Skip to main content

आगामी कार्यक्रम/उत्स्फूर्त कट्टे - कोणकोण येतंय? - १

ऐसीचे कट्टे हा एक धमाल अनुभव असतो हे आत्तापर्यंत झालेल्या दोन मोठ्या कट्ट्यांमध्ये भाग घेतलेल्यांना आणि वृत्तांत वाचलेल्यांना समजलं असेलच. पण दरवेळी ऐसीवरची मित्रमंडळी भेटतात तेव्हा तो जाहीर केलेला कट्टा असतोच असं नाही. कारण बऱ्याच वेळा कट्टा भरवणं, एकत्र भेटणं वगैरे ठरवायला चिकार वेळ लागतो. आणि दरवेळी पंधरा वीस लोक जमवणं शक्यही नसतं. कधीकधी चार टाळकी एकत्र जमली तरी मैफल जमू शकते. असे उत्स्फूर्त, इंप्रॉम्प्च्यू कट्टे अधिक वारंवार व्हावेत यासाठी हा धागा.

काही वेळा आपल्याला एखाद्या सिनेमाला, नाटकाला, भाषणाला जायची इच्छा असते. काही वेळा ऐसीवरचेच काही लोक एखादा कार्यक्रम सादर करणार असतील. आपल्या बरोबर कोणी जाणार असेल तर उत्तमच, नाहीतर आपला कार्यक्रम ठरलेला असतो. अशा वेळी 'मी/आम्ही अमुक अमुक कार्यक्रमाला जात आहोत' असं जाहीर आमंत्रण द्यायचं असेल तर या धाग्यावर टाका. ज्या काही लोकांना जमायचं असेल ते धाग्यावर जाहीर करून येतील - एकमेकांशी व्यनिसंपर्क करतील अशी अपेक्षा आहे. जमल्यास कार्यक्रम कसा झाला याबद्दल चार शब्द जर त्यांपैकी कोणी नंतर लिहिले तर ज्यांना यायला जमलं नाही त्यांनाही जळवण्याची संधी साधता येईल.

या धाग्यावरच्या प्रतिसादांत कार्यक्रम जाहीर करणारांनी खालील माहिती पुरवावी.
कार्यक्रम -
अपेक्षित शुल्क -
स्थळ -
तारीख व वेळ -
कुठे भेटायचं -

या प्रकारच्या धाग्यांवर १००हून अधिक प्रतिसाद झाले की नवीन धागा तयार करता येईल.

Taxonomy upgrade extras

चिंतातुर जंतू Fri, 16/01/2015 - 16:39

पुण्याच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातले काही चित्रपट मुंबईकरांना यशवंत फिल्म फेस्टिव्हलमध्ये पाहायला मिळतील. १७ जानेवारीला संध्याकाळी महोत्सवाचं उद्घाटन आहे. महोत्सव १७-२३ जानेवारी आहे. अधिक माहिती इथे मिळेल.

चिंतातुर जंतू Sat, 24/01/2015 - 14:39

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात तीन दिवस नाटककार सतीश आळेकरांविषयी चर्चासत्र आयिजित करण्यात आलं आहे.
स्थळ : नामदेव सभागृह, मराठी विभाग.
दिवस : २९, ३०, ३१ जानेवारी.
उद्घाटन व बीजभाषण हस्ते अरुण खोपकर - २९ जानेवारी स. १० - ११:३०
अधिक माहिती

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 03/02/2015 - 18:12

'ऐसी' सदस्य भडकमकर मास्तरांकडून आलेला निरोप -

'शोभायात्रा' या नाटकाचा त्यांचा शो रविवारी, ८ फेब्रुवारीला पुण्यात टिळक स्मारक मंदिरात असणार आहे. तिकीटांसाठी 9822518081 या नंबरावर संपर्क साधणे.

चिंतातुर जंतू Tue, 03/02/2015 - 18:54

'द पेंटिंग' हा फ्रेंच अ‍ॅनिमेशनपट
स्थळ : फिल्म इन्स्टिट्यूट, पुणे.
वेळ : ५ फेब्रुवारी ६:३० वा., ७ फेब्रुवारी ७ वा.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला. तिकीट नाही.
अधिक माहिती इथे मिळेल.

चिंतातुर जंतू Thu, 12/02/2015 - 15:53

गिरीश संत स्मृती व्याख्यान
वक्त्या : सुचेता दलाल
विषय : Accountable Regulators: A Key Requirement for Good Governance & Consumer Protection
वेळ : शनिवार १४ फेब्रुवारी सं. ६:१५ वाजता
स्थळ : 'पर्सिस्टंट सिस्टिम्स'चे देवांग मेहता सभागृह, 'भगीरथ' इमारत, सेनापती बापट रस्ता, पुणे.

अधिक माहिती

अनु राव Thu, 12/02/2015 - 18:46

In reply to by चिंतातुर जंतू

Accountable Regulators: A Key Requirement for Good Governance & Consumer Protection

इतकी बेसिक गोष्ट कोणी सांगायची गरज आहे? आणि आधीच्या आणि आत्ताच्या सत्ताधीशांना ती कळत नाही असे वाटतय?

गब्बर सिंग Mon, 23/02/2015 - 04:29

In reply to by अनु राव

Accountable Regulators: A Key Requirement for Good Governance & Consumer Protection

आणि आधीच्या आणि आत्ताच्या सत्ताधीशांना ती कळत नाही असे वाटतय?

तुम्ही मस्त शब्द वापरलात हो ->> सत्ताधीश.

अनार्किस्ट असल्याचा दावा करणार्‍यांना तरी हे समजणे गरजेचे नाही का ??? (केजरीवाल हे अनार्किस्ट आहेत असे ते म्हणतात. मी म्हणत नाही.)

अनार्किस्ट चा शब्दशः अर्थ "अशी व्यक्ती की जी सत्ताधीशांचा अभाव असलेल्या व्यवस्थेचे समर्थन करते ती". अनार्की चा समर्थक.

( Literally, “anarchy” means “without an archon.” Archons were leaders of ancient Greek city-states. )

-------

आजच केनेथ अ‍ॅरो यांचा एक जुना क्वोट वाचनात आला.

Whatever the source of the concept, the notion that through the workings of an entire system, effects may be very different from, and even opposed to, intentions is surely the most important intellectual contribution that .....

(पुढचा भाग महत्वाचा नाही.)

या क्वोट चा इथे संबंध काय असा प्रश्न उपस्थित होईलच.

चिंतातुर जंतू Sat, 21/02/2015 - 16:27

गिरिश कार्नाड यांचे व्याख्यान
विषय : आधुनिक भारतीय संस्कृती
ठिकाण : गरवारे महाविद्यालय सभागृह, पुणे
वेळ : रविवार २२ फेब्रु. सं. ६ वा.
(व्याख्यान सर्वांसाठी खुले आहे; प्रवेशमूल्य नाही.)

बहुभाषिक विनोद दोशी नाट्यमहोत्सव
ठिकाण : बालगंधर्व रंगमंदिर, पुणे
वेळ : सोमवार २३ - शुक्रवार २७ फेब्रुवारी (विविध वेळी)
अधिक माहिती

राजेश घासकडवी Mon, 23/02/2015 - 18:21

भूषण माटे यांचे फोटोग्राफीचे प्रदर्शन

ठिकाण : दर्पण आर्ट गॅलरी, पत्रकार नगराजवळ, पुणे
वेळ : २५ फेब्रुवारी सकाळी ११ ते मार्च १ संध्याकाळी ८.