कवी विरुद्ध कविता

स्वस्थता नाही जिवाला, षोक ठरला जीवघेणा
सोडुनी कवितेस सार्‍या संपवाव्या शब्दवेणा ||धृ||

सर्जनाने होत होतो वर्णनापल्याड पुलकित
होत गात्रे तृप्त अन्‌ सौदामिनीने देह उर्जित
सौख्य निमिषार्धात सरते, रिक्तता सरता सरेना ||१||

का असा छळवाद माझा मांडला आहेस, कविते?
दंश हा कसला तुझा, ज्याने विषाची झिंग येते?
पोखरे तनमन तरीही हे व्यसन सुटता सुटेना ||२||

मी किती घासू-पुसू, आकार देऊ कल्पनांना,
खेळवू दररोज ह्या न्हात्या-धुत्या पद्यांगनांना?
यापुढे उठणार नाही बाव्हळ्यांना काव्यमेणा ||३||

यापुढे, कविते, तुला शृंगारणे जमणार नाही
चंचले, दुसरा कवी बघ; मी तुला पुरणार नाही
मान्य, तू चिरयौवना, पण काळ माझ्याने अडेना ||४||

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

वा! सुंदर रचना.. बरेच दिवसांनी वृतबद्ध-छंदबद्ध कविता वाचली..

आणि हो! ऐसीअक्षरेवर स्वागत!
येत रहा लिहित रहा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऐसी अक्षरेवर स्वागत.

छंदबद्ध आणि काहीशा जुन्या वळणाची कविता.... (जुन्या म्हणजे जुनाट या अर्थाने नव्हे) वृत्ताला साजेसे शब्दप्रयोग आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओह आनंदकंद वृत्त होय!! तरीच म्हटले वृत्त कळेना Smile छान कविता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'आनंदकंद' कशाने?

हे (जे कोणते असेल ते) 'गालगागा गालगागा गालगागा गालगागा' छापाचे वृत्त आहे.

'आनंदकंद' हे, माझ्या समजुतीप्रमाणे, 'गागालगालगागा गागालगालगागा' छापाचे असते.

(चूभूद्याघ्या).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्चे म्हण्णे बरोबर आहे, पण आनंदकंद हे निव्वळ अक्षरगणवृत्त आहे का याबद्दल मला थोडा अज्ञानजन्य संदेह आहे , शिवाय ही कविता त्या चालीत म्हणायला तादृश अडचण येत नै, म्हणून म्हणालो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मस्तय कविता. आवडली.
हा योगायोग की काही विशिष्ट योजना ठाऊक नाही, पण सगळ्या कडव्यांतली दुसरी ओळ विशेष आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आवडली. मस्तच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0