श्रद्धा - धार्मिकांचा प्लॅसिबो
श्रद्धेचा रिमोट वापरून प्रत्यक्षात एक बारिकसा खडासुद्धा आपोआप एक सेंटीमीटर मागे-पुढे सरकवता येत नाही हे माहित असूनसुद्धा श्रद्धा असल्यास डोंगर चालत चालत चढू शकतो अशी बढाई मारणारे भरपूर जण आहेत. श्रद्धेमुळे नाट्यपूर्ण घटना घडत असतात असे छातीठोकपणे सांगणारे अनेक लोक आपल्याला नेहमी भेटत असतात. गंगेचे पाणी पिल्यानंतर अनेक दुर्धर रोग बरे झाले आहेत असे सांगणारे लोक आपल्याला नक्कीच भेटले असतील. पार्वतीमाँने पोटावर हात फिरवल्यानंतर बाईची पाळी चुकली व पोट दिसण्याइतपत पुढे आले होते असे (शपथेवर!) सांगितलेल्या शेकडो बायका महाराष्ट्र - गुजरात येथे सापडतील. शेवटी पोटात मूल नव्हतेच, हा भाग वेगळा. अर्धांगवायूच्या झटक्यामुळे एखादा अवयव निकामा झालेला असला तरी ईश्वरावरील (किंवा बुवा-महाराज यांच्यावरील!) श्रद्धेमुळे ते अवयव नीटपणे काम करत आहे असे सांगणार्याकडे बघितल्यावर आपण थक्क होतो. कारण अवयव निकामा झाला आहे हे उघड्या डोळ्यांना स्वच्छ दिसत असते.
सश्रद्धांचा मेंदू कसा काम करतो, हा एक संशोधनाचा विषय आहे. मेंदूतील एक बारीकशी हालचाल शारीरिक प्रक्रियेत एवढा मोठा बदल कसा काय घडवू शकतो? ज्ञानेंद्रियांच्या अनुभवाच्या विरुद्धच्या टोकाच्या गोष्टीवर आपले मन कसे काय विश्वास ठेऊ शकते? श्रद्धेला जैविक आधार असू शकेल का? असे अनेक प्रश्न आपण श्रद्धेच्या संदर्भात विचारू शकतो. 'श्रद्धेतील विसंगती' या विषयावर संशोधन करणारे कॅलिफोर्निया विद्यापीठातील डॉ. व्ही. रामचंद्रन यांच्या मते श्रद्धेचा संपूर्ण व्यवहार आव्हानात्मक असूनसुद्धा त्याचा नीटपणे अभ्यास झालेला नाही. काही वैज्ञानिक मात्र अलिकडे श्रद्धेबद्दल गंभीरपणे अभ्यास करत आहेत. याविषयी दोन प्रमुख विचारप्रवाह आहेत. ढोबळमानाने श्रद्धा विवेक व बुद्धीमत्ता यांच्या रसायनातून तयार झालेला व्यवहार असावा असे काही अभ्यासकांना वाटत आहे. परंतु इतर काहींना श्रद्धा पूर्णपणे भावनात्मक व्यवहार असून त्यात उत्स्फूर्ततेचाच भाग जास्त आहे असे वाटते. श्रद्धा वैचारिक विश्लेषणाचा विषय नसून पूर्णपणे भावनेचाच आहे व त्याच दृष्टीकोनातून त्याचा अभ्यास करायला हवा, असे बहुतेकांना वाटत आहे.
श्रद्धेच्या जैविक मूळ कारणावर बोट ठेवणे वाटते तितके सोपे नाही. ईश्वरावरील श्रद्धेमुळे शारीरिक रोग बरा होऊ शकतो याचा वैज्ञानिकरित्या अभ्यास करणे फार अवघड गोष्ट आहे. परंतु श्रद्धाविषयक अभ्यासकांना आजकाल एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. अभ्यासकांच्या मते रोगोपचारावरील श्रद्धेचे स्वरूप हे ईश्वरावरील श्रद्धेशी मिळते जुळते आहे. आणि रोगोपचारावरील श्रद्धेच्या तथाकथित परिणामांची नियंत्रित चाचणी करणे तुलनेने सोपे आहे. ताणतणावासाठी घेतलेल्या गोळ्यांमुळे होणार्या अनुकूल परिणामात ऐंशी टक्के वाटा वैद्यकशास्त्रावरील श्रद्धेचा तर उरलेला वीस टक्के वाटा गोळ्यांच्या रासायनिक प्रक्रियेत असे जाणकारांचे मत आहे. पर्यायी उपचार पद्धतीच्या बाबतीत तर परिणामातील श्रद्धेचा वाटा याच्यापेक्षाही खूप खूप जास्त असणार. बरे वाटणे व बरे होणे हा फरकच सश्रद्धांच्या लक्षात येत नाही. अक्युपंक्चरच्या उपचार पद्धतीत पोटदुखीसाठी शरीरातील कुठल्याही भागात सुई टोचली तरी चालेल, पोटदुखी गायब! अशा प्रकारच्या केवळ श्रद्धेशी निगडित उपचाराच्या परिणामाला 'प्लॅसिबो इफेक्ट' असे वैद्यकीय परिभाषाकोशातील नाव आहे. आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धतीत प्लॅसिबोलासुद्धा उपचारात प्रक्रियेत भर दिला जात आहे. त्यामुळे श्रद्धेचे वैज्ञानिक स्वरूप समजून घेण्यासाठी, त्याची तपासणी करण्यासाठी प्लॅसिबोच्या परिणामाचा अभ्यास पुरेसा ठरू शकेल, असे अभ्यासकांना वाटत आहे.
ढोबळपणे प्लॅसिबो इफेक्ट म्हणजे वैद्यकीय उपचारातील श्रद्धेमुळे होणारे जैविक परिणाम. प्लॅसिबोचा खराखुरा परिणाम होऊ शकतो व रोगोपचार पद्धतीतील ती एक प्रभावी शक्ती आहे, हे मान्य करायलाच हवे. परंतु प्लॅसिबो कशा प्रकारे काम करत असावा हा आपल्यासमोरचा प्रश्न आहे. यासाठी एका संशोधकाने प्रत्यक्ष प्रयोग करण्याचे ठरविले. त्याने सुदृढ, निरोगी अशा चौदा युवकांची निवड करून त्यांना दाढदुखी होण्यासाठी काही गोळ्या दिल्या. गोळ्यांचा चांगलाच 'परिणाम' दिसू लागल्यानंतर, दाढदुखी कमी होण्यासाठीचे इंजेक्शन देत असताना "या इंजेक्शनमुळे दाढदुखी थांबेल किंवा कदाचित थांबणारही नाही" असे रुग्णांना सांगत असे. इंजेक्शन सिरिंजमध्ये फक्त सलाइनचे पाणी भरलेले होते. तरीसुद्धा त्यातील बहुतेकांनी 'इंजेक्शनमुळे गुण आला' म्हणून सांगू लागले. संशोधकानी त्यांच्या मेंदूची PET चाचणी घेतली. चाचणीत त्यांच्या मेंदूत एंडॉर्फिनचा जास्त प्रमाणात स्राव झाला होता, हे लक्षात आले. जास्त प्रमाणातील एंडॉर्फिनमुळे त्यांना कमी प्रमाणात वेदना जाणवत असावेत. हाच धागा पकडून संशोधक, प्लॅसिबो उपचार घेणारे व न घेणारे अशा दोघांच्याही मेंदूतील सूक्ष्म बदलांचा अभ्यास करू लागले. PETची चाचणी घेतली. चाचणीत, केवळ मेंदूतच नव्हे तर मेंदूतील वेदनेचा अनुभव दर्शविणाऱ्या, वेदनेच्या तीव्रतेची माहिती देणाऱ्या व शरीराच्या कुठल्या भागात वेदना होत आहेत याची जाणीव देणाऱ्या भागातसुद्धा एंडॉर्फिन पसरलेला होता. इंजेक्शनच्या सकारात्मक परिणामाविषयी ज्यांचा विश्वास होता त्यांच्या मेंदूतील स्रावात लक्षणीय फरक जाणवत होता.
यावरून, आपल्याला जे अपेक्षित आहे ते घडून येण्यासाठी जाणीवेच्या पातळीवर या प्रक्रिया घडत असावेत असा अंदाज बांधता येईल. श्रद्धासुद्धा जाणीवपूर्वक व बुद्ध्यापुरस्कर घडत असलेली प्रक्रिया असून आपल्या मनातील इच्छा-आकांक्षांना पूरक म्हणून ते कार्य करत असावे. आपल्याला नेमके काय हवे याची संपूर्ण जाणीव असेल तरच श्रद्धा (व प्लॅसिबो) परिणामकारकरित्या कार्य करू शकतात. रुग्णाला अज्ञानात ठेऊन प्लॅसिबोचा प्रयोग केल्यास कधीच गुण येणार नाही. तुमचे परिचित तुम्हाला बरे वाटावे यासाठी प्रार्थना करत आहेत हे तुम्हाला माहित असेल तरच तुम्हाला बरे वाटण्याची शक्यता आहे. तुम्हाला न कळत हजारो लोकांनी प्रार्थना केली तरी ती व्यर्थ ठरण्याची शक्यता आहे.
इंद्रियांच्या अनुभवांचासुद्धा श्रद्धेत प्रमुख सहभाग असतो. कारण आपण करत असलेली अपेक्षा कुठूनही उद्भवू शकते. श्रद्धा केवळ मानसिक समाधान देत नसून त्या इच्छाशक्तीद्वारे काही मर्यादित प्रमाणात शारीरिक बळही ती देऊ शकते. पार्किन्सनच्या रुग्णांना प्लॅसिबोच्या उपचारानंतर बरे वाटू लागते. प्लॅसिबोसंबंधातील चाचणीत त्यांच्या मेंदूत, शरीराच्या हालचाली करण्यास उत्तेजन देणाऱ्या डोपामाइनचा श्राव जास्त प्रमाणात आढळला. अशा प्रकारची वाढ औषध सेवनानंतर होत असते. परंतु यावेळी औषधाचे काम प्लॅसिबो करत होता. प्लॅसिबो म्हणून दिलेल्या गोळ्या/इंजेक्शनमुळे पार्किन्सनच्या रुग्णांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. त्यातून डोपामाइनचा स्राव होऊ लागल्यामुळे शारीरिक हालचाली करण्याची इच्छा होऊ लागली. काही मर्यादेपर्यंत अवयव कामही करू लागले. गंमत म्हणजे दुर्धर रोगानी जर्जरित झालेल्या व औषधोपचारांच्या सकारात्मक परिणामाबद्दल साशंक असलेल्या रुग्णावर प्लॅसिबोचा कितीही मारा केला तरीही त्यांच्या अवस्थेत काहीही फरक पडत नाही. अल्झामाइरच्या रुग्णांच्यात मुळातच जाणीवेचा अभाव असतो. त्यांच्या आशा उंचावल्या नसतात. त्यामुळे त्यांच्यावरील प्लॅसिबो उपचार निरर्थक ठरतो. कारण त्यांच्यात कुठलीही अपेक्षाच नसते. त्याचप्रमाणे अक्युपंक्चरचा परिणाम लहान मुलावर होत नाही. कारण पर्यायी रोगोपचाराच्या प्लॅसिबो प्रक्रियेची त्यांना जाण नसते, अपेक्षा नसतात.
प्लॅसिबोच्या संदर्भात अनुभव व अपेक्षा हातात हात घालून काम करत असतात. वैद्यकीय उपचारावरील रुग्णाची अढळ श्रद्धा एकूण उपचार प्रक्रियेत महत्वाचे ठरते. 'अपेक्षेनुसार अनुभव' हा श्रद्धेचा गाभा आहे. त्यामुळे धार्मिक श्रद्धेच्या संदर्भात धर्माबद्दलच्या इच्छा व आकांक्षा व धर्मश्रद्धेतून आलेले अनुभव फार महत्वाचे ठरतात. केवळ धर्मावरील श्रद्धाच नव्हे तर इतर अनेक प्रकारच्या श्रद्धा आपल्या मनात कायम कोरून ठेवल्यासारखे असतात. कितीही विरोधी पुरावे दिले तरी त्या मानसिकतेत तसूभरही बदल होत नाही. बदल करण्यास नकार दिल्यामुळे नुकसान होत आहे हे माहित असूनसुद्धा आपण आपापल्या श्रद्धेशी घट्ट चिकटून बसतो, हट्टाला पेटतो.
डॉ. व्ही रामचंद्रन यांचा संशोधनाचा विषय वैद्यकीय उपचारावरील श्रद्धेमुळे उद्भवणारी वैचित्र्यपूर्ण परिस्थिती असा आहे. यातून श्रद्धेचे नेमके स्वरूप काय असेल हे कळू शकेल. अर्धांगवायूचाच एक प्रकार असलेल्या ऍनोग्नोसियाच्या रुग्णांच्या एका गटाचा अभ्यास करत असताना गटातील काही रुग्ण त्यांच्या शरीरातील हातासारखा अवयव निकामा झाला आहे यावर विश्वास ठेवायलाच तयार नव्हते. हात नेहमीसारखाच असून फक्त आता तो नीट नाही अशा समजूतीत ते वावरत होते. त्यापैकी एका रुग्णाला डॉक्टरांनी " मी तुला भूल येण्याचे इंजेक्शन देतो. काही काळ तुझा हात बधीर राहील" असे म्हणत लुळ्या पडलेल्या हाताला सलाइनच्या पाण्याचे इंजेक्शन दिले. तो रुग्ण खरोखरच हात बधिर झाला आहे असे म्हणू लागला. इंजेक्शनचा खरे-खोटेपणा तपासण्यासाठी रुग्णाच्या दुसर्या निरोगी हाताला पण इंजेक्शन दिल्यावर रुग्णाने 'भूल काम करत नाही' म्हणून तक्रार केली. अजून काही अशाच प्रकारच्या रुग्णावरील प्रयोग कमी-जास्त प्रमाणात सामान्यपणे याच प्रकारात मोडत होते. हे रुग्ण आपापल्या हाताकडे एकाग्र नजरेने बघत हाताची भूल उतरण्याच्या प्रतीक्षेत होते. त्या सर्वांना आपला हात खरोखरच व्यवस्थित आहे यावर पूर्ण विश्वास होता..या रुग्णांना हात हलवण्यास सांगितल्यानंतर सांधेदुखी, स्नायूत बिघाड असे काही तरी कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होते. या गटातील रुग्णांच्या मेंदूच्या तपासणीत ज्यांच्या उजव्या मेंदूत बिघाड आहे तेच फक्त आपण रुग्ण आहोत हे मानण्यास तयार नव्हते. परंतु ज्यांच्या डाव्या मेंदूत बिघाड होता त्यांना मात्र आपण अर्घांगवायूचे रूग्ण आहोत याची जाणीव होती. उजव्या मेंदूतील कमतरतेमुळे माणूस प्रश्न विचारण्याची क्षमताच हरवून बसतो. प्रत्यक्ष पुराव्यावर विश्वास ठेवायलाही तयार होत नाही.
श्रद्धेतील विसंगती ऍनोरेक्सिया व बायपोलार डिसऑर्डर (कधी उन्माद तर कधी औदासीन्य) मुळे उद्भवण्याची शक्यता असते.ऍनोरेक्सियाग्रस्त रोगी स्वत: हडकुळा असूनसुद्धा आरश्यात बघत 'आपण फार मोठे पहिलवान आहोत' अशी समजूत करून घेत असतो. बायपोलार डिसऑर्डरचे रुग्ण नेहमीच आपल्या नादात असतात. कधी स्वत:ला ग्रेट व कधी कचरा अशी समजूत करून घेत असतात. त्यांचा स्वत:च्या स्वत:वर अजिबात विश्वास नसतो. अशा प्रकारचे आजार सामान्यपणे भावनेतील बाधेमुळे होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे श्रद्धेतील विसंगतीसुद्धा अशा प्रकारच्या भावनाविकारांचे कारण असू शकते.
काही वैज्ञानिकांच्या मते श्रद्धा - ईश्वरावर की वैद्यकीय औषधोपचारावर, हा मुद्दा गौण आहे - ही एक भावनिक स्थिती असते. ज्याप्रकारे सुख, समाधान, आनंद, इ.इ. मेंदूतील एका विशिष्ट स्रावांना कारणीभूत ठरतात तसाच काहिसा प्रकार श्रद्धेच्या बाबतीतही घडत असावे. श्रद्धा सामान्य स्थितीत असलेल्या मेंदूत बदल घडवून आणते. भावनोद्रेकाच्या स्थितीत असलेल्या मेंदूप्रमाणेच डोपोमाइन व सेरोटोनिन श्रद्धेच्या स्थितीतही कार्य करत असतात. आध्यात्मिकतेच्या आहारी पडलेल्यांच्यातसुद्धा याच न्युरोट्रान्समिटरचाच सहभाग असतो.
अजून एका अभ्यासामध्ये जितक्या जास्त प्रमाणात दुखणे तितक्या तीव्रतेने प्लॅसिबो गुण देतो हे लक्षात आले. जेव्हा जास्त दुखत असते तेव्हाच वेदनेपासून मुक्त होण्याची इच्छा तीव्र होते. अशा प्रसंगात प्लॅसिबोचा आधार मिळत असल्यास रुग्णाची इच्छा पूर्ण होते. कारण प्लॅसिबोमुळे मेंदूत होत असलेला एंडॉर्फिनचा स्राव वेदना कमी करणार्या मेंदूच्या संवेदनशील भागात पसरू लागतो व रूग्णाला वेदनेतून मुक्ती मिळाल्यासारखे वाटू लागते. धार्मिक श्रद्धांच्या बाबतीतही नेमके हेच घडते.
श्रद्धा ही एक जैविक घटना असून त्यामुळे मेंदूत होत जाणार्या बदलांचे मोजमोप करणे आता शक्य आहे. जीवन जगण्यासाठी अत्यंत गरजेचा असलेल्या आत्मविश्वासात श्रद्धेमुळे बळकटी मिळत असेल. श्रद्धेतून आत्मविश्वास की आत्मविश्वासातून श्रद्धा हा प्रश्न बाजूले ठेवला तरी माणूस श्रद्धेच्या मागे एवढा का धावत आहे याचे चित्र स्पष्ट होत जात आहे, हे मात्र खरे.
माहितीमधल्या टर्म्स
नक्की किती % आहे ते माहिती
नक्की किती % आहे ते माहिती नाही. ते पाहिले पाहिजे.
बाकी, कायद्यात धर्मग्रंथांमधील काही भाग आला म्हणून त्या गोष्टी लगेच 'योग्य गोष्टी' झाल्या हे रोचक आहे.
अन धर्माच्या कक्षा मर्यादितच होत्या भारतात, कज्जेखटले कै कट टु कट मनुस्मृतीप्रमाणे निकाली काढले जात नसत. काही प्रभाव अवश्य असे, पण टोटली आजिबात नाही. विठ्ठल त्र्यंबक गुणे यांचे ज्युडिशिअल सिस्टिम ऑफ मराठाज़ हे पुस्तक बघावे असे सुचवतो.
तेच म्हणायचय मला.. "धारयती
तेच म्हणायचय मला.. "धारयती इति धर्मः" किंवा जगण्याची पद्धती अशा वर्णनाने उगाच जास्त व्यापकता दाखवणच पटत नाही.. धर्माच्या कक्षा मर्यादीतच हव्यात..
तुम्हांला पटण्या न पटण्याने अन ते पालुपद सारखे वापरण्याने कै होत नै हो. दरवेळेस ते पालुपद काय टाकताय उगीच? =))
उगीच हॅहॅहॅ चालू द्या म्हणजे
उगीच हॅहॅहॅ चालू द्या म्हणजे काय? सद्य धर्मांमधे दुरित गोष्टी जास्त वाटतात असं वाटत असेल तर त्यात काय अस्वीकारार्ह आहे? काही धर्मांत सक्ती कमी असेल, काहींत जास्त.. धर्म ही एकदम सर्वांनी एका दिवसात सोडून देणे शक्य असलेली गोष्ट नाही हेही मान्य. पण एखाददुसरा तसं करत असेल तर त्याला हॅहॅहॅ चालू द्या असे (सपोजेडली उडवून लावणारे) कशाला म्हणायचे ?
समप्रमाणात आहेत किंवा कसं हे
समप्रमाणात आहेत किंवा कसं हे सब्जेक्टिव्ह आहे.
समप्रमाणात अर्थातच नाही हे दिसतं. विज्ञान, किमान तात्विक पातळीवरची संस्था म्हणून, धर्मापेक्षा, "केवळ नि केवळ" त्याच्या त्याच्या क्षेत्रात, आज सरस आहे. धर्माचं संस्था नीट नाहीत, डोक्यूमेंटेशनच्या सिस्टीम्स नीट नाहीत, हायरार्की नीट नाही, लेगसी प्रचंड आहे, मूळ वांच्छित तत्त्वापासून डिस्टॉर्शन्स खूप आहेत, प्रसार भयंकर आहे, म्हणून त्याच्या चूका ठळक दिसतात.
===========================================================================================
धर्म आणि विज्ञान म्हणजे आयवोरी टावरवरचा धर्म नि आयवोरी टावरवरचे विज्ञान का?
धर्म + मानवी मूल्ये + निसर्ग + प्रत्यक्ष रोल
हे कॉकटेल आणि
वि़यान + मानवी मूल्ये + निसर्ग + प्रत्यक्ष रोल
हे कॉकटेल
अशी तुलना केली तर मात्र सब्जेक्टीवीटी येईल.
माझ्या मते दुसरे कॉकटेल सवत्याने विषच आहे, पहिले ओके आहे नि सध्याला दोघांचे मिक्सचर चालू आहे ते चर्चनीय आहे.
काहीही हा श्री (जोशी)!!
हे वाक्य अजून एका प्रकारे निरर्थक आहे. समजा असं असतंच, म्हणजे "कोणालाही" समजलं असतं, तर आज निअर १००% जग नास्तिक नसतं का? एक तर कोट केलंय तसं नाही, नैतर जगातल्या ९५% लोकांना डोकं नाही.
अहो कोणालाही समजू शकतं म्हणजे सर्वांना समजलं आहे असा अर्थ होत नाही श्री! जगात कित्येक गाढव लोक असतात जे समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाहीत, त्याचा दोष उगाच विज्ञानाला का? (बाकी जगात ९८% लोक गाढव असावेत असं मला वाटतं, पण २-३% इकडे तिकडे विज्ञानात चालायचेच, नाही का!)
जगात कित्येक गाढव लोक असतात
जगात कित्येक गाढव लोक असतात जे समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाहीत, त्याचा दोष उगाच विज्ञानाला का?
+१००
===============================================================================================================
नाईलसाहेब, वरील सगळं धर्माला देखिल लागू आहे. आडकित्ता यांच्या आकृतीत धर्माला डोके नसते, फक्त विज्ञानाला असते असा भयंकर माजोरडा स्टँड दिसला. त्या परिप्रेक्ष्यात ही विधाने झाली आहेत.
जसे विज्ञान बर्याच लोकांना कळत नाही, बरेच कळून घेत नाहीत, तसेच धर्म देखिल अनेक गाढवांना कळत नाही, अनेक कळून घेत नाहीत.
आधुनिक विज्ञान नविन आहे म्ह्णून त्याचा मेकअप छान वाटतो, पण एकूणात पाहिलं तर मानवी मूल्यांचा व वर्तनांचा स्रोत म्हणून धर्माचं महत्त्व त्यापेक्षा खूपच जास्त आहे. असो.
काहीही हा श्री!
नाईलसाहेब, वरील सगळं धर्माला देखिल लागू आहे. आडकित्ता यांच्या आकृतीत धर्माला डोके नसते, फक्त विज्ञानाला असते असा भयंकर माजोरडा स्टँड दिसला.
काहीही हा श्री! धर्माला डोके नसतेच. पण धार्मिकांनाही फारसे डोके नसते. यात माजोरडं काय आहे?
जसे विज्ञान बर्याच लोकांना कळत नाही, बरेच कळून घेत नाहीत, तसेच धर्म देखिल अनेक गाढवांना कळत नाही, अनेक कळून घेत नाहीत.
धर्म कोणालाच कळत नाही*. आणि जे म्हणतात त्यांना कळतो तेच खरे गाढव असतात. (ज्यांना धर्मात कळण्यासारखे काही नाही हे कळते ते एक तर नास्तिक असतात नाहीतर पैसा छापणारे बाबा-बुवा!).
*कारण त्यात कळण्यासाराखं विशेष काही नाहीच.
धसारे धर्म रफली "आपण सारे
धसारे धर्म रफली "आपण सारे इश्वराची लेकरे आहोत" असे शिकवतात. नि काही दंगे होतात.
विज्ञान ९८% लोक मूर्ख असतात असे शिकवत नाही. नि तरीही काही विज्ञानवादी तसे मानतात.
-----------------------------------------
आय जस्ट वान्टेड टू ब्रिंग द केस टू द नोटीस ऑफ द कोर्ट, योर ऑनर.
http://www.aisiakshare.com/no
http://www.aisiakshare.com/node/2820#comment-103922
इथे जे लिहिलं होतं ते स्पेसिफिकली या कॅटेगिरीसाठी. (सगळ्या विज्ञानवाद्यांसाठी नाही हे आवर्जून पुन्हा सांगतो.)
बाय द वे तिरशिंगराव, मी काही
बाय द वे तिरशिंगराव, मी काही विज्ञानविरोधी भूमिका घेतलेली नाही. विज्ञानाच्या सगळ्या चांगल्या गोष्टी मला मान्य आहेत. त्या ढीगाने आहेत हे देखिल मान्य आहे. पण विज्ञानच म्हणते ना कि प्रत्येक गोष्ट विचार करून, परखून करावी? मग धर्म नावाची संस्था कचर्यात काढावी असे म्हणण्यापूर्वी तिची उप्युक्तता आहे का, तिचे प्रयोजन काय आहे, ती नसेल तर काय होईल, तिचा इतिहास काय राहिला आहे, सुधारणा शक्य आहेत काय, आवश्यक आहेत काय इ इ वर विचार करायला काय हरकत आहे? धर्म या शब्द्आचा इतका विटाळ का? फॅशन म्हणून?
शस्त्रं १७ तास ३० मिनीटांसाठी निकामी
विक्षिप्तबाईंची शस्त्रं १७ तास ३० मिनीटांसाठी निकामी झाली आहेत. हा वनवास संपला की पुन्हा विक्षिप्तबाई शस्त्र परजणार.
अधिक विस्ताराने सांगायचं झालं तर - या कर्कशपणाचा मला कंटाळा आला आहे. कोणीतरी, कुठेतरी, काहीतरी चमत्कारिक बोलतात आणि त्यांचं स्पष्टीकरण इथल्या वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणाऱ्यांनी द्यायचं, त्याचं कारण इथला सेन्सिबल लेख! या सगळ्यातला फोलपणा, कालांतराने का होईना, मला समजलेला आहे. जिथे स्पष्टीकरणं देऊन काही फरक पडेल असं वाटतं तिथे ती लिहायलाही ना नाही. बाकी हताशेपोटी फक्त विनोद करण्याचं मटेरियल मिळतंय असं मानून 'विनोदी' म्हणावं आणि आपल्या कामाला जावं.
उदाहरणार्थ -
While measuring work, isn't it that no work is considered to be done if no displacement is observed? Is this not as good as assuming law of conservation of energy?
इतका गोंधळ निस्तरण्याएवढा वेळ माझ्याकडे खरंच नाही.
कर्कशपणाचा मला कंटाळा आला आहे
कर्कशपणाचा मला कंटाळा आला आहे
यावर धाग्याच्या लेखकाने फार फार वर्षांपूर्वीच उपाय शोधून काढला आहे. तो म्हणजे फक्त लेख प्रसविला की आपला अवतार त्या लेखापुरता संपविणे. एखाददुसरा अपवाद वगळता मी कधीही त्यांना स्वतःच्या लेखावर आलेल्या प्रतिसादांवर उपप्रतिसाद देताना पाहिले नाही.
एकतर त्यांना जे सांगायचे आहे ते लेखात पुरेसे स्पष्ट आहे आणि त्यावर चर्चा करण्यात काही हशील नाही किंवा त्यांना अशा चर्चा करण्याचा कंटाळा येतो की फारच कंटाळा आल्यावर ते अशा प्रकारचे लेख लिहितात आणि जालीय जन्तेने खेळलेली धुळवड ते एन्जॉय करतात हे कळायला काही मार्ग नाही बुवा.
मला तर लेखक म्हणजे प्रत्यक्ष व्यक्ती आहेत की एखादा ऑटोमेटेड प्रोग्राम आहे, जो काही कालांतराने असे लेख ठराविक चर्चास्थळांवर पुश करतो इतपत नाही नाही त्या शंका येतात. तुम्ही संपादक मंडळात असाल तर 'कॅप्चा' सारखे काही उपाय करता आले तर बघा बुवा.
टीप : प्रतिसादास किती खवचट श्रेणी येतात ते मोजतो आता. :)
अजो, बड्या चीफ लोकांच्या
अजो, बड्या चीफ लोकांच्या शब्दांचे शब्दशः अर्थ घ्यायचे नसतात..!! ;)
तुम्ही सरकारनामा पिक्चर पाहिला आहे का? त्यात मुख्यमंत्री उत्तमराव देशमुख ऊर्फ यशवंत दत्त हे कधीकधी "यांचा 'सत्कार' करा" असं म्हणतात तेव्हा त्यांचे लोक संबंधित व्यक्तीला आदरपूर्वक घेऊन जातात. "सत्कार" याचा अर्थ त्यानंतरच्या सीनमधे दिसतो.
अहो "कंटाळा" म्हणजे खरोखर कंटाळा असा अर्थ घेता की काय तुम्ही? ;)
मी चित्रपट पाहिला आहे तो.
मी चित्रपट पाहिला आहे तो. "आमचा कंटाळा" केला म्हणजे काय ते समजलं. असो.
-------------------------------------------------------------------------
माझ्याकडून कोणास "बडे चीफ लोक" समजणं (नि त्यावर तसं रिअॅक्ट करणं) मला फार क्रूर वाटतं. त्यापेक्षा वादावादी करा, आदळआपट करा. हे नक्कीच सन्माननीय आहे.
निमित्त मिळालेलं आहे तर
निमित्त मिळालेलं आहे तर वापरूनच घेते.
विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन याबद्दल नानावटींचं लेखन मला आवडतं. जेव्हा "लेख आवडला" इतपतच प्रतिसाद देणं शक्य असतं तेव्हा तसं लिहितेच असं नाही. त्याशिवाय लोकांनी जालीय धुळवड खेळली तरीही आपण आपला अभ्यास, लेखन यांकडे दुर्लक्ष होऊ न देण्याची लेखकाची वृत्ती मला आत्मसात करावीशी वाटते. म्हणूनच तिरशिंगरावांनी हाक मारेपर्यंत प्रतिसाद दिला नव्हता.
जसे कर्कश जालीय धुळवड खेळणारे लोक आहेत तसे तिरशिंगरावांसारखे, धुळवडीपलिकडे काहीतरी देवाणघेवाण करण्यात रस असणारे लोक आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये नाहीतर कर्कशपणा वाढत जातो आणि त्यातून माझा कंटाळाही* वाढत जातो. या वर्तनाला वेळेतच चाप लागला नाही तर सेन्सिबल लोकांना लिहायचा कंटाळाच येतो.
'ऐसी अक्षरे' संस्थळावर अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे. व्यवस्थापक मंडळातली लोकही माणसंच आहेत, त्यांनाही वैताग येतो, आणि त्यातलं कोणी कधी वैतागलं तर बाकीचे लोक वैतागलेल्यांना समजवतात आणि सगळ्यांनाच अभिव्यक्तीस्वातंत्र्य मिळेल यासाठी काळजी घेत असतात.
हे स्वातंत्र्य वापरून जर लोकांना पकवायचंच* असेल तर पकवा. फक्त इतरांना "आम्ही पकलो" असं म्हणण्याचं अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे याची नोंद घ्या. ते सुद्धा फार वाईट नाही कारण कोणी, काहीतरी(च) प्रतिसाद देतंय म्हणजे निदान पकवणाऱ्यांची दखल घेतली जात आहे. हे पकवणं असंच सुरू राहिलं तर एक दिवस तेवढीही दखल घेतली जाणार नाही. तुमच्या बोलण्याकडे, अभिव्यक्तीकडे कोणी लक्षच देणार नसेल तर त्या स्वातंत्र्याचा काय आणि कसा फायदा घेणार आहात याचा विचार करा अशी विनंती.
आणि हो, मी व्यवस्थापकांपैकी एक आहे. तेवढंच नाही, संस्थळाचं बहुतेकसं तांत्रिक काम मीच करते. तेव्हा 'कॅपचा'च्या सूचनेबद्दल आभार. विचार करायला लावणारे लेख प्रकाशित करणाऱ्यांवर 'कॅपचा'सारखे प्रयोग करण्यापेक्षा सेन्सिबल लोक न पकता देवाणघेवाण करू शकतील याची काळजी घेणं मला महत्त्वाचं वाटतं. त्यासाठी माझ्या डोक्यात चक्रं फिरायला लागली आहेत. तेव्हा या सूचनेबद्दल आभारच.
*होय. कंटाळा आणि पकवणे हे शब्द समजून-उमजून, जाणीवपूर्वक वापरले आहेत.
ते त्यावरच्या अजून एका
ते त्यावरच्या अजून एका (इंग्रजीतल्या) प्रतिसादासोबत वाचायचं आहे. ते काही आयसोलेशन मधे लिहिलं नाही. ते दोन प्रतिसाद आहेत हो.
===================================================================================
बाकी हताशेपोटी फक्त विनोद करण्याचं मटेरियल मिळतंय असं मानून 'विनोदी' म्हणावं आणि आपल्या कामाला जावं.
नाईल ९८% चा आकडा देतोय ते पटतंय.
बायबलातील कथा
माणूस हाडा-मांसाचा बनलेला आहे. हाडे आणि मांस यंत्रासारखे कार्य करतात; पण माणूस यंत्र नाही. हाडा-मांसासोबतच मन नावाचा एक अदृश्य अवयव माणसाकडे आहे. तो काम करीत असतो. हाडा-मांसाचा संबंध थेरपींशी आहे. तर श्रद्धेचा संबंध मनाशी आहे. थेरपी काम करते, त्याच प्रमाणे श्रद्धाही काम करते. बुवा-बाबांकडे गेल्यानंतर लोक बरे होतात. यात खोटे काहीही नाही. ते खरोखरच बरे होत असतात. त्यांचे मन त्यांना बरे करीत असते. बायबलमध्ये यासंबंधी फार सुंदर कथा आली आहे.
येशू गालिलीत धर्मप्रचार करीत होता. येथे एक स्त्री होती. तिला १२ वर्षांपासून हेमरेजचा त्रास होता. तिच्या शरिरातून सतत रक्तस्त्राव होत असे. येशू लोकांना बरे करतो, असे तिला कळते तेव्हा ती त्याच्या भेटीसाठी धडपडते. येशू पुढे जात असतो आणि त्याच्या भोवती प्रचंड गर्दी असते. तिला त्याच्या पर्यंत जाता येत नाही. त्याच्या कपड्याला स्पर्श झाला तरी आपण बरे होऊ , अशी तिची दृढ भावना असते. ती त्याच्या अंगरख्याच्या गोंड्याला पाठीमागून स्पर्श करते. आणि ती बरी होते. येशू तिला म्हणतो, ‘मुली तुला तुझ्या विश्वासाने (श्रद्धेने) बरे केले.'
बायबलमधील शब्द फार काळजीपूर्वक लिहिले आहेत. 'मी तुला बरे केले', असे येशू म्हणत नाही. 'तुझ्या विश्वासाने तुला बरे केले', असे म्हणतो. हा प्लॅसिबोचाच प्रकार आहे.
श्रद्धा ही एक जैविक घटना असून
श्रद्धा ही एक जैविक घटना असून त्यामुळे मेंदूत होत जाणार्या बदलांचे मोजमोप करणे आता शक्य आहे. जीवन जगण्यासाठी अत्यंत गरजेचा असलेल्या आत्मविश्वासात श्रद्धेमुळे बळकटी मिळत असेल. श्रद्धेतून आत्मविश्वास की आत्मविश्वासातून श्रद्धा हा प्रश्न बाजूले ठेवला तरी माणूस श्रद्धेच्या मागे एवढा का धावत आहे याचे चित्र स्पष्ट होत जात आहे, हे मात्र खरे.
खूपच छान! नेमक्या गोष्टीवर बोट ठेवलेत. श्रद्धेची कारणमीमांसा आणि शक्य झाले तर योग्य प्रकारे वापर - ही आयडिया आवडली.
नक्की सांगता येत नाही पण
नक्की सांगता येत नाही पण अश्रद्धेच्या अतिरेकामुळेच एक प्रसिद्ध मराठी संस्थळ मृतावस्थेत गेले असा माझा तर्क आहे. म्ह्णजे ते तसे अजून व्हेंटीलेटर वर आहे म्ह्णा पण असे असणे म्हणजे जवळजवळ नसणेच नाही का ?
आणि
मुर्खांचे बहुमत असेल तर आपणही मुर्ख व्हावे तर!! चांगलं आहे.
यांचा नक्की संबंध काय? सश्रद्ध मूर्ख असतात अशी धारणा असेल तर तीही तितकीच मूर्खपणाची आहे. उत्तम, फंक्शनिंग प्लासिबो असणार्या सर्वांना मूर्खांबरोबर एकाच लेबलात लावायची इतकी अहमहमिका कशापायी? नक्की कसला अभिनिवेश इथे कार्यरत आहे ते समजलं नाही.
अश्रद्ध लोकांचे आरोग्यच नव्हे
अश्रद्ध लोकांचे आरोग्यच नव्हे तर ते लोकच आणि त्यांचे अन्य उपक्रमही प्लेसबोचा परिणाम न झाल्याने मागे पडतात असे लेखात म्हणायचे होते असे जाणवले नाही. जे कोणते संस्थळ आहे त्यावरील लोक ईश्वराच्या, धर्माच्या, इ इ बाबतीत अश्रद्ध असले तरी जनरली आशावादी असू शकतात नि तिथे प्लेसबो काम करू शकतो.
अतिशय छान व विश्लेषणात्मक
अतिशय छान व विश्लेषणात्मक लेख आहे. मेडिटेशनमुळे मन/मूड स्थिर रहाण्याचा विलक्षण अनुभव कठीण काळात तर आलेला होताच पण अजूनही मन प्रसन्न व शांत रहाण्यासाठी संध्याकाळी केलेल्या स्तोत्रवाचनाचा फायदा होतोच्च.
______________________
अनेकांना श्रद्धाळू व्यक्तीना एखाद्या देवतेचे सहस्त्रनाम म्हणतेवेळी अननुभूत आनंदाचा अनुभव येतो.
शिवसहास्त्रानामाचेच उदाहरण घेउ. बरेचदा म्हणजे आठवड्यातून २-३ वेळां तरी मी संध्याकाळी आंघोळी नंतर शिव सहस्त्रनाम म्हणते. एक तर आंघोळ करून सैलसर कपडे घातल्याने अतिशय प्रसन्न वाटत असतेच, त्यातून एका ठराविक वेळीच हा पठण विधी केल्याने मन खरोखर स्तोत्रे, सहस्त्रनाम म्हणण्यासाठी ओढ घेउ लागते. सायन्सच म्हणते की व्यायाम हा ठराविक वेळी व नियामित केल्यानेच प्रभावी ठरतो, अध्यात्मातील साधनेचेही तसेच आहे. कधी जर कंटाळा आला असेल तर पोपटपंची होते व त्यादिवशी तितकासा फायदा होत नाही. परंतु असे क्वचितच होते, बहुसंख्य वेळा नाम उच्चारले की मन त्याचा अर्थ शोधू लागते, अर्थ गवसला की अंध व्यक्तीला प्रकाश दिसावा तसा आनंद होतो. खरच होतो, प्रत्येक वेळी नव्याने आनंद होतो.मेंदूला electrodes लावून हा आनंद जरूर मोजता यावा.
सुरुवातीलाच शंकराचे ध्यान केले जाते.-
शान्तं पद्मासनस्थं शशिधरमकुटं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रं
शूलं वज्रं च खड्गं परशुमभयदं दक्षभागे वहन्तम् |
नागं पाशं च घण्टां वरडमरुयुतं चाङ्कुशं वामभागे
नानालङ्कारयुक्तं स्फटिकमणिनिभं पार्वतीशं नमामि ||
संस्कृत येत असल्याने हा श्लोक एका ध्यानस्थ पण शस्त्रास्त्रे धारण केलेल्या योग्याचे रुपडेच डोळ्यासमोर आणतो. असा विरळा योगी जो भोगीसुद्धा आहे, अन भोगात रमूनही विरक्त आहे. मध्येच "मागे उभा मंगेश" च्या समान अर्थाच्या पुढील ओळी मनात चमकून जातात, अन मेंदू चा सुसूत्रता, सुसंगती शोधणारा भाग नक्कीच उद्युक्त होतो व परत एकदा अभिमानास्पद आनंदाची अनुभूती होते.
-
"जन्म जन्मांचा हा योगी,
विरागी म्हणू की म्हणू भोगी,
शैलासुता संगे गंगा मस्तकी वाहे"
हातात नानाविध शस्त्रे धारण केलेले हे रुप अत्यंत अभयदायक अन माझ्याप्रती शांत जाणवते. खरोखर निर्भय वाटते. आता निर्भयता कशापासून तर वाघ-सिंह-चोरांपासून नव्हे तर भीती, उन्माद,औदासिन्य व अन्य मानसिक क्लेशांपासून ही देवता माझे संरक्षण करेलच असा विश्वास वाटतो.
मग सुरु होतात नामे अन प्रत्येक नामागणिक सौंदर्य अन शिव तत्वाचा धबधबा. शंकराच्या प्रत्येक नामस्मरणा बरोबर त्याच्यावर अभिषेक केल्याचे समाधान मिळते.
"विश्वलोचन:, विश्ववक्त्र" ही नावे घ्या किंवा "जगदेकप्रभूस्वामी:, जगद्वन्द्यो:, जगन्मया:, जगदानन्दो, जगत्प्रिय" ही नावे घ्या, संपूर्ण जगाचे नियमन करणार्या शक्तीस शरण जात आहोत ही भावना या स्मरणातून दृढ होते अन बरोबर हा विश्वास की इतक्या सत्ताधारी शक्तीचे वरदहस्त आपल्यावर आहे आणि मग काय बिशाद आहे कुणी आपले वाकडे करण्याची? अर्थात -
"समर्थाचिया सेवका वक्त्र पाहे,
असा सर्व भूमंडळी कोण आहे?"
अशा प्रकारचा आत्मविश्वास येउ लागतो. आता हा आत्मविश्वास चांगला की वाईट हे प्रत्येकाने आपलेआपण ठरवावे पण हा प्लासिबो इफ़ेक्ट जरूर जाणवतो.
"मृत्युंजयो, मृत्युमृत्युरपमृत्युविनाशक,
दुष्टमृत्यरदुShTeष्ट:, मृत्युहा, मृत्युपूजित:"
ही नावे भित्र्या मनाला खूप आधार देतात. अनेकदा काहीबाही अर्थात लोकांचे अपमृत्यू, घोरामृत्यू ऐकलेले असते पाहिलेले असते, मनाने धास्ती घेतलेली असते. या ओळी म्हणताना, निदान एक दिलासा मिळतो की कोणीतरी ऐकणारे आहे, व हे माझी भीती ऐकून घेणारी शक्ती इतकी शक्तिवान आहे की साक्षात काळ त्याची पूजा करतो - मृत्युपूजित:. आपण आपले म्हणणे तर मांडले नाउ ball इज इन हिज कोर्ट सो relax .
नीतीमान, सत्यो, सत्यवाक्यो, धर्मवेत्ता,सत्यज्ञ,सत्यवित्तम:, धर्मवान,धर्मनिपुणो, धर्मो, धर्मप्रवर्तक,नीतीस्वरुपो,नितीसंश्रय:
लहानपणापासून केलेल्या संस्कारांची उजळणी तर होतेच पण त्यांना दुजोरा मिळतो. जर मी पूजाणारी देवता ही मूल्ये धारण करते तर मलाही त्याच वाटेवरुन मार्गाक्रमण केले पाहिजे ही श्रद्धा दृढ होते.
अन शेवटी मेंदॊचा अजून एक भाग प्रकाशित होतो तो आहे काव्याआस्वादाचा. आजकाल तर हृदयाची लय, स्पंदने मोजता येतात, माणसाची शारीरिक निरामयता मोजता येते. मग सौदार्यास्वाद का मोजता येउ नये? सत्य, शिव, सौंदर्य ही मूल्ये आपण शाश्वत मानतो. सहस्त्रानामातील अनेक नामे मेंदुतील सौद्र्यास्वादाचे क्षेत्र निव्वळ उजळून टाकणारी आहेत, उदा - महानाट्यविशारद:, सोमसूर्याग्निलोचन:, लावण्याराशी:, भक्तकल्पतरू वगैरे.
मेंदूची इतकी कार्यक्षेत्रे कार्यान्वित करणार्या, उजळवून टाकणार्या , या साधनेचे सम्यक फायदे पहाण्यासाठी तुम्ही कोणी neuroscientist असण्याची अजिबात गरज नाही.
सारीका यांचा नि इतर प्रतिसाद
सारीका यांचा नि इतर प्रतिसाद वाचून खालील विचार मनात आले.
१. देव, धर्म, देश, जात, प्रांत, इ इ च्या अश्रद्धांचे प्रकार असतात. एक म्हणजे तांत्रिक अश्रद्धा. Technical and scientific conclusion. देव, इ आहे असा निष्कर्षच काढता येत नाही म्हणून अश्रद्ध.
२. दुसरी म्हणजे सामाजिक अश्रद्धा. पहिला निष्कर्ष निघालेला असो वा नसो, हे सगळे मानवजातीसाठी घातक, वाईट आहे म्हणून अश्रद्धा.
३. या अनैसर्गिक, अभौतिक, कृत्रिम संकल्पनांनंतर प्रश्न येतो मानवी मूल्यांबद्दलच्या अश्रद्धांचा. त्याग करणे, प्रेम करणे, कष्ट करणे, नियम पाळणे, इ इ असे सगळे चांगले गुण आहेत व चोरी करणे, खोटे बोलणे, फसवणे, हानी करणे, अपमान करणे, इ इ असे सगळे वाईट गुण आहेत यांवरील तांत्रिक अश्रद्धा. म्हणजे काय चांगले मानावे, काय वाईट मानावे आणि एकदा त्याचे निकष ठरवले कि कोणते वर्तन चांगले नि कोणते वाईट हे कसे ठरवावे याला काहीही आधार नाही असे मानणे.
४. यानंतर मूल्यांवर तांत्रिक अश्रद्धा असो वा नसो, सर्वमान्य चांगली आत्मिक, कौटुंबिक नि सामाजिक मूल्ये फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पजेस हितावह आहेत याबद्दलही अश्रद्धा. म्हणजे इन जनरल त्याग करणे हे कसे हे ठरवता येत नसताना, पालकांनी लहान बाळासाठी १ वर्ष करीयर बाजूला ठेवावे, रहदारीचे नियम पाळावे, म्हणा, इ सर्वमान्य मूल्याबद्दल अश्रद्धा.
फक्त 'देव आहे' याबद्दलच बोलून आपण आपल्याला सश्रद्ध, अश्रद्ध असे विशेषण लावतो. पण त्याची किमान वरील चार डायमेंशन्स असावीत. मला वाटते कि माणूस हा रिजिड सश्रद्ध वा अश्रद्ध नसतो. त्याच्या अनंत श्रद्धा काळाप्रमाणे हेलकावे खात असतात.
इथे कोणी कोण्या मेजर बाबतीत अश्रद्धाचा सश्रद्ध वा सश्रद्धाचा अश्रद्ध झाला आहे का? केवळ प्रसंगाचा झटका म्हणून ? केवळ एक नविन निरीक्षण झाले म्हणून? कोणी केवळ कोण्या एक विषयावर फक्त विचार करून, विचाराअंती, आपली कोणती मोठी श्रद्धा बदलली आहे का?
अदिती म्हणते कि तिची कृष्णावर, अध्यात्मात, इ श्रद्धा नाही पण तिला मीरेचे भजन आवडते नि सारीका म्हणते कि 'मागे उभा मंगेश' ऐकताना ती खरोखरच तो मंगेश विश्वकारणाशी कनेक्टेड एक घटक आहे असे मानते. कोण्या कारणाने त्यांची भूमिका स्वॅप होऊ शकते का?
काही "नियर डेथ
काही "नियर डेथ एक्स्पिरीअन्सेज" (http://www.near-death.com) या साइटवरती अश्रद्ध व्यक्ती मृत्युच्या अनुभवानंतर सश्रद्ध झाल्याचे वाचले होते.
हेलकावे
इथे कोणी कोण्या मेजर बाबतीत अश्रद्धाचा सश्रद्ध वा सश्रद्धाचा अश्रद्ध झाला आहे का? केवळ प्रसंगाचा झटका म्हणून ?
मी कॉलेजात असेपर्यंत प्रचंड सश्रद्ध होतो. मात्र हळूहळू अश्रद्ध होऊ लागलो असे वाटते. हे कोण्या एका प्रसंगाचा झटका म्हणून नक्कीच झालेले नाही. मात्र अद्यापि मी पूर्णपणे अश्रद्ध नाही. 'लेफ्ट ऑफ द सेंटर' म्हणतात त्याप्रमाणे सश्रद्धांपेक्षा अश्रद्ध मात्र पूर्णपणे नास्तिक नाही अशी माझी सद्यस्थिती आहे. एखाद्या दिवशी किंचित सश्रद्ध होण्याचे हेलकावे मी खात असतो. मानवी अस्तित्वाला कारणीभूत आणि विज्ञानाला अनाकलनीय अशी एक दिव्य शक्ती अस्तित्वात आहे असे मला मनापासून वाटते मात्र ती शक्ती कोणत्याही मूर्तीत-फोटूत किंवा कबरीत निश्चितच नाही इतपत खात्री होण्याइतपत मी अश्रद्ध झालो आहे . मूर्ती-फोटो-मंदिर-कर्मकांडे वगैरेंचा उबग येऊन अश्रद्धपणाकडे हेलकावा जात असतो.
नाही
म्हणजे सोनिया गांधी म्हणायचय का आपल्याला?
आपणास सोनिया गांधी दिव्य शक्ती वाटतात हे वाचून आनंद जाहला. मात्र आम्हांस सोनिया गांधी म्हणायचे असते तर आम्ही सोनिया गांधीच म्हटले नसते का? की सोनिया गांधी हे नाव घेण्यास 'अबकी बार...' नुसार बंदी आहे? अद्याप असलेल्या माहितीनुसार 16 मे पर्यंत आम्हास अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे असे वाटते.
मी धार्मिक,सश्रद्ध व काही
मी धार्मिक,सश्रद्ध व काही अंशी सनातनी ग्रामीण कुटुंबातून आलेलो आहे. अतिशहाणा म्हणतात तसे बदल माझ्यात हळू हळू झाले. नंतर मी माझ्यातल्या काही अश्रद्धतेचीही चिकित्सा केली. त्याच्या छटा बदलत असतात. मला झालेल्या आयबीएस च्या त्रासामुळे पोटाचे डॉक्टर व सायकियाट्रिस्ट शी संबंध आला. त्याविषयी मी इथे लिहिले आहे. त्यानिमित्त माझ्यात हळुहळु बदल झाले.तसाही मी सराईत व निर्ढावलेला अश्रद्ध नव्हतोच पण जो काही अश्रद्धतेचा भाग होता व आहे त्याची चिकित्सा ही सातत्याने निरंतर होणारी प्रक्रिया आहे त्यातून माझ्यातली जी काही अश्रद्ध आहे तिचा माज कमी झाला असे माझे मला जाणवते.मनात,मेंदुतला माणुस,मेंदुच्या मनात या पुस्तकांचाही त्यात वाटा आहेच. मला प्रतिमांमधे अडकण्याचे भय नेहमी वाटते. असो.
आवडला
नानावटी, तुमचा लेख आवडला. अशा गोष्टींचाही वैज्ञानिक अभ्यास होतो आहे हे आणखीनच आवडले. वर म्हटल्याप्रमाणे तरुण असताना मीही एक अश्रद्ध एडकाच होतो. पण जसजशी आयुष्याची वर्षे गेली, अनुभव गांठी जमा झाला, तसतसा असा विचार करु लागलो की आपल्याला जे पटते ते आपण करावे. आजुबाजुचे जे वागत आहेत ते बरोबर की चूक, हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला नाही. किंबहुना, त्यातून त्यांना मानसिक समाधान मिळत असेल तर त्यावर वाद घालू नये. पण अगदी टोकाच्या वेळी, एखाद्याचे प्राण जर वैद्यकीय उपचारांनी वाचत असतील असा रोगी, जर नुसत्या अंगार्याने मी बरा होईन असे म्हणू लागला (तोही जवळचा नातेवाईक असेल तर} तरच प्रतिवाद करावा.
तिरशिंगराव, अश्रद्ध एडका
तिरशिंगराव, अश्रद्ध एडका शब्दप्रयोग जाम आवडला गेल्या आहे. तुम्ही आमच्या या प्रतिसादातील एडका होता की काय?
बाकी तुमच्या प्रतिक्रियेशी सहअनुभूत आहे
छान लेख.
अगदी समतोल (balanced) असा लेख लिहिला आहे. श्रद्धा हा विवेक आणि बुद्धीमत्ता यांच्यातून तयार झालेला आहे का मनाच्या भावनांचा व्यवहार आहे, याचे उत्तर शोधण्याचा जो प्रयत्न चालू आहे, त्याबद्दल सुरेख माहिती मिळाली. (आणि मुख्य म्हणजे सरळसोप्या शब्दात, कुठलीही १ बाजू न घेता) त्याबद्दल आभारी आहे. या कारणामुळे मला नानावटींचे लेख आवडतात.
काही वैज्ञानिक श्रद्धेबद्दल गंभीरपणे अभ्यास करत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. मध्यंतरी वाचले होते की मानवी मेंदूचा अभ्यास करण्यासाठी आता fMRI हे तंत्र वापरतात. (दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यात fMRI चा मुख्य उद्देश, मानवी मेंदू जाणून घेऊन मार्केटिंगसाठी तो कसा मॅनिपुलेट करता येईल, हा होता.) प्लॅसिबो इफेक्टमुळे कदाचित चांगला फायदा होतही असेल. पण त्याच्यावर कितपत आणि कुठपर्यंत अवलंबून राहायचे, हापण खरा कळीचा मुद्दा आहे.
लेख आवडला नाही
का हो नानावटी एक गोष्ट सांगा.समजा आपल्यापुढे एखादा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.रूढार्थाने त्यातून निभावून जायची गणिती शक्यता म्हणाल तर ती जवळपास शून्य.तरीही मी यातून बाहेर पडणारच (समोर दिसत असले की ते जवळपास अशक्य आहे) हे आपण स्वतःलाच बजावत असू आणि त्यातून संकटातून आपण पार पडू असे बळ आपल्याला मिळत असेल तर ती श्रध्दा की प्लसेबू? जर कोणाला असे बळ देवाच्या मूर्तीकडे बघून असे बळ कोणाला मिळत असेल तर त्यात काय वाईट आहे? थ्री इडियटमध्ये आमीर खान स्वतःच्या हृदयावर हात ठेऊन म्हणतो--आल इज वेल म्हणजे सर्वकाही ठिक होईल या भावनेतून संकटाविरूध्द लढायचे बळ मिळल्त असेल तर त्यात काय वाईट आहे?
या अतिवैज्ञानिक लोकांपैकी बहुसंख्य लोकांच्या हुशार्या सगळे काही आलबेल असते तोपर्यंत असतात.एखादे मोठे संकट आले की आपोआप त्यांचे हातही देवाच्या मूर्तीपुढेच जोडले जातात याविषयी तुम्हाला काय म्हणायचे आहे?
मला धर्म-देव या प्रकारात फार रस नाही.तरीही इतरांच्या श्रध्देची अशी थट्टा केलेली मात्र अजिबात आवडत नाही.
हास्यास्पद गोष्टींची थट्टाच केली पाहिजे.
तरीही इतरांच्या श्रध्देची अशी थट्टा केलेली मात्र अजिबात आवडत नाही.
डॉकिन्स आठवला.
श्रद्धावानांची चेष्टाच का केली पाहिजे तेही आठवले.
सध्या इथे बडवायचा टंकाळा आहे. पण या घिस्यापिट्या श्रद्धावानांच्या हास्यास्पद श्रद्धांचे समर्थन वाचले की रहावत नाही, म्हणून हा प्रतिसाद.
एखाद्या गोष्टीने जोवर हानी
एखाद्या गोष्टीने जोवर हानी होत नाही तोवर टीका करण्यात काय अर्थ आहे ते कळत नाही.
आणि तसेही, समजून न घेता एखाद्या न पटणार्या गोष्टीची नुसती खिल्ली उडवत राहणे हा अतिशय पोरकट प्रकार आहे. याचा इंटेंडेड इफेक्ट अगदी वेगळा होतो. समाजासाठी या गोष्टी आवश्यक आहेत असा दावा असेल तर उलट लोक त्यामुळे प्रबोधनापासून अजून दूर जातात. मग सश्रद्ध आणि अश्रद्ध अशी दोन वर्तुळे अजूनच वॉटरटाईट होतात.
हा प्रकार sponteneous
हा प्रकार sponteneous generation पेक्षा डेंजर वाटला.
अश्रद्ध लोक ज्यांच्यावर श्रद्धा ठेवत असतात ते महान महान शास्त्रज्ञ महान महान वचने बोलत असतात.
http://www.nbcnews.com/#/science/science-news/our-universe-real-maybe-i…
Canonization
Canonization असे म्हणणार होतो पण तेवढ्यात असा विचार केला कि नास्तिकांमधे संतपद मृत्युपुर्वीच बहाल करण्याची सोय असावी.
@ पिसाळलेला हत्ती तुम्ही हा
@ पिसाळलेला हत्ती
तुम्ही हा प्रश्न खरंतरं नानावटींना विचारला आहे, पण मला समजलेले उत्तर मी देतो.
समजा एका मुलाला परीक्षेला जायचं आहे आणि तिथे बरोबर/चूक असे प्रश्न विचारले जाणार आहेत. (objective type). अशावेळी घरातून निघताना त्याला त्याच्या आजीने हातावर दही दिले आणि सांगितले की तुला चांगले मार्क मिळतील. त्याच्यावर विश्वास ठेऊन तो गेला, तर हा झाला प्लॅसिबो इफेक्ट. (हा मनाचा खेळ आहे. त्याचा फायदा झाला की क्रेडिट दह्याला). समजा, त्याने गेल्या ५ वर्षांच्या जुन्या पेपर्सचा अभ्यास केला होता आणि त्याला साधारण अंदाज होता की अमुक विषय option ला टाकला, तरी मी पास होईन. तर ही झाली श्रद्धा. परीक्षेत त्याला कळले की त्याने अभ्यास केलेला काहीच परीक्षेत आले नाही. म्हणून त्याने randomly बरोबर/चूक उत्तरे लिहिली. त्याला ५०% मिळून तो पास झाला. एका गणितज्ञ/वैज्ञानिकाने परत-परत प्रयोग करून तोच रिझल्ट सिद्ध केले की प्रोबॅबिलिटीने त्यालाच काय, इतरांना पण ५०% टक्के मिळाले असते. हा झाला वैज्ञानिक द्रुष्टिकोन.
जमल्यास पुढील व्हिडिओ बघा. विशेषतः ७ मिनिटांनंतरचा. विज्ञान, धर्म आणि फिलॉसॉफीबद्दल एका वैज्ञानिकाचे विवेचन आहे. (अर्थात तो स्वतः म्हणतो, त्याप्रमाणे त्याच्यावरपण शंका घ्यायला हरकत नसावी. open mind मात्र हवा.)
When you doubt and ask, it becomes harder to believe. - फिनमन
I am not absolutely sure about any thing and there are many thing I don't know any thing about.
I don't have to know an answer. - फिनमन
धर्मशास्त्रे, उदा. मिताक्षरा,
In reply to भारतीय कायद्यातील बराच मोठा by बाळ सप्रे
धर्मशास्त्रे, उदा. मिताक्षरा, मनुस्मृती, इ. वारसाहक्काशी रिलेटेड भाग तर त्यांतूनच उचलला आहे. बाकीही काही नियम आहेत.