हिरवं झालं रानं
हिरवं झालं रानं
हिरवं झालं रानं
तिथंच गाठलं त्यानं
ग बाई
तिथंच गाठलं त्यानं ||धृ||
पायवाट नागमोडी
पांधीतून जायी गाडी
शेतावर सावरूनी
चालले बांधावरूनी
एकल्याच नारंला
तिथंच गाठलं त्यानं ||१||
मोठी झुंबड तिथं झाली
आधाराला नाही सावली
व्दाड वारा पदराशी
खेळला, पाडला पायाशी
सावरू तरी मी कशी
त्यानं ठरवलं झोंबणं ||२||
आधी जरा घाबरले बावरले
पण मी मला नाही सावरले
त्याला अंगाशी ओढले
त्याच्यामधीच भिजले
अस्सा तस्सा आला बरसून
गेला तन चिंब भिजवूनं ||३||
हिरवं झालं रानं
हिरवं झालं रानं ||धृ||
- पाषाणभेद
(पुर्वप्रकाशीत)
प्रतिक्रिया
मस्त!
हैच्या मारी! मस्त!
हे चालीत नक्की बसेल.. चाल लावली असेल तर रेकॉर्ड करून टाक ना!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
सुंदर
सुंदर
मस्त.
मस्त.
लय भारी!!
लय भारी!!
धन्यवाद!
पल्लवी