Skip to main content

तुझं माझं जमेना

हे काय लिहिलं आहे; नक्की ठाउक नाही.
एकदम डोक्यात गुणगुणावसं वाटलं ते सरळ टंकलं आहे.
एखादं तंतू वाद्य किंवा स्वरवाद्य येत असतं तर चाल लावण्याचा प्रयत्न केला असता.

मला तुझी आठवण येते
साधा डेस्क छान आहे
त्यावरती पाणी आहे
तुझी नजर पाण्यात दिसते
तू मला आवडतेस

आपण दोघे दंगाखोर भांडखोर
वेडे आपण ; वेडे सारे शहाणे
चेंडू गेला दूर
आणायला गेलिस तू

वाट तुझी पाहतोय मी
चेंडू आलाय परत
पण हाक मारून थकलोय मी

तुझ्या हाका आल्या
तू आली नाहिस
ग्राउंडची बाउंडरी हलली नाही
पिच सोडून अस्सा मी येणार नै
हाक नको मारुस समोर ये तूही

अजो१२३ Thu, 13/03/2014 - 12:06

मला तुझी आठवण येते

माझा फोन नंबर तुझ्याकडे आहे, फोन कर. भेटायलाही येऊ शकतोस.

साधा डेस्क छान आहे

त्यापेक्षाही साधे डेस्क बाजारात आहेत. पाहिजेत तर कळव.

त्यावरती पाणी आहे

हो, तूच सांडलंयस, ते पटकन पुसलं पाहिजे बाबा

तुझी नजर पाण्यात दिसते

अर्थातच, असं डेस्कवर पाणी , वैगेरे सांडलेले असताना मला अवघडल्यासारखं होतं

तू मला आवडतेस

मनोबा, वाक्यात लिंगाचा वापर चूक होतोय

आपण दोघे दंगाखोर भांडखोर

ठिक. समस्त ऐसीकरांना माहित आहे. पण जाहिरपणे असे बोलू नये.

वेडे आपण ; वेडे सारे शहाणे

हे ही ठिक. फायनली स्वतःला शहाणेच म्हणायचे असते.

चेंडू गेला दूर

फेकलासच जोरात ना

आणायला गेलिस तू

आता पून्हा मला बाईसारखे संबोधलेस तर मी काही करणार नाही

वाट तुझी पाहतोय मी

तू नॉर्मल होशील तेव्हा परत येईन म्हणतो

चेंडू आलाय परत

मीच फेकला

पण हाक मारून थकलोय मी

हाक मारून कुठे चेंडू परत येतो का? शेवटी तुझा घसा बसू नये म्हणून मी चेंडू टाकला तुझ्याकडे

तुझ्या हाका आल्या

त्या मी भाजीवाल्याला मारत होतो.

तू आली नाहिस

हे शेवट्चं आता बरं. अरे मन नपुसकलिंगी असतं तरी आम्ही तुला मनोबा म्हणतो.

ग्राउंडची बाउंडरी हलली नाही

भूकंपाची प्रतीक्षा आहे का?

पिच सोडून अस्सा मी येणार नै

सफरचंद सोडून ये.

हाक नको मारुस समोर ये तूही

या वेळेस लिंग जमलंय. भाजीवालाही आलाय माझ्या हाका ऐकून. आणि तुझ्याकडे समोर येण्यासाठी मोर शोधतोय.

बिपिन कार्यकर्ते Thu, 13/03/2014 - 11:53

बादवे, एखाद्या भयपटाची ष्टुरी होईल यातून चांगल्यापैकी!

चेंडू गेला दूर
आणायला गेलिस तू

वाट तुझी पाहतोय मी
चेंडू आलाय परत
पण हाक मारून थकलोय मी

Nile Fri, 14/03/2014 - 02:58

एखादं तंतू वाद्य किंवा स्वरवाद्य येत असतं तर चाल लावण्याचा प्रयत्न केला असता.

एकाच वेळेला किती इंद्रियांना त्रास द्याल?

सुशेगाद Thu, 20/03/2014 - 09:18

मी बहामामध्ये सुट्टीला गेल्यापासून ऐसीचा कवितांचा दर्जा खूपच घसरला आहे. आता परत आलोय. काव्य रसिकांनी "वाह मस्त आवडले" अशा प्रतिक्रिया द्यायला लेखण्या सरसावून ठेवा ( जसे सैनिक युद्धात भाले सरसावून ठेवायचे)

एक दोन दिवसात पोस्ट करतोय कविता.

मन Thu, 20/03/2014 - 14:31

In reply to by सुशेगाद

अवश्य लिहा. तुमच्या लिखाणातून चर्चा भारी सुरु होतात.
फक्त इथून पुढे बहामाला सुट्टीला जाण्यापूर्वी ऐसीकरांना कळवावे ही कळकळीची विनंती.
तितका काळ कविता विभाग बंद ठेवण्याची आपण व्यवस्थापनास विनंती करुत.

मेघना भुस्कुटे Thu, 20/03/2014 - 14:58

In reply to by मन

तद्दन अवांतरः
'करूत' हे रूप बरोबर आहे की 'करू' हे? बोली भाषेत दोन्ही ठीक हे मान्य आहे. पण शास्त्रानुसार? व्याकरणाचं पुस्तक काय सांगतं?

बॅटमॅन Thu, 20/03/2014 - 15:04

In reply to by मेघना भुस्कुटे

प्रमाण बोलीनुसार तरी करूत हे रूप चूक आहे. पण त्या नियमास मधूनमधून फाट्यावर कोलल्यासच बरे ;)

सुशेगाद Thu, 20/03/2014 - 15:22

In reply to by बॅटमॅन

नियमांना कोलून जातो मी
आकाशावर भाळून जातो मी
हे प्रिये टिवीचा रिमोट दे इकडे
नाहीतर डिशच उखडून टाकतो मी
पित्रोदांनी आणले विष
एकता ने हादरवली छोटी स्क्रीन
गोजिरवाण्या घराचा दहा वर्ष खाल्लास हलवा
आता तरी पवित्र रिश्ता अपवित्र होउ दे
हे सखे
एम वरती रघुचा तो जोश
मल्ल्याच्या कॄपेने येती दोन गुड टाईम्सचे
सोमण मराठी मर्द मावळा
हाच तो परीक्षक शोभे
लाव व्ही वरती गुमराह
वागळेला एकमताने फेड आऊट करू
अरणबच्या तोडांत घालूनी बोळा
सखे त्याला स्टिव आयर्विनच्या मगरीस देउ
पुनहा कधी येइल पामेला
धकधक करोनी
रंग उधळाया कलर्स वर
आतातरी निर्मलबाबांना शरण जातो
सखे तुला सांगत होतो
डिश लगा डाला तो लाईफ झिंगालाला
पण पूर्वीच्या सातच्या बातम्याच़या अँकरच उलाला

बॅटमॅन Thu, 20/03/2014 - 15:37

In reply to by सुशेगाद

साधु!! साधु!!!

श्रवुनि सकल गाथा, भिन्नशा च्यानलांची |
बहुत मनि गमे हो, भावना रीलिफाची |
प्रहरभरुनि सर्वे, क्रंदती रेकताती |
नच कुणि करि ते पैं, सर्वही भांडताती ||१||

काढी कुणी शार्कचा पूर्ण काटा |
अन्यत्र दीसे बिकिनीझपाटा |
पाल्टिक्स वा पिच्चरही असो तो |
केकाटतोसा बहु लोक जो तो ||२||

डोस्के ठिकाणिं नसतां, कंडुअतिशमनार्थ च्यानले पाहावी |
तेहीं नसतां मग, बहु ती संस्थळेचि हुडकावी ||३||

आदूबाळ Thu, 20/03/2014 - 20:42

In reply to by बॅटमॅन

बिकिनीझपाटा हा शब्द काळजास स्पर्शून गेला. आमच्या.

-

सुशेगाद यांच्या कवितेमधली "पित्रोदांनी आणले विष" वाचून बराच वेळ हसत बसलो होतो. :D

Nile Thu, 20/03/2014 - 21:48

In reply to by बॅटमॅन

हे प्रिये टिवीचा रिमोट दे इकडे

हे मी, 'हे प्रिये टिवीचा, रिमोट दे इकडे' असे वाचले आणि क्षणभर विचारात पडलो. पण म्हणलं असेल कोणी ग्रिको-रोमन टिवीचा (च, चार्वाकाचा) नामक हिडिंबा, असते एकेकाची आवड!

बॅटमॅन Thu, 20/03/2014 - 22:54

In reply to by Nile

पीजे समजायला अंमळ वेळच लागला. पण निळोबा, हा बाण अंमळ वाया गेला असे निरीक्षण नोंदवतो.

(बाकी तुमचा हल्कटपणा अलीकडे कमी झाल्यागत का वाटतोय देव जाणे.)

Nile Thu, 20/03/2014 - 23:14

In reply to by बॅटमॅन

(बाकी तुमचा हल्कटपणा अलीकडे कमी झाल्यागत का वाटतोय देव जाणे.)

तुमचा बराच वाढला आहे, त्यामुळे असेल. अतिपरीचयात का काय ते.

बॅटमॅन Thu, 20/03/2014 - 23:36

In reply to by Nile

तुमचा बराच वाढला आहे, त्यामुळे असेल. अतिपरीचयात का काय ते.

शक्यता नाकारता येत नाही.

सुशेगाद Thu, 20/03/2014 - 15:03

In reply to by मन

जेव्हा सिंह जंगलातून बाहेर जातो तेव्हा जंगलातील इतर प्राणी बाहेर निर्धास्त होउन फिरू लागतात.

बाकी ही कविता मला आवडली होती.
रिबेल इज द वन व्हू सेज नो.असा सूर वाटला.

सुशेगाद Sat, 22/03/2014 - 08:34

In reply to by 'न'वी बाजू

प्रश्नचिन्हाच्या माळा लावोनी
दाखवे नवी बाजू
देइ दणका प्रतिक्रियेचा
ट्रोल लागले माजू
पुण्य जाहले कमी
असे का रे राजू
वाटे श्रेण्यांची खैरात
संपादक लागले कुजू
वैतागता विद्वान ऐसीवरचे
खरडावयास नको लाजू
काहूनी उचके खोपडी
खा तू सुशेगादचे ज्ञानकाजू
पुसती का परत आलो
नाहीतर कुठे मी खाजू?

'न'वी बाजू Sat, 22/03/2014 - 06:48

हे काय लिहिलं आहे; नक्की ठाउक नाही.

नवीन काय ते बोला.