Skip to main content

ऐसीअक्षरेमधील तांत्रिक व अन्य संभाव्य सुधारणा

सुधारणांचे स्वरुप काहीही असू शकते. सुधारणेची सूचना म्हणजे विद्यमान स्वरुपावरची टिका नव्हे. सुधारणेची सूचना म्हणजे पूर्ण करायलाच पाहिजे अशी अपेक्षा नव्हे. आणि अशा सूचना काही विशिष्ट लोकांनीच करायच्या/पार पाडायच्या गोष्टी नव्हेत. तांत्रिक सूचना म्हणजे घर बांधताना वा बांधल्यावर कुठे, काय, कसं, इ, इ. अन्य सूचना म्हणजे घरात काय व्हावं, काय नाही, कसं व्हावं, कोण यावं, कोण नाही, इ इ. संस्थळाचे व्यवस्थापन कोणत्या सुचना स्वीकार्य आहेत, कोणत्या राबवण्याच्या योग्यतेच्या आहेत, कोणत्यासाठी किती श्रम आणि द्रव्य लागेल हे ठरवेल. अर्थात या पानावर ते सगळं डोळ्यासमोर ठेऊन सूचना करायच्या नाहीत. सुचना, अपेक्षा, काय आवडले, काय असायला नाही पाहिजे, काय व्हायला पाहिजे होते, इतरत्र कुठे काय पाहि असते हे मोकळेपणाने सांगायचे आहे. सांगताना सांगणारा बुजला नाही पाहिजे. अर्थातच संस्थळाचे व्यवस्थापन ज्या गोष्टींना जबाबदार ठरवले जाऊ शकत नाही त्याचा इथे विचार करायचा नाही आहे. 'तुम्हाला' काय वाटते ते नोंदणे महत्त्वाचे, ते किती प्रत्यक्षात उतरेल हे नंतर पाहू या.
मी सुरुवात करतो.
१. अबाउट ऐसी - ऐसी अक्षरेबद्दल माहिती असे एक पान असावे. याचा सुर माहितीपर असावा, कायद्याच्या भाषेतला नसावा. स्थापना, व्यवस्थापन, उद्देश, इ इ त्यात यावेत.
२. सर्व लोक प्रतिसाद वाचत नाहीत. ( काही फक्त तेच वाचतात) तेव्हा संस्थळाबद्दलचे मार्गदर्शन मूळ लेखांत असावे.
३. ऐसीची काही विचारसरणी असेल, कोण्या तत्त्वज्ञानाला बांधिलकी असेल/नसेल तर तसे एक पान असावे.
४. सक्रीय सदस्य आणि त्यांचे जनरल आवडते विषय वा लेखनाचे प्रकार वा विचारसरणी यांची समरी एका पानावर असावी.
५. सदस्य बनताना चार महत्त्वाच्या गोष्टी ठळकपणे चारदा अ‍ॅग्री बटन क्लिक करून मान्य कराव्या लागाव्यात - जसे व्यक्तिगत आरोप वा चिखलफेक करणार नाही.
६. नवे लेखन करताना शीर्षकातील उकार एडिट मोड मधे दिसत नाही, तो textbox मोठा असावा.
७. वर जाण्याचा अ‍ॅरो/गोल स्क्रोल केल्याशिवाय प्रकट होत नाही. तो पहिलेपासूनच दिसत असावा.
८. असाच एक अ‍ॅरो थेट खाली येण्यासाठी पण असावा.
९. माझे खाते मधे माझे लेखन पहिल्यापासून असते, ते वेगळे लिहिण्याची गरज नसावी.
१०. प्रतिसाद १, २.१.१, २.१.२, ३.१, ३.२, ३.३ असे नंबर दिलेले असावेत
११. प्रतिसाद जसजसा उजवीकडे सरकेल, तसतसे त्याचे हेडिंगकलर बदलावा. पहिली लेवल लाल, दुसरी हिरवी, पांढरी, काळी, इ इ . त्याच्यामुळे नक्की कोणता उपप्रतिसाद कोणत्या प्रतिसादाला आहे हे कळेल.
१२. सर्च इंजिनने शब्द सर्च केला पाहिजे.
१३. सर्च मधे सर्च इन प्रकार, इन शीर्षक, जेथे लेखक क्षक्षक्ष आहे, इन कंटेंट हे सगळे असले पाहिजे.
१४. लेखन सॉर्ट केल्यावर (समजा लेखकाच्या नावाने) तर प्रत्येक पान नंबराखाली त ते प अशी अनुक्रमणिका दिसली पाहिजे.
१५. नविन लेखन सॉर्ट बाय नंबर ऑफ रेटिंग्ज आणि प्रत्यक्ष रेटींग असेही असले पाहिजे. त्यासाठी दोन कॉलम जास्त लागतील.
१६. sort by number of responses हे ही हवे.
१७. sort by date of creation हे ही हवे. आता जे जास्तीचे कॉलम आहेत ते लपवता देखिल यावेत.
१८. तारांकित मधे केवळ काही पंचतारांकित लेख दिसतात. सर्वच तारे (उदा. तीन ते चार) आणि बिनतारे लेखन शोधता यायला हवे.
१९. लेखन अप्रकाशित करून साठवता येत नाही. लिहायला फार स्टॅमिना लागतो. त्यामुळे शुद्धलेखन वैगेरे दुरुस्त करण्याची गोष्ट लांबते. लोक वाचत असतात आणि लेखक संपादन करून अद्ययावत कर्त असतो.
२०. ऐसी अमेरिकन आहे कि भारतीय आणि व्यवस्थापनाच्या निष्ठा, प्रेम, कायदेशीर बांधिलकी हे स्पष्ट व्हावं.
२१. वाचक, लेखक, प्रतिसादक कोणत्या कायद्याच्या कक्षेत येतात हे स्पष्ट व्हावं.
२२. नविन लेखन, कविता, कौल, चर्चा, इ इ या क्रमात एक लॉजिक असलं पाहिजे.
२३. ट्रॅकर मधील मुख्यपानाची छोटी फाँटमधली लिंक हटवावी. ती ज्यादा आहे, कुरुपही आहे.
२४. लेखन नंबर ऑफ रिडिंग्जने पण सॉर्ट करता यावे.
२५. एका विशिष्ट तारखेपूर्वीचे लेखन वा सलग १-२ महिने इनॅक्टीव राहीलेला धागा अर्काइव मधे जावा.
२६. सदस्याच्या लेखनाची वा प्रतिसादांची क्वालिटी यावर एक पान हवे.
२७. नविन लेखन पानावर पार्श्वभूमी हिरवी आणि फाँट निलसर हिरवा हा कॉम्बो डोळ्यास इतका चांगला नसावा. Contrast वाढवावा.
२८. नविन लेखन मधे धाग्यांना अनुक्रमांक देण्यात यावा.
२९. आजची activity पाहता यावे - नवे धागे आणि जुन्या कोणत्या धाग्यावर किती प्रतिसाद. आठवडा, महिना आणि वर्ष बद्दलही असे करता येईल.
३०. आयडींची activity पाहता यावी- एकूण किती आहेत, किती तास लॉग ऑन असतात, किती लेखन केले, किती प्रतिसाद दिले, इ इ. असले स्टेट असले कि जरा मजा येते.
३१. रँक पोलचे लोजिक सुधारून लिहावे. तो क्रम लावण्याचा प्रकार सुलभ असावा.
३२. ऐसीवर फाईल लोड करता यावी.
३३. एडीटर मधे डायरेक्ट चित्र पेस्ट करता यावे.
३४. इमेज कुठे आणि text कुठे त्याचे लॉजिक सोपे असावे. L img a picture of sunset R img हे शवटी असावे.
३५. कोणत्याही icon खाली हॉवर केल्यावर text येत नाही. ते आले तर क्लिक केल्यावर काय होईल ते कळेल. ऐसीवरच्या सहा सिरियला (काय पाहिले, इ) चे जे आय्कॉन आहेत ते देखिल असेच आहेत.
३६. भाषा मधे language neutral म्हणजे काय?
३७. इतर भाषांचा (संस्थळाला भाषिक अस्मिता आहे कि वैषयिक आहे)उपयोग किती बरा किती वाईट?
३८. लिपी चे option पानाबरोबर सरकू नये. ते सतत दिसावे.
३९. 'नमस्कार अरुणजोशी' म्हणणार्‍याच्या खाली 'माझे खाते, माझे हे, ते' वाचणे चूक वाटते. नमस्कार तिथे नसावा.
४०. माझे खाते, लिपी, उपस्थित सदस्य च्या खाली इतर माहित असावी.
४१. चार पाच गोष्टी कॉपी करून ठेवणारा क्लिप्बोर्ड असावा.
४२. स्पिट समरी अ‍ॅट कर्सर म्हणजे काय?
४३. स्मायलीज फार कमी आहेत.
४४. इनपुट फॉर्म्याट म्हणजे नक्की काय ते मराठीत्ही लिहावे. बरेच लोक आय टी अज्ञ असतात.
४५. दिनविशेष पहिल्या पानावर/ वेगळ्या पानावर जास्त चांगल्यापैकी दिसेल असे पण असावे.
४६. लॉग न करता , इ-मेल देऊन प्रतिसाद देता यावा.
४७. उपप्रतिसाद देताना बाकी लेख, बाकी सगळे प्रतिसाद गायब होऊन नवीन जागी प्रतिसाद टायपाची गरज नसावी. श्रेणी दिली तसाच प्रतिसाद देऊन पुढे जाता यावे.
४८. नविन हे लाल अक्षरात नव्या प्रतिसादासाठी लिहिलेले असते ते मोठ्या अक्षरात असावे.
४९. समजा माझ्याकडे ५० प्रतिसाद एक पानावर अषी सेटींग आहे. दोन नवे प्रतिसाद आले. एक पहिल्या पानावरचा एक दुसर्‍या. पहिला वाचून दुसर्‍या पानावर जाताना तो लाल नविन तिथे नसतो. तो असावा.
५०. लाल नविन पुढे सगळीकडे 'पुढचा नविन' ही लिंक असावी.
५१. वाटचाल मधे धाग्याची लिंक न देता प्रत्येक प्रतिसादाची लिंक द्यावी. माणोस ओळखायला सोपे पडेल.
५२. नव्या आयडींना घाबरून सोडू नये. ते सभ्य असतील तर रुळेपर्यंत सांभाळून घ्यावे.
५३. अचानक कोणी नियम बनवला आहे असे वाटू नये. जुन्या आयडींना कोणाला काय आवडत नाही याची कल्पना असते. नवे आयडी निष्कारण एक समीकरण बनवून बसतात जे नंतर सुधारता सुधरत नाही. त्याकरीता आयडींना आपल्या नियमांची सवती प्रोफाई बनवावी.

आता तुमची बारी.

ऋषिकेश Thu, 19/12/2013 - 17:35

१. अबाउट ऐसी - ऐसी अक्षरेबद्दल माहिती असे एक पान असावे. याचा सुर माहितीपर असावा, कायद्याच्या भाषेतला नसावा. स्थापना, व्यवस्थापन, उद्देश, इ इ त्यात यावेत.
३. ऐसीची काही विचारसरणी असेल, कोण्या तत्त्वज्ञानाला बांधिलकी असेल/नसेल तर तसे एक पान असावे.

हे आहे व प्रत्येक पानाच्या शेवटी खाली हा दुवा मिळेल

२. सर्व लोक प्रतिसाद वाचत नाहीत. ( काही फक्त तेच वाचतात) तेव्हा संस्थळाबद्दलचे मार्गदर्शन मूळ लेखांत असावे.
४. सक्रीय सदस्य आणि त्यांचे जनरल आवडते विषय वा लेखनाचे प्रकार वा विचारसरणी यांची समरी एका पानावर असावी.

म्हणजे नै कळ्ळे

५. सदस्य बनताना चार महत्त्वाच्या गोष्टी ठळकपणे चारदा अ‍ॅग्री बटन क्लिक करून मान्य कराव्या लागाव्यात - जसे व्यक्तिगत आरोप वा चिखलफेक करणार नाही.

हे योग्य का नाही? हे जाणीवपूर्वक आहे.

१९. लेखन अप्रकाशित करून साठवता येत नाही. लिहायला फार स्टॅमिना लागतो. त्यामुळे शुद्धलेखन वैगेरे दुरुस्त करण्याची गोष्ट लांबते. लोक वाचत असतात आणि लेखक संपादन करून अद्ययावत कर्त असतो.

यावर तात्पुरता व सोपा उपाय म्हणून झालेले लेखन स्वतःसच व्यनी करून ठेवा.

२०. ऐसी अमेरिकन आहे कि भारतीय आणि व्यवस्थापनाच्या निष्ठा, प्रेम, कायदेशीर बांधिलकी हे स्पष्ट व्हावं.

ऐसी ऐसी आहे, अमेरिकन/भारतीय का असावं? किंबहुना कोणत्याही बाबतीत संस्थळाच्या अशा निष्ठा, प्रेम म्हणजे काय?

२१. वाचक, लेखक, प्रतिसादक कोणत्या कायद्याच्या कक्षेत येतात हे स्पष्ट व्हावं.

सदर संस्थळ अमेरिकन सर्वरवर असल्याने तेथील कायदे लागु होत असावेत. कॉलिंग अदिती/चिंज!

२२. नविन लेखन, कविता, कौल, चर्चा, इ इ या क्रमात एक लॉजिक असलं पाहिजे.
२६. सदस्याच्या लेखनाची वा प्रतिसादांची क्वालिटी यावर एक पान हवे.

नै कळ्ळे?

३७. इतर भाषांचा (संस्थळाला भाषिक अस्मिता आहे कि वैषयिक आहे)उपयोग किती बरा किती वाईट?

हे उद्देश धेय्य धोरणात पुरेसे स्पष्ट आहे.

इतर बरेच कॉस्मेटिक/तांत्रिक चेंजेस आहेत. त्यावर लिहायला असमर्थ
बाकीच्यावर वेळ मिळाले की भर टाकेनच

अजो१२३ Fri, 20/12/2013 - 11:24

In reply to by ऋषिकेश

२२. नविन लेखन, कविता, कौल, चर्चा, इ इ या क्रमात एक लॉजिक असलं पाहिजे

नवीन लेखन
ललित
कलादालन
समीक्षा
कौल
माहिती
बातम्या
चर्चा
मौजमजा
छोट्यांसाठी
कविता
पाककृती
संस्थळाची माहिती + faq हे एकच असावे
दिवाळी अंक २०१३
हा क्रम मला जास्त सयुक्तिक वाटतो.

चिंतातुर जंतू Thu, 19/12/2013 - 17:46

>> ४. सक्रीय सदस्य आणि त्यांचे जनरल आवडते विषय वा लेखनाचे प्रकार वा विचारसरणी यांची समरी एका पानावर असावी.

>> २०. ऐसी अमेरिकन आहे कि भारतीय आणि व्यवस्थापनाच्या निष्ठा, प्रेम, कायदेशीर बांधिलकी हे स्पष्ट व्हावं.

आस्थाविषय, निष्ठा, प्रेम, बांधीलकी वगैरे गोष्टी माझ्या मते - लैंगिकतेप्रमाणे ;-) - प्रवाही असतात. ज्यांना ह्याची आवश्यकता भासेल त्यांनी खुशाल एखाद्याच्या निष्ठा, प्रेमं, बांधीलक्या आणि आस्थाविषयांविषयी अंदाज बांधावेत किंवा खात्री बाळगावी. शिवाय, 'माझे खाते' अंतर्गत प्रत्येक सदस्याला हवी ती माहिती देण्याची मुभा आहे. तिचा वापर करावा.
(कायद्याचा प्रश्न असला, तर अमेरिकेत रजिस्टर झालेल्या संकेतस्थळाला अमेरिकन कायदा लागू असावा हा माझा अंदाज; खात्रीशीर माहिती नाही.)

अजो१२३ Thu, 19/12/2013 - 18:18

In reply to by चिंतातुर जंतू

हामी त्या धाग्यावर नुस्ती शंका काढेस्तोर तुमी हिकडं समद्या भाव्ना गुंडाळल्या बी!!! लै वंगाळ तुमी!!!!

............सा… Thu, 19/12/2013 - 18:01

Arun Joshi, your intention is noble & I really appreciate the spectrum of your thinking & good will.

I find few points are increasing complexity unnecessarily & if anybody executes a short effort-benefit analysis would find the effort being too much & benefits negligible -

e.g.- 41 (चार पाच गोष्टी कॉपी करून ठेवणारा क्लिप्बोर्ड असावा.),32 (ऐसीवर फाईल लोड करता यावी.),10(प्रतिसाद १, २.१.१, २.१.२, ३.१, ३.२, ३.३ असे नंबर दिलेले असावेत).

32 - I have objection. Trolls may misuse this facility & secondly we come to AISI to write/share & not just upload a big file & expect responses.

10 - This will make the reading cumbersome. Very cumbersome rather than efficient.

But I do find many suggestions great -
11(प्रतिसाद जसजसा उजवीकडे सरकेल, तसतसे त्याचे हेडिंगकलर बदलावा. पहिली लेवल लाल, दुसरी हिरवी, पांढरी, काळी, इ इ . त्याच्यामुळे नक्की कोणता उपप्रतिसाद कोणत्या प्रतिसादाला आहे हे कळेल.),

the archive one, (एका विशिष्ट तारखेपूर्वीचे लेखन वा सलग १-२ महिने इनॅक्टीव राहीलेला धागा अर्काइव मधे जावा.)

अजो१२३ Thu, 19/12/2013 - 18:33

In reply to by ............सा…

ऐसी कमित कमी (वा फक्त) एक्सेल लोड करता यावी. चार्ट बनवा, त्याला पिक्चर म्हणून सेव करा, मग त्याला नेटवर ठेवा (तिथून ते उघ्डतच नै), इथे लिंक बनवा हा द्राविडी प्राणायम आहे.

तसेच चित्रांचे पण असावे.

बाकी काही नसले तर चालेल.

बाकी धन्स.

नितिन थत्ते Thu, 19/12/2013 - 18:12

आपण एखाद्या शब्दापाठी दुवा (हायपरलिंक) देतो तेव्हा त्या शब्दाचा रंग बदलतो. त्या बदललेल्या रंगाचा कॉण्ट्रास्ट वाढवायला हवा असं वाटतं.

एखादा धागा अद्ययावत झाला असेल तर काय अद्ययावत झाले हे कळून येण्याची काही सोय व्हावी.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 19/12/2013 - 18:48

In reply to by नितिन थत्ते

त्या बदललेल्या रंगाचा कॉण्ट्रास्ट वाढवायला हवा असं वाटतं.

आत्ताच्या रंगाची शेड बदलता येईल. फार जास्त रंग नको वाटतात. माझ्या निरीक्षणानुसार लिनक्समधे दुव्यांचे रंग व्यवस्थित वेगळे दिसतात. त्याच संगणक-मॉनिटरवर विण्डोजमधे अडचण आहे. आणि मी लिनक्स वापरते म्हणून हे नजरेआड झालेलं असणार. हा बदल करण्याचा प्रयत्न करते.

दुसरं, ब्लॉककोटमधलं लेखन तिरप्या टंकाचं आपोआप होईल का, किंवा वेगळं दिसेल का याचीही तपासणी करायला हवी.
(हे व्हायला कदाचित पुढचं वर्ष उजाडेल. पण प्रवासातून आल्यावर लगेच करता येईल.)

एखादा धागा अद्ययावत झाला असेल तर काय अद्ययावत झाले हे कळून येण्याची काही सोय व्हावी.

तांत्रिकदृष्ट्या काय शक्य आहे हे शोधायचा प्रयत्न करते. ते जमेस्तोवर, धागा अद्ययावत करताना लेखकांनी हातानेच हे लिहीलं तर सध्यापुरता प्रश्न मिटेल.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 20/12/2013 - 02:35

In reply to by नितिन थत्ते

या पानावर सध्याचा रंग सगळ्यात वर आणि त्यापेक्षा गदद आणि फिकट शेड्स आहेत. त्यातला कोणता अधिक उपयुक्त वाटेल? इतर रंगांपैकी, वर जे हिरवे रंग आहेत त्यांपैकी एखादा चालेल का किंवा कसे? इतर काही पर्याय:

कडेच्या पट्ट्यांच्या रंगावरून हे रंग दुवा
वरच्या हिरव्या पट्ट्यांमधून हे रंग दुवा

लाल रंग निश्चितच उठून दिसेल, पण बाकीच्या रंगांमधे ते फार भडक दिसेल म्हणून असं काही सुचवत नाहीये.

Nile Fri, 20/12/2013 - 03:02

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बहुतेक करून इंटरनेटवर मजकूरातील लिंका 'निळ्या' असतात. 'निळ्या' रंगाचा उठूनही दिसेल मजकूर, पांढर्‍यावर. ऐसीवर 'निळ्याच्या' विशेष छटाही नाहीत, म्हणजे काँट्रास्टही असेल. तोच द्यावा.

ह्या सुचवणीचा आणि माझ्या नावाचा काही संबंध नाही.

नितिन थत्ते Fri, 20/12/2013 - 09:28

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हे रंग टाकून पाहिले. विशेष फरक जाणवत नाही. जर एक-दोन अक्षरांचा शब्द असेल तर काहीच कळत नाही. त्याऐवजी निळोबांचा निळा रंगच बरा वाटतो.

हे पहा कसे दिसते?

Nile Thu, 19/12/2013 - 20:16

In reply to by अजो१२३

उपस्थित सदस्य हे 'लास्ट अ‍ॅक्टिव्ह' क्रमानुसार असतात. म्हणजे मी ऐसी अक्षरे उघडलंय आणि एखाद्या पानावर रेंगाळलो तर मी यादीत खाली जातो.

आणि माझ्यासारख्याला अल्फाबेटात कुठे टाकणार?

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 19/12/2013 - 19:12

काही प्रश्नांची उत्तरं मी संगणकातल्या आणि/किंवा ब्राऊजरमधल्या बिल्ट-इन सोयी वापरून करते. ती ही इथे दिलेली आहेत.

६. नवे लेखन करताना शीर्षकातील उकार एडिट मोड मधे दिसत नाही, तो textbox मोठा असावा.

कंट्रोल+= हे बटण दाबल्यावर सगळी अक्षरं मोठी होतात, त्यात हा खोकाही मोठा होईल.

७. वर जाण्याचा अ‍ॅरो/गोल स्क्रोल केल्याशिवाय प्रकट होत नाही. तो पहिलेपासूनच दिसत असावा.
८. असाच एक अ‍ॅरो थेट खाली येण्यासाठी पण असावा.

संगणकावरून ऐसी वापरणारे, होम आणि एंड, ही बटणं दाबून हे करू शकतात. मोबाईलवर करणं तापदायक आहे, हे मान्य आहे.

१०-१८, २४, ४७-४८ आणि अधल्यामधल्या पैकी बऱ्याच गोष्टी सहज करता येण्यासारख्या आहेत. (येत्या वर्षात हे करते.)

२२. नविन लेखन, कविता, कौल, चर्चा, इ इ या क्रमात एक लॉजिक असलं पाहिजे.

काय, ते सांगितलं तर बदल करायला फार वेळ लागणार नाही.

२५. एका विशिष्ट तारखेपूर्वीचे लेखन वा सलग १-२ महिने इनॅक्टीव राहीलेला धागा अर्काइव मधे जावा.

आर्काईव्हमधे श्रेणीदात्यांना आवडलेलं लेखनच आहे. यापेक्षा वेगळं सॉर्टींग करून फायदा काय हे समजलेलं नाही.

२९. आजची activity पाहता यावे - नवे धागे आणि जुन्या कोणत्या धाग्यावर किती प्रतिसाद. आठवडा, महिना आणि वर्ष बद्दलही असे करता येईल.

धागा आल्याच्या क्रमानुसार ताजे पाच धागे मुखपृष्ठावर असतात. त्यापुढचे धागे तिथेच खाली पहाता येतील.

३०. आयडींची activity पाहता यावी- एकूण किती आहेत, किती तास लॉग ऑन असतात, किती लेखन केले, किती प्रतिसाद दिले, इ इ. असले स्टेट असले कि जरा मजा येते.

एक आयडी किती तास लॉग्ड अॉन असतो हे पहाणं मला stalking किंवा पाठलाग करण्याच्या प्रकारातलं वाटतं. प्रत्यक्ष आयुष्यात लोक याबद्दल संवेदनशील असू शकतात आणि असं कोणी करत असेल तर त्यावर कारवाई करण्याची सोय असते. पण कोणी किती लेखन केलं, किती प्रतिसाद दिले हे सदस्य खात्यामधून शोधता येतं. खात्यामधे "वाटचाल" यातून प्रतिसाद आणि "सदस्याचे लेखन" पहाता येतं.

३२. ऐसीवर फाईल लोड करता यावी.
३३. एडीटर मधे डायरेक्ट चित्र पेस्ट करता यावे.

ऐसीची तांत्रिक जबाबदारी पहाणाऱ्या बाईचं ट्रेनिंग, हुशारी इ कमी आहेत, त्यामुळे यात आणि/किंवा यातून तांत्रिक अडचणी येण्याची भीती वाटते. म्हणून हे केलेलं नाही. शिवाय 'फुकट ते पौष्टिक' वगैरे जोक्स या बाईला आवडतात.

४२. स्पिट समरी अ‍ॅट कर्सर म्हणजे काय?

ते split आहे, spit नाही. पण काही अनावश्यक पर्याय दिसत आहेत, ते काढता येतील का हे पहाते.

४३. स्मायलीज फार कमी आहेत.

आहेत चिकार. अजून कोणते हवेत? पण प्लीज प्लीज प्लीज, लिखाण पिवळं करू नका. वाचताना त्रास होतो.

४६. लॉग न करता , इ-मेल देऊन प्रतिसाद देता यावा.

ही सोय चालली तर फार आनंद झाला असता, पण ...

४९. समजा माझ्याकडे ५० प्रतिसाद एक पानावर अषी सेटींग आहे. दोन नवे प्रतिसाद आले. एक पहिल्या पानावरचा एक दुसर्‍या. पहिला वाचून दुसर्‍या पानावर जाताना तो लाल नविन तिथे नसतो. तो असावा.
५०. लाल नविन पुढे सगळीकडे 'पुढचा नविन' ही लिंक असावी.

हा प्रश्न अनेकांना पडत असावा. यावर तांत्रिक उपाय आहे का, हे माहित नाही. कदाचित नसेलही. किंवा असेल तर फारच किचकट असेल. त्यापेक्षा शतकी, आणि मोठे धागे वाचण्यासाठी मी शॉर्टकट वापरते:

दुसऱ्या छोट्या धाग्यावर जाऊन हे सेटिंग बदलायचं, ५० किंवा ९० च्या जागी २०० किंवा १००० प्रतिक्रिया लोड होतील असं सेटिंग करायचं. भरपूर प्रतिसादांचा धागा वाचायचा आणि पुन्हा सेटिंग ९० प्रतिसादांचं करायचं. प्रतिसाद वाचताना ब्राऊजरमधे 'नवीन' असा स्ट्रिंगसर्च करायचा. यामुळे पानावर जिथे कुठे 'नवीन' असा शब्द असेल तिथला भाग स्क्रीनवर समोर येतो.

............सा… Thu, 19/12/2013 - 20:52

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

३०. आयडींची activity पाहता यावी- एकूण किती आहेत, किती तास लॉग ऑन असतात, किती लेखन केले, किती प्रतिसाद दिले, इ इ. असले स्टेट असले कि जरा मजा येते.

अ‍ॅब्सोल्युट नो!!!!! कै च्या कै!!!!

राजेश घासकडवी Thu, 19/12/2013 - 22:24

-ऐसीविषयीची माहिती : 'उद्दिष्टे, मार्गदर्शक तत्त्वे, धोरणे' या पानावर सर्वसाधारणपणे ऐसीच्या माध्यमातून काय व्हावं, आणि ते कशा पद्धतीने व्हावं याचा आढावा आहे. ऐसीतर्फे कुठली मूल्यं जपण्याचा प्रयत्न होईल, सदस्यांची वागणुक कशी असावी याची पुरेशा व्यापक शब्दांत मांडणी आहे. थोडक्यात ती ऐसीची घटना आहे. पीनल कोड तयार करण्याची गरज वाटत नाही. याशिवाय अजून कुठची माहिती आवश्यक आहे? तुम्ही दोन परिच्छेद लिहू शकाल का?

- प्रतिसाद : नवीन प्रतिसाद शोधणं, कुठचा प्रतिसाद कोणाला आहे हे शोधणं वगैरे गोष्टी १०० पेक्षा अधिक प्रतिसाद झाले की कठीण होतात खरं. गेल्या दोनेक महिन्यातच सेंच्युऱ्या (डब्बल आणि ट्रिपलसुद्धा) झाल्यामुळे हा मुद्दा पुढे आलेला आहे. तरीही अजूनपर्यंत ९९% लेखनाला १०० च्या खालीच प्रतिसाद आहेत. अदितीने केलेली सूचना - एका पानावर हवे तितके प्रतिसाद पाहण्याची व्यवस्था करणे - हा पर्याय आहे. यापेक्षा रंग, आकडे वगैरे करण्यासाठी जे कष्ट आहेत आणि त्यातून निर्माण होणारी गिचमिड (क्लटर) त्यामानाने फायदे किती आहेत याबद्दल साशंक आहे. लाल नविन पुढे सगळीकडे 'पुढचा नविन' ही लिंक असावी. ही सूचना छान आहे. पण ड्रुपलमध्ये असं करता येतं की नाही कल्पना नाही.

- सर्च : शोध घेतल्यावर आपोआपच तीन टॅब्ज मिळतात. म्हणजे सर्चचे पॅरामीटर नंतर फाइन ट्यून करता येतात.

- सॉर्ट : लेखक, प्रतिसादसंख्या, शेवटच्या प्रतिसादाचा कालावधी याप्रमाणे सॉर्ट करता येतं.

- लेखकांची माहिती : कोण ऐसीवर कसा वावरतो ही माहिती देता आली तरी देऊ नये असं वाटतं. प्रायव्हसी जपण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे. स्वतःविषयीची माहिती प्रत्येकाने/प्रत्येकीने जेवढी द्यायला हवी तितकी द्यावी अशी अपेक्षा आणि सुविधा आहे.

- स्पिट समरी अ‍ॅट कर्सर म्हणजे काय? : ट्रॅकरवर लेखाचं नावच नव्हे तर सुरूवातीच्या काही ओळी समरी म्हणून दिसण्याची सोय करता येते. प्रकाशित करताना कर्सरच्यावरचा भाग स्प्लिट करून तो 'समरी'मध्ये ठेवता येतो. ते आपल्याकडे लागू होत नाही, कारण लेखाचं फक्त नावच दिसावं अशी सोय सुटसुटीतपणासाठी केलेली आहे.

- नव्या आयडींना घाबरून सोडू नये. ते सभ्य असतील तर रुळेपर्यंत सांभाळून घ्यावे. : हे कळलं नाही. आत्तापर्यंत सभ्य आयडींना घाबरून सोडून दिल्याचं माझ्या माहितीत नाही.

इनपुट फॉर्मॅट डिफॉल्ट फुल एचटीएमेल करता येईल का हे संस्थळाचं तांत्रिक काम बघणाऱ्या बाईंना विचारून पाहतो.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 20/12/2013 - 05:57

In reply to by राजेश घासकडवी

इनपुट फॉर्मॅट डिफॉल्ट फुल एचटीएमेल करता येईल का हे संस्थळाचं तांत्रिक काम बघणाऱ्या बाईंना विचारून पाहतो.

Filtered HTML याचीच रचना बदलली आहे. त्याने बहुदा प्रश्न सुटावा. पण सगळ्या प्रकारचं HTML testing करून पाहिलेलं नाही.

निखिल देशपांडे Fri, 20/12/2013 - 10:43

७. वर जाण्याचा अ‍ॅरो/गोल स्क्रोल केल्याशिवाय प्रकट होत नाही. तो पहिलेपासूनच दिसत असावा

गो टु टॉप बटन पानाच्या टॉपला असताना कशासाठी अ‍ॅक्टिव्हेटेड असावे. जसे तुम्ही स्क्रॉल करायला सुरवात करता तसे ते बटन प्रकट होते. त्या बटणाची वागणुन नियम बरहुकुम आहे. मला तर तेच योग्य वाटते.

३८. लिपी चे option पानाबरोबर सरकू नये. ते सतत दिसावे.

जर तुम्ही फायर्फॉक्स वापरत असाल तर हे दिसण्या न दिसण्याने काही फरक पडत नाही. लिपीबदलासाठी Ctrl+\ वापरा.

अजो१२३ Fri, 20/12/2013 - 10:53

In reply to by ऋषिकेश

केवळ लिपिबदलच नव्हे तर अख्खी लिपीच कधी कधी कोणताकोणता ब्राऊजर सपोर्ट करत नाही. मी काही दिवस फक्त इंग्रजीत लिहिल्याचे आठवते का?

अजो१२३ Tue, 31/12/2013 - 15:32

नविन प्रतिसाद आणि अपडेटेड प्रतिसाद यांत फरक आहे. सर्वात नविन 'मुख्य प्रतिसाद' एखाद्या धाग्यावर असला तर तो सर्वात शेवटी असायला हवा. पण नविन मुख्य प्रतिसाद वर पाहिला कि विचित्र वाटते.

उपप्रतिसाद उपडेटावला तर इतके काही वाटत पण तेही नसावेच.

मन Mon, 06/01/2014 - 09:39

In reply to by बॅटमॅन

पण ... पण...
प्रतिसाद करता येत नाहितच अजूनही.
काही अ जोशी लोकांचे प्रतिसाद डिलिट करता आले तर बरे होइल ;)
.
.
एक संभाव्य तांत्रिक सुधारणा :-
अ जोशी नावाचे नवीन आयडी काही दिवस स्थगित करावेत काय?
आहे त्यांनाच आधी पचविणे अवघड आहे . ;)

शरद वागळे Mon, 20/01/2014 - 10:20

मी २ दिवसापूर्वी सभासद झालो. पण मला बर्‍याच अडचणी आल्या त्या अशा:

१. सदस्य म्हणून माहिती भरताना परवलीचा शब्द विचारला जात नाही. तो इ-पत्राद्वारे पाठवली जाईल हे तिथे सांगणे जरुरीचे आहे.
२. संकेतस्थळावर गेल्यावर येण्याची व जाण्याची नोंद कुठे करायची हे फार शोधावे लागते.
३. परवलीचा शब्द कसा बदलायचा तेही मी अजून शोधत आहे.

माझी खात्री आहे की इतरांनाही अशा अडचणी आल्या असतील. तरी त्यानुसार बदल केल्यास बरे होईल.

ऋषिकेश Mon, 20/01/2014 - 10:49

In reply to by शरद वागळे

सर्वप्रथम ऐसी अक्षरेवर स्वागत
सुचनेबद्दल आभार. इतर संस्थळांची सवय असल्याने पहिल्या दोन अडचणी मलाही जाणवल्या नव्हत्या.
बाकी पासवर्ड बदलण्यासाठी:
माझे खाते मध्ये जावे --> तेथे संपादन हा टॅब उघडावा --> त्यात हवा असलेला नवा परवलीचा शब्द टाकावा --> प्रकाशित करा या बटणावर क्लीकवावे.

अजो१२३ Fri, 07/03/2014 - 11:06

ऐसीवरचे दिनवैशिष्ट्य भारतीय प्रमाणवेळेनुसार बदलत नाही. आता ७ तारखेचे सकाळचे ११ वाजलेत. तरीही ६ तारखेचे दिनवैशिष्ट्य दिसतेय.

मन Fri, 07/03/2014 - 11:19

In reply to by अजो१२३

मी काही चांगली दिनवैशिष्ट्य लक्षात आणून दिली तर त्यातली एखाद वगळता इतरांची दखलही घेतली गेली नाही.
म्हणून मी चिडून इथल्या व्यवस्थापनात वगैरे जे जे लोक आहेत्; त्या सगळ्यांच्या धाग्यांना १ तारका देणार होतो;
पण त्याचा घंटा उपयोग नाही. कारण ती एक तारका मीच दिली आहे हे ह्या प्राण्यांना समजणारही नाही.
कुणी किती तारका दिल्यात हे कळले तर फार बरे होइल. निदान निषेध नोंदवणे सोपे होइल बुवा.
आणि फक्त ह्याच केसमध्ये नव्हे तर इतरत्रही त्या तारका कुणी दिल्यात हे दिसलं तर फार बरं होइल.
जेव्हा मी एखाद्या लेखाला १ तारका देतो किंवा ५ तारका देतो; तेव्हा मी लेखाबद्दल प्रत्यक्षात एक विधान करीत असतो.
मग विधानाची जिम्मेदारी घेतली जायला नको का ?
काळ्या पडद्याआदून कशाला करायचं विधान ?

मिहिर Fri, 07/03/2014 - 12:14

In reply to by मन

मी काही चांगली दिनवैशिष्ट्य लक्षात आणून दिली तर त्यातली एखाद वगळता इतरांची दखलही घेतली गेली नाही.
म्हणून मी चिडून इथल्या व्यवस्थापनात वगैरे जे जे लोक आहेत्; त्या सगळ्यांच्या धाग्यांना १ तारका देणार होतो;

आँ! उगाच? दोन्ही गोष्टींचा काय संबंध? आणि ती गोष्ट न पटल्याबद्दल निषेध तुम्ही तिथे प्रतिसादात नोंदवला आहेच बहुतेक. त्याव्यतिरिक्त तारका कुठून आल्या?

आणि फक्त ह्याच केसमध्ये नव्हे तर इतरत्रही त्या तारका कुणी दिल्यात हे दिसलं तर फार बरं होइल.

हे देखील फारसे पटले नाही. तारका एकुण वाचकांना लेख कशा दर्जाचा आहे (सरासरी) ह्याचा अंदाज यावा यासाठी आहेत. ज्यांना काही विशेष विधान करायचे असते, ते करतातच की आपल्या आयडीद्वारे.

मेघना भुस्कुटे Fri, 07/03/2014 - 12:34

In reply to by मिहिर

सहमत. तारका कोण देतंय हे कळत नाही ही एक मस्त सोय आहे. स्वतंत्रपणे काही म्हणून त्याची जबाबदारी घेण्यासाठी लिहिण्याची सोय आहेच की.

दिनवैशिष्ट्यांबद्दलः सुचवणं ठीक आहे. पण ते घ्याच हा आग्रह कसा काय धरता येईल? त्याचा निर्णय (आणि जबाबदारीही) लिहिणारा माणूसच घेणार.

अजो१२३ Fri, 07/03/2014 - 12:50

In reply to by मन

मी काही चांगली दिनवैशिष्ट्य लक्षात आणून दिली तर त्यातली एखाद वगळता इतरांची दखलही घेतली गेली नाही.

ही जर तक्रार असेल तर (बाकीच्या प्रतिसादावरून तसे वाटते) असे म्हणणे म्हणजे मी त्याला चांगल्या चांगल्या पोरी दाखवल्या पण त्याने एकही पसंद केली नाही या धाटणीची आहे. आली नसेल पसंद, जाऊ द्या.

मन Fri, 07/03/2014 - 14:06

In reply to by अजो१२३

स्थळं दाखवण्याची तुलना इथं लागू होत नाही. एखाद्या स्थळाला होकार देणं म्हणजे उर्वरित सर्व स्थळं नाकारणं असतं.
इथे तीन चार दिनवसिशिष्ट्ये दिली आहेत; म्हणून अजून कुणी वेगळी पाच सात सुचवली तर त्यासाठी नकार अपेक्षित नाही.
आय मीन, साइट त्यांच्या मालकीची आहे; ते कधीही नकार देउ शकतातच; पण स्थळ सुचवणे आणि दिन्वैशिष्ट्ये ही तुलना
उचित ठरत नाही.

अनामिक Fri, 07/03/2014 - 14:31

In reply to by मन

+१

पण ह्याच बरोबर स्थळं आणि संस्थळं ह्यात 'सं' चा फरक आहे तो लक्षात घ्यावा. आणि हा 'सं' संपादकाचा असल्याने दिनवैशिष्ट्यात काय यावे हे तेच ठरवतात हेही लक्षात घ्यावे.

'न'वी बाजू Sat, 08/03/2014 - 16:42

In reply to by अनामिक

नाही म्हणजे, हे असले लॉजिक (विशेषतः आमच्याकालीन आजोबापिढीत) तेथे खूपच लोकप्रिय असल्याचे आठवते, म्हणून विचारले.

शहराजाद Fri, 07/03/2014 - 16:49

In reply to by मन

उगी उगी मनोबा, असा रुसू नको. अरे संपादक आपले कनी? पाहिजे तर ऋ. ना जाऊन सांग. म्हणाव, आमचेपण दिनविशेष तुमच्यात घ्या. हा का ना का.

'न'वी बाजू Sat, 08/03/2014 - 16:34

In reply to by अजो१२३

हा प्रकार म्हणजे त्याला चांगल्या चांगल्या (व्हॉटेवर द्याट मे मीन) पोरी दाखवल्यावर त्याने अगदी त्या सगळ्या नाही, तरी त्यांपैकी बहुतांश पसंत करून त्या (पसंत केलेल्या) सगळ्याजणींशी लग्न करायला हवे होते, अशी अपेक्षा करण्यातला आहे.

मिहिर Fri, 07/03/2014 - 12:36

In reply to by अजो१२३

मला वाटते, की संपादक त्यांच्या सोयीने जेव्हा ऑनलाईन येतात तेव्हा दिनवैशिष्ट्य बदलतात. कधीकधी (विशेषतः शनिवारी) बराच वेळ झाला, तरी ते बदललेले दिसत नाही. पण मला यात तक्रार करण्यासारखे काही वाटत नाही.

आडकित्ता Fri, 07/03/2014 - 13:54

In reply to by अजो१२३

कमळाच्या क ला एक काना, वर एक मात्रा, को, र रड्याचा, डब्ब्याचा ड, त्याला काना डा. हा झाला कोरडा.
मग स ला दुसरा उकार सू, रड्याचा र, सूर.

'कोरडा सूर' असे लिहायचे. की झाले!

अजो१२३ Fri, 07/03/2014 - 14:26

In reply to by आडकित्ता

हे झाले कोरडा सूर. पण हे मी विचारले नव्हते. लेखी भाषेत कोरडा सूर असे विचारले होते.

आडकित्ता Fri, 07/03/2014 - 21:08

In reply to by अजो१२३

अहो,

लेखी भाषेत कोरडा सूर कसा लिहिता येईल?

असे तुम्ही विचारले. लिहिलेल्या शब्दांतला कोरडेपणा कसा ऐकवता येईल असं म्हणायचंय का तुम्हाला?
तसं असेल, तर मात्र कठिणेय!
कानावर आदळलेल्या शब्दांचा अर्थ, त्यातले सूर, बिटविन द लाईन्स इ. ऐकणे हे ऐकणार्‍यावर असते..

'सुनने की मोहलत मिले तो आवाज है पत्थरोंमें
उजडी हुई बस्तीयों में आबादियाँ बोलती है । '

ऐसीवर भाषेबद्दलचा एक धागा काढणारे तुम्हीच ना?

अजो१२३ Sat, 08/03/2014 - 14:32

In reply to by आडकित्ता

मी लिहिले -
लेखी भाषेत कोरडा सूर कसा लिहिता येईल?

तुम्ही वाचले -
लेखी भाषेत, "कोरडा सूर" कसा लिहिता येईल?

मग मी म्हणालो
"लेखी भाषेत कोरडा सूर" कसा लिहिता येईल? असे मी विचारले होते ते सांगा. थोडेक्यात ते लेखी भाषेत चे पण काने मात्रे सांगा.

बाकी भाषेची दौबल्ये दुर्लक्षून भाषिकाला बडवायची सवय सार्वत्रिक आहे.

ऋषिकेश Fri, 07/03/2014 - 14:48

In reply to by अजो१२३

दिनवैशिष्ट्य बदलणे ही एखाद्या विदागारातून इथे आपोआप झळकेल अशी क्रिया/रचना नाहीये.
दररोज काही ठराविक संपादक त्या विभागातील माहिती, आपल्या सोयीनुसार शोधुन, संपादित करून मॅन्युअली टंकतात. वेळेच्या उपलब्धतेनुसार हे पुढे मागे होतेच - होईलच, त्याला सध्यातरी इलाज दिसत नाही. (काही दिवसांचे वैशिष्ट्य तर द्यायचेही राहिले होते).

भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारपर्यंत दिनवैशिष्ट्य बदलण्याचा शक्य तितका प्रयत्न असतो - राहिल.

मिसळपाव Fri, 07/03/2014 - 18:49

In reply to by ऋषिकेश

एक मिनीट हं, जरा खातरजमा करून घेतो;
१. आपल्या खिशातल्या दमड्या आणि लाखमोलाचा वेळ खर्च करून संचालक आणि संपादक आपल्याला हे व्यासपीठ फुकटात उपलब्ध करून देतात
२. दिनवैशिष्ट्य हे सदर चालवतात. हे कुठुनहि कॉपी/पेस्ट करता येत नाही. जमवाजमव करायला लागते - ला. मो. वे. ख. क.
३. त्यावर इथे सभासद "माझ्या सुचवण्या का नाही घेतल्या", "भारतीय प्रमाणवेळेनुसार बदलंत नाहीत" (कोरड्या सुरात!) हे मुद्दे मांडताहेत.
४. आणि संपादक ".......भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारपर्यंत दिनवैशिष्ट्य बदलण्याचा शक्य तितका प्रयत्न असतो - राहिल........." अशी सेवावृत्तीने ग्वाहि देतायत.

बरोबर ना? माझ्या समजुतीत काही घोटाळा नाही ना??? sighhhhhhh........................

अजो१२३ Sat, 08/03/2014 - 14:27

In reply to by मिसळपाव

"भारतीय प्रमाणवेळेनुसार बदलंत नाहीत" (कोरड्या सुरात!) हे मुद्दे मांडताहेत.

कोरड्या सुरात म्हणजे तक्रार न करणार्‍या सुरात असे मला लिहायचे होते हो!

अस्वल Tue, 13/05/2014 - 23:47

एखादी प्रतिक्रियांची माळ उदा. ही कोलॉप्स/एक्स्पांड (मिट/उघड?) करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य होइल का?
बरेचदा प्रतिक्रियांमधे विंटरेस्टिंग पण वेगळे विषय चर्चिले जातात. जर एखादी प्रतिक्रिया आणि तिच्या उप-प्रतिक्रिया ही माळ मिटता आली, तर प्रतिक्रियांचा संपूर्ण आढावा सहज घेता येतो, स्क्रोलिंगही वाचते.

'न'वी बाजू Tue, 13/05/2014 - 23:48

In reply to by अस्वल

बरेचदा प्रतिक्रियांमधे विंटरेस्टिंग पण वेगळे विषय चर्चिले जातात.

थोडक्यात, अवांतर म्हणा ना!

अस्वल Tue, 13/05/2014 - 23:50

In reply to by 'न'वी बाजू

"रोचक" म्ह्णायचं होतं. पण त्या शब्दाबद्दल आमचं अस्वली मत हे आहे, म्ह्णून टाळला तो शब्द!

'न'वी बाजू Tue, 13/05/2014 - 23:52

In reply to by अस्वल

स्वाक्षरी बदला!

'झुरळाच्या मिशा आणि झुरळाचेच पाय' अशी करा.

आहे काय, नि नाही काय?

............सा… Tue, 13/05/2014 - 23:55

In reply to by अस्वल

हाहाहा मिशा फेंदारुन :D
.
.
.
पुढची पीढी "फेंदारलेले, थोबाड, निगरगट्ट, ढुंगण" वगैरे अनवट शब्द कशी शिकणार कोणास ठाऊक. काळजी वाटते कधी कधी. :)

'न'वी बाजू Wed, 14/05/2014 - 00:24

In reply to by ............सा…

"फेंदारलेले, थोबाड, निगरगट्ट, ढुंगण"

"ओक, लेले, काळे, फडके" या चित्पावन (उप)नामावलीप्रमाणेच, वरील आवली ही मधील स्वल्पविराम गाळून वाचण्याकरिता रोचक आहे.

(चित्रपटाचे टैटल म्हणूनही वाईट नाही. 'दो आँखे बारह हाथ'च्या धर्तीवर. किंवा, कदाचित, 'ये रेशमी ज़ुल्फ़ें, ये शर्बती आँखें'च्या वाटेने जाणार्‍या एखाद्या गीताकरिता प्रेरणा म्हणूनही खपून जाईल.)

(पेटंट / कॉपीराइट, जे काही असेल ते, घेऊन टाका पटकन. दुसर्‍या कोणीतरी ढापण्याअगोदर.)

---------------------------------------------------------------------------------------------------------
'काळे' म्हणजे चित्पावनच का? याबाबत किंचित साशंक आहे.

'ढापणे' म्हणजे 'चोरणे' / 'परवानगीशिवाय उचलणे'. 'हा ढापण्या कोण?' असा प्रश्न मेहेरबानी करून विचारू नये; उत्तर मिळणार नाही.

बॅटमॅन Wed, 14/05/2014 - 01:05

In reply to by 'न'वी बाजू

ढापणे' म्हणजे 'चोरणे' / 'परवानगीशिवाय उचलणे'. 'हा ढापण्या कोण?' असा प्रश्न मेहेरबानी करून विचारू नये; उत्तर मिळणार नाही.

एतत्सदृश प्रश्न स्वतः इतिहासाचार्य राजवाड्यांनी विचारल्याचे त्यांवर आधारित लेखात नमूद आहे. हरियाणा हे प्रदेशनाम अश्रुतपूर्व असल्याने तळटीपेत त्यांनी "हा हरिअण्णा किंवा हरिअप्पा कोण?" असा प्रश्न विचारला होता म्हणे.

बॅटमॅन Tue, 13/05/2014 - 23:51

In reply to by अस्वल

एखादी प्रतिक्रियांची माळ उदा. ही कोलॉप्स/एक्स्पांड (मिट/उघड?) करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य होइल का?

श्रेणीभारादलसगमना सा ह्यदृष्टापि तेन ;)

अस्वल Wed, 14/05/2014 - 01:00

In reply to by बॅटमॅन

मूळ प्रतिक्रिया (वड )
--------------------पारंबी १
-------------------------पारंबी २
------------------------------पारंबी ३
------------------------------पारंबी ४
-------------------------------------पारंबी ५
------------------------------------------पारंबी ६
……
आत्ता इथे पारंब्या उत्तम प्रत्रिक्रिया असू शकतात आणि त्यातून माहितीदेखील मिळू शकते, तेव्हा त्यांना कमी (अवांतर इ.) श्रेणी देऊ शकत नाही.
इथे मला मूळ प्रतिक्रिया मिटता आली, तर एकही पारंबी दिसू नये. (श्रेणी कितीही असली तरीही) हे अभिप्रेत आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 14/05/2014 - 01:03

In reply to by अस्वल

किंचित तक्रारवजा सूर लावला तर धागा वेगळाही करता येईल. पण सध्या सदस्यांना या पारंब्या मिटवून ठेवण्याची सोय नाही (आणि उपलब्ध करून द्यायला जमतही नाही).

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 14/05/2014 - 01:01

कोणत्याही दिवसाचं दिनवैशिष्ट्य सगळे दिवस उपलब्ध असावं म्हणून बारा महिन्यांची बारा पानं करण्याचं काम सुरू आहे. मे महिन्याचं इथे. जानेवारी-एप्रिलचा विदा बहुतांशी आहे, पुढची पानं बनवून, तिथे विदा भरण्याचं काम सुरू आहे. (मधूनच रस्ता बंद सापडेल.)

अजो१२३ Thu, 15/05/2014 - 10:32

एकदा प्रतिसाद लिहिला कि मागच्या वेळेसचे न वाचलेले नवे म्हणून मार्क झालेले प्रतिसाद कोणते ते ओळखता येत नाही. म्हणून प्रतिसादाची विंडो वेगळी न उघडता तिथल्या तिथे उत्तर देता यावे. मग धागा शेवटपर्यंत वाचून झाला कि 'नविन लेखन' कडे जावे व तोपर्यंत आलेले नवे प्रतिसाद पाहता. अर्थात इतके अ‍ॅक्टिव, म्हणजे हे करावे लागावे इतके अ‍ॅक्टिव, थ्रेड ऐसीवर नसतात.

अस्वस्थामा Fri, 31/07/2015 - 15:09

खरड फळ्यावरवर प्रत्येक खरडीत दिसणारे सदस्यांचे फोटू दिसू नयेत असे करता येईल काय ?
म्हंजे,
१. ते जागा खातायत आणि प्रत्येक खरडीमध्ये उपयोगी असे नाहीत.
२. ते डिस्ट्रॅक्शन आहेत.
३. जर ऑफिस वगैरे मध्ये खफ उघडला तर चित्रे शेजार्‍या-पाजार्‍याचे लक्ष वेधून घेतात उगाचच.
४. छोटी खिडकी केली इतर काही करत खफ पहायला तर चित्रे त्रासदायक वाटतात.

ही जागा सूचनांसाठी आहे असे कळाले म्हणून इथे लिहितोय.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 31/07/2015 - 19:37

In reply to by अस्वस्थामा

ही चित्रं तिथून काढणं सोपं आहे.

ही चित्रं काढली तर खरडवह्यांमधली चित्रंही गायब होतील. याचा कोणाला त्रास होणारे का? (मला किंचित होतो, कारण मी नावं बघण्यापेक्षा प्रोफाईल फोटो चटकन वाचू शकते.)

-प्रणव- Thu, 07/04/2016 - 11:58

नवीन आलेल्या सगळ्या प्रतिसादांचं बॅकग्राऊंड एखाद्या फिक्या पण लक्षवेधी रंगात करता येईल का?

सापडायला सोपे जातील.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 07/04/2016 - 18:55

इथला डीफॉल्ट मराठी कीबोर्ड गूगल च्या मराठी किबोर्ड सारखा करता येईल का? तो वापरायला अजून सोपा आहे.

याबद्दल बहुसंख्येचं मत काय आहे त्यावर अवलंबून आहे. व्यक्तिशः मी हे दोन्ही कीबोर्ड्स वापरत नाही. पण त्यातल्यात्यात मला सध्याचा गमभन कीबोर्ड गूगलच्या कीबोर्डपेक्षा बरा वाटतो. गूगल-इनपुट सेवा आपापल्या विंडोज कंप्यूटरवर चढवता येते असं प्राथमिक गूगल सर्चमधून दिसलं. ज्यांना ते सोयीचं वाटतं त्यांना हे करता येईल असं वाटतं.

नवीन आलेल्या सगळ्या प्रतिसादांचं बॅकग्राऊंड एखाद्या फिक्या पण लक्षवेधी रंगात करता येईल का?

तांत्रिकदृष्ट्या मला झेपेल का ही पुढची गोष्ट; ते दिसायला कसं दिसेल यावर अवलंबून आहे. सध्या सगळ्या नवीन प्रतिसादांच्या उजव्या बाजूला 'नवीन' असा लाल शब्द दिसतो.

कोणी काय श्रेणी दिली आहे ते दिसेल का?

जर शोधायची वेळ आली तर शोधता येतं हो व्यवस्थापकांना. तेवढा वेळ एरवी कोणी घालवत नाहीत ही निराळी बाब.