आप पक्ष

आप’ बिती!

केजरीवाल बाबू मुख्यमंत्री झाल्याबरोबर अनिल कपूरच्या ‘नायक’ चित्रपटातले काही तुकडे एका बाजूला आणि टोपी व मफलरधारी केजरीवालांची छबी दुस-या बाजूला दाखवत इलेक्ट्रॉनिक मीडियाने जो हैदोसहुल्ला उडवला होता, तो पाहून आमच्या काही जाणत्या आयाबाया, ‘ह्यो बाबा पिच्चरमदी गेलाय काय’, असंही विचारू लागल्या. लोकशाहीत घडलेला हा चिमित्कार पिच्चरमदीच आजवर दिसलेला; पण दिल्लीत खराखुरा पाहिल्याने आमी हरखून गेलो. केजरीवाल बाबू काय करतील, त्याची गडद, पुसट खूण पिच्चरमदी शोधू लागलो. मीडिया ती नंतर दाखवेना आणि मग आमची चीडचीड होऊन आमची च्यानल बदलाबदली वाढली. सत्ता हाती घेतल्यापासून रोज नव्या घोषणा करणे आणि मीडियाला ब्रेकिंग न्यूज देणे; हीच आपली ड्युटी आहे, असे ‘आप’ ग्यांगला आणि त्यांच्या प्रमुख बाबूला वाटू लागले आहे. पण, त्यांनी भरवलेला जनता दरबार पहिला, आणि राजा परांजपे व राजा गोसावी यांच्या ‘लाखाची गोष्ट’ या पिच्चरची आठवण झाली. लाख रुपये खर्चण्याची क्षमता नसलेले नायक आणि सत्ता मिळून राज्यशकट हाकण्याची कुवत नसलेले केजरीवाल; हे चित्र ब-यापैकी सारखे आहे, हे पक्के गडद झाले...
‘आप’चा उदय आणि वाटचाल ही किसन हजारे (राळेगणकर) यांच्या रामलीलावरील 2011च्या तमाशापासून सुरू झाली. प्रसिद्धीला चटावलेल्या किसन हजारेंना मीडियाने देवाचा दूत भासवत, पब्लिकचा (मेणबत्तीवाले) तारणहार केवळ तोचि एक अण्णा! हे चित्र तयार केले. त्यावर ‘जाम’ आणि ‘आम’ दोन्ही प्रकारचे पब्लिक डोलू लागले. किसन हजारे फुगू लागले आणि अशात सरकारी बिलाला ‘जोकपाल’ म्हणत केजरीवाल बाबूने कोअर कमिटीच्या मीटिंगमध्ये, ‘अब हमे व्यवस्था में उतरना होगा, असं म्हटल्याबरोबर किसन हजारे नाराज झाले, त्यांनी बाबूबरोबरचे सर्व रिश्ते तोडले.
आपल्याकडे विरेचन म्हणून एक प्रकार मान्यता पावलेला आहे. निचरा होणे. आम्ही जातीय आहोत; पण जातीयवादी नाही. सब का भला हो लेकिन पहले सिर्फ मेरा हो! याचा स्वीकार होऊन सर्व शकट नीट असावे, अशा इच्छे-अपेक्षेत वावरणारा, सांपत्तिक स्थिती उत्तम असणारा एक मोठ्ठा वर्ग, या आंदोलनात सक्रीय सामील होता. हा वर्ग 1991 नंतर जागतिकीकरण व खाजगीकरणाच्या लाटेने इथे तयार झाला. आमची सोच ग्लोबल सोच! म्हणून सिद्ध झालेला हा युवा व मध्यम सेटल वर्ग याला जातीय दंगली, राजकारण, त्यांच्या भाषेत करप्शन आणि मुख्य अजेंड्यावर आरक्षण या विषयाने ग्रासले. हा मनाने भाजप व संघाशी ज्यादा जोडलेला; परंतु वरकड सेक्युलर जप जपणारा. त्यांना उघड भाजप वा ब्राह्मणी झाकेची पारंपरिक काँग्रेस याचं कुठलंच नेतृत्व नकोसं होतं आहे. त्याला सबळ कारण म्हणजे, सोनिया गांधींचे विदेशी असणे आणि त्यांच्या हाती नेतृत्वाची दोर असणे. हे इथल्या ब्राह्मणवादी मनोवृत्तीला रुचणारे नसल्याने, या नव्या वर्गाची गरज म्हणून एक अशी नवी पार्टी की ज्यात कट्टर हिंदुत्व हवे; पण त्याचे व्यक्त होणे भाजपच्या थाटात नको. मंडल आयोगाला विरोध करणारे केजरीवाल बाबूंचे नेतृत्व या गरजेतून किसन हजारेंच्या या वेळच्या तमाशाचा फायदा घेत पुढे आणले गेले. जोपर्यंत हे नेतृत्व बाल्यावस्थेत होतं, तोवर संघीय मीडियाने त्याला कडे-खांद्यावर घेऊन वाढवले. घडवले. आणि बेमतलब हिंदी बडबड करणारे किसन हजारे बाजूला पडले. हे घडवलेले नेतृत्व, आता अप्रत्यक्ष संघप्रणीत भाजपची मदत करते आहे. ढोंग मात्र मोहनदास गांधींच्या तोडीचे वठवत आहे. सरकारी बंगलाच काय नको, सुरक्षा व्यवस्थाच काय नको, आणि स्वत: रस्त्यावर उतरून आंदोलन, या प्रकाराने तर कहरच! सरकारी बंगला घेतला असता तर जनता दरबार तिथल्या गवतावर कदाचित सहज मावला असता. आता झेड सुरक्षा नाही, म्हणजे ती केजरीवाल बाबूला आहे, असा त्यांनी ग्रह केलाय. ती मुख्यमंत्री या पदाला असते, हे मान्य करायला ते तयारच नाहीत. जिथे 40 लोकांवर काम भागते तिथे, यांच्या साधेपणा व सादगीच्या दबावाने 100 लोक सिविल ड्रेसवर तैनात करावे लागतात. त्याचे काय? साधेपणा आणि सादगीच्या नशेने बेभान होऊन मुख्यमंत्र्याने रस्त्यावर उतरून फिल्मी स्टायलने केंद्रीय गृहमंत्र्याची रेवडी उडवणे, हा भलताच डेंजर प्रोग्राम! केजरीवाल बाबूने तत्काळ देशभक्तीपर वा देशभक्तीवरच काढलेले सिनेमे पाहणं बंद करायला हवे नाहीतर, आधीचा कार्यकर्ता मुख्यमंत्री म्हणजे
आधी होती दासी। पट्टराणी केले तिसी।
तिचे हिंडणे राहिना। मूळ स्वभाव जाईना।
दुर्दैवाने सध्या दिल्लीत दिसणारी केजरीवालबाबू आणि ‘आप’ ग्यांगची थेरे म्हणजे असलाच प्रकार चालू आहे. इंग्रज गेल्याचं खरं दु:ख ‘आप’वाले व किसन हजारे ग्यांग यांच्या इतके दुस-या कुणाला होत नसावे. आंदोलनाची नशा या काळात त्यांना पुरेपूर अनुभवून तसेच कायम बडे होता येत नाही, हे दु:ख त्यामागे नक्कीच असणार. संसदेला, घटनेला नाकारत वारंवार उपोषण, तमाशे व फिल्मी आंदोलनांनी थेट सरकारी यंत्रणेला वेठीस धरून ब्ल्याकमेल करत राहणे म्हणजे लोकशाहीप्रधान मुख्य मूलभूत अधिकारांची टवाळीच म्हणावी लागेल. कायम प्रेषितांच्या शोधात असणारे समाजवादी आणि बिगर राजकीय तोंडावळा घेऊन आलेल्या एनजीओ, बदललेल्या आर्थिक, सामाजिक परिप्रेक्ष्यात जे राजकीय व्यासपीठ शोधत होत्या, ते व्यासपीठ म्हणजे आप! जागतिक पातळीवरील मीडियाचे सर्वंकष पाठबळ, भारतीय सरंजामी राजकीय मानसिकतेला कंटाळलेला व आर्थिक प्रगतीला खीळ बसलेला भांडवलदार वर्ग आपल्या थैल्या सुट्या करून आपच्या मागे उभा राहिलेला दिसतो, त्याची कारणे काँग्रेसप्रणीत सरकारने तपासण्याची गरज आहे. शहरी मध्यमवर्गाला भुलवणारे रूप ‘आप’ने पांघरल्याने मतदार म्हणून हाच वर्ग टार्गेट ठेवणारा प्रत्येक प्रादेशिक पक्ष आज आपचा धसका बाळगून आहे, महाराष्‍ट्राची माय होऊन, सत्तेची साय खायचे ख्वाब बघण्याच्या ऐवजी राज ठाकरे ‘आप सोडा, इथे आम्हीच बाप आहोत’, अशी वल्गना करताना दिसतात; त्यातून हा धसका इथेही घेतल्याचे स्पष्ट होते. म्हणून टोलच्या तापलेल्या तव्यावर सध्या ते भाकरी भाजून घेण्यात गुंग आहेत.

प्रा . सतीश वाघमारे .

दै . दिव्य मराठी . दि . २/२/२०१४

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

धन्यवाद अँडमीन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रणाम वाघमारे साहेब,

आपला लेख वाचला. पण आपण केजरीवाल यांच्यावर अ‍ॅड होमिनेम अ‍ॅटॅक करत आहात. ते ही ठीक आहे कारण केजरीवाल यांनी अनेक चुका केलेल्या आहेत. व Sometimes it is difficult to establish the connection between policy and accountability without ad hominem argument.

पण तुम्ही जो लेख लिहिलात त्यात केजरीवाल यांच्या धोरणांचा वस्तुनिष्ठ लेखाजोखा मांडला असतात तर लेख वाचनीय झाला असता. Instead What I get to read is a diatribe refurbished as analysis.

---

हे घडवलेले नेतृत्व, आता अप्रत्यक्ष संघप्रणीत भाजपची मदत करते आहे.

हे नेमके कसे होत आहे ते लिहिलेत तर आम्हासही समजेल. काँग्रेस ची थेट व उघड मदत घेऊन्/पाठिंबा घेऊन राज्य करणारे केजरीवालांचे सरकार अप्रत्यक्षपणे संघप्रणीत भाजपची मदत नेमके कसे करते आहे ?

---

संसदेला, घटनेला नाकारत वारंवार उपोषण, तमाशे व फिल्मी आंदोलनांनी थेट सरकारी यंत्रणेला वेठीस धरून ब्ल्याकमेल करत राहणे म्हणजे लोकशाहीप्रधान मुख्य मूलभूत अधिकारांची टवाळीच म्हणावी लागेल.

केजरीवालांनी घटने ला नाकारले ते नेमके केव्हा ? केजरीवालांनी/अण्णांनी संसदेला नाकारले ? केव्हा ?

व काँग्रेस ने ९०+ घटनादुरुस्त्या केल्या ते मात्र घटनेला नाकारणे नसून घटनेचा सन्मान करणारे आहे ????? खरंच ????

मूलभूत अधिकारांची टवाळी ???? कोणाच्या व नेमक्या कोणत्या मूलभूत अधिकाराची कोणती टवाळी केली, केजरीवालांनी ?

घटनेची ४४ वी दुरुस्ती ही १९७९ मधे करण्यात आली. त्यासारखी मोठी संविधानाची टवाळी दुसरी झाली नसेल. ज्यासाठी लोकशाही स्थापन केली जाते त्यावरच हल्ला ? पण तो मुद्दा इथे अवांतर होईल.

---

प्रसिद्धीला चटावलेल्या किसन हजारेंना मीडियाने देवाचा दूत भासवत, पब्लिकचा (मेणबत्तीवाले) तारणहार केवळ तोचि एक अण्णा! हे चित्र तयार केले. त्यावर ‘जाम’ आणि ‘आम’ दोन्ही प्रकारचे पब्लिक डोलू लागले. किसन हजारे फुगू लागले

माझ्या माहीतीत तरी अण्णांचा व्यक्तीगत कोणताही फायदा झालेला नाही.

प्रसिद्धी मिळाली हे मान्य. पण ती तर आंदोलन करणार्‍या सगळ्यांना मिळाली होती/आहे. आजतागायत असा कोणता नेता आहे ज्याने जनतेसाठी आंदोलन केले व त्यास प्रसिद्धी मिळाली नाही ? गांधी, लाजपत राय यांनी ही रस्त्यावर उतरून आंदोलन केले व त्यांना प्रसिद्धी मिळाली. व त्यातून त्यांचे नेतृत्व घडले. त्यावर टीका ही झाली. गांधींवर तर जहरी टीका झालेली आहे. (गांधी, लाला लाजपत रॉय ही केवळ उदाहरणे आहेत. तुलना नाही.) आणि प्रसिद्धी मिळाली तर त्यात गैर काय आहे ? देशासाठी लढणार्‍याने परफेक्टली सेल्फलेस असावे अशी अपेक्षा का ?

अण्णांनी कोणतेही घटनात्मक पद मागितलेले नाही. माझ्या माहीतीनुसार अण्णांना त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीची बेगमी करायची नाही. व ते सैनिक होते. He saw action in 1962.

भ्रष्टाचारास चर्चेच्या केंद्रस्थानी आणण्याचे काम अण्णांनी केले आहे व त्यात ते सफल झालेले आहेत. व तुम्ही मिडियाच्या ब्राह्मणीपणा कडे झुकण्याच्या वृत्तीवर टीका केलीय पण अण्णा व केजरीवाल हे दोघे ही ब्राह्मण नाहीत. किरण बेदी, सिसोदिया, संजय सिंग हे ही ब्राह्मण नाहीत. मग मिडिया त्यांच्याकडे का झुकतो ? (शांति भूषण, प्रशांत भूषण, चंद्र मोहन यांच्याबदल माहीती नाही. )

मीडिया ची नेमकी कोणती कृती ब्राह्मणीपणाकडे झुकणारी वाटते ?

आता तुम्ही म्हणाल की त्यांचे बोलविते धनी ब्राह्मण आहेत (उदा. रा.स्व. संघ) - पण आप ला समर्थन तर काँग्रेस चे आहे. व केजरीवालांनी मोदी व सोनिया दोघांनाही भ्रष्टाचारी घोषित केलेले आहे (ते खरे आहे की नाही हा पुढचा भाग झाला). म्हंजे केजरीवाल हे भाजपा/संघ धार्जिणे आहेत हे काही तितकेसे पटत नाही. मग समस्या काय आहे ????

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Instead What I get to read is a diatribe refurbished as analysis.

हीच तर खासियत आहे!!! असे केल्याशिवाय लोक वाचत नाहीत ना. वरणभाताऐवजी चिकन बिर्यानी लोकप्रिय का होते यातूनच कळून जावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

I deplore this highly condemn-able diatribe against "our" chicken biryani. वास्तविक एतद्देशीय डिशेश मधे चिकन बिर्याणी ही (परफेक्टली एतद्देशीय नसली$$ तरी) उच्च मानली गेली पायजेल. पण नैष्ठिक निग्रह नाहिये तुमच्याकडे. Smile

-----

$$ - Biryani literally means deep fried (in Iranian).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चिकन बिर्यानी माझीही परमप्रिय डिश आहे. अन वरणभातही तितकाच आवडतो. Smile तस्मात उच्चनीचतेचा बायस असा नाही. मसाला लावणे हा समान धागा ओवला इतकेच.

बाकी बिर्यानीचा अर्थ माहिती नव्हता, तो सांगितल्याबद्दल धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुमचे काही मागचे लेख थेट अनुबह्व मांडणारे होते, तेव्हा मी कैक मंडळींच्या विपरित भूमिका घेत जो व्यक्त होतोय, त्याला व्यक्त होउ द्यावं. लागलिच आदर्शवादी तत्वांची तर्कटं जिवंत व गुंतागुम्तीच्या प्रसंगांना लावू नयेत असं म्हटलं होतं. कारण ते थेट, स्पष्त होतं.
इथे मल जाणवलेली गडबड अशी की डायरेक अमुक अमुक माणूस करतोय म्हणून ते चूक आहे, असं दिसतय.
आणि १९९१ न्म्तर वगैरे प्रगती करुन घेतलेल्यांबद्दल इतका राग का असावा ? people who are left behind ह्यांच्याबद्दल कनव्/आस्था/आपुलकी असणं समजू शकतो, पण जे पुढे जात आहेत, त्यांनी मागे रहावं ही अपेक्षा चूक आहे. हां, पुढे गेलेल्यांनी मागच्यांना हात द्यावा, मदत्/उत्तेजन द्यावं हे मान्य आहे. आर्थिक धोरणात केंद्राच्या किम्चित डावीकडं झुकणं वेगळं; व कुनाचा द्वेश करणं वेगळं.
आणि हो, १९९१ नंतर अमुक उच्चवर्णीयांचा विकास/फायदा झाला हे पटत नाही.दलित चेम्बर ऑफ कॉमर्स आता किती मजबूत आहे, दलित उद्योगपती कशी स्वतःची स्थानं बनवतात, ही कौतुकास्पद गोश्त का नजरेआड होते आहे? त्यांनी इतकं करुन ते मागे राहिले असं म्हणणं म्हणजे त्यांच्या कामगिरीला कमी लेखण्यासारखं आहे.
.
असो.
मूळ मुद्द्याकडं येतो.

‘आप’चा उदय आणि वाटचाल ही किसन हजारे (राळेगणकर) यांच्या रामलीलावरील 2011च्या तमाशापासून सुरू झाली.
मागण्या करण्यात नेमकं काय चूक आहे ? हातात बंदूक घेउन नक्षलवादी स्टाइल आपलं म्हणणं मांडण्यापेक्षा आंदोलन चालवणं उचित नाही का ?
कोणता असा पक्ष आहे, ज्यानं कधीच कोणतच आंदोलन केलेलं नाही ?
१९९०च्या दशकत राम मंदिर ,त्यापूर्वी शाहबानो केसमध्ये समान नागरी कायद्याकडे झुकू पाहणार्या निर्णयास विरोध करायला रस्तयवर उतरणं, सलमान रश्दी, मकबूल फिदा हुसैन ह्यांच्या विरोधातली आंदोलने, वगैरे अस्मितेला हात घालायला निघणार्‍या आंदोलनापेक्षा भ्रश्टाचारवर आम्दोलन होत असेल तर चाम्गलच आहे की.
.
.
त्यांची एकूनात स्टाइल मलाही भंपक वातली; पण म्हणून "आम्दोलनच कशाला करता" असं म्हणणं चूक आहे.
( भारताची वाट फक्त शे-दोनशे लोकांमुळे लागली आहे; त्यांच्या काळ्या पैशाने लावली आहे वगैरे सरधोपट स्टाइल मांडनी भंपक व बिनडोक आहे. पण शेवटी पब्लिकला झेपेल इतपतच डोस द्यावा लागतो, ही सुद्धा मर्यादा आंदोलनाला असते.)
पब्लिकचा (मेणबत्तीवाले) तारणहार केवळ तोचि एक अण्णा
पुन्हा तेच. मेणबत्तीवाले म्हटल्यवर मलाही हसू येते. पण नेमके पब्लिकने काय केले पाहिजे ? हाती बंदूक घ्यावी का ? दगडफेक करावी का ?
.
.
मंडल आयोगाला विरोध करणारे केजरीवाल बाबूंचे नेतृत्व या गरजेतून किसन हजारेंच्या या वेळच्या तमाशाचा फायदा घेत पुढे आणले गेले
माझ्या माहितीतील कटर हिंदुत्ववादी , ज्याला ब्राम्हनवादी हे केजरीवालांना यत्र तत्र झोडपताना दिसतात. केजरीवाल हे काँग्रेस एजंट आहेत. ते मुस्लिम मुल्ला मौलवींचे लांगूलचालन करताना दिसतात असा आरोप थोतो. त्यांची वक्तव्ये व फोतो ह्या संदर्भात प्रसिद्ध होतात.
तर केजरीवाल काँग्रेस एजंट कसे ? हे विआचरल्यावर मिळालेले उत्तर :-
"काँग्रेस स्वतःची मते ह्यावेळी वाढवू शकत नाही. काँग्रेसविरोधी मते फुटून मात्र नक्की विजयी होउ शकते.(मनसे ने महाराश्ट्रात युतीची बेफाम मते खाल्ली, तशी देशपातळीवर अ‍ॅण्टीकाँग्रेस मते आप खाइल, आप नावाचा भागीदार त्या मतशिश्श्यांत तयार होइल. ) कॉंग्रेसने डोके लावून खेळी केली आहे."
.
.
.
मला स्वतःला ह्यातले काहीच खरे खोटे कळेनासे झाले आहे.
केजरीवाल ह्यांचा दिल्लीत फार्सिकल प्रयोग सुरु आहे, हे पटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

प्रकाटाआ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मला केजरीवालांची थेरं ही यडपट न वाटता पूर्णपणे प्रीप्लान्ड वाटतात. आत्ता सत्तेत आले आहेत, पुढच्या काही महिन्यात लोकसभेची निवडणुक लढवायची असेल तर शक्य तितका वेळ प्रसिद्धीच्या झोतात रहायला हवं. त्यांचा युएसपी काय, तर आंदोलनं करणं, धरणी धरणं, भ्रष्टाचाऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करायच्या... वगैरे. आता इतकं बहुमत मिळेल असं त्यांना स्वप्नातही आलं नसेल. त्यांना खरं तर दिल्लीत काही सिटा मिळून विरोधी पक्ष व्हायला आवडलं असतं. मग वारंवार सरकारला धारेवर धरून प्रसिद्धीत राहता आलं असतं. दुर्दैवाने हेच सत्तेत गेले. आता काय करणार? त्यातल्या त्यात बिचारे पॉप्युलर होण्याचा प्रयत्न करताहेत. करूद्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नवीन प्रयोगाचे मूल्यमापन करून इतक्या लगेच कनक्लूजन काढायची गरज नाही असे वाटते. काही काळ तरी जाऊ द्यावा.

सध्या ते जे काही करत आहेत ते "आपण कारभार चालवू शकत नाही" असे कळून चुकल्यामुळे शक्य तितक्या लवकर काँग्रेसने पाठिंबा काढून घ्यावा म्हणजे अ‍ॅग्रीव्हड पार्टी म्हणून लोकांपुढे जाता येईल असा एक अंदाज आहे. पण असे कळून चुकले असेल तर लोकांपुढे जाऊन काय मागणार? (आणि का मागायचं?) हा प्रश्नच आहे.

वाट पहायला हवी थोडा काळ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

त्यांना सरकार चालवता येत नाही याच्याशी असहमत!

त्यांना अनुभव नसल्याने चुकतमाकत ते सरकार चालवत आहेत!

या घडीला त्यातल्या त्यात बरा पर्याय आहे आप!

if i am to choose between duffer, bluffer and muffler, i chose muffler.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

काही काळ जाऊ द्यावा असे म्हणत होतो.. अगदी आता आता पर्यंत! पण विकांताला याच्याशी समांतर बरेच काही वाचले - दोन्ही बाजुंचे, त्यावरून वाघमारेंशी सहमत होण्यावाचुन हळुहळू पर्याय राहणार नाही हे जाणवु लागले आहे.

वानगीदाखल आजच्याच डीएनएमध्ये आआपच्या 'फाऊंडिंग मेंबर'चा हा लेख! जर अश्या व्यक्तीला आपले म्हणणे मांडूही दिले जात नसेल तर हा आआपचा खेळ म्हंणजे गंमतचे!

तरी इतक्यात थेट निश्कर्षावर येऊ इच्छित नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तरी इतक्यात थेट निश्कर्षावर येऊ इच्छित नाही

याबद्दल सहमत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||