अशा लेखांतून काय साध्य करायचे आहे?

मी ऐसी अक्षरेचा गेल्या वर्षीपासून सदस्य आहे. वाचनाची आवड आहे म्हणून सदस्य झालो. वेळ मिळेल तसा वाचत असतो. अलीकडे सतीश वाघमारे यांचे पुरोगामी महाराष्ट्र आणि जयंती हे दोन लेख वाचनात आले. लेखकाची शैली उत्तम आहे. लेख ललित या श्रेणीत आहेत. याचाच अर्थ ते काल्पनिक असावेत. पण लेखा खालील प्रतिक्रियांतून लेख सत्य घटनेवर आधारित आहेत, असा आभास निर्माण होतो. दोन्ही लेखांचा रोख पाहता, हे लेख निर्भेळ आहेत, असे म्हणवत नाही.

दोन्ही लेखांत विसंगती दिसून येते. कल्पनारम्यतेतून ती आली असावी, असे दिसते. पण त्यातून चुकीचा जातीयवादी संकेत जातो. तो घातक आहे. पुरोगामी महाराष्ट्र या लेखाचे उदाहरण पाहू या. बौद्धांना लग्नसमारंभात बुद्ध वंदना लाऊडस्पिकरवर म्हणण्यास कशी बंदी आहे, याचे वर्णन या लेखात येते. चंदरभौ नावाचे एक पात्र या दडपशाहीला विरोध करताना म्हणते : "साउंड लावायचा. नायतं आय झवून टाकतो येकेकाची... बुद्ध वंदना आयकायची नसंल तर शेमणं घाल म्हणाव कानात. तुमी गांड सांभाळा हाणतोच येकायेकाची... एका बापाचे असाल तर या येक येक या... आयी झवतो..."

आता विसंगती काय ते पाहा. या गावातले गावकरी इतके जात्यंध आहेत की, ते बुद्ध वंदना आपल्या कानी पडू नये म्हणून लाऊड स्पीकर बंद पाडतात! असे हे गावकरी एका दलित व्यक्तीच्या तोंडून अशा शिव्या ऐकून घेतात!! गावक-यांचा कडवटपणा पाहता, त्यांनी "शेमणं, माय झवणं, गांड सांभाळ" असे शब्द वापरणा-या चंदरभौचा मुडदाच पाडला असता.

जयंती या लेखात कोणी भोसले नावाचा राष्ट्रवादीचा स्थानिक नेता आंबेडकरांची जयंती उत्सवानिमित्त आनदं शिन्दे यांच्या गाण्याचा कार्यक्रम ठेवतो. त्यात आनंद शिन्दे हे भोसलेचे कौतुक करणारे शेर मारतात. त्याबद्दल लेखातील पात्राला चीड येते. कोणी भोसले खरोखरच आंबेडकर जयंती साजरी करीत असेल, तर महाराष्ट्रात मोठी क्रांती आली आहे, असे म्हणायला हवे. या घटनेचे खरे तर स्वागत करायल हवे. लेखक मात्र, शेरोशायरीचे निमित्त करून संताप व्यक्त करतो. जातीयवादाचे विष आपल्या मनातून उतरत नाही, हेच खरे.

असे लेखन करून लेखकाला काय साध्य करायचे आहे?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
2.333335
Your rating: None Average: 2.3 (3 votes)

मला प्रश्न असा पडला की त्या त्या लेखांवर हे प्रश्न विचारण्याऐवजी, एक स्वतंत्र धागा काढून नक्की काय साध्य करायचं आहे? या प्रश्नाचं उत्तर लेखात येणं अपेक्षित होतं. नाहीतर इतरांची तथाकथित चूक दाखवताना आपणही तीच करणं याने ती चूकच रद्दबातल होण्याचा धोका आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्री. घासकवडी,

या लेखांसंबंधी स्वतंत्र धागा निर्माण करण्याची माझ्या दृष्टीने दोन कारणे आहेत.

  • १. या दोन्ही लेखामागील हेतू मला संशयास्पद वाटला. अत्यंत नियोजनपूर्वक लेखांची मांडणी करण्यात आली आहे. एका लेखात संभाजी महाराजांच्या फ्लेक्सचा नकारात्मक उल्लेख येतो. तर दुसèया लेखातील खलनायक पात्राचे आडनाव भोसले असे दाखविले गेले आहे. ही एक प्रवृत्ती आहे. ती लक्षात आणून देण्यासाठी स्वतंत्र लेख असावा, असे मला वाटते.
  • २. हे लेख जुने असल्यामुळे संकेतस्थळावरील यादीत बरेच मागे गेले आहे. त्या लेखांखाली प्रतिक्रिया दिली असती, तर ती जास्तीत जास्त वाचकांपर्यंत गेली नसती. त्यामुळे स्वतंत्र लेख लिहिणे मला योग्य वाटले. मी हे लेख उशिरा वाचले, हा म्हटले तर माझा दोष आहे.

जाता जाता : विषय महत्त्वाचा असेल, तर प्रतिक्रियांमधून बाजूला काढून त्याचे स्वतंत्र लेख करण्यात आल्याची उदाहरणे आपल्या संकेत स्थळावर आहेत. हे मी विनम्रपणे आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमची कल्पनाशक्ती अफाट आहे असंच म्हणावं लागेल, कारण कुठल्यातरी फ्लेक्सचा नकारात्मक उल्लेख आणि कोणत्यातरी पात्राचं काहीतरी नाव यातून तुम्हाला व्यापक जातीयवादी संदेश दिसला!

जुन्या लेखावरही प्रतिसाद दिल्यावर तो धागा वर येतो आणि लोकांना दिसतो, आणि ऐसी अक्षरे वाचणाऱ्या कोट्यवधी वाचकांपर्यंत पोचतो.

विषय महत्त्वाचा असेल, तर प्रतिक्रियांमधून बाजूला काढून त्याचे स्वतंत्र लेख करण्यात आल्याची उदाहरणे आपल्या संकेत स्थळावर आहेत. हे मी विनम्रपणे आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो.

अहो आमच्या निदर्शनाला काय आणून देता? आम्ही संपादकच करतो हे उद्योग. तुम्ही जर त्या लेखावर प्रतिसाद टाकला असता आणि आम्हाला तो पुरेसा महत्त्वाचा वाटला असता तर आम्ही केला असता स्वतंत्र लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...वाचणाऱ्या कोट्यवधी वाचकांपर्यंत पोचतो.

शाब्बास! इस्कू बोलताय अ‍ॅम्ब्युलन्स!!! राजेशसाब, लो येम इजे क्राईम!!! Smile

आम्ही संपादकच करतो हे उद्योग.

'संपादकीय उद्योग' यावर एक निराळा स्वतंत्र धागा आला पायजेल!!!
-जनहितार्थ याचिका
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...जुन्या लेखावरही प्रतिसाद दिल्यावर तो धागा वर येतो आणि लोकांना दिसतो, आणि ऐसी अक्षरे वाचणाऱ्या कोट्यवधी वाचकांपर्यंत पोचतो..

हे आम्ही पहिलेच्छूट माहिती करून घ्यायला पाहिजे होतं. पण आम्हाला सूचल नाही.

...अहो आमच्या निदर्शनाला काय आणून देता? आम्ही संपादकच करतो हे उद्योग...

संपादक होणारी माणसे थोर असतात आणि त्यांचे उद्योगही थोर असतात, असे कोणी तरी म्हटले आहे. या ‘कोणी तरी'च्या म्हणण्यावर आमची नितांत श्रद्धा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धागाकर्त्याने उभे केलेले प्रश्न महत्वाचे आहेत?

की वेगळा धागा, की तिथेच प्रतिक्रिया हा मुद्दा आधी तडीस नेला पाहिजे? मग लगीन मूळ प्रश्नाचं..

धागा आणि चर्चा वाचून पडलेले उपरोक्त प्रश्न उभे करण्यासाठी नवा धागा काढावा का?

Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भाई-बहन लोग आपून आया है.
आपून को आपका ये धागा अच्छा नहीं लगा. फिर भी प्रतिसाद दे दिया.

सगळ्यांना दिदींची हात जोडून पुन्यांदा आणि पुन्यांदा इनंती अशी आहे की, आपल्या आपले बोला. आपल्या नाय म्हणायचे नाय. कारण काय तर आपल्याला नाय ऐकायची सवै नाय. नाय बोलाल तर गडबड पसरून जाईल. करिता, आपले बोला.

तुम्ही लोक आपल्याला आपले बोलाल तर आपून त्याची परतफेड करणार. साला, सर्वांचा मनोरंजन करणार. आपल्या जवळ लै चांगल्या चांगल्या गोष्टी है. आपण सगळ्यांना दाखवाय करिता तैयार है. बोले तो अपना हुनर बद्दल आपून हे सगळा बोलले.

आपला प्रतिसाद एकदम झक्कास है बॉस. लै लै भारी.
अपना इल्लम याद रखना : बोले तो, जयहिन्द बोलने का और चूप रहेना का.

-- अदिती दिदी

(आधारित)

०. आम्ही असंच रापचिक हिंदी बोलतो. आमच्या ठाण्यात यालाच रापचिक म्हणतात.
१. जालावर जेवढं दाखवता येण्यासारखं आहे तेवढंच दिसेल; उगाच खरडी-व्यनि करून डोकं खाऊ नये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>> या गावातले गावकरी इतके जात्यंध आहेत की, ते बुद्ध वंदना आपल्या कानी पडू नये म्हणून लाऊड स्पीकर बंद पाडतात! असे हे गावकरी एका दलित व्यक्तीच्या तोंडून अशा शिव्या ऐकून घेतात!! गावक-यांचा कडवटपणा पाहता, त्यांनी "शेमणं, माय झवणं, गांड सांभाळ" असे शब्द वापरणा-या चंदरभौचा मुडदाच पाडला असता. <<

ह्या व्यक्तीला जोरदार मारहाण होते असा मूळ लिखाणाचा शेवट आहे. आता मुडदा पाडावा की जबर मारहाणीवर भागवावं हा निर्णय लेखकाचा आहे. महत्त्वाचा मुद्दा हा की तुमची अपेक्षा 'गावातले उच्चवर्णीय एका दलिताकडून असली भाषा सहन करणार नाहीत' अशी असली तर ती लेखात कमीअधिक प्रमाणात पुरी होते असंच म्हणावं लागेल.

>> कोणी भोसले खरोखरच आंबेडकर जयंती साजरी करीत असेल, तर महाराष्ट्रात मोठी क्रांती आली आहे, असे म्हणायला हवे. या घटनेचे खरे तर स्वागत करायल हवे. लेखक मात्र, शेरोशायरीचे निमित्त करून संताप व्यक्त करतो. जातीयवादाचे विष आपल्या मनातून उतरत नाही, हेच खरे. <<

आता इथे गंमत पाहा. 'भोसले आडनावाच्या माणसानं आंबेडकर जयंती साजरी केली तर महाराष्ट्रात मोठी क्रांती झाली असं म्हणायला हवं' असं तुम्ही म्हणता. तेव्हा तुमच्या मनातदेखील जातीयवाद आहे असं म्हणता येईलच की. कारण ह्या आडनावाचा माणूस असं करूच शकणार नाही असं त्यातून ध्वनित होतंय. आणखी गंमत म्हणजे लेखात नक्की काय म्हटलं आहे ते पाहिलं, तर असं लक्षात येईल की लेखकाला ह्या घटनेतला दांभिकपणाच दाखवायचा आहे. म्हणजे एक प्रकारे लेखक आणि तुम्ही एकच गोष्ट वेगळ्या पद्धतीनं म्हणताहात. उदा : हे पाहा -

मला वैताग वैताग वाटू लागला. मामाचा मटका , खतरा रंडीबाजी , पोलीसानी काढलेली वरात आठवू लागली.

किंवा हे -

मामाने गळा भेट घेतली . प्रेमपूर्वक दारु पुसली. नकारावर हसला. त्याच्या लेखीची आठ मतं फिक्स झाली.

म्हणजे निमित्त शेरोशायरीचं असो अथवा नसो, पॉइन्टाचा मुद्दा काय, तर निवेदकाला मामा भोसले आधीपासून माहीत आहे आणि चाललेल्या समारंभातला मतांसाठीचा दांभिकपणा तो ओळखतो.

थोडक्यात काय, तर लेखक आणि तुम्ही यांच्या दृष्टिकोनात फारसा फरक करता येत नाही. तद्वत तुमचे मुद्दे फारसे दखलपात्र वाटत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

...आता इथे गंमत पाहा. 'भोसले आडनावाच्या माणसानं आंबेडकर जयंती साजरी केली तर महाराष्ट्रात मोठी क्रांती झाली असं म्हणायला हवं' असं तुम्ही म्हणता. तेव्हा तुमच्या मनातदेखील जातीयवाद आहे असं म्हणता येईलच की...

‘भोसले आडनावाच्या माणसानं आंबेडकर जयंती साजरी केली तर महाराष्ट्रात मोठी क्रांती झाली असं म्हणायला हव...' या वाक्यात भोसले आडनाव मुद्दाम घातलेलं नाही. वाघमा-यांच्या लेखात ते आहे म्हणून ओघाने आलं आहे. बाकी महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील कोणतंही आडनाव या वाक्यात घातलं तरी अर्थ बदलत नाही! उदा. कुलकर्णी, जोशी, दुबे, शर्मा, यादव, खत्री, घोष, बसू, सुब्रमण्यम, रेड्डी, रॉय यातील कोणतंही आडनाव या वाक्यात घालून पाहा. बरे आंबडेकर जयंतीच्या बाबतीतच ही स्थिती आहे, असं नव्हे. सगळ्या महापुरूषांच्या बाबतीत हीच स्थिती आहे. आणि ही सगळ्यांत मोठी गंमत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तर लेखक आणि तुम्ही यांच्या दृष्टिकोनात फारसा फरक करता येत नाही. तद्वत तुमचे मुद्दे फारसे दखलपात्र वाटत नाहीत.

सहमत.

मी ऐसी अक्षरेचा गेल्या वर्षीपासून सदस्य आहे. वाचनाची आवड आहे म्हणून सदस्य झालो. वेळ मिळेल तसा वाचत असतो.

हे आवडलं, हे करत रहावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशा ललित आणि सामाजिक लेखांतून कल्पनामिश्रित सत्यकथा कथन करणे आणि एक नवा अनुभव जालिकरांना देणे या व्यतिरिक्त आणखी काय हवे तेजा यांना? फिर मार्क किधर है?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नावरे आवरीता!

संदर्भ : फिर मार्क किधर है?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

आपण नक्की कोण हे समजल्याने बाकीचे आक्षेप आपसुक मागे घेत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नावरे आवरीता!

...अशा ललित आणि सामाजिक लेखांतून कल्पनामिश्रित सत्यकथा कथन करणे आणि एक नवा अनुभव जालिकरांना देणे या व्यतिरिक्त आणखी काय हवे तेजा यांना?...

सत्य हे कल्पनामिश्रितही असतं, हे महान सत्य पहिल्यांदाच कळलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तमसो मा तेजोमय..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नावरे आवरीता!

कॉलींग वाघमारे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'नव्या सदस्यांच्या लिखाणाला उत्तेजन देण्या ऐवजी त्यांना वेडेवाकडे, अस्मिताभंग करणारे प्रतिसाद देऊन त्यांचा तेजोभंग करण्याची दुष्ट प्रवृत्ती 'ऐसी अक्षरे' सारख्या धुतल्या तांदळांसारख्या संकेतस्थळापर्यंतही पोचली आहे काय?' या नावाचा एक धागा काढावा अशी संपादक मंडळाला नम्र वगैरे विनंती आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

या धाग्यामुळे दोन छान लेख वाचायला मिळाले. धन्यवाद तेजा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

या धाग्यामुळे दोन छान लेख वाचायला मिळाले. धन्यवाद तेजा.

जख्म देणे का खास तरिका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0