एक पोएटीक कन्फ़्युजन झालय

मी अनेक वर्षांपुर्वी एक सुंदर गझल जगजित सिंग च्या आवाजात ऐकली होती. ती प्रचंड आवडली होती. तीच्या मधुर चालीमुळे ती डोक्यात अधुनमधुन घुमत राहयची. नंतर ती कॅसेट (ती काळ्या फ़िल्म वाली) हरवली मात्र गझल डोक्यात रुतुन बसली. तिचे शब्द व त्यांचा एक मनात लागलेला अर्थ देखील तसाच फ़ीट्ट झाला. आपले गैरसमज जसे घट्ट होउन जातात तसाच. मी ती बेहोश गुणगुणत असे व मोठा आनंद मला ती गझल गुणगुणतांना व्हायचा. तिचा अर्थ त्यातले शब्द व सर्वात महत्वाच म्हणजे जगजित चित्रा चा आवाज तर खुपच पागल करायचा, प्रचंड आवडायचा. पुढे वय वाढल ( सध्या मी नव्वदीच्या घरात आहे, तब्येत ठणठणीत आहे, पाचन संस्था कायम चुर्णा शिवाय ही व्यवस्थीत काम करते, छान ५ कीलोमीटर फ़ीरतो, संध्यानंद नियमीत वाचतो, होणार सुन मी ह्या घरची नियमीत बघतो, रोहीणी ताइंचा अभिनय भावतो. नायिका फ़ारच.... असो जास्त लिहायला लागलो तर तोल ढळतो)

तर वयोमानामुळे काय होत की आम्हा वृध्दांचा एकात दुसर मिक्स होउन घोळ फ़ार वाढतो. आमचा नॉस्टेल्जीया भावना विचार या सर्वांचा एकत्रित गुंता होत असतो.( वन हंड्रेड इयर्स ऑफ़ सॉलिट्युड या मार्क्वेझ च्या महान कादंबरीतल्या ओल्ड बुकसेलर चा मुळ गावी परततांना उडतो तसा गोंधळ होतो तो उतारा फ़ार सुंदर आहे राव नॉस्टेल्जीया वरचा जरुर वाचा नसेल वाचला तर) त्यामुळे आम्हाला कधी कधी कळत नाही की काय होत की कुठल्या गाण्याचा काय अर्थ आहे ओळ काय होती त्यापेक्षा मुळ सोडुन दुसरच काहीतरी डोक्यात बसत व त्याने मोठी गंमत उडते एक स्वीट पोएटीक कन्फ़्युजन तयार होते. तर या गाण्याच इतकच माहीत होत की समवन समव्हेअर या जगजित चित्रा सिंग ने त्यांच्या एकुलत्या एक १८ वर्षा च्या कोवळ्या वयाच्या मुलाच्या अपघाती मृत्यु नंतर काढलेला हा सुंदर अलबम होता. ( त्या देखण्या मुलाचा त्या दोघांबरोबर चा फ़ोटो त्यावर होता तो अजुनही कसा काय कोण जाणे स्पष्ट आठवतो) तर गझल व त्याच्या मला आठवत असलेल्या ओळी अशा होत्या. आणि त्याचा अर्थ मला मोडका तोडका उमजलेला मी असा लावत होतो.

कोइ समझेगा क्या राज-ए-गुलशन
जब तलक ना उलझे काटो से दामन
गुलशन – बगिचा

अर्थ सहज लागतो. बगिचा उद्यान हे जीवनाच प्रतिक आहे. जीवनाचा खरा अर्थ तेव्हाच कळेल जेव्हा जीवनातील कठोर वास्तवाला सामोर जाल, जीवनातल्या काट्यांशी दु:ख वेदना मृत्यु नुकसान अपयश विरोध आदिंशी सामना होइल तेव्हाच जीवनाचा अर्थ गवसेल असे कवि म्हणतो. तोपर्यंत खर जीवन काय आहे कळणारच नाही. कळण शक्य नाही. एक आग का दरीया है गुजर के जाना है सारखा भाव.

यक बयक सामने आ न जाना
रुक ना जाए कही दिल की धडकन

यक बयक एकाएकी अचानक च जर जीवन तुमच्या समोर त्याच्या पुर्ण अक्राळविक्राळ स्वरुपात आलं, तर तुम्ही त्याला पेलु शकणार नाहे. यु कुड नॉट हॅन्डल इट. महाभारतात कृष्ण जसा अर्जुना ला विश्वरुप दर्शन घडवतो ते अर्जुनाला जस पेलवत नाही त्याने तो मुर्छीत होतो तस काहीस. म्हणजे स्टेप बाय स्टेप जीवनाचा एक एक पैलु तुमच्या समोर येत गेला तर तेच चांगल आहे. एक एक करुन तुम्ही ते आकलन करु शकता , चिंतन करु शकता पचवु शकता. हळुवारपणे राइप होण्यात मजा आहे. पण अचानक येउन आदळली जीवनातील वेदना दु,:ख आदि तर रुक ना जाए कही दिल की धडकन

गुल तो गुल खार तक चुन लिए है
फ़िर भी खाली है गुलची का दामन

ही ओळ ही तशी सरळ आहे जीवनात जाणवणारी सार्वकालीक व्यर्थता रीक्तता. सर्व फ़ुल जीवनरुपी उद्यानातली तोडली सर्व भोग भोगले तरीही अजुन एक पोकळी आहेच ती जाणवतेय थोडा है थोडे की जरुरत अभी है . कींवा हजारो ख्वाहीशे ऐसी की हर ख्वाइश पे दम निकले बहोत निकले मेरे अरमॉ फ़िर भी कम निकले. सनातन अतृप्ती त्या गुलची ला जाणवतेयं जी आपल्या सर्वांचाच अनुभव असतो.

आता इथे पुढील दोन शेर मध्ये माझ्या मेमरी ने सरमिसळ केली मी अशा ओळी डोक्यात बाळगुन होतो व गंमत म्हणजे एक अर्थ ही लावुन घेतला होता. तो शेर चुकीचा असा

कितनी आराइश-ए-आशियाना
बर्कं को दोस्त समझु के दुश्मन ?

गझल मध्ये एक एक शेर स्वयंपुर्ण असतो तो स्वतंत्र अर्थ असतो व त्यांचा गुछ म्हणजे गझल असते. या न्यायाने एक स्वतंत्र अर्थाचा हा शेर म्हणुन मला तो उर्दु तल्या नेहमीच्या प्रतिंका च्या आधारे असा वाटला किंबुहना मी असा चुकीचा अर्थ लावत होतो. तर मी असा अर्थ लावत होतो की हा एका पक्ष्याच्या पॉइंट ऑफ़ व्ह्यु लिहीलेला शेर आहे. जणु एक छोटा नाजुक पक्षी आपल्या घरट्या कदे आशियाना कडे बघुन म्हणतोय की
कितनी आराइश-ए-आशियाना
काय सुंदर रोशणाइ आहे माझ्या घरट्याची काय सुंदर दिसत आहे माझ घरटं या उजेडात या विजेच्या लखलखाटात. म्हणजे रात का वक्त है बिजली कडक के चमकी है और उसकी रोशनी मे क्या जगमगॉ के उठा है मेरा घरौंदा. मेरा आशियाना. तर तो पक्षी हरखुन गेलाय स्वत:च्या घरटुल्याच ते सुंदर रुप बघुन ती लकाकी बघुन. आणि हे सर्व कशामुळे घडुन आलय तर बर्कं मुळे बिजली मुळे बर्क हीच कारणीभुत आहे त्याच्या घरट्याच सौंदर्य वाढवण्यात. त्याची दिवाळी च साजरी केलीय जणु विजेने.
आणि पुढच्या ओळीत तो पक्षी दिल चिर के जाने वाला सवाल पुछता है की बर्कं को दोस्त समझु के दुश्मन ? की आता विज कडाडलेली आहे आणि ती माझ्या घरट्या वर पडणार आणि माझ घरटुल ही विज कायमच उध्वस्त करणार. मग तो विचारतो की माझ घर उजळवुन टाकणार्या मला अफ़ाट सौंदर्याचा प्रत्यय देणारया या विजेला यासाठी माझा मित्र समजु की पुढच्याच क्षणी माझ घरट कायमच उध्वस्त करेल म्हणुन माझा शत्रु समजु. ?
कविने एक अतिशय नाजुक क्षण चिमटीत पकडलाय असे मी समजत होतो. हा वरील दोन क्रमांकाची चुकीची ओळ लावल्याने बदललेला अर्थ होता. मुळ ओळ काळाच्या ओघात विसरल्याने खाली वर ओळ लागल्याने भलताच अर्थ मी लावुन बसलेलो होतो. वरील चुकीचा सेकंड इफ़ेक्ट शेवटाच्या लाइनलाही लागलाच
शेवटची ओळ मी अशी चुकीची डोक्यात घालुन बसलो होतो. ती अशी की

अजमत ए आशियाना बढा दी
टुट जाए ना शाख ए नशेमन

साहजिकच या ओळीचा अर्थ लागत नव्हता अडखळत होतो. कारण ती ऒळ मुळात अशी नाहीच तर अर्थ कुठुन लागणार ? वरती चुकुन अपघाताने अर्थ लागला होता
इथे जमतच नव्हत. मी ही सोडुन दिल कारण अजमत शब्दाच आकलन नव्हत पुढे एक सुंदर मराठी उर्दु डीकशनरी मिळाली श्रीपाद जोशी यांची( अत्यंत उत्कृष्ट अप्रतिम उर्दु मराठी डिक्शनरी) त्यात वरील कीडा वळवळत च होता म्हणुन अगोदर अजमत शब्दाचा अर्थ बघितला तर तो श्रेष्ठत्व महत्व प्रताप आदर असा निघाला
अर्थ जोडुन बघितला तर काहीच अर्थबोध होत नव्हता एका विक्षीप्त दर्दी जाणकार मित्राकडे गेलो त्याला सांगितल तो नेहमीच्या शैलीत म्हणाला अरे ..... तु ते सोड वो तेरे बस की बात नही उसके लिए डीफ़्रंट सेन्सीबिलीटी मंगता है. मी त्याला सोडुन तो विषय ही सोडुन दिला. नंतर एक दिवस रेल्वे स्टेशनवर एक जगजित चित्रा च्या गजल च्या लिरीक्स च पुस्तक मिळाल ते वाचतांना ही गझल सापडली उत्सुकतेने ते वाचु लागलो तर धक्काच बसला
मुळ ऒळी ची मी केलेली भयंकर सरमिसळ लक्षात आली. थोडा वेळ घाबरलो च्यायला आपल आता कस व्हायच मेमरी तर फ़ारच धोका द्यायला लागली राव. ओरीजीनल ओळी अशा क्रमात होत्या

कितनी आराइश ए आशियाना
टुट जाए ना शाख-ए-नशेमन
ही मुळ बरोबर ची ओळ होती

दुसरा शेर असा होता
अजमत- ए-आशिया ना बढा दी.
बर्क को दोस्त समझु के दुश्मन ?

तर असे पोएटीक कन्फ़्युजन झाले मग मी म्हटल जाउ द्या बघु आता बरोबरीचा काय अर्थ आहे तो आणि या वेळेस ठरवल की जाणकारांनाच विचारु
तुम्ही प्लिज मला सांगाल का योग्य अर्थ काय आहे तो ?
कारण नव्याने अर्थ लावण्याच वय आता माझ राहील नाही. व मेमरी वर तर अजिबात भरवसा करता येत नाही. विक्षिप्त मित्र मला लायकच समजत नाही तो
जाए तो जाए कहॉ ?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

ते ’नाथ’ आणि ’स्वामी’ । त्यांना त्वरीत उमजे
इश्की, दमिष्कि, दिल्नूर । काहीच नाहि समजे !
जरि या मराठमोळ्या । कट्टयास बोध व्हावा,
तरि फारशी-मराठी । त्यां कोश पाठवावा.

Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधीच धड ना उर्दु समजे
त्यात आता ही मराठी ही न उमजे
आता काय करावे आम्ही काहीच न समजे
तुम्हीच हे कोडे उलगडावे. शीघ्र वदावे
कोण हे नाथ कोण हे स्वामी ?
आम्ही होउ तुमचे आजन्म उतराई.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कितनी आराइश-ए-आशियाना
टूट जाये ना शाख-ए-नशेमन

आराइश म्हणजे सजावट, डेकोरेशन, अडॉर्नमेन्ट. रोशणाई नव्हे.
घरट्याची (घराची) किती ही सजावट. ह्या नादात ज्या फांदीवर घरटे बांधले आहे तीच तुटायची. ह्याचा मी लावलेला अर्थ असा - अधिकाधिक भौतिक सुखांच्या मागे लागताना आपण आयुष्य ज्या तत्त्वांच्या आधारावर उभे आहे त्यांनाच विसरतो आहोत, पतनाकडे चाललो आहोत.

अज़्मत-ए-आशियाना बढा दी
बर्क़ को दोस्त समझू के दुश्मन

अज़्मत=माहात्म्य, महिमा, श्रेष्ठता, मोठेपणा, ग्रेटनेस, ग्रॅन्ज्यर, ग्लोरी.
वीजेने कोसळण्यासाठी लाखो घरांतून माझ्या घराची निवड करून माझ्या घराला व मला मोठेपणा दिला, माहात्म्य बहाल केले. माझा बहुमान केला. परंतु हेही खरे की तिच्यामुळे माझ्या घराची (आयुष्याची) राखरांगोळी झाली. त्यामुळेच माझी अशी द्विधा मन:स्थिती झाली आहे. तिला मित्र म्हणावे की शत्रू हिच उमगत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले

>>आराइश म्हणजे सजावट

आरास हा शब्द यावरून आलाय तर....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तुम्ही सांगितल्यावर डिक्शनरी त बघितला अगदि अचुक अर्थ सांगितला तुम्ही आराइश या शब्दाचा आराइश (मुळ फारसी ) सजावट असा अर्थ दिलेला आहे. थत्ते म्हणतात तसा आरास या मराठी शब्दाच मुळ या शब्दात असु शकत. कारण अनेक मराठी शब्द फारसी वरुन मराठीत आलेले आहेत. मागे एक सदर होत यु.म.पठाण यांच लोकमत मध्ये एक एक फारसी मुळ असलेला मराठी शब्द घेउन ते त्याच फार सुंदर एटीमॉलॉजी उलगडुन दाखवायचे.
मी डिक्शनरी न बघताच अर्थ लावत होतो. मी रोषणाई हा अर्थ अशा साठी लावत होतो की दुसरा बर्कं हा शब्द परीचयाचा होता त्याच्या आधारे याचा अंदाजा ने अर्थ लावला होता. अंदाज अर्थातच हवामान खात्याचा निघाला ते तर दिसतच आहे.
पण मिलींद जी जो दुसरा शेर आहे अज्मत चा जो अर्थ तुम्ही सांगताय तो मात्र थोडा अपील नाही होत आहे हो म्हणजे विजेने माझ्या घराची निवड केली यात त्याला गौरव प्रतिष्ठा कशी वाटेल अजमत चा कुठलाही अर्थ लावुन पाहीला तरी ते थोड मनाला काही केल्या पटत नाहीये.
म्हणजे अजमत या शब्दाच्या अर्थाविषयी काहीच शंका नाही त्या पुर्ण शेर चा जो अर्थ तुम्ही सांगताय तो जरासा कन्व्हीनसींग वाटत नाही इतकच म्हणतोय
आणि वरचा पहील्या क्रमांकाचा जो शेर आहे त्याचा अ-अध्यात्मिक भौतिक अंगाने जाणारा अर्थ देखील अभिप्रेत असावा अशी ही एक शंका येत आहे.
असो
मात्र तुम्ही जे सुंदर विश्लेषण केले त्यासाठी अनेक अनेक आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे विजेने माझ्या घराची निवड केली यात त्याला गौरव प्रतिष्ठा कशी वाटेल अजमत चा कुठलाही अर्थ लावुन पाहीला तरी ते थोड मनाला काही केल्या पटत नाहीये.

'नशेमन'ला काय वाटावे, कोणी सांगावे, नाही का?
.....................................

संदर्भाकरिता माझा खालील प्रतिसाद पहावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आराइश म्हणजे सजावट, डेकोरेशन, अडॉर्नमेन्ट.

बोले तो, (आतापावेतो इतर असंख्यांनी म्हटल्याप्रमाणे) मराठीत 'आरास'च ना?

(बाकी, 'नशेमन' म्हणजे काय? क्वार्टर-दोन क्वार्टर व्हिस्की (किंवा कोणतीही 'शराब') ढोसलेले मन?)

('जला के मेरे नशेमन को आसमाँ भी जला'... बापरे, यांच्यात बेवड्यांसाठी फारच भयंकर शिक्षा आहेत!)

अज़्मत=माहात्म्य, महिमा, श्रेष्ठता, मोठेपणा, ग्रेटनेस, ग्रॅन्ज्यर, ग्लोरी.

'अज़ीम' किंवा 'आज़म'पासून 'अज़्मत' काय? ('बोर'पासून 'बोरियत', तसे?)
.........................................................................................................
'मन' - आता 'म्न' - हा आयडी नव्हे. ऑल्दो, मनोबांनी दोन क्वार्टर ढोसण्यास माझी कोणतीही हरकत नाही, परंतु तरीही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नशेमन म्हणजे घरटे असा अर्थ होतो.
एक जुने हिंदी गाणे आहे
दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है.
उम्र भर का गम हमे इनाम दिया है.
त्यात पुढे एक ओळ येते
अपने ही गिराते है नशेमन पे बिजलियॉ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ठीक.

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे असे पोएटिक कन्फ्युजन माझं ही होतं मारवा जी. अगदी अस्सच Smile
ती गायिका कही वेगळं गाते अन माझ्या मनात लक्ककन काहीतरी अनवट अन सुंदर चमकुन जातं.
.
कवितेची ओळ वाचता वाचता, एकदम वेगळीच दुनिया दिसते.
.
हे ब्लेसिंग समजा. अगदी खात्रीने सांगते मी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समं, या धाग्यावरती "बुकमार्क करा" लिन्क का दिसत नाहीये? अमक्या अमक्या रीड्स च्या पुढे असायला हवी होती.
फार परिश्रमाचे काम नसेल तर यात लक्ष घावे ही विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फारशी मराठी वगैरे कोश वाचून नाही कळणार शेर शाइरी.तेवढी तरलताच नाही माझ्याकडे.
मारवा ,अरविंद छानच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तच गझल आहे! जगजीतची असूनही कधी ऐकली नव्हती. आता ह्या चर्चेमुळे ऐकाविशी वाटतेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0