पब, बायका, भारतीय संस्कृती... (अरुण जोशी काय म्हणतात?)
(व्यवस्थापन - एका बातमीच्या निमित्ताने चालू झालेली चर्चा भारतीय संस्कृतीविषयीच्या अरुण जोशींच्या काही विधानांमुळे वाढली. त्यामुळे वेगळा धागा काढला आहे.)
बायकांनी पबमध्ये जाऊ नये: गोव्याचे मंत्री
आता बोला!!...
अतिअवांतरः पबमध्ये मेम्बर्सना
अतिअवांतरः
पबमध्ये मेम्बर्सना फी किती असते?
कॉलेज संपल्यावर नुकतीच नोकर्या लागल्याच्या काळात आम्ही काही डिस्को-पबना गेलो होतो तिथे कपल्सना व मेंबर्सना फ्री एंट्री असे. आम्ही मेंबर नसल्याने कोणत्याही परिचित मुलीसोबत एक-दोनदा 'कपल' म्हणून गेलो होतो तर एकदा पोचायला उशीर झाल्यामुळे सगळे आत गेले होते. मग मला बाहेर ताटकळलेले बघुन बाहेर माझ्यासारख्या समदु:खी मुलीने 'वॉना बी एन्ट्री -कपल?' असे विचारले, नी आम्ही 'एन्ट्री कपल' बनून आत गेलो होतो. तेव्हापासून या मेंबरशीपची फि किती असते असा प्रश्न आहे. तेव्हा विचारले नाही नी आता रुची बदलल्याने तेवढ्यासाठी पुण्यात पब शोधायचा कंटाळा.
वेगवेगळी फी असते, पबच्या
वेगवेगळी फी असते, पबच्या दर्जानुसार. १-२ वर्षांपूर्वी दिल्लीत उत्तम दर्जाच्या पबची कपल एंट्री फी ७५० रु असायची. म्हणजे तिथे बँड असतो (मला कै ते इंग्रजी गाणे कळत नाहीत, पण आमच्या शेजारची जोडी त्यांच्यावर बरीच सेंटी झालेली आढळायची.) प्रकाशव्यवस्था खूप छान असते. बसायची, नाचायची इ व्यवस्था पण छान असते. मोकळी जागा खूप असते. पिली तर दारूचे पैसे वेगळे द्यावे लागतात. सहसा अशा पबमधे गेल्यावर फालतू पबमधे जायचे मन करत नाही.
सहा महिन्याखाली पबमधे जायची सवय रिवाइव करण्यासाठी मी एक स्किम घेतली होती, वर्षाला ५००० रु, १२ आमंत्रणे (प्लस कुठेतरी वाह्यात जागी वाह्यात सिझनमधे हजार नियम घालून पर्यटनाचे हॉटेल, इ). मी फॅमिलीवाल्यांची स्किम मागीतली म्हणून तिथे कोणीही सिग्रेट पीत नसे. कारण खूप लहान मुले येत. पण तिथे प्रचंड गर्दी, ३ करोड डेसिबलचा आवाज, आणि एक २-३ मिनिटांचे मेन आकर्षण (म्हणजे युक्रेनियन मॉडेलने परीचा ड्रेस घालून नाचणे) पाहता देखिल न येणे, असा प्रकार असे. ज्यांना थिरकायला आवडते त्यांच्यासाठी असल्या स्किम्स फस्क्लास आहेत. पण ज्यांना शांतपणे इतरांना थिरकताना पाहताना आवडते त्यांच्यासाठी बकवास.
एकूणात भारतात पबचा अनुभव एक तर ( या एक आणि तर मधे गॅप असतो का?) महाग वा भिकार असतो. (अर्थातच म्हणूनच मंत्र्यांनी आपल्या माताभगिनींचे पैसे वाचवण्यासाठी संस्कृतीचा दाखला देऊन पबमधे जाणे कसे अयोग्य आहे ते सांगीतले आहे, नै का?)
डिपेन्ड्स काही पब्समध्ये
डिपेन्ड्स
काही पब्समध्ये कपलना फ्री एन्ट्री होती. मात्र आत सगळे - अगदी पाणीही - विकत घ्यावे लागे.
तर काहि ठिकाणी कवर चार्जेस इन्क्लुड करून ५०० ते ६०० एंट्री फि आठवतेय.
तेव्हा ती खूप वाटे. त्यामनाने ७५० काळाचा हिशोब करता स्वस्ताई झाली ;)
किंवा दिल्लीत पुरवठा जास्त असल्याने दर कमी असल्यास माहिती नाही.
काहि संकेतस्थळांवर केवळ
काहि संकेतस्थळांवर केवळ त्याची /तिची मत पटत नाहीत म्हणून 'विचारजंत ' अशे शेलके नाव देऊन त्यांना झोडपले जायचे प्रकार बख्खळ पाहिले होते . त्या हल्ल्यांना वैयक्तिक शेरेबाजीची फोडणी असायचीच . ऐसी अक्षरे याला अपवाद आहे असे माझे मत होते (आहे?). पण हि चर्चा वाचून इथे पण हा प्रकार सुरु होतो कि काय असे वाटायला लागते . वैचारिक प्रतिवाद ठीक आहे पण एवढी वैयक्तिक शेरेबाजी? एकूणच 'टोळीने' शिकार करण्याची प्रथा इथे पण पडू नये हि अपेक्षा
पबमधे मी पूर्वापार जात असतो.
In reply to पब? by सुनील
पबमधे मी पूर्वापार जात असतो. प्रतिक्रिया वाचून मेंबरशीप रद्द करण्याची इच्छा झाली आहे.