हर हर मोदी घर घर मोदी

हर हर मोदी..घर घर मोदी

हजारो वर्षांनी जेंव्हा भारताचा इतिहास लिहिला जाईल , तेंव्हा भारत म्हणजे फक्त गुजरात आणि पुराणपुरुष म्हणून आफकोर्स नरिंदर मोदी यांची नोंद होईल , पुढे तत्कालीन राष्ट्रगीताचा शोध घेता भो नरेंद्र मोदी भूप धन्य धन्य असे सर्वथा भूवरी....हे गाणे सापडेल कि काय अशी चमत्कारिक भीती चड्डीवाले आणि टिळ्यावाल्यांचे अजब गजब मोदी प्रचारतंत्र बघून या काळात सहज मनाला चाटून जातेय .असो. आणि नव इतिहासाचार्य ,फेकचंद मोदीसुद्धा लग्नच ठरत नसलेल्या पोरीच्या बापासारखे कुठल्याही कॉम्परमाईज़ला तयार होऊन , काहीच्या काही वक्तव्य करत आहेत , वा कार्यकर्त्यांनी केलेल्या वक्तव्याला मान डोलवून समर्थन देत आहेत . हर हर मोदीच्या घोषाला द्वारकेच्या शंकराचार्याने विरोध जाहीर केला आणि मग मोदी देखील ना चोल्बे ना चोल्बे म्हणू लागले . हर हर मोदि म्हटल्यामुळे यांच्या धार्मिक कम राजकीय भावना दुखावल्या आहेत . चड्डीवाले आणि टिळेवाले वगळून सुद्धा भाजप व मोदीला न मानणारे हिंदू आहेत व ते दुखावून विपरीत परिणाम होऊ शकतो हे आता यांच्या लक्षात आलेय . खरे तर , हर हर चा अर्थ दु:ख हरण कर हा एक आणि दुसरा ज्याचं नाव घेतलं त्याला , तू हर तू हर म्हणणे असा होतो. या दुसऱ्या अर्थाच्या गृहीत धरण्याने हर हर मोदीला विरोध करणारे शंकराचार्य भारतभूवरील पुरोगामी जीवाला फार काही पटत नाहीत . त्यांनी मोदीविरोधी फतवा काढला आणि लगेच तो मान्य केला ? काय हे ?
आपल्या देशात चार शंकराचार्य आणि शे दिडशे उपशंकराचार्य आहेत त्या सगळ्यांची कॉमन मिटिंग घेऊन नरेंद्रमहाराज , भय्यू महाराज यांना अनुक्रमे अध्यक्ष उपाध्यक्ष नेमून सर्वांची मते भाजपाने विचारात घ्यायला हवी होती . तसे न करता एक शंकराचार्य सनातन धर्माच्या चिवट पालना पोटी उगी उगी कसे राहावे म्हणून खडबडून गडबडून भाजपला आत्मपरीक्षण करायला भाग पाडतो. आणि पक्ष ऐकतो .बाकीचे तसेच बाजूला. संघ आणि भाजपात लोकशाहीला किंमत नसल्याचे हे अजून एक ठळक उदाहरण.
यातून हिंदू धर्म प्रेमी लोकांची ‘दिले’ पक्षी काळजं अत्यंत हळवी असून तीस जपणे आय यम्पी आहे हे लक्षात आल्याने , आणून दिल्याने पुढील हर हर घोष मंदावला . हे हर हर मोदी कट्टर हिंदुत्ववादी ओबीसी नेते आहेत पण ते ओबोसींचे आहेत का ? तर नाही ! ९० च्या दशकात मंडल आयोगाचे आंदोलन चिघळले असताना ओबोसिंना उघड विरोध करणारा केजरीवाल बोवा आपण पाहिलाय , तर त्याच वेळी आंदोलनाला समर्थन न देता चीरवृद्ध अडवाणी (हे चीरतरुण च्या धर्तीवर. मागील २० वर्षापासून हे असेच दिसतात !) यांच्या नेतृत्वाखाली राममंदिरासाठी विटा गोळा करण्यात मोदी धन्यता मानत होते .हे ही आपण पाहिलेय . असे हे गुजरातचे लाल नरिंदर मोदी ! दलित आदिवासी ओबीसी शोषित वंचित समाजाचे कधी होणे शक्य आहे काय ? गुजरातच्या प्रगतीचा खरा चेहरा तिथल्या ग्रामीण भागात स्पष्ट दिसतो तो बघण्याची दृष्टी महाराष्ट्रातल्या राज ठाकरे , सदृश गुजराती प्रगतीचे गोडवे गाणाऱ्या इथल्या सेना भाजपा राजकीय नेतृत्व टोळीकडे नाही .
भारतीय राजकारणाला आणि समाजकारणाला नियंत्रित करू पाहणारी एक कुटील यंत्रणा म्हणजे राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ .भारतातील अर्थकारण, समाजकारण, परराष्ट्र धोरण, शिक्षण यासंबंधीची धोरणे ठरविण्यात संघसेवकाचा प्रमुख सहभाग असतो हे उघड आहे .यामुळे संघाच्या ब्राह्मण राष्ट्रवादाला अनुकूल अशा पक्षाचेच राज्य केंद्रात सत्तास्थानी असावे अशी रणनीती रा.स्व.संघामार्फत आतापर्यंत आखली गेली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातले मुख्य लोक, पहिल्या फळीचे कलाकार म्हणजे बिल्डर त्यांच्या विचारधारेचे मुख्यमंत्री म्हणजे गंवडी आणि त्यांचा पंतप्रधान म्हणजे संघ सांगेल त्या पद्धतीने काम करणारा सहा-अभियंता ! भारताची विद्यमान राज्यघटना बदलवून धर्माधिष्ठीत राज्यव्यवस्था प्रस्थापित करणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुख्य अजेंडा . या मुख्य अजेंड्याच्या ध्यासा हव्यासा पायी अजून तरी कॉंग्रेसच सत्तेत टिकून आहे. खरे तर कॉंग्रेसने याबद्दल संघाचे आभारच मानले पाहिजेत .असो मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, दलित आदिवासी आणि इतर विवेकवादी लोक अद्याप कॉंग्रेस कडेच आशा लावून बसले आहेत. नौटंकी केजरीवाल बाबूची हवा फार काही गारवा देऊ शकत नाही हे बाबूने अल्पकाळ मुखमंत्री बनून विविध रोड शो , आरडा ओरडा , आदळआपट करून दाखवले आहेच .
संघपरिवारातील संघटनांबरोबर हिंदुराष्ट्रवादाचा राकीस कायम उभा असल्यामुळे काँग्रेस आपली तारणहार आहे असा विश्वास दलित-मुस्लिमांना अद्याप वाटतो आहे. तसेच काँग्रेसचे अस्तित्व टिकवून धरण्यास दलित-आदिवासी आणि मुस्लिम-ख्रिश्चनांचा मुख्य वाटा राहिला आहे. ही देखील अत्यंत महत्वाची बाब आहे . काँग्रेस मात्र याबदल्यात या समाजघटकांना अद्याप भरीव काही देऊ शकलेली नाही . हे कडवे वास्तव आहे , कॉंग्रेसने देखील प्रचंड आत्मपरीक्षण करण्याची आज गरज आहे . सामाजिक आणि आर्थिक विषमतेच्या वरंवट्याखाली असलेल्या खूप मोठ्या समाजघटकाची परिस्थिती निरक्षरता, बेरोजगारी, उपासमार, जातीय व धार्मिक अत्याचार यांनी वेढलेली आहे .यावर उपाययोजना करून या समाजघटकांचे जगणे सुसह्य व्हावे यासाठी काँग्रेसने प्रभावशाली उपाय योजलेले नाहीत. हिंदुत्ववाद्यांचे, दहशतवाद्यांचे भय दाखवून आम्हीच केवळ तुमचा उद्धार करू शकतो अशा दाव्याला काँग्रेस प्रभावी पणे उतरलेली नाही.. या समाजघटकांचा मुख्य शत्रू संघ मोदी व भाजप आहे यात शंका नाही , परंतु दगडा पेक्षा वीट मऊ या न्यायाने म्हटले तरी शेवटाला वीट देखील लागतेच. भाजपा आणि कॉंग्रेस एकमेकांचे विरोधी पक्ष असले तरी त्यांची रणनीती ही संघाला पोषक ठरणारी दिसते.. नाहीतर गुजरातमधली खरी परिस्थिती तिथल्या कॉंग्रेसने प्रभावीपणे समोर आणली असती. ही बाब भारतातील मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन आणि दलित आदिवासींच्या लक्षात येत नाही असा समज कॉंग्रेसने करून घेण्याची आवश्यकता नाही
सध्या भाजपात गोंधळाचे वातावरण भलतेच जोरदार आहे आणि ही चांगली गोष्ट आहे . भाजपातल्या जेष्ठ नेत्यांच्या राजकारणाला आखरी घर घर लागल्याचे चित्र स्पष्ट दिसते आहे . म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान म्हणून हौसेने उभे राहिलेल्या चीरवृद्ध अडवाणींना जाय तिकडं उभा राहा म्हणून बाजुले सारले आहे. मोदींना तशा अर्थाने कृतघ्न म्हणता येणार नाही . कारण मोदींनी जशी अडवाणींना वेळोवेळी मदत केली, तसे अडवाणींनीही मोदींच्या सर्व राजकीय चुकांवर पांघरूण घालण्याचे काम काल टाक्टोर इमानेइतबारे केलेले आहेच . 2009च्या लोकसभा निवडणुकीत चीरवृद्धाची ‘लोहपुरुष’ प्रतिमा मेणपुरुष झाली. आणि भाजपची तेंव्हा पासून सगळीकडची अवस्था ही मुंडी छाटेल कोंबडी सारखी फड फड फड फड अशी...राहिली. पदरी पडलेल्या अपयशामुळे संघाची भाजपवरील पकड अधिक घट्ट होत गेली, पण हे पराभव होऊनही अडवाणींनी आपल्या उग्र हिंदुत्ववादी राजकारणाला ओबीसी असूनही पुढे घेऊन जाणारा येडपट नेता म्हणून मोदींची साथ सोडली नव्हती. त्यांनी गुजरात दंगलप्रकरणी मोदींची निर्लज्ज पाठराखण केली. या मिलीभगतला दीर्घकालीन राजकारणात फार अर्थ न्ह्व्ताच. चीरवृद्ध जसे पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा बाळगून होते, तसा चहावालाही होता . त्यामुळे सत्ता जवळच दिसताच चहावाल्या मोदींनीच अडवाणींपुढे आव्हान उभे केले.
नरिंदर मोदीच्या या खेळीने भाजपा मधली डंगरी ग्यांग जायबंदी झाली आणि चीरवृद्ध पंतप्रधानपदाचे फक्त थ्री डी ख्वाब बघत दिवस घालवू लागले , म्हाताऱ्या ग्यांग्चे पुढारी झाले . आता दुबळे राजकारण करणारी म्हातारी ग्यांग फार प्रभावशाली नाही पण पारड्यात डावे उजवे करू शकत असल्याने त्यांना थोडे चुचकारले जातेय . समजा (फक्त समजा ) दोन महिन्यांनी मोदीशेठ पंतप्रधान झालेच तर , चीरवृद्ध अडवाणी सुषमा, जसवंतसिंह व अन्य ज्येष्ठ नेत्यांना मोदींशी जुळवून घेताना नाकी नव येणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे ते फार काही उत्सुक कृती करत नाही . भाजपातल्या म्हाताऱ्या ग्यांगकडे गर्दी नाही , आणि आता मंदिर वही बनायेंगे म्हटल्याने सत्ता नाही पण जोड्याचीच शक्यता वाढलीय . म्हणूनच गर्दी हरवलेला सोफ्ट ओल्ड म्याण गांधीनगरमधून उभा राहिल्यास तो प्रचंड मताधिक्याने निवडून येइल , अशी खात्री कुणी जाणता देत नाही. उलट तो हरल्यास मोदींची डोकेदुखी कायमची जाईल, असेच बोलले जात आहे.
ओल्ड म्याण यांनी भोपाळमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली यात मोदींचे समर्थक आपला पराभव करू शकतात ही भीती स्पष्ट आहे. या भीतीपोटीच त्यांनी भोपाळ हा सुरक्षित मतदारसंघ निवडला होता. गांधीनगरमध्ये पराभव पत्करावा लागला तर पक्षातील स्थान दुबळे होऊन आपण आपोआप पंतप्रधानपदाच्या स्पर्धेतून बाहेर फेकले जाऊ, असे त्यांना वाटणे स्वाभाविक आहे. आणि म्हातारपणात हि नामुष्की म्हणजे तोबा तोबा तोबा... अशी बरीच बड्या बुजुर्गांची मानसिक स्थिती गोंधळलेपणाची आहे .आणि म्हणून सध्या संघ भाजपात वादळ उठले आहे. याचा फायदा घेत कॉंग्रेसने सुव्यवस्थित रणनीती आखून संविधान विरोधी असलेल्या ,प्रचंड जातीयवादी भाजपला शह द्यायला हवा .

दैनिक दिव्य मराठी दि . ३०/३/२०१४
प्रा. सतीश वाघमारे .

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
1.5
Your rating: None Average: 1.5 (4 votes)

नमो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

खोडी करून आलेल्या पोराला बाप जसा हाताखाली घेतो तसा लेख लिहिला आहे. कोणत्या पक्षाने काय करावे वा लेखकाच्या विचारांशी साधर्म्य असणार्‍या वाचकाने काय करावे याबद्दल कोणताच दृष्टीकोन दिसत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सगळ्यात इंटरेस्टिंग वाटला.

दैनिक दिव्य मराठी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे नांव वाचायला गमतीदार दिसत असलं, तरी दैनिक भास्कर ग्रूपचे ते मराठी दैनिक आहे, व मराठवाडा, विदर्भ व खानदेशात तरी बर्‍यापैकी लोकप्रिय होत आहे. प्रकाशन दर्जेदार आहे. टॅब्लॉईड अथवा चिरगुट प्रकारचे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

नाव वाचायला गमतीदारचा प्रश्न नाही.. असो.

http://divyamarathi.bhaskar.com/editors/
हे पाहता फारच दर्जेदार असणार... आणि अनबायस्ड सुद्धा!! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिव्य मराठीला अप्प्लाय करताना जे CV या लोकांनी पाठवले तेच पेस्ट केलेत. प्रथमपुरुषी वाक्यरचना पाहून लोक काय असतील याची कल्पना यावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

कुमार केतकर आणि दर्जा

हे दोन शब्द एकत्र येऊ शकत नाहीत.

झालेच तर कुमार केत्कर आणि लाचारी अशी जोडी होऊ शकते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाघमारे साहेब, तुम्ही अ‍ॅड हॉमिनिझम मधे स्पेशलायझेशन केलेले आहे का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे काय?
होमिनिझम गूगलून हे सापडले :

hom·i·nism
noun \-ˌnizəm\
-s
Full Definition of HOMINISM
: pragmatic humanism that regards man as only a highly differentiated animal
Origin of HOMINISM
homin- + -ism

शिवाय गूगलने हे देखिल विचारले :

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

ह्म्म.

दुसरा अर्थ लागू आहे. अ‍ॅड होमिनेम हे आर्ग्युमेंट चे विशेषण. अ‍ॅड होमिनिझम म्हंजे "the act of indulging in ad hominem argument"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हाला 'अ‍ॅड होमिनेमिझम' म्हणायचे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यामुळे संघाच्या ब्राह्मण राष्ट्रवादाला हे असं मिदियात इतरत्रही ह्या धर्तीवर उल्लेखलेलं दिसतं.
त्यामुळे गोंधळून जायला होतं.
माझ्या माहितीप्रमाणे संघाच्या शाखेमध्ये गेल्यावर जात पात विचारत नाहित. विचारलेली चालत नाही.
तिथल्या जितक्या लोकांशी मी बोललो; तिथेही जातींचा असा वेगळा उल्लेख दिसला नाही.
(त्या लोकांचं स्वतःचंही म्हणणं आहे की जातिव्यवस्था वाईट आहे.
http://magazine.evivek.com/?p=5268
)
इतके असून " जातीयवादी " असे संघ परिवार आणि त्याच्या extension ने भाजपला का बोलले जाते ?
फार तर ह्यांना अभिमानांध, धर्मांध वगैरे म्हणता येइल. पण जातीयवादी कसे ?
त्याहून महत्वाचे म्हणजे ब्राम्हणी कसे ?
( "संघ मुस्लिमांचा द्वेष करतो " हे गृहितक धरल्यास.)
जातीची गणितं करण्यात सर्वाधिक पटाइत स्वातंत्र्योत्तर काँग्रेसच आहे.
पण त्यांना कोणी "जातीयवादी" का म्हणत नाही ?
.
.
ह्याचा अर्थ माझं संघ , परिवार वगैरेबद्दल फारच अनुकूल मत आहे असा कृपया घेउ नका.
मी समर्थक , कार्यकर्ता किंवा त्यांचा सहानुभूतीदार वगैरे अज्याबात नाही. इतर दोन चार धाग्यांवर मी त्याही मंडळींबद्दल
मला असलेले इतर प्रश्न, शंका विचारल्या आहेत.
(हे सांगणं भाग आहे; नाहीतर "अजून एका प्रचारकाचा प्रतिसाद" असे समजून दुर्लक्ष केले जाउ शकते.)
.
.
माझी शंका टंकण्यासाठी दिलेली संधी इतकेच म्हणून पहात आहे.मूळ धाग्यावर ह्याउप्पर अधिक टिप्पणी देउ शकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मी एबीव्हीपीत होतो. संघाच्या इतरही अनेक संघटनांशी माझा संबंध आला आहे. संघात जात विचारली जात नाही, हे खरे आहे. पण संघ जातीयवादी नाही, हे खोटे आहे. याचे कारण मोठे चमत्कारिक आहे. संघाला जातींशी देणे-घेणे नाही. संघाचे काम ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर या तत्त्वावर चालते. "आपले" आणि "इतर" अशी ही विभागणी आहे.

ब्राह्मण कोण आणि ब्राह्मणेतर कोण हे ओळखायला जात विचारायची गरज पडत नाही. शिवय संघ आणि संघ संघटनांत काम करणारे सर्व ब्राह्मण पारिवारिक पातळीवर जोडलेले असतात. त्यांचे एक स्वतंत्र सर्कल असते. या सर्कलमध्ये कोणीही आगंतूक घुसू शकत नाही. त्यामुळे ब्राह्मण-ब्राह्मणेतर यांची ओळख पटवून घेण्यात गफलत होत नाही.

संघाची बांधणी पूर्णत: ब्राह्मणी आहे. संघाच्या प्रमुखापासून तो कनिष्ठ पदाधिका-यापर्यंत सर्व जण जातीने ब्राह्मण आहेत. इतकेच काय, मी जेव्हा संघाशी संबंधित होतो, तेव्हा संघाच्या कार्यालताील सर्व कर्मचारी वर्गही ब्राह्मणच होता. ही स्थिती बदलली असेल, असे मला वाटत नाही. संघाच्या सर्व ठिकाणच्या कार्यालयांत हीच "ब्राह्मणी बांधणी" टिकवून ठेवण्यात आलेली आहे.

प्रत्यक्ष लोकांत जाऊन काम करणा-या संघ संघटनांत ब्राह्मणेतर चेहरे आहेत. त्यातही ओबीसींना प्राधान्य आहे. पण त्यांच्या हाती निर्णय प्रक्रियेची सूत्रे नाहीत. निर्णय प्रक्रिया ब्राह्मणांच्याच नियंत्रणात आहे. या संघटनांच्या पदाधिका-यांच्या दोन-दोन बैठका होतात, असा माझा अनुभव आहे. ब्राह्मण पदाधिका-यांची बैठक स्वतंत्रपणे होते. ही बैठक गोपनीय असते. महत्त्वाचे निर्णय या बैठकीत होतात. सर्व पदाधिकारी असलेल्या कार्यकारिणीची बैठक औपचारिक असते. ब्राह्मण पदाधिका-यांच्या बैठकीतील निर्णयावर कार्यकारिणीच्या बैठकीत शिक्कामोर्तब होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब्राह्मण पदाधिका-यांची बैठक स्वतंत्रपणे होते. ही बैठक गोपनीय असते. महत्त्वाचे निर्णय या बैठकीत होतात. सर्व पदाधिकारी असलेल्या कार्यकारिणीची बैठक औपचारिक असते.

आपल्याकडे या विषया संदर्भातील काही विदा आहे का ? म्हणजे अमुक इतक्या ब्राह्मण पदाधिकार्‍यांच्या बैठका झाल्यावर इतक्या सर्व पदाधिकारी असलेल्या कार्यकारिणीच्या बैठका होतात ? दोन्ही बैठकात विषय तेच असतात की दुसरर्‍या बैठकीत नुसते निवेदन असते ( कारण निर्णय अगोदरच झालेला असतो )
ब्राह्मण पदाधिकार्‍यांसाठी काही विशेष प्रशिक्षण असते का ? ते ब्राह्मणेतर पदाधिकार्‍यांना चुकवून कसे काय दिले जाते ?
तुम्ही इतक्या आत्मविश्वासाने लिहले आहे, तुम्हाला आतल्या गोटातील नक्किच माहीती असणार ! म्हणून तुम्हाला विचारले आहे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्याकडे या विषया संदर्भातील काही विदा आहे का ? म्हणजे अमुक इतक्या ब्राह्मण पदाधिकार्‍यांच्या बैठका झाल्यावर इतक्या सर्व पदाधिकारी असलेल्या कार्यकारिणीच्या बैठका होतात?

माझे विवेचन माझ्या व्यक्तिगत अनुभवावर आधारित आहे. संघ आणि संघ संघटनांनी जाहीर केलेली ही माहिती नव्हे. अशी माहिती विशेषत: बैठकांची आकडेवारी जाहीर करायला संघवाले दुधखुळे आहेत काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी दोन एक वर्षं शाखेत जायचो, तिथं दरवर्षी कोजागिरी पोर्णिमेला मसाला दूध पिण्याच्या कार्यक्रमाला कधिही शाखेत न येणारे, ब्राह्मण आळीतले अनेक हिंदूत्वबंबाळ चेहरे दिसायचे ,यावरुन संघ व हंगामी संघिष्ट लोक 'दूधखुळे' असतात असा निष्कर्ष काढायला हरकत नसावी...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

हंगामी संघिष्ट लोक 'दूधखुळे' असतात असा निष्कर्ष काढायला हरकत नसावी.

संघिष्ट? संबोधन चांगले आहे. संघवाल्यांना संघोटे असेही एक संबोधन वापरले जाते. हे संबोधन अलिकडे फारच लोकप्रिय झालेले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आर एस एस चा माझा पाचदा संबंध आला.
१. पहिल्यांदा लातूरच्या भूकंपावेळी. या लोकांनी त्यावेळेस भूकंपग्रस्तांची बरीच सेवा केली. जिथे भूकंप झाला तिथे ब्राह्मण नव्हतेच म्हणून ते ब्राह्मणांची सेवा करायला आले होते असे तर नक्कीच म्हणता येणार नाही. हे लोक खूप चांगले आहेत असा सर्वांचा फीडबॅक होता.
यातले काही लोक किल्लारीवरून पुणे वा औरंगाबादला जाताना उदगीरवरुन जात. तिथल्या एका मठात थांबले असताना एका लिंगायत माणसाची आणि त्यांची चर्चा मी ऐकली होती. तो लिंगायत म्हणत होता कि आम्ही वेगळ्या धर्माचे आहोत आणि हे म्हणत होते कि तुम्ही हिंदू आहात. लिंगायत प्रतिवादी फारच हुशार होता आणि त्याची बाजू सरस झाल्यावर, तो गेल्यावर, तिथे थांबलेला मी कोण आहे हे माहित नसताना, या लोकांनी चांगलाच जळफळाट व्यक्त केला होता. पुढच्या लातूरच्या भूकंपाला हे लोक लिंगायत धर्माचा (?) प्रचंड अभ्यास करुन येणार हे नक्की.
२. मी औरंगाबादला, दुसरे काही काम नाही म्हणून, त्यांच्या एका स्किल बिल्डींग कँपला गेलो होतो (मला कोणी धाडले होते. नाहीतर इतका सामाजिक इनिशिअटीव नाही दाखवत मी.). माझ्यावर तेव्हा त्यांचे चांगले इंप्रेशन पडले होते. ही मंडळी संज्ञा चूकीच्या वापरतात (म्हणजे उठून कुणालाही हिंदू म्हणणे, इ) पण मनाने चांगले आहेत, सर्वांना समान वागवतात, जातीयवादी नाहीत, इ इ. पण तिथे वेगळीच गोची झाली. देव धर्म जप ताप याबद्दल काही सांगतील म्हणून आमचा एक पाहुणा माझ्या बरोबर आला होता. ४-५ दिवसात ना कोण्या देवाचे नाव, ना कोणता विधी पाहून तो प्रचंड संतापला आणि त्याने संघाचा कायमचा त्याग (तिरस्कारही) केला.
३. औरंगाबादच्या शिबिरानंतर लातूरला भावाच्या नोकरीसाठी आम्ही दोघे तिथल्या विवेकानंद रुग्णालयात गेलो. साधी टायपिस्टची सुट्टीत १-२ महिने नोकरी करायची होती. मी औरंगाबादच्या संघाचे कनेक्शन आहे म्हणालो. भाऊ 'शिवाय आम्ही ब्राह्मण आहोत' असे म्हणाला*. त्यामाणसाने आम्हाला अक्षरशः ढकलून हाकलून दिले. पण त्यापूर्वी चांगली ३० मिनिटे संघाच्या समावेशक हिंदुत्ववादावर लेक्चर दिले.
४. लातूरच्या अपमानानंतर मनात संघाबद्दल द्वेष निर्माण झाला होता. पण कॉलेजात एक सिनिअर संघी होता. तो ब्राह्मणच होता. तो आम्हाला संध्याकाळच्या शाखेला कधीमधी घेऊन जाई. म्हणजे ४ वर्षांत १५ दिवस गेलो असू. Friendly obligation म्हणून जावे लागायचे. या मुलाचा दलितांना संघात घ्यायचा प्रचंड अट्टाहास होता.
५. कॉलेजातच पुन्हा friendly obligations (आता त्या संघी बनलेल्या दलित मुलांच्या) मुळे आम्ही २ दिवसाच्या शिबिराला गेलो होतो. तिथली भडक** पोस्टर्स वगळता त्यात काही वाईट आढळले नाही. पण पुण्याच्या शिबिरापेक्षा औरंगाबादचे शिबिर १० पट सेक्यूलर होते असे म्हणेन.

माझ्या निरीक्षणाप्रमाणे, अशा जागच्या संघाच्या लोकांत ब्राह्मणांचा बराच भरणा होता. म्हणजे अर्धे लोक ब्राह्मण असावेत. पण जनरली देशप्रेम आणि हिंदुराष्ट्र या दोन कंपिटींग थीम्स असतात. म्हणजे अगदी ३-४ ब्राह्मणच एका घोळक्यात उभे असले तरी ते 'ब्राह्मण वि इतर' असा निंदापूर्वक वा कसाही संवाद करत नाहीत (जो एव्हाना मला बर्‍यापैकी आढळला आहे). पण प्रत्यक्ष संघातून बाहेर येऊन आपण जस जसे संघाच्या सहानुभूतीदारांकडे वळतो, त्यांची मते तिखट आणि ब्राह्मणवादी बनत जातात. पण संघाला लोक मिळत नसल्यामुळे कोणी काही का म्हणेना, संघ उघडपणे अशी सहानुभूती नाकारत नाही. संघात सगळी जेवणे शाकाहारी असतात, संस्कृतच्या ज्ञानाला (अचानक) महत्त्व येते (एरवी कोणी विचारत नाही.) तिथली केवळ हीच स्पष्ट ब्राह्मणी लक्षणे सांगता येतील.

आता प्रश्न राहिला संघाला ब्राह्मणबहुल आणि ब्राह्मणवादी म्हणायचा. मी जिथे जिथे काम केले आहे, तिथे तिथे मी जनरली भटाबामनांचा+बिझनेस कमुनिटीचा (गुप्ताज्)जो टक्का पाहिला आहे ते पाहता संघाला एकट्याला मला विशेष ब्राह्मणबहुल म्हणवत नाही. ब्राह्मणवादी संघाला म्हणता येईल. सहसा पारंपारिक हिंदु समाज (obviously led by Brahmins) तत्कालिन जगातल्या इतर समाजांपेक्षा श्रेष्ठ होता नि आज त्याची ग्लोरी पुनर्स्थापित करायची आहे असे त्याचे मत असते. पण आज जे ३.५% ब्राह्मण नावाची जात आहे तिचे भारतावर राजकीय, आर्थिक नियंत्रण असावे या अर्थाने ते ब्राह्मणवादी असले तर सांगता येत नाही. पण कदाचित संघ ही गरज 'भागवत' नसावा. त्यामुळे वेगवेगळ्या थेट ब्राह्मण संघटनांची बीजे फोफावली आहेत.

* ज्यांना उदारमतवाद जन्मजात मिळाला नाही ते लोक हळूहळू घडत जातात. समजून घ्या.
** पाकिस्तानी अतिरेकी राक्षसाच्या रुपात दाखवणे, इ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

प्रतिसाद आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

असेच म्हणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मी पण

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

असे छान प्रतिसाद देताना अजोंचे भाषिक दौर्बल्य कुठे जाते कोण जाणे Wink
असो. प्रतिसाद आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पण प्रत्यक्ष संघातून बाहेर येऊन आपण जस जसे संघाच्या सहानुभूतीदारांकडे वळतो, त्यांची मते तिखट आणि ब्राह्मणवादी बनत जातात. पण संघाला लोक मिळत नसल्यामुळे कोणी काही का म्हणेना, संघ उघडपणे अशी सहानुभूती नाकारत नाही. संघात सगळी जेवणे शाकाहारी असतात, संस्कृतच्या ज्ञानाला (अचानक) महत्त्व येते (एरवी कोणी विचारत नाही.) तिथली केवळ हीच स्पष्ट ब्राह्मणी लक्षणे सांगता येतील.

हा भाग अगदि नेमका , बिंदूगामी- टू द पॉइण्ट म्हणता यावा.
एरव्ही जातपातीचा उल्लेख नाही, पण संस्कृतचा आग्रह; हे तिथले स्वरुप माझ्या पाहण्यात आले आहे.
संस्कृत ही एका विशिष्ट जातीशी निगडित असल्याचे मानले जात असल्याने तसा शिक्का आख्ख्या संघटनेवर असावा.
आता हे आपोआप झाले, प्रामाणिकपणे केले ही मागे काही इतर उद्देश्/हेतू आहे; त्याची कल्पना नाही.

(पण माझे पाहणे म्हणजे भलतेच दूरवरून आहे. डोंगराच्या कड्यावरून खालून जाणारी आगगाडी पाहिल्याप्रमाणे.
मला एकंदर आगगाडी कशी वळणे घेत चालली आहे हे दिसते; पण त्यातले नेमके अंतःप्रवाह ,सूक्ष्म फरक ठाउक नाहित.
पुढचा डबा वळण घेत असताना मागचा दूरचा डबा सरळच जात असतो; त्या आतल्याला काय दिसते; ते मला ठाउक नाही.
)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

संघाचे संस्कृत आकर्षण हे "सावरकरवादातून" (सावरकरी {तथाकथित} भाषाशुद्धी) आले असावे असे म्हणता येईल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

संघ सावरकरवादी ?

हे काय भलतंच? ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सावरकरवादाची काही अंगे, विशेषतः भाषाशुद्धीचे अंग

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जोशिसर माझा जनकल्याण रक्तपेढिशि अगदि जवळुन संबंध आला आहे. मि तेथे केवळ आणि केवळ ब्राह्मण (प्युन वगैरे सोडल्यास) कर्मचारिवृंदच पाहिला आहे. यात गैर आहे असे नाहि कारण इतर जातिंच्या शैक्षणिक संस्था, पतपेढ्या, सहकार बँका यात जात पाहुनच नोकरि दिलि जाते.तुमच्या आधिच इतर कोणाला नोकरि प्रॉमिस केलेलि असेल कदाचित म्हणुन तुम्हाला हाकलले असावे.

हॅविंग सेड दॅट, संघात जातिच्या आधारावर भेद केला जात नाहि हे खरे आहे. राजेंद्रसिंह (रज्जुभैय्या) हे ब्राह्मण नव्हते तरि ते सरसंघचालक झाले होते. संघात (ऐसिवर आहे तशि) एक उतरंड काहि निकषांवर (भाषा, वागण्याच्या पद्धति) ठरते. हे निकष ब्राह्मणि पार्श्वभुमि असलेल्या लोकांनि ठरवलेले असल्यामुळे अब्राह्मण लोक (त्यांना तसे संस्कार नसल्याने) या उतरंडिवर खालच्या पायर्‍यांवर ढकलले जातात. त्यामुळे तरुणपणि संघाच्या मुशित तयार झालेले अब्राह्मणि लोकहि संघाचा दु:स्वास करु लागतात. 'पहा जात, ढकल आत' असे एक्स्प्लिसिटलि होत नाहि हे जोशिसरांचे म्हणणे बरोबर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

__________
श्रेणिव्यवस्था जिंदाबाद - मालकशाहि जिंदाबाद

>> इतके असून " जातीयवादी " असे संघ परिवार आणि त्याच्या extension ने भाजपला का बोलले जाते ?
फार तर ह्यांना अभिमानांध, धर्मांध वगैरे म्हणता येइल. पण जातीयवादी कसे ?
त्याहून महत्वाचे म्हणजे ब्राम्हणी कसे ? <<

त्याला इतिहास कारणीभूत असावा. साधारण १९८४ वगैरेपर्यंत संघाला आणि पर्यायानं जनसंघ/भाजप वगैरेंना 'भटा-बामणांचा' असंच म्हटलं जाई. त्यांची विचारसरणी ज्या समाजघटकांत (त्यातल्या त्यात) लोकप्रिय होती, आणि जो त्यांचा मतदार होता त्याचं हे प्रतीक होतं; शिवाय गांधी'वधा'ला पाठिंबा किंवा सहानुभूती वगैरेंमुळेही ही प्रतिमा निर्माण झालेली होती. त्यांच्या धोरणांचं उघड जातीयवादी असणं किंवा नसणं ह्याचा त्याच्याशी संबंध नसावा. पुण्यापासून ते अगदी लहान गावांमध्ये ब्राह्मणेतर गटांत संघाला शून्य किंमत होती. मंडल आयोग आला त्या आसपासच्या आणि नंतरच्या काळात नव्यानं उभारणारी जातीय समीकरणं ओळखून ओबीसी आणि इतर जातींना संघात आणि भाजपमध्ये हेतुपुरस्सर स्थान दिलं गेलं. त्यामागे प्रमोद महाजन होते असं ऐकिवात आहे. (माझ्यापाशी संघपरिवाराशी घनिष्ट संबंध असलेल्यांची सांगोवांगी आहे; विदा नाही). ह्यात अर्थात 'सनातन प्रभात'सारख्या कट्टर विचारांचे ब्राह्मणी लोक मागे पडले. त्यातून पुष्कळ गोष्टी बदलल्या आणि भाजपचा जनाधार वाढला हे वर्तमान सर्वांसमोर आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

संविधान विरोधी असलेल्या ,प्रचंड जातीयवादी, या शब्दांचे अर्थ माहित आहेत का लेखकाला?

याच संविधानाने जात आधारित आरक्षणाला मान्यता दिली आहे. आणि काही राज्यात धर्मानुसार ही. तूर्त कोणत्या ही पक्षाला जातीयवादी म्हणणे उचित नाही.
शिवाय गुजरात दंगलीत, गुजरात पोलीसने १०० हून अधिक दंगेखोरांना कंठस्नान घातले होते त्यात ९०% बहुसंख्य होते. त्यामुळे नरेंद्र मोदी जातीयवादी आणि धर्मांध नाही हे सिद्ध होते.

धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या पक्षाने सिख विरोधी दंगलीत एका ही दंगेखोराला दिल्ली पोलीस ने कंठस्नान घाले नाही. तीच परिस्थिती मुझफ्फरनगर दंगलीच्या बाबतीत आहे. मग जातीयवादी जातीयवादी आणि धर्मांध कुणाला म्हणावे, हे स्पष्ट करण्याची गरज नाही.

आपल्या तात्कालिक राजनैतिक फायद्या साठी प्रत्येक पक्ष परिस्थितीनुसार वागतो. कुणा ऐकला ही दोष देण्यात अर्थ नाही. पण शेवटी प्रत्येक पक्ष जातीय आणि धार्मिक संतुलन स्थापित करण्याचा प्रयत्न करतो. हीच आपल्या देशातल्या प्रजातंत्राची खुबी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जातीयवादी फक्त आणि फक्त ब्राह्मण असतात. धर्मांध फक्त आणि फक्त हिंदू आणि पुन्हा ब्राह्मणाच असतात. ह्यापलीकडे विश्लेषण हे हल्लीच्या सेक्युलर आणि विचारवंत लोकांना मान्यच नसते. गेल्या किमान ५० वर्षांचा हां परिपक आहे आणि तो लवकर बदलणार नाही. त्यामुळे मोदीने कितीही चांगले काम केले तरी त्याला चांगले म्हणणे हे सध्याच्या पोलिटिकली करेक्ट फॉर्मच्या बाहेर आहे. मग चुका फक्त दाखवत राहणे हाच एकमेव मार्ग असतो आणि तोच निवडला जाणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संविधान विरोधी असलेल्या ,प्रचंड जातीयवादी, या शब्दांचे अर्थ माहित आहेत का लेखकाला?

पटाईत सायबांशी या मुद्द्यावर प्रचंड सहमत - "संविधान विरोधी".

१) संविधानात भाजपा ने बदल करायचे म्हंटले की लगेच भाजपा संविधान-विरोधी होतो. पण काँग्रेस ने भाजपा पेक्षा चार पट घटनादुरुस्त्या केल्यात. ९८ पैकी भाजपाच्या कारकीर्दीत १४ व बाकीच्यां ८४ पैकी बहुतांश काँग्रेसने केलेल्या आहेत. पण ते मात्र संविधान विरोधी होत नाही. का व कसे ते देवालाच माहीती.

२) धर्मग्रंथ व संविधान($$$) यांतील एक (एकमेव नव्हे) फरक हा की धर्मग्रंथ घट्ट असतो. संविधान हे परिवर्तनशील असते. संविधान परिवर्तनशील असावे - हे संविधानातलेच एक महत्वाचे तत्व आहे. मग जनाधार मिळाल्यावर भाजपाने जनहितार्थ संविधानात बदल घडवून आणले तर ? प्रॉपर प्रोसिज्युअर नुसार केले तर त्यात गैर काय आहे ?

----

$$$ - धर्म व संविधान हे अ‍ॅपल्स वि. ऑरेंजेस अशी तुलना गब्बर का करतोय ? - या प्रश्नाचे उत्तर सुद्धा देऊ शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>संविधानात भाजपा ने बदल करायचे म्हंटले की लगेच भाजपा संविधान-विरोधी होतो. पण काँग्रेस ने भाजपा पेक्षा चार पट घटनादुरुस्त्या केल्यात. ९८ पैकी भाजपाच्या कारकीर्दीत १४ व बाकीच्यां ८४ पैकी बहुतांश काँग्रेसने केलेल्या आहेत. पण ते मात्र संविधान विरोधी होत नाही. का व कसे ते देवालाच माहीती.

१. घटना दुरुस्ती आणि घटना-पुनरावलोकन यात फरक आहे.
२. ९८ घटना दुरुस्त्यांपैकी कित्येक किरकोळ स्वरूपाच्या आणि तांत्रिक असतात. उदा. एखाद्या राज्यात-जसे काश्मीर-राष्ट्रपती राजवट लागू केलेली असेल तर सहा महिन्यांनी तिचा आढावा घ्यायला लागतो. राष्ट्रपती राजवट आणखी सहा महिन्यांनी वाढवायची असेल तर "घटना दुरुस्ती" करावी लागते. ९८ पैकी किती घटना-दुरुस्त्या अशा प्रकारच्या आहेत त्याची कल्पना नाही.

बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन बदलता येणार नाही असे विविध न्यायालयीन निर्णयांतून दिसते आहे. [तुम्ही घराच्या आत बसून घर पाडू शकत नाही].

>>मग जनाधार मिळाल्यावर भाजपाने जनहितार्थ संविधानात बदल घडवून आणले तर ? प्रॉपर प्रोसिज्युअर नुसार केले तर त्यात गैर काय आहे ?

घटनेचे पुनरावलोकन/पुनर्लेखन करण्यात गैर काही नाही. पण ते एक (डिक्रीड- Decreed) समिती बनवून घेता येणार नाही. त्यासाठी घटना समितीच्या निवडणुका घेऊन घटना समिती स्थापन करावी लागेल. सध्याच्या घटनेच्या अंमलबजावणीसाठी मिळालेला जनाधार सध्याची घटना मोडीत काढायला/मूलभूत बदल करायला वापरता येणार नाही.

त्याहीवेळी भाजपचा तसा काही विचार होता असे वाटत नाही. समर्थकांच्या मागणीवर काहीतरी केल्यासारखे दाखवायचे म्हणून ती समिती नेमली गेली होती. The commission has not been asked to review the Constitution; it is only to review the working of the Constitution. As to how the constitutional phrase for an egalitarian, social and economic order has been transformed into reality.

संघ-भाजपचे कोअर समर्थक [शिक्षित-सुखवस्तू मध्यमवर्गीय] घटनापुनरावलोकनातून काय अपेक्षा करत असतील?...... दुसरी नापास असलेल्याला आणि डॉक्टरेट असलेल्याला घटना एकच मापाने मोजते हे बरोबर नाही (सो कॉल्ड मेरिटोक्रसी). या एका मार्गाने अनेक गोष्टी साध्य होऊ शकतात. उदा आमच्यातले ६०% लोक ग्रॅज्युएट होतात २० % पोस्ट ग्रॅज्युएट होतात ... मागासांमधले कदाचित ५-१०% च होतात. मताधिकारात किंवा इतर काही बाबतीत ग्रॅज्युएट असणे हा क्रायटेरिया आणला की ऑपॉप आम्ही संख्येने तुल्यबळ होऊ शकतो. Smile इत्यादि....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन बदलता येणार नाही असे विविध न्यायालयीन निर्णयांतून दिसते आहे.

प्रतिवाद १) बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन काँग्रेस ने बदललेले आहे. उदा घटनाकारांना सोशॅलिस्ट हा शब्द कॉन्स्टिट्युशन मधे अभिप्रेत नव्ह्ता. तो इंदिराजींनी अंतर्भूत केला. हे बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन बदलणारेच आहे. नेमके कसे ते सुद्धा लिहू शकतो.

प्रतिवाद २) चव्वेचाळीसाव्या दुरुस्तीनुसार मालमत्त्तेचा अधिकार (जो मूलभूत अधिकार होता) तो काढून टाकून नुसता अधिकार ठेवण्यात आलेला आहे. व तो बदल जनता पक्षाच्या सरकारने केलेला होता. लोकशाहीची संकल्पना ही मालमत्तेच्या अधिकाराच्या रक्षणार्थ जन्मास आली (संदर्भ. जॉन लोक, सेकंड ट्रिटाईझ इन गव्हर्नमेंट). व त्या अर्थाने पाहिलेत तर चव्वेचाळीसाव्वी घटना दुरुस्ती ही सुद्धा बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन बदलणारीच होती. फार प्रचंड मोठ्ठ्या प्रमाणावर. (अर्थात संभाव्य आक्षेप हा ही घेतला जाऊ शकतो की - कोण हा जॉन लोक ? व त्याचे एक पुस्तक आम्ही गांभिर्याने का घ्यावे.)

याउप्पर मी बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन बदलावे अशा मतप्रणालीचा समर्थक नाही. उलट मालमत्तेचा अधिकार (जो आधी होता तो) अबाधित ठेवावा याच मताचा आहे.

बहुपक्षीय लोकशाही (अ‍ॅज अपोज्ड टू द्विपक्षीय वगैरे) असावी याच मताचा आहे. संसदीय (अ‍ॅज अपोज्ड टू अध्यक्षीय) लोकशाही असावी याच मताचा आहे. व ही सर्व बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन मधेच आहेत.

घटनेचे पुनरावलोकन/पुनर्लेखन करण्यात गैर काही नाही. पण ते एक (डिक्रीड- Decreed) समिती बनवून घेता येणार नाही. त्यासाठी घटना समितीच्या निवडणुका घेऊन घटना समिती स्थापन करावी लागेल. - हे एकदम मान्य.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन बदलणारेच आहे. नेमके कसे ते सुद्धा लिहू शकतो.

इथे लिहुन उपयोगाचे नाही. हे कोर्टाला पटावे/पटवावे लागेल.
जोवर कोर्ट म्हणत नाही की हे बेसिक स्ट्रक्चरमध्ये बदल घदवणारे आहे ते तसे नाही. बेसिक स्ट्रक्चरमध्ये काय काय येते ही यादी सान्त नसली तरी स्पष्ट आहे. संदर्भासाठी हा लेख बघा.

@थत्ते

घटनेचे पुनरावलोकन/पुनर्लेखन करण्यात गैर काही नाही. पण ते एक (डिक्रीड- Decreed) समिती बनवून घेता येणार नाही. त्यासाठी घटना समितीच्या निवडणुका घेऊन घटना समिती स्थापन करावी लागेल.

असहमत. घटनेचे पुनर्लेखन (अर्थात बेसिक स्ट्रक्चरसकट बदल) सध्याच्या घटनेच्या चौकटित राहुन शक्य नाही. त्यासाठी घटनाबाह्य मार्गाने आधी सत्तांतर व्हावे लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

इथे लिहुन उपयोगाचे नाही. हे कोर्टाला पटावे/पटवावे लागेल.

अगदी.

नेमके असेच घडलेले आहे. सोशॅलिस्ट या शब्दाबाबत. Court refused to accept that the term socialist alters the basic structure of the constitution. And will reconsider a petition from a political party if that party appeals to the court stating that the party does not want to solemnly swear that it will live by the term socialist. Until such a party emerges ... we are condemned to live with the fact that each political party has to accept the term socialist while registering with EC.

बहुपक्षीय लोकशाही या संज्ञेच्या मुळाशी आघात करणारा हा शब्द आहे. The moment you say the political party has to be socialist - you are disallowing all the other comparative political-economic systems.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नेमके असेच घडलेले आहे. सोशॅलिस्ट या शब्दाबाबत

नाही कळाले. कोर्टाने हा शब्द घटनाबाह्य / बेसिक स्ट्रक्चर मध्ये धरला आहे काय?
काहि संदर्भ असतील तर वाचायला आवडतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

गब्बरजींच्या प्रतिसादाशी सहमत आहे.

बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन बदलता येणार नाही असे विविध न्यायालयीन निर्णयांतून दिसते आहे. [तुम्ही घराच्या आत बसून घर पाडू शकत नाही].

१. असे काही नाही. घटनेच्या प्रिएंबलमधे इंदिराबाईनी सेक्यूलर शब्द घुसडला. ते ही आणिबाणीत. नि वर अजून तो तसाच आहे.
२. ग्रामसंस्था आणि यू एल बींना मिळालेली प्रचंड स्वायत्तता हा प्रचंड मोठा घटनाबदल आहे. तो राजीवबाबाने केला.
३. अटलजींच्या कमिटीने (led by CJI) मूळ घटनेत काय काय बदल करावे ते सांगीतले.

शिवाय हे वाक्यच फंडामेंटली चूक आहे. घटनेत कोणताही बदल एक विशिष्ट मेजोरिटी असेल तर करता येतो. तिथे न्यायपालिका काय म्हणते ते बघायची गरज नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

घटनेच्या प्रिएंबलमधे इंदिराबाईनी सेक्यूलर शब्द घुसडला. ते ही आणिबाणीत. नि वर अजून तो तसाच आहे.

हे बेसिक स्ट्रक्चर विरोधी नाही. किंबहुना न्या चंद्रचुड यांनी नंतर हा 'सेक्युलॅरीझम' बेसिक स्ट्रक्चरचा भाग असल्याचे म्हटले आहे. तेव्हा त्यात बदल करणे संसदेलाही शक्य नाही.

ग्रामसंस्था आणि यू एल बींना मिळालेली प्रचंड स्वायत्तता हा प्रचंड मोठा घटनाबदल आहे. तो राजीवबाबाने केला.

मग? त्याने बेसिक स्ट्रक्चरमध्ये कसा बदल झाला.

वर गब्बर यांना दिलेला दुवा वाचा. त्यात बेसिक स्ट्रक्चरमध्ये काय येते ते दिले आहे. त्याव्यतिरिक्त कोणतेही घटना-बदल करण्याचा संसदेला अधिकार आहे. मात्र बदल केल्यानंतर कोर्ट ठरवु शकते की तो बदल बेसिक स्ट्रक्चरवर घाला घालतो का, असल्यास तो बदल रद्द करण्याचा अधिकार कोर्टाला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बेसिक स्ट्रक्चरमध्ये काय येते

Some of the features of the Constitution termed as "basic" are listed below:
1.Supremacy of the Constitution
2.Rule of law
3.The principle of Separation of Powers
4.The objectives specified in the Preamble to the Constitution
5.Judicial Review
6.Articles 32 and 226(सुप्रिम आणि आणि हाय कोर्टाचे लोकांचे मूलभूत अधिकार सुरक्षिण्याचे अधिकार)
7.Federalism
8.Secularism
9.The Sovereign, Democratic, Republican structure
10.Freedom and dignity of the individual
11.Unity and integrity of the Nation
12.The principle of equality, not every feature of equality, but the quintessence of equal justice;
13.The "essence" of other Fundamental Rights in Part III
14.The concept of social and economic justice — to build a Welfare State: Part IV in toto
15.The balance between Fundamental Rights and Directive Principles
16.The Parliamentary system of government
17.The principle of free and fair elections
18.Limitations upon the amending power conferred by Article 368
19.Independence of the Judiciary
20.Effective access to justice
21.Powers of the Supreme Court under Articles 32, 136, 141, 142
22.Legislation seeking to nullify the awards made in exercise of the judicial power of the State by Arbitration Tribunals constituted under an Act[7]

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ग्रामसंस्था आणि यू एल बींना मिळालेली प्रचंड स्वायत्तता हा प्रचंड मोठा घटनाबदल आहे. तो राजीवबाबाने केला

यावर एक फक्त पिंक टाकतो -

पंचायती राज म्हंजे तुम्ही पंच लोक काय हवा तो निर्णय घ्या. तो योग्य की नाही ते प्लॅनिंग कमिशन ठरवेल व त्यानुसार पैसे मिळतील. प्लॅनिंग कमिशन म्हंजे समाजवादाचे हृदय व मेंदू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संविधानात भाजपा ने बदल करायचे म्हंटले की लगेच भाजपा संविधान-विरोधी होतो. पण काँग्रेस ने भाजपा पेक्षा चार पट घटनादुरुस्त्या केल्यात. ९८ पैकी भाजपाच्या कारकीर्दीत १४ व बाकीच्यां ८४ पैकी बहुतांश काँग्रेसने केलेल्या आहेत. पण ते मात्र संविधान विरोधी होत नाही. का व कसे ते देवालाच माहीती.

काँग्रेसने ८२ वेळा घटनादुरुस्ती केली आहे. इतक्या प्रमाणात घटनादुरुस्त्या करूनही काँग्रेस संविधान विरोधी ठरत नाहीत. कारण काँग्रेसने केलेल्या घटनादुरुस्त्या संविधान बळकट करणा-या आहेत. या उलट भाजपाने आपल्या सरकारच्या काळात घटनेचा फेरआढावा घेण्याच्या नावाखाली विद्यमान संविधानच नष्ट करण्याचा प्रयत्न चालविला होता. घटना दुरुस्ती करणे आणि घटना बदलणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, हे समजून घेतले पाहिजे.

सध्याच्या घटनेसोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जोडले आहे. ते संघ आणि त्याची राजकीय संघटना असलेल्या भाजपाला डाचत आहे. नवी घटना आणल्यास आंबेडकरांचे नाव पुसले जाईल, असे त्यांना वाटते. पण, हे प्रत्यक्षात घडणार नाही. भाजपाला लोकसभेत ४०० जागांइतके राक्षसी बहुमत मिळाले तरीही त्यांना विद्यमान घटना रद्दबातल ठरविता येणार नाही. घटना रद्द करण्याचे परिणाम विनाशकारी आणि विघटनकारी ठरतील. "घटना बदलणे" हे संघाच्या "अखंड हिन्दुस्तान"सारखे अशक्य कोटीतील स्वप्न आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://www.ndtv.com/elections/article/election-2014/bjp-targets-sonia-ga...

वरील लिंक बघावी आणि ठरवावे की नक्की सेक्युलर, जातीयवादी कशाला म्हणावे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भाजपा ला कोणत्याही परिस्थितीत संविधानिक प्रक्रियेनुसार घटनेत कोणताही बदल करण्याचा अधिकार नाहीच - असे कुणाचे म्हणणे आहे ???

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुणाचेच नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मग गब्बरचे नक्की असेल Wink Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नाय नाय.

माझे तसे आर्ग्युमेंट असलेच तरी ते अत्यंत weak आहे. सबब पास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा वा वा. तुमचं आमचं जमलं.

आता फक्त रिझनिंग द्या. भाजपा ही निर्वाचन आयोगात नोंदणीकृत पार्टी आहे. व जर ही पार्टी बहुमताने निवडून आली तर त्यांनी संसदीय प्रोसिज्युअर वापरून -

१) घटनादुरुस्त्या केल्या (अर्थात यासाठी प्रोसिज्युअर नुसार ६६% .......)
२) घटना समितीच्या नेमणूका घेऊन घटनेत मूलगामी बदल केले तर

तुमचा नेमका आक्षेप कोणत्या बाबीवर आहे व का आहे ? दोन्ही बाबींवर असेल तर तसे ही लिहा. व कारण द्यायला विसरू नका.

---

तुम्हास दोन मस्त पुस्तकं सुचवतो -

१) How Progressives Rewrote the Constitution by Richard A. Epstein (जेमतेम दिडशे पानांचं पुस्तक आहे हे.)
२) The Calculus of Consent: Logical foundations of constitutional democracy by James M. Buchanan (हे जरा मोठं आहे. पण अतिशय रियलिस्टिक आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नोंदणीकृत पार्टी असल्याने काय होते? नोंदणीकृत पार्टी आहे म्हणून काहीही करण्याचा अधिकार मिळत नाही. घटना लिहिणारी व्यक्ती दलित होती, एवढ्या एका कारणासाठी कोणालाही घटना बदलता येणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घटना लिहिणारी व्यक्ती दलित होती, एवढ्या एका कारणासाठी कोणालाही घटना बदलता येणार नाही.

ओह अच्छा, म्ह. घटनाकार दलित नसते तर घटना बदलता आली असती तर...रोचक!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

श्री. बॅटमॅन, तुम्ही उलटे सांगत आहात. घटनाकार दलित नसते, तर भाजपा आणि संघाने घटना बदलण्या साठी आटापिटा केला नसता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुद्दा भाजप व संघ काय करेल याचा नाही, तर बहुमताने निवडून आलेला पक्ष काय करू शकेल याचा आहे. बाबासाहेबांनी लिहिलेली घटना बदलण्याचा कुणालाही अधिकार नाही हे विधान हास्यास्पद आहे. हे ऐकल्यावर स्वतः बाबासाहेबही आज असते तर हसले असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मुद्दा भाजपा आणि संघाचाच आहे. कारण घटना त्यांनाच बदलायची आहे. दुस-या कोणत्याही पक्ष-संघटनेने घटना बदलण्याविषयी कोणत्याही प्रकारचे वक्तव्य केलेले नाही. त्यामुळे मुद्दा भाजपा-संघाचा नाही, असे म्हणणे हे सर्वाधिक हास्यास्पद आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भाजपा-संघ-इतर अशी स्लगफेस्ट खेळण्यात मला रस नाही. तुमचे चालूद्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

घटना समितीच्या नेमणूका घेऊन घटनेत मूलगामी बदल केले तर

भाजपाच असे नाही तर कोणीही अशी घटना समिती नेमुन त्यानुसार घटना बदलणे हेच घटनाबाह्य आहे व म्हणून सद्य चौकटीत अशक्य आहे.
नवी घटना समिती बसवणे सद्य घटनात्मक मार्गाने शक्य नाही त्यासाठी घटनाबाह्य मार्गानेच सत्ताबदल व्हावा लागेल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नवी घटना समिती बसवणे सद्य घटनात्मक मार्गाने शक्य नाही त्यासाठी घटनाबाह्य मार्गानेच सत्ताबदल व्हावा लागेल

नक्की? संविधानातलं वरिजिनल सायटेषण बघायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कोणते सायटेशन बघायचे आहे ते नाही कळले, पण अख्खी घटना जालावर मिळेलच त्यात बघा.

सद्य घटना रद्द ठरवून मगच नवी घटना समिती नेमता येईल. आणि सद्य घटना रद्द ठरवायला त्याच घटनेच्या चौकटीत निवडून गेलेले प्रतिनिधी/एकुणच व्यवस्था उपयोगाचे नाहीच, अगदी १००% खासदार एकाच पक्षाचे असले तरीही! तार्किक दोष येतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नव्या घटना समितीसाठी निवडणुका घेता येतील. त्या अर्थातच घटनेअंतर्गत असणार नाहीत. घटनासमितीसाठी निवडणुका घेणार कोण असा प्रश्न येतो. कारण सरकारने घेतल्या तर घटनासमितीसाठी निवडणुका घेण्याचे कृत्य सरकारच्या अधिकाराबाहेरचे आहे असे म्हणून न्यायालयात चॅलेंज करता येईल आणि न्यायालय त्या निवडणुका रद्दबातल ठरवेल.

राष्ट्रपती तरी असे करू शकतील का? [त्यांना घटनात्मक अधिकार असेल का? नसेल तरीही त्यांनी असे केले तर राष्ट्रपतींच्या कृतीला न्यायालयात आव्हान देता येते का? राष्ट्रपतींना इम्पीच करता येते.]

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

नव्या घटना समितीसाठी निवडणुका घेता येतील. त्या अर्थातच घटनेअंतर्गत असणार नाहीत. घटनासमितीसाठी निवडणुका घेणार कोण असा प्रश्न येतो. कारण सरकारने घेतल्या तर घटनासमितीसाठी निवडणुका घेण्याचे कृत्य सरकारच्या अधिकाराबाहेरचे आहे असे म्हणून न्यायालयात चॅलेंज करता येईल आणि न्यायालय त्या निवडणुका रद्दबातल ठरवेल.

सहमत

राष्ट्रपती तरी असे करू शकतील का? [त्यांना घटनात्मक अधिकार असेल का? नसेल तरीही त्यांनी असे केले तर राष्ट्रपतींच्या कृतीला न्यायालयात आव्हान देता येते का? राष्ट्रपतींना इम्पीच करता येते.]

राष्ट्रपती आपणहून असे करू शकत नाहीत - तसा अधिकार नाही. सरकारच्या सांगण्यावरून तसा अध्यादेश जारी करता यावा मात्र सरकार कोणत्या अधिकारात असे सजेस्ट करेल? पुन्हा वरील लॉजिक लागु - न्यायालय सरकारने तसे सजेस्ट करणे घटनाबाह्य ठरवून अध्यादेश रद्दबातल करेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

परिस्थितीचा रेटाच असेल तर काहीही होतं.
बहुमताच्या जवळ पोचलेली राष्ट्रवादी जर्मन पार्टी (नाझी) नंतर हिटलरला फ्यूरर काय बनवते.
नंतर सगळ्यांनाच (नॉन्-नाझी म्हणून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनाही) देशनिष्ठेऐवजी हिटलरनिष्ठेची शपथ काय
घ्यायला लावते. ती माणसंही ती शपथ काय घेतात. परिस्थितीचा रेटा असला काहीही चालू शकतं असं वाटायला लागलय.
आणि नाझींची ही गोष्ट फारशी आक्षेपार्हही ठरली नसती; उलट इतरांनी वस्तुपाठ म्हणून वापरला असता;
काही मोठ्या चुका टाळल्या असत्या आणि कधी/कुठे थांबायचं हे नाझींना कळलं असतं तर!

असो.
सांगायचा मुद्दा हाच की तार्किक दोष वगैरे तांत्रिकदृष्ट्या ठीकय.
पण प्रत्यक्षात करायचेच म्हटले, तर पब्लिक करून मोकळीही होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

पण प्रत्यक्षात करायचेच म्हटले, तर पब्लिक करून मोकळीही होते.

अर्थातच, मात्र तो घटनाबाह्य मार्ग झाला आणि त्याने हे करता येईलच असे म्हटले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तेच म्हणतोय.
करता येइल ; पण घटनाबाह्य ठरेल.
--मान्य.

power supercedes every rule

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अवांतर होइल,. पण विचारतो आहे.
अमेरिकन नजरेतून progressive आणि liberal हे वेगळे लोक आहेत का ?
त्यांच्यात काही फरक आहे का ? काय आहे ?
(भारतात ह्यांना झोडणारे स्वघोषित राष्ट्रवादी progressive आणि liberal हे शब्द हायफनेटेड वापरतात.
पण तिथल्या अमेरिकेतल्या चर्चा, लेख पाहिले तर ह्यांचे वेगळे स्पष्ट उल्लेख असतात.
)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

केशवानंद भारती, मिनर्वा मिल्स अशा निर्णयांमुळे सध्या अशी वज्रलेप स्थिति झालेली दिसते की घटनेच्या माध्यमातून निर्माण झालेल्या संसदेला घटनेचा मूलभूत ढांचा बदलण्याचा अधिकार नाही. अशा बदलामागे संसतेच्या आत कितीहि बहुमताचे आधिक्य दिसले तरीहि. जेथे मूलभूत ढांचा बदलण्याचा अधिकारहि नाही तेथे संसदेच्या माध्यमातून घटनाच बदलणे अशक्य आहे.

असे करायची इच्छा ज्या गटाला असेल त्याला स्वतःला मोठया दिव्यातून जावे लागेल आणि देशालाही तशाच परिस्थितीमधून जायला भाग पाडायला लागेल. उदाहरणार्थ देशभर अभूतपूर्व दंगली, हिंसाचार इत्यादि उत्पन्न करून देश चालणे आणि टिकून राहणे हे नव्या घटनेखालीच शक्य आहे आणि तसे घडवण्याचा अधिकार जनतेने आम्हांस द्यावा असे वातावरण निर्माण करायला हवे. ह्यापुढच्या दिवसात तसे घडणे अशक्य वाटते कारण अशी परिस्थिति निर्माण करण्यासाठी फार मोठी आर्थिक आणि सामाजिक किंमत जनतेला चुकवायला लागेल. वाढत्या संख्येचा तरुणवर्ग, त्याच्या वाढत्या आर्थिक सुबत्तेच्या अपेक्षा, त्याचे आसपासच्या जगाबद्दलचे वाढते ज्ञान असे होऊन देणार नाही. बाकीचे जगहि एका गटाला इतक्या सहजपणे अराजक निर्माण करण्याची आपली योजना पूर्णतेस नेऊ देणार नाही कारण अशान्त भारत त्यांच्याहि हिताचा नाही.

सारांश म्हणजे घटनाच बदलायचे स्वप्न कोणी पाहातच असेल तर ते एक pipe dream ठरेल असे मला वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नोंदणीकृत पार्टी असल्याने काय होते? नोंदणीकृत पार्टी आहे म्हणून काहीही करण्याचा अधिकार मिळत नाही.

हे ठीक आहे. याबद्दल कोणतेही दुमत नाही.

---

घटना लिहिणारी व्यक्ती दलित होती, एवढ्या एका कारणासाठी कोणालाही घटना बदलता येणार नाही.

हे सुद्धा सुयोग्य आहे. मान्य आहे.

----

भाजपा ने असे जर लिखित स्वरूपात जाहीर केले की - आम्ही ज्या कारणासाठी घटनेत बदल करीत आहोत ते कारण हे नाही - की - घटना लिहिणारी व्यक्ती दलित होती..... तर भाजपा ला संसदीय प्रोसिज्युअर वापरून सर्व प्रशासकीय व संविधानात बदल करण्यासंबंधित सर्व नियमांची पूर्तता केल्यावर - घटनेत बदल करायचा अधिकार आहे की नाही ?

आता खालील पैकी तुमचे उत्तर काय -

१) आहे - कारण ......
२) नाही - कारण ......
३) लिखित स्वरूपात जाहीर करून काय होतेय .... अंतस्थ हेतू जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत तो अधिकार मी देणार नाही. व त्यांचा अंतस्थ हेतू खरोखर बदललाय की नाही हे ठरवण्याचा अधिकार फक्त मला आहे.
४) आणखी काही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भाजपा ने असे जर लिखित स्वरूपात जाहीर केले की - आम्ही ज्या कारणासाठी घटनेत बदल करीत आहोत ते कारण हे नाही - की - घटना लिहिणारी व्यक्ती दलित होती..... तर भाजपा ला संसदीय प्रोसिज्युअर वापरून सर्व प्रशासकीय व संविधानात बदल करण्यासंबंधित सर्व नियमांची पूर्तता केल्यावर - घटनेत बदल करायचा अधिकार आहे की नाही?

एखाद्या व्यक्तीने जर असे लिखित स्वरूपात जाहीर केले की, "कोणाचाही जीव घेण्याचा माझा हेतू नाही, परंतु मला रस्त्यावर एक-दोघांना चाकूने भोसकण्याची परवानगी देण्यात यावी." आपण अशी परवानगी कोणाला देऊ शकू का?

किंवा एखादा बिल्डर उद्या लिखित स्वरूपात असे म्हणाला की, "कोणाचेही घर पडावे अशी माझी अजिबात इच्छा नाही. त्यामुळे इथली पाच-दहा लोकांनी आपली घरी रिकामी करून निघून जावे. मग रिकाम्या झालेल्या जागेवर मी माझ्यासाठी एक हॉटेल बांधीन." आपण घरे रिकामे करून जाऊ शकू का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुलना बरोबर नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तेजा साहेब,

तुमचे उत्तर असे असावे असा माझा कयास आहे ->>> भाजपा ने काहीही केले तरी त्यांना घटनेत बदल करायचा अधिकार नाही. त्यांनी सर्व नियमांची पूर्तता केली तरी तो अधिकार भाजपा ला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचे उत्तर असे असावे असा माझा कयास आहे ->>> भाजपा ने काहीही केले तरी त्यांना घटनेत बदल करायचा अधिकार नाही. त्यांनी सर्व नियमांची पूर्तता केली तरी तो अधिकार भाजपा ला नाही.

कयासच लावायचा म्हटल्यावर काहीही लावता येईल. त्यामुळे माझ्या प्रतिपादनाचा जो काही अर्थ काढायचा तो तुम्ही काढू शकता. पण भाजपा आणि नियम हे समीकरण पचणे कठीण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भाजपच्या मागील सरकारकडून समाजातल्या एका विशिष्ट वर्गाची काही अपेक्षा* होती. त्या त्यावेळच्या सरकारने पुरी केली नाही त्यामुळे या वर्गाच्या मनातून भाजप उतरलेला होता. म्हणजे ते भाजपसमर्थकच राहिले असले तरी तो जोर काही नव्हता.

हा वर्ग यंदाच्या निवडणुकीत पुन्हा उत्साहाने मोदींकडे डोळे लावून बसला आहे. त्यांच्या मनातली ती अपेक्षा मोदी तरी पुरी करतील असे त्यांना वाटत आहे. असे त्यांना वाटण्याचे कारण मोदींच्या इतिहासात आहे. मोदींनी ती अपेक्षा यापूर्वी डिलिव्हर केलेली आहे.

*ही अपेक्षा विकास/अर्थव्यवस्था या संदर्भातली नाही हे येथे लक्षात घेणे जरुरीचे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

:star: :star: :star: :star: :star:

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थत्ते असं वरच्या प्रतिसादासारखं गर्भित कायतरी लिहितात.
पण जे थेट सरळ लोकांनी लिहिलय, त्याबद्दलही बोलले तर बरं होइल.

कट्टर मोदीविरोधक असणारा आणि नंतर त्यांचा समर्थक बनलेल्या लंडनस्थित मुस्लिम माणसाची कहाणी वाचण्यात आली.
ह्या माणसानं पूर्वी मोठी चळवळ वगैरे मोदींविरुद्ध आंतररष्ट्रिय पातळीवर चालवली होती.
पण मोदी भेटींनतर त्याच मत बदलत गेलं. नंतर तो स्वतः एकटाच गुजरातेत जाउन राहून आला.
मत बदलण्यात तो महत्वाचा टप्पा ठरला. तो लेख इथे देत आहे.
पुस्तकही उपलब्ध आहे असं दिसतं.
http://blogs.maharashtratimes.indiatimes.com/XYZ/entry/modi-muslims
.
.
**************************लेख सुरु*********************
मोदी आणि मुसलमान : दुसरी बाजू

"२००२च्या दंगली उगाळत बसणारे लोकं विसरतात की १९६९ साली अहमदाबादमध्ये झालेल्या दंगलीत ५०००हून अधिक मुसलमान मारले गेले होते. कॉंग्रेसचे हितेंद्रभाई देसाई हे गुजरातचे मुख्यमंत्री आणि स्व. इंदिरा गांधी तेव्हा देशाच्या पंतप्रधान होत्या. दोषींना शिक्षा होणं दूर, पोलिसांकडून साधं एक आरोपपत्रंही त्यावेळेस ठेवलं गेलं नव्हतं." झफर सरेशवाला

आजपासून सुरू होत असलेल्या लोकसभा निवडणूकांतला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नरेंद्र मोदी. मोदी आले तर देशातील १५% मुसलमानांशी भेदभाव केला जाईल; त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाईल; देशात ठिकठिकाणी दंगे होतील अशा आवया कॉंग्रेस आणि अन्य तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांकडून उच्चरवाने उठवल्या जात आहेत. गेल्याच आठवड्यात कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी दिल्लीच्या जामा मशिदीच्या शाही इमामांना साकडं घालत त्यांना मुसलमानांना कॉंग्रेसच्या मागे उभं रहाण्याचं आवाहन करायला लावलं.

निवडणूकांचं वातावरण सांप्रदायिकतेच्या मुद्द्यावरून तापलं असताना १ एप्रिल रोजी वरिष्ठ संशोधक आणि स्तंभलेखक मधु पुर्णिमा किश्वर यांचे "मोदी, मुस्लिम्स अ‍ॅंड मिडिया - व्हॉयसेस फ्रॉम नरेंद्र मोदीज गुजरात" हे पुस्तक प्रकाशित झाले. २०१३ साली गुजरातला अनेकदा भेट देऊन, तेथील मुस्लिम समुदायाच्या लोकांशी, २००२ च्या दंगलग्रस्तांशी, सरकारी अधिकाऱ्यांशी आणि खुद्द नरेंद्र मोदींशी साधलेल्या विस्तृत संवादावर आधारित हे पुस्तक मोदी विरोधाची होळी पेटवून त्यावर गेली १२ वर्षं स्वतःची पोळी भाजणाऱ्यांचा बुरखा टरकावते.

या पुस्तकाची प्रस्तावना ख्यातनाम पटकथा लेखक (आणि हो सलमान खानचे वडील) सलीम खान यांनी लिहली असून ती डोळ्यांत अंजन घालते. २००२ च्या दंग्यांतल्या सहभागासाठी मोदींविरूद्धं लंडनमधून चळवळ चालवणारे आणि त्यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयात खेचणारे झफर सरेशवाला मोदींचे जवळचे सहकारी कसे बनले याची हकीकत वाचकांना खिळवून ठेवते. आपण सर्वांनी हे पुस्तकं वाचावं म्हणून मी त्यातील सरेशवालांच्या कहाणीचा थोडासा स्वैर अनुवाद सारांशरूपाने तुमच्यासमोर मांडत आहे.

सरेशवाला म्हणतात, सौदी अरेबियातून सुमारे २५० वर्षांपूर्वी गुजरातमध्ये स्थायिक झालेल्या सुन्नी बोहरा समाजातील मी एक. अत्यंत कर्मठ मुसलमान असूनही आम्ही शिक्षण व उद्योगांत मोठी प्रगती केली आहे. २००२च्या दंगली उगाळत बसणारे लोकं विसरतात की १९६९ साली अहमदाबादमध्ये झालेल्या दंगलीत ५०००हून अधिक मुसलमान मारले गेले होते. कॉंग्रेसचे हितेंद्रभाई देसाई मुख्यमंत्री आणि स्व. इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या.

दोषींना शिक्षा होणं दूर, पोलिसांकडून साधं एक आरोपपत्रंही ठेवलं गेलं नव्हतं. १९८५ ते २००२ सालापर्यंत, जवळपास दर २-३ महिन्यांनी दंगे व्हायचे. कर्फ्यू लागायचे. कॉंग्रेस राजवटीत झालेल्या या दंग्यांमध्ये अनेकदा आमचं घर, ऑफिस किंवा फॅक्टरी जाळली गेली. विमा काढला असूनही त्याचे पूर्ण पैसे मिळायचे नाहीत. कदाचित २००२ च्या दंगली २४x७ टीव्ही आणि इंटरनेट युगात झाल्यामुळे त्या इतरांपेक्षा उठून दिसतात.

२००२च्या दंगलींच्या वेळेस मी इंग्लंडमध्ये असलो तरी त्यात आमच्या कुटुंबाच्या व्यवसायाची वाताहत झाली. इंग्लंडला माझ्या आजूबाजूला रहाणारे ३ मुस्लिम रहिवासी या काळात गुजरातमध्ये गेले असता दंगलींत मारले गेले. आम्ही एकत्र येऊन मोदींना आणि गुजरात सरकारला आंतरराष्ट्रीय न्यायालयात खेचले. तत्कालिन गृहमंत्री लाल कृष्ण आडवाणींना अटक होण्याच्या भीतीने आपला इंग्लंड दौरा रद्द करावा लागला.

एका रात्रीत मी "हिरो" ठरलो पण आपण यातून काय साध्य केलं या विचाराने मी अस्वस्थ होतो. इग्लंडमध्ये असताना जगभरातील मुसलमानांची स्थिती मी जवळून पाहिली. मुस्लिम जगात सर्वत्रं युद्धं, दहशतवाद आणि यादवीमुळे करोडो लोकं देशोधडीला लागले असून स्वतःच्या किंवा दुसऱ्या देशांत निर्वासितांसारखे जगत आहेत.

त्यांच्या दुःखाचं भांडवल करणारे; त्यांना वाटाघाटींपासून परावृत्त करून संघर्ष चालू ठेवायला भाग पाडणारे लोकं, स्वतः मात्र दुसऱ्या देशांमध्ये रहातात. आलिशान ऑफिसं थाटून त्यातून इमेल पाठवणे किंवा मिडियात आंदोलनं करून लाखो डॉलरच्या देणग्या आणि सात आकडी पगार मिळवतात.

मुस्लिम सर्व एक आहेत असा माझा तोपर्यंत समज होता. गुजरात दंगलग्रस्तांसाठी मदत गोळा करताना तो दूर झाला. अरब हे अरब आहेत आणि पाकिस्तानी हे पाकिस्तानी आहेत. भारतातही लखनौचे मुस्लिम हे गुजरातच्या मुसलमानांपेक्षा वेगळे आणि सुरतचे मुस्लिम हे अहमदाबादच्या मुसलमानांपेक्षा वेगळे असून गरज पडल्यास कोणी कोणासाठी धावून जात नसल्याचा प्रत्यय आला.

त्यावेळेस इस्रायल आणि पॅलेस्टिनी लोकांच्यात भयंकर संहार सुरू असूनही त्यांनी शांतता वाटाघाटींना सुरूवात केली. जर गेल्या ६० हून अधिक वर्षांपासून लढणारे हे लोकं एकमेकांशी बोलू शकतात तर आपण का नाही? पण बोलणार तर कोणाशी? थेट मोदींशीच बोलायचे का? का नको? मोदी काही कोणी परके नाहीत. अहमदाबादच्या बाजूच्या आणि मुस्लिम वस्ती असलेल्या वडनगरमध्ये ते मोठे झाले. दोन तृतियांश मताधिक्याने ते पुन्हा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून निवडून आले होते.

त्यांना आणि गुजरात सरकारला वाळीत टाकले तर सर्वाधिक नुकसान गुजराती मुसलमानांचेच होणार होते. आम्हालाही शाळा, दवाखाने, मदरसे चालवायला प्रशासनाची मदत लागतेच. म्हणून मी याबाबत अनेक मौलवींशी चर्चा केली. कुराण आणि हदीथचे दाखले देत त्यांनी सांगितले की, जर तुमचा हेतु स्वच्छ असेल तर शांतता आणि सद्भावना प्रस्थापित करण्यासाठी अगदी शत्रूशीही बोलणी करण्यास इस्लामची मान्यता आहे.

पण मोदी आमच्याशी बोलतील का? गेली दोन वर्षं आम्ही त्यांच्याविरूद्धं आग ओकत होतो. हिटलर आणि अन्य क्रूरकर्म्यांशी आम्ही त्यांची तुलना करत होतो. तेव्हा मी माझे मित्र सिनेनिर्माते महेश भट यांचा सल्ला घेतला. त्यांनी आपले पत्रकार मित्र रजत शर्मांच्या माध्यमातून मोदींशी आमची भेट घडवून आणण्याची व्यवस्था केली. ऑगस्ट २००३ मध्ये पहिल्या "व्हायब्रंट गुजरात" परिषदेच्या प्रसारासाठी मोदी इंग्लंडला येणार होते.

वेंब्लीच्या कुठल्यातरी हॉलमध्ये भेटायला त्यांनी सांगितले पण आम्ही एकांतातील भेटीसाठी आडून बसलो तेव्हा मोदींनी ते रहात असलेल्या जेम्स कोर्ट येथे भेटायला बोलावले. मी मोदींना भेटणार आहे हे कळताच तोपर्यंत स्तुतीवर्षाव करणारे लोकं माझ्यावर तुटून पडले. माझा धिक्कार करणाऱ्या ११०० इ-मेल मला आल्या. तरीही मी मागे हटलो नाही. मी म्हटलं की, हाच माझा जिहाद आहे.

आमचे स्वागत करायला मोदी स्वतः लिफ्टपर्यंत आले होते. "या मित्रांनो" असं म्हणत अत्यंत आदबीनं त्यांनी अमचं स्वागत केले. आम्ही थेट मुद्द्यालाच हात घातला. तुम्ही ५ कोटी गुजरातींची भाषा करता, त्यात ६० लाख मुसलमान समाविष्ट आहेत का नाही? तुम्ही इथे व्हायब्रंट गुजरातच्या नावाखाली आर्थिक विकासाची गोष्टं करता पण सामाजिक न्यायाचं काय? जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत शांतता कशी नांदेल. हा प्रश्नं फक्त दंगलींची झळ बसलेल्या मुसलमानांचा नाही तर हिंदूंचाही आहे.

त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या एका बड्या उद्योगपतीने घड्याळाकडे बघालया सुरूवात केली असता मोदींनी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले की, आजची संध्याकाळ मी या लोकांबरोबर घालवणार असून माझे बाकीचे सर्व कार्यक्रम रद्द करा. माझ्याबरोबर आलेल्या मौलवी इसा मन्सूरींनी तर मोदींना धारेवरच धरलं. तब्बल दीड तास त्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. आम्ही त्यांना सुनावले की, या दंगलीत जे झाले त्याची जबाबदारी शेवटी मुख्यमंत्री म्हणून तुमच्यावर येते.

मोदींनी आम्हाला शांतपणे ऐकून घेतलं. त्यांनी सांगितलं की, गुजरातच्या हिंदूंप्रमाणेच मुसलमानही माझेच आहेत. जेव्हा मी नर्मदेचं पाणी साबरमतीत आणलं तेव्हा त्याचा फायदा मुसलमानांनाही तेवढाच झाला. दंगलींबाबत करण्यात आलेल्या आरोपांना त्यांनी अतिशय मुद्देसूद उत्तरं दिली. तथ्यहीन व अतिशयोक्तीपूर्ण आरोप त्यांनी पुरावे आणि आकडेवारीनिशी खोडून काढले. जिथे प्रशासनाच्या तृटी राहिल्या त्या त्यांनी खुलेपणाने मान्य केल्या.

गुजरात दंगलींपूर्वी केवळ ४ महिने आधी ते मुख्यमंत्री झाले होते आणि केवळ ३ दिवस आधी राजकोट विधानसभेच्या पोटनिवडणूकीत ते विजयी झाले होते. त्यापूर्वी ना कधी ते आमदार होते ना सरकारात त्यांनी कोणती जबाबदारी पार पाडली होती. मुख्यमंत्री व्हायच्या आधीची ६ वर्षं ते राष्ट्रीय राजकारणात असल्याने गुजरातबाहेरच राहिले होते.

या त्यांच्या मुद्यांमध्ये तथ्य असल्याचं आम्हाला पटलं. "हा कलंक माझ्या कारकिर्दीत लागला असून मलाच तो धुवावा लागणार आहे" अशा शब्दांत त्यांनी दंगलींची जबाबदारी स्वतःकडे घेतली. नरेंद्र मोदी दंगलींबद्दल माफी मागत नाहीत असा अनेकांचा आक्षेप असतो. पण आपली न्यायव्यवस्थाही "सॉरी" म्हटलं म्हणून कोणाचे गुन्हे माफ करत नाही. मी दोषी असेल्याचं सिद्धं झाल्यास मला भर चौकात फाशी द्या असं मोदी सांगतात.

यापूर्वी गुजरातमध्ये एवढ्या दंगली झाल्या पण कॉंग्रेसच्या एकाही मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आमचे म्हणणे मांडायला संधी दिली नाही. १९९२च्या दंगलींनंतर पंतप्रधान नरसिंहा राव यांना भेटायला गेलेल्या शिष्टमंडळात माझे काका होते. त्यांना ४ दिवस ताटकळत ठेऊन पंतप्रधानांनी शेवटी भेट दिलीच नाही असं सरेशवाला सांगतात. या भेटीपासून सुरू झालेल्या मोदींसोबतच्या मैत्रीबाबत बोलताना ते कशाप्रकारे गेल्या १० वर्षांमध्ये गुजरातमध्ये एकही दंगल झाली नाही, आधी गुजरातमध्ये मुस्लिम शाळा काढणे दूरास्पद होते ते आता किती सहजशक्य झाले आहे आणि गुजरातच्या मुसलमानांनी कशा प्रकारे आर्थिक प्रगती केली आहे याचे अनेक दाखले देतात.

दुसरीकडे मोदीविरोधी ब्रिगेडमधील तथाकथित सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार कशा प्रकारे दंगलींची केवळ एकच बाजू दाखवतात, दंगलींमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी असलेल्या कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या सहभागाबद्दल मूग गिळून गप्प बसतात, स्वतः मुंबईत राहून गुजरातच्या मुसलमानांबद्दल नक्राश्रू ढाळतात आणि कशा प्रकारे दंगलग्रस्तांच्या जखमा भळभळत राहतील यासाठी प्रयत्नं करतात याबद्दलही ते भरभरून बोलतात.

आजवर मोदींची एवढी स्तुती ऐकायची सवय नसल्याने मधु किश्वर यांनी यातील शक्य तेवढ्या संवादांचे व्हिडिओ चित्रिकरण केले असून सरेशवालांच्या कहाणीची महेश भट आणि रजत शर्मांकडून खातरजमा केली आहे. पुस्तकाचा भर गुजरात दंगली, नरेंद्र मोदींना खलनायक ठरवण्यासाठी कॉंग्रेस तसेच मिडिया आणि सामाजिक संस्थांच्या एका गटाने गेली १२ वर्षं अविरतपणे चालवलेली मोहिम आणि गुजरातमधील मुसलमानांचा विकास या विषयांवर असला तरी ते कोणत्या पार्श्वभूमीवर मोदींची गुजरातमध्ये थेट मुख्यमंत्री म्हणून पाठवणी करण्यात आली, मोदींच्या नियुक्तीवर नाराज असलेल्या भाजपाच्या विविध गटांनी त्यांना कशा प्रकारे त्रास दिला, मोदींनी अल्पावधीतच कशा प्रकारे प्रशासन व्यवस्थेवर पकड मिळवली आणि भ्रष्टाचारमुक्त, कार्यक्षम आणि संवेदनशील व्यवस्था कशाप्रकारे निर्माण केली यावरही प्रकाश टाकते.

२६ जानेवारी २००१ला कच्छला देशातील सर्वात मोठा भूकंप झाला. त्यानंतर ९ महिन्यांनी मोदींची गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली. तोपर्यंत भूकंपग्रस्तांचे हाल कुत्रं खात नव्हतं. ते न पाहवल्याने कच्छमध्ये तळ ठोकून सामान्य माणसांच्या दुःखात सहभागी होणारे; त्यांच्या घरी जाऊन त्यांच्यासह जेवणारे, त्यांचे आश्रू पुसणारे मोदी या पुस्तकातून आपल्या समोर येतात तेव्हा रांगडी आणि पोलादी प्रतिमा उभी केलेल्या मोदींचे मन किती संवेदनशील आहे याचा आपल्याला प्रत्यय येतो.

देशातल्या सर्वात मागास जिल्ह्यांत समावेश असलेल्या कच्छला नरेंद्र मोदींनी कशा प्रकार देशातील सर्वाधिक वेगाने विकास होणाऱ्या जिल्ह्यांच्या यादीत पोहचवले (यावर गेल्या वर्षी मी कच्छला भेट देऊन आल्यानंतर "जेव्हा कासव धावू लागते http://goo.gl/iBPQNd हा लेख लिहिला होता) याची कहाणीही रोचक आहे.

मोदींवर काय वाट्टेल ती टीका करणारे असंख्य लोकं आहेत आणि त्यात समाजातील अनेक मान्यवरांचाही समावेश आहे. दुसरीकडे "मोदींसाठी काय पण" असाही एक वर्ग आपल्याला इंटरनेट आणि सोशल मिडियावर हमखास भेटतो. त्यामुळे कुंपणावरच्या माणसांची स्थिती गोंधळल्यासारखी होते. मधु किश्वर यांनी स्वतः २००२ च्या दंगलींनंतर मोदींवर टीका करणारे अनेक लेख लिहिले होते.

२०१३ साली स्वतः केलेल्या अभ्यास दौऱ्यानंतर त्यांचे मनःपरिवर्तन झाले. या पुस्तकात अनेक लोकांच्या मुलाखती त्यांच्या शब्दात मांडल्या असल्याने काही गोष्टी आणि उल्लेख पुन्हा पुन्हा येतात. तेवढा भाग सोडला तर हे पुस्तक मनाचा ठाव घेते. या निवडणूकींत मतदान करण्यापूर्वी शक्य झाल्यास हे पुस्तक वाचा असं सुचवायला मला आवडेल.

*************************लेख समाप्त*******************

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

>> कट्टर मोदीविरोधक असणारा आणि नंतर त्यांचा समर्थक बनलेल्या लंडनस्थित मुस्लिम माणसाची कहाणी वाचण्यात आली.
ह्या माणसानं पूर्वी मोठी चळवळ वगैरे मोदींविरुद्ध आंतररष्ट्रिय पातळीवर चालवली होती.
पण मोदी भेटींनतर त्याच मत बदलत गेलं. नंतर तो स्वतः एकटाच गुजरातेत जाउन राहून आला.
मत बदलण्यात तो महत्वाचा टप्पा ठरला. <<

जर लंडनस्थित जफर सरोशवालांचं ते म्हणणं वाचलंत तर मग जरा अहमदाबादेतल्या जुहापुरा ह्या मुस्लिम वस्तीतल्या जाहिर जानमोहंमद ह्या रहिवाशानं मधु किश्वरना लिहिलेलं हे पत्रदेखील वाचावंत अशी नम्र विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मला वाटले दुवा चुकला असावा, हे हि एक पत्र आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत आहे. मोदी आले तर देशात अराजक माजेल हे पूर्णपणे दिसतय त्या पत्रावरून. या देशात, प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्हा परिषदेत, प्रत्येक महानगर पालिकेत कॉग्रेसचच सरकार पाहिजे. जो पर्यंत चंद्र सूर्य तारे आकाशात आहेत तोपर्यंत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

>>थत्ते असं वरच्या प्रतिसादासारखं गर्भित कायतरी लिहितात.
पण जे थेट सरळ लोकांनी लिहिलय, त्याबद्दलही बोलले तर बरं होइल.

म्हणजे काय?
मौत के सौदागर असं लिहू का?

माझ्या नात्यात किंवा संपर्कात असलेल्या सवर्ण हिंदूंपैकी ५०% हून अधिक लोक "*डे माजलेत आणि त्यांना धडा शिकवायला पाहिजे" असं उघड बोलतात. उरलेल्यांना मनातून तसं वाटत असेल असा अंदाज आहे. कारण तसं गर्भित ते बोलतातच. ७ डिसेंबर १९९२ रोजी हिटलरने केलेल्या एथनिक क्लीन्सिंगचा जर्मनीला कसा फायदा झाला वगैरे गोष्टी ऐकायला मिळाल्या. त्यामुळे उच्चवर्णीय हिंदूंना काय हवे आहे याचा अंदाज मी बांधू शकतो.

२००४ मध्ये भाजपचा पराभव झाला त्यात"आम्ही ज्यासाठी तुम्हाला निवडून दिले ते तुम्ही केले नाही" हा भाग बराच होता. तसेच २००९ मध्ये आक्रमक हिंदुत्व न स्वीकारल्यामुळे भाजपकडे पाठ फिरवणारे लोक भरपूर असणार.

आज मोदी समर्थक म्हणून फेसबुकवर धुमाकूळ घालणार्‍यांच्या टाइमलाईनवरच्या निवडणूक पूर्व काळातल्या (आणि अण्णा आंदोलनाखेरीजच्या काळातल्या) पोस्टस पाहिल्या तर त्यात 'हिंदूंवर अन्याय, गायींची हत्या' वगैरे थीम्स बर्‍याच प्रमाणात दिसतील.

म्हणून आज हे फेसबुकी जरी मोदींच्या विकासाच्या नावे उड्या मारत असले तरी त्यांची सुप्त इच्छा पूर्ण करेल असा मनुष्य मोदींच्या रूपाने त्यांना सापडला आहे. [मोदींना मिळालेल्या निर्दोषत्वाच्या दाखल्यांचा हवाला ते देत असले तरी मोदी त्या कृत्यात सामील होते अशी त्यांची धारणा आहे].
================
बाकी मतपरिवर्तनाचे म्हणाल तर मीही एकेकाळी जहाल वगैरे होतो. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हे असे तपशील नीट समजले कोण काय म्हणतय, का म्हणतय; त्याची लिंक लागते.
त्यात एक तर्कसंगती दिसते. आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

थत्ते:

भाजपच्या मागील सरकारकडून समाजातल्या एका विशिष्ट वर्गाची काही अपेक्षा* होती. त्या त्यावेळच्या सरकारने पुरी केली नाही त्यामुळे या वर्गाच्या मनातून भाजप उतरलेला होता. म्हणजे ते भाजपसमर्थकच राहिले असले तरी तो जोर काही नव्हता.

हा वर्ग यंदाच्या निवडणुकीत पुन्हा उत्साहाने मोदींकडे डोळे लावून बसला आहे. त्यांच्या मनातली ती अपेक्षा मोदी तरी पुरी करतील असे त्यांना वाटत आहे. असे त्यांना वाटण्याचे कारण मोदींच्या इतिहासात आहे. मोदींनी ती अपेक्षा यापूर्वी डिलिव्हर केलेली आहे.

*ही अपेक्षा विकास/अर्थव्यवस्था या संदर्भातली नाही हे येथे लक्षात घेणे जरुरीचे आहे

मनः

थत्ते असं वरच्या प्रतिसादासारखं गर्भित कायतरी लिहितात. पण जे थेट सरळ लोकांनी लिहिलय, त्याबद्दलही बोलले तर बरं होइल.

थत्ते

म्हणजे काय?
मौत के सौदागर असं लिहू का?

एरवी असे संवाद मी इग्नोर करतो. पण इथे मते मांडणारे थत्तेजी आहेत जे सहसा खूप संतुलित विचार मांडतात. ते काँग्रेसी विचारांचे आहेत आणि मी ही अनेकदा भाजपीय विचारांना सब्क्राईब केले तरी माझा दुसरा चॉइस हमखास काँग्रेसच असतो. Before writing the text below, let me say that I still feel that a congress led government under a mature leader like P. Chidambaram is a better choice for 16th Loksabha and Modi should sit in opposition for 5 years. I am giving this disclaimer, unusual of me, at the beginning of this response, because I don't want my response to be seen in political light.

माझ्या नात्यात किंवा संपर्कात असलेल्या सवर्ण हिंदूंपैकी ५०% हून अधिक लोक "*डे माजलेत आणि त्यांना धडा शिकवायला पाहिजे" असं उघड बोलतात. उरलेल्यांना मनातून तसं वाटत असेल असा अंदाज आहे. कारण तसं गर्भित ते बोलतातच. ७ डिसेंबर १९९२ रोजी हिटलरने केलेल्या एथनिक क्लीन्सिंगचा जर्मनीला कसा फायदा झाला वगैरे गोष्टी ऐकायला मिळाल्या. त्यामुळे उच्चवर्णीय हिंदूंना काय हवे आहे याचा अंदाज मी बांधू शकतो.

आपल्याला नक्की काय म्हणायचं आहे? भारतातल्या अर्ध्यापेक्षा जास्त सवर्ण हिंदूंना, म्हणजे अंदाजे १६ कोटी लोकांना, संख्येने १३% म्हणजे पून्हा १६ कोटी लोकांना, अर्थात मुसलमानांना, नष्ट करायचे आहे? हे १६ कोटी (किंवा तितक्या प्रमाणातले)सवर्ण लोक आत्ताच असे विखारी झाले आहेत कि स्वातंत्र्यापासून असे आहेत? त्यांचा इतर हिंदू समाजावर काहीच प्रभाव नाही का? ज्या इतर हिंदूचे/धर्मीयांचे विकासाचे पैसे खाऊन ते त्यांना ७० वर्षे मूर्ख बनवू शकतात त्यांना ते "आम्ही दंगा करताना तुम्ही फक्त शांत रहा" इतके पटवू शकत नाहीत? हे सवर्ण हिंदू संख्येने थोडे कमी आहेत मात्र आर्थिक, सामाजिक, इ दृष्ट्या त्या १६ कोटी मुस्लिमांपेक्षा फारच मागास आहेत का? या सवर्णांना थांबवून धरणारे काय आहे? या लोकांचे राजकीय प्रतिनिधित्व स्वातंत्र्यापासून फारच कमी राहिले आहे का? असे नसेल तर हे वाईट ५१% सवर्ण, इतक्या वर्षांत एकदाही त्या सज्जन ४९% सवर्णांना ओव्हरपावर करू शकले नाहीत? त्यांना कोणतेही राजकीय मॅनिप्यूलेशन जमले नाही? आणि धडा शिकवणे म्हणजे काय? हत्या? देशाबाहेर घालणे? (मतदानाचे, राजकारणाचे, संपत्तीचे, धार्मिक, इ)अधिकार काढून घेणे? यात मी केवळ उघड बोलणारांबद्दल बोलतोय. इतरांना (लगभग सर्वांना) देखिल तसेच वाटत असावे हा तुमचा अंदाज दुर्लक्षित करतोय. तो जर पकडला तर भारतात ३०-३२ कोटी सर्वण हिंदूंची एक जबरदस्त वोटबँक आहे. भारतातल्या कोणत्या राजकीय, प्रशासकीय, न्यायिक धोरणातून ही वोटबँक आपले साध्य साधण्यास यशस्वी ठरली आहे असे आपल्याला वाटते?

तुमच्या संपर्कात जे असले सवर्ण आले आहेत ते भारतातल्या अत्यंत प्रगत भागातले, त्यातही उच्च आणि सर्वोच्च जाती उपजातींतले आहेत असे मानण्याचे स्वातंत्र्य मी घेतो. म्हणजे त्यांचे सामान्यज्ञान नीट असावे या अर्थाने. युरोपातला नरसंहार (वांशिक जिनोसाइड)आणि आजची स्थिती याचे त्यांना ज्ञान असणे अपेक्षित नाही का? म्हणजे असे बोलणारा मूर्ख जर मला भेटला असता तर मी त्याला लगेच काही प्रश्न विचारले असते. १.५% असणारे ज्यू आणि १३% असणारे भारतातले मुस्लिम यांच्यात फरक आहे कि नाही? ज्यू खूप श्रीमंत, हुशार आणि पावरफूल होते म्हणून ५०-६० लाख ज्यूंचा मृत्यू जगात सर्वांनाच माहित आहे.

त्या कांडानंतर, अगदी अलिकडे, म्हणजे १९९४ मधे, रवांडा मधे ८ लाख लोक अत्यंत अल्प काळात नरसंहाराने मारले गेले. किती लोकांना याची कल्पना आहे? हा देश छोटा आहे. मारल्या गेलेल्या जमातीचे ७०% लोक नष्ट झाले. २०% लोकसंख्या नष्ट झाली. याच माहितीच्या आधारे मी हे मान्य करून चालतो कि कुठेही काहीही होऊ शकते. तेव्हा वेळ सांभाळलेली बरी. पण हे करताना कोणत्या टोकाला जावे? "कुठे काहीही होऊ शकते" हे आपण आजच्या संयुक्त संस्थानांबद्दलही बोलाल का? याच अमेरिकेचा इतिहास काय आहे? मानवतावादाचा नि स्वातंत्र्याचा आज इतका नाच करणार्‍या या लोकांनी एक अख्खा खंड वाइप आउट केला आहे. मग कालामानानुसार देशांना, समाजांना प्रगल्भता, शहाणपण येते हे मान्य करायचे आहे कि नाही? कि भारतीय समाज, जेव्हापर्यंत हिंसक मूल्यांचा प्रश्न आहे, प्रगत राष्ट्रांशी तोलला जाऊ शकत नाही असे आपल्याला म्हणायचे आहे? भारतीय समाज इतकाच विभाजित होता तर बाबरी मजिद पाडण्याची घटना इथे प्रचंड (करोडोंमधे) नरसंहार घडवून आणावयास पुरेशी होती. असे का झाले नसावे? भारतात इतके विष माजले असताना २०००च (असे च लिहू नये, दुर्भाग्यपूर्ण आहे, पण मला असे म्हणायचे आहे कि इथले लोक रक्तपिपासू नाहीत.) बळी पडले. मला असे म्हणायचे आहे कि भारताची संस्कृती वेगळी आहे. इथे अगदी काश्मिरातून पंडित हाकलले गेले, पण नरसंहार झाला नाही. मुद्दा असा आहे कि देशात किती नरसंहार होईल याची जी भिती बाळगली जाते वा दाखवली जाते याला मर्यादा नसावी का?

आपल्याला पुन्हा नक्की काय म्हणायचं आहे? गांधीजींच्या अहिंसा, सहिष्णूता या तत्त्वांमागे इतक्या संख्यने उभे राहणारे सवर्ण नाटकी आहेत? कि त्यांची दुसरी तिसरी पिढी वेगळ्या (अगदी उलट्या)मूल्यांची आहे?

शिवाय भारतात इतका अंडरकरंट आहे? इतकी स्फोटक परिस्थिती आहे? आणि ती केवळ काँग्रेस (सपा, सीपीएम्, इ)च्या अत्यल्प (पण पुन्हा सवर्ण) बुद्धीजीवी प्रामाणिक मानवतावादी लोकांनी ७० वर्षे सांभाळून धरली आहे? लक्षात घ्या कि "धडा शिकवणारे लोक" हे "सनातनी लोकांचा" एक लहानसा सेट आहेत. मग भारतात सनातन्यांचा एक शंखनाद सर्वत्र ऐकू येतो का? (म्हणजे परवा सरकारने वैष्णोदेवीचे चित्र असलेले नाणे काढले. त्याने काही लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यांनी आर बी आय ला कोर्टात नेले. आता ही नाणी बाजारात होर्डींग मुळे आणि उत्पादन कमी केल्याने कमी आहेत. आता ही माता उत्तर भारतात इतकी जास्त पूजली जाते कि विचारू नका. पण लोकांत काही राग, इ नाही. मोर्चे नाहीत. इ इ नाही. का? हे लोक काही "धडा शिकवू इच्छिणारे" नाहीत. ते साधे भक्त आहेत. त्यांना फक्त त्यांचे नाणे हवे आहे. पण तरीही त्यांचा आवाज ऐकू येत नाही. का?) हा देश आपल्याला एक सुप्त्/निद्रिस्त ज्वालामुखी वाटतो? इथे हिंदूंत आणि मुसलमानांत छोटे-मोठे फरक आहेत कि जवळजवळ प्रत्येक जण प्रत्येक वेळी "तयार" असतो? शेतात, कारखान्यात, कंपनीत, अन्यत्र जिथे सवर्णांची मालकी असते तिथे असे प्लॅन तयात होत असतात का?

आपण जिथले आहात, तो परिसर उजव्या चळवळीचा गढ आहे. तिथे काही लोक काहीही मत मांडणारे मिळणारच. त्याला किती महत्त्व द्यायचं? आज दलित चळवळ बरीच सोबर झाली आहे. माझ्या कॉलेजच्या दिवसांत ती बरीच तरुण आणि विखारी होती. अक्षरशः "अजून काही वर्षांनी आम्ही तुम्हा सगळ्या ब्राह्मणांना कापून काढू." असे शब्द मी काही लोकांकडून ऐकले आहेत. पण असं काही झालं आहे का? उलट भेदाची दरी दिवसेंदिवस मिटत आहे. अजूनही बराच अंडरकरंट आहे, पण अशा लोकांना किती सिरिअसली घ्यायचं? उद्या आर पी आय ला मत देताना हे वाक्य आठवून मी कायमचीच पाठ फिरवावी का?

आणि असे कुठे प्लॅन तयार होतही असतील तर ते राजकीय लोभाने असतील याची शक्यता नाही का?

माझं खूप स्पष्ट मत आहे कि भारत प्रचंड वेगळा आहे. त्याची तुलना मध्ययुगीन रानटी युरोप आणि सद्यकालीन आफ्रिकेशी करता येत नाही. इथे युद्धे झाली. टोळ्यांच्या आक्रमणाच्या काळात कत्तली आणि विस्थापने झाली असतील. पण इथे अगदी ब्रिटीशही "आरामात" राज्य करून गेले. शेवटी परिस्थिती आरामाची ठेवायची स्किल भारतीयांची आहेच.

सर्वात शेवटी, सध्याला भारतात नरसंहार करायचा राजकीय मानस काही लोकांचा आहे इतके मान्य केले तरी, आपला इथपर्यंतचा प्रतिसाद वाचेतो, इथली मूळ परिस्थितीच स्फोटक आहे हे जे आपल्याला सूचित करायचे आहे, त्याचा पूनर्विचार व्हावा.

२००४ मध्ये भाजपचा पराभव झाला त्यात"आम्ही ज्यासाठी तुम्हाला निवडून दिले ते तुम्ही केले नाही" हा भाग बराच होता. तसेच २००९ मध्ये आक्रमक हिंदुत्व न स्वीकारल्यामुळे भाजपकडे पाठ फिरवणारे लोक भरपूर असणार.

आपल्या प्रतिसादात हे विधान नसते तर इतका मेगाबायटी प्रतिसाद मी लिहिला नसता. आपलं इतर सगळं वाचून "भारताच्या लोकसंख्येत" असे "धडा शिकवू पाहणारे लोक" किती आहेत ते कळत नाही. या वाक्याने ते सुस्पष्ट होतं. सरकार पाडू शकतील इतके लोक अशी भावना धरून आहेत असा याचा अर्थ होतो. ही पून्हा भारतातल्या लोकांवर टिका आहेत. याने अशी विकृत धडा शिकवण्याची इच्छा असणारे लोक कोणाला कशी मते देत होते, ते कसे निर्माण झाले, आणि धडा ही त्यांची किती मोठी प्रायोरेटी आहे याबद्दल मी प्रचंड कंफ्यूज झालो आहे. म्हणजे कितीही समीकरणे मांडली तरी असे लोक इतके असणे कोणत्याही काळात सिद्ध होत नाही.

कळस म्हणजे इथे राजकीय पक्ष म्हणून अशा सर्व "धडावादी" विचारांचे प्रतिनिधित्व करणारे भाजपचे नेते त्यामानाने प्रत्यक्ष उदारमतवादी वागले आहेत अशी या वाक्यात कबूली आहे. आणि शिवाय "वाजपेयींनी" धडा शिकवावा अपेक्षा करणारे मूर्ख आक्रमक विचारांचे सवर्ण हिंदू प्रचंड प्रमाणात आहेत असेही म्हणायचे आहे. पण ते असो.

आज मोदी समर्थक म्हणून फेसबुकवर धुमाकूळ घालणार्‍यांच्या टाइमलाईनवरच्या निवडणूक पूर्व काळातल्या (आणि अण्णा आंदोलनाखेरीजच्या काळातल्या) पोस्टस पाहिल्या तर त्यात 'हिंदूंवर अन्याय, गायींची हत्या' वगैरे थीम्स बर्‍याच प्रमाणात दिसतील.

धार्मिक भावना नसणे, धार्मिक भावना असणे, धार्मिक भावनांवर अन्याय झाला असण्याची भावना असणे/नसणे, आणि त्याचा बदला "धडा शिकवून" घ्यायची भावना असणे /नसणे या सहा वेगवेगळ्या भावना आहेत. पण म्हणून "धार्मिक भावनांवर अन्याय झाला असण्याची भावना असणे" याला नेहमीच "त्याचा बदला "धडा शिकवून" घ्यायची भावना असणे" असे वाचता येणार नाही. आर एस एस हे हिंदू पुरुषांचे संघटन आहे म्हणून ते मुस्लिमविरोधी आणि स्त्रीविरोधी ठरत नाही. ते वेगळ्याने सिद्ध करावे लागेल.
पण अर्थातच अशा पोस्ट्स लिहिणार्‍या लोकांच्या भावना, खासकरून इतिहासात काय झाले याबद्दलच्या, अधिक तीव्र असतात, हे मान्य आहे.

म्हणून आज हे फेसबुकी जरी मोदींच्या विकासाच्या नावे उड्या मारत असले तरी त्यांची सुप्त इच्छा पूर्ण करेल असा मनुष्य मोदींच्या रूपाने त्यांना सापडला आहे. [मोदींना मिळालेल्या निर्दोषत्वाच्या दाखल्यांचा हवाला ते देत असले तरी मोदी त्या कृत्यात सामील होते अशी त्यांची धारणा आहे].

इथपर्यंत आपण कोठेही कोणाच्याही (म्हणजे धडावाड्यांच्या) प्रामाणिक आणि अंतस्थ (मग त्या चूकिच्या का असेनात) भावनांवरच शंका घेतली नव्हती. इथे मात्र ती मर्यादा ओलांडली आहे. आता आपण जरी अशी शंका घेतली तरी आपल्या हेतूंबद्दल मुळीच शंका न घेता मी काही प्रश्न विचारतो त्यांची उत्तरे द्या. पण आपल्या उत्तरांत सुसुत्रता हवी.
"धडा शिकवण्याची" एक इच्छा राजकीय मूर्त रुप, आजवर, घेऊ शकली नव्हती. आता मोदींचे सरकार बनले तर ती घेईल. इथे अशा भावनांचे मोदी हे प्रामाणिक प्रतिनिधी आहेत असे आपल्याला वाटते का? ते प्रामाणिकच नाहीत, त्यांना पैसे, प्रसिद्धी इ पाहिजे आहे असे नसावे असे वाटते का? त्यांना नक्की काय हवे आहे? त्याच्या कोर ग्रुपला काय हवे आहे? याचे उत्तर निरंकुश सत्ता असे आहे का? असे असेल तर मोदींचे टार्गेट काय आहे (म्हणजे त्यांना किती वेळ, किती भागात , किती बळी, कोणत्या लोकांचे) घ्यायचे आहेत? अर्थातच असे करण्यासाठी प्रशासन आणि हिंदू समाजाची जाहीर मदत आणि संम्मती हवी. ती त्यांना मिळेल का? सत्ता वारंवार मिळण्यासाठी मोदींना घड्वून आणायच्या दंगलीत हिंदू न के बराबर मरणे गरजेचे आहे. ते कसे साध्य करणार? म्हणजे आसाम, बंगाल आणि केरळ मधे बाजी पलटली (म्हणजे सगळे हिंदूच नष्ट झाले) तर त्यांना कोणीच निवडून देणार नाही. इतरत्रही विषिष्ट लोक वेगळे कसे काढणार? यावेळी लष्कर काय करेल? आंतरराष्ट्रीय समुदाय काय करेल? आजकाल सगळ्या गोष्टींचा व्हीडीओ बनतो. मग यू नो (किंवा यू एस) सरळ पकडून वाट लावतात. मोदी ते कसे टाळणार? सौम्य, उदारमतवादी हिंदूना कसे हाताळणार? कि ते केवळ घटनेच्या आत चूटपूट अन्याय करणार? कि घटनेच्या आत/बाहेर समान नागरी कायदा, ३७० कलम आणि ८-१० मंदिरे, हिंदूराष्ट्र इतके करून दाखवणार? बाकी सगळे न्याय्य? मोदींच्या, भाजपच्या, दुष्ट अशा सवर्णांच्या इच्छा नक्की काय काय आहेत? ते कळले तर नक्की कशाचा किती विरोध करायचा ते कळेल.

कसं आहे, किती बाऊ करणार? मी अजूनही म्हणत नाहीय कि आपल्या आर्थिक पराभवाला झाकण्यासाठी वैगेरे काँग्रेस असे म्हणत आहे. "सर्वधर्मसमभाव" हा हिंदुत्वापेक्षा श्रेष्ठ असू शकतो. तसे म्हणून मते मागा. विरासत सांगून मते मागा. अजून काही घटनेच्या आत आहे ते सांगून मत मागा. मी तर म्हणतो कि भाजपने विकासाचा नारा देऊन ९८ ते ०४ मधे जितका विकास केला त्यापेक्षा जास्त लोककल्याणाचा नारा देऊन लोककल्याण काँग्रेस सरकारने त्यांच्या काळात केले. Congress has delivered what it promised. ते सांगा. पण ज्या लोकांना आपल्यापेक्षा विभिन्न विचारधारेत रस आहे त्यांचा बागुलबूआ बनवणे आणि मते मिळवणे अयोग्य नाही का? मतभिन्नता आणि शत्रुत्व यात फरक नको का? २००२ चे दंगे जर मोदींच्या साथीने झाले असतील, असे काँग्रेसला पक्के माहित असेल तर त्यांनी मोदींना मोकाट सोडणार्‍या (वर पंतप्रधान बनू देण्यार्‍या) न्यायव्यवस्थेत असा कोणता आमुलाग्र बदल प्रोपोज केला आहे का? असा बदल त्यांचा इलेक्शन अजेंडा आहे का? न्यायव्यवस्था अशीच रडकी असू द्या आणि माझ्यावर विश्वास ठेवा (कि तो खूनी आहे) असे मला कोणी म्हणू लागला तर मी त्याचे का ऐकू? तुम्ही (काँग्रेस) केंद्रात आलात आणि राज्यांत असेच मोदी उगवू लागले तर तुमचा काय फायदा. वर अनुप म्हणाले तसे फक्त सतत तुम्हाला निवडून देणे हाच एक पर्याय आहे का?

चला एक राजकीय चाल म्हणून तुम्ही मुसलमानांना मोदीभय घालू लागलात, किंवा जनतेलाच दंग्यांचे भय घालू लागलात, (ज्यात वास्तविक काही अर्थ नाही असे मानू) तर मला एक वेळ समजेल. पण काँग्रेसच्या नेत्यांच्या वक्तव्यांवरून असे वाटू लागले आहे कि त्यांना खरोखरच व्यक्ति म्हणून मोदींची भिती वाटू लागली आहे. हे विचित्रच आहे. २००२ पासून भितीचे खोटेखोटे नाटक करायचे होते हे ते विसरूनच गेले आहेत. मग काय होणार? भित्यापाठी ब्रह्मराक्षस.

बाकी मतपरिवर्तनाचे म्हणाल तर मीही एकेकाळी जहाल वगैरे होतो.

Unfortunately I have never been able to form firm opinions and align any side. So what I end up doing is endlessly questioning the person holding such firm belief though it is not an exactly opposite view for me. I myself get nonplused in pursuit of concrete answers, so at the most I make centre of the spectrum prescriptions.
हे मत परिवर्तन झालेले लोक दुसर्‍या बाजूला जाऊन तिकडचे महाजहाल का बनतात? मतपरिवर्तन म्हणजे बुद्धाला ज्ञान झाले तसे व्हायला हवे. म्हणजे you realize the fallacy of Hindutva and now are inclined to secularism. आता काँग्रसला मत द्या म्हणा, मोदींची 'रिस्क' नको म्हणा, आम्ही श्रेष्ठ म्हणा, विरोधक उदात्त हिंदुत्वाच्या विचारांशी प्रामाणिक नाहीत म्हणा - हे सर्व ठीक आहे. पण आता तुम्ही इतके सौम्य बनले आहात का कि विरोधकच नव्हे तर त्यांचे मतदारही रक्तपिपासू मानसिकतेचे आहेत असे म्हणावे वाटावे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

टाळ्या!!!
मस्तं प्रतिसाद. आप्ल्या आजूबाजूला दिसणार्‍या ५० -१०० लोकांवरून त्याच्या अनेकपट लोकांबद्दल मतं बनवलेली इतकी उदाहरण दिसतात की वाद घालायची इच्छाच मरून जाते.

कालामानानुसार देशांना, समाजांना प्रगल्भता, शहाणपण येते हे मान्य करायचे आहे कि नाही?

हे वाक्य विशेष आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अतिशय सुंदर प्रतिसाद. सरसकटीकरणाच्या आरोपांनी कंटाळून आता बास्स! म्हटल्यावर एकदाचे जे विस्तृत विवेचन बाहेर पडते त्याचा अत्युत्कृष्ट नमुना. सरसकटीकरण हे नेहमीच फ्याशनमध्ये असते, पण सध्याची फ्याशन आधीपेक्षा वेगळी आहे इतकाच फरक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बाकी फ्याशन फिरून परत परत येताच असते. काहीच वेगळी नाहीये. वेगळा आत्ता भाग असा आहे की बरेच लोक मोदिन्च्यावर सरसकटीकरण होणाऱ्या टीकेला आणि उठ सुठ हिंदुनांना झोडपण्याला कंटाळून गेले आहेत. थोड्या थोड्या वर्षांनी असेच होत राहते. लंबक एका टोकाला गेला की पुन्हा मध्ये आणि नंतर दुसऱ्या टोकाला जातोच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत. यद्यपि डॉमिनंट डिस्कोर्समध्ये लंबक दुसर्‍या टोकाला गेल्याचे फारसे कधी पाहिले नै- किमान भारतात. (तुरळक अपवाद वगळता)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

टाळ्या!!!
मस्तं प्रतिसाद. आप्ल्या आजूबाजूला दिसणार्‍या ५० -१०० लोकांवरून त्याच्या अनेकपट लोकांबद्दल मतं बनवलेली इतकी उदाहरण दिसतात की वाद घालायची इच्छाच मरून जाते.

सॅम्पल सर्व्हे हा ५०-१०० लोकांच्या मतांवरून बनविला जातो. निवडणूक सर्व्हेचेही तसेच आहे. सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या देशातील निवडणुकीचा कल ठरविण्यासाठी चॅनलवाले हजार-दोन हजार लोकांची मते जाणून घेतात. या सर्व्हेवाल्यांची विश्वासार्हता संशयास्पद नाही का? विशेष नमूद करण्याजोगी बाब म्हणजे सगळे सर्व्हेवाले मोदींची लाट असल्याचे ओरडून ओरडून सांगत आहेत. याबद्दल आपण काय म्हणाल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वेवाले हवेतून अंदाज काढत नाहीत. त्यामागे काहीतरी statistical model असतं. घासकडवींनी मध्ये एका लेखाची लिंक दिली होती.
http://www.thehinducentre.com/verdict/commentary/article5739722.ece

थत्तेचाचांनी असं केलं असेल तर मी विश्वास ठेवायला तयार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आपला प्रतिसाद आवडला.

माझे सॅम्पल बायस मी अगोदरच उघड केलेला आहे. मी (योगायोगाने) कोकणस्थ ब्राह्मण असल्याने माझ्या संपर्कात त्यांची बहुसंख्या आहेच.
मी त्या 'विशिष्ट वर्गाबद्दलच बोलतो आहे'. त्या वर्गाचा मुस्लिमांबाबत प्रत्यक्षानुभव फारसा नसतोच (माझाही नाहीच). तुम्ही लातूरकडचे आहात त्यामुळे तुम्हाला त्यांचा अनुभव कदाचित अधिक असू शकेल.

तुम्ही 'या असल्या लोकांचा एकूण जनतेवर आणि राजकारणावर प्रभाव किती?' असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्याचे उत्तर फारसा नाही हेच आहे. पण या असल्यांची ती इच्छा आहे हे नाकारता येत नाही.

हिंदुत्ववादी आणि हिंदू सश्रद्ध हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. धडा शिकवू पाहणार्‍यांमध्ये तुम्हाला फारच थोडे श्रद्धाळू सापडतील. ते दररोजची पूजा सुद्धा करत नसतील, मांसाहार करत असतील- स्नानसंध्या तर सोडाच. (आद्य हिंदुत्ववादी सावरकर सश्रद्ध नव्हते हे तर जगजाहीर आहे).या हिंदुत्ववाद्यांचा सश्रद्धांवर प्रभाव पडू शकलेला नाहीच. पण काही काळ तरी असा प्रभाव ते ठाकू शकले आहेत.

धडा शिकवू पाहणारे स्वतः धडा शिकवायला जात माहीत जाणार नाहीत हे खरे. पण प्रत्यक्ष धडा शिकवणारे काही लोक ते निर्माण करू शकले हेही तितकेच खरे.

शेवटचे म्हणजे मोदी हे करणार आहेत असे मलाही वाटत नाही. पण ते तसे करतील असे या विशिष्ट वर्गाला मात्र वाटत असावे.

काँग्रेस मुस्लिमांना मोदींची भीती घालत आहे हे म्हणण्यापेक्षा हे हिंदुत्ववादी सामान्य हिंदूंना मुसलमानांची भीती घालत आले आहेत. (ना होते सिवाजी तो सुन्नत होती सबकी टाइप किंवा ५० वर्षात हिंदू अल्पसंख्य होणार वगैरे). फेसबुकी पोस्टींमधून ते दिसत असतेच. कुठे कुठे मुसलमान २% असले तर काय होते , ५ टक्के असले तर काय होते, १५% च्या वर गेले की काय होते अशी अ‍ॅनालिसिस येत असतात. [नेहरू-गांधी फॅमिली मूळची मुसलमानच आहे वगैरे पोस्टी सोडून देऊ].

बहुसंख्य हिंदू जनतेवर ते मोठा प्रभाव पाडू शकले नाहीत कारण हिंदू-हिंदू म्हणून त्यांनी कितीही शोष केला तरी हिंदू लोक स्वतःला हिंदू म्हणून आयडेंटिफाय करत नाहीत. ते नेहमी आपल्या जातीशीच आयडेंटिफाय करतात.

>> मी तर म्हणतो कि भाजपने विकासाचा नारा देऊन ९८ ते ०४ मधे जितका विकास केला त्यापेक्षा जास्त लोककल्याणाचा नारा देऊन लोककल्याण काँग्रेस सरकारने त्यांच्या काळात केले. Congress has delivered what it promised.

ते तर मी करतोच. पण लोककल्याण हा सध्या बॅड वर्ड आहे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तुमच्या सॅम्पल पैकी ५०% हून अधिक लोकांचे मत असे आहे हे वाचून आश्चर्य वाटले. अशी वक्तव्ये कॉलेज ई च्या काळात काही लोकांकडून ऐकली होती (आणि त्यांच्यामुळे कोणाचे मत बदलेल अशी अजिबात शक्यता नव्हती) पण नंतर एखाद दुसरा अपवाद सोडला तर फारसे ऐकले नाही.
त्यामुळे उरलेल्यांचे ही असेच मत असावे असा अंदाज हा अन्यायकारक आहे.

माझ्या स्वतःच्या अनुभवावरून तर क्वचित अपवाद सोडले तर सगळे लिबरलच आहेत.

बाकी मोदींबद्दल - भाजपचा हिंदुत्त्ववाद किंवा काँग्रेसचा सर्वधर्मसमभाव (किंवा जातिभेद नसणे ई.ई. 'मिथ') हे फक्त मतांसाठी असलेले पॉप्युलर तोंडवळे आहेत असे तुम्हाला वाटत नाही का (भ्रष्टाचाराच्या बाबतीतही). प्रत्यक्षात दोघांच्याही नेत्यांमधे फारसा फरक नाही असेच मला वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसाद आवडला.
सोबत टिव्हीवर दामिनी लागला आहे, त्यात नेमका "तारीख पे तारीख" ड्वायलॉग लागला आहे. त्या पार्श्वभूमीमुळे या प्रतिसादातला उद्वेग चांगलाच जाणवला Wink

"५०% हून अधिक लोक " या एका काहीश्या ओव्हरएस्टिमेटेड आकड्यावरून ऑफ ऑल पीपल अजोंनी इतके वैतागावे याची मात्र मौज वाटली. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आधीच्या दोन्ही बाजूच्या आक्रस्ताळ्या विचारसरणी वाचून वीट आला होता पण मन आणि अरुण जोशी यांच्या प्रतिक्रियांनी या जगांत रॅशनल विचार करणारे लोकही आहेत याचे बरे वाटले.
मोदींविरुद्धचा प्रचार तर इतका विखारी आहे की जणु ते पंतप्रधान झाल्यावर मुसलमानांसाठी काँसंट्रेशन कँपच काढणार आहेत असे वाटावे.
या मिडियाला तर काय म्हणावे तेच कळत नाही. त्यांना मलेशियन विमानाचे सोयरसुतक नाही, युक्रेनमधे काय चालले आहे हे लोकांपर्यंत पोचवण्याची इच्छा नाही, सीरियात काय भयानक परिस्थिती आहे याची पर्वा नाही. जगभरातली दिवसेंदिवस होणारी भयानक परिस्थिती आपल्या उंबरठ्यापर्यंत आली आहे याचे भान नाही. ते जात्यात असतील तर आपण सुपात आहोत याची तरी जाणीव प्रत्येक भारतीयाने ठेवायला हवी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते जात्यात असतील तर आपण सुपात आहोत याची तरी जाणीव प्रत्येक भारतीयाने ठेवायला हवी.

कोईभी फिकर मत कर यार
अब की बार.... मोदी सरकार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मार्मिक श्रेणी दिली होती, पण काही मूर्खांनी विनोदी श्रेणी दिल्याने विनोदी श्रेणीच राहिली. या प्रतिसादात विनोदी काय आहे? श्रेणीदात्यांच्या मानसिकतेचा अलीकडे उबग येऊ लागलाय.

(द्या, यालाही मस्तपैकी श्रेणी देऊनच टाका आता. होऊदे खर्च.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अहो अगदी काही वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत एका स्त्रीने स्वतःचा नवरा जिवंत असतानाही, दुसरी स्त्री पंतप्रधान झाल्यास मुंडन करण्याची धमकी दिली होती. याला विखारी प्रचार म्हणतात. मोदींबाबत जे काही होत आहे ते political mudslinging आहे जे सर्वच पक्षांबाबत होते. त्याला विखारी प्रचार म्हणत नाही. त्यामुळे मी विनोदी श्रेणी दिली होती. इतर मूर्खांबाबत माहिती नाही. वरील प्रतिसादालाही विनोदी श्रेणी दिली आहे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ळॉळ.

पण मोदीवरचे मडस्लिंगिंग लैच जास्त आहे अन ते शीर्यस असते, हुच्चभ्रूंचा त्यात लक्षणीय भरणा असतो हे जास्त चिंत्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मला स्वतःला सोनिया गांधी व इतर गांधी कुटुंबियांवरची चिखलफेक जास्त वाटते. कुणाला मोदींवरची जास्त वाटत असेल. हुच्चभ्रूंचा भरणा जास्त असण्याचे कारण ती माणसे बहुश्रुत व जगात काय चालू आहे याचे भान ठेवणारी असतात. त्यामुळे मोदीसारख्यांचा गौरव होणे त्यांना कदाचित पसंत पडत नसेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गांधी कुटुंबीयांवरची चिखलफेक तर प्रचंड अन अस्थानी आहेच. पण बहुश्रुत एट ऑल लोकांची पसंती मोदींवरच्या चिखलफेकीकडे झुकलेली असते हे रोचक वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पहिल्याच वाक्यात 'अरुण जोशी' आणि 'रॅशनल' हे शब्द एकाच वाक्यात एकसमयावच्छेदेकरून गुण्यागोविंदाने नांदताना पाहून हसू नावरल्याकारणाने पुढील काहीही न वाचता थेट 'विनोदी' अशी श्रेणी मीच दिली होती खरी.

- (बॅटमॅनपुरस्कृत मूर्ख नंबर १) 'न'वी बाजू.

(बादवे, 'काही मूर्खांनी' बोले तो, माझे सहमूर्ख नेमके कोणकोण?)

----------------------------------------------------------------------------------------------------------------------

, बोले तो, या सहमूर्खांच्या मांदियाळीतील फर्ष्ट अमंग ईक्वल्स म्हणून नंबर १. अन्यथा, आमचा श्रेष्ठत्वाचा कोणताही दावा नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ळॉळ. पण तो मेगाबायटी प्रतिसाद र्‍याशनल होता बादवे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शक्यता नाकारता येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोदींविरुद्धचा प्रचार तर इतका विखारी आहे की जणु ते पंतप्रधान झाल्यावर मुसलमानांसाठी काँसंट्रेशन कँपच काढणार आहेत असे वाटावे.

आँ... मग २००१ साली गुजरातेत जे काही झाले ते काय होते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रश्नः नमो, राहुल, सोनिया, मायावती, मुलायम ह्यांनी एकाच वेळी कुतुबमिनारवरून खाली उडया मारल्या तर कोण वाचेल?
उत्तरः भारतीय नागरिक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरूणजोशी यांच्या माहितीसाठी आंग्ल भाषेतील खास एक म्हण :
brevity is the soul of wit.
सोप्या मराठीतील अर्थ असा : संक्षिप्तता हा बुद्धिमत्तेचा आत्मा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संक्षिप्तता हा बुद्धिमत्तेचा आत्मा आहे.

पटले नाय राव. Smile

शेकड्यानी लेखक आहेत की ज्यांच्या लिखाणांचे समग्र साहित्य ... ११ खंड, ९ खंड प्रकाशित झालेले आहेत.

उदा. जीएंनी लिहिलेल्या नुसत्या पत्रांचे ४ खंड आहेत. म द हातकणगलेकर यांनी संकलित केले आहे (माझ्या माहीतीनुसार.)
विवेकानंदांचे साहित्य ११ खंडांत प्रकाशित झालेले आहे (रामकृष्ण मिशन तर्फे).
जेम्स ब्युकॅनन यांचे १० खंड आहेत. आर्मेन आल्चियन यांचे २ खंड आहेत.
टॉयन्बी यांचे इतिहासाचे ७ खंड आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पटले नाय राव.
शेकड्यानी लेखक आहेत की ज्यांच्या लिखाणांचे समग्र साहित्य ... ११ खंड, ९ खंड प्रकाशित झालेले आहेत.

एक लक्षात घ्या की, आम्ही सांगतो आहोत, तर त्यावर सर्वांनी विश्वास ठेवायलाच पाहिजे.

तुम्ही ज्या महान प्रभृतींची नावे देऊन त्यांच्या खंडांचे आकडे दिले आहेत, ते खरेच आहेत. या लोकांनी संक्षिप्त लिहिले म्हणून त्यांचे वाङ्मय किमान दहा-दहा, अकरा-अकरा खंडांत बसले. त्यांनी अरूणजोशी यांच्यासारखे मेगाबायटीमध्ये लिहिले असते, तर शे-शे दोन-दोनशे खंड झाले असते प्रत्येकाचे. मग ते आपल्याला परवडले असते का?

इथून तरी आमच्यावर अविश्वास दाखविण्याचे पाप करू नका, ही विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0