही, मला एक "एपिसोड" जर जास्त भावला. लुई हा जरी घटस्फोटीत, तरी बायकामुलं होऊन कॉमेडी career मध्ये स्थिरावलेला माणूस… त्याचा एक "vagabond" comedian मित्र त्याला भेटायला येतो… मुद्दाम "vagabond" शब्द वापरला, कारण हा लुईचा मित्र लुई सोबतच stand up ची सुरुवात केलेला, पण गावोगाव फिरून show करणारा, drugs, दारूच्या नादी लागलेला, उमेद हरवलेला माणूस… तो लुई ला भेटायला येतो, सोबत फिरतो… म्हणतो चल कुठे तरी "set" (कॉमेडी बार मध्ये वगैरे ५-१० मिनिटांचे set असतात ५-६ कलाकारांचे…) करूया… एकूणच सगळा भाग जुन्या मित्रासोबत फिरणारा लुई आणि comedians ची रात्र थोडक्यात कशी असते ते दाखवतो… शेवटी लुई विचारतो मित्राला… का आलास ईथे? काय हवंय? मित्र सांगतो "अरे बाबा, काही नको… फक्त सांगायला आलोय की परवा माझा शेवटचा show करतोय आणि मग संपवणार आहे स्वतःला. उमेद संपली, want संपली… बास! कुणालातरी good bye म्हणावसं वाटलं आणि फक्त तूच डोक्यात आलास." खरंच एवढे एकटे असतात हे लोक? प्रश्न पडला नंतर, उत्तर माहित आहे असे वाटूनही…

या मालिकेची हीच गंमत आहे. लुई सी. के. ने आधीच सांगितलंय की, या मालिकेतला मी ही माझी "अतिरंजित" आवृत्ती आहे. पण मालिका बघताना आपण, "हे खरं असेल की अतिरंजित? किती प्रमाणात खरं असेल? काय नेमकं अतिरंजित असेल?" असाच विचार करत बसतो.

स्वतःची प्रतिक्रिया पुन्हा वाचतोय… शुद्धलेखनाच्या बऱ्याच चुका झाल्या… सांभाळून घ्या!

1990 च्या दशकातील दूरदर्शन वरील एक विनोदी सीरियल
सरकारी ऑफिस मधील बाबूगिरी आणि काम (न )करण्याच्या पद्धतीवर तिरकस भाष्य !
पहा एकदा ! लय भारी !!!
13 एपिसोड आहेत ..........

http://www.youtube.com/watch?v=g0TzuucEwEw&list=PLv8lv-LPpERFWeS-_Sdurqq...

Mandar Katre

दुव्याकरता आभारी आहे. बघेनच.

तुम्ही DD Child असाल तर Nostalgic व्हा---

http://abhisays.com/internet/watch-old-doordarshan-serials-online.html

Mandar Katre

ही घ्या लिंक सायन्स फिक्शन लव्हरांनो..................
http://ftw.usatoday.com/2014/11/interstellar-review-matthew-mcconaughy-w...

"मर्डर बाय डेथ" (१९७६)
दिग्दर्शकः रॉबर्ट मूर
लेखकः नील सायमन

रहस्यकथांचे, विशेषतः खूनकथांचे, आणि अशा कथांच्या काही प्रसिद्ध नायक/नायिकांचे विडंबन करणारा हा विनोदी रहस्यपट अलीकडे पाहिला. लायोनेल ट्वेन नामक एक विक्षिप्त रईस पाच नामांकित गुप्तहेरांना (प्रत्येकी एका पाहुण्यासह) आपल्या रहस्यमय गढीवर "डिनर अ‍ॅन्ड अ मर्डर"चे आमंत्रण देतो. बंगल्यात ट्वेनव्यतिरिक्त फक्त एक आंधळा बटलर, व एक मूकबधीर व निरक्षर स्वयंपाकीण असतात. बटलर व स्वयंपाकीणीत साहजीकच कोणत्याही स्वरूपाचा संवाद अशक्य, व त्यामुळे पाहुण्यांच्या खाण्या-पिण्याचा सावळा गोंधळ. पाहुणे हेर आहेत इन्स्पेक्टर सिडनी वान्ग [मूळः इन्स्पेक्टर चार्ली चान्ग] (व त्याचा दत्तक जपानी पुत्र विली वान्ग), सुप्रसिद्ध बेल्जियन गुप्तहेर मायलो पेरियर [मूळ: हर्क्यूल पुआरो] (व त्याचा ड्रायवर मार्सेल), डिक व डोरा चार्ल्स्टन व त्यांचा टेरियर कुत्रा मायरन [मूळः निक व नोरा चार्ल्स व त्यांचा टेरियर कुत्रा अ‍ॅस्टा], मिस जेसिका मार्बल्स [मूळः मिस जेन मार्पल] (व तिची अपंग नर्स, मिस विदर्स), आणि सॅम डायमन्ड [मूळः सॅम स्पेड] (व त्याची खाजगी सचिव-प्रेयसी टेस स्केफिंग्टन).

ट्वेन ह्या सर्वांसमक्ष आपण स्वतः जगातील सर्वोत्तम गुप्तहेर असल्याचा दावा करतो, व त्यांना खुले आव्हान देतो- मध्यरात्री एक खून होईल, व त्यांच्यापैकी जो कोणी खुनी शोधून काढेल त्याला दहा लाख डॉलर इनाम दिले जातील. मध्यरात्रीपूर्वीच बटलरचा खून होतो, व मध्यरात्री ट्वेनचा. त्यानंतर रहस्यकथांमध्ये नेमाने येणार्‍या अनेक क्लीशेंचे मनसोक्त विडंबन केलेले आहे. भिंतीवरील तसबिरींचे हलते, माग घेणारे डोळे, हलत्या भिंती व गुप्त खोल्या, साप/विंचू/बॉम्ब/पडत्या छप्पराने केलेले खुनाचे प्रयत्न, व इतर बरेच काही. भाषिक विनोदांचे तरलपासून ओवर द टॉपपर्यंत सर्व प्रकार चित्रपटाची रंगत वाढवतात. ह्या सर्वावर कळस म्हणजे स्टार कास्ट- पिटर सेलर्स, पिटर फॉक, अ‍ॅलेक गिनेस, मॅगी स्मिथ, डेविड निवेन, जेम्स कोको, ट्रूमन कॅपोट...चित्रपटाच्या पोस्टरवरील टेगलाईनमध्ये सगळे आले.

दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले

शुक्रवारी सचिन कुंडलकर दिग्दर्शित हॅपी जर्नी पाहिला.
मला आवडला. जीवन, मृत्यू, सहवास, सवय, प्रेम, आवड आणि व्यवहार या विविध घटकांच्या सरमिसळीवर दोन व्यक्तींमधील नात्याची वीण गुंफली जात असते. यातील एक आणि एकच घटक दोन व्यक्तींमधील नात्याला पुरेसा नसतो, इतर घटकांचीही तितकीच जरूर असते. अशावेळी विविध पात्रांकडे यातील गोष्टींची कमतरता, सहजीवनातून भरून काढण्यासाठी एकत्र आलेल्या माणसांच्या गुंत्याचे/गाठींचे चांगल्या विणीच्या गालिचात रुपांतर कसे होत जाते याचा प्रवास छान दाखवला आहे.

मला फक्त डबिंग अजिबात नाही आवडलं. कित्येकदा मुळ ओठांच्या हालचाली व चेहर्‍यांवरील भावांहून डबिंगमधील आवाजाचे चढउतार तीक्ष्ण व टोकदार झाले आहेत. असे डबिंग रसभंग करणारे वाटले.

बाकी लोकेशन्स, संवाद, अभिनय, कंसेप्ट आणि त्याचे एक्झिक्युशन सगळेच आवडले.
सौम्य व प्रभावी पार्श्वसंगीत (वजा मला न आवडलेली गाणी), चपखल ध्वनी यांची जोडही छान आहे.

एकुणात छान अनुभव माझ्याकडून ८/१०

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ईंटरस्टेलार पाहिला. एक भावनापट म्हणून बायकोला खूप आवडला. मुलाला पॉपकॉन, हॉटडॉग खात मस्त पॅनोरमा पाहायला मिळाले म्हणून आवडला पण इंटरवलनंतर तो झोपी गेला. भावूक विज्ञानवादी, भावनाहिन विज्ञानवादी, भावूक विज्ञानाज्ञ, भावनाहिन विज्ञानाज्ञ अशा सगळ्यांनाच उल्लूत काढायचे कौशल्य हॉलिवूडवाल्यांनी मस्त हस्तगत केले आहे.
------------
या सगळ्यांची मला सवय झालेली आहे. पण मानवजात नष्ट व्हायला आलेली असताना, दोन वेगवेगळे दृष्टिकोन असलेली पात्रे अंतरीक्षाच्या कोणत्या त्या कोपर्‍यात हिंसक होऊन भांडतात, हा दरदरवेळी पाहायला नको वाटणारा सीनही पाहावा लागला. डोके बाजूला ठेवायचे हॉलिवूडपट, आता जी काही गृहितके प्रेक्षकांना सांगीतली आहेत त्यांचा अन्वयार्थ लावण्यासाठी डोके आत ठेऊन आहात असा आव आणा, असे सांगत आहेत कि काय असे वाटले.

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

सध्या अग्निहोत्र सेरिअल बघत अहे यू ट्यूब वर. अतिशय सुंदर कॅरेक्टर्स रंगवली आहे. नाशिकचा वाडा आणि तिकडली रहस्य बघयाला अतिशय मजा येते. सेरिअलमधली मुक्ता बर्वे आणि शरद पोंक्षे मधले संवाद तर फारच मस्त आहेत.

सुलेमानी किडा - निव्वळ अफलातून पिक्चर . बम्बैया भाषेत सुलेमानी किडा म्हणजे स्वस्थ न बसता उचापत्या करणारा इसम . Bollywood writers हि जमात कायमच उपेक्षित , underpaid आणि अन्याय झालेली . (सलीम -जावेद चा अपवाद वगळता). त्यांचा पहिला ब्रेक मिळवण्याचा संघर्ष तर अजूनच भयानक असतो .पण या लेखकांच स्वतःच एक जग असत . हि जमात वर्सोव्यात राहते . तिथून त्याना पुढची झेप सरळ बांद्र्यात घ्यायची असते . नोकरदार माणसांकडे हे लेखक तुच्छतेने बघतात आणि ती लोक यांच्याकडे झू मध्ये ठेवलेल्या प्राण्यांकडे बघावे तसे कुतुहुलाने . ते लोकांकडून उधार मागून सिगारेट फुकतात . घरमालकाला भाड देताना यांची तारांबळ उडते . आराम नगर मधल्या बार मध्ये बसून स्वस्त दारू पिताना हे लोक १०० crore फिल्म बनवून bollywood पे छा जाने के ' बेत बनवत असतात . आज खिसा फाटका असला आणि बूट चावत असला तरी आने वाला कल आपलाच असेल असा आत्मविश्वास त्याना असतो . सुलेमानी किडा हा चित्रपट अशाच संघर्षरत दुलाल आणि मैनक या दोन लेखकांची कहाणी . दुलाल आणि मैनक हि जोडगोळी लेखक म्हणून ब्रेक मिळवण्यासाठी धडपडत असतात . मैनक हा उथळ , वाक्या वाक्यात शिव्या वापरणारा , आणि यशासाठी कुठलीही तोडजोड करण्यास ना नसणारा इसम . दुलाल हा तुलनेने मवाळ , संवेदनशील आणि अंत नसलेला struggle करण्यात आपल जीवन तर संपून जाणार नाही ना या भीतीच्या छायेत जगणारा लेखक . हि जोडगोळी 'chance of life ' साठी महेश भट पासून ते अमृता राव पर्यंत सगळ्यांचे उंबरठे झिजवतात . फावल्या वेळात पोरीना टापून 'action ' मिळवण्यासाठी पुस्तकांची दुकान आणि फडतूस कवितांचे मुशायरे पावन करत असतात . अशाच एका ठिकाणी दुलाल रुमा ला भेटतो . रुमा च्या सहवासात येउन तो आयुष्याबद्दल वेगळा विचार करू लागतो . त्याना पहिला ब्रेक मिळतो का ? सलीम -जावेद सारखे दुलाल -मैनक जोडी बनते का ? याची कहाणी म्हणजे सुलेमानी किडा . यातल्या दोघाही मुख्य कलाकारांनी या भूमिका भन्नाट केल्या आहेत . यातले काही सीन तर अफलातून भन्नाट आहेत . मैनक दुलाल ला घेऊन सलमान खान च्या घरासमोर जातो आणि विचारतो ,"बता ये किसका घर है ?"
"सलमान खान का ." दुलाल .
"और किसका घर है ."
"सलीम खान का ."
"देखा writer हमेशा actor का बाप होता है ."

महेश भट चा यांच्यासोबतचा सीन असलाच भारी . हा चित्रपट लेखकाना 'autobiographical ' संदर्भामुळे नक्की आवडेलच पण १० ते ५ मधल्या लोकाना एका वेगळ्या जगाची लेखकांच्या जगाची सैर घडवून आणेल . दिग्दर्शक अविनाश मसुरकर ला हि भन्नाट फिल्म बनवल्याबद्दल hats off . या विकांताला हा चित्रपट नक्की बघा . पुण्यात फ़क़्त ३ screen वर हा चित्रपट चालू आहे . थोडा त्रास होईल पण its worth .

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

Apocalypse Now हा चित्रपट पाहिला. फ्रान्सिस फोर्ड कोपोलाचा हा चित्रपट. यामध्ये सब कुछ तोच आहे. आताच झालेल्या हिंदुस्तान टाइम्स च्या समिट मध्ये बोलताना त्याने सगळ्यात अवघड असा चित्रपट होता असे सांगितले.
चित्रपट विएतनाम च्या युद्धावर आधारित आहे.एक अतिशय नावाजलेला अधिकारी जेव्हा आपल्याच हातात सर्व अधिकार घेतो आणि सरकारच्या युद्धप्रवण क्षेत्रातील धोरणाच्या विपरीत असे निर्णय घेतो.
त्याला शोधण्यासाठी एका अधिकाऱ्याची निवड केली जाते. सोबत काही साथीदार दिले जातात. तो त्या अधिकाऱ्याच्या शोधात निघतो. वाटेत त्याला आणि त्याच्या सहकाऱ्याला काय काय भोगायला लागते किंवा त्याला कोणते नवे अनुभव येतात, शेवटी तो अधिकारी भेटला तर कश्या अवस्थेत भेटतो या सर्व प्रश्नांची उत्तरे चित्रपटामध्येच पाहणे उत्तम.
या चित्रपटातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे त्यातील लोकेशन्स आणि त्यांना न्याय देणारे छायाचित्रण. एक वेगळाच अनुभव देऊन जाणारा हा चित्रपट आहे.

यातल चित्रपटाच्या सुरुवातीला आणि शेवटी वाजणारं गाणं रोचक आहे. भारी असं म्हणत नाही कारण दरवेळी ते ऐकताना मला एक प्रकारचं नॉशिएटिंग फीलिंग येतं. द डोअर्स या ग्रूपचं आहे ते गाणं. चित्रपट भारी आहेच. हे ते गाणं...

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

काहीतरी हलकं, पॉप पण परदेशी पाहावं म्हणून एक पिच्चर पाहिला. जुना नाही, हा आपला गेल्या सालचा. कथानक आपल्याकडे जसेच्या तसे कॉपी केले तरी उत्तम खपेल. नाहीतरी आपल्याइथे जुळी भावंडे लहानपणी हरवतात. किंवा त्या भावंडापैकी एखादा विक्षिप्त असतो-दुसरा हुशार समंजस, गंभीर वगैरे. शिवाय ती भावंडे एकाच बाप्यावर किंवा पोरीवर मरतही असतात. त्या धरतीवर ह्या पिच्चरची मुलभूत थीम आपल्याकडून तिकडे गेली असावी की काय अशी शंका येते. असेही होईल, उद्या एखादा मानववंश-शास्त्रज्ञ जुळ्या भावंडांच्या असल्या टिपीकल स्टोर्‍या व्यवस्थित मांडून 'ज' संस्कृतीने 'टं' च्यावर आक्रमण केले असे विदापूर्वक म्हणेल.
मी अ‍ॅक्टर आवडतो या एकाच निकषावर मनसोक्त पाहिला.
.

.
त्याचा डबलरोल म्हणजे मजाच होती. त्याने ती अगदी वाखाणण्याजोगी निभावली आहेत. त्यापैकी एक किरदार आहे भूमिगतसा राहणारा विक्षिप्त फिलॉसॉफर, आणि त्याचा जुळा भाऊ, म्हणजे दुसरे किरदार, हा देशाचा विरोधी पक्षनेता. हा अतिशय गंभीर प्रवृत्तीचा, चेहऱ्यावरची रेषा न हलू देणारा पक्का राजकारणी. राष्ट्रीय निवडणुका आलेल्या आहेत आणि अशा धामधुमीच्या मोसमात या पक्षनेत्याचा करिष्मा संपुष्टात येत आहे. पक्षांतर्गतसुद्धा. तेव्हा हा पक्षाला वार्‍यावर सोडून एके दिवशी अचानक गायब होतो. त्यापूर्वी तो आपल्या नुकत्याच मानसोपचारातून बाहेर आलेल्या आणि अजिबात प्रकाशात नसणाऱ्या फिलॉसोफर भावाला भेटतो. ही भेट पक्षनेत्याच्या एका विश्वासू सहकाऱ्यालाच माहिती असते. मग हे अचानक गायब होणं लपवलं जातं, आणि तो सहकारी फिलॉसॉफर भावाला खऱ्याखुऱ्या पक्षनेत्याची रिअल-टाईम भूमिका वठवायला सांगतो. फिलॉसॉफर यात वाक्-बगारच असतो. तो ते बिनधास्त अंगावर घेतो.
हळु हळू या गमत्या, मनस्वीपणे आयुष्य जगणाऱ्या, हसऱ्या, विक्षिप्त भावामुळे, पक्षाच्या सभांत, पक्षात आणि सरकारात पर्यायाने सबंध देशात चैतन्य येते. राजकारणच मरगळ झाडते. दरम्यान मूळचे पक्षनेते आपल्या जुन्या प्रेयसीला भेटायला जातात आणि काटेकोर, घडीदार, गंभीरसे, धकाधकीचे-सदा गुंतलेले आयुष्य जगण्यातले वैयर्थ त्याच्या ध्यानी येऊ लागतात. ही जुनी प्रेयसी दुसऱ्या देशात असते.

याला अर्थात त्या दोन भावंडांच्या पूर्वायुष्याची आणि त्या मैत्रिणीची 'काहीतरी' संगत असते हे ध्यानी आलंच असेल. पण ते काही फारफेच्ड् नाहीय. त्यामुळे, कथा, शेवट सहनीय आहे. अॅक्टींग सराहनीय.
पिच्चरची स्टोरी जराशी घिसीपिटी असली तरी मांडणी बरी आहे. संयत. मजा आली.

नाव काय प्लीज. सॉलीड मस्त सिनेमा वाटतो आहे.

माझा ऑल टाईम फेव्हरिट सिनेमा -हंगामा . आतापर्यन्त १००+ वेळा पाहुन झालाय . कधी कंटाळा आलाय असे वाटले की @हंगामा" बघतो परेश रावल ,एकदम लय भारी - Hungama 2003 - *HQ* *GQ* - DD1 Release

http://www.youtube.com/watch?v=heA6BmHEMA0

परवा असेच सर्च करताना ही १९८० च्या दशकातील डॉक्युमेंटरी सापडली... भारतातील मॉन्सून चा प्रवास आणि संबंधित घटनांचा मागोवा घेतलाय एका ब्रिटिश पत्रकाराने --- ...World of Discovery - Chasing India's Monsoon मस्त ...एकदम नॉस्टॅल्जिक होवुन प्रेमात पडावे असे काही बघायला मिळाले ...

http://www.youtube.com/watch?v=yvvuarY6LbQ

Mandar Katre

ज्यांना नृत्याच्या शास्त्रात रस अथवा गती नाही, त्यांनीही जरूर पहावे असे म्हणेन.
http://www.ted.com/talks/aakash_odedra_a_dance_in_a_hurricane_of_paper_w...

बिबेक देबरॉय यांचे Flaws in laws वरचे एक भाषण ऐकले. आपल्याकडे इंग्रजांच्या काळातील कायदे, स्वातंत्र्यानंतर झालेले कायदे, कुठलाही अपघात झाला कि त्याला प्रतिक्रिया म्हणून झालेले कायदे यामुळे बऱ्याच वेळी कायद्यांमध्ये सुसूत्रता दिसत नाही. त्याच्या काही कारणांचा उहापोह देबरॉय या व्याख्यानामध्ये करताना दिसतात. तसेच या सर्व व्यवस्थेमुळे आपल्यावरती कोणते परिणाम होतात याचे ओझरते विश्लेषण ते करतात. या व्याख्यानाची सुरुवात ते काही गोष्टी सांगून करतात ज्यामुळे सर्व गोंधळाची कल्पना आपल्याला येऊ शकते. त्यानंतरच्या प्रश्नोत्तरामध्येही वेगवेगळ्या विषयाचा ते आढावा घेतात.
याच्याशी संबंधित अरविंद दातार यांचे Toxic taxes and lethal laws या विषयावरचे भाषण काही दिवसांपूर्वी ऐकले होते. या व्याख्यानात मुख्यतः अर्थव्यवस्थेशी निगडीत कायदे आणि त्यांचा मागोवा घेतला गेला आहे.

बिबेक देबरॉय -- Flaws in laws
अरविंद दातार -- Toxic taxes and lethal laws

बिबेक देबरॉय हा एक भन्नाट माणूस आहे.

काल शहराच्या मध्यवर्ती भागात उगाच फिरत असताना एक निषेधमोर्चा पाहिला. कृष्णवर्णीय संशयितांशी (गौरवर्णीय) पोलिस बळाचा अतिवापर करतात, त्यात कृष्णवर्णीयांचा जीवही जातो याविरोधात गेले काही महिने अमेरिकेतलं वातावरण तापलेलं आहे. कालच्या ऑस्टीनमधल्या मोर्च्यात ते लॅरी जॅक्सन ज्यु या ऑस्टीनच्या (माजी) रहिवाशाच्या 'खुना'विरोधात एकत्र आले होते.

या मोर्चासाठी रस्ता मोकळा करायचं कामही (गौरवर्णीय) पोलिस करत होते. मोर्चात फारतर शंभर लोक असतील, बहुतेकसे गोरे, मध्यमवर्गीय दिसत होते. मोर्चा टेक्ससच्या विधानभवनातून निघाला. तिथे सध्या ख्रिसमस-ट्री ठेवलेलं आहे. तिथे मोर्चाची सुरूवात झाली. मोर्चा काही वेळानंतर शहराच्या इतर भागांमध्ये गेला. मी विधानभवनाच्या परिसरातच होते. तिथे काही (पुन्हा गौरवर्णीय) पोलिस होते, त्यांच्याकडे पोलिसी कुत्रेही होते. त्यांनी त्या ख्रिसमसट्रीखाली ठेवलेल्या भेटवस्तूंच्या खोक्यांचाही वास घेतला. त्या खोक्यांच्या वर हे लिहिलेलं होतं - Because of police violence these gifts will never be opened.

इतर फोटो इथे दिसतील.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पीके हा चित्रपट परवा पाहिला. (थोडेसे spoilers आहेत.)

मुळातच या चित्रपटाकडून माझ्या काही खास अश्या अपेक्षा नसल्याकारणाने खूप जास्ती निराशा होणार नव्हती. तरीही थोडीबहुत निराशा झालीच.
मध्यंतरापर्यंतचा चित्रपट उत्तम नसला तरी बरा नक्कीच आहे. पीके उभा करण्यामध्ये यातील बराच वेळ जातो. छोट्या छोट्या गोष्टी आवडत जातात. पण एकंदरीत परिणाम कमीच होतो. मध्यंतरानंतर चित्रपट कोणत्या दिशेला चालला आहे याची जाणीव होतेच. पण त्यातही एवढे नाट्य करायची गरज होती का हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. Oh! My God आपण परत पाहत तरी नाही ना असा काहीसा फील येत राहतो. चित्रपटाचा climax इतका नाट्यपूर्ण आणि अतिरंजित असेल असे त्या क्षणाला येईपर्यंत सुद्धा वाटत नाही. नंतर कधी एकदा चित्रपट संपतो असे होत राहते.
एकंदरीतच संकलन करताना कमी पडले आहेत असे वाटले. अभिनयाचे बोलायचे झाले तर आमिर खान ने चांगला अभिनय केला आहे. चित्रपटातील गाणी चांगली असली तरी अश्याच चाली आपण राजकुमार हिरानी यांच्या इतर चित्रपटामध्ये ऐकल्या आहेत. झुबी झुबी आणि लव इस भेस्ट ऑफ टाईम याच्या मुखड्या मध्ये खूपच सारखेपणा जाणवतो.

मला अजूनही कळत नाही कि एखाद्या live show मध्ये लोक अगदी बेल्जिअम पासून ते पाकीस्तान पर्यंत एकमेकांना फोन कसे काय करू शकतात? हे सर्व टीवी वरती सुरु असताना सगळ्या शहरांमधून लोक टीवीच्या दुकानाबाहेर हा कार्यक्रम पाहत उभे आहेत. हे तरी का सगळ्या चित्रपटातून दाखवतात? टीवी हे एकच माध्यम आहे का जे चित्रपटामधून दाखवले जाऊ शकते?
आम्ही काही तरी 'वेगळे' करत आहोत असे म्हणणारे दिग्दर्शक शेवटी 'तेच तेच' तर करत नाहीत ना असा एक प्रश्न पडला आहे की वेगळेपणा एक नवा cliche झालाय?

अगदी अगदी. अनुष्काचे दिसणे वगळता खास वेगळे आणि छान असे फारसे काही चित्रपटात आढळले नाही.
तेच दळण अगदी तस्सेच दळले आहे (मात्र आव सगळेच वेगळे असल्याचा आहे).

किंबहुना एकुणात जी कंसेप्ट (आणि बोमन इराणीसारखा नटसुद्धा) ती पूर्णपणे वाया घालवली आहे असे माझे मत आहे

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

"अतिरेकी भाबडेपणा" असा काहीसा पैलू राजकुमार हिरानीच्या आधीच्या चित्रपटांतून जाणवला होता. उदा. मुन्नाभाईमधील त्याने सोडवलेल्या समस्या आणि (अति)आनंदाने वेडावून जाणारं पब्लिक.
किंवा एखादी गोष्ट लोकांना किती आवडलीये ते दाखवायला पोलिस, हेअर कटिंग सलून किंवा रस्त्यावरचे लोक ह्यांची जमलेली गर्दी वगैरे.
पुन्हा पुन्हा हे अस्संच बघितल्यावर वीट येणं सहाजिक आहे पण-
मला राजकुमार हिरानीचा हा भाबडेपणा अजून एका बाबतीत प्रचंड आवडतो- तो भावनासुद्धा अस्सल आणि भाबड्या दाखवतो- बरेचदा इतक्या की आपल्या सिनिक मनाला वाटून जातं "असं कधी खर्या जगात होतं काय?"
आणि त्याच वेळी मनात आपल्याला जाणवत असतं की असं काही होणं अशक्य नाहीये, असं खरं तर व्हायला हवं.
दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या चित्रपटांत जाणवणारा hope. त्याचं सामाजिक परिस्थितीवरचं भाष्य कधीच निराशाजनक नसतं. खूपच भाबडेपणाने तो त्यावरचे उपाय दाखवतो- अगदी आधुनिक परिकथा वाटतील एवढे: पण मला त्याचा उद्देश प्रामाणिक वाटतो. बर्याच लोकांपर्यंत एखादा रंजक सिनेमा पोचवायचा असेल तर संयतपणाला थोडी काट देणं ग्राह्य समजलं जावं.

ह्या चित्रपटातील कमीविषयी पूर्ण सहमत.
/spoilers
शेवटला क्लायमॅक्स तर बेक्क्क्कार वाईट आहे. अरे जिथे तो बाबा फेसबुक आणि ट्विटरवर आहे तिथे तुम्हाला किमान फोन नंबर्/ईमेल/फेसबुक असं कुठेच भेटता येऊ नये? हद्द कर दी.
आमिरही त्याच्या येवढे मोठ्ठे डोळे, कान, तोंडामध्ये नेहेमीच पान वगैरे कृतीमुळे थोडा ओवर एक्सायटेड वाटला, पण ३ इडियट्सएवढा डोक्यात नाही गेला.

spoilers/
पण बर्याच दिवसांनी हसलो खूप. आणि मोकळेपणाने Smile

"पीके" थिएटर मध्ये पाहिला. बरा वाटला . एकदा पाहण्याच्या लायकीचा आहे.
3 Idiots सारखा "माइल्स्टोन" वगैरे नाही. एलियन ची स्टोरी अधिक चांगल्या प्रकारे खुलवता आली असती. त्याऐवजी उगाचच देवा-धर्मावर घसरला आहे हिरानी!
एडिटिंग चा गोन्धळ आहेच! पण आमिर आणि इतरांची कामे चांगली झाली आहेत

Mandar Katre

नुकताच थेटरात जाऊन (अगदी सहकुटुंब, सहपरिवार) पाहून आलो. भयंकर आवडला. 'पैसा वसूल' एवढेच मत व्यक्त करू इच्छितो.

(बाकी ज्याचेत्याचे मत, नि पिच्चर न बघताच फेसबुकी प्रचारावर जाऊन किंवा मुख्य पात्राचे काम करणार्‍या पात्राचे नाव 'खान' आहे म्हणून किंवा पिच्चरमध्ये संजय दत्त आहे म्हणून किंवा नायिकेचा बॉयफ्रेंड पाकिस्तानी दाखवलाय म्हणून वाटेल ते मत करून घेऊन पिच्चर न पाहणारांस साष्टांग --/\--, अशांनी पिच्चर न पाहिलेलाच बरा, तेवढीच पालथ्या घड्यावरील पाण्याची बचत, इ.इ.)

(सवांतर: 'लर्न भोजपुरी इन सिक्स अवर्स'वाला फंडा मस्त आहे. ;))
=====================================================================================

मला अजूनही कळत नाही कि एखाद्या live show मध्ये लोक अगदी बेल्जिअम पासून ते पाकीस्तान पर्यंत एकमेकांना फोन कसे काय करू शकतात?

का बुवा? तत्त्वतः हे बॉर्डरलाइन शक्य असावे.

भारत, पाकिस्तान आणि बेल्जियम यांच्यात आजघडीस दूरध्वनी संपर्क सहज शक्य आहे.

लाइव शो अगदी प्राइमटाइममधला बोले तो दिल्लीत रात्री साडेनऊला मानला, तरी बेल्जियममध्ये संध्याकाळचे पाच आणि पाकिस्तानात रात्रीचे नऊ. बोले तो बेल्जियममधल्या त्या युनिव्हर्सिटीचे ऑफिस काय किंवा पाकिस्तानी एम्बसी काय, नुकतीच बंद होऊ घातली असणार. (साडेनवाच्या आधीचा लाइव शो असल्यास चांगली सताड उघडी असणार.) टाइमझोनमधील फरक जरी लक्षात घेतला, तरी अगदीच अशक्य नसावे. (बाकी, लाहोरमधला तिचा बॉयफ्रेंड, घरीच असणार त्या वेळी. त्याला काय वेळेचा फरक पडतो?)

(पण त्यापेक्षासुद्धा, पिच्चर आहे, चालवून घ्या ना राव!)

===========================================================
मग्रूर, मुजोर आणि आढ्यताखोर भुंकणारा ब्राह्मण पुरुष
(ऐतिहासिक काळात किंवा फेस‌बुकाव‌र न वाव‌र‌लेला, प‌ण उप‌क्र‌माव‌र थोडाफार‌ बाग‌ड‌लेला)

पीके पाहून एक प्रश्न पडला की भोजपुरीत कपड्यांना कपडा म्हणतात की फैसन?

Hope is NOT a plan!

कदाचित ती प्रमाण भोजपुरी नसून, ज्या 'सोर्स'वरून डौनलोड केलीय त्या सोर्सच्या वैयक्तिक भोक्याबुलरीचा भाग असू शकेल. (चूभूद्याघ्या.)

जौद्याहो, शंकाच भारी तुम्हाला! बोलूनचालून हा पिच्चर आहे; तेवढे सोडून द्या ना!

(उद्या 'राजस्थानातली रांड भोजपुरी काहून बोलून राहिलीये?' म्हणून विचाराल! अहो, आजकालच्या ग्लोबल भिलेजमध्ये कोल्हापुरातली मंडळी क्वालालंपुरात जिथे पडीक सापडतात नि सोलापुरातली सिनसिनाटीत, झालेच तर औरंगाबादेतली ऑकलंडात नि चंद्रपुरातली चेचन्यात, तिथे आमची ईष्टर्न यूपी/झारखंड/बिहारातली गरीब बिचारी रांड पोटापाण्यासाठी राजस्थानात जर सापडली, तर तिनेच बापडीने काय घोडे मारलेय? चालवून घ्यानाबे! बी (अ) लिबरल, म्यान!)

(बाकी, दूरच्या कुठल्यातरी परग्रहावरचा (नागडा) एलियन राजस्थानात कडमडलेला जिथे चालतो, तिथे बिहारातली (कंस लागू आहे की नाही ते तुम्हीच ठरवा!) रांड खपवून न घेणारे तुम्ही कोण टिक्कोजीराव, आं? इतका बिहारीद्वेष चांगला नव्हे बरे!)

(बाकी, खुसपटेच काढायची झाली, तर मध्यंतरीच्या काळात त्याची स्पेसशिप नक्की कुठे घुटमळत असते, अगदी रिमोट हरवला नाही, तरी प्रकाशाच्या वेगानेसुद्धा त्याचा संदेश तिथवर पोचून त्याला पिकप करायला ती स्पेसशिप येणार कधी, झालेच तर त्याचा 'गोला' पृथ्वीपासून किती प्रकाशवर्षे दूर असावा, बोले तो पिच्चरच्या शेवटी पुढच्या 'मिशन'वर तो आणखी एका एलियनला घेऊन परत येतो ते किती शतकांनंतर, (एलियनचा लाइफस्प्यान कितीही मानला तरी आणि तोवर तो जिवंत आहे असे मानले तरी) मध्यंतरीच्या काळात पृथ्वीवर किती सामाजिक/सांस्कृतिक बदल झालेले असणार, नि मग हा एक्स्पर्ट गाइड म्हणून येतोय तर त्याच्या औटडेटेड एक्सपर्टीज़चा उपयोग काय नि किती, वगैरे नाना प्रश्न उपस्थित करता येतील. पण मग या रेटने तुम्ही पिच्चर पाहणे तर सोडाच, साधी काऊचिऊची ष्टोरीसुद्धा नाही वाचू शकणार. तेव्हा सोडा ना राव! नसता भेस्ट ऑफ टाइम!)

..................

हा आमचा भोजपुरीचा माफक प्रयत्न.

===========================================================
मग्रूर, मुजोर आणि आढ्यताखोर भुंकणारा ब्राह्मण पुरुष
(ऐतिहासिक काळात किंवा फेस‌बुकाव‌र न वाव‌र‌लेला, प‌ण उप‌क्र‌माव‌र थोडाफार‌ बाग‌ड‌लेला)

भोक्याबुलरी हे वंगीय वाटते.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

आप कहत रहे तो छोड देवत है. लोकप्रिय सनिमाचे "छिद्रान्वेषण" करणे ऐसी फैसन आहे म्हणून आपला टाकला प्रतिसाद.

Hope is NOT a plan!

Boyhood हा रिचर्ड लिंकलेटर दिग्दर्शित चित्रपट पहिला. लिंकलेटर हे बिफोर सनराइझ, बिफोर सनसेट, बिफोर मिडनाईट या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे. त्याची दिग्दर्शनाची वेगळी शैली वर सांगितलेल्या चित्रपटातून दिसते. पूर्ण चित्रपटात २ च कलाकार आणि त्यांच्या संवाद-विसंवाद..
Boyhood हा चित्रपट एका कुटुंबावर बेतलेला आहे. त्या कुटुंबात आई ऑलीविया , मुलगा मेसन आणि मुलगी सॅमंथा असे तिघेजण आहेत. आई वडिलांमध्ये घटस्फोट झाला आहे आणि आईने मुलांची जबाबदारी घेतली आहे. वडील दर आठवड्याला येउन त्यांना भेट देतात. या पार्श्वभूमीवर चित्रपट सुरु होतो.
६ वर्षाचा छोटा मेसन ते १८ वर्षाच्या मेसन पर्यंतचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. या सर्व काळामध्ये त्याचे आई-वडील, बहिण, मित्र-मैत्रिणी यांच्याबरोबरचे संबंध खूपच चांगल्या पद्धतीने हाताळले आहेत. विशेषत: वडील आणि मुलामधील संवाद हे तर उत्तमच. चित्रपटाची एकसंध अशी कथा सांगता येणार नाही त्यामुळे हा चित्रपट पाहिलेलाच उत्तम.
Boyhood हा चित्रपटही लिंकलेटर यांनी एका वेगळ्याच शैलीत बनवण्यात आला आहे. २००२ ते २०१३ असे १२ वर्षे या चित्रपटाचे शूटिंग सुरु होते. प्रत्येक वर्षी सिनेमाचा संच मिळून काही आठवडे काम असे. या चित्रपटातील कलाकार या १२ वर्षामध्ये अजिबात बदलले नाहीत. त्यामुळे ६ वर्षाचा मेसन आणि १८ वर्षाचा मेसन या एकाच व्यक्ती आहेत.
२०१४ मध्ये जेवढे चित्रपट पाहण्यात आले त्यामधील एक उत्कृष्ट चित्रपट असे म्हणायला काहीच हरकत नसावी.

काल मुलांनी Into the Woods पाहिला आणि मी बायकोबरोबर Wild पाहिला. दोन्ही सिनेमे एकदम बकवास. मुलांना Into the Woods हा डिस्नीचा चित्रपट फर्स्ट डे म्हणून बघायचाच होता (थेटरात इतकी गर्दी असून पण). दोघांनी सिनेमा Awful आहे, असे एकमतानी सांगितले कारण दर ५ मिनिटांनी १०-१० मिनिटांची लांबलचक-कंटाळवाणी गाणी आहेत. Number of songs च्या बाबतीत this one is worse than hindi movies, असे मत ऐकून मग मी गप्पच बसलो आणि सिनेमाची स्टोरी काय आहे, ते पण विचारले नाही.
Wild चा ९३% फेवरेबल रिव्हू बघून अपेक्षेने गेलो होतो, पण निराशा झाली. आईचा मृत्यू आणि स्वतःचा घटस्फोट झाल्यावर शेरिल Pacific Crest Trail वर अनुभव नसताना हायकिंग करायला जाते, त्यातून तिला काय अनुभव येतात आणि स्वतःची ओळख पटते, अशी साधारण कथा असलेला हा चित्रपट बकवास आहे. इतकेच न्हवे तर अननुभवी हायकर्सना यातून अतिशय चुकीचे मार्गदर्शन होत आहे, असे वाटले.
एकंदरीत, हे दोन्ही चित्रपट फुकटात बघायला मिळाले तरी मी रेकमेंड करणार नाही.

बरेच महिने वाट पाहिल्या नंतर अनुराग कश्यपचा अग्ली पाहिला. इट वाज वर्थ दी वेट.
एका लहान मुलीचे अपहरण झाल्यावर तिच्या आजूबाजूच्या लोकांचे बाहेर येणारे ईगो आणि स्वार्थ यांची गोष्ट... अनेक वेगळी वेगळी वळणं घेणारा चित्रपट तुम्हाला विचार करायची खूप संधी देतो. दर वेळी तुम्ही एक विचार करत असता गोष्ट वेगळच वळण घेते. राहूल भट आणि गिरिश कुलकर्णीने झकास कामं केली आहेत. नेहेमी कश्यप एखाद्या शहराच्या अंडरबेलीचं दर्शन घडऊन आणतो ते यात कमी आहे. पण डार्क म्हणतात त्या रसाचा सिनेमा. नॉट फॉर द वीक हार्टेड!

चित्रपटाचं सार माझ्या एका मित्रानी कबिराच्या या दोह्यात सांगितलं.
बुरा जो देखण मै चला, बुरा ना मिला कोय,
जो मन खोजा अपणा, मुझसे बुरा ना कोय.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

अमेरिकन ह्युमर हा एक भन्नाट प्रकार आहे . मुख्य म्हणजे ते त्यात कुणाचीच पत्रास ठेवत नाहीत . the Simpsons हि माझी आवडती मालिका आहे . स्टार World या वाहिनीवर सोमवार ते शुक्रवार रोज रात्री आठ वाजता असतॆ . त्यात ते जिझस , कथोलिक चर्च आणि एकूण धर्माची जी रेवडी उडवतात ती बघून आपल्याकडच्या धर्मप्रेमी लोकाना फेफरे येऊ शकतात . म्हणूनच ते आपल्या चित्रपटातून जॉर्ज बुश शी ची हत्या झाल्याच दाखवू शकतात (पाहा डेथ ऑफ प्रेसिडेण्ट चित्रपट ) मग The Interview या चित्रपटात मारला जातो असे दाखवला गेलेला किम किस चिडीया का नाम है . हॉट शोटस या चित्रपटातून त्यांनी सद्दाम हुसेन ची अशीच खिल्ली उडवली होती . अतिरेकी धर्मांध लोक तिथे पण आहेत पण जनमानस प्रगल्भ असल्याने त्याना एका सीमेबाहेर आपला चड्फ़डाट व्यक्त करता येत नाही . दा विन्सी कोड चित्रपटात तर त्यांच्या धर्मावर मुलभूत प्रश्न उपस्थित केले होते आणि तिथल्या अतिरेकी धर्मान्धानी त्यावर बंदी आणण्यासाठी खूप प्रयत्न पण केले पण सर्वसामान्य वाचकाने ते पुस्तक पण भरपूर विकत घेतले आणि त्यावर बनलेला चित्रपट पण खूप चालला . मला स्वतःला या बाबतीत अमेरिकेच्या तुलनेत आर्थिक दृष्ट्या खूप मागे असलेल्या , जाती धर्मात विभागलेल्या भारतीय समाजमनाचे अमेरिकन समाजमना शी धक्कादायक साधर्म्य आढळते . म्हणजे धर्माचे ठेके घेतलेल्या लोकांनी कितीही आरडा ओरडा केला तरी पीके तिकीट खिडकीवर खच्चून चालतो , लज्जा या पुस्तकाच्या शेकडोंनी प्रती खपतात आणि वारकरी संप्रदायाने आक्षेप घेऊन पण एलिझाबेथ एकादशी चित्रपट houseful गर्दी खेचतो . बाकी अभिव्यक्ती स्वातंत्र्य हि दुधारी तलवार आहे . एकूणच पीके च्या समर्थनात उतरलेली मंडळी 'मी नथुराम बोलतोय' नाटकाचा विषय निघताच काखा वर करू लागतात . असे का ? let people choose . लोक ठरवतील ना काय पाहायचं आणि काय नाही ते . आणि आता पर्यंत चा अनुभव असा आहे कि भारतीय जनता अतिरेकी वादाला स्वीकारत नाही . अतिरेकी पणा त्याना पचत नाही . बाकी पीके वरच्या अनाठायी आरोपांना हिंदू लोकांनीच या वर्षातला सगळ्यात मोठा हिट चित्रपट बनवून उत्तर दिले आहे .

अवांतर - एक कलाकृती म्हणून पीके मला मुळीच आवडला नाही . त्यापेक्षा याच विषयावरचा Oh My God कितीतरी सरस होता .

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

एकूणच पीके च्या समर्थनात उतरलेली मंडळी 'मी नथुराम बोलतोय' नाटकाचा विषय निघताच काखा वर करू लागतात . असे का ?

अशा कोणी प्रसिद्ध व्यक्ती भेटल्या/माहिती आहेत काय?
सर्वसामान्यांपैकी मीही असे काही नग बघितले आहेत, पण ते अपवादापुरते.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सॉरी, राँग नंबर.

===========================================================
मग्रूर, मुजोर आणि आढ्यताखोर भुंकणारा ब्राह्मण पुरुष
(ऐतिहासिक काळात किंवा फेस‌बुकाव‌र न वाव‌र‌लेला, प‌ण उप‌क्र‌माव‌र थोडाफार‌ बाग‌ड‌लेला)

एकूणच पीके च्या समर्थनात उतरलेली मंडळी 'मी नथुराम बोलतोय' नाटकाचा विषय निघताच काखा वर करू लागतात .

का बुवा? 'मी नथुराम गोडसे बोलतोय'सुद्धा पाहिलेय. (किमानपक्षी हिंदी आवृत्ती तरी.) सादरीकरण तसे बरे वाटले. आणि नथुरामबद्दल बाकी काहीही मते असली, तरी नाटकात बंदी घालण्यालायक काही वाटल्याचे आठवत नाही.

असो.

===========================================================
मग्रूर, मुजोर आणि आढ्यताखोर भुंकणारा ब्राह्मण पुरुष
(ऐतिहासिक काळात किंवा फेस‌बुकाव‌र न वाव‌र‌लेला, प‌ण उप‌क्र‌माव‌र थोडाफार‌ बाग‌ड‌लेला)

"Everybody says I am fine" नेट्फ्लिक्सवरती स्ट्रीमींग करुन पाहीला.
आवडला - ७/१०

ओहो! माझ्या अत्यंत आवडत्या चित्रपटांपैकी एक. रिलीज झाला तेव्हाच पाहिला होता. परत बघीतल्यावर तेवढाच आवडेल का विचार करतेय Fool

===
Amazing Amy (◣_◢)

मी काही आठवड्यांपूर्वीच हा परत पाहिला. मला या वेळेस जास्तच आवडला. कदाचित इंग्लिश आता व्यवस्थित समजल्यामुळे असेल, कदाचित माझं आकलन वाढल्यामुळे.

ज्यांनी चित्रपट बघितलेला नाही त्यांच्यासाठी, कथासूत्र असं - झेन - अलेक्झांडर नावाचा उच्चवर्गीय न्हावी मुंबईच्या उच्चभ्रू भागात दुकान चालवत असतो. त्याने लोकांचे केस कापण्यासाठी हातात घेतले की त्याला लोकांचे विचार ऐकू येतात. साधारण सांताक्लॉज म्हणता येईल अशी वर्तणूक असणारा झेन मनातून कुढत असतो. त्याच्या कुढण्याबद्दल हा चित्रपट.

चित्रपट मर्यादित प्रमाणातच आवडण्याचं कारण, झेनचा बनवलेला सांताक्लॉज. लोकांचे विचार (चोरून) ऐकून त्यांना मदत करणाऱ्या झेनवर बहुतेकशा लोकांचा काहीच परिणाम होत नाही का, या लोकांकडून तो काहीच शिकत नाही का, असे प्रश्न पडतात. असा फरक पडण्यासाठी दोन लोकांमध्ये काय नातं असावं, हेच्च नातं का, असे प्रश्न पडावेत इतपत हा चित्रपट चांगला वाटला.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ह्म्म!! अन्य लोकांच्या मनातील विचार ऐकू येणे हे झेनचे "असिधारा चक्र" अर्थात नकोसे प्राक्तन दाखविले आहे. तो शेवटी त्यातून जेव्हा मुक्त होतो त्याला किती आनंद होतो. Smile

असणारी शक्ती नकोशी असणं, सामान्य माणसांचं आयुष्य हवंहवंसं वाटणं हे समजतं. ज्या लोकांकडे हे सामान्यपण आहे त्यांना तो काहीही अपेक्षा न ठेवता मदत करत राहतो म्हणून त्याची मुक्तता व्हावी हे आपल्याला - दर्शकालाही वाटतं, हे ही समजण्यासारखं. त्याची मुक्तता जिच्यामुळे होते ती त्याच्यासारखीच अडकलेली, तरीही अगदी उलट पद्धतीने, ते दोघं एकमेकांना सोडवतात, हे पण आवडलं.

अभिनेत्यांची कामं, नेपथ्य, पार्श्वसंगीत पार्श्वभूमीपुरतंच मर्यादित असणं हे ही आवडलं.

म्हणून छोटी खुस्पटं काढावीशी वाटली.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

इन फॅक्ट मला इन्टिमेट सीन्स अतिशय आवडले. दे वेअर इन्टेन्स.... नॉट अ‍ॅट ऑल लाइट. मस्त आहेत.
आधी आवडले अन मग तिचा इश्यू कळला. मेड सेन्स लेटर.
दिग्दर्शन छान आहे खरच.

कालचे डिस्कवरीवरचे माणसाने स्वत:ला अॅनकोंडा अजगराकडून खाववून घेणे.चिलखताला सुद्धा अजगर आवळून तोडू पाहतो तेव्हा सोडवतात.

अचरटपणा आहे तो नुसता.

Hope is NOT a plan!

१९७७ साली बाहेर आलेला अनन्तमूर्तींच्या कथेवर आधारित आणि गिरीश कर्नाड दिग्दर्शित 'घटश्राद्ध' ह्या कन्नड सिनेमाचा बराच बोलबाला झाला होता. त्यावर्षीचे 'सुवर्णकमल' त्यालाच मिळाले होते. यूट्यूबवर तो उपलब्ध आहे पण पूर्ण कन्नड भाषेत असल्याने आम्हाला उपयोग नाही. त्याच कथेवर आधारलेला 'दीक्षा' हा हिंदीमध्ये असून तो यूट्यूबवर येथे आहे. त्यालाहि १९९१ सालचे सर्वोत्तम हिंदी चित्रपटाचे पारितोषिक मिळाले होते. स्वातन्त्रपूर्व काळामध्ये कर्नाटकाच्या पश्चिम भागातील एका ब्राह्मण समाजाच्या अग्रहार गावामध्ये गुरुकुल चालविणार्‍या आचार्याच्या घरामध्ये त्याच्या विधवा मुलीला दिवस गेल्यामुळे निर्माण झालेला संघर्ष चित्रपटात दाखविला आहे. मनोहर सिंग (आचार्य), विजय कश्यप (आचार्याचा प्रतिस्पर्धी) आणि नाना पाटेकर (जातीने शूद्र पण केवळ ऐकून ऐकून बरीच समज आलेला)ह्या तिघांच्याहि भूमिका उत्तम आहेत.

त्याच काळातील 'दिशा' येथे पाहता येईल. सई परांजपे दिग्दर्शित आणि नाना पाटेकर, निळू फुले, शबाना आझमी, रघुवीर यादव, ओम पुरी असे नव्या जमान्यातले कसलेले नट घेऊन केलेला हा सिनेमा महाराष्ट्राचा ग्रामीण भाग विरुद्ध मुंबईचे आकर्षण हा संघर्ष दाखवतो. ह्यालाहि काही पारितोषिके मिळाली होती.

सध्या पीबीएसवर रविवारपासून 'डाउनटन अ‍ॅबी'चा ५वा सीझन सुरू झाला आहे. अतिशय addictive अशी ही सीरियल आहे. आता १३ आठवडे दर रविवारी चालेल असे वाटते.

काल बुधवारपासून कॅनडामध्ये CBC वर Book of Negroes नावाची नवी सीरिअल सुरू झाली आहे.

दीक्षा चित्रपट नक्की पहाणार.

बिली जोएल या आवडत्या गायकाला यूएस कॉँग्रेसचा पुरस्कार मिळाला. त्या सोहळ्याचे प्रक्षेपण मागच्या आठवड्यात पीबीएसवर झाले होते. त्या निमित्ताने बिली जोएलची गाणी दीडतास ऐकता आली. तेवढा वेळ मजेत गेला. (पियानो मॅन या अतिशय आवडत्या गाण्यावर केविन स्पेसीने मस्त माऊथ ऑर्गन वाजवला!)

बिली जोएल ने गायलेले "रिव्हर ऑफ ड्रीम्स" माझे आवडते गाणे आहे.

मला बहुतेक सगळीच आवडतात. आधी अपटाऊन गर्ल खूप आवडायचे. वयोमानाने आता जरा संथ लयीतली बरी वाटतात. Wink

ऐकते. मी ऐकली नाहीत. आज अप्टाऊन गर्ल अन पिआनो मॅन ऐकेन Smile
____
पिआनो मॅन आवडलं Smile

नेटफ्लिक्सवर मर्डर मिस्ट्री प्रकार शोधताना द किलिंग नावाची एक मालिका सापडली. शहराच्या महापौर निवडणुकीच्या धामधुमीच्या दरम्यान एका उमेदवाराची गाडी व गाडीच्या ट्रंकमध्ये एका तरुण मुलीचे प्रेत एका तळ्यात सापडते. शहरातून बदली होऊ घातलेली एक मनस्वी डिटेक्टिव व तिची रिप्लेसमेंट म्हणून आलेला व सुरुवातीला उडाणटप्पूछाप वाटणारा दुसरा डिटेक्टिव ही केस हातात घेतात व त्याचा छडा लावण्याचे प्रयत्न करतात.

तब्बल १३(+) भाग चालणारी ही शोधाची कथा खूपच आवडली. अद्याप पहिला सीझन संपायचाय पण मूळ खुनाच्या बरोबरीनेच इमिग्रेशन, वंशवाद, नेटिव-इंडियन प्रश्न, घरातील तरुण मुलीच्या मृत्यूमुळे बदलू लागलेले नवराबायकोचे संबंध, निवडणुकीच्या समीकरणांमध्ये होणारे बदल, ही केस हाताळणाऱ्या स्वतः डिटेक्टिवच्या आयुष्यात उडालेली खळबळ हे विषयही अतिशय मार्मिक पद्धतीने समोर येतात.

इतर रहस्यमय मालिकांच्या तुलनेत ही मालिका खूपच दर्जेदार वाटली. (हल्ली प्रचलित असलेला सेक्स व तत्सम मसालेदार बटबटीतपणा टाळला आहे हे विशेष! ;)) डिटेक्टिव सारा आणि तिचा साथीदार होल्डर यांनी अफलातून कामे केली आहेत. शक्य असल्यास अवश्य पाहा

वरील नावाची एक डॉक्युमेन्टरी १९६२ साली आली असतांना अलका टॉकीजमध्ये पाहिली होती. तेव्हा ती फार आवडली होती. तिची पुनः आठवण झाली आणि यूट्यूबवर शोधल्यावर ती लगेच येथे दिसली. तिचे उरलेले भागहि शेजारीच दिसले. तिचा स्क्रीनग्रॅब तिची थोडी माहिती देईल. विकिपीडियावर तिचे एक पान येथे आहे.

सुमारे ५५-६० वर्षांपूर्वी गोळा केलेले तिच्यातील विश्व आता तसे राहिलेलेहि नसेल. मागास, रानटी आणि सुधारलेले आधुनिक ह्यांच्यामध्ये असलेला फरक कसा वरवरचा आहे हे धक्कादायक तन्त्राने दाखवायचे हा ह्या डॉक्युमेन्टरीचा उद्देश असावा असे वाटले.

या आगामी मालिकेची झलकः

वरील व्हीडो भारतात ब्यान दिस्तोय. पण दुसरा ट्रेलर पाहिला. नाय आवल्डा... सॉल गुडमन ट्रायल लॉयर असेल असं वाटलं नव्हतं. पडद्यामागे राहून सूत्र हलवणारा वाटला होता.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

प्रॅन्क (प्रॅक्टिकल जोक) चे हे व्हिडीओ मस्त आहेत -

https://www.youtube.com/watch?v=Tgre6v3rMq8

https://www.youtube.com/watch?v=KWkXUL9Bd_s ROFL

https://www.youtube.com/watch?v=TkgzkMWcxCo ROFL

https://www.youtube.com/watch?v=Dv6l0LGvSv4

https://www.youtube.com/watch?v=RzF5LWnHebM

ओह शूट हाच शोधत होते - https://www.youtube.com/watch?v=p5CCv7IlrpQ Wink

नुकताच परेश मोकाशी दिग्दर्शित "एलिझाबेथ एकादशी" हा मराठी चित्रपट पाहिला ...अंतर्मुख करणारा एक नितांतसुंदर सिनेमा. विश्वविख्यात इराणी दिग्दर्शक मोहसेन मखमलबाफ आणि माजिद माजिदी च्या तोडीचा चित्रपट आहे, असे म्हणावेसे वाटतेय !
मराठी सिनेमात जागतिक दर्जाची निर्मितीमूल्ये येत आहेत ...हार्दिक अभिनंदन .
सर्वांनी जरूर पाहावा !

Mandar Katre

--

यात कार्ली फ्योरिना व सलमान रश्दी यांनी तुफान फटकेबाजी केलेली आहे. कार्ली फ्योरिना यांनी - आत्ता या घडीला मिडियातले लोक जे काही पेटून उठलेत ते आत्ताच का उठले व ... गेल्या अनेक वर्षात सुदान मधे इतक्या स्त्रियांचे छळ केले गेले तेव्हा या मिडिया ने आरडाओरडा का केला नाही ??????

ह्या मुलाखतीत 'बोको हराम' ह्या नावाचा अर्थ कळला. 'पुस्तक (पक्षी ज्ञान - अर्थातच इस्लामबाह्य परंपरेचे) निषिद्ध' असा तो अर्थ आहे.

http://zeenews.india.com/news/videos/zee-media-exclusive-sudhir-chaudhar...
काल असावुद्दिन ओवेसी यांची मुलाखत झी टीवीवर पाहिली. किमान या मुलाखतीत तो रिजनेबल वाटला. मिडियाची धर्म म्हटले कि झोडून काढायची प्रवृत्ती समाजातले विष वाढवत आहे कि काय असे क्षणभर वाटले.
एका धर्माची भूमिका मांडणे, धर्माच्या लोकांच्या हिताचा विचार करणे, त्यांचे संघटन करणे, धर्माचा प्रसार करणे यात कायदाबाह्य काही नाही. शिवाय ओवेसींना "सेपरॅटिस्ट" म्हणणे तर भयंकरच चुकिचे नि कदाचित काउंटर प्रॉडक्टीव असावे.

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

राज्यसभा टिवीवर द मॅथ फॅक्टर मधे नेटवर्क थेरीवरचा कार्यक्रम पाहिला. जगातल्या कोणत्याही दोन व्यक्ती म्हणे फार तर फार सहा डीग्राने (मधल्या लोकांनी) जोडता येतात.

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

आजच युट्यूब वर संस्कार हा कन्नड चित्रपट पाहिला .1920-30 चा काळ , कर्नाटकातील एका ब्राह्मण-बहुल गावात एका ब्राह्मणाचा मृत्यू होतो ,परंतु तो ब्राह्मण अभक्ष्य-भक्षण / अपेय -पान करणारा ,तसेच त्याने शूद्र स्त्रीशी विवाह केलेला असल्याने इतर ब्राह्मण मंडळी त्याच्या प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यास नकार देतात , मग त्यातील एक जाणता पूरोहित देवाला कौल लावतो , पण कौल मिळत नाही. कोणताच निर्णय झाल्याने 3/4 दिवस सर्व ब्राह्मण मंडळी जेवणाशिवाय उपाशी असतात , त्यातच उंदीर, गिधाडे घिरत्या घालू लागतात आणि भरीस भर म्हणून प्लेग ची साथ येते. अन भूक अन रोग यांच्या पायी अख्खी ब्राह्मण वस्ती उद्ध्वस्त होते . शेवटी दूरच्या गावातील एक धर्माचार्य स्वामीजी
असा निर्णय देतात की, त्या बंडखोर ब्राह्मणा ने ब्राहमण्य सोडले असले तरी ब्राहमण्याने त्याला सोडले नाही,यास्तव गावातील ब्राह्मणांनीच त्याचे उत्तरकार्य करावे. पण ट्रॅजडी अशी की ,हा निर्णय लागायला इतका उशीर लागतो ,की तोपर्यंत गावात ब्राह्मणच शिल्लक नसतो !

http://www.youtube.com/watch?v=FmZHsUVSUw8
http://www.youtube.com/watch?v=Pg_rTpnVQzg

Mandar Katre

---

द इंटरव्ह्यु बघितला. आवडला. जेम्स फ्रँको चे काम लई मंजे लई आवडले. पिक्चर बद्दल चर्चा म्हणाल नेहमीप्रमाणे "अमेरिकेचा सिक्युरिटी कॉम्प्लेक्स" व अमेरिकाविरोधकांचा "सी !!! आय टोल्ड यू दॅट अमेरिकन्स आर फ्रीकिन पॅरनॉईड" धर्तीची असणार आहे. पण पिक्चर मधे फ्रँको, सेथ, व डायाना बँग यांची कामे मस्तच. रँडेल पार्क चे पण काम आवडले.

"बकेट लिस्ट" चवथ्या की पाचव्यांदा पाहीला. तितकाच आवडला
_____________
अहाहा पॅटन परत परत पाहीला. प्रचंड आवडतो तो सिनेमा.

काल Point Blank नावाचा १९६७ सालचा सिनेमा बघितला. फिल्म न्वार टाइप चा हा सिनेमा फार पूर्वी २००३ साली TNT वर बघितला होता, तेंव्हा पासुन मधुन मधुन आठवणीत यायचा, म्हणुन काल शांतपणे बघितला.
ली मार्वीन ला बघुन फार इम्प्रेस झाले होते. फार काही भारी कथानक, संवाद नसताना फक्त टीपीकल स्टाइलाइस्ड क्राइम पिक्चरायझेशन मुळे आवडला आहे.

आजच 'द इमिटेशन गेम' हा चित्रपट पाहिला. कॉम्पुटर सायन्सचा विद्यार्थी असल्याने ट्युरिंगची तशी ओळख आहेच. पण त्याची ही बाजू (एका कोडब्रेकरची) कधीच वाचनात आली नव्हती. चित्रपट आवडला हे वेगळे सांगायला नको.
चित्रपट हा बऱ्याच वर्षांमध्ये मागे पुढे करत राहतो. चित्रपटाचे कथासूत्र (थोडेसे कालानुक्रमे आहे) साधारणपणे असे:
जर्मनीकडे असलेले एनिग्मा मशीन ब्रेक करण्यासाठी काम करणाऱ्या लोकांमध्ये तो अ‍ॅलन ट्युरिंगपण काम करत आहे(१९४०) .पण त्यांच्याकडे हा कोड ब्रेक करण्यासाठी खूपच कमी वेळ आहे. अश्यावेळी हे एका मशीनशी लढाई फक्त एक मशीनच करू शकते, असे म्हणत ट्युरिंग कोडब्रेक करण्यासाठी मशीन बनवण्याच्या कामाला लागतो. हे करत असताना त्याचा सहकाऱ्यांसोबतचा वाद, त्याच्या शाळेतील (१९२८) काही प्रसंग जे तो समलैंगिक आहे हे दर्शवतात.
शेवटी ट्युरिंगचे मशीन यशस्वी होते आणि एनिग्मा मशीन मधून दिवसातून येणारे कितीतरी संदेश मशीन ब्रेक करू शकते.
सन १९५१ मध्ये तो समलैंगिक आहे म्हणून त्याला शिक्षा होते आणि १९५४ मध्ये तो आत्महत्या करतो.

बेनेडिक्ट कंबरबॅचने जो ट्युरिंग उभा केला आहे तो उत्तमच. किएरा नाईटले आणि इतर सर्व अभिनेत्यांचा अभिनयही चांगला झाला आहे. १९४० च्या लंडनचा फील पाहताना येतो.
जरूर पाहावा असा हा चित्रपट.

बेनेडिक्ट कंबरबॅचने जो ट्युरिंग उभा केला आहे तो उत्तमच...जरूर पाहावा असा हा चित्रपट.

सहमत आहे.

'इमिटेशन गेम' हे शीर्षक हे मानव-मशीन-आर्टिफिशय इंटलिजन्स, मशीनला दिलेले 'ख्रिस्तोफर' हे शाळूसोबत्याचे नाव आणि मुखवटा घेऊन प्रत्यक्ष जीवनात करावी लागलेली कसरत - या सार्‍या अर्थांनी चपखल बसते.

(अवांतर - राहून गेलेले काही)

मुंबई मध्ये कामासाठी जाण झाल की एक घाणेरडा वास सतत आपला पाठलाग करत आहे अस एक अस्वस्थ करणार फिलिंग येत . हा वास पोत बदलत असला तरी त्याचा गाभा एकच आहे . काहीतरी सडत आहे असा तो वास . अख्ख्या मुंबईत हा घाण वास तुमचा पाठलाग करतो . अनुराग कश्यप च्या 'अग्ली ' मध्ये हि असा सडका वास येणारी घाणेरडी मुंबई बहुतेक फ्रेम मध्ये दिसते . अजून एक गोष्ट . मुंबई मध्ये कितीही इच्छा असली तरी तुम्ही एकटे नसता . Personal Space वैगेरे चोचले मुंबई पुरवत नाही . मुंबई ला अंतर्बाह्य ओळखून असलेल्या अनुराग ने हिच मुंबई कॅमेरा फ्रेम मध्ये टिपली आहे . कुठल च पात्र एकट आहे असे फ्रेम मध्ये दिसत नाही . किमान दोन लोक तरी फ्रेम मध्ये असतात . यापूर्वी मुंबई च्या या वैशिष्ट्यांचा वापर फार कमी चित्रपटात झाल्याचा दिसतो . ते चित्रपट म्हणजे सत्या (पटकथा लेखक -अनुराग कश्यप ), Black Friday ( पुन्हा दिग्दर्शक अनुराग च ) आणि इतर काही नियम सिद्ध करणारे अपवाद .

प्रस्थापितांना विरोध करणारा च स्वतः कधी प्रस्थापित बनतो हे त्याला पण कळत नाही . आणि हा फ़क़्त राजकारणाला लागू पडणारा नियम नाही . जौहर -चोप्रा च्या चित्रपटांवर टीकेची झोड उठवणारा अनुराग कश्यप आता स्वतः च प्रस्थापित झाला आहे अशी ओरड चालू झाली होती . करण जौहर सोबत चित्रपटाची सह निर्मिती करण , रणबीर कपूर सारख्या 'स्टार ' सोबत पुढचा चित्रपट सुरु करण वैगेर कारणांमुळे हि ओरड सुरु झाली होती . पण 'अग्ली ' ने हि ओरड तात्पुरती का होईना थांबेल अशी अपेक्षा आहे . गँग्स ऑफ वासेपूर नंतर खर तर अनुराग अजून मोठ्या बजेट चा चित्रपट बनवू शकला असता पण त्याने 'अग्ली ' ची निवड केली . राहुल भट , विनीत सिंग , रोनित रॉय , तेजस्विनी कोल्हापुरे , गिरीश कुलकर्णी अशी कास्ट घेऊन हा चित्रपट केला . एका लहान मुलीचे होणारे अपहरण आणि त्यानंतर घडणारया घटना चित्रपटात दाखवल्या आहेत .

राहुल हा अपयशी नट आपल्या मुलीला फिरायला घेऊन जातो . त्याचा आणि बायको शालिनी चा घटस्फोट झाला असून शालिनी ने दुसरा विवाह केला आहे . तिचा दुसरा पती बोस हा राहुल आणि शालिनी चा कॉलेज मधला सहध्यायी असतो . आता तो एक बडा पोलिस ऑफिसर आहे . अतिशय कडक आणि दरारा असणारा असा तो ऑफिसर आहे . कॉलेज जीवनात झालेल्या काही घटनांमुळे तो राहुल वर खार खाऊन आहे . राहुल आपल्या मुलीला कार मध्येच बसवून कास्टिंग एजंट आणि मित्र चैतन्य ला भेटायला त्याच्या घरी जातो . दरम्यान कुणीतरी त्याच्या मुलीच अपहरण करते . संशयाची सुई सर्व पात्रांवर फिरायला लागते . बोस चा पहिला संशय अर्थातच राहुल वर असतो . नंतर नंतर संशयास्पद भूतकाळ असणार्या चैतन्य वर ठपका ठेवला जातो . या चित्रपटातल्या सर्वच व्यक्तिरेखा भावनिक दृष्ट्या असुरक्षित अस्थिर अशा आहेत . नातेसंबंध असून आणि कुठल्या न कुठल्या धाग्याने जोडले गेलेलं असून पण इथे कुणाचाच कुणावर विश्वास नाही . दुर्दैवाने आजची मुंबई पण अशीच आहे . अस्थिर आणि धुरकट . या सिनेमात मुख्य मुद्दा अपहरण कुणी केल हा नाही आहे हे थोड्याच वेळात कळायला लागत . पण एका घटनेनंतर संबंधित लोक प्रतिक्रिया कशा आणि का देतात हे जाणून घेणे हा मुख्य मुद्दा आहे . इथे पण अनेक लोकांचे नात्यांचे बुरखे टराटरा फाटतात . मुलीचा मामा असो , शालीनीची जवळची मैत्रीण असो वा दस्तुरखुद सख्खी आई असो इथे कुणालाही मुलगी सापडणे तितकेसे महत्वाचे वाटत नाही तर यातून आपले उल्लू कसे सीधे करता येतील हे महत्वाचे वाटत आहे हे कळल्यावर प्रेक्षकाला धक्का बसतो . जागतिकीकरण , त्यातून जवळ आलेले जग , त्यातून एकाकी पडणारा माणूस आणि त्यातून येणारी असुरक्षितता हि आता आपल्यापण दरवाजावर येउन ठेपली आहे हि अस्वस्थ करणारी भीतीदायक जाणीव करून देण्यात अनुराग पुरेपूर यशस्वी झाला आहे . राहुल भट , तेजस्विनी कोल्हापुरे , रोनित रॉय यांनी आपल्या भूमिका चोख बजावल्या आहेत . पण सर्वात उल्लेखनीय आहेत ते चैतन्य ची भूमिका करणारा विनीत सिंग आणि इन्स्पेक्टर जाधव ची भूमिका करणारा आपला गिरीश कुलकर्णी . मुलीच अपहरण झाल आहे हे कळल्यावर राहुल आणि चैतन्य पोलिस ठाण्यात जातात आणि इन्स्पेक्टर जाधव त्यांच्यावर कसा चढतो हा १३ मिनिटाचा प्रसंग निव्वळ अजरामर या श्रेणीत यावा . आपली पोलिस यंत्रणा दाद मागायला येणाऱ्या लोकांना कशी वागणूक देते हे इथ कळत . गिरीश कुलकर्णी आणि विनीत सिंग ने हा सीन जबरदस्त खुलवला आहे . तांत्रिकदृष्ट्या पण चित्रपट सरस आहे . निकोस अन्द्रीत्साकीस ने मुंबई आपल्या कॅमेऱ्यात जबरदस्त टिपली आहे. संकलन पण सरस . चित्रपट कुठेही रेंगाळत नाही .

पीके बघून राजकुमार हिराणी च साचेबद्ध होत असण अस्वस्थ करत असतानाच अनुराग कश्यप मात्र बदलला नाही हे आश्वस्त करणार फिलिंग आहे .

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

छान लिहिलं आहे. उत्सुकता होतीच, आता वाढली आहे.

*********
आलं का आलं आलं?

छान लिहिलय!

मुलीच अपहरण झाल आहे हे कळल्यावर राहुल आणि चैतन्य पोलिस ठाण्यात जातात आणि इन्स्पेक्टर जाधव त्यांच्यावर कसा चढतो हा १३ मिनिटाचा प्रसंग निव्वळ अजरामर या श्रेणीत यावा .

याच्याशी असहमत. विवक्षित ठिकाणी विनोद ही वासेपूरमध्ये जमून गेलेली गोष्ट या प्रसंगात जरा ओढून आणलेली वाटली मला.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

हा प्रसंग निव्वळ विनोदी तर नाहीचे.
म्हणजे जे कोणी लोक पोलिसांकडे तक्रार नोंदवायला किंवा साधं पासपोर्ट साठी गेले आहेत, त्यांना पूर्ण प्रसंग किती जमून आलाय ते कळेल (त्यातला विनोद नक्की दिसेलच)
गिरिश कुलकर्णीचं इतर पोलिसांकडे बघून कमेंटस मारणंं आणि मधूनच खास पोलिसी खाक्या दाखवून दरडावणं- मराठीमिश्रीत हिंदीत बोलणं- जवळपास १० मिनिटं झाल्यावर मग तक्रारकर्त्यांनी तोडकंमोडकं मराठी कसंबसं घुसवणंं (अडला हरी ह्या नात्याने) - आणि मोबाईलवर चित्रं कशी घेतात या सुतराम संबंध नसलेल्या विषयावर दोन्ही बाजूंची चर्चा- ह्या सगळ्याशी १००% रिलेट करू शकलो.
============
मुंबईबरोबरच चित्रपटात मोबाईल्सचा वापरही एकदम जमलेला आहे. ह्या आधीच्या कश्यपपटांत मोबाईल्स, मॉल्स आणि टेक्नोलॉजी फार जाणवली नव्हती (देव-डी मध्ये थोडीफार). पण इथे मोबाईल्स हे प्रत्येक पात्राबरोबर सतत असतात, त्यांचं अस्तित्त्व नकळत जाणवत रहातं.

This comment has been moved here.

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

काल मार्टीची Mean Streets पाहीला. मार्टीच्या बायोपिक सिनेमांच्या मालिकेची सुरुवात दिसते ह्यात. आज जरी त्यात नाविन्य वाटत नसले, तरी १९७३ साली ह्या सिनेमानी बर्‍यापैकी हलचल मचवली असणार.

http://en.wikipedia.org/wiki/Mean_Streets

डी निरो मस्तच. अ‍ॅक्टरचा सिनेमा मेकींग मधे कीती खोल सहभाग असला पाहीजे हे "मी डायरेक्टर चा अ‍ॅक्टर आहे" असे सांगणार्‍या बॉलिवूड मधल्यांनी १० % तरी शिकायला पाहीजे होते.