जालावरचे दिवाळी अंक २०१४

आपण गेली दोन वर्षे 'ऐसी अक्षरे'वर विविध जालीय दिवाळी अंकाचा आढावा/मागोवा (२०१२ | २०१३) घेत आहोत. याही वर्षी आता जालावर दिवाळी अंक प्रकाशित होऊ लागतील. काही प्रकाशित झाले देखील असतील. हा धागा अश्याच जालावरील दिवाळी अंकांबाबत चर्चा करण्यासाठी आहे. तुम्ही वाचलेल्या, माहित असलेल्या आणि जालावर उपलब्ध असलेल्या दिवाळी अंकांबद्दल इथे मनमोकळी चर्चा करू शकता, समीक्षा करू शकता, परिचय करून देऊ शकता आणि आपली मते मांडू शकता.

वाचकांच्या सोयीसाठी पहिल्या पानावर ऐसीअक्षरेसोबतच जालावरील वेगवेग़ळ्या दिवाळी अंकांचा दुवा देण्याची प्रथा चालु रहाणार आहे. तेव्हा अंकांची माहिती देताना, चर्चा करताना त्या अंकाचा दुवा दिलात तर तो पहिल्या पानावरही टाकला जाईल याची नोंद घ्यावी.

इथे केवळ अंकांचे दुवेच नाहीत तर त्या अंकांत काय वाचाल? याविषयीच्या सुचवण्या देता आल्या / अधिक व्यापक मते-टिपण्ण्या करता आल्या तर अधिक आनंद होईल / उपयुक्त होईल.

चला तर आस्वाद घेऊया यंदाच्या जालीय दिवाळी अंकांचा!

नोंदः संदर्भासाठी गेल्या दोनवर्षांतील विविधजालीय दिवाळी अंकाचे दुवे या धाग्यावर उपलब्ध आहेत.

field_vote: 
0
No votes yet

मिसळपाव.कॉम दिवाळी अंक प्रकाशित झालेला आहे.
तो इथे वाचता येईल

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मिपा आणि ऐसीच्या दिवाळी अंकाची पीडीएफ आवृत्ती अजूनही आली नाहिये त्यामुळे ते जोपर्यंत येत नाहित तोपर्यंत वाचायचेच नाही असे मी ठरवले आहे.
अरे जरा दिवाळी अंक वाचल्याच्या फील येऊद्या की लोकहो ! उगा आपले रोजचे धागे वाचतोय असे वाटतेय.
जोपर्यंत पीडीएफ आवृत्ती येत नाही तोपर्यंत ते दिवाळी अंक वाचणार नाही अशी मी जाहीर शपथ घेत आहे.

जोक्स अपार्ट, मिपाच्या दिवाळी अंकातील लेखांवर प्रतिक्रिया दिल्यास तो लेख "मुख्य प्रवाहात" मिक्स अप होत नाही. तसे ऐसीच्या दिवाळी अंकातही केले असते तर बरे झाले असते. धर्मराज मुटके साहेबांशी याबद्दल सहमत आहे.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

यंदा मिसळपाव आणि मायबोली आणि ऐसी. अजून कुठे आहेत जालीय अंक?

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मायबोलीच्या अंकाचा दुवा मिळेल काय?

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मलापण दिसला नाही माबोचा दिअं. दुवा आहे का कोणाकडे?

===
Amazing Amy (◣_◢)

आलाय का? गेल्या वर्षी बलिप्रतिपदेच्या दिवशी प्रकाशित झाला होता.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ओह. आला नाहीय मग अजून. वरचा मेघनाचा प्रतिसाद वाचून कंफ्यूज झाले Smile

===
Amazing Amy (◣_◢)

डिजिटल दिवाळी २०१४
http://digitaldiwali2014.wordpress.com/

चेपुवर ज्युनियर ब्रह्मे त्यांच्या ट्रेडमार्क शैलीत या अंकाची कचकावून जाहिरात करत होते. ("हर्क्यूल पायरो आणि चिवड्यातले शेंगदाणे" वगैरे)

अंकाची पिवळीधमक पार्श्वभूमी पाहून वाचण्याची इच्छा + हिंमत अजून झाली नाहीये.

*********
आलं का आलं आलं?

आता तो पिवळाधमक रंग आधीच्या तुलनेत थोडा मातकट केल्यासारखा दिसतोय.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बरं केलं. नाहीतर नाकावर बुक्की घातल्याचं फीलिंग येत होतं.

*********
आलं का आलं आलं?

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तो गेल्या वर्षाचा आहे. मार्चमधे ऑनलाईन मधे काही भाग प्रकाशित केला.

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

ओह ओके. मी घाईत महिना बघितलाच नै!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मायबोली.कॉम चा ही अंक प्रकाशित झाला आहे नुकताच
http://www.maayboli.com/hda/hda_2014/

येथे दिसणार्‍या चित्रावर क्लिल केलेत की सगळी सदरे दिसतील.

वेबपेज खूप सुंदर आहे हे. रचनाही उत्तम वाटली. ( वेगवेगळ्या सदरांतील साहित्यावर एकाच पानावरून navigate करता येतंय) मेन्यू बार मधून...

बॅटमॅन, धर्मराजमुटके साहेबांचा सल्ला पटला: दिवाळी अंकातील साहित्य आणि नेहेमीचे लेख्/चर्चा ह्या पूर्णपणे वेगळ्या दिसल्या तर बरं होईल.

आहे की इथे: http://aisiakshare.com/dtracker14

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हो- दिवाळीचं वेगळं साहित्य नक्कीच आहे. पण आपल्या नेहेमीच्या trackerमधेही ते साहित्य दिसतं... ते जरा विचित्र वाटतं ( कदाचित माझ्या मनात दिवाळी/ऐसी असे दोन कप्पे असतील).

कोणत्याही व्यवस्थेप्रमाणे या व्यवस्थेचे फायदे व तोटे दोन्ही आहे
फायदा असा की अनेक लगबगीने वाचणार्‍या वाचकांप्रमाणेच निवांतपणे दिवाळी अंक वाचणारेही अनेक असतात. दिवाळी अंकाचा वेगळा सेक्शन केल्यास काही काळाअने तिथे मिळणारा प्रतिसाद दुर्लक्षिला जाऊ शकतो. त्यापेक्षा कधीही प्रतिसाद दिला तरीही तो वाचकांच्या लक्षात येणे, नवा प्रतिसाद मिळालेले लेखन सतत वर दिसणे वगैरे फायदा दिवाळी अंकातील लेखांनाही मिळतो.

त्याच बरोबर ऐसीवर येणार्‍या नव्या वाचकाला उत्तमोत्तम लेखन मुळ अनुक्रमणिकेतच मिळते. ज्यामुळे संस्थळाला एक चांगला वाचक/लेखक मिळण्याची शक्यता वाढते.

तोटे आहेतच पण संपादकमंडळाने यावर दोन वर्षांपूर्वी बरीच चर्चा करून या प्रकारचे प्रकाशन ठरवले आहे - तेव्हा त्या तोट्यांची कल्पना आहे.

अर्थात, या तसेच इतरही विषयांबद्दल सुचवण्यांचे स्वागतच आहे.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मलादेखील हीच पद्धत आवडली आणि योग्य वाटते.

===
Amazing Amy (◣_◢)

या पानावर 'विशेष अंक' या शीर्षकाखाली उजव्या बाजूला यंदाचे साधनेचे अंक आहेत. बालकुमार, युवा, आणि मुख्य दिवाळी अंक.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन