स्वातंत्र्योत्तर भारतात समाजवादाची वाटचाल

व्यवस्थापकः या धाग्यावर (इथे )झालेल्या चर्चेनुसार तीनही प्रतिसाद एकत्र करून वेगळा धागा काढत आहोत.
राही या धाग्याचे संपादन करून आवश्यक ते बदल करू शकतील. तसेच उर्वरित लेखनही याच धाग्याला संपादित करून अथवा प्रतिसादात स्वतंत्रपणे देऊ शकतील.

=======

या विषयावर सविस्तर काही लिहायचे माझ्याही मनात खूप दिवस होते पण निमित्त नव्हते. शिवाय त्या लांबलचक लिखाणाची खरेच गरज आहे का असेही वाटले. पण हिय्या करून प्रयत्न केला आहे. यात जुना इतिहास आठवणे अपरिहार्य वाटले, जरी धागाकर्त्याला अपेक्षित नसले तरी. या विषयांतराबद्दल क्षमस्व.
खरे तर भारतात समाजवादी चळवळीचे राजकीय रूप इतके दिवस टिकले हेच आश्चर्य आहे. कारण ज्या काँग्रेसमधून हे लोक वेळोवेळी तात्कालिक मुद्द्यांवरून बाहेर पडले त्या काँग्रेसचाही चेहरा किंवा मुखवटा समाजवादाचाच होता. समाजवादी म्हणवणारा एक प्रबळ पक्ष आधीच अस्तित्वात असताना समाजवादाच्या ह्या 'ब' आघाडीला वैचारिक वेगळेपणा प्रस्थापित करणे कठिण होते. त्यामुळे मग विचारांपेक्षा आचारावर भर देऊन 'आचाराने आम्ही वेगळे' अशी भूमिका घेण्यात आली आणि भ्रष्टाचाराला विरोध या नावाखाली काँग्रेसला विरोध केला गेला. नंतर तर काँग्रेसविरोध हे एकच सूत्र राहिले आणि जो कोणी काँग्रेसविरोधी तो आपला असे मानून टोकाच्या विरोधी विचारसरण्यांशीही समझोतापूर्ण युत्या केल्या गेल्या. यात कम्यूनिस्ट, जनसंघ, शिवसेना (महाराष्ट्रापुरती) हे सगळे आले. १९७५ च्या आणीबाणीविरोधात सुरुवातीला समाजवादी आघाडीवर होते. त्यांना ती दुसरी '१९४२' वाटली होती. भूमिगत होऊन बुलेटिन्स काढणे, गुपचुपपणे ती प्रसारित करणे असली चित्तथरारक कामे, ज्याबद्दल त्यांनी जुन्या पिढीकडून बरेच ऐकले होते, ती नव्या पिढीला करावयास मिळाली. आपण जणू एसेम, अरुणा आसफ अली आहोत असे वाटू लागले. जयप्रकाशजींना अवास्तव महत्त्व मिळाले. (हे थोडेसे धाडसी असे वैयक्तिक मत.) त्या कैफात यांनी जनसंघाशी आणिबाणीविरोध हे कॉमन कॉज़ केले. त्यामुळे विरोधाची तात्कालिक ताकद वाढली खरी पण अंती जनसंघाने ही चळवळ हाय्जॅक केली. जनसंघाला देशव्यापी व्यासपीठ मिळाले. त्यांच्या गुप्त मसलतींच्या काडर बेस्ड कार्यपद्धतीनुसार त्यांनी ते पुरेपूर वापरून भारतीय राजकारणात आपले स्थान पक्के केले. संयुक्त महाराष्ट्राची चळवळसुद्धा थोड्याफार प्रमाणात कम्यूनिस्टांकडून हाय्जॅक झाली असे आता वाटते. याला कारण समाजवाद्यांचे भोंगळ आचरण असावे असे मानण्यास जागा आहे. 'आम्हांला सत्ता-संपत्तीची हाव नाही' असे निष्कलंक चारित्र्य त्यांनी मिरवले खरे पण कदाचित सत्ता राबवण्याची त्यांची कुवतच नव्हती.

------
मधू लिमये, लोहिया असे विचारवंत सोडले तर नंतरच्या पिढीत बळकट वैचारिक नेतृत्व फारसे उरले नाही. त्यामुळे वरच्या पातळीवरचे मार्गदर्शन कमी पडले. स्थानिक आणि तात्कालिक समस्यांनुसार चळवळ ठरू लागली. एकमुखी रूप लयास गेले. लोकांना देण्याजोगा कार्यक्रम उरला/सुचला नाही. यालाच समांतर अशा काही घटनाही यावेळी घडत होत्या. महाराष्ट्रात, प्रामुख्याने आर्थिक राजधानी मुंबईत, प्रबळ कम्यूनिस्टांना संपवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून छुपेपणाने शिवसेनानिर्मितीला म्हणजे शिवसेनेला बळ दिले गेले. कृष्ण मेनन यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव ही दूरगामी परिणाम करणारी घटना होती. शिवसेनाउदयाचा फायदा वसंतराव नाईकांना मिळू देऊन कामगारक्षेत्रात देशातील प्रमुख आणि (आर्थिकदृष्ट्याही) बलाढ्य अशा कम्यूनिस्ट चळवळीची ताकद खच्ची करण्यात आली. प्र.स. पक्षाने अल्पकाळ शिवसेनेशी दोस्ती केली खरी पण दोघांच्या कार्यपद्धतींत प्रचंड फरक होता त्यामुळे ही मैत्री टिकणे शक्य नव्हते, तशी ती तुटलीच. आता काँग्रेसलाही विरोध आणि बलवान होत चाललेल्या शिवसेनेलाही विरोध यामुळे समाजवाद्यांचा जनाधार कमी होत गेला. (जो पुढे आणीबाणीत खूप वाढला.) शिवसेनेचे भडक राजकारण तरुणांना आकर्षित करू लागले. याला तत्कालीन समाजस्थितीसुद्धा कारणीभूत होती. स्वतंत्र राज्य मिळाल्यामुळे वाढलेल्या अपेक्षा लोकशाही मानणार्‍यांकडून झटपट पुर्‍या होण्याजोग्या नव्हत्या. साठ-सत्तरच्या दशकात सरकारी धोरणांमुळे शिक्षणविषयक सोयी वाढल्या आणि सुशिक्षित/अर्धशिक्षितांची संख्या वाढू लागली. त्या मानाने उद्योग वाढले नाहीत. शहरीकरणाचा वेगही वाढू लागला होता .(पुढे ७२ च्या दुष्काळात मुंबईत प्रचंड स्थलांतर झाले.) मुंबईतून सुतीवस्त्रोद्योग इतरत्र हटण्यास सुरुवात झाली, सुती धाग्याला कृत्रिम धाग्याची तीव्र स्पर्धा निर्माण होऊ लागली. निम्न स्तरावर बेकारी वाढू लागली. या अर्धशिक्षित बेकारांना शिवसेनेच्या नोकरीच्या आमिषाने (मद्रासी हटाव-मराठी लाव, वडापाव वगैरे) भुरळ पाडली. पुढे देशपातळीवर इंदिरा गांधींनी बँकांचे राष्ट्रीयीकरण करून शाखांचे जाळे विस्तारले आणि रोजगारनिर्मितीच्या या हुकमी एक्क्याद्वारे मध्यमवर्गीय सुशिक्षित बेकारांना आपल्याकडे ओढले. या राष्ट्रीयीकरणाला समाजवाद्यांचा पाठिंबाच होता पण काँग्रेसविरोध हे मुख्य सूत्र राहिल्याने याचे खुल्या दिलाने स्वागत करणे अथवा श्रेय घेणे त्यांना जमले नाही. अशा तर्‍हेने समाजवादी चेहर्‍याच्या काँग्रेसची ताकद वाढली आणि त्याला स्पष्ट विरोध करणार्‍या उजव्या गटांचीही थोडीफार वाढली. समाजवादी कोणत्याच गोटात सामील होऊ शकले नाहीत, ते मध्येच लोंबकळत राहिले.

-----

बँक राष्ट्रीयीकरणाचा भारतीय समाजकारणावर फारच मोठा परिणाम झाला. आज आय्टीमुळे जी क्रांती किंवा सुबत्ता आली आहे किंवा आल्यासारखी वाटते आहे त्याचे बँक राष्ट्रीयीकरण हे लघुरूप होते. शिक्षित गरिबांच्या हाती थोडाफार पैसा खुळखुळू लागला तेव्हा सुरुवातीला ह्या वर्गाला आपल्याकडे ओढून घेण्यात कम्यूनिस्ट यशस्वी झाले. कारण राष्ट्रीयीकरणासाठी रस्त्यावर उतरून नारे देण्यात त्यांचा प्रमुख सहभाग होता. पुढे आणखी म्हणजे बँका ह्या भांडवलदारधार्जिण्या आहेत आणि आपण त्यांवर अंकुश ठेवून संपत्तीचे योग्य वितरण केले पाहिजे अशी या नोकरवर्गाची एक समजूत करून देण्यात आली. त्यामुळे हा वर्ग 'वॉच-डॉग' म्हणून कार्यरत राहाण्यात धन्यता मानू लागला. खरे कामकाज बाजूला पडले. ऐदीपणा, मुजोरी, यूनिअनगिरी वाढली, लोकमानसात वाईट प्रतिमा बनून डाव्या विचारांचा पाया थोडासा डळमळू लागला. तोपर्यंत या नवमध्यमवर्गाची अर्थसाक्षरता वाढली होती. पैशाच्या विनियोगासंदर्भात बचत, गुंतवणूक, कर्ज, शेअर, परतावा असे शब्द त्याच्या तोंडी रुळू लागले होते. गृहकर्जामुळे स्वतःचे घर होऊ शकत होते. या वर्गाची मुले अधिकाधिक उच्चशिक्षित होऊन (तोपर्यंत मूळ धरलेल्या आय आय टीज् मुळे देखील,) परदेशी जाऊ लागली. तिथल्या कार्यपद्धतीची, कार्यक्षमतेची ओळख होऊन त्यांची मने भारतातल्या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात, म्हणजे काँग्रेसच्या समजवादाविरोधात झुकू लागली. समाजवादी मात्यापित्यांची ही मुले कट्टर उजवी बनू लागली. क्रांती आपल्या पिलांना खाते म्हणतात पण या अर्थक्रांतीने आपल्या मातापित्यांनाच खाल्ले. या नवसमृद्ध वर्गाच्या आचारविचारांचे अनुकरण याच समृद्धीच्या प्रतीक्षेत असलेल्या निम्न वर्गाकडून होणे अपरिहार्य होते. अशा तर्‍हेने उजवे विचार तळागाळात झिरपू लागले आणि त्या प्रमाणात डावे (त्यात समाजवाद आलाच.) विचार दूर सारले गेले.

(क्रमशः)

टीप - फक्त विश्लेषणात्मक लिहिले आहे. कसलाही विदा देऊन काही सिद्ध करायचा मानस नाही.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

राही यांच्याशी सहमत. जनसंघाचा उंट राजकारणाच्या मुख्य प्रवाहाच्या तंबूत घेण्याचे कार्य समाजवाद्यांनी केले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ब्यांकांचे राष्ट्रीयीकरण हे चूक, गुन्हा व पाप यांचा सुनहरा संगम आहे. एरवी स्पर्धा "प्रक्रिया" अबाधित रहावी म्हणून सरकारने बाजारात हस्तक्षेप करावा असे मत असते. पण ब्यांकांचे राष्ट्रीयीकरण ह्याद्वारे सरकारने - थेट मक्तेदारी, (प्रिडेटरी प्रायसिंग) डंपिंग, लिमिट प्रायसिंग, डिव्हायडिंग टेरिटरीज, क्राऊडिंग आऊट, अप्रत्यक्षपणे मज्जाव करणे (preventing entry)(काही प्रमाणावर हे सुद्धा), एखाद्या मार्केट/बिझनेस मधे सहभागी होण्याची जबरदस्ती करणे हे सगळे Anti-competitive उद्योग केले आणि थेट भ्रष्टाचार सुद्धा होऊन दिला (intendedly or unintendedly भ्रष्टाचारास पोषक वातावरण निर्माण केले व निर्माण झालेल्या भ्रष्टाचाराकडे काणाडोळा केला).

क्रोनी कॅपिटलिझम च्या नावाने बोंबा मारणार्‍यांच्यासाठी एक क्लू देतो फक्त - ब्यांकांचे राष्ट्रीयीकरण - हा केवळ क्रोनी कॅपिटलिझमच नव्हे तर क्रोनी युनियनिझम व क्रोनी अ‍ॅग्रिकल्चरिझम चा त्रिवेणी संगम आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राहीजी, खूप छान प्रतिसाद लिहिताय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मस्तं प्रतिसाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

राहींचे प्रतिसाद नेहमीच वाचनीय असतात. त्यांनी जास्त नियमीतपणे ऐसीवर येत आणि लिहीत रहावे ही विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चर्चा वाचत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आवडलं, बाकी बहुसंख्य समाजवादी ढोंगी होते म्हणून चळवळीचा अंत झाला. आता जातीय समाजवादी अर्थात यादव समूह उरला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्या ढोंगीवरून एक किस्सा आठवला. आई ज्या शाळेत शिक्षिका होती त्याच्या स्नेहसंमेलनाला एकदा प्रसिद्ध समाजवादी आणि पोरीगामी व्यक्ती बोलावली होती. हे विभूती शाळेच्या अगदी जवळ राहायचे. वेळ उलटून गेली तरी आले नाहीत म्हणून शेवटी आई त्यांच्या घरी गेली. तर त्यांनी समस्त शाळेची ... बाहेर काढली. तुम्हाला काय वाटले मी कोण आहे हे माहिती आहे का, मला घ्यायला गाडी कशी नाही पाठविलीत वगैरे आणि मुख्य म्हणजे शाळेच्या मुख्याध्यापिका आल्या पाहिजेल होत्या तुम्ही सध्या शिक्षक आहात. तुम्ही कसले मला आणायाला येताय. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगायायायायाया...

अतिअवांतरः पोरीगामी हा शब्द काळजाला भिडला. (ह.घ्या.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

च्या टायपो भाऊ टायपो. काल चुकून अजोंना मी मांसाहारी केला. आणि पुरोगामी ला .. छे छे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वैसे, 'पुरो'गामी अन पोरीगामी यांत अगदीच लै फरक आहे असं नाही म्हणा. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एक नम्बर! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

தநுஷ்

चांगला गोषवारा आहे.

रिपब्लिकन चळवळ हा समाजवादाचा भाग म्हणता यावा का? याबद्दल कोणी लिहिलं तर हवंय. माझं स्वतःच याबद्दल मत बनलेलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

This comment has been moved here.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile