फेमिनिष्ठांची मिथके
...
बातमीचा प्रकार निवडा
विशेषतः स्वयंघोषित वुमेन्स
विशेषतः स्वयंघोषित वुमेन्स अॅडव्होकेट्स वाल्यांनी आवर्जून वाचण्यासारखा.
स्वयंघोषित या शब्दास आक्षेप. उगीचच हा शब्द घालून आपण ऑब्जेक्टिव् / इंपार्शल आहोत असा दावा करताय की काय ?
काय राव? हे तुमचे वाक्य खालील वाक्यांसारखे आहे -
१) पालक हे पाल्यांचे स्वयंघोषित समर्थक असतात (पाल्यांच्या चुका झाल्या तर दणके देतात. पण समर्थक अवश्य असतात.)
२) Customers are too important to be left to marketing department. Sex is too important to be left to couples.
३) पर्यावरणवादी हे पर्यावरणाच्या भल्याचे स्वयंघोषित समर्थक असतात.
४) कॅपिटलिस्ट्स हे कॅपिटल चे स्वयंघोषित समर्थक असतात.
हा शब्द घालणे आणि मी
हा शब्द घालणे आणि मी इम्पार्षल असण्याचा दावा करणे- यांत फरक आहे असे वाटते. अन तसेही, (चालू फ्याषनप्रमाणे इ.इ.) व्यक्तीपेक्षा विचारांवर फोकस करा ना राजे ;)
वुमेन्स अॅडव्होकेषनच्या नावाखाली मेल ब्याषिंग (कोटीचा मोह टाळल्याची नोंद घेणे.) करणार्यांना हा लेख विशेषकरून उद्बोधक ठरेल असे मत आहे. स्वयंघोषित हा शब्दही त्यांनाच लागू आहे. सारखे मेल ब्याषिंग अंतिमतः बायकांच्या अहितासच कारणीभूत होत असल्याने स्वयंघोषित हा शब्द बरोबर आहे असे वाटते.
मिथ्स अँड रिअलिटी
>>द टॉप ५ फेमिनिष्ठ मिथ्स दॅट रिफ्यूज़ टु डाय.
https://time.com/3222543/5-feminist-myths-that-will-not-die/
MYTH 1: Women are half the world’s population, working two-thirds of the world’s working hours, receiving 10% of the world’s income, owning less than 1% of the world’s property.
ही मिथ असेल तर असू दे बापडी. भारत सरकारच्या लेबर ब्यूरोच्या २००९-२०११च्या अहवालातून उद्धृत -
At All-India level, wages/salaries per manday worked for directly employed women worker was reported at Rs. 131.23 whereas it is almost double for their
men counterpart (Rs. 258.04) for the year 2008-09.The wages/salaries per manday worked for directly employed women workers were Rs. 260.81, Rs. 244.13 and Rs.126.50 in Public sector, joint sector and
private sector respectively, whereas for men workers it was much higher i.e. Rs. 430.87, Rs.329.34 and Rs. 242.46 respectively during 2008-09.
ही परिस्थिती पुरेशी अंतर्मुख करणारी आहे असं मला वाटतं. ज्यांना मिथ शोधून त्या बस्ट करायच्या आहेत ते अर्थात स्वतंत्र आहेत.
जंतू यांच्या या प्रतिसादाला
जंतू यांच्या या प्रतिसादाला +१ म्हणावं का नाही असा प्रश्न आहे.
टाईममधलं हे 'मत' किंवा आकडेवारी अमेरिकेबद्दल आहे. अमेरिका आणि भारत यांची याबाबतीत सरळ तुलना होऊ शकेल का? किंवा अमेरिका आणि इतर कोणत्याही देशाची या बाबतीत सरळसरळ तुलना होऊ शकेल का? नसेल तर मग या (स्वयंघोषित?) मिथबस्टिंगचा ऐसीवर किंवा कोणत्याही मराठी फोरमवरच्या स्वयंघोषित अमुकतमुकांवर किती आणि काय परिणाम होणं अपेक्षित आहे?
भारतापेक्षा बऱ्याच जास्त प्रगत असणाऱ्या अमेरिकेत ...[W]omen, numbering about 550,000 annually, who come to emergency rooms “for violence-related injuries.” Of these, approximately 37% were attacked by intimates. हा भाग, भारताच्या दृष्टीने विचार करतानाही, मला चिंता करण्यासारखा वाटतो.
हाहा!
धन्यवाद! या कंझर्व्हेटीव्ह लोकांच्या प्रोपाग्यांडाला नक्की कशा प्रकारचे लोक फसतात हा प्रश्न मला नेहमीच पडलेला असतो. त्याचे उत्तर सुकर केल्याबद्दल धन्यवाद. (काही महिन्यांपूर्वी आलेल्या तेलसाठ्याच्या व्हिडिओची आठवण झाली.)
Christina Hoff Sommers, a former philosophy professor, is a resident scholar at the American Enterprise Institute.
पुढच्या वेळेला जरा काहीतरी विश्वासार्ह सोर्सेस मिळाले तर पहा. बाकी टाईम मॅगझिनचे (यु.एस.) दुवे देणार लोक फार्फार धाडसी असायला पाहिजेत!
विचारांचा प्रतिवाद न करता
विचारांचा प्रतिवाद न करता माणसाबद्दल प्रतिवाद रोचक वाटला.
http://www.aisiakshare.com/node/3201#comment-72270
या प्रतिसादातल्या पिरॅमिडमध्ये तुमचा वरील प्रतिसाद कुठे बसेल?
:-)
इथे मी 'वाद' (पिरॅमिडमधील 'अर्ग्युमेंट') घालतोय असा तुमचा गैरसमज झालेला दिसतो. इथे बॅटमॅन (आणि इतर) यांना सोर्सेस जरा तपासा हा प्रेमळ सल्ला आहे. (बॅटमॅन इथे स्वयंघोषित अॅन्टी-पुरोगामी आहेत, आणि त्यांनी विश्वास ठेवून इथे दिलेल्या लेखाची लेखिकाही त्याच प्रकारची आहे. यात तुम्हाला वैयक्तिक शेरेबाजी दिसली याची गंमत वाटली. मी तरी अॅन्टी-पुरोगामी म्हणजे शिवी/वैयक्तिक अपमान असे समजत नाही, तुम्ही समजत असाल तर नाईलाज आहे.) शिवाय, हा सल्ला देतानाच मागच्या एका वेळी अशाच एका सोर्स कडून आलेला प्रॉपग्यांडाची लिंकही दिलेली आहे. त्याठिकाणी त्याचा सविस्तर प्रतिवादही केलेला आहे. शिवाय हा सोर्स रिलाएबल का नाही याबद्दलही दुवे दिलेले आहेत.
इतके करूनही तुम्हाला माझ्या प्रतिसादांत फक्त वैयक्तिक शेरेबाजी दिसत असेल तर तुम्हीच कोणता तरी चष्मा घालून माझा प्रतिसाद वाचत असाल अशी शंका व्यक्त करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही.
क्रिस्टिना हॉफ- सॉमर्स तिच्या
क्रिस्टिना हॉफ- सॉमर्स तिच्या क्षेत्रात एक रिस्पेक्टेड अॅकॅडमिक आहे. जिथे तिचा रिसर्च प्रकाशित झाला ते मासिक कसे **** आहे आणि अन्य मुद्यांवरती त्यांचे विचार कसे चूक आहेत इ. इ. उदाहरणे दिल्याने या केसमध्येही तसेच सिद्ध होते असा (गोड/तिखट इ.इ. ) गैरसमज असेल तर चालूदे ही इणंती. मुद्दा काय, विषय काय हे न पाहता टाईम्सचं लेबल दिसलं की ठोक हा प्रकार कुणाच्या आड्यन्सला आवडत असेल तर आवडो बापडा, पण त्याने प्रस्तुत ठिकाणी काहीच सिद्ध होत नाही.
वरच्या प्रतिसादात काय
वरच्या प्रतिसादात काय प्रतिवाद केलाय ते मला समजलं नाही. 'टाईम' नियतकालिक थोर नसण्याबद्दल प्रतिसाद आहे. याचा अर्थ कदाचित ते "मिथबस्टिंग" सोयीस्कर असेल असा निघू शकतो.
माणसांबद्दल काही वक्तव्य असेलच तर "ठराविक प्रकारची (अपूर्ण, असत्य, अर्धसत्य, इ. असणारी) विधानं लोकांना विश्वासार्ह का वाटतात हे मला समजतंय" अशा प्रकारचं आहे. 'मानवी वर्तनाबद्दल मला काहीतरी समजतंय' अशा प्रकारची विधानं आक्रमक, विरोध करणारी का वाटावीत?
त्या बाईंनी केलेल्या
त्या बाईंनी केलेल्या अर्ग्युमेंट्स कशा चूक आहेत ते न सांगता त्या सोर्सच्या (त्या बाईंच्या आणि त्यांच्या संस्थेच्या) विश्वासार्हतेवर शंका उपस्थित केली होती निळे यांच्या प्रतिसादात म्हणून मी म्हटलं तसं की त्या बाईंच्या आर्ग्युमेंटचा प्रतिवाद न करता त्यांचा प्रतिवाद झाला आहे.
सारासार विचार
"कोणी म्हटलय ते पाहू नका. काय म्हटलय ते पहा" असं काहीतरी पलिकडच्या धाग्यावर सुनावलं गेलय ना?
सारासार विचार केलात तर फरक कळेल. जे लोक नेहमीच थापा मारतात हे माहित असते त्यांच्यावर विश्वास ठेवण्याआधी विचार करा असा सल्ला आहे. त्यांच्या विचारांचा प्रतिवाद करू नका असे मी म्हणलेलं नाही. जरा डोळे उघडून प्रतिसाद वाचलेत तर कळेल.
ad hominem ad nauseum
ह्या विषयाच्या विद्रटपणाच्या, कुणीतरी सतत आपल्याला उपेक्षेने मारून राहिलं आहे ह्या भूमिकेतून येणार्या प्रतिसादांच्या आणि प्रतिपक्षाच्या टोकाच्या भूमिकेकडे सतत निर्देश करून त्यापलीकडे न सरकण्याच्या अमर्याद शक्यता लक्षात घेता ह्या धाग्याला 'सध्या काय वाचताय'१ ह्या शीर्षकाच्या बंधनात अडकवणे जाचक वाटते. त्याच त्याच आयडींना त्याच त्याच धर्तीवरचे प्रतिसाद देण्यासाठी ह्या धाग्याला वाचन, साहित्य ह्यासारख्या कुंपणात बंदिस्त करण्याऐवजी स्वतंत्र हाणामारीच्या धाग्याचे अस्तित्व प्रदान करावे, अशी विदानसभा२ अध्यक्षांकडे मी नम्र विनंती करतो.
१. प्रश्नचिन्ह टाका रे कुणीतरी विषयात.
२. (atrocious) pun intended
वरचं मॅटर काय बरं असेल?
सध्या कसली हाणामारी? - भाग १
बऱ्याचदा एखाद्या आयडीला बुकलून काढावसं वाटतं, त्यांचे सगळे मुद्दे खोडून काढावेसे वाटतात, वैयक्तिक शेरेबाजी कराविशी वाटते पण अशी मौक्तिके बाकीच्या विनाकारण चांगल्या विषयावरच्या लेख अन प्रतिसादात हरवून जातात. अशी खाज भागवण्यासाठी व चिखलफेकीसाठी ह्या धाग्याचा वापर करावा.
१००च्या वर प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढण्यात येईल.
शिमगा आणि कवित्व
सहमत आहे. पूर्वी होळीच्या वेळेस जी मनसोक्त बोंबा ठोकून मनातल्या भावनांचा निचरा करण्याची सोय असायची, तशी संकेतस्थळांवरही उपलब्ध असायला हवी!
बाकी एकंदरीतच बव्हंशी मराठी संकेतस्थळे जालकवड्यांच्या कविता आणि चर्चांची मारामारी यातच घुटमळत असल्याने 'शिमगा आणि कवित्व' हे त्यांचे वर्णन फार चुकीचे आहे, असं वाटत नाही :)
चांगलं
बव्हंशी मराठी संकेतस्थळे जालकवड्यांच्या कविता आणि चर्चांची मारामारी यातच घुटमळत असल्याने
ह्याला लै लै वेळा दिलं गेलेलं उत्तर पुन्हा देतो.
चांगले लेख , चांगले प्रतिसाद ह्यांना प्रोत्साहन देणं , जमेल तितकं चांगलं लिहित राहणं हा सरळसाधा व प्रभावी उपाय आहे.
पण मानवी मेंदूला क्लिष्टतेचे आकर्षण असावे की काय असे वाटते; साध्या गोष्टी अंमलात येणे खूपच कठीण असते.
शिमग्याचाच धागा असल्याने माझा नंदनशेटवर आरोप :-
अत्यंत सकस असं काही जालावर देता येत असूनही ते गप्प बसतात. जालविश्व चांगल्या गोष्टींनी भरलं गेलं तर खराब गोष्टींना
व्यापायला पुरेशी पोकळी/अवकाश उरणार नाही. हे सर्व ह्यांनाही ठाउक असणार. तरीही हे फक्त मजा बघण्यात आनंद घेताहेत.
असो. चालायचच.
पूर्वी होळीच्या वेळेस जी
पूर्वी होळीच्या वेळेस जी मनसोक्त बोंबा ठोकून मनातल्या भावनांचा निचरा करण्याची सोय असायची, तशी संकेतस्थळांवरही उपलब्ध असायला हवी!
अहो, या २०१४ सालच्या सोळा मार्चला बोंबा ठोकण्याची सोय उपलब्ध करून दिली की. त्यासाठी मालकांना किती माड्या चढाव्या लागल्या याबद्दल काय सांगू? दोन चपला गळाल्या. सत्तावीस अंगठे तुटले. टाचांची किती झीज झाली याची तर गणतीच नाही.
बऱ्याचदा एखाद्या आयडीला
बऱ्याचदा एखाद्या आयडीला बुकलून काढावसं वाटतं, त्यांचे सगळे मुद्दे खोडून काढावेसे वाटतात, वैयक्तिक शेरेबाजी कराविशी वाटते पण अशी मौक्तिके बाकीच्या विनाकारण चांगल्या विषयावरच्या लेख अन प्रतिसादात हरवून जातात. अशी खाज भागवण्यासाठी व चिखलफेकीसाठी ह्या धाग्याचा वापर करावा.
क्या बात है !!!
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले....
--
१००च्या वर प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढण्यात येईल
आह को चाहिये एक उम्र असर होने तक...
कौन जीता है तेरी जुल्फ के सर होनेतक...
हमने माना के तगाफुल न करोगे लेकिन
खाक हो जायेंगे हम ... तुमको खबर होने तक
नंदनशी सहमत!
धाग्याची कल्पना आवडली आणि इतरांनी सुचवलेली शीर्षकेही आवडली. पण श्री. बॅटमॅन यांना विनंती आहे की त्यांनी आपली जी काय भडास आहे ती फक्त याच धाग्यावर काढावी, त्यांच्यासाठी हा धागा कायमचा खास राखून ठेवावा. म्हणजे काय आहे ना...इकडे तिकडे लेखनाच्या, बागकामाच्या, पर्यावरणाच्या वगैरे संस्थळाच्या इतर धाग्यांवर जरा सुडोफेमिनिस्ट, सुडोसेक्युलर, सुडोमराठी वगैरे सूडकथा वाचत बसाव्या लागणार नाहीत.
विनोदी
हे सगळं विनोदाने चाललेलं आहे तोवर ठिक आहे, पण बॅटमॅन (किंवा इतर कोणीही) फक्त एकाच धाग्यावर शिमगा/भडास वगैरे करावं या सुचनेशी असहमत आहे. वोल्तेर म्हणतो त्याप्रमाणे "I disapprove of what you say, but I will defend to the death your right to say it." मग आम्हाला किती का कंटाळा येऊदे तेच तेच वाचून! ;-)
हा लेख मला अतिशय आवडलेला आहे.
हा लेख मला अतिशय आवडलेला आहे. मी नॉर्थवेस्टर्नला असताना 'वन इन थ्री विमेन इझ रेप्ड' अशी पोस्टर्स बघितली होती. तेव्हाही अविश्वासाने मी स्वतःशी 'हे कसं शक्य आहे?' असं म्हटल्याचं आठवतं... असं बऱ्याच जणांना झालं असणार, म्हणून पाचात एक सेक्श्युयली असॉल्टेड वर स्थिरावलेलं दिसतं. पण बारमध्ये चुंबन घेण्याचा प्रयत्न यालाही सेक्श्युअल असॉल्ट म्हटलं, आणि ज्यांनी प्रतिसाद दिला नाही त्यांची आकडेवारी गाळली की आकडा वीस टक्क्यांपर्यंत फुगतो.
पण हा गंभीर प्रश्न असल्यामुळे आकडेवारी थोडी फुगवली तर काय बिघडलं? किंबहुना तशी फुगवण्याची काहीशी गरजच आहे... असंही काही म्हणतात.
सगळाच सोशल डिस्कोर्स असा फुगवलेल्या आकडेवारीने झाला की मग तारस्वरात ओरडून जाहिराती करणारे आणि समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणारे यांच्यात काही फरक राहात नाही.
लेखाचं केवळ शीर्षक वाचलं तर
लेखाचं केवळ शीर्षक वाचलं तर असा गैरसमज होण्याची शक्यता आहे. मात्र पूर्ण लेख वाचल्यावर तो गैरसमज दूर व्हावा. लेखिकेला 'विल नॉट डाय' या शब्दप्रयोगांतून 'ही मरणार नाहीत' असं म्हणायचं नसून 'काही केल्या ही मिथ्यं मरत नाहीत साली' असं काहीसं म्हणायचं आहे. यातून 'कुठचीच मिथकं कधीच मरत नाहीत' असा सार्वत्रिक दावा करायचा नसावा.
हे समजावून घेण्यासाठी रिचर्ड डॉकिन्सने मांडलेल्या मीम या संकल्पनेचा विचार करा. जसे जीन अनुकूल स्थितीत टिकून राहतात, तशाच संकल्पना, विचार, माहिती हेही अनुकूल परिस्थितीत टिकून राहतात. 'तिनात एक बलात्कार' हे टिकून राहण्याच्या लायकीचं नाही, कारण ते इतकं खोटं आहे, की एक सोश्यॉलॉजीचा वर्ग आपल्या नातेवाइक स्त्रियांना विचारून ते खोटं पाडू शकतो. माझ्या मते योग्य प्रमाणातली इन्क्रेड्युलिटी आवश्यक आहे. सत्याचा बेडूक फुगून मोठा होऊ शकतो, पण त्याचा बैल होत नाही. मला 'आधी बैल असण्याचा दावा केला गेला, मग तो सोडून देऊन फुगलेला बेडूक दाखवला. आणि हा फुगीरपणा टिकून आहे.' एवढंच सांगायचं होतं.
यापलिकडेही गैरसमज राहिले तर ते निवारण्यास मी असमर्थ आहे.
खरंच काही <b>मिथबस्टिंग </b>दिसले का?
थॅक्स टु अदिती, लेख इमेलमधून मिळाला व वाचला.
बॅट्या, प्रामाणिकपणे सांग तुला यात खरंच काही मिथबस्टिंग दिसले का?
काही अमेरिका सेंट्रीक ट्रिव्हिअल मिथके उडवून लावताना जुजबी प्रतिआकडेवारी दिलेली आहे, ती सोडल्यास बाकी महत्त्वाच्या मिथकांसाठी सत्य परिस्थिती न देता, फक्त सांगितलेली परिस्थिती कशी नाही असे दावे आहेत.
असो. इतकी चर्चा वाचून फार अपेक्षेने मूळ लेख उघडला होता. अगदीच फुस निघाला.
इथे तिचे इतर व्हिडियो
इथे तिचे इतर व्हिडियो सापडतील. तिचं म्हणणं एकच आहे - स्त्रियांचे प्रश्न सोडवण्यासाठी आकडेवारी फुगवणं योग्य नाही. 'आकडेवारी फुगवली जाते' या विधानाबद्दल आक्षेप घेता येईलच - त्याची उत्तरं लेखात आणि व्हिडियोंमध्ये आहेत. आकडेवारी फुगवण्यालाच जर मुळात हरकत नसेल तर मात्र पुढे काही बोलता येत नाही.
"आकडेवारी फुगवली जाते" या
"आकडेवारी फुगवली जाते" या विधानाबद्दल आक्षेप घेण्याइतका विदा माझ्यापाशी नाही. व तो जमवण्याइतका वेळ सध्या नाही.
आकडेवारी किती फुगवली जाते? याचे जर विवेचन कोणी दिले किंवा मुळात ही आकडेवारी इतकी चुक आहे आणि प्रत्यक्ष चित्र असे आहे असा दावा कोणी केला तर त्या दाव्याला ग्राह्य टरवून स्त्रीयांवरील अन्याय खरोखरच किती मिथ आहेत आणि किती सत्य आहेत यावरील मत बदलायला मी तयार आहे.
यांची ग्लोबल उत्तरं लेखात तरी अजिबात नाही दिसली.
लेखात जे लिहिलंय तो खंडनाचा अगदीच वरवरचा प्रयत्न आहे. तुम्ही म्हणताय ते चुक आहे हे बघा काही वेगवेगळ्या सोर्सेसच्या आकडेवारीतील फरक असे त्या लेखाचे स्वरूप आहे.
आकडेवारीत फरक आहे हे समजले, पण पुढे काय? खरी आकडेवारी कोणती, अशी आकडेवारी आहे काय ज्याने मिथ बस्ट होईल किंवा स्त्रियांवर अन्याय होत नाही किंवा स्त्रियाच अन्याय करत आहेत असे काहीही सिद्ध होईल
जर तसे काही असेल तर नक्कीच वाचायला नी त्यावर माझे मत रिफाईन करायला / प्रसंगी मुळातून बदलायला आवडेल
तरीही, तुम्ही सांगताय तर वेळ मिळाला की/तर विडीयो बघेनच.
आकडेवारी किती फुगवली जाते?
आकडेवारी किती फुगवली जाते? याचे जर विवेचन कोणी दिले किंवा मुळात ही आकडेवारी इतकी चुक आहे आणि प्रत्यक्ष चित्र असे आहे असा दावा कोणी केला तर त्या दाव्याला ग्राह्य टरवून स्त्रीयांवरील अन्याय खरोखरच किती मिथ आहेत आणि किती सत्य आहेत यावरील मत बदलायला मी तयार आहे.
याबद्दल कोणी काही बोलणार नाहीये ऋ! हे स्त्रीमुक्तीवाले खोटे आहेत, आकडे फुगवताहेत हे आणि हेच फक्त सांगायचं आहे.
अमेरिकेतली परिस्थिती आणि शिवाय भारतातही उरलेल्या मुद्द्यांची स्थिती मला माहीत नाही पण
पाचात एक सेक्श्युयली असॉल्टेड - हे तर माझ्या आजवरच्या अनुभवावरून सत्य असावे असे वाटते.
मी स्वतः वय ५ ते साधारण १७-१८ या वयापर्यंत किमान १० वेळा या प्रकाराला सामोरी गेले आहे (आणि हे खरे आहे, मी आकडा फुगवून नाही सांगत आहे, एक्दा आठवून मोजून बघितलेय, अर्थात आजकालच्या बलात्काराच्या घटना बघता आप्ल्यावर बलात्कार आणि त्यापुढंच अघोरी काही झालं नाही यातच समाधान मानायचं बहुदा!) आणि मला जरा जास्तच अनुभव आलेत असे वाटून माझ्या ओळखीतल्या ज्या ज्या स्त्री/मुली यांच्याशी बोललेली आहे सर्वांनी असे प्रकार त्यांच्याबरोबर आणि त्यांच्या ओळखीतल्या मुलींबरोबर किमान एकदा तरी घडले असल्याचे मान्य केले आहे. हा सँम्पल सेट किमान २५०-३०० मुलींचा आहे ज्यात किमान एक्दा असा प्रकार घडणे जवळ जवळ १००% आहे. तरी मी एक मुलगी एक्दा धरली आहे. प्रत्येक अनुभव मोजायचा तर काय होईल कुणास ठाऊक!
आता यावर "कारण भारत हा सेक्श्युअली फ्रस्ट्रेट्रेड लोकांचा देश आहे" अशी मौक्तिके द्या रे कुणी!
आपलाच दोष
मला जरा जास्तच अनुभव आलेत असे वाटून माझ्या ओळखीतल्या ज्या ज्या स्त्री/मुली यांच्याशी बोललेली आहे सर्वांनी असे प्रकार त्यांच्याबरोबर आणि त्यांच्या ओळखीतल्या मुलींबरोबर किमान एकदा तरी घडले असल्याचे मान्य केले आहे.
दुर्दैवाने खरे असावे.
मागे एका खरड चर्चेत मी हेच म्हटले होते की मी अनेकदा नी सहज जे बघतो - मला दिसते, दिसत आलंय - ते तुम्हाला दिसत नाही का? मला तर अनेकदा बसमधील मुद्दाम केलेले चोरटे स्पर्श, दुकानदाराने वस्तु देताना/पैसे घेताना मुद्दाम केलेले स्पर्श, काही घ्यायला वाकलेल्या स्त्रीयांच्या पार्श्वभागाकडे डोळे भरून बघून घेणे, बाजारात वाकून भाजी निवडणार्या बाईच्या मागे "अँगल साधून" (नी जागा असूनही जणु त्या बैचे होईपर्यंत थांबलोय अशा अविर्भावात) तिरके कटाक्ष टाकत उभे असलेले, "अरे वो तो हम घुरके देखे इसीलीये ऐसा कपडा पहनती है" असे उच्चशिक्षितांचे संवाद, लहान मुलींना (म्हणजे त्या व्यक्तीपेक्षा लहान, प्रत्यक्षात ती ८-१० वर्षांची असते) सतत चोंबाळत शो श्वीट करत घेतलेले लांबलचक पापे आणि असे बरेच काही दिसत असते
हरेक वर्गाकडून, शिक्षित व अशिक्षितांकडून, झोपडपट्टीपासून "साला हाय क्लास" सोसायट्यांपर्यंत, हर वयाच्या व्यक्तींकडून असे होताना दिसते. खटकते. प्रत्येकवेळी थोपवायची धमक नसते, कधी इच्छा तर कधी कुवत, पण म्हणून याची जाणीवच असु नये किंवा "हे काय खोटारडेच आहेत. एखाद दुसर्या प्रकरणाला कित्ती कित्ती मोठ्ठे करून यांना काय मिळतं! पर्वट कुठले." "या स्त्रीमुक्तीवाल्यांना जिथ्थे तित्थे वैट्टंच दिस्तं. समाजात चांग्ल काही आहे हे पटतच नै यांना" वगैरेही ऐकले आहे. ते ऐकून घेण्यात कोडगे झालो आहोतच म्हणा!
आता आम्हाला हे दिसतं जाणवतं हा आमचा दोषच म्हणायचा!
असो.
सहमत आहे.सेक्षुअल असॉल्टची
सहमत आहे.
सेक्षुअल असॉल्टची व्याख्या इथे मिळेल. leching is not assault.
http://en.wikipedia.org/wiki/Sexual_assault
ऋ ने त्याला अयोग्य वाटणा-या
ऋ ने त्याला अयोग्य वाटणा-या गोष्टी सांगितल्या असतील पण इथे मी जी उदाहरणे त्यात मी शिट्टया, अश्लील वा इतर शेरे किंवा अगदी कोणी विक्रुत पुरूषाने दुसर्या कोणाचे लक्ष नसताना समोरच्या बेसावध मुली/बायकांसमोर स्वत:च्या लिंग काढून दाखवणे (हो, हा फार कॅामन अनुभव आहे, माझ्या १० आकड्याच्या बाहेर मी दोनदा हा प्रकार पाहिला आहे, एकदा कॅालेजचे पार्किंग आणि एकदा लक्ष्मी रस्त्याच्या फुटपाथवर!) हे प्रकार धरले नाहीयेत. फक्त जिथे स्पर्श (सार्वजनिक ठिकाणी अनोळखी व्यक्तीकडून अथवा मगओळखीच्या लोकांकडून गैरफायदा घेऊन वा अन्य आमिषे देऊन) करणे वा करायला लावणे झाले आहे तेच मोजलेय!
परिच्छेदातील प्रत्येक
परिच्छेदातील प्रत्येक उदाहरणाला (प्रत्यक्ष स्पर्श नाही अश्यासुद्धा) अॅब्यूज म्हणायचे असेल तर मग वन इन एव्हरी टू एक म्हणायला हवे.
!!!!!!!!!!!!!!!
यात गोष्टींत अब्युझिव्ह काहीही नाही याची तुम्हाला खात्री आहे!!!! बोलणेच खुंटले!!
असे न घडो मात्र तुमच्या परिचयातील व्यक्तीसोबत असे कृत्य करताना तुम्हाला कोणी आढळाला तर तुम्ही कोणता गुन्हा दाखल कराल, याला अॅब्युज म्हणाल का हे पाहणे रोचक ठरेल!
याउप्पर मला काहीच बोलायचे नाही. माझ्याकडून इतीश्री!
>>याउप्पर मला काहीच बोलायचे
>>याउप्पर मला काहीच बोलायचे नाही. माझ्याकडून इतीश्री!
धन्यवाद.
>>असे न घडो मात्र तुमच्या परिचयातील व्यक्तीसोबत असे कृत्य करताना तुम्हाला कोणी आढळाला तर तुम्ही कोणता गुन्हा दाखल कराल, याला अॅब्युज म्हणाल का हे पाहणे रोचक ठरेल!
मला टिपिकल अहिंसेच्या चर्चांमधील 'बहीण-गुंड-छेड-मतपरिवर्तन' या उदाहरणाची आठवण झाली.
परंतु खुलाशापुरते....
तुमच्या यादीतल्या भाजी घेणार्या बाईचे उदाहरण सोडले तर बाकी उदाहरणात स्पर्श आहेच. त्यामुळे ते अॅब्यूज म्हणता येतीलच. त्याबद्दल काही म्हणणे नाही. आणखी कुणीतरी इतरत्र उदाहरणे दिली आहेत - छातीला स्पर्श इत्यादि. त्यात अॅब्यूज नसल्याचा माझा दावा नाही.
होणार्या अब्यूजबद्दल सहमत
होणार्या अब्यूजबद्दल सहमत आहे, आकडेवारी होणार्या अब्यूजपेक्षा कमीच असावी असे मला वाटते.
पण सर्वांसाठी एक शंका, तुमचा परिप्रेक्ष्य काय आहे? -
१. अब्यूज म्हणजे व्यक्तिगत स्वातंत्र्याचा भंग किंवा स्वातंत्र्याची अवहेलना/दडपशाही/एनक्रोचमेंन्ट आहे?
२. का अब्यूज म्हणजे योनिशुचितेचा झालेला भंग आहे?
विकीवर हे मिळालं Sexual
विकीवर हे मिळालं
Sexual assault, a form of sexual violence, is any involuntary sexual act in which a person is threatened, coerced, or forced to engage against their will, or any non-consensual sexual touching of a person. This includes rape (such as forced vaginal, anal or oral penetration or drug facilitated sexual assault), groping, forced kissing, child sexual abuse, or the torture of the victim in a sexual manner.[1][2][3]
ऋषि़केशनी वर जी उदाहरण दिली आहेत त्यातली काही सेक्षुअल हरासमेंटमध्ये येतात. शिट्ट्या मारणे वगैरे. अर्थात ह्या उमेरिकन परिभाषा आहेत.
+१
२५०-३०० स्त्रियांशी मी बोललेले नसले तरीही मी ज्या काही २५-३० स्त्रियांशी बोलले आहे त्यांना हा असा अनुभव आहेच. माझाही अपवाद नाही.
आकडेवारी फुगवली जाते असा आरोप करणाऱ्यांना बलात्काराच्या घटना अमेरिकन विद्यापीठांमध्ये आजही दाबल्या जातात हे माहित आहे का? दोन दिवसांपूर्वी हफिंग्टन पोस्टमध्ये ही बातमी होती.
Columbia University Student Will Drag Her Mattress Around Campus Until Her Rapist Is Gone
ही गोष्ट प्रगत अमेरिकेतली. भारतातल्या किती मुलींवर झालेले विनयभंग आणि बलात्कार दाबले जात असतील याची कल्पनाही नको वाटते. मी २५-३० स्त्रियांशी बोलले त्यापैकी तिघींनी सरळच त्यांच्यावर विनयभंग/बलात्कार झाल्याचं सांगितलं. आणि त्यांच्याच आईवडिलांनी या गोष्टी दाबून टाकल्या हे ही सांगितलं. "नशीब, याचे माझ्यावर फार मानसिक दुष्परिणाम झाले नाहीत" असं त्यातली एक म्हणाली. दुसरीच्या नशीबात ते ही सुख नाही.
अमेरिकेपेक्षा भारत बरा
http://blogs.wsj.com/indiarealtime/2013/01/02/are-women-safer-in-india-…
Take this document from the United Nations Office on Drugs and Crime. It shows 1.8 incidents of reported rape in India per 100,000 people in 2010 compared to 27.3 in the U.S.
The Rape, Abuse & Incest National Network, or RAINN, a U.S. nonprofit organization, says only 46% of U.S. rape cases get reported to the police
आपण त्या ४६% ला ५०% मानू.
आपण त्या ४६% ला ५०% मानू. म्हणजे अमेरिकेत लाखात ५५ रेप गुन्हे स्त्रीयांवर प्रत्यक्ष होतात. भारतात १.८. हे फक्त १०%च रिपोर्ट झाले असे मानू. (९०% दाबले जातात असे मानल्यावर तरी मी भारताची बाजू घेतोय असे म्हणणार नाहीत अशी आशा आहे.) म्हणजे भारतात प्रत्यक्ष लाखात १८-२० गुन्हे. (अॅज कंपेरड टू अदितिज स्टॅट्स ऑफ ३ इन थर्टी ऑर १०% ओफ टोटल विमेन पॉप्यूलेशन).
---------------
५५ पेक्षा १८ तिप्पट कमी आहे.
http://www.nationmaster.com/country-info/stats/Crime/Rape-rate
इथे देखिल पहा. हेच स्टॅट आहे.
-------------
थोडक्यात, सो फार अॅज रेप इज कन्सर्न्ड इंडिया इज मच बेटर प्लेस दॅन यूएस फॉर विमेन. यात काही मूर्खांना (शब्द काही श्रेणीदात्यांसाठी आवश्यक) विनोदी वाटले तर वाटो बापडे. शिवाय हे आकडे भारतात बलात्कार आज खूप वाढलेले आहेत नि अमेरिकेत आज खूप कमी झालेले आहेत तेव्हा ही तुलना आहे.
ओके भारतात ९०% आणि अमेरिकेत
ओके भारतात ९०% आणि अमेरिकेत ५०%! (हे आकडे कसे आले हे तुम्हाला विचारण्यात हशील नाहीच! पण..)
पण म्हणजे "भारतातल्या किती मुलींवर झालेले विनयभंग आणि बलात्कार दाबले जात असतील याची कल्पनाही नको वाटते" हे अदिती यांचे विधान तुम्हाला मान्य आहे तर! मग पुढिल वादाला अर्थ काय?
ओके भारतात ९०% आणि अमेरिकेत
ओके भारतात ९०% आणि अमेरिकेत ५०%! (हे आकडे कसे आले हे तुम्हाला विचारण्यात हशील नाहीच! पण..)
ठिक आहे. मग आपण उलटे करू. अमेरिकेत ९०% दाबले जातात आणि भारतात ५०%. मग भारत २८०/३.६ = ७५ पट बरा निघतो. ओके?
तुम्हाला म्हणायचं काय आहे? अमेरिकेत ४६% नसून दिलेला आकडा १००% रिपोर्टींग आहे? आणि भारतात ३% देखिल रिपोर्टींग होत नाही. Is that what you want to say? असे केल्याने दोन देश समान वाईट होतात. यापुढे जाऊन भारताला नीच दाखवायचे असेल तर भारतात १% बलात्कारच रिपोर्ट होतात असे विधान करावे लागेल.
-----
ते ९०% आकडा कुठून आला म्हणजे काय? मास अंडररिपोर्टींगचा एक स्केल म्हणून मी वापरला आहे. खरा आकडा कमीच असावा असे मला वाटते. आता तो ही १० पट कमी करून अमेरिकाच कशी लाल हे दाखवायचा अट्टाहास का?
------------------
पण म्हणजे "भारतातल्या किती मुलींवर झालेले विनयभंग आणि बलात्कार दाबले जात असतील याची कल्पनाही नको वाटते" हे अदिती यांचे विधान तुम्हाला मान्य आहे तर! मग पुढिल वादाला अर्थ काय?
प्रचंड निरर्थक विधान आहे. आणि वास्तवाच्या विपरित.
माझे इतकेच म्हणणे आहे की
माझे इतकेच म्हणणे आहे की तुम्ही "भारतातल्या किती मुलींवर झालेले विनयभंग आणि बलात्कार दाबले जात असतील याची कल्पनाही नको वाटते" या विधानाला विरोध करताय आणि तुम्ही दिलेला दुवा या विधानाचे अजिबात खंडन करत नाही, उलट एका दृष्टीकोन आतून पुष्टीच देतोय!
जर तुम्ही त्या विधानाचे व्यवस्थित खंडन करू शकत नसाल तर तसे मान्य का नाही करत?
ऋषिकेश, अदिती अमेरिकेतले
ऋषिकेश, अदिती अमेरिकेतले बलात्कारांचे नि विनयभंगांचे वास्तव पाहून 'भारतात तर काय असेल ब्वॉ' असा सुर काढते आहे. यातल्या 'भारतात तर' ची गरज नाही, भारत बलात्कारांचे स्टेट्स आणि ट्रेंड्स उपलब्ध आहेत ते अमेरिकेपेक्षा खूप चांगले आहेत.
---------------------
आणि पुन्हा म्हणतोय, भारतात १%च बलात्कार रिपोर्ट होतात असे मानून (डाटा नाही कुठे म्हणून) अदितीच्या विधानाला अर्थ प्राप्त करून द्यायचा असेल तर द्या बापडे. आता माझा पेशन्स संपला.
मी कदाचित मूर्ख असेन पण निदान
मी कदाचित मूर्ख असेन पण निदान या वेळी मी अजोंची बाजू घेणार आहे.
ही लि़ंक म्हणते
अमेरिकेत २७.३ बलात्कार होतात १००,००० नागरिकांमागे, तर भारतात १.८ बलात्कार १००,००० नागरिकांमागे!
अमेरिकेत फक्त ४६% च बलात्कार रोपोर्ट केले जातात या तथ्यामुळे (ज्याचे अजोंनी ५०% असे अप्रॉक्स केले) असे धरून त्यांनी ५५ (२७.३ गुणिले २) बलात्कार १००,००० नागरिकांमागे हे लिहीले.
भारतात फक्त १०% बलात्कार रोपोर्ट केले जातात यावरून (हे १०% त्यांनी त्यांच्याकडे पक्क विदा नसल्याने ग्रॉस अंडर-रिपोर्टींग चे एक उदाहरण म्हणून घेतले आहे) त्यांनी १८(१.८ गुणिले ९) बलात्कार १००,००० नागरिकांमागे हे गुणोत्तर काढले.
हा विदा बघता ते फक्त म्हणतायेत अंडर-रिपोर्टींग चा विचार करून सुद्धा अमेरिकेची स्थिती (भारतापेक्षा) जास्त वाईट दिसतेय, त्यामुळे भारत जास्त भयाण असावा असे निदान अमेरिकेकडे पाहून तरी म्हणू नका
बाकी परिस्थिती वाईट आहे (अमेरिका वा भारत) यावर असहमती नसावी!
त्यांचे म्हणणे पोचले
त्यांचे म्हणणे पोचले आहे.
त्यांचा विरोध कोणत्या देशात अधिक बलात्कार दाबले जातात? याच्याशी संबंधित विधानाला होता, कोणत्या देशात अधिक बलात्कार होतात ?हा विषयच नाहिये/नव्हता.
त्यांनी दिलेली लिंक ते ज्या मुद्द्याचे खंडन करू इच्छितात त्या खंडनाला पाठबळ देत नाही (उलट दिलाच तर विरोधी पक्षालाच पाठबळ देतात) इतकाच लिमिटेट पॉइंट निदर्शनास आणला होता.
एकूण सँपल लोक =
एकूण सँपल लोक = १,००,०००
अमेरिका
रिपोर्ट केलेले बलात्कार = २७.३
रिपोर्टिंग = ४६%
एकूण केसेस = ५९.३४
नॉन रिपोर्टींग % = ५४%
नॉन रिपोर्टेड केसेस = ३२.०४
भारत
रिपोर्ट केलेले बलात्कार = १.८
रिपोर्टींग = १०%
एकूण केसेस =१८
नॉन रिपोर्टींग = ९०%
नॉन रिपोर्टिंग केसेस = १६.२
--------------------------------
ज्या लाख लोकांमधे ६० बलात्कार आणि त्यातल्या ३२ अनरिपोर्टेड केसेस आहेत त्यांचेकडे पाहून ज्या लाख लोकांमधे १८ बलात्कार आणि १६.२ अनरिपोर्टेड केसस आहेत त्यांच्याबद्दल कळवळा व्यक्त करणे विक्षिप्त आहे.
आणि कोणत्या देशात अधिक बलात्कार दाबले जातात? अमेरिकेत ३२ आणि भारतात १६. कोणतेही रँडम लाख अमेरिकन स्त्रीया काढा, ३२ दाबलेले बलात्कार असतील. तेच भारतात १६ असतील. तरीही अमेरिकेकडे पाहून भारताचा कळवळा?
--------------------------------
@ सविता - भूमिका समजून घेतल्याबद्दल धन्यवाद.
बापरे! यात असा काहीतरी स्फोटक
बापरे! यात असा काहीतरी स्फोटक मजकूर दिसतोय की आमच्या हाफिसने त्याला ब्लॉकच केले आहे. ;)
अडाणी (म्हणजे मूर्ख या अर्थाने, कंपनी नव्हे :P) फिल्टरने त्यातील सेक्शुअल या शब्दामुळे लेख ब्लॉक केला असावा असा कयास! ;)