Skip to main content

स्वामी समर्थ आहेत

सौभाग्यलेणी
अंगारा
पैपाहुणा
सणवार
गोडधोड 
पोथी 
उद्यापन
वेळच्या वेळी सग्गळं काही
शंभर आवडी निवडी  
नातवंडी आणि पत्वंडी
गावामध्ये दवंडी 
स्वामी समर्थ आहेत
जग पुढे चाललंय
(म्हणजे कै हो? )
शेवटी नातू होऊदे म्हणजे झालं
कार कशाला बुडाशी 
आमचा काळ भारी 
तुमचा काळ फालतू
पण विडीओ च्याट लावून देई 
बारशाला नवीन साडी      
ईश्वरा सोडव रे बाबा
आता काही इच्छा नाही राहिली
शेवटी 
स्वामी समर्थ आहेत 

विशेषांक प्रकार

आतिवास Thu, 15/11/2012 - 14:08

कविता कळली नाही.
कळण्याचं एक वेळ सोडून देता येईल, तसं फारसं काहीच कळत नाही म्हणा मला - पण पोचलीही नाही ती माझ्यापर्यंत!

गवि Thu, 15/11/2012 - 14:31

In reply to by आतिवास

मीही कवितेच्या बाबतीत अर्थापेक्षा काय (अ‍ॅबस्ट्रॅक्ट)जाणवतंय याला महत्व देतो. तरीही माझ्या कपॅसिटीत ही कविता नाही जाणवू शकली..

काही घटना किंवा तत्सम संदर्भ असू शकेल जो तुम्हाला, मला माहीत नाही..

नगरीनिरंजन Thu, 15/11/2012 - 16:15

एक आजी आठवली. :)

तिरशिंगराव Thu, 15/11/2012 - 17:05

कविता एखाद्या विशिष्ठ व्यक्तीला डोळ्यासमोर ठेवून लिहिली आहे असे वाटते.
आणि तसेही कुठलेही 'स्वामी' सगळ्याच बाबतीत समर्थच असतात!

राजेश घासकडवी Thu, 15/11/2012 - 19:26

दणदणीत दीर्घ कविता होवू शकते.
हे तर केवळ जोत आहे . ज्यावर एक बुलंद इमारत उभी राहू शकते .

हे पटलं. मात्र श्रद्धा-अंधश्रद्धा यापेक्षा एका विशिष्ट व्यक्तीच्या चित्रणातून एकंदरीत आज्जीबाईंचं चित्रण यातून होऊ शकेल. सुरूवात उत्तम झालेली आहे. मला वाटतं ही कविता अनेक भागांची व्हावी. या आजींचा भूतकाळ काय होता? याचंही चित्रण केलं तर त्या व्यक्तिमत्वाचे अनेक पदर दिसून येऊ शकतील.