घातक स्युडोमार्ग
"बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले?" माय फुट! मी कसाही वागेन नी काहिहि बोलेन! शिवाय माझी पावले कोणी वंदावी अशी माझी इच्छाच कुठाय आणि असली तरीही हा नियम मी का म्हणून मानावा? आणि तसंही मी अगदी बोलल्याप्रमाणे वागल्यावरही माझी पावले वंदतीलच लोकं याचीही खात्री नाहिच्चे!
=========
"साला स्युडोलिबरल" त्याने आणखी एक शिवी हासडली. हा स्युडो शब्द इतका व्हेग आहे की त्याच्याशी संग केल्यावर होणारी प्रसुती ही कोणालाही कोणत्याही पातळीवर नेऊ शकते. स्युडोलिबरल, स्युडोसेक्युलर, स्युडोयंव नी स्युडोत्यंव! महात्मा गांधींपासून ते डॉ आंबेडकरांपर्यंत आणि पंडीत नेहरूंपासून ते मनमोहनसिंगांपर्यंत कोणालाही काहीही विचार न करता क्षणात झाडून टाकायला हे "स्युडो" हत्यार मंडळींच्या हातात आलं आहे. विचाराचा प्रतिकार करू न शकणारी लोकं मग व्यक्तीच्या वागण्यावर घसरतात आणि मग त्याचं वागणं तसं नव्हतं ना? त्याचं वागणं असं होतं ना? मग काय बाता करता?
अरेच्या! त्याचे विचार चुक आहेत की नाहीत ते बोला! हवं तर त्या माणसाला दुटप्पी म्हणा दुतोंडी म्हणा पण तरीही तो विचारांचा प्रतिवाद नाहिच्चे! त्या व्यक्तीच्या विचारांचा प्रतिवाद हा विचारांनी करण्याची धमक नसलेले विचारषंढ लोक मग त्या व्यक्तीलाच झाडून टाकायला हा 'स्युडोमार्ग' अवलंबतात. व्यक्तीलाच झाडून टाकलं की विचारांचा प्रश्नच येत नाही, ना रहेगा बांस...
माझ्यामते कोणताही समाज पुढे यायला परंपरा नावाच्या चिखलाला दूर सारणारी पुरोगामी मंडळी अत्यावश्यक असतात. पुरोगाम्यांचे (मग ते वैयक्तिक जीवनात तसे वागु शकत असोत वा नसोत ते इथे गैरलागू आहे) किंबहुना पुरोगामी विचारांचे कोणत्याही प्रगती इच्छिणार्या समाजात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण त्या त्याच व्यक्ती असतात ज्या परंपरेने चालत आहे, संस्कारांमुळे गरजेचे आहे असल्या भुलथापांच्या पलिकडे जाऊन तर्काला, बुद्धीला जे पटेल त्यावर आपले मत बनवतात. प्रत्येकवेळी परिस्थितीमुळे, काही भावनिक कारणांमुळे कधी कायद्याच्या भितीमुळे किंवा कधी कायदा मोडायची प्रत्यक्ष धमक नसल्याने असेल ते तसे वागु शकतीलच असे नाही. पण त्यांनी दिलेला विचार हा समाजाला पुढेच घेऊन जात असतो. पुरोगाम्यांचा आवाज दाबल्यावर, त्या व्यक्तींना आउटराईट रिजेक्ट केल्यावर भुतकाळात अडकलेल्या रादर रुतलेल्या आणि लोकांच्या निव्वळ अस्मितांना चुचकारत नेतृत्त्व करू पाहणार्या परंपरावाद्यांच्या हातात नेतृत्त्व गेलं की देशाचा, समाजाचा फक्त पाकिस्तान होऊ शकतो इतके लक्षात घेतले तरी पुरेसे आहे.
पुरोगामी, लिबरल म्हणजे काही विशिष्ट वर्गाची मक्तेदारी नाही किंवा विशिष्ट काळाचीही नाही. एखादी गोष्ट निव्वळ चालत आली आहे, किंवा "हे करून कुणाचं वैट झालंय का?" किंवा "आमच्या पिढ्यान पिढ्या असं वागत आल्या आहेत" किंवा "आपल्या धर्मात, जातीत, 'लोकांत' हे असंच चालतं" असली कारणं आपली मते बनवायला पुरेशी न वाटणार्या कोणत्याही व्यक्तीला मी पुरोगामी म्हणेन. पुरोगामी किंवा अभिजन वर्ग हा मुठभर उच्चजातीतील किंवा उच्चभ्रुंचा अट्टाहास आहे किंवा त्यांची नाटकं आहेत, हि प्रतिमा उभी करणे हा मला देशद्रोह वाटतो. या वर्गाचे अस्तित्त्वच नसेल तर समाज पुढे जाईलच कसा?
समाजाला साचु न देता सतत पुढे खेचत रहायचे अतिशय महत्त्वाचे कार्य हा अभिजन वर्ग करत असतो. आजवर त्यांच्या कृतीवर असंख्यवेळा टिका झाली आहे. होत असते. आणि ती होणारच कारण ते "स्टेटस कूओ" भेदत असतात त्याला विरोध हा अध्याहृत असतो. मात्र भारतात आजवर सुदैवाने हा विरोध विचारांना व कृतीला झाला आहे. त्या व्यक्तीला मात्र समाजात आदरच मिळत आला आहे. ज्योतिबांसारख्या व्यक्तीला मोठा विरोध झाला पण तो त्यांच्या कार्याला व विचारांना झाला. त्यांना अडवण्यात आले, त्यासाठी अनेक गोष्टी केल्या गेल्या पण समाजाने ज्योतिबांना शेवटी गौरवलेच. त्यांना आउटराईट रिजेक्ट केले नाही. त्यांना होणारा विरोध हा त्यांना "ग्राह्य" ठरवल्यानंतरची स्टेज आहे. आता लगेच प्रतिवाद येईल की ज्योतिबांना आदर दिला गेला नाही तो त्यांनी त्यांच्या कृतीतून मिळवला आहे. अर्थातच! तुमच्या बोलण्याला यशस्वी कृतीची जोड असेल तर त्याचा परिणाम अधिक होतो हे मान्यच आहे! पण म्हणून तुलनेने कमी कृती करू शकणार्या / इच्छिणार्या किंवा वेगळ्या प्रकारे/माध्यमांतून समाजप्रबोधन घडवू पाहणार्या आगरकर व/वा गोखल्यांसारख्यांच्या विचारांचे महत्त्व अजिबात कमी होत नाही.
कोणत्याही समाजाला नवे विचार, नवी दिशा हवी असेल, समाज प्रवाही हवा असेल तर चाकोरी मोडणार्या नव्या विचारांची समाजाला आत्यंतिक गरज असते. स्युडो लिबरल, स्युडोसेक्युलर, विचारजंत, हस्तीदंती मनोर्यातील मूर्ख अश्या शब्दांनी हल्ली अनेकदा व्यक्तीला दूर केले जाते. त्यांचे काही विचार कित्येकदा पूर्णपणे चुकीचेही असतील पण ते त्यांना मांडु देण्यासाठी पोषक वातावरण ठेवणे ही आपली जबाबदारीच नाही तर अत्यावश्यक कर्तव्य आहे. आततायी वाटणार्या विचारांकडे दुर्लक्ष करा किंवा त्यांचा प्रतिवाद करा मात्र त्या व्यक्तीला रिजेक्ट करून, कायमचे अग्राह्य ठरवून त्याच्याकडून येणार्या/येऊ शकणार्या किंवा आधीच आलेल्या इतर विषयांवरच्या संभाव्य महत्त्वाच्या विचारांनाही तुम्ही घाऊकपणे दूर लोटता आहात. बदलत्या आर्थिक परिस्थितीन आणलेल्या वेगाबरोरच भारतात हा होऊ घातलेला नवा बदल आता सामान्य लोकांमध्ये खूप वेगात रूजतो आहे याची खंत अतिशय बोचरी आहे.
या मुक्तचिंतनावरही येणार्या प्रतिसादांची पूर्ण कल्पना आहे. त्यावर मी प्रतिवाद करेनच, प्रतिसाद देईनच असे नाही. मात्र त्यात येणार्या विचारांवर पूर्ण व आदरपूर्वक विचार करेन इतके मात्र नक्की! बरेच दिवस साचले होते, एकहाती, एकटाकी टंकले आहे. प्रमाणलेखनदोष पदरात घ्याल अशी आशा!
ह्म्म्म
तुमचा मुद्दा तसा विचार करण्याजोगा आहे. मला 'गुलाम' सिनेमा मधले आमिर खान, त्याचा भाऊ आणि त्याचे 'स्वातंत्र्य सैनिक' असलेले वडील यांचं नातं आठवलं. 'अन्याय सहन न करता आपण कसं आपल्याला बरोबर वाटेल ते करत राहिलं पाहिजे, आपल्याला कितीही त्रास झाला तरी जे आपल्याला बरोबर वाटतय तेच करणारा, प्रवाहाच्या विरोधात जायला लागलं तरी जाणारा, तोच खरा माणूस' अशी शिकवण आपल्या मुलांना देणारे वडील प्रत्यक्षात तसे नसतात तर अगदी फट्टू, असतात हे कळल्यावर त्या मुलांच्या काय रिअॅक्षन्स येतात ते विचार करण्यासारखं आहे. एक मुलगा आपला बाप *त्या होता म्हणून त्यानं सांगितलेलं सगळच डिसमिस करतो तर दुसरा माणूस कसा का असेना जे सांगितलं ते in isolation घेऊन 'ते मला पटलय, मी आचरणार' असा स्टँड घेतो.
पण एखादा काय सांगतोय ते किती प्रॅक्टीकल आहे ते ठरवायला तो मनुष्य स्वतः तसा वागतो का हे बघितलं जातं. त्यामुळे विचार आणि कृती यांचा अजिबात संबंध नसेल तर पचवायला जड जात तो माणूस काय सांगतोय ते.
माझ्यामते कोणताही समाज पुढे यायला परंपरा नावाच्या चिखलाला दूर सारणारी पुरोगामी मंडळी अत्यावश्यक असतात.
समाज पुढे येणं म्हणजे काय?
पण एखादा काय सांगतोय ते किती
पण एखादा काय सांगतोय ते किती प्रॅक्टीकल आहे ते ठरवायला तो मनुष्य स्वतः तसा वागतो का हे बघितलं जातं. त्यामुळे विचार आणि कृती यांचा अजिबात संबंध नसेल तर पचवायला जड जात तो माणूस काय सांगतोय ते.
अगदी नेमके!!!! अन हाच मुद्दा दुर्लक्षिला जातो ते बाकी उद्बोधक आहे. एकीकडे समाज सुधारण्याची भाषा अन दुसरीकडे व्यक्तिस्वातंत्र्य हे दोन्ही एकमेकांना न्यूट्रलाईझ करतात असे वाटते. पण हाच मार्ग कन्व्हीनिअंट आहे.
बिकट वाट वहिवाट नसावी, स्युडोमार्गा सोडू नको |
दोन्ही डगरींवरती पाय ठेव तू, उगाच प्रामाणिक होऊ नको ||
लेख फार आवडला.
लेख फार आवडला.
_________
व्यक्तीलाच झाडून टाकलं की विचारांचा प्रश्नच येत नाही, ना रहेगा बांस...
या विचाराशी अत्यंत सहमत. जे लोक व्यक्तीलाच झाडून टाकतात त्यांच्यात आत्मविश्वासाची कमी असते असे माझे मत आहे. जी व्यक्ती जितकी जास्त अरेरेवी, उग्रपणा करते तितकी ती आतून पॅरॅनॉईड अन दुबळीसुद्धा असते - असा कयास.
संतुलितपणे, संयमाने आपला मुद्दा मांडायला प्रचंड आंतरीक ताकद (इन्टर्नल रिझर्व्हॉयर ऑफ स्ट्रेन्थ) लागते.
स्युडो लिबरल.... हस्तीदंती मनोर्यातील मूर्ख अश्या शब्दांनी हल्ली अनेकदा व्यक्तीला दूर केले जाते. ...... खंत अतिशय बोचरी आहे.
अतिशय उत्तम लेख. __/\__
पॉल ग्रॅहम
पॉल ग्रॅहम यांचा हाऊ टू डिसअॅग्री म्हणून एक लेख आहे (त्याचा सारांश मुक्तसुनीत यांच्या खरडवहीत चित्र रुपात आहे) त्यात ते म्हणतात;
DH0. Name-calling.
This is the lowest form of disagreement, and probably also the most common. We've all seen comments like this:
u r a fag!!!!!!!!!!
But it's important to realize that more articulate name-calling has just as little weight. A comment like
The author is a self-important dilettante.
is really nothing more than a pretentious version of "u r a fag."
तस्मात, अशा लोकांना फारसे महत्त्व देऊ नये.
liberals (उदारमतवादी) आणि rebels (बंडखोर)
liberals (उदारमतवादी) आणि rebels (बंडखोर) यांत तुमची गफलत होत नाहीये ना? तुम्हाला नक्की कुणाला "पुरोगामी" म्हणायचंय? उदारमतवाद्यांना की बंडखोरांना? माझ्या मते या दोन्ही जमाती भिन्न आहेत. तसंच हस्तिदंती मनोर्यांत राहून उंटावरून शेळ्या हाकणारी पण जमात आहे. माझ्या अल्प ज्ञानानुसार भारतातल्या पत्रकारांमध्ये या उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या लोकांचा सुळसुळाट आहे (पहा: राजदीप, बर्खा, सागरिका, वागळे काका… ). या जमातीतल्या लोकांना त्यांचे विचार चुकीचे आहेत हे सांगणं किंवा पटवून देणं हे त्यांच्या विचार स्वातंत्र्यावर आघात करणं होऊ शकत नाही (तुम्हाला तसंच म्हणायचं आहे असं माझं मत नाही… )
तुमचा लेख वाचून "Think Different" कॅम्पेन आठवली (actually शाळेत आमच्या इंग्लिश च्या सरांनी ऐकवली होती पहिल्यांदा… ती Apple ची स्लोगन आहे हे आत्ता google केल्यावर कळले!) -
Here’s to the crazy ones. The misfits. The rebels. The troublemakers. The round pegs in the square holes.
The ones who see things differently. They’re not fond of rules. And they have no respect for the status quo. You can quote them, disagree with them, glorify or vilify them.
But the only thing you can’t do is ignore them. Because they change things. They invent. They imagine. They heal. They explore. They create. They inspire. They push the human race forward.
Maybe they have to be crazy.
How else can you stare at an empty canvas and see a work of art? Or sit in silence and hear a song that’s never been written? Or gaze at a red planet and see a laboratory on wheels?
We make tools for these kinds of people.
While some see them as the crazy ones, we see genius. Because the people who are crazy enough to think they can change the world, are the ones who do.
उंटावरून शेळ्या हाकणारे आणि
उंटावरून शेळ्या हाकणारे आणि 'उंटावरून शेळ्या हाकणे' या आचरणापेक्षा विचार कसा महत्त्वाचा आहे हे लोकमानसावर ठसवू पाहणारे म्हणजेच लिबरल अशी डेफिनिषन आहे बहुधा सध्या. कुठे आग लागली आणि समोर पाण्याने भरलेली बादली असली तर 'पाण्याने आग विझते हा विचार महत्त्वाचा आहे' म्हणत बोंबा ठोकणारे हे, यांचं सगळंच कसं उद्बोधक आणि अद्भुत वाटतं.
हाहा, एकच नंबर!!!!! पूर्ण
हाहा, एकच नंबर!!!!! पूर्ण सहमत हेवेसांनल.
उगीच विचार जुळतात म्हणून महात्मा गांधी/फुले, आंबेडकर, इ. लोकांच्या भरजरी लिखाणाशी आपल्या ठिगळाची तुलना करून 'आम्हीही त्याच आळीतले बरंका, आता होऊन जाऊद्या आमचा सन्मान!' छाप लोकही त्यातलेच.
शेवटी काहीतरी करणारे लोकच आपले विचार समाजाच्या गळी उतरवू शकतात. आंबेडकरादि लोक नुस्ते पुस्तकं पाडत बसले असते तर घंटा काही झालं नसतं. पुरोगामी विचारांची इतकी पडली आहे तर बाकीचे कसे चु* आहेत हे सिद्ध करण्यापेक्षा समाजाला जरा बरोबर घेऊन त्याच्या कलाने समजावलं तर लोकही कबूल करतात, भले वेळ लागला तरी बेहत्तर. पण चीप पब्लिसिटीचा मोह..तो सुटलाय कुणाला? त्यामुळे बेवडे झिंगून उद्या दारूबंदीवर प्रवचन करताना दिसले तरी या लोकांना त्यात चुकीचं काही दिसणार नाही. वर उपदेश करतील ते वेगळंच!
स्वातंत्र्य
विचारांमागचा अजेंडा लक्षात घेतला पाहिजे, अर्थात अजेंडा व्यक्त करण्यासाठीसुद्धा पुरेसे स्वातंत्र्य मिळायला हवे, विचार आणि आचारात फरक असल्यास आणि त्याबद्दल व्यक्ती 'प्रामाणिक' असल्यास विचारस्वातंत्र्य असायला हरकत नाही, किमानपक्षी चर्चास्वातंत्र्य हवे.
पण मांसाहार करणार्याने प्राण्यांबद्दल भुतदया आहे असे सांगणे तार्किकदृष्ट्या दुट्टप्पीपणा आहे, तसे असले तरी विचार मांडण्याचे स्वातंत्र्य हवेच.
अंशतः वाचन?
हा आणि वरीलही एक प्रतिसाद वाचून लेख पूर्ण वाचलाय का घाईत काही अंशच वाचलाय अशी शंका आली, म्हणून लेखातीलच दोन उद्धृते देतो:
१. हवं तर त्या माणसाला दुटप्पी म्हणा दुतोंडी म्हणा .....
२. तुमच्या बोलण्याला यशस्वी कृतीची जोड असेल तर त्याचा परिणाम अधिक होतो हे मान्यच आहे.
हे आधीच वाचले असेल नी तरीही तुमचे प्रतिसाद आपल्या जागी योग्यच आहे असे वाटत असेल तर हा प्रतिसाद गैरलागू समजावा.
बाकी चालु आहेच, ते चालु द्यालच!
हवं तर त्या माणसाला दुटप्पी
हवं तर त्या माणसाला दुटप्पी म्हणा दुतोंडी म्हणा .....
ते म्हटलेलेच आहे. द्विरुक्ती उद्बोधक वगैरे.
तुमच्या बोलण्याला यशस्वी कृतीची जोड असेल तर त्याचा परिणाम अधिक होतो हे मान्यच आहे.
हे एक वाक्य उगीच घालायचं म्हणून घातल्यागत आहे. बाकी पूर्ण लेख उष्ट्रस्थित अजापालक नकर्त्यांचा उदोउदो करणारा वाटतो ही खंतही तितकीच बोचरी आहे.
पण मांसाहार करणार्याने
पण मांसाहार करणार्याने प्राण्यांबद्दल भुतदया आहे असे सांगणे तार्किकदृष्ट्या दुट्टप्पीपणा आहे, तसे असले तरी विचार मांडण्याचे स्वातंत्र्य हवेच.
त्याचवेळी मांसाहार करणार्याला कोणत्याच प्राण्याविषयी प्रेम, ममत्व, दया इत्यादि असूच शकत नाही असेही अतिघाऊक विधानही काहीजण लावून धरु शकतात.
मांसाहार करणार्या व्यक्तीला एकूण प्राणीसृष्टीविषयी घाऊक भूतदया नसेल इतपत मानणे ठीक. पण खाद्य म्हणून पाहिले जाणारे पोल्ट्री-प्राणी, ज्यांच्याशी आपला काही मानसिक बंध, लळा झालेला नाही, त्यांना खाणे आणि पाळलेल्या, नेहमीच्या पाहण्यातल्या प्राण्यांविषयी माया असणे हे इन इटसेल्फ दुटप्पी बाय डिफॉल्ट असेलच असं नाही.
त्याला जनरल भूतदया न म्हणता लळा लागलेल्या प्राण्यांविषयीचं प्रेम असं काहीतरी म्हणता येईल आणि ते ढोंग अजिबात नसेल.
आपल्याला कुत्रा प्रिय आहे पण आपण चिकन बकरे इ खातो हे ढोबळ झालं.
त्याउप्पर मी घरी मासे पाळतो आणि त्यांची काळजी घेतो. पण पापलेट सुरमई तळून आवडीने खातो.
अगदी एखादी बकरीदेखील मी स्वतः पाळली आणि तिला खायला प्यायला घालून वाढवली की मला ती मारणे आणि खाणे शक्य होणार नाही अशी शक्यता आहे, पण त्याचवेळी मी एकुणात अन्यत्र मटन खाणे शक्य आहे.
याला "दुटप्पी" म्हणावे का याबद्दल साशंक आहे.
अश्या न्यायाने जगात एकही- अक्षरशः एकही- मनुष्य स्वतःला वृक्षप्रेमी, पर्यावरणप्रेमी म्हणवू शकणार नाही. भाजीपाला, फळे खाणे म्हणजे वृक्षहानीच / हत्या होय. मग कसले वृक्षारोपण करायचे.. दुटप्पी..
मांसाहार करणार्या व्यक्तीला
मांसाहार करणार्या व्यक्तीला एकूण प्राणीसृष्टीविषयी घाऊक भूतदया नसेल इतपत मानणे ठीक. पण खाद्य म्हणून पाहिले जाणारे पोल्ट्री-प्राणी, ज्यांच्याशी आपला काही मानसिक बंध, लळा झालेला नाही, त्यांना खाणे आणि पाळलेल्या, नेहमीच्या पाहण्यातल्या प्राण्यांविषयी माया असणे हे इन इटसेल्फ दुटप्पी बाय डिफॉल्ट असेलच असं नाही.
होय की. पण मुळात काहीतरी अंतर्विरोध आहे की नाही? अंतर्विरोधाचा अगदी ०.००००००००००००००००००१% टक्काही लोक नाकारतात ते उद्बोधक वगैरे वाटतं.
खुलासा
अश्या न्यायाने जगात एकही- अक्षरशः एकही- मनुष्य स्वतःला वृक्षप्रेमी, पर्यावरणप्रेमी म्हणवू शकणार नाही. भाजीपाला, फळे खाणे म्हणजे वृक्षहानीच / हत्या होय. मग कसले वृक्षारोपण करायचे.. दुटप्पी..
खाली जंतूना दिलेल्या प्रतिसादातला काही भाग इथे देत आहे - वृक्षप्रेमी, पर्यावरणप्रेमी, प्राणीप्रेमी तोपर्यंत ठिक आहे जोपर्यंत वृक्ष,पर्यावरण आणि प्राण्यांचा फायदा माणसाला होत आहे, त्यापलिकडे त्यांच्याबद्दल ममत्त्व वगैरे एकतर कुटुंबातील सदस्याप्रमाणे मानल्यामुळे आला असावा किंवा अज्ञानातून आला असावा. इतर कोणतेही वर्तन दुटप्पी न वाटण्याचे कारण नाही.
विधान सरसकट असलेले चालावे पण निदान भुमिका स्पष्ट असावी.
"कोंबड्या, डुकरे, गायी वगैरेना मारताना कमी यातना व्हाव्यात असे मला वाटते त्याउप्पर मला त्यांच्याबद्दल दया नाही, त्या कमी यातना त्यांना होणे नाईलाजाचे आहे कारण त्यांना खायला मला आवडते" हे विधान योग्य ठरावे.
गुंतागुंत किंवा तपशीलांतले सैतान
>> पण मांसाहार करणार्याने प्राण्यांबद्दल भुतदया आहे असे सांगणे तार्किकदृष्ट्या दुट्टप्पीपणा आहे
एखादं मत ह्याहून अधिक गुंतागुंतीचं असू शकतं आणि संदर्भचौकटीनुसार एखादं वर्तन सुसंगत / विसंगत ठरू शकतं, हे इथे लक्षात घेणं गरजेचं आहे असं वाटतं. उदा :
- 'वर्तन / स्वभाव वगैरे दृष्टिकोनातून सस्तन प्राणी माणसांच्या अधिक जवळचे वाटतात म्हणून त्यांच्याबद्दल भूतदया वाटते, पण इतर प्राणी मी खातो' असं म्हणणारा माणूस त्याच्या जागी तर्कशुद्ध असू शकतो, पण 'कोणताही मांसाहार = कोणत्याही प्राण्याविषयीची भूतदया दुटप्पीच' एवढाच विचार केला, तर ती गुंतागुंत दुर्लक्षित होईल.
- जीवजंतू आपल्यामुळे मरू नयेत म्हणून पराकोटीचे नियम पाळणारे जैन त्यांच्या धर्मसंकल्पनेनुसार सुसंगत वागत असू शकतात, पण सूक्ष्म जंतूंना न मारण्याच्या ध्येयातून केलेलं त्यांचं वर्तन विज्ञानाच्या नियमांनुसार निरर्थक असू शकतं. आज उपलब्ध वैद्यकीय / जीवशास्त्रीय ज्ञानानुसार त्यांचं वर्तन दुटप्पी आहे असं मग आज एखादा म्हणू शकेल.
तपशील
स्वातंत्र्य हवेच, पण असे सांगणे हा दुटप्पीपणा आहे हेच कबूल करवत नाही ते उद्बोधक वाटतं.
'वर्तन / स्वभाव वगैरे दृष्टिकोनातून सस्तन प्राणी माणसांच्या अधिक जवळचे वाटतात म्हणून त्यांच्याबद्दल भूतदया वाटते, पण इतर प्राणी मी खातो' असं म्हणणारा माणूस त्याच्या जागी तर्कशुद्ध असू शकतो, पण 'कोणताही मांसाहार = कोणत्याही प्राण्याविषयीची भूतदया दुटप्पीच' एवढाच विचार केला, तर ती गुंतागुंत दुर्लक्षित होईल.
समजण्याच्या सोयीसाठी 'मला कुत्र्यांबद्दल प्रेम वाटते पण मी कुत्र्याचे मांस खात नाही, मी कोंबडीचे मांस खातो, मला कोंबडीबद्दल भूतदया वाटत नाही' हे विधान 'मला प्राणिमात्रांबद्दल भूतदया वाटते' ह्या विधानाच्या अंतर्गत करता यावे काय?
जीवजंतू आपल्यामुळे मरू नयेत म्हणून पराकोटीचे नियम पाळणारे जैन त्यांच्या धर्मसंकल्पनेनुसार सुसंगत वागत असू शकतात, पण सूक्ष्म जंतूंना न मारण्याच्या ध्येयातून केलेलं त्यांचं वर्तन विज्ञानाच्या नियमांनुसार निरर्थक असू शकतं. आज उपलब्ध वैद्यकीय / जीवशास्त्रीय ज्ञानानुसार त्यांचं वर्तन दुटप्पी आहे असं मग आज एखादा म्हणू शकेल.
उपलब्ध माहितीनुसार केलेले विधान प्रामाणिक असल्यास विचार दुटप्पी नाहीत असे म्हणता यावे, म्हणजे माहिती मिळाल्यास वर्तनात बदल घडेल ही अपेक्षा आहे.
संदर्भचौकट, तपशील, वगैरे.
>> उपलब्ध माहितीनुसार केलेले विधान प्रामाणिक असल्यास विचार दुटप्पी नाहीत असे म्हणता यावे, म्हणजे माहिती मिळाल्यास वर्तनात बदल घडेल ही अपेक्षा आहे.
माझा मुद्दा संदर्भचौकटीचा होता. जंतू मरू नयेत म्हणून (धर्मतत्त्वांनुसार) केलेलं वर्तन विज्ञानाच्या संदर्भचौकटीत निरर्थक ठरेल. तरीही ते करत राहिलं तर विज्ञानाच्या संदर्भचौकटीत त्याला दुटप्पी म्हणता येईल (असं वागल्यामुळे जंतूंचे प्राण वाचत नाहीत हे माहीत असूनही 'जंतू मरू नयेत' ह्या हेतूनं तसं वागणं). ह्याउलट, वैज्ञानिक आधार नसलेलं वर्तन सोडून दिलं, तर धर्माच्या चौकटीत तो पाखंड होऊ शकतो. तसं करूनही 'मी धार्मिक आहे' असं म्हणणारा मग धर्मचौकटीत दुटप्पी ठरेल.
>> समजण्याच्या सोयीसाठी 'मला कुत्र्यांबद्दल प्रेम वाटते पण मी कुत्र्याचे मांस खात नाही, मी कोंबडीचे मांस खातो, मला कोंबडीबद्दल भूतदया वाटत नाही' हे विधान 'मला प्राणिमात्रांबद्दल भूतदया वाटते' ह्या विधानाच्या अंतर्गत करता यावे काय?
समजण्याची सोय समजली नाही. ;-) अशा उदाहरणांत अनेक तपशील भरता येतात आणि त्यानुसार संदर्भचौकट बदलते. उदा:
- 'मी पाळलेल्या कुत्र्याबद्दल मला प्रेम वाटतं म्हणून मी त्याचं मांस खाणार नाही; पण इतर कुत्र्यांचं मांस मी खातो; आणि मी पाळलेले गाय-बैल, शेळ्या-मेंढ्या, डुकरं मी खातो.' (विशिष्ट कुत्र्याचा प्रेमापोटी अपवाद)
- 'मला समस्त कुत्र्यांबद्दल प्रेम वाटतं म्हणून मी कोणत्याच कुत्र्याचं मांस खाणार नाही; पण मी पाळलेले (किंवा न पाळलेले) गाय-बैल, शेळ्या-मेंढ्या, डुकरं मी खातो.' (सगळ्या कुत्र्यांचा अपवाद.)
- 'मी पाळलेले प्राणी मी खात नाही; पण त्यांच्या मदतीनं शिकार करून आणलेले प्राणी मी खातो.' (पाळलेल्या प्राण्यांचा अपवाद.)
वगैरे. सरसकट विधानात स्पष्ट वाटणारा दुटप्पीपणा तपशीलात शिरलं की त्या संदर्भचौकटीत सुसंगत ठरू शकतो एवढंच दाखवून द्यायचं होतं.
सरसकट विधानात स्पष्ट वाटणारा
सरसकट विधानात स्पष्ट वाटणारा दुटप्पीपणा तपशीलात शिरलं की त्या संदर्भचौकटीत सुसंगत ठरू शकतो एवढंच दखवून द्यायचं होतं.
"माझ्या पाल्यास इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालेन (नाइलाजाने नाही) पण मराठी माध्यमाचे समर्थन करेन" हे वाक्य सुसंगत ठरणारी संदर्भचौकट पाहणं उद्बोधक ठरेल.
दोन्ही माध्यमांचे पर्याय उपलब्ध असणे इ. नेहमीची गृहीतके अप्लाय.
"नाईलाजाने नाही" हे
"नाईलाजाने नाही" हे गृहीतकवाचक शब्द कंसात घालून ते त्या विधानाचा अविभाज्य भाग बनल्याने आता हे पूर्ण विधान सरळसरळ तर्कदुष्ट बनले.
तो नाईलाज किंवा तत्सम काहीतरी यावरच संदर्भचौकटी बदलतात.
माझ्या गावात / एरियात / देशात मराठी माध्यमाची शाळा नाही.
किंवा जी आहे ती दर्जा आणि सुविधांच्या दृष्टीने फारच निकृष्ट आहे.
या कारणांनी मुलांना इंग्रजी शाळेत घातले पण त्याचवेळी ज्या प्रदेशात उत्तम मराठी शाळा आहेत तिथे त्यांचे समर्थन केले तर दुटप्पी म्हणता येणार नाही.
तस्मात. नाईलाज नाही असे ठामपणे म्हटल्यास मग विरोधाभास सिद्ध करण्याचा प्रश्नच राहात नाही.
माझ्या गावात / एरियात / देशात
माझ्या गावात / एरियात / देशात मराठी माध्यमाची शाळा नाही.
किंवा जी आहे ती दर्जा आणि सुविधांच्या दृष्टीने फारच निकृष्ट आहे.
हे डिस्क्लेमर न देता किंवा अध्याहृत आहेत असेही न वाटू देता समर्थन केलेले जालावर पाहिले आहे आणि अॅट द सेम टैम आचरण विरोधी असलेलेही. नाइलाजाचा वट्ट उल्लेख न करता लिहिलेले प्रतिसाद पाहिले आहेत.
तस्मात या केसमध्ये किमान विरोधाभास आहे हे तरी मान्य केलं हेच लै झालं. पण असं मान्य करणं हे बहुधा लिबरल चौकटीत बसत नसावं. पायरीपायरीला आमचं नव्यानेच उद्बोधन होतंय या लिबरल एज्युकेषनात.
काही शंका (ओपन थिंकिंग)
हे डिस्क्लेमर न देता किंवा अध्याहृत आहेत असेही न वाटू देता समर्थन केलेले जालावर पाहिले आहे आणि अॅट द सेम टैम आचरण विरोधी असलेलेही.
हे डिस्क्लेमर का द्यावे लागावे? एखाद्याची खाजगी बाब असू शकते ती... नाही वाटले द्यावेसे डिस्क्लेमर! काय म्हणणे आहे?
बाकी, दुसर्याला जोपर्यंत 'दुटप्पी' म्हणून बोंबलण्याचा अधिकार आहे, तोपर्यंत (उदाहरणादाखल) मला दुटप्पीपणे (किंवा, दुसर्याला दुटप्पी वाटू शकेल अशा रीतीने) वागण्याचा अधिकार का नसावा?
तिसरी गोष्ट, समजा, एखादी गोष्ट चूक आहे असे मी म्हणतो, आणि नंतर (किंवा आधीसुद्धा) ती गोष्ट मी स्वतः करतो (विथ ऑर विदौट व्हॅलिड रीझन). त्याने ती गोष्ट चूक (असली तर) व्हायची थोडीच थांबते?
'अमूकअमूक गोष्ट चूक आहे. (भले मी ती चूक स्वतः करत असलो तरी.)' या विधानात नेमके काय गैर आहे? यातले कंसातले विधान अध्याहृतात न ठेवता दर वेळी अगोदर नि जाहीरपणे केलेच पाहिजे, ते कशासाठी?
हे विधान मी जर (प्रत्येक वेळेस) जाहीरपणे नाही केले, तर मला (कदाचित वै. वै वै. वै. वै. दु.!!!!!!बरोबरच) 'दुटप्पी' हे(ही) विशेषण चिकटविले जाईल, म्हणून? वेल, ती (किंवा मनाला येतील ती) विशेषणे चिकटविण्याचा अधिकार चिकटविणार्यांना तसाही आहेच. मग, माझे घर जर मी अगोदरच सकाळ-दुपार-संध्याकाळ भरपूर ऊन्ह येणार्या ठिकाणी बांधले असेल, तर मी पर्वा कशाबद्दल करावी?
तस्मात या केसमध्ये किमान विरोधाभास आहे हे तरी मान्य केलं हेच लै झालं. पण असं मान्य करणं हे बहुधा लिबरल चौकटीत बसत नसावं.
मान्य कोणाजवळ करायचे? स्वतःशी मान्य करणे ठीकच आहे - किंबहुना तेही नसेल, तर तुम्ही म्हणता तशी अडचण आहे खरी. जाहीर कबुलीची (प्रसंगी तीही - अॅट वन्स ओन डिस्क्रीशन - दिली जाऊ शकते, पण) गरज काय?
दुसरे म्हणजे, एकदा 'आय कुड बी राँग' याच गृहीतकावर चालल्यावर, 'आय अॅम इंडीड राँग' याची पूर्ण खात्री झाल्याखेरीज अशी कबुली (स्वतःलाच; दुसर्याला ती दर वेळी देणे लागू असतेच, याबद्दल साशंक आहे.१) देण्याची घाई का करावी?
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ वुड्डहौससाहेबाचे एक विधान आहे. "It is a good rule in life never to apologize. The right sort of people do not want apologies, and the wrong sort take a mean advantage of them." विधानाशी - खास करून दुसर्या वाक्याच्या पूर्वार्धाशी - पूर्णपणे सहमत आहेच, असे म्हणू शकत नाही. पण विचारांना चालना देणारे विधान आहे खरे.
समाजासाठी आपले विचार उपयोगी
समाजासाठी आपले विचार उपयोगी आहेत अशी धारणा असेल तर ते आचरणाने सिद्ध करून दाखवायची थोडीसुद्धा जबाबदारी या लिबरलांवर येत नाही काय?
विचार समाजासाठी उपयोगी, पण ते समाजाने आयसोलेशनमध्ये का स्वीकारावे? नव्या विचारांचा इ. जो काही इन्सेंटिव्ह असेल तो फक्त विचारांतून स्पष्ट होणार नसेल तर समाज का म्हणून स्वीकारेल ते विचार? आणि नाही स्वीकारले तर समाजाला लेबल लावणारे तरी हे कोण टिकोजीराव? टाळी एकाच हाताने वाजते असा समज असेल तर ठीके, नपेक्षा असो.
फरक आहे!
तळटीपांमध्येच अर्धे जेवण करणे हा ज्याच्यात्याच्या आवडीचा (पक्षी: व्याख्येनेच वैकल्पिक) भाग असू शकतो. ते त्यावर बंधनकारक ठरू नये.
बोले तो, ओरडणे ही ओरायलीची हौस असू शकेल. पण त्याने एखादे वेळेस न ओरडल्यास१ (अथवा 'ओरडणे ही मूलभूत गरज असू शकत नाही' असे प्रतिपादन केल्यास), द्याट शुड नॉट बी हेल्ड अगेन्ष्ट हिम, वगैरे वगैरे.
---------------------------------------------------------------------------------------------------
१ जष्ट फॉर द सेक ऑफ द आर्ग्युमेंट.
योग्य चौकट
माझा मुद्दा संदर्भचौकटीचा होता. जंतू मरू नयेत म्हणून (धर्मतत्त्वांनुसार) केलेलं वर्तन विज्ञानाच्या संदर्भचौकटीत निरर्थक ठरेल...वैज्ञानिक आधार नसलेलं वर्तन सोडून दिलं, तर धर्माच्या चौकटीत तो पाखंड होऊ शकतो. तसं करूनही 'मी धार्मिक आहे' असं म्हणणारा मग धर्मचौकटीत दुटप्पी ठरेल.
वर्तन निरर्थक सिद्ध झाल्यावर 'मानलेली' धर्मचौकटच निरर्थक ठरते, त्यामुळे दुटप्पीपणा निरपेक्षपणे तपासायला हवा, माहितीप्रमाणे/ज्ञानप्रमाणे चौकटीत बदल झाल्यास वर्तन दुटप्पी मानण्याचे कारण नाही.
समजण्याची सोय समजली नाही. अशा उदाहरणांत अनेक तपशील भरता येतात आणि त्यानुसार संदर्भचौकट बदलते.
सरसकट विधान केल्याने चर्चा घडली म्हणून सरसकट विधानाचे पाप मी केले ;), पण प्राणी किंवा वृक्षांच्या प्रती असलेली भूतदया तोपर्यंतच ग्राह्य आहे जोपर्यंत ती माणसाच्या उपयोगाची/फायद्याची आहे, झाडे अन्न आणि पर्यावरण राखतात म्हणून त्यांची काळजी केली जाते ह्याउप्पर त्यांच्याबद्दल ममत्त्व वगैरे भावना व्यक्त केल्यास तो दुटप्पीपणाच समजावा, स्वतः पाळलेल्या प्राण्यांबद्दल/झाडांबद्दल असलेले ममत्त्व बहुतांशी सोयिस्कर असते नसल्यास त्यांना प्राणी किंवा झाडांच्या पलिकडचा दर्जा(कुटुंबातील सदस्य) दिला जातो जिथे वरील नियम लागु होणार नाही.
सरसकट विधानात स्पष्ट वाटणारा दुटप्पीपणा तपशीलात शिरलं की त्या संदर्भचौकटीत सुसंगत ठरू शकतो एवढंच दाखवून द्यायचं होतं
विधान सरसकट असलेले चालावे पण निदान भुमिका स्पष्ट असावी.
"कोंबड्या, डुकरे, गायी वगैरेना मारताना कमी यातना व्हाव्यात असे मला वाटते त्याउप्पर मला त्यांच्याबद्दल दया नाही, त्या कमी यातना त्यांना होणे नाईलाजाचे आहे कारण त्यांना खायला मला आवडते" हे विधान योग्य ठरावे.
गुंता वाढतोय
>> वर्तन निरर्थक सिद्ध झाल्यावर 'मानलेली' धर्मचौकटच निरर्थक ठरते, त्यामुळे दुटप्पीपणा निरपेक्षपणे तपासायला हवा, माहितीप्रमाणे/ज्ञानप्रमाणे चौकटीत बदल झाल्यास वर्तन दुटप्पी मानण्याचे कारण नाही.
धर्मचौकट निरर्थकच ठरायला हवी असं नाही. कुणाच्या धर्मतत्त्वात अहिंसा आहे, पण जीवशास्त्रीय ज्ञानानुसार मानवी शरीरातली प्रतिकारशक्ती काही जंतूंना जगू देते आणि काहींना मारते (शिवाय, काहींना मारण्यासाठी प्रतिजैविकं घ्यायला लागतात, नाही तर आपणच मरू) वगैरे गोष्टी लक्षात घेऊन एखादा हे अहिंसेचं तत्त्व पाळायचा प्रयत्न करत असेल, तर 'धर्मपरंपरा मोडूनही मी धर्मतत्त्वांचं पालन करतो आहे' असं तो म्हणू शकेल. पण कट्टर धर्मपरंपरावाद्यांनुसार तो पाखंड ठरेल. आता, त्याची इच्छा आहे धर्मतत्त्वांनुसार वागण्याची, पण त्या धर्मचौकटीत त्याचं वर्तन पाखंड नाही हे त्यानं स्वतः किंवा आपण बाहेरून कितीही ठरवलं, तरी त्याचा/आपला अधिकार तो किती? आणि सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे : त्याला ती चौकट नाकारायची इच्छा नाही आहे. त्यामुळे त्याच्यासाठी ती निरर्थक होऊ शकत नाही. हा मानवी आयुष्याचा गुंता आहे.
>> प्राणी किंवा वृक्षांच्या प्रती असलेली भूतदया तोपर्यंतच ग्राह्य आहे जोपर्यंत ती माणसाच्या उपयोगाची/फायद्याची आहे
जी गोष्ट उपयोगासाठी / फायद्यासाठी केली जाते ती 'दया' कशी? 'भूतां परस्परें जडो मैत्र जिवाचे' हे फायद्यासाठी आहे का? माणसाला कुणाविषयी प्रेम वाटेल ते वाटो; पण प्रेम ठरवून करता येतं का?
सोडवुयात
धर्मचौकट निरर्थकच ठरायला हवी असं नाही. कुणाच्या धर्मतत्त्वात अहिंसा आहे, पण जीवशास्त्रीय ज्ञानानुसार मानवी शरीरातली प्रतिकारशक्ती काही जंतूंना जगू देते आणि काहींना मारते (शिवाय, काहींना मारण्यासाठी प्रतिजैविकं घ्यायला लागतात, नाही तर आपणच मरू) वगैरे गोष्टी लक्षात घेऊन एखादा हे अहिंसेचं तत्त्व पाळायचा प्रयत्न करत असेल, तर 'धर्मपरंपरा मोडूनही मी धर्मतत्त्वांचं पालन करतो आहे' असं तो म्हणू शकेल. पण कट्टर धर्मपरंपरावाद्यांनुसार तो पाखंड ठरेल. आता, त्याची इच्छा आहे धर्मतत्त्वांनुसार वागण्याची, पण त्या धर्मचौकटीत त्याचं वर्तन पाखंड नाही हे त्यानं स्वतः किंवा आपण बाहेरून कितीही ठरवलं, तरी त्याचा/आपला अधिकार तो किती? आणि सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे : त्याला ती चौकट नाकारायची इच्छा नाही आहे. त्यामुळे त्याच्यासाठी ती निरर्थक होऊ शकत नाही. हा मानवी आयुष्याचा गुंता आहे.
धर्मतत्त्वात असलेल्या अंहिसेच्या संकल्पनेचा बोध(इंटर्पिटेशन) चुकीचा असल्यास त्या-त्या माणसाची चौकट चुकीचीच ठरावी, त्याला कट्टर धर्मपरंपरावादी त्यांच्या इंटरप्रिटेशनची स्केल लावून दुटप्पी म्हणण्याची शक्यता आहेच पण तो तुम्ही म्हणता त्या गुंत्याचा भाग आहे हे मान्य आहे.
जी गोष्ट उपयोगासाठी / फायद्यासाठी केली जाते ती 'दया' कशी? 'भूतां परस्परें जडो मैत्र जिवाचे' हे फायद्यासाठी आहे का? माणसाला कुणाविषयी प्रेम वाटेल ते वाटो; पण प्रेम ठरवून करता येतं का?
:) गुंता वाढवता काय? 'भूतां परस्परें जडो मैत्र जिवाचे' हे फायद्याचेच आहे म्हणूनच दान मागितले आहे, प्रेम ठरवून नाही पण सहवासाने निर्माण होउ शकतं. भुमिका स्पष्ट करण्याबद्दल मी लिहिले आहेच.
संदर्भचौकट (क्रमशः)
ह्याला प्रतिसाद द्यायचा राहून गेला :
>> "कोंबड्या, डुकरे, गायी वगैरेना मारताना कमी यातना व्हाव्यात असे मला वाटते त्याउप्पर मला त्यांच्याबद्दल दया नाही, त्या कमी यातना त्यांना होणे नाईलाजाचे आहे कारण त्यांना खायला मला आवडते" हे विधान योग्य ठरावे.
विधानाची योग्यायोग्यता संदर्भचौकटीनुसार ठरते. उदा :
- ज्यांच्या तत्त्वचौकटीत अहिंसा हे मूल्य आहे ते ह्या विधानाला अयोग्य मानू शकतील.
- ह्याउलट, एखादा नरभक्षक जर म्हणाला, की मी माणसांना कमी यातना होतील असंच मारून खातो. म्हणून मी सर्वात सुसंगत आहे. उलट, माणसाला ह्यातून सोयीस्कररीत्या वगळणारे तुम्ही दुटप्पी आहात. :-)
जो जे वांछिल तो ते लाहो
माझे विधान मांसाहार करणार्या माणसाची भुमिका म्हणून आहे, त्यामुळे...
विधानाची योग्यायोग्यता संदर्भचौकटीनुसार ठरते. उदा :
ज्यांच्या तत्त्वचौकटीत अहिंसा हे मूल्य आहे ते ह्या विधानाला अयोग्य मानू शकतील.
अहिंसा हे मूल्य असलेले मांसाहारी नसतील त्यामुळे दुटप्पीपणा नाहीच.
ह्याउलट, एखादा नरभक्षक जर म्हणाला, की मी माणसांना कमी यातना होतील असंच मारून खातो. म्हणून मी सर्वात सुसंगत आहे. उलट, माणसाला ह्यातून सोयीस्कररीत्या वगळणारे तुम्ही दुटप्पी आहात.
आहा!! मग विधान वेगळे, अधिक वैश्विक असेल - "सजिवांना मारताना कमी यातना व्हाव्यात असे मला वाटते त्याउप्पर मला त्यांच्याबद्दल दया नाही, त्या कमी यातना त्यांना होणे नाईलाजाचे आहे कारण त्यांना खायला मला आवडते"
लेखाला समर्थन आहे हे वेगळं
लेखाला समर्थन आहे हे वेगळं सांगायची गरजच नसावी.
पण शेवटी आपल्याला जी गोष्ट समजत नाही, तिला हसून, तिची रेवडी उडवून, तिला स्यूडो संबोधून तुम्ही स्वतःला श्रेष्ठ मानणार; की ती गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करणार, आपले आकलन विस्तारून घेणार - हा एका टप्प्यानंतर व्यक्तिगत निवडीचा मामला असतो. त्यामुळे ज्यांना स्यूडोचिखलात (होय, हा समास वेगवेगळ्या प्रकारे सोडवता येतो, हे मला माहीत आहे) रमायचे आहे, त्यांना रमू द्यावे. दुसरे काय बोलणार?
पण शेवटी आपल्याला जी गोष्ट
पण शेवटी आपल्याला जी गोष्ट समजत नाही, तिला हसून, तिची रेवडी उडवून, तिला स्यूडो संबोधून तुम्ही स्वतःला श्रेष्ठ मानणार; की ती गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करणार, आपले आकलन विस्तारून घेणार - हा एका टप्प्यानंतर व्यक्तिगत निवडीचा मामला असतो.
विथ अस ऑर अगेन्स्ट अस चे एक उद्बोधक उदाहरण!!!! धन्यवाद.
ह्म्म-२
प्रतिसाद लेखिकेचा प्रतिसाद आणि तिच्याच स्वाक्षरीतला मजकूर पहाणे रोचक ठरावे, आणि उद्बोधक ही.
ही ती स्वाक्षरी.
स्वतःला निष्पक्षपातीपणाचे निकष लावण्याची तसदीही न घेता, पुरोगामी लोकांनी मात्र सदासर्वकाळ खुल्या मनाचे, तटस्थ, भावनाविरहित, निष्पक्षपाती असलेच पाहिजे अशा अपेक्षा धरणार्या छुप्या ट्रोलांचा मी जाहीर निषेध करत आहे
आतपर्यंत चर्चेत सहभागी
आतपर्यंत चर्चेत सहभागी झालेल्यांचे अनेक आभार!
आतापर्यंतचे मोजके अपवाद वगळता बहुतांश प्रतिसाद हे मुळ लेखनाला धरून आहेत याचाही आनंद आहेच.
आता मी हाफिसातून घरी गेलो की गणपतीच्या धामधुमीत रविवार/सोमवारपर्यंत बहुतांशवेळ ऑफलाईन असेल. त्यामुळे या चर्चेत भाग घेता येईलच असे नाही, मात्र परतल्यावर चर्चेत पुन्हा सहभागी होईनच. तोवर अजून विविधांगांनी मते वाचायला आवडतीलच, ती येत राहु द्यालच.
माझ्या डोळ्यांसमोर तरळून
माझ्या डोळ्यांसमोर तरळून गेलेला एक सुखसंवादः
आगरकरः माझा देवावर अजिबात विश्वास नाही. देव ही सर्वसामान्य माणसाला लुबाडण्याची युक्ती आहे...
स्वरूप खैरे: होय, पण यांची बायको कुंकू लावते. मंगळसूत्र घालते. एवढंच नाही, तर सत्यनारायणही घालते. तिला यांनी काडीमोड दिलेला नाही, हे रोचक आणि उद्बोधक म्हणता यावे....
ज्योतिबा: गरीब बिचार्या शेतकर्यांना सत्यनारायणासारख्या क्षुद्र पूजेच्या निमित्ताने हे ब्राह्मण नाडतात.
कॅटमॅन: गाईच्या पोटात ३३ कोटी देव असतात असे म्हटले, म्हणजे 'अंधश्रद्धा, अंधश्रद्धा' ओरडायला सुरुवात. कोटी म्हणजे प्रकार हे जाणून न घेताच, आपल्या पुरातन संस्कृतीला खोट्यात काढून मोकळे. पिढ्यानपिढ्या संस्कृती जपणार्या ब्राह्मणांना सरसकट वाईट म्हणणार्या असल्या स्यूडोलिबरलांचीच सध्या चलती आहे. यांच्या विधानांना गांभीर्यानं घेण्याची वट्ट जरुरी नाही....
आंबेडकरः शिका, एकत्र या, प्रगती करा. त्याशिवाय तरणोपाय नाही.
तू: एकदा प्रस्थापितांच्या विचारांबद्दल आणि पर्यायानं प्रगतीच्या व्याख्येच्या चौकटीबद्दलच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यावर शिक्षणाची गरजच निरर्थक ठरते. जर यांना समाजातील प्रस्थापित वर्गाची प्रगती खुपत असेल, तर त्याच प्रकारचे शिक्षण मागण्यातून आणि त्यातून प्रगती करण्यातून यांना साध्य काय करायचे आहे? मुदलात भूमिकेबद्दलच मला प्रश्न आहेत...
कुरुंदकरः म्हणून आपल्याला गांधीजींच्या विचारांकडे पाहताना सावध राहिले पाहिजे... सर्वसामान्य माणसाच्या दैहिक मर्यादा ओलांडून सत्तेचा प्रतिकार करण्याचे सत्याग्रह नामक अस्त्र गांधींनी दिलेले दिसते.
तरुणदोषी: मला गांधीजींबद्दल प्रचंड आदर आहे. त्यांच्या विचारांचा मी आदर करतो. पण त्या माणसाचे लैंगिक वर्तन भारतातल्या सर्वसामान्य माणसांना माहीत आहे का? ते माहीत असेल तर सर्वसामान्य माणूस - ऋजींसारखा किंवा मेघनाजींसारखा पुरोगामी नव्हे - त्यांचा आदर राखेल का? क्क्स्फ्लिअफ्ज्लस्द्गुओप्ज्ग्ल्कद्ग्ज्ल्स्क्ग्जल्स्द्क्ग्जस्द्ल्ग्जस्दोइग्जस्ल्द्क्ग्सोइद्गुसिओगु८एओविएतु०वेत्य्ज्ग्न्,ख्ल्ग्ज्ल्क्द्ल्ज्द्ग्ज्ल्स्द्ग्ज...
१. क्क्द्ग्ज्ल्क्द्ग्ज्ग्ल्क्ग्ज्ल्ग्फ्ज्ल्फ्ल्क्ग्जस्दइद्गुसिओगु८एओविएतु०वेत्य्ज्ग्न्,ख्ल्ग्ज्ल्क्द्ल्ज्द्ग्ज्ल्स्द्ग्जइद्गुसिओगु८एओविएतु०वेत्य्ज्ग्न्,ख्ल्ग्ज्ल्क्द्ल्ज्द्ग्ज्ल्स्द्ग्ज
२. इद्गुसिओगु८एओविएतु०वेत्य्ज्ग्न्,ख्ल्ग्ज्ल्क्द्ल्ज्द्ग्ज्ल्स्द्ग्जइद्गुसिओगु८एओविएतु०वेत्य्ज्ग्न्,ख्ल्ग्ज्ल्क्द्ल्ज्द्ग्ज्ल्स्द्ग्जइद्गुसिओगु८एओवि एतु०वेत्य्ज्ग्न्,ख्ल्ग्ज्ल्क्द्ल्ज्द्ग्ज्ल्स्द्ग्जइद्गुसिओगु८एओविएतु०वेत्य्ज्ग्न्,ख्ल्ग्ज्ल्क्द्ल्ज्द्ग्ज्ल्स्द्ग्जइद्गुसिओगु८एओविएतु०वेत्य्ज्ग्न्,ख्ल्ग्ज्ल्क्द्ल्ज्द्ग्ज्ल्स्द्ग्ज
३. इद्गुसिओगु८एओविएतु०वेत्य्ज्ग्न्,ख्ल्ग्ज्ल्क्द्ल्ज्द्ग्ज्ल्स्द्ग्जइद्गुसिओगु८एओविएतु०वेत्य्ज्ग्न्,ख्ल्ग्ज्ल्क्द्ल्ज्द्ग्ज्ल्स्द्ग्जइद्गुसिओगु८एओवि एतु०वेत्य्ज्ग्न्,ख्ल्ग्ज्ल्क्द्ल्ज्द्ग्ज्ल्स्द्ग्जइद्गुसिओगु८एओविएतु०वेत्य्ज्ग्न्,ख्ल्ग्ज्ल्क्द्ल्ज्द्ग्ज्ल्स्द्ग्जइद्गुसिओगु८एओविएतु०वेत्य्ज्ग्न्,इद्गुसिओगु८एओविएतु०वेत्य्ज्ग्न्,ख्ल्ग्ज्ल्क्द्ल्ज्द्ग्ज्ल्स्द्ग्जइद्गुसिओगु८एओविएतु०वेत्य्ज्ग्न्,ख्ल्ग्ज्ल्क्द्ल्ज्द्ग्ज्ल्स्द्ग्जइद्गुसिओगु८एओवि एतु०वेत्य्ज्ग्न्,ख्ल्ग्ज्ल्क्द्ल्ज्द्ग्ज्ल्स्द्ग्जइद्गुसिओगु८एओविएतु०वेत्य्ज्ग्न्,ख्ल्ग्ज्ल्क्द्ल्ज्द्ग्ज्ल्स्द्ग्जइद्गुसिओगु८एओविएतु०वेत्य्ज्ग्न्,इद्गुसिओगु८एओविएतु०वेत्य्ज्ग्न्,ख्ल्ग्ज्ल्क्द्ल्ज्द्ग्ज्ल्स्द्ग्जइद्गुसिओगु८एओविएतु०वेत्य्ज्ग्न्,ख्ल्ग्ज्ल्क्द्ल्ज्द्ग्ज्ल्स्द्ग्जइद्गुसिओगु८एओवि एतु०वेत्य्ज्ग्न्,ख्ल्ग्ज्ल्क्द्ल्ज्द्ग्ज्ल्स्द्ग्जइद्गुसिओगु८एओविएतु०वेत्य्ज्ग्न्,ख्ल्ग्ज्ल्क्द्ल्ज्द्ग्ज्ल्स्द्ग्जइद्गुसिओगु८एओविएतु०वेत्य्ज्ग्न्,............................................................................................................................................................
इथे मला झोप लागली....
प्रतिसाद अव्द्ला. स्वरूप
प्रतिसाद अव्द्ला.
स्वरूप खैरे: होय, पण यांची बायको कुंकू लावते. मंगळसूत्र घालते. एवढंच नाही, तर सत्यनारायणही घालते. तिला यांनी काडीमोड दिलेला नाही, हे रोचक आणि उद्बोधक म्हणता यावे. यांच्या विधानांना गांभीर्यानं घेण्याची वट्ट जरुरी नाही....
आगरकरांनी त्यांच्या बायकोवर त्यांचे विचार लादायला पाहिजे होते असे म्हणणे अजिबात नाही. पण आगरकर इतरांना सत्यनारायण करू नका असं सांगून स्वतः सत्यनारायणाला बसत असावेत असं वाटत नाही.
पण आगरकर इतरांना सत्यनारायण
पण आगरकर इतरांना सत्यनारायण करू नका असं सांगून स्वतः सत्यनारायणाला बसत असावेत असं वाटत नाही.
म्हणूनच ते आगरकर होते, खरे लिबरल होते. यांच्यासारखे स्यूडो लिब्रल नव्हते.
बाकी यावरून मेघनाच्या स्वाक्षरीत एक उद्बोधक बदल सुचला.
स्वतःच्या आचारविचारांना परस्परसंगतीचा साधा निकष लावण्याची तसदीही न घेता, अन्य लोकांनी मात्र सदासर्वकाळ आपल्याप्रती खुल्या मनाचे, निष्पक्षपाती असलेच पाहिजे अशा अपेक्षा धरणार्या स्यूडो लिबरलांचा मी जाहीर निषेध करत आहे.
वेदना फुसफुसे: कुटुंबांना आग
वेदना फुसफुसे: कुटुंबांना आग लागो. पुरुषांनी तर अनरिकरेबल, ९५% बर्निंग होवो. हे तुटून पडो. ते तुटून पडो. सगळी नाती अन्यायी. सगळे लोक अन्यायी. पुरोगामी तेव्हढे अंधारातला दिवा. याला अर्थ नाही. त्याला अर्थ नाही. राखी स्त्रीचा अवमान. लग्न स्त्रीचा अवमान. हा अवमान. तो अवमान. हे नातं असला कुजकट व्यवहार. ते नातं कुजकट व्यवहार. याँ. त्यों. फलानं. ढिमकानं. इउ॑व्ह्फोजु॑ए;फ्ज्॑व्;ह्ज्द्क फ्व्॑ज्फो॑;वेज फ्जेफुएव्ज्फ्॑विग्द्व्ब्व्द फ्ज्दोव्॑ह्चिव्ह्ब्ब्न वेफ्द ॑वोज्फ्च्१ज्द्फ ११एज्फ्च १;एफ्द्१'एफि१प्९३४४उफ्हस्व्द्ग्सव्॑ध्वे१फ्च एफ्वे॑ज्'॑फ्व्फ्॑एफ'
हसून हसून पुरेवाट. कीव करत करत मला झोप लागली.
माझ्या आधीच्या प्रतिसादाला
माझ्या आधीच्या प्रतिसादाला थोडं अजून लांबवत आहे -
मुळात, तुमच्या लेखात "पुरोगामी" हा शब्दप्रयोग चुकलाय असे माझे मत आहे. केवळ समाजाचे नियम धुडकावून लावल्याने किंवा इतरांची फिकीर न करता स्वतःला हवे तसे वागल्याने कुणी "पुरोगामी" होतं असं मला वाटत नाही. माझ्या मते "स्वतःला हवे तसे वागणे" आणि "बोले तैसा चाले गेलं तेल लावत असं म्हणून दुटप्पीपणा करणे" या दोन कृतींमध्ये सुद्धा फरक आहे. इतरांशी प्रामाणिक रहाच असे म्हणणे नाही, पण बोले तैसा चाले हे मान्य नसेल तरी स्वतःशी प्रामाणिक राहणे शक्य आहे का?
"पुरोगामी" अशी पदवी कुणी स्वतःला बहाल करणे योग्य नाही. कुणी पुरोगामी आहे की नाही हे त्यांच्या फक्त कृतीतून नव्हे तर त्या कृतींच्या परिणामांतून सिद्ध होतं. तसंच, कुणी स्वतःला दुटप्पी म्हणणं पण योग्य नाही कारण जर तुमचा दुटप्पीपणा कुणावर लादला जात नसेल तर कुणी तुम्हाला दुटप्पी म्हणण्याचं काहीच कारण नाही. "पुरोगामी" आणि "दुटप्पी" या पदव्या स्वतःच स्वतःला बहाल करता येत नाहीत एवढंच.
तुमच्या लेखात "पुरोगामी" आणि "Pseudo" एकत्र आले आणि तिथेच सगळी गोम आहे. थोडक्यात स्वतःला "पुरोगामी" समजत राहून चुकीचे विचार मांडत राहणे आणि मला चुकीची मतं मांडत राहू द्या असं विचारस्वातंत्र्याच्या नावाखाली बोंबलत राहणे हे "Pseudo" लोकांचे मुख्य लक्षण आहे. ज्याला खरंच समाज आणि त्याचे नियम धुडकावून लावायचे आहेत तो / ती स्वतःला कुठली विशेषणं लावत नाही आणि कोण आपल्याला पुरोगामी म्हणेल की नाही याची पण फिकीर करत नाही. मी आधी उल्लेखलेल्या जमातींमध्ये Pseudo जमात स्वतःचे विचार चूक की बरोबर याची पर्व करत नाही, पण कोण आपल्याला Pseudo म्हणतंय आणि कोण पुरोगामी याची पर्वा मात्र उदंड करते. चित भी मेरी और पट भी! या असल्या अजय देवगण छाप लोकांना (पहा: hero honda भी मेरी और suzuki भी - फूल और कांटे) Pseudo म्हणणं ही वैयक्तिक टीका होणार नाही, पण त्यांच्या विचारांना विचारांनी किंवा कृतीने योग्य / अयोग्य पटवून देणं हे पण चूक होणार नाही.
काँटेक्स्ट
माझ्या मते तुमचा थोडा गोंधळ होतोय. लेखाचा टोन असा आहे की "स्युडो" असे म्हणून विरोधकांची मते धुडकावून लावण्यापेक्षा त्यांच्या मतामध्ये काय चूक आहे याला अधिक महत्त्व द्यायला हवे. तुम्हाला बहुतेक काँटेक्स्ट कळला नसावा, पण चर्चांमध्ये, आणि मुख्यतः आंतरजालीय चर्चांमध्ये, विरोधीपक्षाच्या वादाशी असंबंधित 'त्रुटींना'/विसंगतींना टारगेट करून चर्चेला तिसरेकडेच नेण्याचे प्रयत्न अनेकदा होतात. त्यातीलच 'स्युडो' लेबल लावणे हा एक प्रकार.
एक नेहमी दिसणारे उदाहरण देतो, मराठी संस्थळांवर हिंदूंच्या अंधश्रद्धावर टिका केली की लगेच तुम्ही मुसलमानांना/ख्रिश्चनांना नाही विरोध करणार असे म्हणून लगेच स्युडोसेक्युलरचा शिक्का मारण्यात येतो.
ओके!
तुमचं बरोबर आहे… पण केवळ कुणी तुमच्याशी नीट वाद न घालता तुम्हाला "Pseudo" लेबल लावतोय म्हणून तुम्ही स्वतःला "पुरोगामी" म्हणवून घ्याल का? एवढेच मला म्हणायचे आहे. आधी सांगितल्याप्रमाणे, लेख चुकला नसेल (आणि मला context कळला नसेल), पण शब्दप्रयोग चुकलाय (माझ्या मते!).
स्वतःला इतरांकडून Pseudo लेबल लागणे, ही स्वतःच्या पुरोगामी असण्याची परीक्षा होऊ शकत नाही.
… हवं तर त्या माणसाला दुटप्पी
… हवं तर त्या माणसाला दुटप्पी म्हणा दुतोंडी म्हणा पण तरीही तो विचारांचा प्रतिवाद नाहिच्चे! त्या व्यक्तीच्या विचारांचा प्रतिवाद हा विचारांनी करण्याची धमक नसलेले विचारषंढ लोक मग त्या व्यक्तीलाच झाडून टाकायला हा 'स्युडोमार्ग' अवलंबतात. व्यक्तीलाच झाडून टाकलं की विचारांचा प्रश्नच येत नाही, ना रहेगा बांस...
माझ्यामते कोणताही समाज पुढे यायला परंपरा नावाच्या चिखलाला दूर सारणारी पुरोगामी मंडळी अत्यावश्यक असतात. पुरोगाम्यांचे (मग ते वैयक्तिक जीवनात तसे वागु शकत असोत वा नसोत ते इथे गैरलागू आहे) किंबहुना पुरोगामी विचारांचे कोणत्याही प्रगती इच्छिणार्या समाजात अनन्यसाधारण महत्त्व आहे.…
हवं तर त्या माणसाला दुटप्पी
हवं तर त्या माणसाला दुटप्पी म्हणा दुतोंडी म्हणा पण तरीही तो विचारांचा प्रतिवाद नाहिच्चे! त्या व्यक्तीच्या विचारांचा प्रतिवाद हा विचारांनी करण्याची धमक नसलेले विचारषंढ लोक मग त्या व्यक्तीलाच झाडून टाकायला हा 'स्युडोमार्ग' अवलंबतात. व्यक्तीलाच झाडून टाकलं की विचारांचा प्रश्नच येत नाही, ना रहेगा बांस...
माझ्यामते कोणताही समाज पुढे यायला परंपरा नावाच्या चिखलाला दूर सारणारी पुरोगामी मंडळी अत्यावश्यक असतात. पुरोगाम्यांचे (मग ते वैयक्तिक जीवनात तसे वागु शकत असोत वा नसोत ते इथे गैरलागू आहे) किंबहुना पुरोगामी विचारांचे कोणत्याही प्रगती इच्छिणार्या समाजात अनन्यसाधारण महत्त्व आहे.…
इथे एक बेशिक अंतर्विरोध जाणवतो आहे.
कोणी कसेही वागले तरी त्याचे विचार त्या निकषावर जोखू नयेत असा धाग्यातला सूर आहे. काही अंशी तो ग्राह्य मानायला हरकत नाही. पण 'लिबरल विचारांचे समाजात महत्त्व आहे' याचाच अर्थ ते विचार व्हॅक्यूममध्ये नसतात. कुठलाही विचार समाजात कसा पसरतो ते पाहणे महत्त्वाचे आहे. समाज थोडा तरी बदलावा अशी तळमळ असेल तर त्याला कृतीची जोड देणे अवश्य आहे नाहीतर समाज त्या विचाराकडे लक्ष का देईल? निव्वळ थेरी वाचून त्याप्रमाणे बदल करण्यातले इन्सेंटिव्ह काय आहे ते स्पष्ट होत नाही. ते कृतीतून स्पष्ट झाल्याखेरीज त्यातले जे कै असेल ते इन्सेंटिव्ह स्पष्ट होत नाही म्हणून समाजाचा बदलाला विरोध असतो.
या लिबरलांची डिमांड आहे की समाजाने आमच्या विचारांचा सप्लाय ग्रहण केला पाहिजे. पण तुमचे विचार हा एकमेव प्रॉडक्ट समाजाने विनातक्रार का स्वीकारावा याबद्दल स्पष्टीकरण दिले जात नाही. स्वतःच्या प्रॉडक्टला कस्टमर फ्रेंडलि बनवण्यासाठी काही संस्कार केले पाहिजेत हे पचनी न पडणे आणि त्याचवेळेस समाजाने आमचा प्रॉडक्ट स्वीकारण्यातच त्याचे भले आहे असा आग्रह धरणे हे म्युच्युअली सुसंगत आजिबात नाही.
आयव्हरी टॉवरात राहण्यात इंट्रेस नसेल तर समाजाच्या कलाने थोडे घेऊन आचरण केले पाहिजे तरच समाज त्या विचारांना बरावाईट प्रतिसाद देईल, अन्यथा अनुल्लेखाने मारेल. अन याचे जबाबदार ते विचारवंतच असतील. शेवटी प्रॉडक्ट विकला गेला पाहिजे अशी इच्छा तर आहे पण तो विकण्यायोग्य बनवायची तयारी नाही हे बरोबर वाटते का? असेल तर प्रश्नच मिटला.
समाजाला सुधारू पाहणार्यांनी समाजाला तो आपल्याप्रमाणे वागत नाही म्हणून निव्वळ मूर्खात काढणे यातच समाधान मानले तर त्यातून कोणाचेच हित होत नाही. नव्या विचारांना मोकळेपणाने न पाहणे हा जसा समाजाचा दोष आहे तसाच फक्त विचारांपुरते मर्यादित राहून प्रत्यक्ष आचरणाची काळजी न करणे हाही विचारवंतांचा दोषच आहे. शेवटी बहुधा मार्क्स म्हणतो तेच खरे आहे - जगाचे निरीक्षण करून त्याचा अन्वयार्थ बर्याच जणांनी लावला आहे. पण ते बदलणे हा मेन मुद्दा आहे.
लेखकाने लोक Pseudo लेबल
लेखकाने लोक Pseudo लेबल लावतात अशी complaint करून डायरेक्ट पुरोगामित्वाचा सूर लावला, तसेच त्या परिच्छेदाच्या पुढील सगळा भाग म्हणजे "फक्त पुरोगामी लोकच लेबलिंग चे बळी ठरतात" यावर टिप्पणी करणारा वाटला. आणि माझ्या मते या एका शब्दाने सगळा लिखाणाचा आशय पालटला. म्हणून मी पहिल्यांदाच विचारलं की पुरोगामी, उदारमतवादी कि बंडखोर नक्की कुणाबद्दल लिहिताय?
तुम्हाला तसे वाटत नसल्यास मी काही करू शकत नाही, आणि चर्चा भरकटवणे हा माझा हेतू नसल्याने मी इथेच थांबणं पसंत करतो.
गैरसमज
तुमचा बहुतेक गैरसमज झालेला दिसतो. विचारांना विरोध करा असे म्हणताना लेखक पुरोगामित्वाचे उदाहरण घेतो आहे असे मला वाटते. लेखकाने पुरोगामित्व म्हणजे त्याला काय वाटते हे ही लेखात संक्षिप्तपणे लिहलेले आहे. हे सर्व पाहता, तुम्ही काढलेला अर्थ गैरसमज किंवा नजरचुक असावी असे मला वाटते. अर्थात, लेखकाचे काय म्हणणे आहे हे तो स्वतः येऊन सांगेलच.
तुम्हाला तसे वाटत नसल्यास मी काही करू शकत नाही,
चर्चेचा उद्देशच मतमतांतराची देवाणघेवाण असते. मी फक्त मला काय वाटते हे लिहले नसून मला तसे का वाटते हे ही लिहले आहे. असो. या अवांतराला थांबवण्याबद्दल सहमती.
हुतात्मे कोणाला म्हणावं?
लेबलिंगमुळे बळी पडतात म्हणावेत असे पुरोगामीच असतात. बंडखोर लोकांमुळेच विचारांना नवीन दिशा मिळते म्हणून त्यांना मोडीत काढू नये; त्यांच्यातले पुरोगामी नसलेले बळी पडल्याबद्दल कितपत खेद करावा?
कोणाला पुरोगामी म्हणावं, कोणाला बंडखोरीसाठी बंडखोरी करणारे म्हणावं हा प्रश्न आहेच. पण विचारांकडे विचार म्हणून पहावं, त्यातलं घेण्यासारखं घ्यावं यात पुरोगामी का फक्त बंडखोर असा विचार करून काय साधतं? त्यातही आज ज्यांना बंडखोरीसाठी बंडखोरी करणारे समजले जातात ते उद्याचे अँडी वॉरहॉल असू शकतात. बंडखोरांना तसंही लेबलांनी फरक पडू नये, पडत नाही. पण मग कडवट लेबलांनी आपला काय उन्नयन होतं?
मुळात, तुमच्या लेखात
मुळात, तुमच्या लेखात "पुरोगामी" हा शब्दप्रयोग चुकलाय असे माझे मत आहे.
असेलही किंवा नसेलही. तो लेखाचा मुख्य विषय नसल्याने त्यावर अधिक काही लिहिले नाही.
केवळ समाजाचे नियम धुडकावून लावल्याने किंवा इतरांची फिकीर न करता स्वतःला हवे तसे वागल्याने कुणी "पुरोगामी" होतं असं मला वाटत नाही.
सहमत आहेच.
इतरांशी प्रामाणिक रहाच असे म्हणणे नाही, पण बोले तैसा चाले हे मान्य नसेल तरी स्वतःशी प्रामाणिक राहणे शक्य आहे का?
माझा मुद्दा हाच आहे की व्यक्तीला काही कारणाने (बेस्ट नोन टु द्याट पर्सन, डिस्क्लोस्ड ऑर नॉट) [किंवा प्रसंगी कारणाशिवाय] स्वतःच्या विचारांशी प्रामाणिक रहाणे शक्य नसेल तरीही त्याचे विचार हे "ग्राह्य" आहेत. ते योग्य असतीलच/वाटतीलच असे नाही पण त्याला ती व्यक्ती तशी वागु शकली नाही / प्रसंगी अगदी उलट वागली, निव्वळ या कारणाने दुर्लक्षित करणे मला गैर वाटते.
थोडक्यात स्वतःला "पुरोगामी" समजत राहून चुकीचे विचार मांडत राहणे आणि मला चुकीची मतं मांडत राहू द्या असं विचारस्वातंत्र्याच्या नावाखाली बोंबलत राहणे हे "Pseudo" लोकांचे मुख्य लक्षण आहे.
मते चुकीची आहेत की नाही हा सापेक्ष मुद्दा झाला.
माझ्या मते "स्वतःला "पुरोगामी" समजत राहून (किंवा न समजताही)(चुकीचे/बरोबर कसेही) विचार मांडत राहणे आणि मला (चुकीची अथवा बरोबर) मतं मांडत राहू द्या असं विचारस्वातंत्र्याच्या नावाखाली सतत सांगणे हे आवश्यक आहे नी प्रत्येकाला आपले मत विधायक पद्धतीने मांडु देणे ही समाजाची जबाबदारी आहे.
मी आधी उल्लेखलेल्या जमातींमध्ये Pseudo जमात स्वतःचे विचार चूक की बरोबर याची पर्व करत नाही, पण कोण आपल्याला Pseudo म्हणतंय आणि कोण पुरोगामी याची पर्वा मात्र उदंड करते.
तसे नाहिये. तुमचे म्हणणे ऐकून न घेता, प्रतिवाद न करता समजा मी तुम्हाला सतत म्हटले "'मूळापासून' हे काहीही बरळत असतात, त्यांचा नी सत्य परिस्थितीचा काहीही संबंध नाही, विचारजंत कुठचे!" तर तुम्ही त्याची पर्वा कराल का?
कदाचित होय कदाचित नाही. हे सतत होउ लागल्यावर अशी एक वेळ येईल की तुम्ही म्हणाल "जाऊ दे सतत अपमान करून घेण्यापेक्षा न बोललेलेच बरे किंवा एकवेळ अपमान झाला तरी हरकत नाही पण विचाराचे खंडन तर करा!" तरीही निव्वळ तुमची हेटाळणी/कुचेष्टा/व्यक्तीगत चिखलफेक होत राहिली तर शेवाटी तुम्ही संवाद थांबवाल
इथे तुम्ही लोक काय म्हणताय याची पर्वा करताय का तर नाही! मात्र लोकांनी किमान मांडलेल्या मुद्द्यांवर बोलावे अशी अपेक्षा व्यक्त करताय ही अपेक्षाही जास्त आहे का?
या असल्या अजय देवगण छाप लोकांना (पहा: hero honda भी मेरी और suzuki भी - फूल और कांटे) Pseudo म्हणणं ही वैयक्तिक टीका होणार नाही,
असहमत
पण त्यांच्या विचारांना विचारांनी किंवा कृतीने योग्य / अयोग्य पटवून देणं हे पण चूक होणार नाही.
अतिशय सहमत, विचारांना विचारांनी किंवा कृतीने पटवून देण्यावर काहीच आक्षेप नाही.
लेखाचा गाभा पटला. मला वाटतं
लेखाचा गाभा पटला. मला वाटतं लिबरल या शब्दाभोवती अकारण चर्चा घुटमळते आहे. स्यूडो हा शब्द सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणावर लिबरल या शब्दाच्या आधी वापरला जातो म्हणून असेल. पण लेखाचा उद्देश 'कृती आणि उक्ती यामध्ये किंचित फरक असला तरीही उक्तीचं महत्त्व कमी होत नाही' हे सांगण्याचा आहे.
-मी सिगरेट ओढतो, तरीही मुलाला सांगतो की सिगरेटची सवय वाईट, कधी ओढू नये.
-मी माफक दारू पितो, पण दारूच्या व्यसनाच्या आहारी जाणाऱ्या माझ्या मित्राला सांगतो, अरे दारू वाईट, सोडून दे.
-मी नास्तिक आहे, तरीही गणपतीची आरती, मंत्रपुष्पांजली, त्यानंतर वाटला जाणारा तीर्थ-प्रसाद वगैरे गोष्टी मला आवडतात.
-प्रत्येक रुढी-परंपरा स्वातंत्र्य-समता-बंधुता-उपयुक्तता आदी मूल्यांवर तपासून घ्याव्यात असा माझा आग्रह असतो, प्रयत्न असतो. तरीही लग्नाच्या वेळी वधूवरांच्या डोक्यावर अक्षता टाकाव्यात ही परंपरा मी सवय म्हणून पाळतो.
आता वरीलपैकी कुठचेही विचार मी मांडले तर केवळ कोणालातरी वाटणाऱ्या विसंगती माझ्या वागण्यात आहेत म्हणून माझा युक्तिवादच निरर्थक ठरतो का? अर्थातच नाही. सिगरेट-दारूबाबत तर मला असलेले अनुभव ही जमेची बाजू ठरते.
किशोरी आमोणकरांच्या गाण्याविषयी बोलताना लोक अनेकवेळा 'गायिका म्हणून थोर आहे, पण त्या किती फटकळ आहेत माहित्ये का? त्यांना साथ करणारांशीसुद्धा खडूसपणे वागतात.' वगैरे बोलणी ऐकू येत. म्हणजे एखाद्या कलाकाराचा कलात्मक आविष्कार आणि व्यक्ती म्हणून वागणुक या दोन गोष्टींची सरमिसळ होत असे - होताना दिसते. तसंच व्यक्ती आणि विचार वेगळे काढणंही लोकांना कठीण जातं. त्यामुळे 'मग तुम्ही एवढं ब्रह्मज्ञान सांगता, पण तुम्ही का वागता असे?' असा प्रश्न निर्माण होतो.
अर्थात एका मर्यादेपर्यंत हा प्रश्न विचारणं बरोबर आहे. कारण जगात फसवणूक करणारे लोकही असतात, आपला बाब्या दुसऱ्याचा कार्टा करणारे लोक असतात. मात्र अशी फसवणूकच करण्याचा हेतू आहे हे गृहितक असू नये. अगदी फुटकळ विसंगतीसाठी 'तू स्यूडो, तुझा युक्तिवाद निरर्थक' हे शस्त्र काढू नये.
लिबरलोंको गुस्सा कब आता है?
लिबरलोंको गुस्सा कब आता है? फ्लोचार्ट एक्ष्प्लेन्ड.
http://my.fakingnews.firstpost.com/2014/08/27/outrage-flowchart-for-ind…
तारा सचदेवच्या केसमध्ये याचे प्रत्यंतर आलेलेच आहे. मज्जा आहे खरीच.
विचार हेही एक 'करणेच'!
आजच्या महाराष्ट्रापुढचे मूलभूत प्रश्न बघता पुरोगामी विचारांना- ओके, नो मोर जोक्स.
हा प्रश्न मांडल्याबद्दल ऋषिकेश सायबांचं अभिनंदन. आमच्या मित्रमंडळीतही अशी घमासान वैचारिक वगैरे चर्चा अनेकदा झाली आहे. काश्मीर वगैरे काहीतरी चालू होतं बरेच जण बरेच विचार मांडत होते.
अचानक एक जण पेटला. "तुम्ही प्रत्यक्ष काश्मीरी लोकांसाठी काही करताय का? नाही ना? मग असले वांझोटे विचार व्यर्थ आहेत. शब्दांना कृतीची जोड हवीच" हा त्याच्या पेटण्यामागचा मुख्या मुद्दा.
बरेचदा पटेल असा. पण अजून एक गोष्ट मोलाची आहे-
एखाद्या विषयाचे वेगवेगळे पैलू चर्चा/संवाद्/ ह्यातून कळत जातात. १० वर्षांपूर्वीचे माझे विचार आणि आत्ताचे विचार- ह्यातला बराचसा फरक ह्या अशा चर्चांमुळे आहे- तेव्हा नुसते विचार मांडणं हे अजीबात फोल ठरत नाही.
पुरोगामी वगैरे शब्दांच्या जवळ जावं एवढी अजीबात लायकी नसल्याने त्याबद्दल काही बोलणार नाही. पण डोक्यातल्या गोंधळाला सॉर्ट आउट करण्याचं काम अशा चर्चा/वैचारिक गप्पा वगैरे करत असल्याने मला तरी त्याचा फायदाच झाला आहे.
मग केवळ विचार करणार्यांना स्यूडो- म्हटलं तरी हरकत नसावी. कुणीही कुणालाही स्यूडो-{आपापली नावडती क्यॅटेगरी इथे भरा} असं म्हणून झटकून टाकलं तर त्या माणसाशी कुठल्याही वैचारिक देवाणघेवाणीची शक्यता संपते.
या स्वयंघोषित
पुरोगाम्यांचे नुस्ते विचार समाजाने नुस्तेच ऐकून सोडून दिले तर चालेल का? समाजाकडून नक्की कसली अपेक्षा आहे? आचाराची अपेक्षा आहे का? जर असेल तर आचाराचा थोडाही इन्पुट नस्ताना 'एक्स निहिलो' आचार समाजाने उत्पन्न करावा ही अपेक्षा पर्पेच्युअल मोषन मषीन इतकीच हास्यास्पद आहे.
हां आता समाजाकडून आचाराची जराही अपेक्षा नसेल तर ठीकच आहे. शेवटी नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे! अनेक मतप्रवाह असेच आले आणि गेले. हेही दिवस जातील! आपल्या हस्तिदंती मनोर्यांतून जन्तेकडे तुच्छतेने पाहण्याशिवाय अन्य काही करू न शकणारे स्वनामधन्य इन्ब्रीडिंग स्वयंघोषित विचारवंत नामशेष होतीलच - अन तेही स्वतःच्या कर्माने! तेव्हा चाल्लंय चालूद्या. खुद के मौत का अट्टाहास अगर किसीको करना है तो हम आडे नही आयेंगे. शेवटी वो तो उनका हक है!
मत मांडताच समाजाने आचरण करावे
मत मांडताच समाजाने आचरण करावे असा अट्टाअहास का? मत योग्यच असेल कशावरून? त्यात भयंकर तृटि असु शकतात, विचार प्रत्यक्षात आणण्यात काही बाधा असु शकतात. कोणीही म्हणजे अगदी कोणीही मत मांडले म्हणजे लगेच समाजाने तसे आचरण करावे अशी अपेक्षा का धरावी?
समाजाकडून मत मांडू देण्याची आणि त्या मतावर चर्चा करत गरज वाटल्यास/पटल्यास आपल्या कृतीत आवश्यक ते बदल करण्या/न करण्याची अपेक्षा आहे. त्या व्यक्तीला राईट ऑफ केल्याने समाज ही संधी गमावतो!
हां मग ठीकच आहे. असे वांझोटे
हां मग ठीकच आहे. असे वांझोटे विचार स्वतःच्या कर्मानेच मरतील. :)
बाकी, जर काही न करता पुणे महानगरपालिकेतल्या उंदीरमार्यास अमेरिकेची आर्थिक घडी बसवण्याबद्दल मत मांडायचा अधिकार पाहिजे असेल तर त्याला राईट ऑफ करण्याचा अधिकार समाजालासुद्धा पाहिजे. पण तुमच्या अर्ग्युमेंटात एकाच बाजूच्या अधिकाराचे रेकग्निशन दिसते, दुसर्या बाजूच्या अधिकाराचे का नाही?
मात्र ते मत उंदीरमाराचे आहे
मात्र ते मत उंदीरमाराचे आहे म्हणून ते चुकीचे आहे हा युक्तिवाद पुरेसा नाही व अनारोग्यपुर्ण आहे इतकेच माझे मत आहे.
हा युक्तिवाद इन्ट्रिन्सिकली अनारोग्यपूर्ण आजिबात नाही. तुमचा दावा म्हणजे सर्वच गोष्टींच्या लोकशाहीकरणाच्या अतिरेकाची परिणती आहे, आणि हा अतिरेक सध्या फ्याषनेबल आहे इतकेच.
धिस इज गोईंग टु बी
धिस इज गोईंग टु बी इंट्रेस्टिंग (बीकॉज इट विल डेफिनेट्ली स्टिंग अ लॉट ऑफ पीपल)... ;)
'आर या पार' टाईपचे पुरोगामी आणि प्रतिगामी या दोघांचाही समाजाला सारखाच धोका आहे. पुरोगामी आणि तरीही मध्यममार्गी विचार करणारे लोकच समाजाला पुढे घेऊन जाऊ शकतात. परंपरा हा जरी अगदी चिखल वगैरे नसला तरी आजकाल लोकांना एखाद्या नव्या गोष्टीमधला कन्व्हीनियन्स पटला की लोकं ती गोष्ट स्वीकारायला तयार होतात. पण त्या अंगाने / कलाने विचारांची मांडणी झाली पाहिजे. नुसतीच वैचारिक जाळपोळ काय कामाची?