जालावरचे दिवाळी अंक २०१२
दिवाळी येण्याची चाहुल जशी फराळ, कपडे आदींमुळे लागते तसेच दिवाळी अंकांच्या आगमनानेही. बदलत्या काळात आता जालावर दिवाळी अंक प्रकाशित होऊ लागतील. काही प्रकाशित झाले देखील आहेत.
हा धागा अश्याच जालावरील दिवाळी अंकांबाबत चर्चा करण्यासाठी आहे. तुम्ही वाचलेल्या, माहित असलेल्या आणि जालावर उपलब्ध असलेल्या दिवाळी अंकांबद्दल इथे मनमोकळी चर्चा करू शकता, समीक्षा करू शकता, परिचय करून देऊ शकता आणि आपली मते मांडू शकता.
वाचकांच्या सोयीसाठी पहिल्या पानावर आंतरजालावरून या सदरात जालावरील वेगवेग़ळ्या दिवाळी अंकांचा दुवा देण्याचाही मानस आहे. तेव्हा अंकांची माहिती देताना, चर्चा करताना त्या अंकाचा दुवा दिलात तर तो पहिल्या पानावरही टाकला जाईल याची नोंद घ्यावी.
इथे केवळ अंकांचे दुवेच नाहीत तर त्या अंकांत काय वाचाल याविषयीच्या सुचवण्या देता आल्या / अधिक व्यापक मते-टिपण्ण्या करता आल्या तर अधिक आनंद होईल / उपयुक्त होईल.
चला तर आस्वाद घेऊया यंदाच्या जालीय दिवाळी अंकांचा!
उत्तम! मात्र शक्यतो मुळ
उत्तम! मात्र शक्यतो मुळ अंकाचा दुवा दिलात तर अधिक छान..
बाकी, इथेच थांबु नका .. तुम्हा त्या अंकात काय आवडलं.. काय नाहि यावरही चर्चा झाल्यास दुधात साखरच! :)
अवांतरः दिवाळी अंकाकडे घेऊन जाणारा दुवा पहिल्या पानावर चढवला आहे
३ लेखांचा छोटासा दिवाळी अंक आहे
http://snvivi.blogspot.in/p/blog-page_13.html
३ लेखांचा छोटासा दिवाळी अंक आहे .
ह्या ब्लॉग मालक चांगला लेखक आहे तो काहीतरी नंतर अॅडीशन करेल(आय होप)तेंव्हा अंकाला खरी मजा येईल
नमस्कार
'फ' फोटोचा या दिवाळी अंकाची लिंक देण्याबद्दल आडकित्ता आणि ऋषिकेश यांचे मनापासुन आभार.
अंकाची लिंक
http://www.fotocirclesociety.com/fa-diwalianka.html
कृपया पहिल्या पानावरची 'फ' फोटोचा या दिवाळी अंकाची लिंक दुसरीकडेच जात आहे ती योग्य ठिकाणी कराल का?
मायबोली दिवाळी अंक प्रकाशीत झाला
मायबोली.कॉमच्या दिवाळी अंकाचे हे तेरावे वर्ष. http://www.maayboli.com/hitguj_diwali_ank/hda_2012/index.html
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!! ही दिवाळी आपणा सर्वांना आरोग्यदायी व आनंदाची जावो.
आभार! मराठी आंतरजालावरचे
आभार!
मराठी आंतरजालावरचे 'ग्रँड ओल्ड संकेतस्थळ' असलेल्या मायबोलीचा दिवाळी अंक चाळला.. आतापर्यंत चाळलेल्या अंकांपैकी सर्वात 'सुंदर' आणि वापरायला-वाचायला 'सोपा' असा तो अंक असावा असे वाटते.
अर्थात, बराच अनुभव आणि तांत्रिक सफाई जमेस धरली तरीही सादर झालेल्या अंकाचे 'दिसणे' अपेक्षेहून उत्तम वाटते आहे.
अंकातील मजकूरही शीर्षकांवरून दर्जेदार वाटतो आहे. माधुरी पुरंदरे यांची मुलाखत वाचली. छोटेखानी असली तर बर्याच त्यांनी बालसाहित्यात आणि इतरत्र केलेल्या कामाला स्पर्श करते.
बाकी वाचल्यावर देतोच
धन्यवाद
अरे वा. इथे दिवाळी अंकाच्या दुव्यांचे संकलन होत आहे हे पाहून आनंद वाटला. 'मनोगत', मिपा, आणि 'उपक्रम' दिवाळी अंक पाहून झाले. मनोगत दिवाळी अंकातील सुंदर लेखांसोबत असलेली शब्दकोड्यांची बोनस मेजवानी फार आवडली. सुधीर कांदळकर, मीरा फाटक अरविंद कोल्हटकर यांचे लेख विशेष उल्लेखनीय.
उपक्रम दिवाळी अंक वरवर चाळून झाला आहे. लेखविषय आणि लेखक आश्वासक वाटले. आटोपशीर आणि देखणा अंक.
मिपा दिवाळी अंकही चांगला आहे. नगरीनिरंजन यांची कथा विशेष आवडली
मायबोलीचा अंक प्रेक्षणीय वाटला पण वाचण्याची इच्छा झाली नाही. :(
"ज्ञानभाषा मराठी"
या दिवाळी अंकातील "ज्ञानभाषा मराठी" या अनुराधा सोहनी यांच्या एका वाचनीय लेखात मिळालेल्या दुव्यावरुन शोधता विविध २९ क्षेत्रांतील मराठी परिभाषा कोशाचे दुवे मिळाले आहेत. या दुव्यांचे संकलन असलेला परिभाषा कोश- अनुक्रमणिकेचा दुवा ऐसीअक्षरेच्या पहिल्या पानावरील मराठी संदर्भकोशात चढवत आहे.
त्याच बरोबर पुढील दुवे सुद्धा पहिल्या पानावर उपलब्ध करून देत आहोतः
शासन व्यवहार शब्दकोश
पदनाम कोश
न्याय व्यवहार कोश
marathibhasha.com
माझ्या माहितीनुसार http://marathibhasha.com/ इथे बरेचसे शासकीय कोश एकत्रित स्वरूपात उपलब्ध आहेत.
हा अगदी चांगला उपक्रम आहे,
हा अगदी चांगला उपक्रम आहे, त्याकरता ऐसीअक्षरेचे आभार. दिवाळी संपल्या संपल्या इतकं काय काय वाचायचं असतं, की लक्षात ठेवून या अंकांच्या लिंका साठवून ठेवण्याचा एक मोठाच व्याप होतो. त्यात काही काही सुटूनही जातं.
अजून अनुभव, मि.सा.जणी, साधना, चिन्ह यांचे दिवाळी अंक जालावर उपलब्ध झालेले नाहीत. ते अर्थातच उशिरा होतील. पण ते उपलब्ध झाले, की तेही या दुव्यावर टाचून ठेवले तर फार बरं होईल.
'आत्मसन्मानाची लढाई'
या अंकातला आज वेळ काढून प्रा. मनोहर जाधव यांचा 'आत्मसन्मानाची लढाई' हा प्रदीर्घ लेख वाचला.
एका जन्माने दलित प्राध्यापकाने आपल्या आत्मसन्मानासाठी आपल्याच कॉलेज प्रशासनाविरूद्ध दिलेल्या थरारक लढयाची ही कथा डोक्यात आता कितीतरी दिवस घुमत राहिल हे नक्की! अभिनिवेशरहित नेटके-नेमके लेखन. अतिशय परिणामकारक!
हे असं सांगितलेले चालेल का?
http://www.maayboli.com/node/39037