मीही वाचलेला एक भयंकर ब्लॉग

चार्ल्स डार्विन नावाच्या एका पुरुषाचा ब्लॉग मी वाचला. ब्लॉग अभ्यासपूर्ण वाटला. म्हणजे किमान लेखन अभ्यासपूर्ण आहे, हे दिसेल याची खबरदारी लेखकाने घेतलेली दिसली. या ब्लॉगवरील मजकूर धक्कादायक आहे. "सर्व माणसे (चक्क ब्राह्मण सुद्धा)पूर्वी म्हणे माकडे होती" या विषयावरीलच लेख तर भयंकरच आहेत. या विषयावर अनेक लेख ब्लॉगवर आहेत. हे लेख वाचून मला भोवळच आली. प्राचीन काळी ब्राह्मण माणसे सुद्धा माकडे होती, असे ह्याच्यातील प्रत्येक लेखात वारंवार सांगितले गेले आहे. तसा दावा करण्यात आला, असे म्हणणे अधिक योग्य राहील. प्राचीन काळातील ब्राह्मणांचे माकड असणे सिद्ध करण्यास डार्विन बुवांनी इंग्रजी आणि परकीय भाषेतील असंख्य उल्लेख लेखात दिले आहेत. हे सारे उल्लेख खरे आहेत का, याबाबत मला तरी संशयच वाटतो. कारण मी असे या पूर्वी कधीही ऐकलेले नाही. कुठे वाचलेले सुद्धा नाही.

चार्ल्स डार्विन यांनी माकड विषयाच्या लेखानमध्ये "ऑन ओरिजिन ऑफ स्पीसीज" या नावाच्या ग्रंथाचा आधार घेतला आहे. या ग्रंथातील अनेक वचने लेखासाठी मोठ्या प्रमाणात घेण्यात आल्याचे दिसून येत होते. असा काही ग्रंथ आहे, हे माझ्या वाचनात आलेले नाही. तज्ज्ञांनी यावर प्रकाश टाकायला हवा. असा ग्रंथ नसेल, तर तसे स्पष्टपणे समोर यायला हवे. आणखीन, असेल तर या ग्रंथात नेमके काय म्हटले आहे, हे तपासून पाहायला पाहिजे आहे. असा ग्रंथ कोणाला माहिती आहे का? असल्यास कृपया सांगावे.

आणखीन एक गोष्ट अशी की, डार्विन बुवांच्या लेखांत The Descent of Man, and Selection in Relation to Sex, या पुस्तकांतील वचनेसुद्धा सुद्धा मला दिसली. इतकेच काय The Expression of the Emotions in Man and Animals या पुतकातील वचने सुद्धा आहेत. माझा यापैकी कोणत्याच ग्रंथाचा अभ्यास नाही. जाणकार लोकांनी या ब्लॉगला भेट देऊन सत्यता तपासून पाहायला पाहिजे हवी. The Descent of Man, and Selection in Relation to Sex आणखीनThe Expression of the Emotions in Man and Animals मधल्या उतार्‍यांचा खरा अर्थ लोकांच्या पुढे यायला पाहिजे आहे, असे माझे स्वत:चे मत आहे.
माझ्या अल्पमती प्रमाणे मी माझे मत या येथे उकलून मांडले आहे. गोड मानून घ्यावे, ही सर्वांना नम्रतेची हात जोडून विनंती तसेच अशा प्रकारचा माझा पहिलाच लेख आहे. हे सुद्धा मी नमूद करून ठेवतो.

मी नवीनच ब्लॉग काढला नाहीये, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (5 votes)

ROFL ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हसू नका...सत्य तपासा, प्रकाश टाका , खरा अर्थ पुढे आणा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगायायायाया _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आपण चार्ल्स डार्वीन यांच्या ब्लॉगचा दुवा दिलेला नाही.
सर्व माणसे पूर्वी माकड होती, यात नवीन काही नाही.

The Descent of Man, and Selection in Relation to Sex आणखीनThe Expression of the Emotions in Man and Animals मधल्या उतार्‍यांचा खरा अर्थ लोकांच्या पुढे यायला पाहिजे आहे, असे माझे स्वत:चे मत आहे.

हा काथ्याकूट दशकानुदशके चालूच आहे. जो तो आपल्या अन्वयार्थाला खरा अर्थ म्हणतो.

मी नवीनच ब्लॉग काढला नाहीये, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.

कुठला ब्लॉग काढलेला नाही ते कुठे सांगितल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यावर प्रकाश टाकायला हवा
साठ्यांच्या प्रकाशला गच्चीवरून टाकू की बाल्कनीमधून टाकून देउ असा विचार करतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आपला धागा अभ्यासपूर्ण आहे. आपण नम्रता जरी बाळगली असली तरी आपल्या लेखनात गाढा व्यासंग दिसतो. नम्रता व विद्वत्ता एकाच वेळी एका व्यक्तीत असणे दुरापास्त पण आपल्या ठायी मात्र ती दिसून येते. डार्विन बुवांच्या ब्लॉगचा दुवा आपण दिला नाही.पण गुगलल्यावर माहीतीचा प्रचंड स्त्रोत आपल्या अंगावर आदळतो.
ब्राह्मण सुद्धा पुर्वी माकड होते हे पचवण्यास जड जात असले तरी डार्विन बुवांच्या समोर ते तसे नव्हते हे सिद्ध करणे कठीण. पण माकडावस्थेतील ब्राह्मण हे गोमांस खात असतील असे वाटत नाही. ते नक्कीच कंदमुळे खात असणार. गोमांस वगैरे खाणे हे उत्क्रांतीतून घडले असावे. असो माझ्या अल्पमतीस एवढेच झेपते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

श्रावण मोडकजी,

दुवा खालीलप्रमाणे आहे

http://www.aboutdarwin.com/

अजून एक दुव्यावर क्लिक केले तरी हा दुवा उघडतो.
http://en.wikipedia.org/wiki/On_the_Origin_of_Species

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL ROFL ROFL
लय भारी!
ह. घ्या. (धक्का का बसला ते कळले नाही... ब्राह्मण चिँपांझी होते असेही कोणी म्हणेल... म्हणेनात का...)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मास्तर, का वाचता एवढं? थोडं कमी वाचत जा गटणे.

आणि वाचायचंच असेल तर काहीतरी चांगलं, उदा: हे असं, वाचत चला. हे नक्की काय तुमच्या पुढ्यात टाकलं आहे यासाठी याच लेखातली काही महत्त्वाची उद्धृतं:

या ब्लॉगाबद्दल ब्लॉगलेखकाचा मित्र हे म्हणाला होता: "If this book were to find general public acceptance, it would bring with it a brutalisation of the human race such as it had never seen before."

याच्यात वाद नाही कि आधी देखील इतिहासात अनेक युद्धे झाली मानव संहार झाला परंतु डार्विन च्या परीकल्पनेच्या प्रभाव खाली इतिहासात पहिल्यांदा युद्धातला विज्ञानाच्या संमतीने कायदेशीर करण्यात आले.

हिटलर वर डार्विनवादाचा खोलवर प्रभाव होता. आणि याचे प्रतीबिंब त्याचे पुस्तक माझा लढा या मध्ये अगदी स्पष्टपणे जाणवते. तो काबुल करतो कि तो डार्विन च्या Struggle for survival या युक्तीवादाने कश्या प्रकारे प्रभावित झालेला आहे. तो म्हणत असे कि जगाच्या इतिहासातून उत्तर जर्नामिच्या युरोपियन समाजाला काढून टाकले तर खाली काय शिल्लक राहील ...फक्त माकडांचा नाच. या वाक्यावरून आपण निष्कर्ष काढू शकतो कि तो किती पक्का डार्विन भक्त होता.

माओ, जगातील मोजक्या भयानक मानव संहार पैकी एक, मानवतेला काळिमा फसवणारे कार्य करणारा कट्टर कम्युनिस्ट कि ज्याच्या प्रत्यक्ष आदेशानुसार १० लाख लोक मारून टाकण्यात आले. आणि इतर २० लाख लोक तुरुंगात सडत, किंवा गायब केले गेले, अगदी सरळ आणि स्पष्टपणे सांगतो चीन चा सोशियालीज्म हा डार्विनिजम वर आणि त्याच्या थेरी ऑफ ईवोल्युशन वर उभा केला गेला आहे…

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

शीर्षकात सुधारणा : मीही वाचलेला भयंकर एक ब्लॉग

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चार्ल्स डार्विन यांची भाषाशैली वाचताना [इतर अनेक ब्लॉग वाचकांना पडलेला प्रश्न] सातत्याने जाणवत राहते की 'चार्ल्स' या मनुष्य-नामामागे कुणीतरी चिम्पान्झी-गोरिलाच असावा आणि तो शतकानुशतके सांप्रत प्राणिसॄष्टीत चालत आलेल्या त्या मनुष्यद्वेषाची मशाल अत्यंत विकृतरित्या पेटवित ठेवत आहे. वाचणार्‍याला काय...मिळते काहीतरी चमचमीत...वाचतात, संताप व्यक्त करतात....ठरल्याप्रमाणे काही चार्ल्सबाबाची(?) उचलून धरतात....बाजू.... मग विसरून जातात....जसा आता चार्ल्स बाबाही ब्लॉगला रामराम करून निर्मात्याच्या गावी गेला आहे....[वर अदिती यांनी त्याचा खून पडल्याची बातमी दिलेली आहेच.]

एकपेशी अमिबा झाले, डायनॉसॉर झाले, जलचर झाले....आता अशा ब्लॉगर्सना भडास व्यक्त करण्यासाठी माणसं आणि बाया सापडले आहेत....तोडत राहतात तारे... त्यांच्यात्यांच्या सापळ्यातून संदर्भेहीन हाडांवर माकडहाड म्हणून विजेरी टाकण्याचा आव आणत.

त्यामुळे भडकमकर मास्तर याना विनंती की, असल्या ब्लॉग्जना भेट दिलीच तरीही त्यातील ते महान मॅटर चघळायच्या लायकीचे असते असे कदापिही मानू नये....वाचावे, आणि संपल्याक्षणीच केसातली ऊ गटकल्यानुसार पचवूनही टाकावे.

- खेचक कुटील

अवांतरः मास्तरांनी सिक्सर मारली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मीही वाचला आहे. त्यातलं लेखन पाहून जात्याधारित उतरंडीच्या विचारसरणीला वैज्ञानिक अधिष्ठान देण्याचं 'सत्कार्य' चालू आहे हे स्पष्ट दिसून येतं. ब्लॉगचं नाव आहे 'रिलेटिव्हिटी - स्पेशल आणि जनरल'. थोडक्यात मराठीत भाषांतर - नातेसंबंध विशेष आणि सामान्य. लेखकाचं नाव आहे आल्बर्ट आइन्स्टाइन. यात निरीक्षक, फ्रेम ऑफ रेफरन्स वगैरे जार्गन असली तरी बिटवीन द लाइन संदेश स्पष्ट होतो. सत्य हे सापेक्ष असतं. आणि निरीक्षकाच्या स्थितीवरून ते ठरतं. म्हणजे थोडक्यात सामाजिक उतरंडीत सर्वोच्च स्थानी असतात त्यांचं सत्य सर्वोच्च, आणि जे खाली असतात त्यांच्या दृष्टिकोनाला काही किंमत नाही. हा उघडउघड ब्राह्मण्याचा पुरस्कार आहे. उगीच नाही त्यांनी इतकी शतकं ज्ञानावर मक्तेदारी सांगितली. त्यातून निर्माण केलेल्या वर्णव्यवस्थेतून कोट्यवधी लोकांना भरडलं गेलं हे कोणालाच नाकारता येत नाही. अशा ब्राह्मण-सत्ता-पुरस्कर्त्या विचारांचं शास्त्रीय समर्थन व्हावं ही लज्जास्पद गोष्ट आहे. अशा व्यक्तीला नोबेल पुरस्कार देऊन गौरव करण्यात शास्त्रज्ञांचा उच्चज्ञात्याभिमान अधोरेखित होतो.

सर्वांनी विचार करून अशा व्यक्तीचा नव्हे, तर त्या व्यक्तीचं नाव घेऊन तिच्या ब्राह्मण्यवादी वृत्तीचा विरोध करावा ही विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या बहुजनद्वेष्ट्या आल्बर्टचा चांगलाच दणदणीत निषेध केला पाहिजे. वेगाला मर्यादा असते असं गृहीत धरून या मनुष्याने सगळे नियमच बदलून टाकले. या अशा सिद्धांतामुळे भारत आणि जगाची प्रगती खुंटलेली आहे. ब्राह्मण हे तसेही अल्पसंख्य आहेत पण बहुजनांचीही प्रगती या अशा मर्यादांमुळे खुंटते याचाही विचार या नराधमाने केला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पण प्रश्न असा येतो की नक्की निषेध कोणाचा करायचा? डार्विनचा निषेध करायचा तर ब्राह्मणी वृत्तीची रेवडी उडवणाऱ्यांच्या विरोधात बोलायचं. म्हणजे पर्यायाने ब्राह्मणांच्या बाजूने बोलायचं. आणि आइन्स्टाइनचा निषेध करायचा तर ब्राह्मणांच्या विरोधात जायचं. आपल्याला यांपैकी एक कोणीतरी निवडलं पाहिजे. कारण दोन्ही बाजूंनी बोलणारे सगळ्यात निषेधार्ह ठरतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या मते यात तुम्ही कोपर्निकसचाही समावेश केला पाहिजे. या कोपर्निकसशिवाय संपूर्ण चित्र मिळणार नाही. त्याच दुष्ट मनुष्याने पृथ्वी सूर्याभोवती फिरते असं सांगितलं. आज स्त्रियांची जी पिछेहाट सुरू आहे ती याच कारणामुळे सुरू झालेली आहे. जेव्हा विश्व पृथ्वीकेंद्री होतं तेव्हा स्त्रियांना प्रचंड मान होता. "यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:" हे तेव्हा सत्य होतं. त्यापुढे तो कोपर्निकसने पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला लावल्यामुळे स्त्रियांचं समाजातलं स्थान घसरलं. स्त्रियांचं स्थान जिथे घसरलं तिथे बहुजन काय आणि ब्राह्मण काय? हे बहुजन-ब्राह्मण असे भेदाभेद मानवनिर्मित आहेत पण स्त्री-पुरूष हा नैसर्गिक भेद आहे. आणि कोपर्निकसच्या दुष्टपणामुळे स्त्रियांना समाजात दुय्यम स्थान प्राप्त झालं आहे. डार्विन आणि आईनस्टाईनच्या आधी त्या निकोलसचा निकाल लावला पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

या जगात इतके भयंकर ब्लॉग लोक लिहीत असतात आणि आपण हातावर हात धरून बसून राहायचं हा एक स्पष्ट भेकडपणा नाही काय?
काहीतरी ठोस कारवाई करायला हवी.

चला, डार्विन, आईन्स्टाईन आणि कोपर्निकस या लोकांच्या ब्लॉगना स्पॅम घोषित करूयात.

कोपर्निकसचा ब्लॉग
http://www.astro.lt/ldangus/straips/kopernik/kopernik.htm

उजव्या कोपर्‍यात स्पॅम असे लिहिले असेल तिथे टिचकी मारावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिंदुगामी विश्लेषण.

हे बहुजन-ब्राह्मण असे भेदाभेद मानवनिर्मित आहेत पण स्त्री-पुरूष हा नैसर्गिक भेद आहे

अतिशय महत्वाचा मुद्दा!
स्त्रियांना परत मानाचे स्थान मिळवण्यासाठी विश्व पृथ्वीकेंद्रित करण्याची गरज आहे. शास्त्रज्ञांनी यावर विचार केला पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

वेगाला मर्यादा असते असं गृहीत धरून या मनुष्याने सगळे नियमच बदलून टाकले.

आपला हा आल्बर्ट स्थनिक पोलीसखात्यात ट्राफिक ड्यूटीवर होता काय?

सहजच विचारले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही. तो बहुदा विचारवंत असावा, एसी ऑफिसात, गुबगुबीत खुर्चीवर बसून तो बहुदा मर्यादा ठरवत असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एइन्स्तिएन February 2012 15:00
डार्विनची बोलती कायमची बंद झाली आहे ;
इंटरनेट च्या माध्यमातून मानव समाजात वितुष्ट
निर्माण करून समाजात फुट पाडण्याचा विघ्नसंतोषी
डाव मी उलथून पाडला आहे; डार्विन नावाच्या भस्मासुराचा
वध करण्यासाठी मला काहीकाळ मानवविरोधी लिखाण करावे लागले .
त्यामुळे काही काळ माझ्यावरही मानवांचा रोष निर्माण झाला होता .
काहींनी तर मला फोन वर धमक्या /शिव्या देखील दिल्या पण मला हें
हलाहल पचवणे भाग होते . डार्विनला उघडे पडण्य साठी मी हें हलाहल
पचवले . डार्विनची जीवनविघातक विचारसरणी/ त्याचे खोटे मानवत्व/ माणूस असल्याची
बतावणी व माकड असण्याचे जेव्हा जगजाहीर होण्याची वेळ आली
तेंव्हा त्याने (त्या माकडाने) फेसबुक आणि ब्लॉग वरून कायमचा गाशा गुंडाळला ..........
हें सर्व करण्या साठी मला माणूस समाजाला दुखवावे लागले . त्या बद्दल मी दिलगीर
आहे . पण खोलवर रुतलेला काटा काढायचा तर स्वतःची कातडी टोकारावी लागते
थोडी कळ काढावी लागते ....ओठावर दात दाबून वेदना सहन कराव्या लागतात
.........पण रुतलेला काटा काढावाच लागतो अन्यथा त्याचे कुरूप होते .....
मित्रहो मी देखील डार्विन या नावाने माणसात द्वेषाचे कुरूप ठरू
पाहणारा विषारी वेड्या बाभळीचा काटा कायमचा उपसून काढला आहे .
काटा काढताना झालेली जखम कालोघात भरून येईल ....सलणारा -खुपणारा
काटा निघणे गरजेचे होते .तो निघाला ....चला आता पुन्हा बंधुत्वाची
वाट चालूया .............एइन्स्ताइन ( सापेक्ष वेडा )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अगायाया..
___/\__

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"सापेक्ष वेडा" भयानक आवडल्या गेले आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लई भारी हो तुम्ही! यापूर्वी धाग्याची विडंबने व्हायची. पण आता तुमचे शिष्यगण प्रतिसादांचीही उत्तम विडंबने करुन गुरुच्या वरताण ठरताहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>असा काही ग्रंथ आहे, हे माझ्या वाचनात आलेले नाही. तज्ज्ञांनी यावर प्रकाश टाकायला हवा. असा ग्रंथ नसेल, तर तसे स्पष्टपणे समोर यायला हवे. आणखीन, असेल तर या ग्रंथात नेमके काय म्हटले आहे, हे तपासून पाहायला पाहिजे आहे. असा ग्रंथ कोणाला माहिती आहे का?<<

समाजात काय चालले आहे त्यावर जळजळीत प्रकाश टाकणारा एक अतिशय माहितीपूर्ण लेख. अशा लेखांमुळेच मराठी आंतरजाल समृद्ध होत असते. थोडे अधिक शोधले असता माकडांनीही ह्या अघोरी माणसाविषयी तक्रार केल्याचे आणि ह्या तथाकथित संशोधकावर शंका घेतल्याचे आंतरजालावर आढळले -

THE DEFRAUDED GORILLA: “That Man wants to claim my Pedigree. He says he is one of my Descendants.”
MR. BERGH: “Now, Mr. Darwin, how could you insult him so?”

ही बातमी १८७१ची आहे. यातले श्री. बर्ग हे American Society for the Prevention of Cruelty to Animals या संस्थेचे संस्थापक होत.

डार्विन यांचे संशोधन खोटे ठरवणारा एक शोधनिबंध इथे सापडेल.

जाताजाता : कोणत्याही मौलिक धाग्यावर अवांतर करणार्‍या आंतरजालावरील काही ज्येष्ठ सदस्यांचा (उदा : श्री. श्रा. मोडक, रा. रा. घासकडवी आणि विक्षिप्त अदिती) निषेध करावा तितका थोडाच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

कोणत्याही मौलिक धाग्यावर अवांतर करणार्‍या आंतरजालावरील काही ज्येष्ठ सदस्यांचा (उदा : श्री. श्रा. मोडक, रा. रा. घासकडवी आणि विक्षिप्त अदिती) निषेध करावा तितका थोडाच आहे.

मी स्वतः इतिहास-विज्ञानाचा अभ्यासक नाही, तज्ञ तर मुळीच नाही. परंतु जर कोणी ब्लॉगातून, साईटीवरून वा अन्य प्राचीन दस्तावेजातून काही सिद्धांत मांडू पहात असेल तर मी शक्य झाल्यास आवर्जून वाचेन. शक्य झाले नाही, कुवतीबाहेरचे वाटले तर सोडून देईन. पण प्रतिसादच अवातंर ठरवून व्यक्तिचा निषेध करणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त धागा!
चिंतातुर जंतूंचे कार्टून पाहून नीत्शे चे उपहासपूर्ण वाक्य आठवले:
"We wish to awaken the feeling of man's sovereignty by showing his divine birth: this path is now forbidden, since a monkey stands at the entrance..”

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाय्ला!
त्या कार्टूनात चिंजं कोणते आहेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

त्या कार्टूनात चिंजं कोणते आहेत?

स्वाभाविक उत्तर असताना तुम्हाला हा प्रश्न का पडावा बरं? तरी तुम्हाला एक क्ल्यू देतो. त्या कार्टूनमध्ये तक्रारकर्ता मी आहे. आता ओळखा. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सदर प्रस्तावातील ब्लॉग हा शब्द दिशाभूल करणारा आहे. चर्चाप्रस्तावकाने दिलेल्या दुव्यांवर ब्लॉग नसून डार्विन या व्यक्तिविषयी इतरांनी नोंदवून ठेवलेली माहिती आढळून आली. चर्चाप्रस्तावक या शब्दाचे प्रयोजन स्पष्ट करतील काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>चर्चाप्रस्तावक या शब्दाचे प्रयोजन स्पष्ट करतील काय?<<

इथे चर्चेत कुठलाही वादग्रस्त मुद्दा यायला नको आहे. कारण एकानं ब्लॉग म्हटलं की दुसरा तो कसा ब्लॉग नाही हे सांगत पुढे येतोच येतो. त्यामुळे तुमचा मुद्दा बाहेरच राहिलेला बरा.
त्या अनुषंगाने झालेला संवाद उडवण्यास हरकत नाही. Smile

श्रेयअव्हेर : http://www.aisiakshare.com/node/1194#comment-15949

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

वादग्रस्त मुद्द्यांपेक्षा कुठच्याही व्यक्तीने, कुठच्यातरी वादाने ग्रस्त आणि त्रस्त होणं हे टाळणं महत्त्वाचं आहे.

त्या अनुषंगाने झालेला संवाद उडवण्यास हरकत नाही.

संवाद उडवण्यापेक्षा संवादास 'अनुल्लेखाने मारणे' हा एका राष्ट्रीय स्वयंसेवी संघटनेचा पवित्रा ध्यानात ठेवणं महत्त्वाचं आहे.

श्रेयअव्हेर : http://www.aisiakshare.com/node/1194#comment-15970

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0