अलीकडे काय पाहिलंत - १७

जुन्या धाग्यात १००हून अधिक प्रतिसाद झाल्यामुळे नवीन धागा. उजव्या बाजूला किंवा मुखपृष्ठावर असणाऱ्या मुखवट्यांच्या प्रतिमेवर टिचकी मारून या प्रकारातले सगळे धागे सापडतील.)

***

हॉलिडे पाहिला. पीकेवर उतारा म्हणून उत्तम आहे.
---------------
खाऊन पिऊन सोफ्यावर लोळत सगळ्या जगावर कमेंट करणारांनी, खासकरून राष्ट्रवाद कसा फालतू आहे, लष्कराला टॅक्सचे पैसे मी का देऊ इ इ विचार करणारांनी अवश्य पाहावा.

field_vote: 
0
No votes yet

खाऊन पिऊन सोफ्यावर लोळत सगळ्या जगावर कमेंट करणारांनी, खासकरून राष्ट्रवाद कसा फालतू आहे, लष्कराला टॅक्सचे पैसे मी का देऊ इ इ विचार करणारांनी अवश्य पाहावा.

१) खाऊन पिऊन.... - काय ओ अरुण जोशी, खाऊन पिऊन असणार्‍यांची कॉमेंट करण्याची इलिजिबिलिटी नाही का ?
२) राष्ट्रवादाबद्दल चर्चा करणारे त्यातील काही गोष्टींवर टीका करत असतील. अगदी एक्स्ट्रीम इंडिव्हिज्युअलिस्ट्स (उदा. हॅन्स हर्मन हॉप्प) किंवा कमुनिस्ट्स सुद्धा राष्ट्रवादास फालतू म्हणत नाहीत. पण राष्ट्रवाद फालतू आहे असं कोण म्हणालं ओ ?

खासकरून राष्ट्रवाद कसा फालतू आहे,

अजो - राष्ट्रवाद ही जनरल टर्म नाहीये. जपानी राष्ट्रवाद चांगला असू शकतो आणि भारतीय राष्ट्रवाद हा फाल्तू असु शकतो.

मी तुमची श्रेणी सुधारू शकत नाही. आपल्या स्वतःच्या धाग्यावर श्रेणी द्यायचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य ऐसीने का हिरावले आहे देव जाणो. असो.
------------------------------
राष्ट्र ही एक सिस्टिम आहे. ज्या सीमेपलिकडे आपण लोकांना सांस्कृतिकदृष्टया, (आर्थिक, सामाजिक, मानवी, इ इ सुद्धा )फूली, पार्शली डिसोन करतो त्यांच्या आत ते राष्ट्र. ही व्यवस्था, ममत्वाची, ऐक्याची भावना म्हणजे राष्ट्रवाद. आपला राष्ट्रवाद शेजार्‍यांसाठी, इतरांसाठी फालतू असू शकतो. स्वतःसाठी? सर्वांसाठी आपापला? उगाच कैतरी.

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

ऐक्याची भावना म्हणजे राष्ट्रवाद. आपला राष्ट्रवाद शेजार्‍यांसाठी, इतरांसाठी फालतू असू शकतो. स्वतःसाठी? सर्वांसाठी आपापला? उगाच कैतरी.

असे कसे अजो? राष्ट्रवादाच्या डेफिनिशन मधे देशा देशात फरक असु शकतो. उदा म्ह्णुन.
मॅच संपल्यावर स्टेडीयम स्वच्छ करुन जाणारे जपानी प्रेक्षक, मागण्यांसाठी संप न करता जास्त उत्पादन करणारे जपानी कामगार, दर्जा बद्दल अतिशय काळजी घेणारे जर्मन - हा राष्ट्रवादाचा प्रकार.

आणि
स्वच्छ भारत मोहीमेच्या शपथ सभारंभानंतर खुर्चीखालीच पाण्याची बाटली आणी शपथे चा कागद फेकणारे भारतीय राष्ट्रवादी.
कारगील च्या चकमकी चालू असताना वर्ड कप च्या पाकीस्तान विरुद्ध च्या मॅचेस ची मजा घेणारे भारतीय राष्ट्रवादी
पाकीस्तानी लोक कशाही परीस्थितीत राहु देत, पण भारताविरुद्ध सर्व पैसा आणि शक्ती वाया घालवणारा पाकीस्तानी राष्ट्रवाद

जपानी राष्ट्रवाद चांगला असू शकतो आणि.....

जपानी राष्ट्रवाद हा क्रूर, अमानुष आणि बीभत्स होता...
(रेफः दुसरे महायुद्ध)
बाकी चालू द्या....

गब्बर भाषेचं एक मोठं दौर्बल्य आहे. मी फक्त खाऊन पिऊन नाही म्हणालो. मी लिहिलेल्या सगळ्या अटी एकत्र पूर्ण करणारे असे म्हणायचे होते. वाचायला सोपे जावे म्हणून मधे मधे कॉमे टाकलेले.
-----------
आता तुम्हाला त्यातही खायचा प्यायचा संबंध कुठे आला असे म्हणायचे असेल. पोट भरले कि (नको ती) अक्कल सुचते. नक्षलवाद्यांना (पोट न भरलेल्यांना) देखिल राष्ट्रवाद नको आहे, त्यांना वेगळे काढण्यासाठी तो शब्द प्रयोग आहे.

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

>> पण राष्ट्रवाद फालतू आहे असं कोण म्हणालं ओ ?

Nationalism is an infantile disease. It is the measles of mankind.

- Albert Einstein.

Read more at http://www.brainyquote.com/quotes/quotes/a/alberteins107012.html

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

वा वा वा. चि जं, क्या बात है. एकदम षटकारच मारलात की ओ.

जोडीला हे पण घ्या - आईनस्टाईन यांच्याच शब्दांत - http://www.peaceandfreedom.org/home/articles/introductions/218-albert-ei...

I am convinced there is only one way to eliminate these grave evils [of capitalism], namely through the establishment of a socialist economy, accompanied by an educational system which would be oriented toward social goals.

Nationalism is power hunger tempered by self-deception.
-- George Orwell

Read more at http://www.brainyquote.com/quotes/quotes/g/georgeorwe159435.html

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आईन्स्टाईनचे आईन्स्टाईनत्व फक्त फिजिक्समध्ये!!!!!

- आम्ही.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

हॉलिडे पाहिला. पीकेवर उतारा म्हणून उत्तम आहे.

वाक्य वाचलं आणि कसं भरून आलं ... कॅमेरून डियाझ, केट विन्स्लेट आणि ज्युड लॉ च्या अभिनयाची मस्त भट्टी जमलेल्या सिनेमाच्या आठवणी जाग्या झाल्या ... आणि पुढचं वाक्य "खाऊन पिऊन सोफ्यावर लोळत सगळ्या जगावर कमेंट करणारांनी, खासकरून राष्ट्रवाद कसा फालतू आहे, लष्कराला टॅक्सचे पैसे मी का देऊ इ इ विचार करणारांनी अवश्य पाहावा." वाचलं ... छ्या ... सगळी मजा गेली राव ...

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

बर्वेसाहेब, ठिक आहे. आजचा दिवस तुमचा. या सोफाधारींना नको थेटरात तुम्ही पाहायच्या वेळी. आता खुष?

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

कॅमेरून डियाझ, केट विन्स्लेट आणि ज्युड लॉ च्या अभिनयाची मस्त भट्टी जमलेल्या सिनेमाच्या आठवणी जाग्या झाल्या

बर्वे साहेब, आमचं व तुमचं जमलं. माझा पण फेव्हरिट पिक्चर आहे तो. लई म्हंजे लईच भारी.

एकत्र बसूया कधीतरी. रम व रमी चा डाव मांडून गप्पा मारू.

काय सुंदर दिसते केट विन्सलेट त्या पिच्चरमध्ये- आणि अन्यत्रही. ती फक्त सुंदरच दिसू शकते. तिच्या हास्यात बुडून जाताना अगदी गारगार वाटतं.

(केटप्रेमी) बॅटमॅन.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

अरूणराव नक्की त्याच हॉलिडे बद्द्ल म्हणतायत का? मला वाटलं अक्षय कुमारचा हॉलिडे...

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

मेबी. पण मला तरी हॉलिवुडवाला हॉलिडेच माहितीये.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

हो अजो अक्षय कुमारच्या हॉलीडे बद्दल बोलताहेत असं माझंही मत. मी बॉलीवूड हॉलीडे फक्त पहीले १५ मिनीट वगैरे पाहिला, नंतर आय फेल्ट लाईक, आय हॅव फार बेटर थिंग्स टू डू Blum 3 मग अर्थात पुढे नाही पाहिला Wink

हो रे, बॅट्या... केट फक्त आणि फक्त सुंदरच दिसू शकते. आणि का कोणास ठाऊक मला ती कधीच फिरंगी वाटत नाही - आपल्यातलीच वाटते Smile

Smile

आपल्यातली अशी नाही वाटत पण छान वाटते खरी. Smile

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

मला ती बांधेसूद अन full-figured वाटते. टायटॅनिक मध्ये सुंदर दिसली.

बांधेसूद, व्होलप्टस आणि क्लासी.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

केट व्होलप्टस ??????

घोर अपमान. आम्ही आता दगडफेक करणार.

होय गब्बर ती व्हॉलप्शसच आहे. हाच शब्द मला आठवत नव्हता.

च्यायला यात आणि कसला अपमान? व्होलप्टस म्हणजे चीप थोडीच आहे. केट कर्व्ही आणि आकर्षक आहेच, सबब ते विशेषण तिला फिट बसते. नै????

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

आमचिया मते व्हॉलॉप्शस हे विशेषण एव्हा मेंडेज (की मेंडेस) ला जास्त फिट्ट बसते...

नक्कीच भेटूया गब्बर ..ठाणे कट्ट्याला (विक्षिप्त बाईंच्या भेटी साठी) येणार आहेस का ??

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

अं.... मुझे उनसे बहुत डर लगता है. इसलिये नही.

मे जून मधे कधीतरी भेटू.

हॉबिटचा शेवटचा भाग पाहिला. प्रचंड भ्रमनिरास झाला. पैशे आणि वेळ दोन्हींचा चुराडा!

भिकार सिनेमा... अ‍ॅक्चुअली तीनही टुकार आहेत.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

मला पहिले दोन आवडले होते. अगदी एलओटीआरपेक्षा जास्त नाही पण किमान तितकेच. पण तिसरा भाग निव्वळ कचरा आहे.

हॉबिटला मारे (कोणत्या ते ही आठवत नाही) गेलेले अन आवाजानी डोकच उठलं. झोपता येईना की जाता येइना Sad

साफच असहमत. तिसरा बेष्टेष्ट आहे तीन्हीपैकी.पहिल्या-दुसर्‍यात नुस्ता पेष्षल इफेक्टचा खच आहे. तिसर्‍यात जरा तरी जान आहे. रादर बरीच जान आहे. शेवट हा एलोटीआरकडे अगदी व्यवस्थित आणून बसवला आहे.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

कसं कसं जमवता तुम्ही हे ?

रिइन्व्हेंटिंग धारावी नावाची एक आंतरराष्ट्रीय संकल्पना स्पर्धा झाली म्हणे. कधी झाली , कुणी अयोजित केली हे काही तपशील कळाले नाहीत. माझ्या महाविद्यालयात त्याचे निकाल मोठमोठ्या बोर्डांवर लावून ठेवलेयत. हे इतके..


(हा फोटो या फलकांच्या प्रिन्स ऑफ वेल्सच्या हिरवळॅएवर झालेल्या अधिकृत प्रदर्शनाचा आहे.)
त्यांचं फेसबुक पेज -https://www.facebook.com/events/885628604802632/
त्यांचं संस्थळ- https://reinventingdharavi.org/background.php
तर याचं फलित म्हणजे हे बोर्डस खूप छान आहेत. स्पेन, अमेरिका, भारत, आणि कितीतरी देशांनी यात भाग घेतला होता. एक लांबलचक बोर्ड्सची चेन म्हणजे एका अक्षिसपात्र संस्थेची संकल्पना आहे. उभं राहून वाचणं आणि त्यात ती इतकी सारी माहिती, की सगळे बोर्ड्स वाचून झाले नाहीत. मी 'रिअलायझिंग धारावी', 'ट्रांझिट कँपांत लोकांना न पाठवता नवी धारावी कशी निर्माण करावी', 'इन्क्लुझिव्ह आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऑफ धारावी' हे एवढेच बोर्ड्स चाळले. गेले दोन आठवड्यांपासून ते फलक आमच्याइथे आहेत. अजून ठेवले गेले तर या शुक्रवारी वेळ मिळाल्यास जाऊन आणखी वाचेन. दुर्दैवाने संस्थळावर या फलकांवर असलेली सविस्तर माहिती दिलेली नाहीय.

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

http://www.youtube.com/watch?v=zcKS9JPSfCg १९४७ ची फाळणी या स्फोटक विषयावर बीबीसी ची डॉक्युमेन्टरी ...

रच्याकने, डॉक्युमेन्टरी साठी प्रचलित मराठी शब्द कोणता?

Mandar Katre

http://www.youtube.com/watch?v=Ea_g9h4xt3M

रामचन्द पाकिस्तानी , कलाकारांची कामे अफलातून ...अतिशय आवडला .अन्तर्मुख करुन गेला

Mandar Katre

आत्ताच अक्षय कुमार चा बेबी सिनेमा पाहिला . अतिशय जबरदस्त आणि खिळवून ठेवणारा चित्रपट ! सर्वांनी जरूर पहा, आणि शक्यतो तिकीट काढून पहा ! खाना-वळीच्या बंडल सिनेमाना वैतागून हिन्दी चित्रपट पाहणे सोडून दिले असलेत तरी नक्की बघा ..थरारक अन उत्कंठावर्धक!

Mandar Katre

आणि शक्यतो तिकीट काढून पहा !

हे आवडलं. नीरज पांडे इश्टाईल असला तर चित्रपटाला वेग असेल हे नक्की. (जरी 'बुधवारी' तो वेग अस्सल वाटलेला पण स्पे. छब्बीसमधे बरेचदा खोटा आवेश वाटला होता. असो)

मध्यपूर्वेत (गल्फ कन्ट्री) मध्ये हा चित्रपट थिएटर मध्ये दाखवताना खूप काटछाट केली आहे, कारण सौदी चा सन्दर्भ आहे ,यास्तव नेट वरून अन्य मार्गाने शक्य असल्यास पहावा

वीतराग बनो......वीतद्वेष बनो !

अत्त दीप भव !

स्पे. छब्बीसमधे बरेचदा खोटा आवेश वाटला होता.

हेहे... अगदी अगदी! इथेही तीच केस आहे. बराय सिनेमा. पण आता तेच तेच करतोय नीरज पांडे.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

तुमच्या मताशी साधर्म्य असणारा रिव्ह्यू पाहावे मनाचेवरही वाचला.
आता थेट्रात जाऊन पाहण्यापेक्षा घरीच बघावा असे ठरवतोय

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

'बेबी' पाहिला. मला त्यापेक्षा नीरज पांडेचे आधीचे चित्रपट बरे वाटले होते. बेबी हा बऱ्यापैकी अर्गोवरुन विशेषतः मध्यांतरानंतर ढापल्यासारखा वाटला.

बेबी पिक्चर मस्त आहे.

लक्षणीय बाब ही आहे की - यात डॅनी डेंझोप्पा (बेबी चा टॉप बॉस) च्या तोंडी एक डायलॉग आहे. त्याचा मतितार्थ हा आहे की आता दहशतवादी संघटनांना भारतातूनच मुले रिक्रुट करणे सोपे जात आहे कारण भारतातील मुस्लिम समाजात हा देश आपला नाही ही भावना बळावत चाललेली आहे व पार्ट ऑफ द रिझन इज या दहशतवादी संघटनांनी तसे त्यांना कन्व्हिन्स केलेले आहे व त्याचा परिणाम म्हणून (फुटिरतावादी कारवाया होऊ शकत नाहीत अँड देअरफोर) दहशतवादी कारवाया करण्यासाठी मुलं मिळतात व हा त्या दहशतवादी संघटनांचा विजय आहे व "आपला" पराजय आहे.

प्रश्न हा आहे की - ही भावना खरोखर बळावत चाललेली आहे हे जर सत्य असेल तर ही अशी भावना बळावत का चाललेली आहे ? हा आपला देश नाही हे त्यांना कन्व्हिन्स करणे का सोपे आहे ??

अखेर पीके पाहिला. बालिश, बाळबोध आणि पसरट वाटला. दीड तासात आटोपला असता तर कदाचित सुसह्य झाला असता. ह्यापेक्षा (साधारण ह्याच विषयावरचा) 'देऊळ' बाळबोध असला, तरी अधिक घट्ट बांधणीचा होता.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सहमत. देऊळ खरंच चांगला होता. देऊळमधली गाणी, नाना पाटेकरचं काम वगैरे सगळंच मस्त होतं. आमिर खान तसाही डोक्यात जातोच. त्यात तो उपदेश करायला लागला की नकोच वाटतो.

उपदेशाबद्दल-
पडद्यावरचा आमिर जाम डोस पाजतो यात शंका नाही (सत्यमेव जयते हे टोक.)
उलड पडद्यावरचा नाना कायमच आवडला आहे. सगळ्या रूपांत (अब तक छप्पनवर जरा जास्त जीव आहे.)
पण पडद्याबाहेरचा नाना- हे जरा अवघड प्रकरण. पूर्वी तो फटकळ वगैरे म्हणून प्रसिद्ध होता. पण आजकाल शिव्या चालतील, पण उपदेश आवर म्हणायची वेळ आली आहे.
हल्ली हल्ली बरेचदा नाना चिक्कार उपदेश हाणताना बघितलाय. जे झेपलं नाही.

सो पडद्यावरचा आमिर = पडद्याबाहेरचा नाना वगैरे समीकरणं डोक्यात चमकून गेली.

दोन्ही पडद्यावरचं पाहिलेले कलाकार आहेत. नाना पाटेकरला एकदाच वसंतराव देशपांडेंच्या स्मृतीप्रीत्यर्थ गाण्यांच्या कार्यक्रमाचे संचालन करताना पाहिले होते. तेव्हापासनं त्याला फक्त डायरेक्टरच्या आदेशाखाली काम करतानाच पाहायचं असं ठरवून टाकलं.

हा हा हा हा! अगदी अगदी. पेट्रनायजिंगचा कळस होता तो. त्यावेळीच परत त्या वसंतोत्सवात फिरकायचं नाही असंही ठरवलं.

*********
आलं का आलं आलं?

शेवटी कुतूहल अनावर होऊन "कलिग्युला" (Caligula) हा चित्रपट पाहिला.
[ कलिग्युला ह्या सीझरची कहाणी. त्याच्या विक्षिप्त स्वभावाचं आणि एकूणच रोमन काळाचं चित्रण आहे. अर्थात चित्रपट "वेगळ्याच" कारणांसाठी प्रसिद्ध आहे.
आमचा आवडता दिग्दर्शक टिंटो ब्रास ह्याने दिग्दर्शित केल्यामुळे अपेक्षा उंंचावल्या होत्या! आश्चर्य म्हणजे काही प्रसिद्ध नटांनी ह्यात कामं केली आहेत. का? त्याबद्दल विकीवर भरपूर वाचता येईल. असो.]
तर -
चित्रपटाबद्दल जे काही मत आहे ते खरं आहे. अनावश्यक 'पॉर्न' नंतर घातलं असावं असं वाटतंय- मूळ कथेत ह्या कशाचीच एवढ्या प्रमाणात गरज नाही.
पण बाकी क्रौर्य, विक्षिप्तता आणि लहरीपणाचा कडेलोट हे सगळं चित्रपटात दाखवलंय त्याच्या १०%ही खरं असेल, तर त्या काळातल्या लोकांची खरंच कीव येते. कुठल्या कारणाने जीव जाईल ते सांगणं कठीण. बायकापोरींनाही त्या काळी अब्रू वगैरेची वेगळी व्याख्या करायला लागत असावी. आणि 'हेल सीझर' म्हणून पुन्हा हे सगळं पचवायचं. पूर्वीच्या काळावर काढलेले चित्रपट मोठ्ठ्या-थोर-प्रसिद्ध लोकांच्या दृष्टीकोनातून बघणं वेगळं. त्यात सगळं भव्य दिव्य वगैरे असतं. एखाद्या शेतकर्‍याच्या दृष्टीने तो काळ कसा होता, त्याचं चित्रण असंच भयानक असेल बहुतेक.

आणि एक चित्रपट म्हणून गलिच्छ आहे हे सांगायला विसरलो.

पूर्वीच्या काळावर काढलेले चित्रपट मोठ्ठ्या-थोर-प्रसिद्ध लोकांच्या दृष्टीकोनातून बघणं वेगळं. त्यात सगळं भव्य दिव्य वगैरे असतं. एखाद्या शेतकर्‍याच्या दृष्टीने तो काळ कसा होता, त्याचं चित्रण असंच भयानक असेल बहुतेक.

अरुणजोशी प्रतिक्रिया अलर्ट.

तदुपरि अशे पिच्चर पाहून मते बनवणे म्हंजे...असोच.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

अपेक्षित प्रतिसाद, बाण अचूक बसल्याचा आनंद वगैरे. Wink

मुद्दा थोडा वेगळा आहे. चित्रपटातील (चित्रित केलेला) इतिहास असा रोख आहे. त्यामुळे भारत कृपया वगळावा, आपल्याकडे ऐतिहासिक चित्रपट अगदीच थोडे आहेत.
१. बहुतेक वेळा इतिहासातील राजे (Excalibur) , साधूसंत (Joan of Arc etc.) किंवा देव वगैरे (10 commandments, Passion of Christ) ह्यांना केंद्रस्थानी ठेवून चित्रपट बनवले आहेत. त्यामुळे त्यात भव्यता डोकावतेच.
२. सामान्य माणसाच्या दृष्टीने हे सगळं मांडणारे मला दोन चित्रपट आठवत आहेत- Life of Brian आणि Holy Grail. दोन्हीत माँटी पायथन्सनी लोकांची कैफियत खुबीने मांडली आहे. Bring out your deads, King Arthur Vs communism, Brian and haggling वगैरे असंख्य नमुने. त्यात रोमनांनी जनतेला काय दिलं- ह्याचीही यादी ते देतात.

तेव्हा पूर्वीच्या लोकांना त्या काळच्या परिस्थितीबद्दल काय वाटत होतं? - असा गाभा असलेले चित्रपट पाहिले नाहीत.

(समांतर उदाहरण म्हणजे युद्धपट. Saving private Ryan मधली सामान्य सैनिकाला वाटणारी युद्धाची अपरिहार्यता आणि अगतिकता यापूर्वी फार कमी वेळा दाखवली होती (Platoon, Apocalypse now(?)) वगैरे.
त्याउलट युद्ध म्हणजे शौर्य, वीरता वगैरे मोठमोठे विचार असणारे चित्रपटच त्याआधी प्रचलित होते. )
त्याच धर्तीवर म्हणायचं झालं, तर इतिहासपटातील भव्यता वगैरे काढून टाकली, तर बहुतेक वेळा परिस्थिती भयानक असावी. (रोगराई, कमी जीवनमान, सतत होणारी युद्धं, सम्राटांचा लहरीपणा इ.इ.)

त्याच धर्तीवर म्हणायचं झालं, तर इतिहासपटातील भव्यता वगैरे काढून टाकली, तर बहुतेक वेळा परिस्थिती भयानक असावी. (रोगराई, कमी जीवनमान, सतत होणारी युद्धं, सम्राटांचा लहरीपणा इ.इ.

मुख्य मुद्दा असा की कैक पिच्चरांमधून ब्यालन्स्ड वा काँप्रिहेन्सिव्ह चित्र येतेच असे नाही. वैसे तो ब्रेव्हहार्टसारख्या पिच्चरमध्ये इंग्लंडने स्कॉटलंडवर केलेले अत्याचार कैक दाखवलेत. पण 'प्रिमा नॉक्टे' ची प्रथा जोरात चालू असल्याचे पुरावे नाहीत. बाकीही अनेक गोष्टींत कैक चुका आहेत. सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून तो काळ मांडणारे लै पिच्चर मला आठवत नैयेत. पण पिच्चर या माध्यमालाच ते लिमिटेषन आहे. तीन तासांत किती दाखवता येईल यावर मर्यादा आहेत. त्यामुळे पिच्चर बघून होणारे आकलन बह्वंशी अपुरे आहे इतकेच.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

अरुणजोशी प्रतिक्रिया अलर्ट.

अलिकडे रिलिज होणार्‍या पिक्चरांत एलन लोक हल्ला करतात तेव्हा मॅनहॅटन दाखवतात. लेसोथो, पापुआ न्यू गिनी दाखवायला पाहिजे.

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

लेसोथो, पापुआ न्यू गिनी दाखवायला पाहिजे.

District 9 बघा असं सुचवतो.

टिंटो ब्रासचे इतर पिच्चर पाहिल्यास पॉर्न अनावश्यक आहे असं वाटत नाही. कारण त्या पॉर्न मूव्हीजच असतात.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

बाकी सहमत....

=======================================================================
छिन्नी हातोड्याचा घाव, करी दगडाचा देव, सोशी दैवाचे तडाखे त्यास मानूस ह्ये नाव.....

ड्रीमचाइल्ड (१९८५)

दिग्दर्शकः गॅविन मिलर
लेखकः डेनिस पॉटर

१९३२ साली ऐंशीच्या घरात पोहोचलेली 'अ‍ॅलिस इन वन्डरलॅन्ड'मधील अ‍ॅलिस लिडेल (आता अ‍ॅलिस हार्ग्रीव्ज) लेखक लुईस कॅरॉल (सॅम्युएल लडविग डॉजसन) ह्याच्या जन्मशताब्दीनिमित्त कोलंबिया विश्वविद्यालयाने देऊ केलेली मानद पदवी घेण्याकरता अमेरिकेला जाते. ती दहा वर्षाची असताना कॅरॉलने त्या गोष्टी व कविता तिला ऐकवल्या व अर्पित केल्या होत्या. बोटीत व अमेरिकेला पोहोचल्यावर तिला तेव्हाच्या, विस्मृतीत गेलेल्या, कदाचित तिच्या मनाने मुद्दाम दडपून टाकलेल्या, गोष्टी आठवू लागतात. लहान अ‍ॅलिस तसेच वृद्ध अ‍ॅलिसची 'अ‍ॅलिस इन वन्डरलॅन्ड' पुस्तकातील मॅड हॅटर, डॉरमाउस, कॅटरपिलर इत्यादींसोबत स्वप्नदृश्येही दिसू लागतात. फ्लॅशबॅकच्या तंत्राने दिग्दर्शकाने छोट्या छोट्या तुकड्यात कॅरॉलला एका अबोध मुलीविषयी वाट असणारं निषिद्ध प्रेम अत्यंत संयत पद्धतीने, सवंगपणाला जराही थारा न देता सूचित केले आहे. त्या अजाण बालवयात तिला न जाणवलेली डॉजसनची भावना, त्याची तगमग अ‍ॅलिसला संध्याछाया स्पष्ट दिसू लागल्यावर समजते, उमजते.

कॉरल ब्राउन (वृद्ध अ‍ॅलिस) ह्यांचा अभिनय अप्रतिम आहे. मोजक्याच दृश्यात केवळ डोळ्यांतून व मुद्राभिनयातून इयन होमने विलक्षण ताकदीने उभा केलेला कॅरॉल लाजवाब. आणि अ‍ॅमिलिया शॅन्कली (छोटी अ‍ॅलिस) ह्या दोघांसमोर कुठेही कमी पडत नाही. हा चित्रपट सर्वोत्तम १०० मध्ये मोडत नसला तरी एक दुर्लक्षित मायनर क्लासिक नक्कीच आहे.

चित्रपटाची दोन परीक्षणं इथे (NYT) व इथे (Guardian) वाचता येतील.टॉरेन्ट (सीडर कमी आहेत)

दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले

'अमेली' पाहिला. संवाद अर्थातच कळाले नाहीत. सबटायटल्स वाचणे माझा चहाचा कप नाही. पण विकीवर प्लॉट वाचल्याने जेवढा थोडाफार कळाला तेवढा आवडला.

===
Amazing Amy (◣_◢)

अय्या हा अर्धवट अर्धवट पाहिला. राणी मुखर्जी त्यात एक मराठी ब्राह्मण मुलगी आहे. चित्रपटाने तिने मराठी (मुलींचे) कॉपिराइट अंगविक्षेप मस्त केलेले आढळले.

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

एखादं उदा. देऊ शकाल? अंगविक्षेप की शब्दविक्षेप?

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

जा मेल्या म्हणायला पोरी ओठ वळवतात.

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

धन्यवाद.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

काही चुकलं की आम्ही जीभ बाहेर काढून चावायचो - शाळेतल्या बाईंना अज्जिबात आवडायचे नाही.
तोंडावर हात ठेऊन खुदूखुदू हसणे.

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

मला अय्या अनेक अर्थाने महत्त्वाचा वाटला. त्यातील एक म्हणजे संभोगसूचक दृश्यांमधील फ्रेशनेस! तीच ती गुलाबाची फुलं एकमेकांवर आदळणे किंवा फुलांवर भुंगा बसणे यापेक्षा पेनाचे टोपण चढवणे - उतरवणे, बोगद्यात शिरलेली गाडी, बाइकच्या फ्युएल टँकच्या भोकात पेट्रोलचा दांडा घुसवणे (व अधिकचे पेट्रोल फसफसून बाहेर Wink ) इत्यादी!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अशी अनेक दृष्ये लेस्ली नील्सन च्या 'नेकेड गन' या धमाल चित्रपट सिरीज मधल्या पहिल्या भागात होती. आवर्जून पाहा तो चित्रपट पाहिला नसेल तर.

हा घ्या तो प्रसंग - https://www.youtube.com/watch?v=1_LfUmdR2Mo
दीड मिनिटांनंतर आहे पण आधीची दीड मिनिटे 'घोस्ट' या चित्रपटातल्या प्रसिद्ध दृश्याची उडवलेली खिल्लीही जब्रा आहे.

लेस्ली नील्सन्चा फ्यान - अमुक

धन्यवाद. जबरी हसलो. काही काही तर जुन्या मराठी कादंबर्‍यातील प्रतीके ही आहेत Smile

हैला!
(स्मितहास्य वगैरेमध्ये फाइव्ह स्टार मिळवणार्‍या) अमुकलाही खिदळवून हसवू शकणारे काही आहे हे समजल्यावर घरी जाऊन कधी एकदा ती लिंक पाहतोय असे झालेय SmileWink

दोघांचेही आभार!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

काल टिव्हीवर 'मुव्हीज नाऊ' चॅनलवर लागलेला '३०९६ डेज' नावाचा सिनेमा पाहिला. चित्रपट मोहोत्सवात शोभेल असा सिनेमा होता म्हणजे आर्ट फिल्म टाईप. चित्रपट जर्मनी देशानं प्रदर्शित केला असून भाषा इंग्रजीच आहे.

थोडक्यात चांगला होता चित्रपट. एका १० वर्षाच्या मुलीला एक सायको किडनॅप करतो आणि तिला एका छोट्या खोलीत (केवळ ५४ स्क्वे.फूट खोली) कैद करून ठेवतो, तब्बल ८ वर्ष ती त्याच्या कैदेत असते. ह्या आठ वर्षात किडनॅपर तिला थोडी थोडी सुटका देतो (थोडंफार शारिरीक सुखासाठी म्हणूनही आणि कदाचित तो ही कुठेतरी त्याच्या एकटेपणाला वैतागलेला असतो म्हणून) तिला त्या छोट्या खोली बाहेर आणतो, पण फक्त काही काळासाठी/तासांसाठी. अश्याच संधीचा फायदा घेऊन एक दिवशी ती मुलगी शेवटी त्याच्या कैदेतून पळून जाण्यात यशस्वी होते.

चित्रपटाची कथा बाकी फार विशेष नाही, पण अभिनय उत्तम आहेत. कुठलाही इतर फाफट-पसारा नसल्याने चित्रपट खिळवून मात्र नक्की ठेवतो आणि योग्य त्या वेळी संपतो. चित्रपट फार ग्रेट नव्हता तरीही तो एका सत्य घटनेवर आधारित असल्याने तो संपल्यानंतर बराच वेळ फार डिप्रेसींग वाटत होतं (हेच चित्रपटाचं यश म्हणाव की काय माहीत नाही).

बर्‍याच वर्षापूर्वी "The Castle" नावाचा ऑस्ट्रेलियन सिनेमा बघितला होता. एक सर्वसामान्य माणसाचे घर सरकार विमानतळ वाढवण्यासाठी ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असते. हा माणुस आणि त्याचा वकील कसा कोर्टात कसा लढा देतात आणि जिंकतात ह्यावर अतिशय हलकाफुलका आणि नर्म विनोदी सिनेमा आहे. जालावर मिळाला तर जरूर बघावा.
हा सिनेमा मेलबर्न मधे घडतो आणि तिथे रहाण्याचे भाग्य मिळाल्याने मला जास्तच मजा देतो.

अवांतर : ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या फारच कमी असल्यामुळे तिथले मार्केट छोटे आहे, त्यामुळे तिथे मोठ्या बजेट चे सिनेमे तयार होउ शकत नाहीत. त्यामुळे तिथे बाकी सर्व वस्तुंप्रमाणे मनोरंजन पण आयातच होते.
पण BBC ची बहीण असलेली ABC काही छोट्या सिरीयल्स फार चांगल्या तयार करते. जर कोणाला बघायच्या असतील तर "Crownie" "Slap" बघाव्यात, टोरंट वर आहेत.

तिथली Nowhere Boys ही माझी आवडती सिरीअल आहे. लो बजेट असुनही मस्त टाइमपास आहे विशेषतः सध्याच्या अशा विषयांवरील अमेरीकन Tv shows प्रमाणे अजिबात ब्लडगोर सिन्स अथवा न्यूडीटी वगैरे नसुनही मस्त मज्या येते बघायला. फक्त एकच त्रास आहे मला किमान ४२ मिनिटाचा १ एपिसोड असणारे tv shows आवडतात.. अन ही नेमकी १ एपिसोड २४ मिनिटात संपवते Sad स्टील अ लॉट ऑफ फन

actions not reactions..!...!

काल "imitation game " चित्रपट पाहीला. काय सुंदर आहे. " Alan Turing" चे काम Benedict Cumberbatch यांनी ताकदीने केले आहे. फारच सुंदर सिनेमा आहे. Turing - ज्यांनी पहील्या काँप्युटरचा शोध लावला.
जरुर पहावा असा चित्रपट.

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

कंटाळलो होतो. कंबरबॅचचे काम चांगले आहे पण त्यासाठी चुकुनही चित्रपट बघायच्या फंदात पडु नये. मला कंबरबॅच आवडतो कारण त्याने शरलॉकला न्याय दिला होता, आणी मला शरलॉक आवडतो कारण डॉयले ने त्याला न्याय दिला होता Smile चित्रपटामधे कंबरबॅच सोडुन अजुन बरेच काही आवश्यक आहे. कैरा नाइटली साठी तर अजिबात हा चित्रपट बघु नका, बेंड इट लाइ बेकहॅम पुन्हा बघा ति इतकी आवडत असेल तर.

actions not reactions..!...!

काय सांगता? Sad मला फारच आवडला हा सिनेमा.

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

चांगलाच आहे सिनेमा. एक Drama म्हणून उत्तम आहेच, कंटाळवाणा अजिबात होत नाही. पण आम्हाला काही वेगळ्या कारणांसाठी आवडला.

१. Cryptography - इतर चित्रपटांत हॅकिंग म्हणजे दणादण कीबोर्डावर टायप केलेले की-स्ट्रोक आणि मग चित्रविचित्र कमांड लायनीतील वाक्य मॉनिटरावर उमटणं. मग एक पात्र अचानक म्हणतं- "we're in." च्यायला, हॅकिंग करताहेत.
ट्युरिंगने केलेला crypto analysis, त्यामागची मेहेनत, इतरांपेक्षा प्रचंड वेगळा मार्ग स्वीकारूनही जिद्दीने पुढे जात रहाणं, एनिग्माचे कोड तोडण्यासाठी वापरलेलं मशिन वगैरे गोष्टी बघून बरं वाटलं. कुणीतरी खरंखुरं काहीतरी दाखवताहेत, तेसुद्धा रंजक पद्धतीने.
२. ट्युरिंगची वैयक्तिक शोकांतिका- ते तितकसं माहिती नव्हतं, विकीपलीकडे. पण ट्युरिंगच्या लहानपणापासून ते त्याच्या दु:खद अंतापर्यंतची कथा चित्रपटात समांतर गोवली आहे. तीही आवडली.

पण शेरलॉक म्हणून कंबरबॅकची अदाकारीच बघायची असेल तर हा चित्रपट कदाचित निराश करील.

जे चाललयं ते अजुनही प्रेक्षकापांसुन गोपनीय ठेवायचे सरकारचे बंधन आहे की काय असे समजुन पटकथा लिहली गेली काय अशी शंका येते. एव्हडा भयानक अभिनय नक्कि का चालु आहे याला न्याय या चित्रपटाची पटकथा अजिबात देत नाही. आत्मा नसलेला लावण्यपुर्ण (मृत न्हवे) देह ही उपमा जास्त योग्य, छान दिसतोय तर अवश्य बघा . बाकी ज्या व्यक्तिच्या जिवनावर हा चित्रपट बेतला आहे तो गे होता याकारणावरुन व एकुणच त्याच्याशी ब्रिट्स ज्या पध्दतिने वागले ते बघुन वाइट वाटले. पण अशी प्राइड मोर्चेबांधणीही या चित्रपटाचा अजिबात हेतु नसल्याने नक्कि कोणत्या आघाडीवर हा चित्रपट समजुन घ्यायचा या बाबत भले मोठे प्रश्नचिन्ह दिग्दर्शकाने उभे केले आहे असे माझे मत आहे. ना धड मनोरुग्णांचा अँगल, ना गे लोकांच्या समस्या, ना स्पाय थ्रिलर, ना वॉरफेअर, ना इंजीनिअरिंग विषयी... नक्कि समजुन घ्यायचे काय की कंबरबेच छान अभिनय करु शकतो ? ते तर आधिच माहीत आहे हा त्त्याचा पहिला हॉलीवुडपट अजिबात नाही (स्टार ट्रेक तर फसलेला चित्रपट होता त्यामधे व्हिलनचे काम केल्याबद्दल बेच ला विषेश माफी).


पण शेरलॉक म्हणून कंबरबॅचची अदाकारीच बघायची तर ती आम्ही प्रत्यक्ष शरलॉक मधेही बघत नाही कारण कंबरबॅचने शरलॉकला फक्त न्याय दिला आहे अदाकारीची धमाल तर मार्टीन फ्रीमन (डॉक वॉट्सन) ने आणली आहे. तो नसता तर रंगत प्रचंड कमी झाली असती. विषेशतः शरलॉकला आता GF आहे हे बघुन त्याने जे भाव दाखवले तो अथवा इतर अनेक छोटे मोठे प्रसंग.

actions not reactions..!...!

तुमच्या मताशी साधर्म्य सांगणारे परिक्षण पाहावे मनाचे वरही आले आहे.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

विशेषतः इंटरस्टीलर पचनी न पडल्याने अशा विशयांबाबत तात्पुरते आउट झालेल्यांसाठी सुख द उतारा म्हणता येइल आणी आउट न झालेल्यांसाठी सुरेख हँगोवरही.

actions not reactions..!...!

Is Nehru's Socialism Relevant Today?

http://www.ndtv.com/video/player/left-right-centre/is-nehru-s-socialism-...

सुमारे बेचाळीस मिनिटांची चर्चा. व्हिडिओ. सुरजित भल्ला, अरुण मैरा, जयति घोष, जयराम रमेश वगैरे.

https://www.youtube.com/watch?v=JKHUaNAxsTg
मी नेहमी शास्त्रीय दृष्टीकोन आहे म्हणून सांगणार्‍या सामान्य लोकांबद्दल बोलत असतो. हे महाशय शास्त्रीय दृष्टीकोन सांगणार्‍या शास्त्रज्ञांबद्दलच बोलताहेत. धर्मांचं जसं फिक्स्ड तत्त्वज्ञान असतं तसं विज्यानाचं देखिल एक अकारण फिक्स्ड तत्त्वज्ञान तर उदयास येत नाहीये ना अशी शंका आवडून गेली. वक्ता चर्चचा एजंट आहे असं समजून व्हिडिओ पाहू नकात.

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

काल "द जज" नावाचा सिनेमा पाहीला. अतिनाट्यमय वाटला. २/५
_________
"लास्ट व्हेगस" देखील परत पाहीला. जितके वेळा पहाते, अत्यंत आवडतो.
______________
"ओबेसिटी-अ किलर अ‍ॅट लार्ज" ही डॉक्युमेन्ट्री अफाट आवडते. काल परत पाहीली.

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

ब्रेकिंग बॅड नावाच्या मालिकेचा स्पिन-ऑफ, बेटर कॉल सॉल, चे २ भाग पाहिले. अजून काही विशेष घडलं नाहीये. पण बरी वाटतोये सुरुवात. ब्रेकिंग बॅड मधलं एक पात्र, टुको, गरज नसताना आणलय असं वाटलं. बघू कसे आहेत फुडले भाग ते.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

अमेझॉन हळू हळू चांगल्या सिरीज बनवण्याच्या दिशेने जाऊ लागलेलं आहे. नुकतंच वुडी अ‍ॅलन अमेझॉनकरता एक टेलीव्हीजन सिरीज बनवणार असल्याचे जाहीर झाले. माझ्यासारख्या टीव्हीप्रेमींकरता ही आनंदाची बातमी आहे. अमेझॉनने नुकतंच रिलीझ केलेल्या मोत्झार्ट इन द जंगल नावाच्या सिरीजचा पहिला सिझन पाहिला त्याची ही ओळख.

कथा न्युयॉर्कमध्ये घडते. न्युयॉर्क सिंफनी ऑर्केस्ट्रा इतर कोणत्याही 'क्लासिक' कलेप्रमाणेच सद्ध्या संकटात आहे. श्रीमंताच्या देणग्यांवर हा उद्योग चालवतानाच त्यातील नामवंत कलाकारांचे नखरे सांभाळताना संचालिकेच्या नाकी नऊ आलेले आहेत. रिटाअर होणार्‍या जुन्या कंडक्टरची रिप्लेसमेंट आणि ऑर्केस्ट्राला चांगले दिवस दाखवण्याकरता संचालिका एका नव्या अन-ऑर्थोडॉक्स 'रॉकस्टार' कंडक्टर रॉड्रीगोला नेमते. जुना कंडक्टर, नवा कंडक्टर, इतर कलाकार, श्रीमंत कलाप्रेमी आणि न्युयॉर्क (त्यातील स्ट्रगलींग कलाकार) यांच्यातील केमिस्ट्रीत पहिला सिझन पार पडतो.

एकंदरीत हलकेफुलक्या विनोदाची जोड असलेले कथानक बरे म्हणण्यासारखे आहे. पण अधूनमधून घडणारे तरतरीत प्रसंग मजा आणून जातात. अशा नाविन्यपूर्ण आणि कल्पक प्रसंगांमुळेच हा शो पाहण्यासारखा झालेला आहे. ज्यांना संगीताची आवड आहे त्यांना अनपेक्षीत मेजवानी आणि रसभंग वगैरे अनुभवायला मिळतील, दोन्हीही तसे पुरकच. विशेषतः घरात जर ५.१ साऊंडसिस्टीम (किंवा अधिक) असेल तर मात्र मजा येईल. निव्वळ या मजेकरीता तरी चुकवू नये असा शो.

भारतात आता टिव्हि सिरीयल्सपासून ज्यांना सुटका हवी आहे त्यांच्यासाठी वेब सिरीज निघायला सुरूवात झाली आहे.
याचा पहिला प्रयत्न टिव्हीएफनी "पर्मनंट रूममेट्स" काढून केला आहे. काल पाहावेवर याचे परिक्षणही आले आहे. ते वाचून मग सिरीयल पहायला सुरूवात केली आहे.

पहिला एपिसोड तरी प्रचंड आवडला.

अगदी झटकन रिलेट करता येईल अशा प्रकारचे प्रसंग आणि त्यातून आलेला विनोद वगैरे बघताना टिव्हीवरच्या सास-बहुच्या दळणाला लवकरच इथून क्रिस्प काँपिटिशन मिळणारसे दिसते.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

(कोणी ह्यावर आधी लिहिलं असेल तर माफी असावी. )
हॅप्पी जर्नी पाहिला. चित्रपटाची कल्पना खूपच आवडली- सुरूवातही मस्त. लेकिन परंतु किंतु बट-
spoilers!
१. चित्रपटाची हिरवीन पल्लवी सुभाष - कोण आहे रे ही? का आहे रे ही? वॉशिंगमशीनसुद्धा तिच्यापेक्षा चांगली मराठी बोलू शकेल. ती डायलॉग थुंकते. आणि फरदीन खान तिच्यापेक्षा चांगला अभिनय करू शकेल असं आमचं स्पष्ट मत आहे. ही जिथे जिथे चित्रपटात आहे ती फ्रेम बाद. अतुल कुलकर्णी आणि हिचा प्रेमाचा ट्रॅक अज्याबात झेपला नाही.
२. जानकीचा प्रियकर - ह्याचे काही सीन्स जमले आहेत. पण अचानक तो चित्रपटातून गायब होतो. गा-य-ब. एडिटिंगचा घोळ? नो आयडीया. पण कुंडलकरांना ठाउक असायला पाहिजे काय झोल केलाय ते. बघा जरा.
३. टोन - मधेच विनोदी आणि ०.३४२३२३ सेकंदात गंभीर. आपण विनोदाला हसेपर्यंत अचानक वातावरण गंभीर होतं. हे उगाच टाकलं.
४. मध्यंतरानंतर चित्रपट भरकटेश. बहीण भावाच्या नात्याकडून एकदम रोमान्स, प्रेम की जीत वगैरे.

अतुल कुलकर्णी आवडला- त्याचे काही प्रसंग झकास झाले आहेत.
थोडक्यात, एकदा नक्कीच बघण्यासारखा आहे.

अवांतर - अ.कुने ठोक़ळा नयिकांबरोबर काम करण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलंय का? आधी ती सागरिका घाटगे आणि आता पल्लवी सुभाष.

मिशन इंपॉसिबल -३, द आयलँड, हू अ‍ॅम आय, इ इ असे सहा -सात हॉलिवूडपट पाहिले. पैकी हू अ‍ॅम आय गोड वाटला. हा जॅकी चॅन आपल्या पिक्चर मधे कोणाला मारून टाकत नाही असे वाटते. गोड गोड फाइट करून सोडून देतो. (पटकन कोणत्याही पिक्चर्मधे) त्याने कोणाला क्र्रपणे मारून टाकल्याचा सीन डो़ळ्यासमोर येत नाहीय.

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

अजो, हू एम आय फार पूर्वी अनेकदा पाहिला होता. एकदम धमाल चित्रपट आहे. त्यानंतर अनेक वर्षे शोधत आहे पण मिळाला नाही. त्यातले एक थीम साँग टाईप सतत वाजणारे ट्रायबल गाणेही मस्त आहे. जॅकी चॅन च्या माझ्या सर्वात फेवरिट चित्रपटांपैकी अक (रश अवर-२ हा आणखी एक)

रश अवर-२ कहर भारी आहे!!!

अतिअवांतर- रश अवरच्या हिंदी डबिंगला सुमीत राघवनचा आवाज आहे. त्यात पण प्रचंड धमाल. त्याचा प्रत्येक डायलॉग पाठ आहे.

फार फार दिवसांनंतर थेट्रात तिकिट काढून पिच्चर पाहिला.
चित्रपटाचं नावः- बदलापूर
पैसे वाया गेलेत असं वाटलं नाही.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आवडला सिनेमा...

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

अरे फुडे सांगा ना काहीतरी. मराठी आहे की हिंदी? कथाबिथा काय आहे?

*********
आलं का आलं आलं?

हिंदी आहे इतकेच सांगू शकतो. कथेबद्दल कल्पना नाही कारण मी अजून पाहिला नाही. पण बदल्याच्या भावनेतून घडलेली कथा इतकं सांगू शकतो.

उत्कंठा वाढवणारं परीक्षण असच असतं मिष्टर...
पण सिनेमाबद्दल सांगतोच थोडं. हा सिनेमा एका सूडाची अर्थात बद्ल्याची गोष्ट आहे. एका बॅंक दरोड्यात नवाझुद्दीन आणि त्याचा साथिदार वरूण धवनच्या बायको-पोराला मारतात. आणि मग वरूण धवनच्या सूडाबद्दलचा सिनेमा. तो बदला आपल्या डोक्यातून जाऊ नये म्हणून वरूण धवन बदलापूरला राहतो. (हा माझा कयास) अनेक वर्षांनी तो सूड उगवतो. पण सिनेमा एवढा सरळसोट नाही. नवाझुद्दीन, त्याचा साथिदार विनय पाठक आणि वरूण धवन सगळ्यांची काळी बाजूदेखील छान दाखवली आहे. बराच डार्क आहे. लैंगिक सीन्स भरपूर... मध्ये मध्ये फ्लॅशबॅक उगाच...

मला विशेष आवडलेली गोष्ट म्हणजे सिनेमातलं तुरुंगाचं चित्रिकरण. कधी पाहिलं नव्हतं एवढं डिटेलवारी चित्रिकरण.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

बघनार!

बदला डोक्यातून जाऊ नये म्हणून बदलापूर! लोल!

*********
आलं का आलं आलं?

आयला जबरीच. आता पाहणारच.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

मस्त आहे! मला आवडला. नवाझुद्दीन, विनय पाठक, हुमा, राधिका आपटे, इव्हन ती गुप्तहेर बाई, नवाझुद्दीनची आई, इन्सपेक्टर सगळ्यांनीच छान काम केलय.
मी पाहिलेला वरुण धवनचा पहिलाच चित्रपट. तो ज्या पद्धतीचा लूक देतो विनय पाठकला वगैरे ते आवडलं. पण पंधरा वर्षांनीही तो आणि हुमा तरुणच दिसतात ते थोडं ऑड वाटलं.
मिस लव्हली लिप्स हुमाचा सेन्शुअस डान्स आणि तेव्हा वाजणारे गाणे डोक्यात अडकलय.

तुरुंगाच चित्रीकरण एक हसीना थी, तीन दिवारेंमधेदेखील चांगलय.

===
Amazing Amy (◣_◢)

गाणं एकदम कॅची आहे!
@सेन्शुअल डान्स= तिचा नंतर "नाईलाजाने" केलेला नाच जास्त आवडला- चेहेरा निरिच्छ ठेवून केलेला डान्स भारीच!

या चित्रपटाला सेंसॉरचं अप्रूवल मिळालं कसं याचं नवल वाटतंय. चित्रपटात स्त्रीयांचं चित्रण आणि चरित्रीकरण अतिशय निंदनीय पद्धतीनं केलं आहे. पिक्चरमधे हिरो म्हणून दाखवलेला माणूस व्हिलन आहे, त्याच्यापेक्षा व्हिलन खूप बरे आहेत. पण कोण विकृत आहे आणि कोण सामान्य आहे हे सामान्य प्रेक्षकाला कळण्यापूर्वीच पिक्चर संपतो आणि हिरो विकृत आहे हा संदेश पुरेश्या स्पष्टतेने जात नाही.
पुन्हा एकदा, बदला दाखवायच्या नावाखाली स्त्रीयांचं जे चित्रीकरण केलं आहे त्याची निंदा करायला शब्द अपुरे आहेत.

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

आज ऑस्कर पाहिले. बरेच प्रेडीक्टेबल होते. शो ठीक वाटला.

+१

छान छान पद्धतीच्या व रंगाच्या गाउन्स मध्ये दिसणार्‍या अनेक तारका मात्र यावेळी इतके फिकट कलर्स घालून आल्याने (मध्येच न्युडीटीचा भास झाल्यासारखी रचना असल्यास क्षणिक सुखावायचो मात्र अन्यथा) कंटाळवाणा लुक आला होता Sad

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

शो पण कंटाळवाणा वाटला. सेट डिजाइन पण ठीक वाटले. बऱ्याच वेळेला 'बुडापेस्ट हॉटेल' चा सेट मागे होता.
काही भाषणे आवडली परंतु बॉयहूड साठी नक्कीच वाईट वाटले.

शो पण कंटाळवाणा वाटला.

+१, अत्यंत रटाळ वाटला. निल पॅट्रीक हॅरीस फार भावला नाही, अगदी वाईट केलं असंही म्हणता येणार नाही (जेम्स फ्रॅंको बरोबर कंपेअर केल्यास उत्तमच म्हणावे लागेल) पण 'जान' नव्हती शो मधे असं जाणवलं.

(१) चलती का नाम गाडी
(२) चुपके-चुपके
(३) लंचबॉक्स

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

डेव्हिड सुशेने जिवंत केलेला प्वारो कितीही वेळा पाहायचा कंटाळा येत नाही. १९८८ ते २०१३ ईतक दीर्घ कालखंड काम करूनही अभिनय तितकाच टवटवीत ठेवलाय डेव्हिड सुशेने.

सालामांडर ही बेल्जियन, बोर्गन, मर्डर, द ब्रीज ह्या डॅनिश मालिका पाह्यल्या एकूणच दर्जा ऊत्तम होता. विशेषतः बोर्गन. डेन्मार्कमधे आघाडीच्या राजकारणात राहूनसुद्धा सतत भरीव आणि समाजाभिमुख काम करायचा विडा उचललेल्या एका महिलेची कथा ह्यात सुंदर पद्धतीने मांडल्येय. सिडबे बाबेट नुद्सेन ही वास्तविक विनोदी अभिनयासाठी प्रसिद्ध आहे, पण ह्या गंभीर भुमिकेत तीने कमाल केल्येय. मालिका राजकिय, प्रशासकिय, सामाजिक, कौटूंबिक पैलू फार छान दाखवते.

जेमीज ग्रेट ब्रिटन ही मालिकाही आवडली. जेमी ऑलिव्हर ह्या अती लाडावलेल्या (पण सामाजिक जाणिव जाणिवपूर्वक दाखवणार्या) शेफचा हा शो. प्रदेशातून आलेल्या लोकांमुळे ब्रिटनची खाद्यसंस्कृती कशी वाढली आणि सुधारली ह्याचा आढावा तो घेतो. अनेक "ब्रिटिश" पदार्थ कसे परकिय आहेत ते ही तो उलगडून दाखवतो. त्याने एका मिलिटरी ट्रकलाच त्याच फिरत घर्/पाकशाळा/पब बनवला आणि त्यातून ब्रिटनभर फिरत लोकांना भेटत, संवाद साधत, जेवण बनवत हा कार्यक्रम केला. मस्त आहे!!!

=======================================================================
छिन्नी हातोड्याचा घाव, करी दगडाचा देव, सोशी दैवाचे तडाखे त्यास मानूस ह्ये नाव.....