Skip to main content

अमेरिकेतील भारतीयांचे तेथील वास्तव्य

तिथल्या कार्यपद्धतीची, कार्यक्षमतेची ओळख होऊन त्यांची मने भारतातल्या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात, म्हणजे काँग्रेसच्या समजवादाविरोधात झुकू लागली. समाजवादी मात्यापित्यांची ही मुले कट्टर उजवी बनू लागली. क्रां

भारतातून अमेरीकेत उच्चशिक्षणाकरता येणारे लोक इतके कट्टर उजवे कसे हा प्रश्न मला केव्हाचा पडलेला आहे. पण ह्या बदलाचे मुख्य कारण पाश्चात्य-प्रभाव असावा असे मला वाटत नाही. या लोकांचे भारतीय पालक (म्हणजे मुख्यतः पुरूष मंडळी) ही सुद्धा कट्टर उजवीच असल्याचे माझे किरकोळ निरीक्षण आहे. मला वाटतं ज्या बहुसंख्य वर्गातील लोक* अमेरीकेत स्थलांतरीत झाले (आता चित्र बदलते आहे) त्या वर्गात काँग्रेसविरोध आणि पर्यायाने उजवेपणा होताच. गांधी हत्येनंतर ब्राह्मणांचा झालेला दुस्वास, इंदीरा गांधींच्या वेळेस झालेले कुळकायदा वगैरेंमुळे सधन वर्गाची झालेली हानी, काँग्रेसचा 'सेक्युलर'पणा हे एकंदरीतच या वर्गाला नापसंत होते. मी स्वतः लहानपणापासून ज्या गोष्टी ऐकत आलो त्या या निरीक्षणांना दुजोरा देतात. (ह्यातले बरेच लोक पुढे अमेरीकेत येऊन रिपब्लिकन पक्षाचे समर्थक होण्याचे कारण डेमोक्रॅटीकपक्षाची इमेजे ही 'सेक्युलर', 'भांडवलवादविरोधी' (पक्षी काँग्रेसी) अशी रंगवल्याने असावे असेही वाटते. पण रिपब्लिकन पक्षाच्या कट्टर धर्मप्रेमामुळे काही लोक इंडिपेंडंट राहण्याचे पसंत करतात असा माझा अनुभव आहे.)

*दक्षिण भारतातून येणार्‍या मित्रमंडळींबाबत मात्र हे निरीक्षण मी सहजी लावू शकलेलो नाही, पण दक्षिणभारतीयांचा सँपलस्पेस थोडा तोडकाच आहे.

व्यवस्थापकः मुळ लेखातील इथे दिलेल्या या प्रतिसादाने सुरू झालेल्या अवांतर चर्चेला वाचकांच्या नी प्रतिसादकांच्या सोयीसाठी व अधिक तपशीलवार चर्चेसाठी वेगळे काढत आहोत.

राही Fri, 03/10/2014 - 20:01

आपले म्हणणे बर्‍याच अंशी खरे आहे. महाराष्ट्रापुरते पहायचे तर सुरुवातीला (साठ-सत्तरच्या दशकात) एका विशिष्ट वर्गाचे/वर्णाचे लोकच अमेरिकेत गेले. या लोकांना कट्टर उजवेपणाचे बाळकडूच मिळाले होते. पण तिथल्या रहाणीमानामुळे किंवा सुव्यवस्थेमुळे त्यांच्या देशी परिचितांचे/ नातेवाईकांचे मतांतर फारसे झाले नाही, कारण मुळात ते उजवेच होते. नंतर जेव्हा भारतीय समाजवादाचा पाया असलेला निम्न वर्ग/वर्ण अमेरिकेत धडकू लागला तेव्हा तिथली सुव्यवस्था ही देशात समाजवादाच्या र्‍हासाला थोडीफार कारणीभूत ठरली. समाजवादी आणि कम्यूनिस्ट यांचे नेतृत्व हे उच्चवर्णीय होते आणि अनुयायी/कार्यकर्ते सहसा निम्न वर्गातले असत. हा कार्यकर्ता बेस कमी होऊ लागला. राष्ट्रसेवादलासारख्या तळागाळात पसरलेल्या संघटनेला कार्यकर्ते मिळेनात. अर्थात परदेशगमन हे इतर अनेक कारणांपैकी एक कारण आहे. ते मुख्य कारण नव्हे.
जाता जाता : अमेरिकेतल्या महाराष्ट्रमंडळांतल्या ह्या वर्णीय वर्ण्य कथा अतिशय सुरस आहेत. अजूनही ही गटबाजी चालू आहे असे दिसते.
आणखी जाता जाता : अमेरिका आणि कॅनडामध्ये भारतीयांच्या क्रांतिकारी चळवळीची पाळेमुळे बरीच खोल आहेत. 'गदर' चळवळ इथेच रुजली. गंमत किंवा विरोध (विरोधाचा आभास नव्हे) म्हणजे हे सशस्त्र चळवळीचे पुरस्कर्ते लोक त्या काळात 'डावे' होते. भारतात भगतसिंह कम्यूनिस्ट पार्टीचे कार्ड-होल्डर होते. सुभाषबाबूंचा फॉर्वर्ड ब्लॉक हा पक्षही डावाच. गांधीजींनी अहिंसेचा मार्ग स्वीकारला आणि मग या क्रांतिकारकांचे राष्ट्रीय चळवळीशी मतभेद तरी झाले किंवा त्यांनी स्वतंत्रपणे आपली चळवळ पुढे न्यायचे ठरवले. गांधीजींच्या समतावादाच्या तुलनेत हे लोक 'उजवे' ठरले. अमेरिकेतील भारतीयांचा समाजवादाला विरोध हा जुनाच आहे.

मन Fri, 03/10/2014 - 22:07

In reply to by राही

कार्ल मार्क्सनं जर्मनी सोडला.(का त्याला हाकलला असं काहीतरी आहे.)
त्यानंतर तो कुठं गेला ?
औद्योगिक क्रांती ऐन भरात होती तेव्हा औद्योगिक क्रांतीच्या माहेरघरात आश्रय त्याला मिळाला.
खुद्द लंडनमध्ये ,भांडवलशहांच्या आणि साम्राज्यवाद्यांच्या देशात त्याचं वास्तव्य होतं दोन-चार दशके तरी.
हे "अमेरिकेत राहून भारतातले डावे लोक काम करायचे" वाक्य वाचून आठवलं.

Nile Fri, 03/10/2014 - 23:28

In reply to by मन

औद्योगिक क्रांती ऐन भरात होती तेव्हा औद्योगिक क्रांतीच्या माहेरघरात आश्रय त्याला मिळाला.

ह्या तर्काला काही अर्थ नाही. आश्रय मिळाला म्हणजे काय त्याला भांडवलशाही लोकांनी प्रेमाने बोलावून आश्रय दिला असं आहे का? पाश्चिमात्य देशात कम्युनिस्ट विचारसरणीने जोर धरला होता, अनेक बडे लोक त्यात होते आणि त्यामुळे पाश्चिमात्य सरकारे चिंतेत होतीच. अमेरीकेतील अणुबाँबच्या 'मॅनहॅटन' प्रोजेक्टचा लीड सायंटीस्ट ओपनहॅमरचे काय झाले हे माहित असेलच. http://en.wikipedia.org/wiki/Frank_Oppenheimer#Political_scrutiny_and_b…

रमताराम Tue, 07/10/2014 - 16:01

In reply to by Nile

अमेरीकेतील अणुबाँबच्या 'मॅनहॅटन' प्रोजेक्टचा लीड सायंटीस्ट ओपनहॅमरचे काय झाले हे माहित असेलच.>> मेरिलिन मन्रो पण विसरायची नाही. :)

Nile Fri, 03/10/2014 - 23:22

In reply to by राही

नंतर जेव्हा भारतीय समाजवादाचा पाया असलेला निम्न वर्ग/वर्ण अमेरिकेत धडकू लागला तेव्हा तिथली सुव्यवस्था ही देशात समाजवादाच्या र्‍हासाला थोडीफार कारणीभूत ठरली.

अमेरीकेत अजूनही समाजवाद म्हणजेच कम्युनिझम असे सर्रास समजले जाते. डेमॉक्रॅटिक पक्षाच्या पॉलिसींना 'सोशलिस्ट' असे म्हणून रिपब्लिकन प्रचार करताना अनेकदा दिसतात.

डावे म्हणजे मवाळ हा तसा अलिकडचा अर्थ असावा. फ्रेंच राज्यक्रांतीतील रिव्होल्युशनरींना सुद्धा डावेच, पुढे रशियनक्रांती वालेही डावेच नाही का.

ऋषिकेश Sat, 04/10/2014 - 11:22

मला वाटतं ज्या बहुसंख्य वर्गातील लोक* अमेरीकेत स्थलांतरीत झाले (आता चित्र बदलते आहे) त्या वर्गात काँग्रेसविरोध आणि पर्यायाने उजवेपणा होताच

माझं निरिक्षण (किंवा त्यावर केलेला अनॅलिसिस) किंचित वेगळं आहे.

परदेशात विशेषतः पाश्चात्य देशांत कायमे स्थायिक झालेली जनता बघितली तर बहुतांश जणांकडे भारतात अत्यंत कर्मठ ते 'बर्‍यापैकी पारंपारिक' वातावरण होते असे दिसते. (इथपर्यंत सहमती आहे).
अशा वातावरणात दोन गोष्टी असतात
१. समुहामुळे मिळणारी सुरक्षितता, कुशनिंग हा फायदा
२. जुनाट गोष्टींमुळे व्यक्तीस्वातंत्र्य, अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर येणारी गदा हा सर्वात प्रमुख तोटा

परदेशात कायमचे स्थायिक होणार्‍या बहुतांश लोकांशी बोलल्यावर मला से वाटु लागले आहे की त्यांचे तिथे रहाण्यचहे कारण हे पैसा, आधुनिक जीवनशैली, शिक्षणव्यवस्था, भाषा, तेथील सुखसोयी वगैरे पेक्षा त्यांच्या घरातील कर्मठ/अती उजवे वातावरण आहे. (त्यामुळे ते त्यांना आवडते असे वाटत नाही. अर्थात त्यामुळे त्यांच्यावरील उजवे कंडीशनिंग सगळेच झटकतात/ झटकायचा प्रयत्न करतात व/वा झटकाची इच्छा राखतात असे नव्हे)

त्यातही पुरूषांना सवयीने त्यातही अ‍ॅडजेस्ट करायची तयारी असते (त्यामुळेच त्यांचे दोन चार पेग झाले की भारतातील आठवणींचे कढ स्त्रियांच्या तुलनेत अधिक वाहू लागतात ;) ). मात्र एकदा का स्वयंपूर्णतेची गोडी कळली की महिलांना पारंपरीक कुटुंबांत होणारी घुसमट/बंधने नुसती जाणवूच लागतात असे नाही तर ती अत्यंत जाचक वाटू लागतात (आणि जे खरेच आहे. भारतीय पारंपारिक व्यवस्थेत महिलांवर अनेक अधिक बंधने आहेत). त्यामुळे ही कुटुंबे या दोन कारणाने परदेशात रहाणे पसंत करतातः
१. आपल्या मुलांवर तशा व्यवस्थेचे संस्कार टाळणे
२. महिलांना पुन्हा या त्यांच्यासाठी जाचक असणार्‍या व्यवस्थेत शिरण्याचा उत्साह नसणे - व त्यामुळे अख्खे कुटुंबच तिथे स्थिरावणे (पुरूषांना भारतात आल्यावर आपोआप घरात कमी कामे करावी लागतात, इतरही अनेक बाबतील पारंपारीक व्यवस्थेचा उलट फायदाच होतो (उदा. अगदी पहिल्या पंगतीला बसायला मिळण्यापासून, जेवणे झाल्यावर ताटे उचलायला न लागण्यापर्यंत) तेव्हा त्यांच्यातील अनेकांची परतायला फारशी ना नसते ;) )

परदेशातील किती भारतीय महिला उजवेपणाकडे झुकलेल्या असतात हे बघणे रोचक ठरावे.

===

अवांतर+१: मी लिंगनिरपेक्ष सामाजिक नियमांचे समर्थन करतो परंतू भारतात सामाजिक नियम अतिशय लिंगसापेक्ष असल्याने त्यावर टिपण्णी करताना नाईलाजाने सामाजिक बाबतीतही स्त्री-पुरूष भेदाचे वर्णन करावे लागले आहे.

=====

अवांतराबद्दल क्षमस्व! ;)

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 04/10/2014 - 18:41

In reply to by ऋषिकेश

प्रतिसाद पटणेबल आहे.

जाचक असणार्‍या व्यवस्थेत शिरण्याचा उत्साह नसणे

हे पुरुषांच्या बाबतीत, कमी प्रमाणात का होईना, होतं असा मर्यादित अनुभव आहे. पुरुषांवर मुळात बंधनं कमी म्हणून तीव्रता कमी असेलही.

मी Sat, 04/10/2014 - 20:59

In reply to by ऋषिकेश

स्थलांतरीत झालेल्या फ्रेशर्स बद्दल मत बरोबरच आहे.

त्यामुळे ही कुटुंबे या दोन कारणाने परदेशात रहाणे पसंत करतातः
१. आपल्या मुलांवर तशा व्यवस्थेचे संस्कार टाळणे
२. महिलांना पुन्हा या त्यांच्यासाठी जाचक असणार्‍या व्यवस्थेत शिरण्याचा उत्साह नसणे - व त्यामुळे अख्खे कुटुंबच तिथे स्थिरावणे (पुरूषांना भारतात आल्यावर आपोआप घरात कमी कामे करावी लागतात, इतरही अनेक बाबतील पारंपारीक व्यवस्थेचा उलट फायदाच होतो (उदा. अगदी पहिल्या पंगतीला बसायला मिळण्यापासून, जेवणे झाल्यावर ताटे उचलायला न लागण्यापर्यंत) तेव्हा त्यांच्यातील अनेकांची परतायला फारशी ना नसते (डोळा मारत) )

पण हिच पिढी अमेरिकन ग्रोन-अप मुलाच्या आई(वडिलांच्या)च्या भुमिकेत शिरु शकत नाही असं मर्यादीत निरिक्षणावरुन म्हणतो, ३०-३५ वर्षापूर्वी स्थलांतरीत झालेल्या पण आता तिकडचे जिवनमान न पटू शकणार्‍या आई-वडिलांचे/आजी-आजोबांचे गीता-पठण वर्ग दर आठवड्याला न्यु-जर्सीमधेही चालतात. नेमसेक मधे दाखवलेली परिस्थिती शेवट वगळता बर्‍याचअंशी पाहिलेली आहे.

हे आपल्याला रुचणार नाही हे ओळखुन पहिल्या मुलाच्या आगमनानंतर भारतात परतणारे सगळ्यांच्याच परिचयाचे असतील, त्याचप्रमाणे नेक्स्ट फॉल इंडियात असं म्हणून पाय न निघणारीही आहेतच.

ऋषिकेश Mon, 06/10/2014 - 10:54

In reply to by मी

३०-३५ वर्षापूर्वी स्थलांतरीत झालेल्या पण आता तिकडचे जिवनमान न पटू शकणार्‍या आई-वडिलांचे/आजी-आजोबांचे गीता-पठण वर्ग दर आठवड्याला न्यु-जर्सीमधेही चालतात. नेमसेक मधे दाखवलेली परिस्थिती शेवट वगळता बर्‍याचअंशी पाहिलेली आहे.

सहमत आहे. मात्र यापैकी आपल्या मुलांवर हेच संस्कार व्हावेत असे मानणारे मात्र मला अल्पसंख्य वाटते.
अशा गीतेच्या वर्गछाप अनेकांना "आम्ही आता बदलणे कठीण आहे. मात्र मुलांना त्यातून जावे लागु नये ज्यातून आम्ही लहानपणी गेलो" वगैरे म्हणताना ऐकले आहे. अर्थात केस बाय केस वेरीएशन असेलच.

त्याहून गंमत म्हणजे अमेरिकेत स्थायिक झालेल्या आजी-आजोबांचे नी त्यांच्या पूर्णपणे अमेरिकन नातवंडांचे नाते मात्र मोठे सौष्ठवपूर्ण आहे. आजी-आजोबा आयडेन्टिटी क्रायसीसच्या आंदोलनांतून तावून सुलाखून निघालेले आहेत. त्यांच्या मुलांच्या वेळी असणारा संभ्रम/द्विधा/असमंजस आता उरलेला नाही. नवे स्वीकारलेच नाही तर त्या नव्यात रुळले आहे असे नाते बघायला छान वाटतेच :)

हे आपल्याला रुचणार नाही हे ओळखुन पहिल्या मुलाच्या आगमनानंतर भारतात परतणारे सगळ्यांच्याच परिचयाचे असतील, त्याचप्रमाणे नेक्स्ट फॉल इंडियात असं म्हणून पाय न निघणारीही आहेतच.

अर्थातच.
पैकी दुसर्‍या प्रकारातील काहिं जोडप्यांपैकी एकाला अमेरिकेतच रहायचे असल्याने त्या व्यक्तीचा पार्टनरही तिथे "अडकला" आहे असा दावा करतानाही कैकदा ऐकले आहे :P

अजो१२३ Mon, 06/10/2014 - 22:05

In reply to by ऋषिकेश

परदेशात कायमचे स्थायिक होणार्‍या बहुतांश लोकांशी बोलल्यावर मला से वाटु लागले आहे की त्यांचे तिथे रहाण्यचहे कारण हे पैसा, आधुनिक जीवनशैली, शिक्षणव्यवस्था, भाषा, तेथील सुखसोयी वगैरे पेक्षा त्यांच्या घरातील कर्मठ/अती उजवे वातावरण आहे.

शुद्ध जावईशोध.

या पेक्षा हे? बाकीचं जाऊच द्या, फक्त पैसा हा एकच घटक भारतापेक्षा कमी करा, सगळे भारतात परत येतील.

अनुप ढेरे Tue, 07/10/2014 - 07:06

In reply to by अजो१२३

फक्त पैसा नाही. उमेरिकेतील इन-जनरल आयुष्य कमी तकतकीचं आहे असं वाटतं. अनेक दैनंदिन गोष्टी लै सोप्या आहेत. हेही यायचं कारण असावं.

वामा१००-वाचनमा… Tue, 07/10/2014 - 15:31

In reply to by अनुप ढेरे

अनुप अतिशय परफेक्ट बोललात. पैसा तर इथे सो सो आहे, घरदार नाही पण जीवनमान छान आहे.

अजो१२३ Tue, 07/10/2014 - 15:41

In reply to by वामा१००-वाचनमा…

पैसा सो सो आहे?
--------------------
महिन्याला एक हजार डॉलर (वर्षाला १२००० एकूण) ही तिथे महाभिकार सॅलरी आहे. ६०००० रु प्रतिमाह वाला माणूस भारतात चंगळ करू शकतो.
---------------------
इथून जे लोक जातात त्यांना प्रारंभीच किमान ६०,००० डॉलर मिळतात. करीयर पुढे जाईल तसे हे पैसे अगदी सामान्य बुद्धीच्या एन आर आय ला १०-२५ वर्षांनी १२०,००० यू एस डी मिळतात.
-----------------------------------
ते जाऊ द्या, बाकी सगळं सेम असेल तर भारतात मासिक १५-२०००० रु घेऊन हे लोक इंजिनिअरचे काम ट्रेनी असताना, नि नंतर १०-१५ वर्षांच्या अनुभवानी ४०,००० ते ५०,००० भारतीय रुपयांत "अमेरिकेत" करायला तयार असतील?
-------------
पैसा हीच मूल प्रेरणा आहे. बाकी बोनस आहे. पैसा काढला तर बाकी गोष्टींना अर्थ उरत नाही.

वामा१००-वाचनमा… Tue, 07/10/2014 - 15:48

In reply to by अजो१२३

पण खर्चही डॉलरमध्ये होतो तेव्हा पैसा शिल्लक रहात नाही. परत एका स्पाऊसला सडवतात त्यामुळे एकाच्या पगारावर घर चालतं निदान पहीली काही वर्षं.

अजो१२३ Tue, 07/10/2014 - 15:52

In reply to by वामा१००-वाचनमा…

शिकताना पैसे जातात, नंतर कसेबसे भागते, इ इ काहीही असो, एन आर लोकांना जर भारतीयांपेक्षा कमी पैसे दिले (डॉलर्स म्हणा नैतर रुपये, पण इक्विव्हॅलँट), तर ते अमेरिकेत बाकीची इतर अनेक कारणे असली तरी अमेरिका सोडून तत्काळ भारतात येतील. इतक्या बेसिक्सवर वाद नको.

वामा१००-वाचनमा… Tue, 07/10/2014 - 16:00

In reply to by अजो१२३

स्वच्छ अन जागोजागी टापटीप स्वच्छतागृह, गर्दीचे धक्के खावे न लागणं, विपुल प्राणी (खार, चिपमंक, ससे, हरणां) पक्षांची (ब्लूजे, रॉबिन, सीगल्,मॅलार्ड्,रंगीत चिमण्या, कार्डिनल) विविधता जी की रोज जाता येता नजरेस पडते, स्वच्छ व कमी गर्दीचे पब्लिक ट्रान्स्पोर्ट, अत्यंत कमी पोल्युशन.
.
पैसा किस पेड की पत्ती आहे अजो या सगळ्यापुढे?

गब्बर सिंग Tue, 07/10/2014 - 16:12

In reply to by वामा१००-वाचनमा…

शिवाय अमेरिकेचा अभिमान बाळगलाच पायजे असं नाही. उलट एखादा जण अमेरिकेला "एक भिकार" म्हणत असेल तर आपण "अमेरिका सात भिकार" असं बिनदिक्कत पणे ठोकून द्यावं. व तरीही निश्चिंत असावं.

अजो१२३ Tue, 07/10/2014 - 16:34

In reply to by वामा१००-वाचनमा…

असू शकतं. काहीच न करता सोशल सेक्यूरिटीचा लाभ घेत या आणि अशा सगळ्या गोष्टी तिथे फुकटात एंजॉय करता येत असतील. पण ते सुरक्षा कवच काढलं तर, भारतात जितके पैसे मिळतात तितक्याच पैशात तेच काम करत अमेरिकेत जगाल का?
------------
भारतात बीपीओ मधे १०-१२-१४ हजार पगार मिळतो. तर महिना १६६, २००, २३३ डॉलरला तिथे रहायला (मंजे असलाच पगार जीवनभर, नो अमेरिकन अ‍ॅडवांटेज) तयार असाल का? आपण या सगळ्या प्राण्यापक्षांची संख्या दुप्पट करून उत्तर पाहू.

अनुप ढेरे Wed, 08/10/2014 - 08:47

In reply to by वामा१००-वाचनमा…

परत एका स्पाऊसला सडवतात

याच्याशी असहमत. यात स्पाऊसना थोडं विक्टीमाइज केल्यासारख वाटतय. असे स्पाऊस यायला कसे तयार होतात मं? माझ्या काही वर्गभगिनी/ हपिसभगिनी लग्न ठरल्यावर केवळ नवरा तिथला आहे म्हणून गप जॉब-बिब गुंडाळून विलायतेला चालत्या झाल्या.* तिथे गृहिणी झाल्या, आरामशीर आयुष्यासाठी आपलं आर्थिक स्वातंत्र्य गुडाळून ठेवण्यार्‍यांना वर 'सडवलं' असं म्हणवत नाही.

===
* यात आता भारतात स्त्रीयांना स्वातंत्र्य कसं नाही, समाज व्यवस्था पुरुषी आहे ही टेप लाऊ नये.

नितिन थत्ते Wed, 08/10/2014 - 09:01

In reply to by अनुप ढेरे

६०% संबंध आहे.

तुम्ही खरं तर स्त्रीने नोकरी करणे आणि तिचे आर्थिक स्वातंत्र्य याचा संबंध आहे का असं विचारायला हवं. नोकरी केल्याने आर्थिक स्वातंत्र्य येतेच असे नाही. [आणि स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्य -विथ जबाबदारी- हवे असतेच असे नाही. :( ]

नितिन थत्ते Wed, 08/10/2014 - 08:58

In reply to by अनुप ढेरे

>>आरामशीर आयुष्यासाठी आपलं आर्थिक स्वातंत्र्य गुडाळून ठेवण्यार्‍यांना

ही उत्क्रांतीतून आलेली प्रवृत्ती/मनोधारणा आहे हे तुम्हाला ठाऊक नाही का?

वामा१००-वाचनमा… Wed, 08/10/2014 - 18:19

In reply to by अनुप ढेरे

अनुप माझा नवरा ४-५ वर्षं इतका फ्रस्ट्रेट झालेला, खूप. शेवटी त्यानी स्कॉलरशिप मिळवून, पी एच डी केली अन मग जॉब मिळाला. मला तेव्हाची असुरक्षिततेची टांगती तलवार आठवली तरी काटा येतो. आम्ही ऑलमोस्ट भारतात परत येणार होतो.

तेव्हा दर वेळी सडलेली स्पाऊस स्त्रीच असते असंही नाही. अन जेव्हा तो पुरुष असतो तेव्हा त्या पुरषाला अतोनात त्रास होतो.

अनुप ढेरे Thu, 09/10/2014 - 07:08

In reply to by वामा१००-वाचनमा…

दर वेळी सडलेली स्पाऊस स्त्रीच असते असंही नाही.

असेलही. पण याचं प्रमाण खूप कमी असेल.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 08/10/2014 - 19:43

In reply to by अनुप ढेरे

* यात आता भारतात स्त्रीयांना स्वातंत्र्य कसं नाही, समाज व्यवस्था पुरुषी आहे ही टेप लाऊ नये.

का?

अनुप ढेरे Thu, 09/10/2014 - 07:14

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अशा स्त्रीया हे का सांगू शकत नाहीत का की मी माझी असलेली नोकरी/ करीअर सोडून बेभरवश्याच्या ठीकाणी येणार नाही? कोणी आडवलयं. अस एक उदाहरण माझ्या पहाण्यात आहे की मुलीनी विलायतेत नोकरी असलेल्या होणार्‍या नवर्‍याला सांगितलं की मी तिकडे येणार नाही. मी इथेच राहणार. नवरा आला इकडे. आता अबॉव्ह अ‍ॅव्हरेज सनातनी घरातली मुलगी हे सांगू शकते तर बाकीच्यांना काय प्रॉब्लेम असू शकेल?

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 09/10/2014 - 21:31

In reply to by अनुप ढेरे

आपण नोकरी करून पैसे मिळवल्यावर भारतात मिळणाऱ्या स्वातंत्र्यापेक्षा, अमेरिकेत पैसे स्वतः न कमावता मिळणारं स्वातंत्र्य (आणि इतर बऱ्याच गोष्टी) महत्त्वाच्या वाटू नयेत असं काही बंधन नसावं. यामागे भारतातली पुरुषप्रधान (किंवा जी काही आहे ती*) संस्कृती नाकारण्याचा विचार असू शकतो. तेव्हा त्या पुरुषप्रधान संस्कृती नाकारण्याला 'टेप लावणं' असं हिणवत, ते का नाकारावं?

अबॉव्ह अ‍ॅव्हरेज सनातनी घरातल्या मुलीला ठराविक गोष्टी आवडतात म्हणून सगळ्यांना त्या आवडतीलच हे म्हणण्यामागे काय तर्क?

*पुरुषप्रधान + भोचकपणाची संस्कृती - "अय्या, यांच्या लग्नाला इतकी वर्षं झाली, अजून काही 'इश्श्यू' नाही का?", "केवढे कमी कपडे घालते ती! आता काय कॉलेजात आहे का?", "काल बऱ्याच उशीरापर्यंत बाहेर होतात वाटतं!" इत्यादी सगळंच.

अनुप ढेरे Fri, 10/10/2014 - 06:45

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आपण नोकरी करून पैसे मिळवल्यावर भारतात मिळणाऱ्या स्वातंत्र्यापेक्षा, अमेरिकेत पैसे स्वतः न कमावता मिळणारं स्वातंत्र्य (आणि इतर बऱ्याच गोष्टी) महत्त्वाच्या वाटू नयेत असं काही बंधन नसावं.

स्त्रीयांवर अनेक बंधन घालणार्‍या संस्कृतीपासून लांब जाण्यासाठी आणि 'स्वतंत्र' आयुष्य जगण्यासाठी, आर्थिक स्वातंत्र्याला फाट्यावर मारण रोचक वाटतं.

अबॉव्ह अ‍ॅव्हरेज सनातनी घरातल्या मुलीला ठराविक गोष्टी आवडतात म्हणून सगळ्यांना त्या आवडतीलच हे म्हणण्यामागे काय तर्क?

मुद्दा हा आहे की सनातनी घरातली मुलगी, जी पुरुषी संस्कॄतीखाली दबलेली असते तीसुद्धा ठामपणे लग्नाचे निर्णय घेऊ शकते. सो लग्नाचे निर्णय स्वतः घ्यायला पुरुषी संस्कृतीचा अडसर येतोच असं नाही. वाटल तर त्याला फाट्यावर मारता येतं.

सलील Tue, 07/10/2014 - 21:46

In reply to by अजो१२३

पहिली संधी मिळेपर्यंत त्यातूनही नोकरीत असाल तर पैसा महत्वाचा. ज्यांना वातावरण सुट होत नाही ते परत येतात आणि जे राहतात त्यातले फार कमी पैशांसाठी राहत असावेत. पैसे फारसे मिळत नाहीत हे पण खरे आहे पण बाकीच्या गोष्टी बऱ्याच आहेत. स्वतःला मिळणारा वेळ. बऱ्याच प्रमाणात कटकटी कमी असतात. शिवाय ऑफिसमध्ये बरेच मोकळे वातावरण असते. दुसरे म्हणजे खूप ठिकाणी उगाचच संध्याकाळी बॉस जाईपर्यंत बसणे किंवा काय इतक्या लवकर घरी चालला वगैरे असे नसते.

पिवळा डांबिस Wed, 08/10/2014 - 02:18

In reply to by अजो१२३

पैसा हीच मूल प्रेरणा आहे. बाकी बोनस आहे. पैसा काढला तर बाकी गोष्टींना अर्थ उरत नाही.

पूर्णपणे सहमत आहे!!

आयच्यान, खोटां कश्यांला बोलीयाचां!!!
:)

नितिन थत्ते Tue, 07/10/2014 - 07:14

In reply to by अजो१२३

भारतीय पारंपारिक व्यवस्थेत महिलांवर अधिक बंधने मुळीच नाहीत.

ठरलं. अजोंनी असं सांगितलंय ना? आता याचा प्रतिवाद करायच्या भानगडीत कोणी पडू नका.

मन Tue, 07/10/2014 - 07:19

In reply to by नितिन थत्ते

शेवटच्या वाक्यापूर्वी "शुद्धीवर असाल तर" किम्वा "स्वतःचा जीव प्यारा असेल तर" किंवा "स्वतःचे मनःस्वास्थ्य प्यारे असेल तर " अशी पुरवणी हवी.
अर्थात एकदा अजो विरुद्ध राधिका अशी जालिय फाइट पहायची तीव्र इच्छा आहे.
काहीतरी कारण घडो आणि ह्यांची तुफानी दंगल घडो.

अजो१२३ Tue, 07/10/2014 - 10:33

In reply to by मन

असामाजिक तत्त्वे म्हणतात ती हीच. म्हणे दंगल घडो. मला गविसारख्या माणसासोबत संवाद (मंजे भांडण) करायला आवडेल. ते शेवटपर्यंत मुद्द्याचं बोलतात. अजो असा आहे, तसा आहे इ इ मधे त्यांना रस नसतो.

बॅटमॅन Tue, 07/10/2014 - 13:21

In reply to by अजो१२३

संवाद मंजे भांडण तर भांडण मंजे काय?

शिवाय, अजोंची मते वायझेड आहेत आणि अजो तसे आहेत ही दोन विधाने वेगळी न मानणे रोचक आहे.

Nile Tue, 07/10/2014 - 22:32

In reply to by ऋषिकेश

खरंतर प्रतिसाद देणार नव्हतो (ऑलरेडी लोक मी फार प्रतिसाद देतो म्हणून खरडी करून राह्यलेत! ;-) ), पण आता संपादकांनी धागा आमच्या नावावर लावून ही जबाबदारी बळेच आमच्यावर लादलेली आहे (केव्हाची मला संपादकांनी धागा वेगळा केला म्हणून तक्रार करायची होती पण आज संधी मिळाली!) तेव्हा प्रतिसाद देणे आले!

प्रत्येकाचं आपापलं निरीक्षण असल्याने ते वेगवेगळं असणं साहजिक आहे.

परदेशात कायमचे स्थायिक होणार्‍या बहुतांश लोकांशी बोलल्यावर मला से वाटु लागले आहे की त्यांचे तिथे रहाण्यचहे कारण हे पैसा, आधुनिक जीवनशैली, शिक्षणव्यवस्था, भाषा, तेथील सुखसोयी वगैरे पेक्षा त्यांच्या घरातील कर्मठ/अती उजवे वातावरण आहे. (त्यामुळे ते त्यांना आवडते असे वाटत नाही. अर्थात त्यामुळे त्यांच्यावरील उजवे कंडीशनिंग सगळेच झटकतात/ झटकायचा प्रयत्न करतात व/वा झटकाची इच्छा राखतात असे नव्हे)

हे म्हणजे थोडंसं 'भारतात सगळे विचार करून इंजिनीअरींगला जातात' असं म्हणण्यासारखं आहे. ;-) आयटी बूममुळे भारतातून अमेरीकेत आलेल्यापैकी कित्येक जण उत्तम संधी म्हणून अमेरीकेत आले. कित्येकांनी ऐनवेळी अशी संधी मिळाली अन ती घेतली. म्हणजे, भारतातील नावडतीचे वातावरण सोडायचे म्हणून अमेरीकेला/परदेशात जावे असे 'प्लॅनिंग' करणारे कमीच. पुढे अमेरीकेला जाणे थोडे अवघड झाले आणि शिक्षणाकरता जाणार्‍यांची संख्या वाढली. अमेरीकेत जाणे प्रतिष्ठेचे असल्याने जाण्याची इच्छा ही कर्मठ भारत सोडण्यापेक्षा नक्कीच प्रबळ असावी. मी जेव्हा जीआरई परीक्षा पास झालो (म्हणजे नापास असं कोणी होत नाहीच) तेव्हा लोकांची प्रतिक्रीया "अरे वा, आता अमेरीका पक्की" अशा प्रकारची होती. यातील कित्येकांची अपत्य, भाऊ-बहिणी वगैरे अमेरीकेत याच मार्गाने गेलेले होते, किमान यांनातरी जीआरई परीक्षा म्हणजे काहीच नाही हे माहीत हवे होते. थोडक्यात, अमेरीकेला जाणे हा 'ट्रेंड' झालेला होता, त्यापुढे कर्मठपणा वगैरेचा त्याग असा विचार असावा असे मला वाटत नाही. इतकेच काय, तर यातल्या अनेकांचा कर्मठपणा तसाच, किंवा काही उदाहरणांत अधिक कडवाही झालेला पाहीला आहे.

बायकांच्या निरीक्षणाबाबत सहमत आहे, पण विभक्त कुटुंबपद्धतीमागे तीच भावना नाही का. त्यामुळे, बायकांनी भारत सोडून अमेरिकेत राहणे याकरता हे कारण तकलादू वाटते. त्यापेक्षा, एकंदरीतच अमेरीकेत राहणे बायकांच्या दृष्टीने सोयीस्कर आहे (काही तोटेही आहेतच, विभक्त कुटुंबात, पण तरीही भारतातात, राहिल्यास मुलांचे संगोपन अमेरीकेतल्यापेक्षा सोपे पडते, वगैरे).

२. महिलांना पुन्हा या त्यांच्यासाठी जाचक असणार्‍या व्यवस्थेत शिरण्याचा उत्साह नसणे - व त्यामुळे अख्खे कुटुंबच तिथे स्थिरावणे (पुरूषांना भारतात आल्यावर आपोआप घरात कमी कामे करावी लागतात, इतरही अनेक बाबतील पारंपारीक व्यवस्थेचा उलट फायदाच होतो (उदा. अगदी पहिल्या पंगतीला बसायला मिळण्यापासून, जेवणे झाल्यावर ताटे उचलायला न लागण्यापर्यंत) तेव्हा त्यांच्यातील अनेकांची परतायला फारशी ना नसते (डोळा मारत) )

हा प्रकार अमेरीकेत होत नाही असे नाही. एल-१, किंवा एच-१ वर अमेरीकेत येणार्‍या लोकांच्या बायका फार वेगळं आयुष्य जगतात असं नाही. डिंपेंडंट व्हिजाचे शॉटकर्ट घेतलेली अनेक गुजराती, तेलगु कुटुंबं भारतातल्या सारखंच राहतात. (मागे एकदा मी अमेरीकेतील दक्षिणआशियाई लोक सिलेक्टीव्ह अबॉर्शन्स करत असल्याने अमेरीकेत त्याविरोधी कायदे करण्याच्या प्रयत्नाबद्दल लिहले होते त्यावरून अंदाज यावा.)

परदेशातील किती भारतीय महिला उजवेपणाकडे झुकलेल्या असतात हे बघणे रोचक ठरावे.

हा प्रकार थोडा किचकट आहे. भारतातील किती महिला उजवेपणाकडे झुकलेल्या असतात हेही या बरोबर पहावे लागेल. शिवाय, अमेरीकेतही अमेरीकन महिला उजवेपणाकडे (भारतातल्या उजवेपणाप्रमाणेच हा ही बायकांना जाचक आहे) किती झुकलेल्या आहेत हा राजकारणातील 'सनातन; प्रश्न आहेच. त्यात भर म्हणजे, भारतीय महिलांपैकी किती महिला स्वेच्छेने अमेरीकेत जातात अन रहायला पसंत करतात हा प्रश्नही सोडवणे सोपे नाही.

पिवळा डांबिस Wed, 08/10/2014 - 02:07

परदेशातील किती भारतीय महिला उजवेपणाकडे झुकलेल्या असतात हे बघणे रोचक ठरावे.

अहो कशाला आमच्या महिलांना उगीच इकडे-तिकडे झुकवतांय?
त्या जर पडल्या आणि पाय मुरगाळून घेतला तर रात्रभर पायाला आयोडेक्स चोळत बसावं लागेल ते आम्हाला!
तुमचं काय जातंय रोचक ठरवायला?
:(

पिवळा डांबिस Wed, 08/10/2014 - 09:00

In reply to by नितिन थत्ते

इथे बरंच काही उपलब्ध असतं हो!
पण आमच्या भारतीय महिलेला आयोडेक्सच लागतं ना!!!!
मग ते भारतातून इम्पोर्ट करावं लागतं!!!!
:)

नितिन थत्ते Wed, 08/10/2014 - 09:11

>>ज्या बहुसंख्य वर्गातील लोक* अमेरीकेत स्थलांतरीत झाले (आता चित्र बदलते आहे) त्या वर्गात काँग्रेसविरोध आणि पर्यायाने उजवेपणा होताच. गांधी हत्येनंतर ब्राह्मणांचा झालेला दुस्वास, इंदीरा गांधींच्या वेळेस झालेले कुळकायदा वगैरेंमुळे सधन वर्गाची झालेली हानी, काँग्रेसचा 'सेक्युलर'पणा हे एकंदरीतच या वर्गाला नापसंत होते. मी स्वतः लहानपणापासून ज्या गोष्टी ऐकत आलो त्या या निरीक्षणांना दुजोरा देतात.

+१
त्यात भर म्हणजे आरक्षणामुळे भारतात (आमच्यासाठी) नोकर्‍या उरल्या नसल्याची भावना होती/आहे.

राजन बापट Wed, 08/10/2014 - 20:06

भारतातून येता येता आपलं भगवं गाठोडं घेऊन आलेले लोक क्लिंटन-ओबामाच्या प्रेमात असतात, जॉर्ज डब्ल्यू बुश यांना पूर्णपणे मूर्ख ठरवण्याच्या बँडवॅगन वर स्वार होतात हे खरं आहे. मात्र इथे पंधरा-वीस वर्षं घालवल्यावर टॅक्स-पॉलिसीज् , निम्न आर्थिक वर्गीयांच्या मदतीकरता असलेले एनटायटलमेंट प्रोग्राम्स इत्यादिंबद्दलच्या "उजव्या विचारसरणी"मधले फायदे त्यांना दिसायला लागतात. त्यामुळे "बुश वाईट होता" पण "शेवटी ना रिपब्लिकनच खरे" या मार्गाला लागताना मी पहातो.

थोडक्यात, भारतातून "उजवी" कडून येणारे लोक सुरवातीला उदारमतवादी लोकांमागे आकर्षित झाले तरी शेवटी अमेरिकेतल्या (किमान आर्थिक संदर्भातल्या) उजव्या विचारसरणीच्या धारेला लागतात असं मला वाटायला लागलेलं आहे.

अर्थात, सर्वच - किंबहुना बहुसंख्य - एनाराय अमेरिकन्सचा प्रवास "अस्साच" होतो असं म्हणणं नाही. मी केवळ एका ट्रेंडचं वर्णन केलेलं आहे.

दुसरं असं की उजवं डावं हे (अर्थातच) एकपदरी नाही. भारतातलं उजवंडावं फंडामेंटालिस्ट्/सेक्युलर अशा स्वरूपाचं आहे. अमेरिकेतल्या उजव्या/डाव्या चर्चेला आर्थिक (हेल्थकेअर, एन्टायटलमेंट्स, टॅक्स पॉलिसीज् ) , सामाजिक (रेसिझम, इमिग्रेशन, अ‍ॅबॉर्शन) धार्मिक (क्रिएशनिझम, अ‍ॅबॉर्शन-सेमसेक्स मॅरेजला असलेला विरोध इत्यादि) अशा वेगवेगळ्या पदरांचं स्वरूप आहे.

उदय. Wed, 08/10/2014 - 22:47

In reply to by राजन बापट

एकच पार्टी चांगली इतकं काळं-गोरं नसावं बहुधा. बहुतेकदा डेमोक्रॅट्सच्या काही बाजू पटतात, तर काही रिपब्लिकन्सच्या. बरेचसे इंडिपेंडंटपण पाहिले आहेत, जे दरवेळी निवडणुकांत वेगळ्यावेगळ्या पार्टीला मत देतात. शेवटी काय, सरकार जो कायदा करणार तो पाळावाच लागतो, भले तो मला आवडो किंवा न आवडो. मग काय फरक पडतो. Fait accompli म्हणून पुढे सरकायचे.

धनुष Thu, 09/10/2014 - 10:55

भारतातून शिकायला येणारे सगळेच लोक काही इंजीनिअरिंग किंवा तत्सम नोकरीच्या उपसानेसाठीचं शिक्षण घ्यायला येत नाहीत. सोशल सायन्सेस, साहित्य, इतिहास तत्वज्ञान वैगेरे बिन पैशाचे तमाशे शिकायला सुद्धा काही हौशी गौशी लोक इथे येतात. (त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे भारतात ह्या शिक्षणाची झालेली जबरदस्त घसरण. जाऊदे, पुन्हा आपलं जुनंच रडगाणे!) त्यातले बरेच लोक उलट कट्टर डावे असतात (ह्यात मराठी लोक अगदी म्हणजे अगदीच नगण्य असल्याने असेल कदाचित).

इथले मराठी-अमेरिकन उजवे असतात का कसं ते माहित नाही कारण गेल्या ३ वर्षांत इथे मी एकही मराठी मनुष्याला पाहिलेलं नाही. पण भारतातल्या अनुभवांवरून ते तसे असतील ह्यावर माझी संपूर्ण श्रद्धा आहे. त्यांच्या मूळ शिदोरीतच लोचा आहे. भारतातलं मराठी मध्यमवर्गीय राजकीय सांस्कृतिक वातावरण हे अनेकानेक गंड, असुरक्षितता आणि वैचारिक दृष्ट्या खुरटलेल आहे. उजवेपणा म्हणजे केवळ धार्मिक असहिष्णुता किंवा आर्थिक उदारीकरणाला पाठींबा एवढंच नाही तर एक सांस्कृतिक भय आहे, ज्यातून एक कोती, सनातनी भावना तयार होते. अडचण अशी कि: आपण ज्याला पब्लिक इंटेलेक्चुअल्स म्हणतो, जी पॉपुलर मिडियातून उजवेपणा, संकुचितता, सांस्कृतिक गंड इत्यादी भानगडींची चिकित्सा करतात, त्यावर टीका करतात, सामाजिक सहिष्णुता, विरुद्ध मत पचवण्याच्या वृत्तीचा विकास करण्याचा प्रयत्न करतात, असे लोक आपण निर्माणच होऊ देत नाही. आणि तश्या लोकांची जागा रिकामी राहत नाही, ती फुटकळ आणि उथळ लोक बळकावतातच. आपले सामाजिक टीकाकार जोवर आपण पैदा करत नाही तोवर आपलं कठीण आहे.

बर्याच काळापूर्वी मी मुंबईत म्याक्स मुलर भवनात टाईमपास म्हणून (आणि काही रोम्यांटिक उद्योगांसाठी) जर्मन भाषा शिकत होतो. तिथे एक कल्याणचा एक इंजिनिअर मराठी मुलगा सुद्धा येत असे. त्याला त्याच्या कंपनी तर्फे जर्मनीला पाठवणार होते म्हणून जर्मन शिकायला तो यायचा. क्लास सुटल्यावर आम्ही चहा सिगारेटी वगैरे करत असताना, त्यानं मला त्याचं स्वप्न सांगितलं होत: हे बघ, आज मी २३ वर्षांचा आहे, आता मी पुढच्या एका वर्षात लग्न करेन आणि मग त्यानंतर एका वर्षाने मूल. म्हणजे जेन्वा मी ५० वर्षांचा होईन त्यावेळी माझा मुलगा/मुलगी पंचविशीत असेल, म्हणजे त्याचं/तिचं शिक्षण संपवून नवा इन्कम सोर्स तयार झाला असेल. ह्याशिवाय, त्याने मी इतक्या वर्षात कुठे आणि कसे पैसे गुंतवणार आणि त्याचे किती परत मिळतील, २५ वर्षानंतर बाजारभाव काय असणार इत्यादी गोष्टी सांगितल्या होत्या. मी त्याला म्हटलं कि बाबारे, हि एक सिगारेट संपवून मी ५ मिनिटांनी काय करणार हे ही मला माहित नाही. तर तुझे इमले तुला लखलाभ होवोत…

सांगायचा मुद्दा हा कि हे जे स्वतःला सुरक्षित करत राहाण आहे, ते अनेकानेक गृहीतकांवर बांधलं जात, ज्याच्या मुळाशी एक भय आहे, उद्याचं भय. आपण लोक इतके का घाबरलो आहोत, ते एक कोडंच आहे. उजवेपणाचा विचार ह्या थोड्या सायकोलोजिकल अङ्गल ने करावा असं मला वाटत.आपली स्वप्न सुद्धा इटुकली पिटुकली आणि ती पण इतक्या पातळ काचेची का आहेत; आपल्या मानसिक जडणघडणीचा पुनर्विचार करायला हवा कि नको?

बॅटमॅन Thu, 09/10/2014 - 11:44

In reply to by धनुष

आपली स्वप्न सुद्धा इटुकली पिटुकली आणि ती पण इतक्या पातळ काचेची का आहेत; आपल्या मानसिक जडणघडणीचा पुनर्विचार करायला हवा कि नको?

च्यायला, सगळ्यांनी मग काय पंतप्रधान नायतर टाटाबिर्ला व्हायची स्वप्नं बघायची काय? उगा कायतरच मोठ्या अपेक्षा तुमच्या मध्यमवर्गीयांकडून.

मन Thu, 09/10/2014 - 12:15

In reply to by बॅटमॅन

+१
हे धनुषरावांद्दल नाही; एकूणातच ऐन विशीत मिशी फुटू लागली की भव्य दिव्यतेचा डोस पाजणर्‍यांबद्दल आहे:-
लै मोठ्ठं कैतरी व्हा. अमुक करा वगैरेचा डोस हल्ली पाजला जातो.(कदाचित आधीही असावा, कल्पना नाही.)
सेल्फ हेल्प बुक नामक प्रकाराची हवा/क्रेझ त्यात अजूनच भर घालते.
आणि होतं असं की स्पर्धेत सारेच जेते नसतात.
शिवाय जेते असण्याचे प्रत्येकाचे मानकही वेगळे असतात.
महिन्याला दोनेक लाख घरी आणणाराही स्वतःला पाचेक लाख आणता न आल्याने जबरदस्त निराश करुन घेतो स्वतःला.
काहीजणांच्या बाबतीत असं होतं की हे प्रेरणा/उत्तेजना/inspirationचे डोस पिंच ऑफ सॉल्टसह घ्यायचे असतात
हे कळेपर्यंत बराच वेळ निघून गेलेला असतो.
अर्थात स्पर्धेनेच सर्वोत्तम काय ते बाहेर येते. स्पर्धा हवीच.
स्पर्धा जीवघेणी असण्यात चूक काहिच नाही.
स्पर्धेत जेते नसलेल्यांना अस्सच दंडित केलं जावं; त्यांचे हालहाल व्हावेत.
साल्यांना ग्यास चेम्बरमध्ये घालून ....
असे परमपवित्र विचार असतील तर हरकत घेणारे आम्ही कोण.

बॅटमॅन Thu, 09/10/2014 - 12:20

In reply to by मन

विशीत मिशी फुटणे म्हणजे अंमळ रोचक आहे खरं. आम्हांला अन आमच्या कैक मित्रांना मधुरषौडश्यातच मिशी फुटली होती.

अन मूळ मुद्याबद्दल स्वतः नमुनेदार अँटिथेसिस ऑफ फडतूस असलेल्या एकाचे हे एक वाक्य पहा.

"राजहंसाचे चालणें | जाहले जगी शहाणें | म्हणोनि काय कवणें | चालोंचि नयें ||"

धनुष Thu, 09/10/2014 - 12:31

In reply to by मन

+१
एकदम सहमत. माझ्या प्रतिसादातून सेल्फ हेल्प टाइप काही अर्थ निघू शकेल ह्याचा विचार सुद्धा त्रास दायक आहे. सेल्फ हेल्प अडाणीपणाचा निषेध असो. मला म्हणायचं आहे ते इतकंच कि: आयुष्याकडे किडूक मिडूक पैसे जोडत राहण्याच्या दृष्टीने पाहणे अरसिक तर आहेच पण कोतेपणाच आहे.

बॅटमॅन Thu, 09/10/2014 - 12:35

In reply to by धनुष

एक तर अरसिकपणाची व्याख्या सब्जेक्टिव्ह आहे. शिवाय, पैशाच्या चष्म्यातून जगाकडे पाहणं हा कोतेपणा असेल तर जगातली प्रत्येक आयड्यॉलॉजी हा कोतेपणाच आहे. इतके बाकीचे चष्मे चालतात तर हा एक चष्मा का चालत नाही? किमान पैसे असल्यावर जीवन सुकर होतं हे एक सत्य तरी त्यामागे आहे. उगीच अमुक अन तमुक वादासारखं वांझोटं नाहीये ते.

पिवळा डांबिस Thu, 09/10/2014 - 22:57

In reply to by बॅटमॅन

"पैसा भगवान तो नही है, लेकिन मांकसम भगवानसे कम भी नही है|"
असं भारतामधल्या एका अप्रसिद्ध नेत्याचं प्रसिद्ध वाक्य आठवलं!!! :)
बाकी बॅट्याला या विषयावर बॅटिंग करतांना पाहून सचिनची बॅटिंग पहातांना सुनील गावसकरला काय वाटत असेल ते जाणवून ड्वाळे पानावले!!! ;)

बॅटमॅन Thu, 09/10/2014 - 23:01

In reply to by पिवळा डांबिस

बाकी बॅट्याला या विषयावर बॅटिंग करतांना पाहून सचिनची बॅटिंग पहातांना सुनील गावसकरला काय वाटत असेल ते जाणवून ड्वाळे पानावले!!!

कै चुकलंमाकलं तर इथेच आमच्या बॅटमोबिलीतली हवा सोडा पिडांकाका ;)

पिवळा डांबिस Thu, 09/10/2014 - 23:12

In reply to by बॅटमॅन

आणि हे कुणा एकाला उद्देश्यून असं नाही, पण पैसा असणारा माणूस हा रात्रंदिवस फक्त पैशाचाच विचार करणारा असतो, जीवनाच्या बाकीच्या क्षेत्रात त्याला रस्/गम्य नसतं हे (बहुदा पैसा नसणार्‍यांनी केलेलं) एक जनरलायझशन असावं!
माझ्या मते पैसा असणारे लोकं त्यांना रुची असलेल्या क्षेत्रात, फक्त वाचनच असायची गरज नाही तर, संगीत, चित्र-शिल्पकला, स्थापत्यशास्त्र, फिलॅन्थ्रोपी वगैरेमध्ये जास्त रस घेऊन असतात. कारण त्यांच्या मंमंची सोय त्यांच्या गुंतवणुकीतून येत असल्याने, आणि त्यासाठी त्यांना दिवसाचे १०-११ तास मोजावे लागत नसल्याने, त्यांना आपल्या आवडीकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ असतो!!!
त्यामुळे त्यांचा हेवा वाटणं जरी काही प्रमाणात नैसर्गिक असलं तरी त्यांना एकजात अरसिक समजणं हे असमंजसपणाचं आहे असं मला वाटतं....

बॅटमॅन Fri, 10/10/2014 - 14:34

In reply to by पिवळा डांबिस

आणि 'गरीब पण बुद्धिमान' या जोडीला अजूनही महाराष्ट्रात महत्त्व देणे गरजेचे वाटते यातच सारे काही आले. पैसे कमवतात सगळेच, पण त्याच्याकडे अजून निकोपपणे पहायची दृष्टी मराठी मध्यमवर्गात रुजलेली नाही. अजूनही पैशाबद्दल चांगले काही बोलणे हा जरा बॅड फॉर्मच समजला जातो.

धनुष यांना उद्देशून हे नाहीये (नैतर परत अरे मला नव्हतं असं म्हणायचं इ.इ. म्हणतील म्हणून अगोदरच सांगतो.) पण हे फार जाणवतं. सगळे साले पैशे बाळगून असतात पण तसं बोलायचं मात्र नाही. काय वायझेडपणा आहे?

धनुष Thu, 09/10/2014 - 21:47

In reply to by बॅटमॅन

अरे? पैसा मिळवू नये नि भिकेचे डोहाळे मिरावावेत असं मी म्हणत नाहीये. पैश्या पलीकडे न पाहता येणे, सगळ्या यच्चयावत सृष्टीला पैश्यात मोजणे हा प्रॉब्लेम आहे. आणि आपली सगळ्यांची मते सब्जेक्टीवच आहेत कि.

बॅटमॅन Thu, 09/10/2014 - 22:00

In reply to by धनुष

पैसा हे साध्य म्हणून पाहिले तर नक्की प्रॉब्लेम काय असतो मराठी लोकांना काय कळत नाय. हे लेखक कवी काय नैतर जर्नलिस्ट काय, प्रत्येकजण यच्चयावत सृष्टीला क्षयझ गोष्टीत बद्ध करू पाहतच असतो. मग यांनीच पैशात मोजलं सृष्टीला तर ते औटॉफ ऑर्डिनरी का समजावं ते कळत नाही.

वामा१००-वाचनमा… Thu, 09/10/2014 - 22:02

In reply to by बॅटमॅन

अरसिक आहेस तू बॅट्या. कोणी आपलं स्वप्न सांगत असेल तर त्याला हिणवायचं कळत कसं नाही तुला? त्याने आपण रसिकशिरोमणी ठरतो ;)

धनुष Thu, 09/10/2014 - 22:07

In reply to by बॅटमॅन

केवळ पैसा हे (च) साध्य म्हणून पाहणे हे तर अजिबातच ऑउट ऑफ ओर्डीनरी नाही. सर्वात ओर्डीनरी तर हेच आहे. आणि इतर तात्विक चष्म्यांपेक्षा हे तुम्हांला कमी खोटारड वाटत हे समजण्यासारखं आहे, पण मला हे डीजनरेटिंग वाटत. खैर, आपली मत भिन्न आहेत अस मानून थांबू.

वामा१००-वाचनमा… Thu, 09/10/2014 - 22:26

In reply to by धनुष

त्याचं ते स्वप्न साकार झालं असेल का, नसेल ते माहीत नाही पण ते स्वप्न (खरच डिटेलड स्वप्न) त्यानी पाहीलं असेल अन तो त्या क्षणी तुम्हाला सांगत होता, हा सन्मान होता तुमचा. जाऊ दे मी कशाला इतकी इमोसनल होतेय :(

धनुष Thu, 09/10/2014 - 22:28

In reply to by वामा१००-वाचनमा…

मी त्याला वाटेला लावलं असं तुम्ही कुठल्या आधाराने गृहीत धरताय? तो मुलगा प्रामाणिकपणेच बोलत होता आणि त्यानं अशी स्वप्न पाहू नयेत असं काही माझे म्हणणे नाही. (का असावं? मला कुठलाही अधिकार नाही त्याच्या स्वप्नांना हिणवण्याचा. आणि मी तसं करतही नाहीये.) मी इतकंच म्हणतोय कि अनेक अनिश्चितता आयुष्य समृद्धच करतात. बुद्ध म्हणतो तसं एका नदीत आपण दोनदा पाय ठेऊ शकत नाही. कारण प्रत्येक क्षणी आपण आणि नदी दोन्ही बदलत असतात. त्यामुळे, आला क्षण आनंदाने जगावा. उद्याची अति काळजी आपला आजचा क्षणहि नासवते. आणि हे मान्यच आहे कि हे माझं अगदी वैयक्तिक मत आहे. किमान मी त्या मित्राला हिणवत नाहीये इतकं तरी तुम्ही मान्य कराल अशी आशा आहे.

वामा१००-वाचनमा… Thu, 09/10/2014 - 22:36

In reply to by धनुष

कदाचित माझं इन्टरप्रिटेशन चुकलं असेल.

मी इतकंच म्हणतोय कि अनेक अनिश्चितता आयुष्य समृद्धच करतात.

अतिशय आशयगर्भ वाक्य!!
आपले म्हणणे मान्य तर आहेच पण आपल्या उत्तराबद्दल आभारी आहे.

राजन बापट Thu, 09/10/2014 - 11:36

In reply to by धनुष

धनुष यांचा प्रतिसाद रोचक आहे आणि तो भारतातल्या मध्यमवर्गीयांच्या एका विशिष्ट संदर्भातल्या मानसिकतेवर प्रकाश टाकतो खरा.

पण मला प्रश्न पडला : ज्या मनोवृत्तीची, असुरक्षित, भयग्रस्ततेची वर्णनं केलेली आहेत ती उजव्या विचारसरणीची निदर्शक कशी ठरतात ? मी त्यांना "सर्व्हायव्हलिस्ट" मानसिकता म्हणतो.

धनुष यांनी जे वर्णन भारतातल्या मध्यमवर्गीयांच्या भयग्रस्ततेचं किंवा असुरक्षिततेचं किंवा एकंदर आयुष्याकडे स्थैर्य/प्लानिंग वगैरेच्या नजरेतून पहाण्याचं केलेलं आहे त्याचंच प्रतिबिंब इथल्या एनाराय लोकांमधे दिसतं. मी गंमतीने त्यांचं वर्णन "मिलिनेयर सर्व्हायव्हर्स" असं करतो. म्हणजे असं की त्यांची घरं मिलियन डॉलर्सच्या घरातली वगैरे असतात परंतु त्यांच्याकडे रोजचा पेपर येत नाही, घरात औषधालाही पुस्तक नसतं. (इथे मी अर्थातच मुलांचा अभ्यास, कामानिमित्त लागणारी पुस्तकं, बँकबुक्स इत्यादिंना वगळलेलं आहे). मुख्य म्हणजे बोलण्याचे विषय हे प्रामुख्याने पैशाचं प्लानिंग, अर्थव्यवस्थेचा "आपल्या"वर होऊ शकेल असा परिणाम, एच-वन किंवा ग्रीन कार्ड किंवा सिटिझनशिपचा प्रवास किंवा घरांचे चढतेउतरते भाव, शेअर्स आणि अन्य स्वरूपाची इन्व्हेस्टमेंट, निरनिराळ्या संदर्भातल्या ग्राहक या भूमिकेतून मिळू शकणारी "डील्स", कॉलेज एज्युकेशन, रिटायरमेंट प्लानिंग इत्यादि विषयांभोवती फिरताना दिसतात. त्यांना प्रेसिडेन्शियल निवडणुकांमधे (त्या निवडणुकीला असलेल्या ग्लॅमरमुळे) भरपूर रस असेल परंतु आपापल्या राज्याचे सेनेटर्स कोण असतील, काँग्रेसमन कोण असतील, जेरिमँडरींग म्हणजे काय, इत्यादिबद्दल क्वचितच माहिती असताना दिसते. ज्या समाजात आपण रहातो, त्या समाजाचा लँडस्केप वगैरेंशी देणघेणं असताना मी क्वचित् पहातो. यालाच मी "मिलिनेयर सर्व्हायव्हर्स" असं म्ह्णतो.

ऋषिकेश Thu, 09/10/2014 - 12:03

In reply to by राजन बापट

ची घरं मिलियन डॉलर्सच्या घरातली वगैरे असतात परंतु त्यांच्याकडे रोजचा पेपर येत नाही, घरात औषधालाही पुस्तक नसतं. (इथे मी अर्थातच मुलांचा अभ्यास, कामानिमित्त लागणारी पुस्तकं, बँकबुक्स इत्यादिंना वगळलेलं आहे). मुख्य म्हणजे बोलण्याचे विषय हे प्रामुख्याने पैशाचं प्लानिंग, अर्थव्यवस्थेचा "आपल्या"वर होऊ शकेल असा परिणाम, एच-वन किंवा ग्रीन कार्ड किंवा सिटिझनशिपचा प्रवास किंवा घरांचे चढतेउतरते भाव, शेअर्स आणि अन्य स्वरूपाची इन्व्हेस्टमेंट, निरनिराळ्या संदर्भातल्या ग्राहक या भूमिकेतून मिळू शकणारी "डील्स", कॉलेज एज्युकेशन, रिटायरमेंट प्लानिंग इत्यादि विषयांभोवती फिरताना दिसतात. त्यांना प्रेसिडेन्शियल निवडणुकांमधे (त्या निवडणुकीला असलेल्या ग्लॅमरमुळे) भरपूर रस असेल परंतु आपापल्या राज्याचे सेनेटर्स कोण असतील, काँग्रेसमन कोण असतील, जेरिमँडरींग म्हणजे काय, इत्यादिबद्दल क्वचितच माहिती असताना दिसते. ज्या समाजात आपण रहातो, त्या समाजाचा लँडस्केप वगैरेंशी देणघेणं असताना मी क्वचित् पहातो. यालाच मी "मिलिनेयर सर्व्हायव्हर्स" असं म्ह्णतो

खरे आहे! मध्यमवर्गीयांपुरते बोलायचे तर ही परिस्थिती अमेरिकेपुरती मर्यादित नसावी.

धनुष Thu, 09/10/2014 - 11:59

उजवेपणा म्हणजे जर आर्थिक उदारीकरणाला पाठींबा, जाती किंवा इतर सामाजिक मागासलेपणावर आधारित सरकारी संरक्षणाला विरोध, मुसलमान किंवा तत्सम "राष्ट्रविरोधी" घटकांबद्दल तुच्छता/भीती, इत्यादी भानगडी असतील तर मग उजवेपणा ची ही मानसिकता कुठून पैदा होते? आर्थिक/सामाजिक असुरक्षितता, जुन्या श्रेष्ठत्वाचे गंड अश्या गोष्टींनी ही मानसिकता बनते. म्हणून मी ह्या "सर्व्हायव्हलिस्ट" दृष्टीला उजवी दृष्टी म्हणतो. अर्थात ह्यात डिग्रीचा फरक पडेल, म्हणजे सगळे असुरक्षित लोक उजवेच होतील असं नाही पण उजवेपणाचा पाया ही वृत्ती आहे असं मला वाटत.

मुक्त सुनीत ह्यांनी वर्णन केलेले अमेरिकी भारतीय भारतात पण हेच उद्योग करतात. आपल्या घरातून पुस्तकांची हद्दपारी हे तर माझ्या मते उजवेपणाचे व्यवछेदक लक्षण आहे. फक्त पैशात आणि उपयुक्ततेत जग तोलणारे बनिये लोक उजवे नाहीत तर आणखी कोण आहेत?

चिंतातुर जंतू Thu, 09/10/2014 - 14:01

In reply to by धनुष

>> फक्त पैशात आणि उपयुक्ततेत जग तोलणारे बनिये लोक उजवे नाहीत तर आणखी कोण आहेत?

सहमत. आणि अशी जीवनशैली स्वीकारलेल्या ब्राह्मणांना असं (म्हणजे 'वैश्य' म्हणून) संबोधल्याचा खूप राग येतो, कारण त्यांना आपल्या ब्राह्मण असण्याचाही (व्यक्त / अव्यक्त) दंभ असतो.

रमताराम Thu, 09/10/2014 - 15:37

In reply to by चिंतातुर जंतू

आणि अशी जीवनशैली स्वीकारलेल्या ब्राह्मणांना असं (म्हणजे 'वैश्य' म्हणून) संबोधल्याचा खूप राग येतो, कारण त्यांना आपल्या ब्राह्मण असण्याचाही (व्यक्त / अव्यक्त) दंभ असतो.>> चिंतूशेटना अणुमोदन

मी Thu, 09/10/2014 - 12:31

धनुष किंवा मुक्तसुनित ह्यांनी वर्णन केलेल्या वर्तना विरुद्ध वर्तन नक्की कुठे किंवा कोणत्या लोकसमुहात आढळते? अमेरीका किंवा औद्योगिक क्रांती केलेल्या देशांचा आदर्श असणारे सर्वच विकसनशील लोकसमुह ह्याच अवस्थेतुन जाणार ह्यात नविन ते काय म्हणावे? लोकसमुहाच्या आजच्या या अवस्थेला कालची अवस्था बर्‍याच अंशी जबाबदार आहे हे लक्षात येते(समाजवादाशी संबंधित धाग्यात सविस्तर दिले आहेच), त्यामुळे समुहाचे आजचे वर्तन चकित करणारे नसुन भाकीत करण्याजोगे आहे.

उजव्यांच्या वर्तनाबद्दल खेद/आश्चर्य व्यक्त करताना डाव्यांच्या अपयशाबद्दल रमताराम ह्यांनी अतिशय उत्तम लिहिले आहे.

चिंतातुर जंतू Thu, 09/10/2014 - 13:57

In reply to by मी

>> धनुष किंवा मुक्तसुनित ह्यांनी वर्णन केलेल्या वर्तना विरुद्ध वर्तन नक्की कुठे किंवा कोणत्या लोकसमुहात आढळते? अमेरीका किंवा औद्योगिक क्रांती केलेल्या देशांचा आदर्श असणारे सर्वच विकसनशील लोकसमुह ह्याच अवस्थेतुन जाणार ह्यात नविन ते काय म्हणावे?

मला वाटतं की औद्योगिक विकास झालेल्यांचा आदर्श ही एकच एक सुटी गोष्ट नसते; तर स्वतःच्या परंपरांविषयीचा अभिमान आणि हा आदर्श ह्यांचं मिश्रण (त्यात अंतर्भूत असलेल्या अंतर्विरोधांसकट) जिथे आहे तिथे असं वर्तन आढळतं. त्यामुळे ह्यातली एक गोष्ट प्रकर्षानं धरून ठेवण्याची इच्छा जिथून गायब झालेली असते तिथे वेगळा विचार / आचरण दिसतं.

मी Thu, 09/10/2014 - 14:21

In reply to by चिंतातुर जंतू

सहमत आहे, पण परंपरेला धरुन ठेवणही अवस्थेचा एक भाग असावा.

चिंतातुर जंतू Thu, 09/10/2014 - 15:00

In reply to by मी

>> परंपरेला धरुन ठेवणही अवस्थेचा एक भाग असावा.

त्याबद्दल अडचण नाही; आधुनिकतेला सामोरं जाताना व्यक्तिगत पातळीवर हा संघर्ष (परंपरा विरुद्ध आधुनिकता) होणं गरजेचं असतं. त्यापेक्षा तो टाळण्याची प्रवृत्ती असेल, तर असे गोंधळ होत असावेत.

मी Thu, 09/10/2014 - 15:25

In reply to by चिंतातुर जंतू

समन्वयवाद्यांवर* टिका होणं सहाजिक आहे, ह्या समन्वयवादाची मुळं कुरुंदकर महादेव रानड्यांपर्यंत/लोकहितवादींपर्यंत नेतात, आणि टोकाची वैचारीक भुमिका न मांडण्याला बुद्धिवादी(डाव्या) वर्गाचे अपयश समजतात. पण अशी समन्वयवादी भुमिका घेणं हे भारतीयांचे व्यवच्छेदक लक्षण मानता येईल काय? सर्वच विकसित देश परंपरा/अधुनिकता ह्या द्वंद्वातून थोड्याफार प्रमाणात ह्याच प्रकारे गेले असतील न?

*इतर सोयिस्कर परंपरेची किंवा अधुनिकतेची बाजु घेणार्‍या फायदेकरुंबद्दल बोलणे टाळत आहे, अर्थात परवाच्या मॅडिसन स्क्वेअरवर अशांची गर्दी जास्त होती असं मला वाटतं.

धनुष Thu, 09/10/2014 - 22:00

In reply to by चिंतातुर जंतू

चिंतातूर जन्तुंशी सहमत. शिवाय एकतर औद्योगिक क्रांती हि केवळ यंत्रांची क्रांती नाही. कथ्लिक सनातनी विचारांची टीका, धर्म आणि राज्य-व्यवस्थेची विलगता, नव्या साहित्य आणि सौंदर्य शास्त्रांची निर्मिती, नव्या प्रबोधनाच्या तत्वज्ञानांचा विकास अश्या अनेक वैचारिक गोष्टींचा ह्या क्रांतीशी घनिष्ठ जैविक संबंध आहे. विचारांच्या क्रांती शिवाय यंत्रांची क्रांती होत नाही. आणखी, चिंतातूर जंतू म्हणतात तसं, आपल्या आधुनिक मध्यम वर्गाची निर्मिती होताना सुद्धा स्वदेशीय परंपरा आणि नव्या पाश्चात्य वैचारिक धारणांचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला गेला. वैचारिक दिवाळखोरीच सेलिब्रेट करणारे लोक कसल्या आदर्शानुसार वागताहेत?

बॅटमॅन Thu, 09/10/2014 - 22:35

In reply to by धनुष

युरोपात औद्योगिक क्रांती झाली त्याच्या दोनेकशे वर्षे अगोदरपासून परंपरावादी विचारांवरची टीका तिथे फेमस होती इतकेच. त्या एका मॉडेलवरून

विचारांच्या क्रांती शिवाय यंत्रांची क्रांती होत नाही.

असे ओव्हरआर्किंग विधान करण्यात काही अर्थ वाटत नाही.

प्राचीन ग्रीसमध्येही विचारांची क्रांती झालीच की. तिथे कुठे झाली यंत्रक्रांती?

प्राचीन चीनमध्ये, प्राचीन भारतातही क्रांतिकारक तांत्रिक शोध लागलेच. त्याने विचारक्रांती कुठे नि कशी झाली हे सांगू शकाल काय?

अंधश्रद्धाविरोध-तांत्रिक क्रांती-लोकशाही ते राजेशाही हा बदल हे सगळे एकत्र सरळ साध्या कारणपरंपरेत बसत नाही. या सर्व गोष्टी एकत्रच असतात हीच मुळात युरोपियन धारणा आहे. हिचेच अजून एक रूप म्हणजे रीजन, भाषा, एथनिसिटी, कल्चर/रिलिजन आणि पोलिटिकल पॉवर या सर्व गोष्टींचे अद्वैत मानणे. शेल्डन पोलॉकने या धारणेचा खरपूस समाचार घेतलेला आहे. तसेच पहिल्या समुच्चयाचाही कुणी घेतला असल्यास माहिती नाही. पण घेतला पाहिजे, कारण युरोपियन मॉडेल अख्ख्या जगाला फिट करण्याचा अट्टाहास यातून जाणवतो.

धनुष Thu, 09/10/2014 - 22:56

In reply to by बॅटमॅन

अरे ब्याटमन भाऊ, मी ह्या आयडी चा प्रश्न होता: धनुष किंवा मुक्तसुनित ह्यांनी वर्णन केलेल्या वर्तना विरुद्ध वर्तन नक्की कुठे किंवा कोणत्या लोकसमुहात आढळते? अमेरीका किंवा औद्योगिक क्रांती केलेल्या देशांचा आदर्श असणारे सर्वच विकसनशील लोकसमुह ह्याच अवस्थेतुन जाणार ह्यात नविन ते काय म्हणावे?

त्यावर उत्तर म्हणून मी लिहिलं कि औद्योगिक क्रांतीचाच काय, कुठल्याही क्रांतीचा आदर्श ह्या लोकासमुहापुढे नाही. खर तर आदर्शांच्या कुठल्याही जाणीवा ठोकरल्या गेल्या आहेत. औद्योगिक क्रांतीचाच आदर्श म्हणायचा तर तो केवळ मटेरीअल वस्तू भांडार बनण नाहीये तर अनेक क्षेत्रातली वैचारिक खळबळ आहे. त्याचं अद्वैत आहे असं मी कुठे म्हटल? भारतीय किंवा इतर विकसनशील लोकांना औद्योगिक क्रांतीच्या मार्गावरचे मानण हेच युरोपीय धारणा जगाला लागू करणे आहे, जे मला पटत नाही.

बॅटमॅन Thu, 09/10/2014 - 23:08

In reply to by धनुष

तसं मला जाणवलं इतकंच.

बाकी मग सहमत आहे हेवेसांनल.

अपडेटः सहमत नाय.

कारणः औद्योगिक क्रांतीचा कुठला अर्थ घ्यावा अन कुठला पैलू स्वीकारावा याचे स्वातंत्र्य नाकारल्यासारखे होत नाही का? औद्योगिक क्रांती म्हणजे भसाभस नवनव्या वस्तू पाहिजेत असे म्हटले तर तो चुकीचा आदर्श होतो का? आञ मीन, हे प्याकेज आहे तस्से स्वीकारावे हा आग्रह नाय का होत?

धनुष Thu, 09/10/2014 - 23:32

In reply to by बॅटमॅन

कमाल आहे राव. औद्योगिक क्रांतीचा आदर्श घ्यावा असं मी (म्हणजे मी स्वतः) अजिबातच म्हणत नाहीये. तो विकसनशील देशांसमोर असतो असं जर आपण (मी ह्या आयडीच्या मतानुसार) मानणारच असू तर मग तो काही केवळ मटेरीअल स्वरूपाचा नाही तर तर वैचारिक स्वरूपाचा पण आहे असं मी म्हणालो. इतकंच.

बॅटमॅन Fri, 10/10/2014 - 01:49

In reply to by धनुष

तुम्ही म्हणताहात असे म्हणतच नैये हो. जर विकसनशील राष्ट्रांसमोर आदर्श असला तर त्यातलं काय घ्यायचं हे त्यांना ठरवू देणं ठीक इतकंच म्हणतोय. असो. या 'आदर्शा' चे रूप बहुपेडी आहे यावर अर्थातच सहमती आहे.

मी Thu, 09/10/2014 - 23:23

In reply to by धनुष

कथ्लिक सनातनी विचारांची टीका, धर्म आणि राज्य-व्यवस्थेची विलगता, नव्या साहित्य आणि सौंदर्य शास्त्रांची निर्मिती, नव्या प्रबोधनाच्या तत्वज्ञानांचा विकास अश्या अनेक वैचारिक गोष्टींचा ह्या क्रांतीशी घनिष्ठ जैविक संबंध आहे.

कॅथलिक सनातनी अवस्थेतून युरोप थेट वैचारिक विकसीत अवस्थेत पोहचला असावा असे आपले म्हणणे दिसते, ट्रान्झिशन फारच वेगात झाले असावे काय?, समन्वयवादी अवस्थेतून युरोप गेलाच नसावा काय?

धनुष Thu, 09/10/2014 - 23:44

In reply to by मी

अहो, मी असं काहीच म्हणत नाहीये. एक तर अश्या उत्क्रांतीच्या धारणा इतिहासाला लागू करणे मला पटत नाही. समन्वय हा तर सतत चालू असतो. एखाद्या काळापासून किंवा वैचारिक धारणेपासून संपूर्ण ब्रेक कधीच दिसत नाही. युरोपचंच उदाहरण घ्यायचं तर अमोस फनकेन्स्ताइन ह्यांनी थिओलोजी अंड सायंटिफिक रेवोलुशन ह्या प्रख्यात पुस्तकात दाखवून दिलंय तसं, ईश्वरशास्त्रातल्या ४ महत्वाच्या धारणा - देवाचं सार्वभौमत्व, त्याचं सार्वकालीत्व, त्याचं आद्यत्व आणि त्याची सर्वज्ञता - ह्या सतराव्या शतकातल्या वैज्ञानिक आणि तात्विक विचारात आढळतात. वैचारिक इतिहासात समन्वय सततच दिसतो.

Nile Thu, 09/10/2014 - 21:20

In reply to by मी

धनुष किंवा मुक्तसुनित ह्यांनी वर्णन केलेल्या वर्तना विरुद्ध वर्तन नक्की कुठे किंवा कोणत्या लोकसमुहात आढळते?

या एकदा इकडे, भेट घालून देतो. मागे एकदा आमच्या त्यावेळच्या गर्लफ्रेंडच्या ग्रुपबरोबर सिनेमाला जायचे ठरले होते. मी आपलं चांगला सिनेमा म्हणून लियाम निसनचा 'ग्रे' सुचवला. तर तो एका भांडवलवादी कंपनीकरता नोकरी करणारा असतो इतक्याश्या कारणावरून तो सिनेमा धूडकावून लावण्यात आला. शेवटी आम्ही एका स्पॅनिश-पोर्तुगिज भाषेत असलेल्या अ‍ॅनिमेटेड (पण कार्टूनिश नाही) सिनेमाला गेलो. सिनेमाची कथा एका गरीब वर्गातल्या कलाकाराची, पुढे तो ब्राझिलमध्ये (का कुठेतरी) जाऊन यशस्वी होतो पण 'स्वत्व' गमावतो वगैरे. (नंतर एकट्याने ग्रे पाहिला हे सांगणे न लगे.) अधिक काय लिहणे!

उजव्यांच्या वर्तनाबद्दल खेद/आश्चर्य व्यक्त करताना डाव्यांच्या अपयशाबद्दल रमताराम ह्यांनी अतिशय उत्तम लिहिले आहे.

अमेरीकेतले डावे म्हणजे समाजावादीच असे नाही. याबद्दल वरती कोणीतरी लिहलेलंच आहे. एकंदरीतच अमेरीकेतील उजवे-डावे प्रकरण जरा गोंधळाचं आहे आणि त्यावर बरंच लिहलेलं सापडेल.

पिवळा डांबिस Thu, 09/10/2014 - 22:41

In reply to by Nile

मागे एकदा आमच्या त्यावेळच्या गर्लफ्रेंडच्या ग्रुपबरोबर सिनेमाला जायचे ठरले होते. मी आपलं चांगला सिनेमा म्हणून लियाम निसनचा 'ग्रे' सुचवला. तर तो एका भांडवलवादी कंपनीकरता नोकरी करणारा असतो इतक्याश्या कारणावरून तो सिनेमा धूडकावून लावण्यात आला. शेवटी आम्ही एका स्पॅनिश-पोर्तुगिज भाषेत असलेल्या अ‍ॅनिमेटेड (पण कार्टूनिश नाही) सिनेमाला गेलो. सिनेमाची कथा एका गरीब वर्गातल्या कलाकाराची, पुढे तो ब्राझिलमध्ये (का कुठेतरी) जाऊन यशस्वी होतो पण 'स्वत्व' गमावतो वगैरे.

एकच सल्ला...
संगत बदलावी!
आणि जमल्यास गर्लफ्रेन्डही!!!
;)

Nile Thu, 09/10/2014 - 22:53

In reply to by पिवळा डांबिस

सद्ध्या हवा तो सिनेमा हवा तेव्हा बघायचे स्वातंत्र्य आहे! ;-)

नितिन थत्ते Thu, 09/10/2014 - 14:44

फडतूसांना गोळ्या घातल्या पाहिजेत हे उजवं तत्त्वज्ञान जगभर कुठेही असतं.

भारतातल्या उजव्यांचा एक ठळक विशेष असा की हे फडतूसत्व किंवा श्रेष्ठत्व हे इथे जन्माने मिळतं. श्रेष्ठ - फडतूस हे गट आणि परंपरागत श्रेष्ठ- कनिष्ठ हे बर्‍यापैकी ओव्हरलॅपिंग असतात. परंपरेने मिळणार्‍या श्रेष्ठत्वाचे फायदे नव्या व्यवस्थेत जाणार अशी भावना असते म्हणून परंपरा तोडणारे काहीही घातक अशी समजूत होते.

आज तरुण असलेले उच्चवर्णीय उजवे परंपरागत फायद्यांचा विचार करतच असतील असे नाही. पण विसाव्या शतकातल्या बदलांच्या स्मृतींच एक बॅगेज त्यांच्याकडे कुटुंबांतून येत असते.

अनुप ढेरे Thu, 09/10/2014 - 15:31

In reply to by नितिन थत्ते

भारतातल्या उजव्यांचा एक ठळक विशेष असा की हे फडतूसत्व किंवा श्रेष्ठत्व हे इथे जन्माने मिळतं.

किंचित अहसमत. इंग्रजीत हायबॉर्न म्हणून एक शब्द आहे. तो जन्मजात श्रेष्ठता दर्शावतो. जन्मजात श्रेष्ठ-कनिष्ठत्व हे भारतीय समजातच दिसत असं नाही.

Nile Thu, 09/10/2014 - 23:02

In reply to by अनुप ढेरे

अहो इंग्रजीत गिलटीन म्हणूनही शब्द आहे म्हणजे काय ते आजकाल सर्रास वापरलं जातं असं मानायचं का? थत्ते म्हणतात त्यात राजकीय अन सामाजिक वास्तव आहे. जातीय/वर्गीय राजकारण भारतात अजूनही स्पष्ट आहे. आमचा एक युपीचा रूममेट होता, तो म्हणायचा, यादवांचं राज्य आले की गावातले सगळे यादव माजतात आणि बहुजनवाले जपून असतात, आणि बीएसपीचं राज्य आलं की बहुजन वाले माजतात. पण दोघांपैकी कोणाचंही राज्य आलं तरी आम्ही आम्हा बनियालोकांची मात्र तेव्हढीच मारली जाते.

इतर पाश्चिमात्य देशांचं माहित नाही, पण असं श्रेष्ठत्व अमेरीकेत तरी टाळलं जातं. अगदी उजवीकडचेही लोक वर्णश्रेष्ठत्ववाल्यांपासून दूर रहायचं प्रयत्न करतात.

अनुप ढेरे Fri, 10/10/2014 - 06:33

In reply to by Nile

माझा मुद्दा हा होता की जन्मजात श्रेष्ठ-कनिष्ठत्व ही संकल्पना भारतीयच आहे असं नाही. आत्ता कुठे काय आहे हा नाही.

Nile Fri, 10/10/2014 - 07:01

In reply to by अनुप ढेरे

पण थत्ते भुतकाळाबाबत बोलत नाहीएत हे त्यांच्या पतिसादावरून सुस्पष्ट आहे. मग तुमच्या प्रतिसादाला काय अर्थ आहे?

नितिन थत्ते Fri, 10/10/2014 - 07:16

In reply to by Nile

+१

भूतकाळात नव्या व्यवस्थेमुळे* परंपरागत अधिकार हिरावून घेतले गेल्याच्या स्मृतीचं गाठोडं कुटुंबाकडून आलेलं असतं.

*अमेरिकेत त्या हक्कांचं पुनर्वसन होत नसतंच. पण भारतात ते कुणामुळे झालं याची स्मृती घट्ट असते.

रमताराम Thu, 09/10/2014 - 15:35

अमेरिकेतील भारतीयांपलिकडेही भारतीय आहेत हे या निळ्याला कधी समजणार देव जाणे.

Nile Thu, 09/10/2014 - 21:20

In reply to by रमताराम

अमेरिकेतील भारतीयांपलिकडेही भारतीय आहेत हे या निळ्याला कधी समजणार देव जाणे.

कुठे असतात म्हणे हे लोक? कॅरीबीयन आयलंड्सवरचे का? ;-)

च्यायला, ज्या लेखाला प्रतिसाद दिला होता त्या विषयाला अनुसरून लिव्हलंय हे. तुम्ही भारतातील भारतीयांबद्दल लिहा, आम्ही तिथे येऊन त्यांनाही शिव्या देऊच की. हाय काय अन नाही काय!