सो बॅड द्याट इट्स गुड

सो बॅड द्याट इट्स गुड वाले चित्रपट इंग्रजीत बरेच आहेत. त्यांचे व्यवस्थित रसग्रहण (करणारे करोत बापडे) सुद्धा होते.
mystery science theater 3000 सारखे लोकप्रिय कार्यक्रम हे त्याचे उदाहरण.
ह्या प्रकाराचं हिंदीत त्या मानाने जवळपास शून्य अस्तित्व आहे. साजीद खान एक "केहने मे क्या हर्ज है " नावाच्या कार्यक्रमात असे हॅम सीन्स दाखवत असे.
त्यानंतर यूट्यूब वर असलेले MBC (Mind Blasting Cinema Reviews) हा आणखी एक ठळक अपवाद. पण ते देखील हल्लीच १-२ वर्षांत नवे आले आहेत.

अशा नमुन्यांसाठी साधारण निकष -
१. तद्दन फालतू अभिनय.
२. भिकार चित्रपट आणि ढोबळ चुका.
३. चुकीच्या जागी आलेलं हसू, किंवा अगदीच हुकलेले सीन्स.

काही उ.दा.
८०च्या दशकातल्या मराठी चित्रपटांतील नृत्य आणि त्यातील भयाकारी पदन्यास.
हृदयी वसंत फुलताना / ही दुनिया मायाजाल हे "बनवाबनवी" मधल्या गाण्यातले नाच. ह्यातल्या काही काही स्टेप्स रक्त गोठवणार्या आहेत.

किंवा "मराठा बटालियन" हा संपूर्ण चित्रपट. गरजूंना इथे बघता येईल.
दीपक शिर्के पाकिस्तानी सैन्यप्रमुख, पाकिस्तानात जाउन बाईच्या वेशात जाउन गनिमी हल्ला चढवणारे लक्ष्या, विजय चव्हाण, सह्याद्रीच्या परिसराचं बनवलेलं काश्मीर एवढं सगळं सहन केलंत,
तर मग चित्रपटाचा प्रमुख हिरो तुम्हाला कदाचित झेपेलही.

तर असे आणखी चित्रपट असणारच, पण ते संकलीत केलेले कुठेही आढळले नाहियेत. ऐसीच्या वाचकांना विनंती की असे चित्रपट /दृश्ये/ नमुने ठाऊक असल्यास कृपया इथे सांगावेत! विशेषतः मराठीतील असतील तर बेष्टच.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

असा एक सरसरीत चित्रपट लगेचच आठवला. अमानुष - एक थरार. (हा यूट्यूबचा दुवा.) शिवाय हा थरारपट असल्यामुळे अस्वल यांच्या विशेष पसंतीस येईल अशी आशा आहे. आख्खा चित्रपट बघण्याची हिंमत नसेल तर निदान हे गाणं पहाच. हिरोने स्वतःच गायलेलं आहे.

बाकी आठवतील तसे प्रतिसाद लिहीता येतीलच. पण 'बनवाबनवी'मधल्या तिर-तिर-तिर-तिर नाचाबद्दल गविंनी मिसळपाववर लिहीलेलं आहे, अगदी नाचाची आकृती काढून, ती लिंक शोधा कोणीतरी. चटकन सापडली नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आभारी आहे. काय ते मिशितल्या मिशीत हसणं, चेहेर्यावरचे तुपट खेळकर भाव ... वा!
अस्वल असूनही अंगावर शहारे आले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अस्वलाचा साळींदर झाला काय? याला एक नवाच थरार समजता येईल. Wink

आणि हो, चित्रपटाचा उत्कंठावर्धक शेवट सगळ्यांनी, एकत्र बसून पहावा असा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हा माणूस प्रत्येक गोष्टीतच भारी आहे ब्वा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिर तिर तिर नाच वाला धागा इथे आहे, सोयीसाठी डकवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL भारीय तो तिर तिर तिर धागा! गवि दिसले नाही बरेच दिवस. कुठे गायबलेत?
बादवे लिंक देताना http:// न दिल्यास 'पान सापडले नाही' येते. वरच्या लिंकचेही तसेच झालेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे काका माहिती आहेत आम्हाला! निखळ करमणूक! चित्रपट "खूनी रात". तोही कमालीचा आहे.
ह्यापे़क्षा वाईट नाच मिळणे अशक्या आहे असे वाटत असतानाच त्यावर ताण म्हणजे हा नाच : साधारण ५० सेकंद जाउ द्या आणि मग मजा बघा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहाहा, गुलाबी चकचकीत शर्ट घालून झाडाभोवती पोल डान्स करण्याची धमकी देणारा नट भन्नाटच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

या गड्याला शोल्डर डान्स या नवीन नृत्यप्रकाराचा जनक म्हणावं लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा, वा, वा, आवडता विषय! 'सो बॅड द्याट इट्स गुड' ही 'शेजार्‍याचा ठणाणा करणारा रेडिओ आपल्यासाठीच लागला आहे' ह्या योगिक अवस्थेनंतरची पायरी. 'इफ यू कान्ट अ‍ॅव्हॉईड इट, देन इन्जॉय इट' ह्या भूमिकेचेच निराळे रूप!

'सावर रे' सारख्या प्रात:दवणीय सदरापासून "मी पुण्याहून मुंबईला आले आणि माझ्या डोक्यावरचं आभाळच बदलून गेलं" छापाचे फुलपाखरी ब्लॉग; 'जय संतोषी माँ', 'क्रांती' इ. पासून 'गुंडा'पर्यंतचे चित्रपट (अटेन्शनः बट्टमण); आचके देत असताना रेडिओवरचं गाणं ऐकून लेफ्ट-राईट करू लागलेला अशोक कुमार आणि राजेन्द्र कुमारच्या मुलाखतीला सॉक्रेटिसच्या धीरोदात्तपणे तोंड देणारा बर्ट्रान्ड रसेल; 'मोकलाया दाहि दिश्या'पासून ते गंध, नि:श्वास, रोमांच, चांदणे, हुरहुर यांत अडकलेल्या आंतरजालीय कवितांपर्यंत अनेक गोष्टी स्मृतिपटलावर मनोहर नर्तन करून गेल्या आणि किती वेळा अंमळ हळवा झालो, त्याची गणतीच नाही.

त्यातलीच ही काही मौक्तिके:

१. प्रेमासाठी झुकले खाली धरणीवर आकाश - चित्रपटः खिचडी (१९८५)
व्हिडिओ पुरेसा बोलका आहेच. तो दिसत नसेल तर किमान ऐकून तरी नक्की पहा.

२. ए बी सी डी इ एफ जी एच आय, जे के एल एम...

हे गाणं ऐकण्याऐवजी आवाज बंद करून त्यातले तुपाळ, faux-आनंदी भावाविष्कार पाहत रहा. काही वेळाने सलमान खानच्या 'अंडरप्ले' अभिनयाचे फ्यान व्हाल!

३. चांदी की सायकल, सोने की सीट

नितीन मुकेशचा गेंगाणा आवाज, जुहीकाकूंची ओव्हर-अ‍ॅक्टिंग, नव्वदीच्या दशकातले मारे स्वप्नाळू सेट्स आणि अनवट शब्दकळा असा अनुपम 'एकैकमप्यनर्थाय, किमु यत्र चतुष्टयम्' योग या गाण्यात जुळून आला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रवीण सावर रे दवण्यांचा उल्लेख झालाच आहे तर हा मधुमेही विडियोदेखील इथे नमूद करतो.
त्यांनी त्या हाताच्या लकबीचं पेटंट घ्यावं, अशी नम्र विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय तरी capacity आहे या माणसाची ... पण पूर्ण एकण काही मज बापडी ला जमले नाही Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तीनही व्हिडियो एकापेक्षा एक. पण खिचडीची जादू काही औरच... आकाश झुकलंय जमिनीवर, प्रेमासाठी... अहाहा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या गाण्याच्या धृपदाच्या अखेरीस त्या चित्रपटाबद्दल एक प्रांजळ कमेंट आहे.

"...वाय झेड!"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(१) नंदन अतीशय दूष्ट आहे.

<गंभीर मोड ऑन>
"प्रेमासाठी झुकले खाली" वर बसवलेले नृत्य इतके भद्दे वाटते, त्याचे कारण केवळ मुद्रांचा अतिरेक (ओव्हरअ‍ॅक्टिंग) नाही. अभिजात नृत्यपरंपरांमध्ये भाव चितारताना अतिरेकी टोकाच्या मुद्रा चेहर्‍यावर वापरतात. हातांच्या ठराविक मुद्रा, हातवारे, चक्कर वगैरे वापरतात. परंतु तो दोष वाटत नाही. "प्रेमासाठी" वर बसवलेला नाच आहे त्यातील सुट्या मुद्रा एकमेकांना डौलदारपणे जोडलेल्या नाहीत.
उदाहरणार्थ : वेळ २:३६-
अ."प्रेमासाठी" दोन्ही हात धप्पकन छातीच्या उजवीकडे आपटले
आ. "झुकले खाली" दोन्ही हात बाजूला, कमरेतून मध्येच खटक्यात वाकून-सरळ होऊन
इ. "धरणीवर" उजव्या हाताच्या तळव्याकडे बघत तळवा खाली-वर करणे
ई. "आकाश" उजवा हात वर उचलणे
-२.४१ -
अ. वरीलप्रमाणे
आ. वरीलप्रमाणे
इ'. उजवा हात फक्त खाली नेणे
ई'. डावा हात वर करणे
-२.४६-
मुद्रा एकमेकांना जोडलेल्या नाहीत. २:४५-२:५५ मध्ये पुरुषाच्या शेजारी एक स्त्री कथक पद्धतीचे नृत्य करते तेव्हा त्याचे ठिगळाठिगळाचे हातवारे, आणि तिचे एकसंध भासणारे नृत्य तोलता येते.
सारांश : ऑव्हरअ‍ॅक्टिंग नाही, तर भद्देपणा टोचतो.
<\गंभीर मोड ऑफ>

(२) नंदन अतीशय दूष्ट आहे.

(३) नंदन अतीशय दूष्ट आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इश्काकरिता झुकणारे आसमान आहे, छातीला हात लावणे आणि आसमानाकडे बोट दाखवणे आहे, ठिगळांप्रमाणे जुळवलेल्या मुद्रा आहेत, ओव्हरअ‍ॅक्टिंग आहे, पण तरी "प्रेमासाठी झुकले खाली"ची सर नाही. (गाणे/संगीत बरे आहे, त्यामुळे "सोब्याडिट्स्गुड"ला गालबोट लागते आहे का?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile धागा जमलेला आहे. मला वाटलेलं ईस्पायडरमॅन ईस्पायडरमॅन च्या वर काहीच नसावे, आता ते म्हणजे पाण्यात अंगठा बुडवल्यासारखं होतंय असं वाटते आहे. (आत्ता लिंक शोधून घेणे, मला हापीसातून इथे दिलेले व्हीडीओ पहाता येतायत पण यू ट्यूब शोधता नाही येत)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साजीदचा आणि माझा एकमेव आवडता हॅम अ‍ॅक्टर जोगिंदर ह्यांचा हा सिन पहाच, बोलायची गरजच नाही. -

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निव्वळ अफलातून.
रजनी कडे २, हातात मावतील अशी, लोह चुंबकं असतात. त्यानी तो लांबूनच मोठ्या मोठ्या गोष्टी उचलत असतो. आणि गुंडांची धुलाई वगैरे करत असतो.
सदाशिव आमरापूरकर मेन विलन. तो नेहेमी वराती ज्या प्रकारच्या गाड्यांमधून काढतात तसल्या गाडी मधून येतो. तुनळीवर शोधून लिंक देतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

सेट मॅक्स वगैरे च्यानलांवर दाकह्वल्या जाणार्‍या मद्राशी चित्रपटांची यादी लिहायला आख्ख्या ऐसीमधील जागा
पुरी पडणार नाही.
वरील प्रतिसाद मस्तच. नंदन सायबाच्या प्रतिसादातला अशोक कुमार ह्यांचा रेडिओ ऐकून बरे व्हायचा सीन
जागतिक पातळीवर सर्वोत्कृष्ट ठरावा. (अपवादः- "गुंडा" . तो ह्या आधिभौतिक जगाच्या पलिकडला आहे.)
आता त्याची यूट्यूब लिंक सापडत नाहिये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अशोक कुमार ह्यांचा रेडिओ ऐकून बरे व्हायचा सीन जागतिक पातळीवर सर्वोत्कृष्ट ठरावा.
..................ही घ्या ती चित्रफीत (तपशील : तो रेडिओ नसून टेप-रेकॉर्डर आहे) -

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यूट्यूबवर कन्नड अभिनेता राजकुमार याच्या एका गाण्याचा व्हिडीओ आहे. 'टिक टिक टिक टिक' किंवा 'इफ यू कम टुडे' नावाने सर्च करून बघा. गाणं इंग्रजी आणि गायलंय एस्पीबालसुब्रमण्यम यांनी, क्या कहने....

शिवाय आपल्याच अशोकरावांच्या 'अश्विनी ये ना' गाण्यातल्या डान्स स्टेप्स पहा. झीट आणण्याचा उत्तम उपाय...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे कसले भन्नाट व्हीडिओ टाकलेत सगळ्यांनी. हहपुवा झाली सकाळी सकाळी Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जबरीच!

माझे काही आवडते प्रकारः

- "अश्विनी ये ना" गाण्यातला अशोक सराफचा नाच (?!). विशेषतः एक हात जमिनीवर ठेवून त्यावर अंग तोलून गोल गोल फिरायची ष्टाईल.
- "हमने जीना सीख लिया" हा मिलिंद बोकिलांच्या शाळा कादंबरीवर आधारित चित्रपट (जबर्‍या आहे, नक्की पहा)
- होम मिनिस्टर - आदेशभाऊजी बांदेकर
- हॅलो मधुमालती आणि रेडिओवरचे तत्सम फोन-इन कार्यक्रम

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मुक्तपीठ!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

काही चित्रपट, कलाकारांचा उल्लेख केल्याशिवाय मनाला शांती लाभणार नाही.
१. मनोजकुमार आणि क्लर्क - वर उल्लेखलेला अति-करुण-तरीही-विनोदी सीन ज्या चित्रपटातील आहे तो. कुठुनही सुरुवात करा, २-३ मिनिटात एक तरी खतरनाक सीन बघायला मिळेलच. मनोजकुमार ही चीज दिग्दर्शक म्हणून काय काय करू शकते, त्याचा हा उत्तम नमूना.
उदा. कॅलिडोस्कोपमधून बघितल्यावर दिसतं तसे घेतलेले शॉट्स, अकारण लावलेले फिल्टर,
शिवाय निव्वळ भिकार संवाद आणि रेखापासून शशीकपूरपर्यंत सर्वांची ओव्हरअ‍ॅक्टिंग.

२. जानी दुश्मन हा भय(भीत करणारा)पट - इच्छाधारी नाग, टर्मिनेटरची देशी कॉपी, खंडीभर नायक-नायिका, चुकून झालेला रेप आणि त्याबद्दल त्या तरुणीने माफी मागावी अशी रास्त अपेक्षा करणारे मित्र, साधारण ३०४२३१२ प्रकारच्या जखमा होउनही जिवंत रहिलेला अक्षय कुमार आणि वाईट जोक मारणारा हिरोचा मित्र...
अशासारखी अनेक सौंदर्यस्थळे असलेला एकमात्र चित्रपट. नक्की बघा.

३. तेहेलका - अनिल शर्मा नामक दिग्दर्शकाने तयार केलेला हा एकमेवाद्वितिय चित्रपट. संपूर्ण पहाणे कदाचित धोकादायक ठरू शकेल.
पण सुरुवातीची ३० मिनिटे तरी बघावी अशी आहेत. सतार वाजवणारा डोंग्रील्ला नामक देशाचा प्रमुख असा खलनायक आजकाल कुठे बघायला मिळतो?

एक नमुना -

Shom Shom Shom Full Song | Tahalka | Amrish... by BollywoodClassics

उत्तेजनार्थ - राजश्री प्रॉडक्शन्स कृत अति-अति-गोड दृश्ये. चिक्कार आहेतच.
मैने प्यार किया मधला देवळातील डान्सदेखील प्रचंड विनोदी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://youtu.be/4CgAiQiT9N4

बटाटावडा कोणा कोणाला आवडतो ?? हे गाणे तुमच्यासाठी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आई शप्पत ....
काय हसायला येतय हे व्हिडिओ बघुन. खुपच छान धागा आहे हा, अजुन येउद्यात...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धागा सुंदर, कमेंटस तर अति सुन्दर Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लै भारी धागा. आजून व्हिडो येऊंद्या.
मनोजकुमार, मिठुन, रज्नीकांत, चक नोरिस, सारुक्खानचेपण येऊंद्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऑफिसमध्ये व्हिडीओज दिसत नाहीत. घरी जाऊन नक्की बघणार. जबरी मनोरंजन.
कुणीतरी:
- स्वतः रस्त्यावरचा भिकारी असूनही डीएसपीला 'अफस्स...र' असे संबोधणार्या
- आईला म्हा (वरती अर्धचंद्र कसा द्यायचा?) अशी हाक मारणार्या
जानी राजकुमारची लिंक टाका. तितका विनोदी नट दुसरा नाही.

- स्वधर्म

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'म्हॉ' हे काय प्रकरण आहे? घरी जाऊन एखादा यूट्यूबचा दुवा द्या. तेवढाच विकेण्ड सफलसंपूर्ण होईल.
(टाईप करण्यासाठी - म्हॉ = mhO. टंकनासाठी अधिक मदत इथे मिळेल. - देवनागरी लिपीत टंकनसहाय्य. हा दुवा सगळ्या पानांच्या उजव्या बाजूला दिसेल.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

म्हॉ SSS कॉलिंग काळा मठ्ठ बैल साहेब. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सायबानु, तेवढी लिंक द्याच.
राजकुमार साहेबांचे आम्ही फआआआर मोठ्ठे पंखे आहोत.
त्याच्याच 'तिरंगा'मधले वाक्य वापरायचे झाले तर -

ना अमिताभका ना रजनीकांत का
बंदा अगर पंखा है, तो सिर्फ राजकुमार का

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://www.youtube.com/watch?v=MnApsvLeRXs&feature=youtube_gdata_player

इथे थोडी झलक आहे. म्हॉ चा डायलॉग मिळाल्यास डकवतोच. खालच्या लिंकवर सोनेरी बूट, सिंहाच्या तोंडाचा पाईप इत्यादी वापरून मारलेला रूबाब जरूर पहा.

http://www.youtube.com/watch?v=amrVWvdbPWE&feature=youtube_gdata_player

-स्वधर्म

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जानि दुश्मन बघाच
त्यामधे भुत का काय तो, त्याच्याकडे सुपर शक्ति असुनहि
केवळ अक्शय कुमार आहे म्हनुन तो त्याला घाबरतो आणि जिव मुठित घेउन पळतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यूट्यूबवर जा. aparna ramteerthkar हे टाइप करा.
समोर जेवढे काही विडियो येतील त्यातील अ‍ॅट रॅण्डम् कोणताही क्लिकवा.
स्वतःच्या जबाबदारीवर पहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

गहिवरून आलं.
भयानक बोलतात ह्या काकूआज्जीताई. ( नक्की काय संबोधायचं ते कळलं नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या बाईंचा एक व्हीडीओ मुद्दाम पाहिला होता. कोणीतरी हिच्याबद्दल सांगितलं तर लोकांना नक्की किती सनातनी, प्रतिगामी ऐकायला आवडतं याची तपासणी म्हणून. अगदी अलिकडपर्यंत, हे सगळं काहीच्या काही बोलते ही बाई. असं काही असतं काय, असं वाटत होतं. पण हल्लीच, साधारण तिशीला आलेली एक मुलगी भेटली. तिच्या आईने तिला पार्लरमध्ये केस कापायलाही मनाई केली होती, हे ऐकल्यावर मग मी बरीच जमिनीवर आले.

तर मुद्दा असा, की बाई म्हणतात, "मला आई म्हणा. कारण आईला कोणी नाही म्हणू शकत नाही." आता हे अज्ञान कसं दूर करायचं वगैरे माहित नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

या बाईंनी 'सांगितलेला एक विषय' मैत्रिणीच्या आई बरोबर प्रवास करत असताना ऐकण्यात आला होता. त्यांच्या मतांइतकीच मैत्रिणीच्या आईचे त्या विधानांना असलेले अनुमोदन पाहून/ ऐकून घाबरले होते.
सगळ्यात विनोदी भाग - नवर्‍याच्या आईला नीट वागवण्याचे कारण माणुसकी/ प्रेम अशा क्षुद्र भावना नसून, नवर्‍याला त्याच्या आईने २५-३० वर्षे प्रेमाने सांभाळलेले असते हे आहे हे ऐकल्यावर वाद घालण्याचा सुद्धा उत्साह उरला नाही.

लोकांना नक्की किती सनातनी, प्रतिगामी ऐकायला आवडतं याची तपासणी म्हणून

फारच आवडत असावं असं मर्यादित निरीक्षण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डेंजर आहेत बाई एकदम.
'मन फेर अँड लवली झालं पायजे !'- असही म्हणाल्या त्या त्यांच्या खास ठसक्यात :ड.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जबरदस्त काकू!!

"अपर्णाकाकूंचा हल्ला" हे सदर चालवायला त्यांना ऐसीवर बोलवावे असे सुचवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

बाप रे, कठीण आहे ह्या "आई". मी कधीच ह्यांच नाव ऐकलं नव्हतं आज पहिल्यांदाच व्हीडिओ पाहिला

५-७ मिनीटांच्या व्हीडिओत हे असले सक्तीचे वाक्य ऐकायला मिळाले :
"
स्वयंपाक आलाच पाहिजे
दुसर्‍याच्या आनंदात सहभागी झालच पाहिजे
भांडे आठवड्यातून एकदातरी घरातल्या बाईने घासलेच पाहिजे.
पुरण घरीच केलं पाहिजे
श्राध्दाचा स्वयंपाक घरीच केला पाहिजे...
"

च्यायला काय मिलिट्रीत होती की काय ही बाई आधी.... अत्याचारच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खोटे कशाला बोलू ? उच्च माध्यमिक शाळेत (बहुतेक सातवी आठवीत ) असताना मलाही कधीकधी ह्या गोष्टी तीव्रतेने पटायच्या.
अज मी त्याच गोष्टी सो बॅड द्याट इट्स गुड मध्ये पोष्ट करतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

घरातील प्रत्येक (इर्रिपेक्टिव्ह ऑफ वय, लिंग, मिळकत इत्यादी) सदस्यावर ही सक्ती असेल तर 'एकवेळ' (तेही कसेबसेच, पण) समजून घेता येईल (नी रोज एकाने भांडी घासल्याने पैशाची बचतही होईल Wink )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

घरातील प्रत्येक (इर्रिपेक्टिव्ह ऑफ वय, लिंग, मिळकत इत्यादी) सदस्यावर कडून ही सक्ती अपेक्षा असेल तर 'एकवेळ' (तेही कसेबसेच, पण) समजून घेता येईल

+ सहमत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सिफरच्या मेन्स टॉक लेखातील उरफाट्या आठवला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

काल एक व्हिडीओ ऐकला. काही मुद्दे पटले काही नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्यात ४:०० मिनिटानंतर पाहा. काव्य केवळ अप्रतिम.

"एवढसं काय?वांगं!
त्याला काय? देठ!
तुमची आमची कायमची भेट"

विकिपिडिया सांगतोय की शांताराम नांदगावकर, विवेक आपटे, अभय परांजपे यापैकी कोणीतरी हे काव्य लिहिलंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा सिनेमा पाहिला आहे का? त्यातील दामलेचं कॅरॅक्टरच शामळूच दाखवलेलं आहे. त्या संदर्भानुसार हे गाणं, त्यातील शब्द त्या कॅरॅक्टरला जमून जातात असे मला वाटते. तुम्ही अवतरणार दिलेल्या वाक्यांचा संदर्भही सिनेमात या दोघांच्या परस्पर नात्याशी जोडलेला आहे.

सिनेमा थोर आहे असे नाही, पण फक्त गाण्याचा व्हिडीओ पाहता वाटते तसे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

दामलेचं कॅरॅक्टर - खरंय. त्याच्यासारख्याने केलेलं काव्य म्हणून खपून जावं. पण आधीचे एवढे उच्च शब्द "युगायुगांची नाती" आणि "महती" वगैरेपुढे हे म्ह्णजे ट-ला-ट लावल्यासारखं वाटलं.
खरं तर अशोक सराफ बाई बनून बारशाला जातो- हा प्रसंग टाकायला हवा होता. Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नव्वदीच्या दशकात दूरदर्शनवर 'जॉकी' नावाची मराठी मालिका येऊन गेली होती. सुशील गजवानी नामक व्यक्तीने दिग्दर्शित केलेली. इतकी अगम्य मालिका मी दूरदर्शनवर पाहिलेली नाही. यू-ट्यूबवर एकही दुवा मिळाला नाही पण एक हिंदीत संवादरुपांतरित केलेली फीत सापडली. समझनेवाले को शीर्षक गीतही काफी हैं |
शीर्षक गीत संपून पुढे जाऊ धजलातच तर संवाद, अभिनय, उच्चार यांचे एक वेगळाले विश्व साकारलेले अनुभवास यावे. त्यातला डोके भादरलेला तो शशी गजवानी (बहुधा सुशीलचा भाऊ). 'चेहर्‍यावरची माशीसुद्धा हलत नाही', असे म्हणायला मुळात माशीच बसू धजत नाही त्यास कोण काय करणार !
(या अश्या मालिकेत कौशल्या गिडवानीने काम करावे ही त्यापुढची शोकांतिका. माझ्या अंधुक आठवणीप्रमाणे बहुधा वर्षा उसगांवकरही या मालिकेत दर्शन देऊन गेली आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नव्वद नाही लेट ऐंशी होती बहुतेक. बघायचो आम्ही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0